30-06-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - बाबा तुम्हाला ज्ञानाने सुगंधी फूल बनविण्यासाठी आले आहेत, तुम्हाला काटा बनायचे नाहीये, काट्यांना या सभेमध्ये आणायचे नाही”

प्रश्न:-
जी मुले आठवणीच्या यात्रेची मेहनत करतात त्यांची खूण काय असेल?

उत्तर:-
आठवणीची मेहनत करणारी मुले खूप आनंदात असतील. बुद्धीत असेल की आम्ही पुन्हा परत जात आहोत. पुन्हा आम्हाला सुगंधी फुलांच्या बगीच्यामध्ये जायचे आहे. तुम्ही आठवणीच्या यात्रेने सुगंधी बनता आणि दुसऱ्यांना सुद्धा बनवता.

ओम शांती।
बागेचे मालक सुद्धा बसले आहेत, माळी सुद्धा आहेत, फुले सुद्धा आहेत. ही नवीन गोष्ट आहे ना. एखाद्या नवीन व्यक्तीने जर ऐकले तर म्हणेल हे काय बोलत आहेत. बागेचे मालक, फूल इत्यादी हे काय आहे? अशा गोष्टी तर कधी शास्त्रांमध्ये ऐकल्या नाहीत. तुम्ही मुले जाणता, आठवण सुद्धा बागवान-खिवैयाची (बागेच्या मालकाची, नावाड्याची) करता. आता इथे आले आहेत, इथून पलीकडे घेऊन जाण्यासाठी. बाबा म्हणतात - आठवणीच्या यात्रेमध्ये रहायचे आहे. आपणच आपल्याला बघा आपण किती दूर जात आहोत? आपल्या सतोप्रधान अवस्थेपर्यंत किती पोहोचलो आहोत? जितकी सतोप्रधान अवस्था होत जाईल तर समजाल आता आपण परत जात आहोत. कुठपर्यंत आपण पोहोचलो आहोत, सर्वकाही आठवणीच्या यात्रेवर अवलंबून आहे. आनंद सुद्धा वाढेल. जे जितकी-जितकी मेहनत करतात तितका त्यांना आनंद होईल. जसे परीक्षेच्या दिवसांमध्ये स्टुडंटला समजते की आपण कितपत पास होऊ. इथे देखील असेच आहे - प्रत्येक मुलगा स्वतःला जाणतो की मी कितपत सुगंधी फूल बनलो आहे? आणि मग दुसऱ्यांना किती सुगंधी बनवत आहोत? असे गायले सुद्धा जाते - काट्यांचे जंगल. तो आहे फुलांचा बगीचा. मुसलमान लोक सुद्धा म्हणतात - गार्डन ऑफ अल्लाह (अल्लाचा बगीचा). समजतात की तिथे एक बगीचा आहे, तिथे जो जातो त्याला भगवान फूल देतात. मनामध्ये जी इच्छा असते ती पूर्ण करतात. बाकी असे तर नाही की कोणते फूल उचलून देतात, जसे ज्याच्या बुद्धीमध्ये आहे तसा साक्षात्कार होतो. इथे (ज्ञानामध्ये) असे साक्षात्कारावर काहीही अवलंबून नाहिये. भक्तीमार्गामध्ये तर साक्षात्कारासाठी आपला गळा सुद्धा कापतात. मीरेला साक्षात्कार झाला तिचा किती मान आहे. तो आहे भक्तीमार्ग. भक्ती तर अर्धा कल्प चालणारच आहे. ज्ञानच नाहीये. वेद इत्यादीचा खूप मान आहे. म्हणतात वेद तर आमचा प्राण आहे. आता तुम्ही जाणता हे वेद-शास्त्र इत्यादी सर्व आहेत भक्तीमार्गासाठी. भक्तीचा केवढा मोठा विस्तार आहे. मोठे झाड आहे. ज्ञान आहे बीज. आता ज्ञानामुळे तुम्ही किती शुद्ध बनता. सुगंधी बनता. हा तुमचा बगीचा आहे. इथे कोणालाही काटा म्हणणार नाही कारण इथे कोणीही विकारामध्ये जात नाहीत. तर असे म्हटले जाईल की या बगीच्यामध्ये एकही काटा नाही. काटा कलियुगामध्ये आहे. आता आहे पुरुषोत्तम संगमयुग. इथे काटा (विकारी) कुठून येणार. जर कोणी काटा बसला असेल तर तो स्वतःचेच नुकसान करून घेतो कारण हे इंद्रप्रस्थ आहे ना. इथे तर ज्ञानपऱ्या बसल्या आहेत. ज्ञान डान्स करणाऱ्या पऱ्या आहेत. मुख्य-मुख्य नावे पुखराज परी, नीलम परी इत्यादी-इत्यादी पडली आहेत. तीच मग ‘नवरत्न’ म्हणून गायली जातात, परंतु हे कोण होते, हे कोणालाही माहीत नाही. बाबा फक्त म्हणतात - माझी आठवण करा. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आता समज आहे, ८४ चे चक्र देखील आता बुद्धीमध्ये आहे. शास्त्रांमध्ये तर ८४ लाख म्हटले आहे. गोड-गोड सिकीलध्या मुलांना बाबांनी सांगितले आहे की, तुम्ही ८४ जन्म घेतलेत. आता तमोप्रधानापासून सतोप्रधान बनायचे आहे, किती सोपे आहे. भगवानुवाच मुलां प्रति, मामेकम् (मज एकाची) आठवण करा. आता तुम्ही मुलांनी सुगंधी फूल बनण्यासाठी स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. काटे बनू नका. इथे सर्व गोड-गोड फुले आहेत. काटे नाही. हो, मायेची वादळे तर येतीलच. माया अशी कठोर आहे की लगेच अडकवेल. मग पश्चात्ताप होईल - आपण हे काय केले. माझी तर जमा केलेली कमाई सर्व नष्ट झाली.

