30-07-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - माया शत्रू तुमच्यासमोर आहे म्हणून स्वतःची खूप-खूप काळजी घ्यायची आहे,
जर चालता-चालता मायेमध्ये अडकलात तर आपल्या भाग्याला लकीर लावाल”
प्रश्न:-
तुम्हा राजयोगी
मुलांचे मुख्य कर्तव्य काय आहे?
उत्तर:-
शिकणे आणि शिकविणे, हेच तुमचे मुख्य कर्तव्य आहे. तुम्ही आहात ईश्वरीय मतावर.
तुम्हाला काही जंगलामध्ये निघून जायचे नाहीये. गृहस्थ व्यवहारामध्ये राहून
शांतीमध्ये बसून बाबांची आठवण करायची आहे. अल्फ आणि बे (बाबा आणि बादशाही), या दोन
शब्दांमध्ये तुमचे सारे शिक्षण येते.
ओम शांती।
बाबा देखील ब्रह्मा द्वारे म्हणू शकतात की, ‘मुलांनो, गुड मॉर्निंग’. परंतु मुलांना
देखील रिस्पॉन्स द्यावा लागेल. इथे आहेच बाबा आणि मुलांचे कनेक्शन. जे नवीन आहेत ते
पक्के होई पर्यंत, काही ना काही विचारत राहतील. हे तर शिक्षण आहे, ‘भगवानुवाच’
देखील लिहिलेले आहे. भगवान आहेत निराकार. हे कोणालाही समजावून सांगण्यासाठी बाबा
चांगल्या रीतीने पक्के करून घेतात, कारण त्या बाजूला आहे मायेचा जोर. इथे काही तशी
गोष्ट नाहीये. बाबा तर समजावून सांगतात ज्यांनी कल्पापूर्वी वारसा घेतला आहे ते
स्वतःहून येतील. असे नाही की अमका निघून जाऊ नये, त्याला पकडा. निघून गेला तर जाऊ
दे. इथे तर जिवंतपणी मरण्याची गोष्ट आहे. बाबा ॲडॉप्ट करतात (दत्तक घेतात). ॲडॉप्ट
केले जातेच मुळी काही वारसा देण्यासाठी. मुले आई-वडीलांकडे येतातच मुळी वारशाच्या
लोभापोटी. श्रीमंताचा मुलगा कधी गरिबाकडे दत्तक जाईल का! इतकी धन-दौलत इत्यादी सर्व
सोडून कसा जाईल. ॲडॉप्ट करतात श्रीमंत. आता तुम्ही जाणता बाबा आपल्याला स्वर्गाची
बादशाही देत आहेत. का नाही त्यांचे बनणार. प्रत्येक गोष्टीमध्ये लोभ तर असतो ना.
जितका जास्त अभ्यास कराल तितका जास्त लोभ असेल. तुम्ही देखील जाणता बाबांनी आपल्याला
ॲडॉप्ट केले आहे बेहदचा वारसा देण्याकरिता. बाबा देखील म्हणतात तुम्हा सर्वांना मी
पुन्हा ५००० वर्षांपूर्वी प्रमाणे ॲडॉप्ट करतो. तुम्ही देखील म्हणता बाबा आम्ही
तुमचे आहोत. ५००० वर्षांपूर्वी देखील तुमचे बनलो होतो. तुम्ही आता प्रॅक्टिकलमध्ये
किती ब्रह्माकुमार-कुमारी आहात. प्रजापिता देखील प्रसिद्ध तर आहे. जोपर्यंत
शुद्रापासून ब्राह्मण बनत नाही तोपर्यंत देवता बनू शकत नाही. तुम्हा मुलांच्या
बुद्धीमध्ये आता हे चक्र फिरत राहते - आपण शूद्र होतो, आता ब्राह्मण बनलो आहोत परत
देवता बनायचे आहे. सतयुगामध्ये आपण राज्य करणार. तर या जुन्या दुनियेचा विनाश जरूर
होणार आहे. दृढनिश्चय होत नाही त्यामुळे मग निघून जातात. बरेचजण कच्चे आहेत जे
कोसळतात (पतन होते), याची देखील ड्रामामध्ये नोंद आहे. माया शत्रू समोर उभी आहे, तर
ती आपल्याकडे खेचून नेते. बाबा सारखे-सारखे पक्के करवून घेतात, मायेमध्ये अडकून
