30-07-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड मुलांनो,
बाबांसारखा निरहंकारी आणि निष्काम सेवाधारी कोणीच नाही, साऱ्या विश्वाची बादशाही
मुलांना देऊन आपण जाऊन वानप्रस्थ मध्ये बसतात”
प्रश्न:-
बाबांचा कोणता
संदेश तुम्हाला साऱ्या विश्वाला सांगायचा आहे?
उत्तर:-
सर्वांना सांगा
की, तुम्ही दुःख हर्ता, सुख कर्त्याची मुले आहात. तुम्ही कधीही कोणाला दुःख द्यायचे
नाही. तुम्ही सुखदाता बाबांची आठवण करा, त्यांना फॉलो करा तर अर्ध्या कल्पासाठी
सुखधाम मध्ये निघून जाल. हा संदेश सर्वांना द्यायचा आहे. जे हा संदेश जीवनामध्ये
धारण करतील, ते २१ जन्मांसाठी मायेच्या बेशुद्धीपासून मुक्त होतील.
गीत:-
हमारे तीर्थ
न्यारे हैं…
ओम शांती।
गोड-गोड रुहानी
मुलांना या गीताचा अर्थ तर समजला आहे. आम्हा आत्म्यांचे ते पिता आहेत. मुख्य आहेच
मुळी आत्मा. आता तुम्ही मुले जाणता - आमची आत्मा परमपिता परमात्म्याच्या सन्मुख बसली
आहे. तुमची सोल, सुप्रीम सोलच्या सन्मुख बसली आहे. तुम्हाला तर स्वतःचे शरीर आहे,
यांना लोन घेतलेले शरीर आहे. गुरू लोक मनुष्यांना यात्रेला घेऊन जातात.
भक्तिमार्गामध्ये असंख्य गुरू आहेत. भारतामध्ये तर पत्नी आपल्या पतीला देखील गुरू,
ईश्वर समजते. बाबा मुलांना समजावून सांगतात - तुम्ही मुले आहात ना. समजता आम्ही
बेहदच्या बाबांची संतान आहोत. पुन्हा एकदा बेहदचा वारसा घेण्यासाठी आलो आहोत, आता
आपल्याला सद्गती प्राप्त करायची आहे. हा तर निश्चय आहे ना. संपूर्ण दुनिया
दुर्गतीमध्ये आहे, पतित आहे. पावन बनण्यासाठी बोलावत असतात, तर भारतामध्ये असंख्य
गुरू आहेत. कोणाचे १०० फॉलोअर्स, कोणाचे ५००, कोणाचे ५० सुद्धा असतात. कोणाचे
लाखो-करोडो सुद्धा असतात. जसे खोजो या अनुयायांचे आगाखां गुरू आहेत. त्यांचे किती
फॉलोअर्स आहेत, किती त्यांना रिगार्ड देतात. मग भले काहीही करणारे असोत परंतु
त्यांचा मान किती आहे. भक्तिमार्गामध्ये गुरू अनेक आहेत, परंतु ते देखील नंबरवार
असतात. कोणाची कमाई अब्जावधींची असते. आगाखां यांची कमाई पुष्कळ आहे. त्यांच्या
शिष्यांनी, त्यांना हिऱ्यांमध्ये तोलून त्याचे दान केले होते. एका पारड्यामध्ये हिरे
आणि दुसऱ्या पारड्यामध्ये त्यांचे गुरू. हिरे दान करतात, किती हिरे असतील! आजकाल
बऱ्याच जणांची सुवर्णतुला करतात. दुसरा धातू आहे प्लॅटिनम, तो तर सोन्यापेक्षाही
जास्त मौल्यवान असतो. त्याची देखील तुला केली होती. गुरूचा दर्जा बघा किती आहे...
