30-09-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - बाबा आले आहेत सर्वांचे दुःख दूर करून सुख देण्यासाठी, म्हणून तुम्ही
दुःख हर्त्याची मुले कोणालाही दुःख देऊ नका”
प्रश्न:-
उच्च पद
प्राप्त करणाऱ्या मुलांची मुख्य निशाणी कोणती असेल?
उत्तर:-
१) ते सदैव श्रीमतावर चालत राहतील. २) कधी हट्टीपणा करणार नाहीत. ३) स्वतःच स्वतःला
राजतिलक (राज्याभिषेक) देण्यासाठी अभ्यास करून गॅप भरून काढतील. ४) स्वतःचे कधी
नुकसान करून घेणार नाहीत. ५) सर्वांप्रती दयाळू आणि कल्याणकारी बनतील. त्यांना
सेवेची खूप आवड असेल. ६) कोणतेही तुच्छ काम करणार नाहीत. भांडण-तंटा करणार नाहीत.
गीत:-
तूने रात
गंवाई सो के…
ओम शांती।
रुहानी (आत्मिक) मुले रुहानी बाबांच्या समोर बसली आहेत. आता या भाषेला तर तुम्ही
मुलेच समजता इतर कोणी नवीन समजू शकणार नाही. “माझ्या रुहानी मुलांनो” असे कधी कोणी
म्हणू शकणार नाही. म्हणताच येणार नाही. तुम्ही जाणता आम्ही रुहानी बाबांच्या समोर
बसलो आहोत. ज्या बाबांना यथार्थ रीतीने कोणीही जाणत नाही. भले आपल्याला भाऊ-भाऊ
देखील समजतात, आपण सर्व आत्मे आहोत. बाबा एक आहेत परंतु यथार्थ रीतीने जाणत नाहीत.
जोपर्यंत सन्मुख येऊन समजून घेणार नाहीत तोपर्यत समजतील तरी कसे? तुम्ही देखील
जेव्हा सन्मुख येता तेव्हा समजता. तुम्ही आहात ब्राह्मण-ब्राह्मणी. तुमचे सरनेमच आहे
ब्रह्मा वंशी ब्रह्माकुमार-कुमारी. शिवाचे तर सर्व आत्मे आहेत. तुम्हाला शिवकुमार
आणि शिवकुमारी म्हणणार नाहीत. हा शब्द चुकीचा होतो. कुमार आहात तर कुमारी देखील
आहात. सर्व आत्मे शिवाचे आहेत. कुमार-कुमारी तेव्हा म्हटले जाते जेव्हा मानवाची
संतान बनतात. शिवाची मुले तर निराकारी आत्मे आहेतच. मुलवतनमध्ये सगळे आत्मेच राहतात,
ज्यांना शाळीग्राम म्हटले जाते. इथे येतात तेव्हा मग देहधारी कुमार आणि कुमारी
बनतात. वास्तविक तुम्ही आहात - ‘कुमार’, शिवबाबांची मुले. ‘कुमारी’ आणि ‘कुमार’
तेव्हा बनता जेव्हा शरीरामध्ये येता. तुम्ही बी.के. आहात, म्हणून भाऊ-बहीण म्हटले
जाते. आता यावेळी तुम्हाला नॉलेज मिळाले आहे. तुम्ही जाणता बाबा आम्हाला पावन बनवून
घेऊन जाणार. आत्मा जितकी बाबांची आठवण करेल तितकी पवित्र बनेल. आत्मे ब्रह्मा
मुखाद्वारे हे नॉलेज शिकतात. चित्रांमध्ये देखील बाबांचे नॉलेज क्लियर आहे.
शिवबाबाच आम्हाला शिकवत आहेत. ना श्रीकृष्ण शिकवू शकतात, ना श्रीकृष्णाद्वारे बाबा
शिकवू शकतात. श्रीकृष्ण तर वैकुंठाचा प्रिन्स आहे, हे सुद्धा तुम्हा मुलांनी
समजावून सांगायचे आहे. श्रीकृष्ण तर स्वर्गामधे आपल्या आई-वडिलांचा मुलगा असेल.