पडायचे नाही, नाहीतर मग आपल्याच भाग्याला लकीर लावाल. बाबाच विचारू शकतात की या
पूर्वी कधी भेटला होता? दुसऱ्या कोणालाही असे विचारण्याची कला येणारच नाही. बाबा
म्हणतात - मला देखील पुन्हा एकदा गीता ऐकविण्यासाठी यावे लागेल. येऊन रावणाच्या
जेलमधून सोडवावे लागेल. बेहदचे बाबा बेहदच्या गोष्टी समजावून सांगतात. आता रावणाचे
राज्य आहे, पतित राज्य आहे जे अर्ध्या कल्पापासून सुरु झाले आहे. रावणाला दहा तोंडे
दाखवतात, विष्णूला चार भुजा दाखवतात. असा कोणता मनुष्य असतच नाही. हा तर प्रवृत्ती
मार्ग दाखविला जातो. हे आहे एम ऑब्जेक्ट, विष्णू द्वारे पालना. विष्णुपुरीला
कृष्णपुरी देखील म्हणतात. श्रीकृष्णाला तर दोनच भुजा दाखवतील ना. मनुष्य तर काहीच
समजत नाहीत. बाबा प्रत्येक गोष्ट समजावून सांगतात. तो सर्व आहे भक्तीमार्ग. आता
तुम्हाला ज्ञान आहे, तुमचे एम ऑब्जेक्टच आहे नरापासून नारायण बनण्याचे. ही गीता
पाठशाळा आहेच जीवनमुक्ती प्राप्त करण्याकरिता. ब्राह्मण तर जरूर पाहिजेत. हा आहे -
रुद्र ज्ञान यज्ञ. शिवाला रुद्र देखील म्हणतात. आता बाबा विचारत आहेत - ज्ञान-यज्ञ
कृष्णाचा आहे का शिवाचा आहे? शिवालाच परमात्मा म्हणतात, शंकराला देवता म्हणतात.
त्यांनी मग शिव आणि शंकराला एकत्र केले आहे. आता बाबा म्हणतात मी यांच्यामध्ये (ब्रह्मा
बाबांमध्ये) प्रवेश केला आहे. तुम्ही मुले म्हणता बापदादा. ते म्हणतात शिवशंकर.
ज्ञानसागर तर आहेतच एक.
आता तुम्ही जाणता -
ब्रह्मा सो विष्णू बनतात ज्ञानाद्वारे. चित्र देखील बरोबर बनवतात. विष्णूच्या
नाभीतून ब्रह्मा निघाला. याचा अर्थ देखील कोणी समजू शकत नाहीत. ब्रह्माच्या
हातामध्ये शास्त्रे दिली आहेत. आता शास्त्रांचे सार बाबा बसून समजावून सांगतात का
ब्रह्मा? हे (ब्रह्मा बाबा) देखील मास्टर ज्ञान-सागर बनतात. बाकी चित्रे तर इतकी
खंडीभर बनवली आहेत, परंतु ती काही यथार्थ नाहीत. ती सर्व आहेत भक्तीमार्गाची.
मनुष्य काही आठ-दहा भुजावाले असत नाहीत. हा तर फक्त प्रवृत्ती मार्ग दाखवला आहे.
रावणाचा देखील अर्थ सांगितला आहे - अर्धा कल्प आहे रावण राज्य - रात्र. अर्धा कल्प
आहे रामराज्य - दिवस. बाबा प्रत्येक गोष्ट समजावून सांगतात. तुम्ही सर्व एका
पित्याची मुले आहात. बाबा ब्रह्माद्वारे विष्णुपुरीची स्थापना करत आहेत आणि तुम्हाला
राजयोग शिकवत आहेत. जरूर संगमावरच राजयोग शिकवतील. द्वापरमध्ये गीता ऐकवली, हे तर
चुकीचे आहे. बाबा सत्य सांगतात. खूप जणांना ब्रह्माचा, श्रीकृष्णाचा साक्षात्कार
होतो. ब्रह्माचा सफेद पोषाखच बघतात. शिवबाबा तर आहेत बिंदू. बिंदूचा साक्षात्कार
झाला तर काहीच समजू शकणार नाहीत. तुम्ही म्हणता आपण आत्मा आहोत, आता आत्म्याला कोणी
पाहिले आहे, कोणीही नाही. ती तर बिंदू आहे. समजू शकता ना. जे ज्या भावनेने ज्याची
पूजा करतात, त्यांना तोच साक्षात्कार होईल. दुसरे जर रूप दिसले तर गोंधळून जातील.