असे गुरू लोक तर असंख्य आहेत. आता या सद्गुरूंना तुम्ही काय द्याल? त्यांची तुला (वजन)
कराल का? हिऱ्यांनी वजन कराल का? त्यांचे वजन करता येऊ शकते का? त्यांचे स्वतःचे असे
काही वजनच नाहीये. शिव तर आहेतच बिंदू, त्यांचे वजन तुम्ही कसे करू शकणार. हे तुमचे
गुरू किती वंडरफुल आहेत, सर्वात हलके आहेत, अत्यंत सूक्ष्म आहेत. तुमचे गुरू एकच
आहेत. तुम्ही जाणता शिवबाबा तर दाता आहेत. भगवान कधीही काही घेऊ शकत नाहीत, ते तर
देतात. ईश्वरअर्थ दान सर्वजण करतात तर समजतात - दुसऱ्या जन्मामध्ये याचे फळ मिळेल.
इच्छा तर ठेवतात. आता हे तर आहेत बेहदचे बाबा. यांच्यासारखी निष्काम सेवा कोणीही करू
शकत नाही. निष्काम सेवा देखील कशी आहे. मुलांना विश्वाचा, सुखधामचा मालक बनवतात.
बाबा स्वतः थोडेच विश्वाचा मालक बनतात. त्यांना म्हटले जाते - सुखाचा सागर, शांतीचा
सागर, पवित्रतेचा सागर. मुलांना प्रत्येक गोष्ट चांगल्या प्रकारे समजावून सांगितली
जाते. एकाच पित्याकडून तुम्हाला जीवनमुक्ती मिळते. बाबांकडून स्वर्गाचा वारसा मिळतो.
निश्चय केला, बस्स. बाबांची आणि वारशाची आठवण करायची आहे. यांना म्हणतात - ज्ञानाचा
सागर. साऱ्या समुद्राची शाई बनवा, संपूर्ण जंगलाची लेखणी बनवा… तरीही अंत होऊ शकत
नाही. तुम्ही सुरुवातीपासून लिहीत गेलात तर तुमची खंडीभर पुस्तके होतील. हे ज्ञान
तर अतिशय मौल्यवान आहे जे धारण करायचे आहे. तुम्ही जाणता हे ज्ञान काही परंपरेने तर
चालत येत नाही. आता तुम्हाला सार मिळत आहे. बाबा येऊन मुलांना स्वतःचा परिचय देतात,
तेवढे पुरेसे आहे. बाबांचा परिचय दिल्याने, रचयित्याला जाणल्याने रचनेचे देखील
ज्ञान प्राप्त होते. बुद्धी म्हणते की, जे सतयुगामध्ये येत असतील, त्यांचे
पुनर्जन्म जास्त असतील. चक्रामध्ये जे अगोदर आले असतील, तेच येणार. या चक्राला
देखील व्यवस्थित समजून घ्यायचे आहे. गाण्यामध्ये देखील ऐकले - ‘हमारे तीर्थ न्यारे
है…’ ते तर जन्म-जन्मांतर तीर्थयात्रा इत्यादी करत आले आहेत. तुमची मात्र ही फक्त
एका जन्माची यात्रा आहे. या रूहानी यात्रेमध्ये जरा सुद्धा काहीही त्रास नाही.
ज्ञान देणारे एकच सद्गुरू आहेत. सद्गती तर कोणाचीही होत नाही. ते आहेत सुप्रीम
ज्ञानाचा सागर, सर्वांची सद्गती होते. बाकी काय हवे! तत्वे देखील सतोप्रधान बनतात.
इथे तमोप्रधान आहेत म्हणून हवा (वायू तत्व) इत्यादी देखील तशीच तमोप्रधान असते. किती
भूकंप इत्यादी होतात. सतयुगामध्ये तर कोणतीही दुःख देणारी वस्तू असणार नाही. बाबा
आहेतच दुःख हर्ता, सुख कर्ता. तुम्ही त्यांची मुले आहात, कोणालाही दुःख द्यायचे नाही.
सुखाचा वारसा प्राप्त करण्याचा हा मार्ग सर्वांना सांगायचा आहे.
आता बाबा म्हणतात -
तुम्ही सर्वांना सुखच द्यायचे आहे. बाबा तुम्हाला अर्ध्या कल्पासाठी असे सुख देतात
- ज्यामुळे तिथे दुःखाचे नाव सुद्धा राहत नाही. तुम्ही जाणता - बाबांकडून २१
जन्मांचा वारसा प्राप्त करण्याकरिता आपण इथे आलो आहोत. तुम्ही स्टुडंट आहात ना.