स्वर्गवासी पित्याचा मुलगा असेल, तो वैकुंठाचा प्रिन्स आहे. त्यांना देखील कोणी
जाणत नाहीत. श्रीकृष्ण जयंतीला आपापल्या घरामध्ये श्रीकृष्णासाठी पाळणा बनवतात किंवा
मंदिरामध्ये पाळणा बनवतात. माता जाऊन गोलक मध्ये (दानपेटी मध्ये) पैसे टाकतात, पूजा
करतात. आजकाल क्राईस्टला देखील श्रीकृष्णाप्रमाणे बनवतात. मुकुट इत्यादी घालून
मातेच्या मांडीवर ठेवतात. जसे श्रीकृष्णाला दाखवतात. आता श्रीकृष्ण आणि क्राईस्ट
राशी तर एकच आहे. ते लोक कॉपी करतात. नाहीतर श्रीकृष्णाचा जन्म आणि क्राईस्टचा जन्म
यामध्ये खूप अंतर आहे. क्राईस्टचा जन्म काही छोट्या मुलाच्या रूपामध्ये होत नाही.
क्राईस्टच्या आत्म्याने तर कोणामध्ये जाऊन प्रवेश केला आहे. विषातून (विकारातून)
जन्माला येऊ शकत नाही. अगोदर क्राईस्टला कधी छोट्या मुलाच्या रूपामध्ये दाखवत नव्हते.
क्रॉसवर दाखवत होते. हे असे आता दाखवत आहेत. मुले जाणतात धर्म स्थापकाला कोणी
अशाप्रकारे मारू शकत नाही, तर मग कोणाला मारले? ज्याच्यामध्ये प्रवेश केला, त्याला
दुःख मिळाले. सतोप्रधान आत्म्याला दुःख कसे मिळू शकते. त्याने असे कोणते कर्म केले
ज्यामुळे इतके दुःख भोगले. आत्माच सतोप्रधान अवस्थेमध्ये येते, सर्वांचा हिशोब चुकता
होतो. यावेळी बाबा सर्वांना पावन बनवतात. तिथून सतोप्रधान आत्मा येऊन दुःख भोगू शकत
नाही. आत्माच भोगते ना. आत्मा शरीरामध्ये आहे तर दुःख होते. ‘मला दुखत आहे’ - हे
कोण म्हणाले? या शरीरामध्ये कोणी राहणारा आहे. ते (दुनियावाले) म्हणतात - ‘परमात्मा
आत आहे’, तर ते असे थोडेच म्हणतील - ‘मला दुःख होत आहे’. सर्वांमध्ये परमात्मा
विराजमान आहे तर परमात्मा दुःख कसे भोगेल. ही आत्मा बोलावते - ‘हे परमपिता परमात्मा,
आमचे दुःख दूर करा’, पारलौकिक बाबांनाच आत्मा बोलावते.
आता तुम्ही जाणता बाबा
आलेले आहेत, दुःख दूर करण्याची युक्ती सांगत आहेत. आत्मा शरीरासोबतच एव्हरहेल्दी,
वेल्दी बनते. मूलवतन मध्ये तर हेल्दी-वेल्दी म्हणणार नाही. तिथे काही सृष्टी थोडीच
आहे. तिथे तर आहेच शांती. शांती स्वधर्मा मध्ये टिकून आहेत. आता बाबा आले आहेत,
सर्वांचे दुःख दूर करून सुख देण्यासाठी. तर मुलांना देखील म्हणतात - तुम्ही माझे
बनले आहात, कोणाला दुःख देऊ नका. हे युद्धाचे मैदान आहे, परंतु गुप्त. ते आहे
प्रत्यक्ष. हे जे गायन आहे - युद्धाच्या मैदानात जे मरतील ते स्वर्गामध्ये जातील,
त्याचा अर्थ देखील समजावून सांगावा लागेल. या युद्धाचे महत्व पहा किती आहे. मुले
जाणतात त्या युद्धामध्ये मेल्याने कोणी स्वर्गामध्ये जाऊ शकत नाही. परंतु गीतेमध्ये
भगवानुवाच आहे त्याला मानतील तर ना. भगवंताने कोणाला सांगितले? त्या युद्ध
करणाऱ्यांना सांगितले की तुम्हाला सांगितले? दोघांनाही सांगितले. त्यांना देखील
समजावून सांगितले जाते, स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. ही सेवा देखील करायची
आहे. आता तुम्ही जर स्वर्गामध्ये जाऊ इच्छिता तर पुरुषार्थ करा, युद्धामध्ये तर
सर्वच धर्माचे आहेत, शीख देखील आहेत, ते तर शीख धर्मामध्येच जातील. स्वर्गामध्ये तर
तेव्हा येऊ शकतील जेव्हा येऊन तुम्हा ब्राह्मणांकडून ज्ञान घेतील. जसे बाबांपाशी
येत होते तर बाबा समजावून सांगत होते - तुम्ही युद्ध करत असताना शिवबाबांच्या
आठवणीमध्ये रहाल तर स्वर्गामध्ये येऊ शकाल. बाकी असे नाही की स्वर्गामध्ये राजा
बनाल. नाही, त्यांना जास्ती समजावून सांगू देखील शकत नाही. त्यांना फक्त थोडेसेच
ज्ञान शिकवले जाते. युद्धामध्ये आपल्या इष्ट देवतेची आठवण जरूर ठेवतात. शीख असतील
तर ‘गुरु गोविंद कि जय’ म्हणतील. असा कोणीच नाही जो स्वतःला आत्मा समजून
परमात्म्याची आठवण करेल. बाकी हां जे बाबांचा परिचय घेतील ते स्वर्गामध्ये येतील.