हनुमानाची पूजा करत असेल तर त्याला तोच दिसेल. गणेशाच्या पुजाऱ्याला तोच दिसू लागेल.
बाबा म्हणतात - ‘मी तुम्हाला इतके धनवान बनवले, हिरे-माणकांचे महाल होते, तुमच्याकडे
अगणित धन होते, तुम्ही आता ते सर्व कुठे गमावले? आता तुम्ही गरीब बनला आहात, भीक
मागत आहात. बाबा तर म्हणू शकतात ना. आता तुम्ही मुले समजता बाबा आले आहेत, आपण
पुन्हा विश्वाचे मालक बनत आहोत. हा ड्रामा अनादि बनलेला आहे. प्रत्येकजण ड्रामामध्ये
स्वतःचा पार्ट बजावत आहे. कोणी एक शरीर सोडून जाऊन दुसरे घेतात, यामध्ये रडण्याची
काय गरज आहे. सतयुगामध्ये कधी रडत नाहीत. आता तुम्ही मोहजीत बनत आहात. मोहजीत राजा
हे लक्ष्मी-नारायण इत्यादी आहेत. तिथे मोह असत नाही. बाबा अनेक प्रकारच्या गोष्टी
समजावून सांगत राहतात. बाबा आहेत निराकार. मनुष्य तर त्यांना नावा-रूपापासून न्यारे
म्हणतात. परंतु नावा-रुपापासून न्यारी कोणती वस्तू थोडीच असते. हे भगवान, ओ गॉड
फादर म्हणतात ना. तर नाव रूप आहे ना. लिंगाला शिव परमात्मा, शिवबाबा देखील म्हणतात.
बाबा तर आहे ना बरोबर. बाबांची जरूर मुले देखील असतील. निराकारला निराकार आत्माच
बाबा म्हणते. मंदिरामध्ये जातील तर त्यांना म्हणतील - ‘शिवबाबा’ मग घरी येऊन
पित्याला देखील म्हणतात - ‘बाबा’. अर्थ तर समजत नाही, आपण त्यांना शिवबाबा का म्हणतो!
बाबा मोठ्यात मोठे शिक्षण दोन शब्दांमध्ये शिकवतात - अल्फ आणि बे (बाबा आणि बादशाही).
अल्फची आठवण करा तर बे-बादशाही तुमची आहे. ही खूप मोठी परीक्षा आहे. मनुष्य खूप मोठी
परीक्षा पास करतात तर आधीचे शिक्षण थोडेच लक्षात राहते. शिकत-शिकत शेवटी सार
बुद्धीमध्ये येते. हे देखील असेच आहे. तुम्ही शिकत आला आहात. अंताला मग बाबा
म्हणतात - मनमनाभव, म्हणजे मग देहाचा अभिमान नष्ट होईल. या ‘मनमनाभव’ची सवय जडली
असेल तर शेवटी देखील बाबा आणि वारशाची आठवण राहील. मुख्य आहेच हे, किती सोपे आहे.
त्या शिक्षणामध्ये देखील आता तर माहित नाही काय-काय शिकतात. जसा राजा तसा तो आपला
रिवाज चालवतो. आधी मण, शेर, पाव चा हिशोब चालत होता, आता तर किलो इत्यादी काय-काय
निघाले आहे. किती वेगळे-वेगळे प्रांत झाले आहेत, दिल्लीमध्ये जी वस्तू एक रुपया शेर
असेल, तीच वस्तू मुंबईमध्ये दोन रुपया शेर मिळेल, कारण प्रांत वेगळा आहे,
प्रत्येकजण समजतात आम्ही आमच्या प्रांताला उपाशी थोडेच मारणार. किती भांडणे इत्यादी
होतात, किती गडबड घोटाळा आहे.