तुमच्या मनामध्ये आहे की शिवबाबांकडून स्वर्गाचे सुख घेत आहोत, तर आता सर्व दुःखे
दूर होतील. बाबा आम्हाला सुरजीत (पुनरुज्जीवित) होण्याकरिता संजीवनी बुटी देत आहेत.
तर मग तुम्ही २१ जन्म कधीही मूर्च्छित होणार नाही. ती संजीवनी बुटी आहे - मनमनाभव.
सर्वांचे सद्गती दाता एक बाबाच आहेत, त्यांना निराकार निरहंकारी म्हटले जाते. ज्या
तनामध्ये येतात, ते देखील सामान्य तन आहे. बाबा म्हणतात - ‘डिअर चिल्ड्रेन, आय एम
युअर ओबीडियंट फादर (प्रिय मुलांनो, मी तुमचा आज्ञाधारक पिता आहे)’. मोठ्या व्यक्ती
नेहमी सही करताना असे लिहितात - ‘आय ॲम ओबीडियंट सर्व्हंट’. स्वतःच्या नावा समोर
कधीही ‘श्री’ लिहिणार नाहीत. आजकाल तर ‘श्री-श्री अमुक’ असेच लिहितात. आपणच
आपल्यासाठी ‘श्री-श्री’ लिहीत असतात. ते बाबा आहेत निराकारी, निरहंकारी. आता तुम्ही
त्यांच्या सन्मुख बसला आहात. तुम्ही जाणता ते आपले पिता, टीचर, सद्गुरू आहेत, बाकी
तर सर्व भक्ती मार्गाचे अनेक गुरू आहेत. गुरूंचे ही गुरू असतात. यांचा कोणीही गुरू
नाही. हे सत् बाबा, सत् टीचर, सद्गुरु आहेत.
तुम्ही जाणता -
आत्माच संस्कार धारण करत आहे. बाबा देखील एक आत्माच आहेत ना, त्यांच्यामध्ये देखील
गुण आहेत. तुमचे गुण बदलत असतात. या वेळी जे गुण तुमच्यामध्ये आहेत तेच बाबांचे
आहेत. आणि मग सतयुगामध्ये तुमचे दैवी गुण असतील. बाबा ज्ञानाचा सागर, प्रेमाचा सागर
आहेत. श्रीकृष्णाची महिमा वेगळी आहे. शिवबाबांना ‘१६ कला संपूर्ण’ म्हणू शकत नाही.
ते तर अचल आहेतच. बाबा म्हणतात - ‘१६ कला संपूर्ण’ ही उपाधी तुम्ही मला देऊ शकत नाही.
मी थोडाच विकारी बनतो, ज्यामुळे पुन्हा सर्वगुण संपन्न बनेन. माझी महिमा
यांच्यासारखी (देवतांसारखी) थोडीच कराल. ज्यांनी हे नॉलेज कल्पापूर्वी ऐकले आहे तेच
येतील, येऊन बाबांकडून ऐकतील आणि बाबांची आठवण करतील. अखेरीला हाय-हाय करून रडतात
आणि नंतर मग जय-जयकार होतो. आता तुम्हाला यात्रेचे रहस्य देखील समजले आहे. या
यात्रेमुळे तुम्ही परत कधीही मृत्यूलोकमध्ये येत नाही. त्या (भौतिक) यात्रांवरून
पुन्हा घरी परतून येतात. कितीतरी माणसे स्नान करण्याकरिता जातात. भक्तीचा विस्तार
बघा किती आहे. जसे झाड किती मोठे, विशाल असते, बीज तर अगदी लहान असते. भक्तीचा
देखील विस्तार पहा किती मोठा आहे. ज्ञानाचा एक थेंब देखील सद्गती करतो. भक्तीमध्ये
खाली उतरता-उतरता अर्धे कल्प लागते. इथे तुम्हाला शिडी चढण्या करिता एक सेकंद लागतो
- लिफ्ट किती चांगली आहे. खालून एकदम वर, आपल्या घरी घेऊन जाते. याला म्हटले जाते -
‘चढ़ती कला सर्व का भला’. सर्वांचे सद्गती दाता एक बाबाच आहेत. आता ज्ञान आणि भक्ती
मधला फरक पाहिलात. ज्ञान, भक्ती आणि वैराग्य आहे ना. संन्याशांचे आहे हदचे वैराग्य.