हा बगीचा आहे. बगीच्यामध्ये चांगली-चांगली फुले देखील असतात. या बगिच्यामध्ये देखील काही तर फर्स्ट क्लास फूल बनत जातात. जसे मुगल गार्डनमध्ये चांगली-चांगली फूले असतात. सर्व बघायला जातात. इथे तुमच्याकडे कोणी बघायला तर येणार नाहीत. तुम्ही काट्यांना काय तोंड दाखवणार. गायन देखील आहे मूत पलिती… बाबांना (ब्रह्माबाबांना) ‘जप साहेब’, ‘सुखमणी’ इत्यादी सर्व पाठ होते. अखंड पाठ सुद्धा करत होते. ८ वर्षांचे होते तेव्हा पगडी बांधत होते, मंदिरामध्येच रहात होते. (ब्रह्मा बाबा म्हणाले) - ‘मंदिराची सर्व जबाबदारी माझ्यावरच होती’. आता समजते आहे, मूत पलिती कपडे धुण्याचा अर्थ काय आहे. ही सारी महिमा एका बाबांचीच आहे’. आता तुम्हा मुलांना बाबा बसून समजावून सांगत आहेत. मुलांना म्हणतात देखील - चांगली-चांगली फुले आणा. जे चांगली-चांगली फुले आणतील त्यांना चांगले फूल समजले जाईल. सर्वजण म्हणतात - आम्ही लक्ष्मी-नारायण बनणार तर जणू गुलाबाचे फूल झाले. बाबा म्हणतात - अच्छा तुम्हा मुलांच्या तोंडात गुलाब. आता पुरूषार्थ करून कायमचे गुलाब बना. असंख्य मुले आहेत. प्रजा तर पुष्कळ बनत आहे. तिथे आहेतच राजा-राणी आणि प्रजा. सतयुगामध्ये मंत्री इत्यादी असत नाहीत कारण राजामधेच सगळी ताकद असते. मंत्री इत्यादींकडून सल्ला घेण्याची आवश्यकता नसते. नाही तर सल्ला देणारा मोठा होतो. तिथे भगवान-भगवतीला सल्ल्याची आवश्यकता नसते, मंत्री इत्यादी तेव्हा असतात जेव्हा पतित असतात. भारताचीच गोष्ट आहे, असा दुसरा कोणता खंड नाही, जिथे राजांच्या समोर राजे डोके टेकवत असतील. हे इथेच दाखवले जाते ज्ञानमार्गामध्ये पूज्य, अज्ञान मार्गामध्ये पुजारी. ते डबल मुकुटधारी, ते सिंगल मुकुटधारी. भारतासारखा पवित्र खंड कोणताही नाही. पॅराडाईज, स्वर्ग होता. तुम्ही त्याच्यासाठीच शिकत आहात. आता तुम्हाला फूल बनायचे आहे. बागेचा मालक आलेला आहे. माळी देखील आहेत. माळी नंबरवार असतात. मुले देखील समजतात हा बगीचा आहे, यामध्ये काटे नाहीत, काटे तर दुःखच देतात. बाबा काही कोणाला दुःख देत नाहीत. ते आहेतच दुःख हर्ता, सुख कर्ता. किती गोड बाबा आहेत.