भारत किती सॉल्व्हंट
(पवित्र) होता मग ८४ चे चक्र फिरून आता इनसॉल्व्हंट (अपवित्र) बनला आहे. म्हटले जाते
- ‘हीरे जैसा जन्म अमोलक कौड़ी बदले खोया रे…’ बाबा म्हणतात - तुम्ही कवड्यांच्या
मागे का धावता. आतातरी बाबांकडून वारसा घ्या, पावन बना. बोलावता देखील - हे
पतित-पावन या, पावन बनवा. तर यावरून सिद्ध होते पावन होतो, आता नाही आहोत. आता आहेच
कलियुग. बाबा म्हणतात - मी पावन दुनिया बनवणार तर पतित दुनियेचा जरूर विनाश होणार
म्हणूनच ही महाभारत लढाई आहे जी या रुद्र ज्ञान-यज्ञातून प्रज्वलित झाली आहे.
ड्रामामध्ये तर या विनाशाची देखील नोंद आहे. सर्वात आधी तर बाबांना (ब्रह्मा बाबांना)
साक्षात्कार झाला. बघितले इतकी मोठी राजाई मिळत आहे तर खूप आनंद होऊ लागला, मग
विनाशाचा साक्षात्कार देखील घडवला. ‘मनमनाभव’, ‘मध्याजीभव’, हे गीतेतील शब्द आहेत.
गीतेतील काही-काही शब्द बरोबर आहेत. बाबा देखील म्हणतात - तुम्हाला हे ज्ञान ऐकवतो,
हे नंतर प्राय: लोप होते. कोणालाच माहिती नाही आहे की लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते
तेव्हा दुसरा कोणता धर्म नव्हता. त्यावेळेस जनसंख्या किती थोडी असेल, आता किती आहे.
तर ही दुनिया बदलली पाहिजे. जरूर विनाश देखील पाहिजे. महाभारत लढाई देखील आहे. जरूर
भगवान देखील असतील. शिवजयंती साजरी करतात तर शिवबाबांनी येऊन काय केले? हे देखील
जाणत नाहीत. आता बाबा समजावून सांगतात, गीतेद्वारे श्रीकृष्णाच्या आत्म्याला राजाई
मिळाली. गीतेला माता-पिता म्हणणार, ज्याद्वारे तुम्ही पुन्हा देवता बनता. गीतेच्या
ज्ञानाद्वारे राजयोग शिकून श्रीकृष्ण असा बनला. त्यांनी (भक्तिमार्ग वाल्यांनी) मग
शिवबाबांच्या ऐवजी श्रीकृष्णाचे नाव घातले आहे. तर बाप समजावून सांगतात, हा तर
आपल्या मनामध्ये पक्का निश्चय करा, कोणी उल्टी-सुल्टी गोष्ट ऐकवून तुम्हाला खाली
पाडू नये. खूप गोष्टी विचारतात - विकाराशिवाय सृष्टी कशी चालणार? हे कसे शक्य आहे?
अरे, तुम्ही स्वतः म्हणता - ती निर्विकारी दुनिया होती. संपूर्ण निर्विकारी म्हणता
ना मग विकाराची गोष्ट कशी असू शकते? आता तुम्ही जाणता बेहदच्या बाबांकडून बेहदची
बादशाही मिळते, तर अशा बाबांची का नाही आठवण करायची? ही आहेच पतित दुनिया.
कुंभमेळ्याला तर किती लाखोंनी जातात. आता म्हणतात - तिथे एक नदी गुप्त आहे. आता नदी
गुप्त असू शकते का? तिथे देखील गोमुख बनवले आहे. म्हणतात गंगा इथे येते. अरे, गंगा
आपला रस्ता काढत समुद्रामध्ये जाईल का इथे डोंगरावर तुमच्याकडे येईल.