बाबांनी समजावून सांगितले आहे की, वैराग्य दोन प्रकारचे आहे - एक आहे हदचे वैराग्य
ज्याने सद्गती काही होत नाही. दुसरे आहे बेहदचे वैराग्य - ज्याने तुमची सद्गती होते.
आता तुम्हा मुलांना सद्गतीकरिता श्रेष्ठ ते श्रेष्ठ बनण्याचे श्रीमत मिळते. आता
श्रेष्ठ दुनियेची स्थापना होत आहे - श्रीमतावर. ही भ्रष्ट दुनिया रावणाच्या मतावर
बनली आहे. आपण श्रेष्ठ बनत आहोत - या गोष्टी तुम्हीच जाणता. दुनिया अजिबात जाणत नाही.
तुमच्यासाठी तर म्हणतात की, या ब्रह्माकुमारी विनाश घडवून आणणाऱ्या आहेत. खरोखर
विनाश तर होणारच आहे. यानेच तर कल्याण होणार आहे. कल्याणकारी बाबा येतात तेव्हा
महाभारी लढाई सुरू होते. म्हणतील - आम्ही सांगितले होते ना की ब्रह्माकुमारी विनाश
करतील. खरोखर, विनाश तर होणारच आहे, जुनी दुनिया विनाश होईल. आपण नवीन दुनिया
स्थापन करतो. जुन्या नंतर नवीन जरूर आहेच. कल्प-कल्प विनाश होतो तेव्हाच भारतामध्ये
स्वर्गाचे द्वार उघडते. परंतु त्या लोकांना समजणार कसे? पुढे जाऊन अनेकांना समजेल.
बाबा जेव्हा येतात तेव्हा संपूर्ण जुनी दुनिया स्वाहा होते. तुमचा हा यज्ञ तर
वंडरफुल आहे, ज्यामध्ये आहुती पडणार आहे. हे देखील तुम्हीच जाणता, दुसरे कोणीही
जाणत नाहीत. विजय तर पांडवांचाच होणार आहे बाकीचे सर्व नष्ट होतील. तुम्ही पांडव
फक्त शिल्लक राहता आणि नंतर मग नवीन दुनियेमध्ये राज्य करता. हे नॉलेज अतिशय
वंडरफुल आहे. सर्वांचे दुःख-हर्ता, सुख-कर्ता, सद्गती देणारे एक बाबाच आहेत. बाबा
किती गोड, किती सुंदर आहेत. म्हणत आला आहात की, ‘गोड बाबा, तुम्ही जेव्हा याल तेव्हा
आम्ही तुमच्यावर बलिहार जाऊ’. माझे तर फक्त तुम्हीच आहात, दुसरे कोणीही नाही. याचा
अर्थ असा नाही की घरदार सोडून इथे येऊन बसाल. नाही, गृहस्थ व्यवहारामध्ये भले राहा.
७ दिवसांचा कोर्स करून मग कुठेही जा - मनमनाभव. बाबांची आठवण करायची आहे आणि वारसा
घ्यायचा आहे. बस्स, आठवणीच्या यात्रेमध्ये राहायचे आहे, यानेच बेडा (जीवन रुपी नाव)
पार होईल. हे देखील तुम्ही जाणता - पवित्र राहायचे आहे. छी-छी (अशुद्ध) भोजन इत्यादी
खायचे नाही. मुरली तर मिळतेच. काही काळ असाही येईल की, मुरली मिळणारही नाही, संकटे
येतील, दंगली इत्यादी होतील तर मुरली मिळू शकणार नाही. तुम्ही या डोळ्यांनी जे काही
पाहत आहात ते राहणार नाही, सगळेच भस्म होईल. प्रलय काही होत नाही. दुनिया तर एकच आहे,
नवीन तीच जुनी होते. न्यू वर्ल्ड, ओल्ड वर्ल्ड (नवी दुनिया, जुनी दुनिया) म्हटले
जाते. आता तर म्हणणार की ही जुनी दुनिया आहे, आता थोडा वेळ बाकी आहे. ते म्हणतात की
कल्पाचे आयुष्य लाखो वर्षे आहे. कलियुगासाठी म्हणतात ४० हजार वर्षे बाकी आहेत.