तुम्हा मुलांचे बाबांवर प्रेम आहे. बाबा सुद्धा मुलांवर प्रेम करतात ना. हे शिक्षण आहे. बाबा म्हणतात - ‘मी तुम्हाला समोर प्रॅक्टिकलमध्ये शिकवतो, हे (ब्रह्मा) सुद्धा शिकत आहेत, शिकून मग इतरांना शिकवा म्हणजे बाकीचेही काट्यांपासून फूल बनतील. भारत महादानी म्हणून गायला गेला आहे कारण आता तुम्ही मुले महादानी बनता. अविनाशी ज्ञान रत्नांचे तुम्ही दान करता. बाबांनी समजावून सांगितले आहे आत्माच रूप बसंत आहे. बाबा सुद्धा रूप बसंत आहेत. त्यांच्यामध्ये सर्व ज्ञान आहे. ज्ञानाचा सागर आहेत परमपिता परमात्मा, ते ऑथॉरिटी आहेत ना. ज्ञानाचा सागर एक बाबाच आहेत म्हणूनच गायले जाते - सर्व समुद्राची शाई बनवली तरी देखील त्यांची महिमा संपणार नाही. आणि मग एका सेकंदामध्ये जीवनमुक्तीचे सुद्धा गायन आहे. तुमच्याकडे कोणतेही शास्त्र (धर्मग्रंथ) इत्यादी नाहीये. तिथे (जुन्या दुनियेमध्ये) एखाद्या पंडित इत्यादींकडे गेलात तर समजून येते की हा पंडित खूप शिकलेला अधिकारी आहे. यांनी सर्व वेद-शास्त्रे तोंडपाठ केलेली आहेत मग तेच संस्कार घेऊन जातात आणि मग लहानपणापासून तोच अभ्यास करु लागतात. तुम्ही संस्कार घेऊन जात नाही. तुम्ही अभ्यासाचा रिझल्ट घेऊन जाता. तुमचे शिक्षण पूर्ण झाल्यावर मग निकाल लागेल आणि ते पद प्राप्त कराल. तुम्ही ज्ञान थोडेच घेऊन जाणार की जे कोणाला ऐकवायचे आहे. इथे तर तुमचे शिक्षण आहे, ज्याचे प्रारब्ध नव्या दुनियेमध्ये मिळणार आहे. तुम्हा मुलांना बाबांनी समजावून सांगितले आहे - माया सुद्धा काही कमी शक्तिशाली नाहीये. मायेमध्ये ताकद आहे दुर्गतीमध्ये घेऊन जाण्याची. परंतु तिची महिमा थोडीच करणार. ती तर दुःख देण्यामध्ये शक्तिशाली आहे ना. बाबा सुख देण्यामध्ये शक्तिशाली आहेत म्हणूनच त्यांचे गायन आहे. हा देखील ड्रामा बनलेला आहे. तुम्ही सुख उपभोगता तर दुःख सुद्धा भोगता. जय-पराजय कोणाचा होतो याविषयी देखील माहीत असले पाहिजे ना. बाबा देखील भारतामध्ये येतात, जयंती देखील भारतामध्येच साजरी केली जाते; हे कोणालाच माहीत नाही आहे की, शिवबाबा केव्हा आले, येऊन काय केले होते. नामोनिशाणच गायब करून टाकले आहे. श्रीकृष्ण मुलाचे नाव दिले आहे. खरे तर बिलवेड बाबांची (अतिप्रिय बाबांची) महिमा वेगळी, श्रीकृष्णाची महिमा वेगळी आहे. ते आहेत निराकार, तो आहे साकार. श्रीकृष्णाची महिमा आहे सर्वगुणसंपन्न… शिवबाबांची काही अशी महिमा करणार नाही, ज्याच्यामध्ये गुणही आहेत तर अवगुण सुद्धा आहेत त्यामुळे बाबांची महिमाच वेगळी आहे. बाबांना अकालमूर्त म्हणतात ना. आपण सुद्धा अकाल मूर्त आहोत. आत्म्याला काळ खाऊ शकत नाही. आत्मा अकालमूर्ताचे हे तख्त (सिंहासन) आहे. आपले बाबा देखील अकाल मूर्त आहेत. काळ शरीरालाच खातो. इथे अकालमूर्ताला बोलावतात. सतयुगामध्ये बोलावणार नाही कारण तिथे सुखच सुख आहे म्हणून गातात देखील - ‘दु:ख में सिमरण सब करें सुख में करे न कोई’. आता रावण राज्यामध्ये किती दुःख आहे. बाबा तर स्वर्गाचा मालक बनवतात नंतर मग तिथे (स्वर्गामध्ये) अर्धे कल्प कोणी बोलावतही नाही. जसे लौकिक पिता मुलांचा शृंगार करून वारसा देऊन आपण वानप्रस्थ अवस्था स्वीकारतात. सर्व काही मुलांना देऊन म्हणतील - आता आम्ही सत्संगामध्ये जातो. काहीतरी खाण्याकरिता पाठवत रहा. हे बाबा तर असे म्हणणार नाहीत ना. हे तर म्हणतात - ‘गोड-गोड मुलांनो, मी तुम्हाला विश्वाची बादशाही देऊन वानप्रस्थमध्ये निघून जाणार. मी थोडेच म्हणेन - खाण्यासाठी काहीतरी पाठवा’. पित्याचा सांभाळ करणे तर लौकिक मुलांचे कर्तव्य आहे. नाहीतर खाणार कुठून? हे बाबा तर म्हणतात - मी निष्काम सेवाधारी आहे. मनुष्य काही निष्काम असू शकत नाही. उपाशी मरतील. मी थोडाच उपाशी मरेन, मी तर अभोक्ता आहे. तुम्हा मुलांना विश्वाची बादशाही देऊन मी जाऊन आराम करतो. मग माझा पार्ट बंद होतो. मग पुन्हा भक्तिमार्गामध्ये सुरू होतो. हा अनादि ड्रामा बनलेला आहे, जी रहस्ये बाबा बसून समजावून सांगतात. वास्तविक तुमचा पार्ट सर्वात जास्त आहे त्यामुळे मोबदला देखील तुम्हाला मिळाला पाहिजे. मी आराम करतो, आणि तुम्ही मग ब्रह्मांडाचे सुद्धा मालक, विश्वाचे सुद्धा मालक बनता. तुमचे नाव मोठे होते. हे ड्रामाचे रहस्य देखील तुम्हीच जाणता. तुम्ही आहात ज्ञानाची फूले. दुनियेमध्ये असा एकही नाही. रात्रं-दिवसाइतका फरक आहे. ते रात्रीमध्ये आहेत, तुम्ही दिवसामध्ये जात आहात. आजकाल बघा वन-उत्सव करत रहातात, आता भगवान मनुष्यांचा वनोत्सव करत आहेत.