सर्वांचा पिता तर एकच आहे - पतित-पावन. ते पतितांना म्हणतात - ‘माझी आठवण केल्याने
तुमची पापे नष्ट होतील आणि मी जे सुखधाम स्थापन करतो त्यामध्ये तुम्ही याल’. युद्ध
करताना देखील शिवबाबांची आठवण कराल तर स्वर्गामध्ये याल. त्या युद्धाच्या मैदानाची
गोष्ट वेगळी आहे, इथे वेगळी आहे. बाबा म्हणतात - ज्ञानाचा विनाश होत नाही.
शिवबाबांची मुले तर सर्वच आहेत. आता शिवबाबा म्हणत आहेत - मामेकम् (मज एकाची) आठवण
केल्याने तुम्ही माझ्याकडे मुक्तीधामला याल. आणि जे ज्ञान शिकवले जाते ते जर शिकाल
तर स्वर्गाची राजाई मिळेल. किती सोपे आहे, स्वर्गामध्ये जाण्याचा मार्ग सेकंदामध्ये
मिळतो. मी आत्मा बाबांची आठवण करते, युद्धाच्या मैदानामध्ये तर आनंदाने जायचे आहे.
कर्म तर करायचेच आहे. देशाला वाचवण्यासाठी सर्व काही करावे लागते. तिथे तर आहेच एक
धर्म. मतभेदाची कोणतीही गोष्ट नाही. इथे किती मतभेद आहेत. पाण्यासाठी, जमिनीसाठी
भांडणे. पाणी बंद करतात, तर दगड मारायला लागतात. एकमेकांना धान्य देत नाहीत तर
भांडणे होतात.
तुम्ही मुले जाणता
आपण स्वतःचे स्वराज्य स्थापन करत आहोत. शिक्षणाने राज्य प्राप्त करतात. नवीन दुनिया
जरूर स्थापन होणार आहे, नोंदलेले आहे तर किती आनंद झाला पाहिजे. कोणत्याही
गोष्टीवरून भांडण-तंटा करण्याचा काही प्रश्नच नाही. रहायचे देखील अतिशय साधे आहे.
बाबांनी सांगितले आहे तुम्ही सासरी जाता म्हणून आता वनवासामध्ये आहात. सर्व आत्मे
जातील, शरीरे थोडीच जातील. शरीराचा अभिमान देखील सोडून द्यायचा आहे. आपण आत्मा आहोत,
८४ जन्म आता पूर्ण झाले आहेत. जेपण भारतवासी असतील - बोला, भारत स्वर्ग होता, आता
तर कलियुग आहे. कलियुगामध्ये अनेक धर्म आहेत. सतयुगामध्ये एकच धर्म होता. भारत
पुन्हा स्वर्ग बनणार आहे. समजतात देखील भगवान आलेले आहेत. पुढे जाऊन भविष्यवाणी
सुद्धा करत राहतील. वायुमंडळ बघतील ना. तर बाबा मुलांना समजावून सांगत आहेत. बाबा
तर सर्वांचे आहेत ना. सर्वांचा अधिकार आहे. बाबा म्हणत आहेत - ‘मी आलो आहे आणि
सर्वांना म्हणतो - मामेकम् (मज एकाची) आठवण करा तर तुमची विकर्म विनाश होतील’. आता
तर मनुष्य समजतात - कधीही युद्ध लागू शकते. हे तर उद्या देखील होऊ शकते. युद्धाला
जोर धरायला वेळ थोडाच लागतो. परंतु तुम्ही मुले समजता अजून आपली राजधानी स्थापन
झालेली नाहीये तर विनाश कसा होऊ शकतो. अजून बाबांचा संदेशच चोहो बाजूला कुठे दिला
आहे. पतित-पावन बाबा म्हणत आहेत - ‘माझी आठवण करा तर विकर्म विनाश होतील’. हा संदेश
सर्वांच्या कानावर गेला पाहिजे. जरी युद्ध सुरु झाले, बॉम्ब्स सुद्धा पडले परंतु
तुम्हाला निश्चय आहे की, आपली राजधानी जरूर स्थापन होणार आहे, तोपर्यंत विनाश होऊ
शकत नाही. विश्वामध्ये शांती म्हणतात ना. विश्वामध्ये वॉर होईल तर विश्वाला नष्ट
करून टाकतील.