वास्तविक ५ हजार वर्षांचे चक्र आहे. तुमच्या बुद्धीमध्ये संपूर्ण नॉलेज आहे. मनुष्य
तर अगदीच पत्थर-बुद्धी आहेत. ॲक्टर्स असूनही ड्रामाच्या क्रिएटर, डायरेक्टरला जाणत
नसतील तर त्यांना काय म्हणणार. दुनियेचा इतिहास-भूगोल कसा रिपीट होतो, हे तर जाणून
घेतले पाहिजे ना. जे चांगल्या प्रकारे जाणतात, बुद्धीमध्ये धारण करून इतरांकडून
धारण करवून घेतात, ते उच्च पद प्राप्त करतात. बाबा म्हणतात - जे ज्ञान माझ्यामध्ये
होते ते आता तुम्हाला देत आहे. ड्रामा प्लॅननुसार मी रिपीट करतो. माझा देखील
ड्रामामध्ये पार्ट आहे. भक्तिमार्गामध्ये देखील पार्ट बजावला, आता तुम्हाला येऊन
स्वतःचा आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताचा परिचय देत आहे. मी देखील ड्रामाच्या
बंधनामध्ये आहे. मी केवळ एकदाच येतो. स्वतःचा परिचय देण्यासाठी आणि रचनेच्या
आदि-मध्य-अंताचे नॉलेज ऐकविण्याकरिता. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) बाबांसारखे
ओबीडियंट बनायचे आहे. कधीही कोणत्या गोष्टीमध्ये स्वतःचा अहंकार दाखवायचा नाही.
निराकारी आणि निरहंकारी होऊन राहायचे आहे.
२) बाबा, टीचर आणि
सद्गुरू यांच्यातील फरक लक्षात घेऊन निश्चयबुद्धी बनून श्रीमतवर चालायचे आहे. रूहानी
यात्रेवर राहायचे आहे.
वरदान:-
‘पुरुषार्थ’
शब्दाला यथार्थ रीतीने यूज करून सदैव पुढे जाणारे श्रेष्ठ पुरुषार्थी भव
अनेकदा ‘पुरुषार्थी’
हा शब्द देखील पराभव झाला अथवा अपयश आले की एक चांगली ढाल बनतो; जेव्हा कोणतीही चूक
होते तेव्हा म्हणता - मी तर अजून पुरुषार्थी आहे. परंतु यथार्थ पुरुषार्थी कधीही
हार खाऊ शकत नाहीत कारण पुरुषार्थ शब्दाचा यथार्थ अर्थ आहे स्वतःला ‘पुरुष’ अर्थात
आत्मा समजून चालणे. अशा आत्मिक स्थितीमध्ये राहणारे पुरुषार्थी तर नेहमी ध्येयाला
समोर ठेवून चालतात, ते कधीही थांबत नाहीत, हिंमत, उत्साह कमी होऊ देत नाहीत.
बोधवाक्य:-
मास्टर
सर्वशक्तिमानच्या स्मृतीमध्ये राहा, ही स्मृतीच आपण मालक असल्याची स्मृती करून देते.
हे अव्यक्त इशारे -
ज्वालास्वरूप स्थितीमध्ये राहून शक्तिशाली आठवणीचा अनुभव करा.
कोणतेही कार्य करत
असताना अथवा बोलताना मधून-मधून संकल्पांच्या ट्रॅफिकला स्टॉप करा. एका मिनिटासाठी
जरी मनाच्या संकल्पांना अथवा शरीराद्वारे चालणाऱ्या कर्माला, मध्येच रोखून ही
प्रॅक्टिस कराल तेव्हाच बिंदू रूपाच्या पॉवरफुल स्टेजवर स्थित होऊ शकाल. जसे
अव्यक्त स्थितीमध्ये राहून कार्य करणे सोपे होत चालले आहे, तशीच ही बिंदूरूपाची
स्थिती देखील सहज सोपी होईल, तर हीच ‘योग’ची ज्वाला स्वरूप स्थिती आहे.