भक्तीमार्गामध्ये किती त्रास आहे. ज्ञान, भक्ती मग आहे वैराग्य. एक आहे हदचे
वैराग्य, दुसरे आहे बेहदचे. संन्यासी घरदार सोडून जंगलामध्ये राहतात, इथे तर अशी
गोष्ट नाहीये. तुम्ही बुद्धीने साऱ्या जुन्या दुनियेचा संन्यास करता. तुम्हा राजयोगी
मुलांचे मुख्य कर्तव्य आहे - शिकणे आणि शिकविणे. आता राजयोग काही जंगलामध्ये थोडाच
शिकवला जातो. ही पाठशाळा आहे. ब्रॅंचेस उघडत जातात. तुम्ही मुले राजयोग शिकत आहात.
शिवबाबांकडून शिकलेल्या ब्राह्मण-ब्राह्मणी शिकवतात. एक शिवबाबा थोडेच सर्वांना
शिकवत बसतील. तर हे झाले पांडव गव्हर्मेंट. तुम्ही आहात ईश्वरीय मतावर. तुम्ही इथे
किती शांतीमध्ये बसला आहात, बाहेर तर अनेक गोंधळ आहेत. बाबा म्हणतात - ५ विकारांचे
दान द्या तर ग्रहण सुटेल. माझे बना तर मी तुमच्या सर्व कामना पूर्ण करेन. तुम्ही
मुले जाणता आता आपण सुखधाममध्ये जातो, दुःखधामला आग लागणार आहे. मुलांनी विनाशाचा
साक्षात्कार देखील केला आहे. आता वेळ फार थोडा आहे म्हणून आठवणीच्या यात्रेमध्ये
रहाल तर विकर्म विनाश होतील आणि उच्च पद मिळवाल. अच्छा
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) बाबांच्या
वारशाचा पूर्ण अधिकार घेण्यासाठी जिवंतपणी मरायचे आहे. ॲडॉप्ट व्हायचे आहे (दत्तक
जायचे आहे). कधीही आपल्या श्रेष्ठ भाग्याला लकीर लावायची नाही.
२) कोणतीही
उल्टी-सुल्टी गोष्ट ऐकून संशयामध्ये यायचे नाही. जराही निश्चय डळमळू नये. या
दुःखधामला आग लागणार आहे म्हणून यातून आपला बुद्धीयोग काढून घ्यायचा आहे.
वरदान:-
विशेषता रूपी
संजीवनी बुटी द्वारा मुर्च्छीतला सुरजीत करणारे विशेष आत्मा भव
प्रत्येक आत्म्याला
श्रेष्ठ स्मृतीची, विशेषतांची स्मृती रुपी संजीवनी बुटी खाऊ घाला तर ती मूर्च्छित
पासून सुरजीत होईल. विशेषतांच्या स्वरूपाचा आरसा त्याच्या समोर ठेवा. दुसऱ्यांना
स्मृती करून दिल्याने तुम्ही विशेष आत्मा बनालच. जर तुम्ही कोणाला कमजोरी ऐकवाल तर
ते लपवतील, टाळतील तुम्ही विशेषता ऐकवा तर स्वतःच आपल्या कमजोरी स्पष्ट अनुभव करतील.
याच संजीवनी बुटीद्वारे मूर्च्छितला सुरजीत करून उडत रहा आणि उडवत रहा.
बोधवाक्य:-
नाम-मान-शान
आणि साधनांच्या संकल्पाचा देखील त्याग हाच महान त्याग आहे
अव्यक्त इशारे -
संकल्पांची शक्ती जमा करून श्रेष्ठ सेवेच्या निमित्त बना:-
निमित्त बनलेल्या
मुलांना आपल्या प्रत्येक संकल्पावर विशेष अटेंशन दिले पाहिजे, जेव्हा तुम्ही
निर्विकल्प, निरव्यर्थ संकल्प सहित रहाल तेव्हा बुद्धी अचूक निर्णय घेईल, निर्णय
योग्य असेल तर निवारण देखील सहज कराल. निवारण करण्याऐवजी जर तुम्हीच ‘कारण, कारण’
म्हणाल तर तुमच्या मागे असणारे देखील प्रत्येक गोष्टीमध्ये कारण सांगत राहतील.