हे आहे विश्व
विद्यालय, साऱ्या विश्वाला तुम्ही नॉलेज देता. एकच बाबा येऊन साऱ्या विश्वाचे
परिवर्तन करतात. ते लोक (दुनियावाले) तर कल्पाचे आयुष्यच लाखो वर्षे आहे असे
म्हणतात. तुम्ही जाणता याचे पूर्ण आयुष्यच ५००० वर्षांचे आहे. म्हणतात -
क्राईस्टच्या ३ हजार वर्षांपूर्वी हेवन होता. इस्लामी, बौद्धी इत्यादी सर्वांच्या
कालावधीचा हिशोब काढतात. त्यांच्या अगोदर दुसऱ्या कोणाचेही नाव नाहीये. तुम्ही तिथी
तारीख सांगू शकता. तर तुम्हाला किती नशा असायला हवा. भांडण इत्यादींचा प्रश्नच नाही.
भांडतात ते जे निधनके (बिनाधनीचे) असतात. तुम्ही आता जो पुरुषार्थ कराल २१ जन्मासाठी
प्रारब्ध बनेल. भांडण-तंटे कराल तर उच्च पद मिळणार नाही. सजा सुद्धा भोगाव्या
लागतील. कोणतीही गोष्ट असेल, काहीही हवे असेल, तर बाबांपाशी या, गर्व्हर्मेंट सुद्धा
म्हणते ना - तुम्ही कायदा आपल्या हातात घेऊ नका. कोणी म्हणतात आम्हाला विदेशी बूट
हवे. बाबा म्हणतील - मुलांनो, आता तर तुम्ही वनवासामध्ये आहात. तिथे तुम्हाला खूप
धन-वस्तू मिळतील. बाबा तर योग्य तेच समजावून सांगतील ना की ही गोष्ट बरोबर नाही. इथे
तुम्ही ही इच्छा का ठेवता. इथे तर अतिशय सिंपल राहिले पाहिजे. नाहीतर देह-अभिमान
येतो, यामध्ये आपले तेच खरे करायचे नसते, बाबा जे म्हणतील, आजारी इत्यादी असाल
डॉक्टर इत्यादींना देखील बोलावतात, औषध-पाणी इत्यादीने काळजी तर सर्वांची घेतली जाते.
तरीही प्रत्येक गोष्टी मध्ये बाबा बसले आहेत. श्रीमत तर श्रीमत आहे ना. निश्चयामध्ये
विजय आहे. ते तर सर्व काही जाणतात ना. बाबांच्या मतावर चालण्यामध्येच कल्याण आहे.
स्वतःचे सुद्धा कल्याण करायचे आहे. कोणाला वर्थ पाउंड बनवू शकत नसाल तर वर्थ नॉट ए
पेनी झालात ना. पाउंड बनण्याच्या लायक नाही. इथे व्हॅल्यू नसेल तर तिथे देखील
व्हॅल्यू राहणार नाही. सेवाभावी मुलांना सेवेची किती आवड असते. फेऱ्या मारत राहतात.