बाबा बघा कसा चमत्कार करतात की मनुष्याला देवता, रंकाला राव (राजा) बनवतात. आता बेहदच्या बाबांकडे तुम्ही सौदा करण्यासाठी आला आहात, म्हणता - ‘बाबा, आम्हाला रंकापासून राव बनवा. हे तर खूप चांगले ग्राहक आहेत. त्यांना तुम्ही म्हणता सुद्धा दुःख हर्ता सुख कर्ता. याच्यासारखे दान कोणते असतही नाही. ते आहेत सुख देणारे. बाबा म्हणतात - भक्तीमार्गामध्ये देखील मी तुम्हाला देतो. ड्रामामध्ये साक्षात्कार इत्यादीबद्दल लिहिलेले आहे. आता बाबा बसून सांगत आहेत मी काय-काय करतो. पुढे जाऊन सांगत राहतील. शेवटी अंताला तुम्ही नंबरवार कर्मातीत अवस्थेला प्राप्त कराल. हे सर्व ड्रामामध्ये नोंदलेले आहे तरीही पुरुषार्थ करवून घेतला जातो, बाबांची आठवण करा. खरोखर ही महाभारत लढाई सुद्धा आहे. सगळे नष्ट होतील. बाकी भारतवासीच शिल्लक राहतील आणि मग तुम्ही विश्वावर राज्य कराल. आता बाबा तुम्हाला शिकवण्याकरिता आले आहेत. तेच ज्ञानसागर आहेत. हा देखील एक खेळ आहे यामध्ये गोंधळण्यासारखी काही गोष्टच नाही. माया वादळे आणेल. बाबा समजावून सांगतात यांना घाबरू नका. खूप घाण-घाण संकल्प येतील. ते सुद्धा तेव्हा जेव्हा बाबांना दत्तक जाल. जोपर्यंत दत्तकच गेला नाहीत तर माया इतकी लढाई करणार नाही. दत्तक गेल्यानंतरच वादळे येतात म्हणून बाबा म्हणतात दत्तक सुद्धा सांभाळून गेले पाहिजे. कमकुवत असाल तर मग प्रजेमध्ये याल. राज्यपद मिळवणे तर चांगले आहे, नाहीतर दास-दासी बनावे लागेल. हे सूर्यवंशी चंद्रवंशी राज्य स्थापन होत आहे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) रूप-बसंत बनून अविनाशी ज्ञानरत्नांचे दान करून महादानी बनायचे आहे. जो अभ्यास शिकत आहात तो इतरांनाही शिकवायचा आहे.

२) कोणत्याही बाबतीत गोंधळायचे किंवा घाबरायचे नाहिये, स्वतःची काळजी घ्यायची आहे. आपणच आपल्याला विचारायचे आहे की, मी कोणत्या प्रकारचे फूल आहे. माझ्यामध्ये कोणती दुर्गंधी तर नाहीये ना?

वरदान:-
दृढ संकल्पाद्वारे कमकुवतपणा रुपी कलियुगी पर्वताला नाहीसे करणारे समर्थी-स्वरूप भव

निराश होणे, कोणत्याही संस्काराच्या किंवा परिस्थितीच्या वशीभूत होणे, व्यक्ती अथवा वैभवाकडे आकर्षित होणे - अशा सर्व कमकुवतपणा रुपी कलियुगी पर्वताला दृढ संकल्पाचे बोट देऊन कायमचे नष्ट करा अर्थात विजयी बना. विजय आमच्या गळ्यातील हार आहे - नेहमी या स्मृतीने समर्थी-स्वरूप बना. हीच स्नेहाची परतफेड आहे. जसे साकार बाबांनी स्थितीचा स्तंभ बनून दाखवले तसे फॉलो फादर करून सर्व गुणांचे स्तंभ बना.

बोधवाक्य:-
साधने सेवेसाठी आहेत, आराम-पसंत बनण्यासाठी नाही.

अव्यक्त इशारे - आत्मिक स्थितीमध्ये राहण्याचा अभ्यास करा, अंतर्मुखी बना:-

जसे एका जागेवर अणुबॉम्ब टाकल्यामुळे चहूकडे त्याचे अंश पसरतात - तो अणुबॉम्ब आहे आणि हा आत्मिक बॉम्ब आहे. याचा प्रभाव अनेक आत्म्यांना आकर्षित करेल आणि सहजच प्रजेची वृद्धी होईल, म्हणून संघटित रूपामध्ये आत्मिक स्वरूपाचा अभ्यास वाढवा, स्मृति-स्वरूप बना तेव्हा वायुमंडळ शक्तिशाली होईल.