सेवा करत नसतील तर त्यांना दयाळू, कल्याणकारी काहीही म्हटले जाणार नाही. बाबांची
आठवण करत नसाल तर तुच्छ काम करत रहाल. मग पद देखील तुच्छ मिळेल. असे नाही, ‘आमचा तर
शिवबाबांशी योग आहे. हा (ब्रह्मा बाबा) तर आहेच बी.के.’. शिवबाबा ब्रह्मा द्वारेच
ज्ञान देऊ शकतात. तुम्ही फक्त शिवबाबांची आठवण कराल तर मुरली कशी ऐकाल मग निकाल काय
असेल? जर अभ्यास केला नाहीत तर कसले पद मिळणार? हे देखील जाणता सर्वांचेच नशीब काही
श्रेष्ठ बनत नाही. तिथे देखील नंबरवार पदे असणार. पवित्र तर सर्वांना व्हायचेच आहे.
आत्मा पवित्र बनल्याशिवाय शांतीधाम मध्ये जाऊ शकत नाही.
बाबा समजावून सांगत
आहेत - तुम्ही सर्वांना हे ज्ञान ऐकवत चला, भले कोणी आता ऐकत जरी नसतील, पुढे जाऊन
जरूर ऐकतील. आता कितीही विघ्न, वादळे जोरात येतील - तुम्ही घाबरायचे नाही कारण नवीन
धर्माची स्थापना होत आहे ना. तुम्ही गुप्त राजधानी स्थापन करत आहात. बाबा सेवाभावी
मुलांना पाहून खुश होतात. तुम्हाला स्वतःच स्वतःला राजतिलक द्यायचा आहे, श्रीमतावर
चालायचे आहे. यामध्ये आपला हट्ट चालू शकत नाही. फुकट स्वतःचे नुकसान करून घ्यायचे
नाही. बाबा म्हणतात - ‘मुलांनो, सेवाभावी आणि कल्याणकारी बना’. स्टुडंटला टीचर
सांगतील ना, अभ्यास करून गॅप भरून काढ. तुम्हाला २१ जन्मांसाठी स्वर्गाची स्कॉलरशिप
मिळते. डिनायस्टीमध्ये जाणे हीच मोठी स्कॉलरशिप आहे. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) संगमावर
अतिशय सिंपल राहायचे आहे कारण हा वनवासामध्ये राहण्याचा काळ आहे. इथे कोणतीही इच्छा
ठेवायची नाही. कधीही आपल्या हातामध्ये कायदा घ्यायचा नाही. भांडण-तंटा करायचा नाही.
२) विनाश होण्यापूर्वी
नवीन राजधानी स्थापन करण्यासाठी सर्वांना बाबांचा संदेश द्यायचा आहे की बाबा
म्हणतात - माझी आठवण करा तर विकर्म विनाश होतील आणि तुम्ही पावन बनाल.
वरदान:-
संतुष्टतेच्या
विशेषतेद्वारे सेवेमध्ये सफलतामूर्त बनणारे संतुष्टमणी भव
सेवेचा विशेष गुण
संतुष्टता आहे. जर नाव सेवा असेल आणि स्वतः सुद्धा डिस्टर्ब होऊन इतरांना देखील
डिस्टर्ब कराल तर अशी सेवा न करणेच चांगले आहे. जिथे स्वयं प्रती किंवा संपर्क मध्ये
येणाऱ्या प्रति संतुष्टता नसेल ती सेवा ना स्वतःला फळाची प्राप्ती करविते ना
दुसऱ्यांना, त्यामुळे अगोदर एकांतवासी बनून स्व-परिवर्तनाद्वारे संतुष्टमणीचे वरदान
प्राप्त करून मग सेवेमध्ये या तेव्हा सफलतामूर्त बनाल.
बोधवाक्य:-
विघ्न रुपी
दगडांना फोडण्यामध्ये वेळ न गमावता त्याला हाय जंप देऊन पार करा.
अव्यक्त इशारे:- आता
लगनच्या (एकाग्रतेच्या) अग्नीला प्रज्वलित करून योगाला ज्वाला रूपी बनवा.
ज्वाला स्वरूप
आठवणीसाठी मन आणि बुद्धी दोन्हीला एक तर पॉवरफुल ब्रेक हवा आणि वळण्याची (परिवर्तन
करण्याची) शक्ती हवी. याने बुद्धीची शक्ती किंवा कोणतीही एनर्जी वेस्ट न जाता जमा
होत राहील. जितकी जमा होईल तितकीच पारखण्याची, निर्णय करण्याची शक्ती वाढेल. यासाठी
आता संकल्पांचे अंथरूण गोळा करत चला अर्थात समेटण्याच्या शक्तीला धारण करा.