30-09-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड मुलांनो, या
देह-भानापासून मरून जा म्हणजेच या जुन्या पतित देहावरील प्रीत तोडून एका बाबांशी खरी
प्रीत जोडा”
प्रश्न:-
संगमावर तुम्हा
मुलांची नॅचरल ब्युटी कोणती आहे?
उत्तर:-
ज्ञानाच्या
दागिन्यांनी सदैव सजलेले राहणे - हीच तुमची नॅचरल ब्युटी आहे. जे ज्ञानाच्या
दागिन्यांनी सजलेले असतात त्यांचा चेहरा आनंदामध्ये फुलासारखा उमललेला असतो. जर
आनंद होत नसेल तर जरूर कोणत्यातरी देह-अभिमानाची सवय आहे, ज्यामुळेच सर्व विकार
उत्पन्न होतात.
गीत:-
महफिल में जल
उठी शमा...
ओम शांती।
या गाण्याचा
अर्थ किती विचित्र आहे. प्रीत कशासाठी जडली आहे? (मरण्यासाठी) कोणावर जडली आहे?
भगवंतावर, कारण या दुनियेतून मरून त्यांच्याकडे जायचे आहे. अशी कधी कोणावर प्रीत
केली आहे का? जो असा विचार येईल की मरून जाऊ. मग कोणी प्रीत करेल का? गाण्याचा अर्थ
किती वंडरफुल आहे. ज्योतीवर परवाने (पतंग) प्रेम करून फेरी मारून जळून मरतात.
तुम्हाला देखील बाबांकडे येता-येता हे शरीर सोडायचे आहे अर्थात बाबांची आठवण
करता-करता शरीर सोडायचे आहे. हा तर जणू मोठा शत्रू झाला, ज्याच्यावर आपण प्रेम करावे
आणि मरून जावे म्हणून मनुष्य घाबरतात. भगवंताकडे जाण्यासाठी दान-पुण्य, तीर्थयात्रा
इत्यादी करतात. शरीर सोडतात तेव्हा मनुष्य म्हणतात - भगवंताची आठवण करा. भगवान किती
नामवंत आहे. ते येतात तेव्हा संपूर्ण जुनी दुनिया नष्ट करतात. तुम्ही मुले जाणता -
आपण या युनिव्हर्सिटीमध्ये येतोच - जुन्या दुनियेतून नवीन दुनियेमध्ये जाण्यासाठी.
जुन्या दुनियेला पतित दुनिया, हेल म्हटले जाते. बाबा नवीन दुनियेमध्ये जाण्याचा
मार्ग सांगतात - फक्त माझी आठवण करा, मी आहे हेवनली गॉड फादर. त्या लौकिक
पित्याकडून तुम्हाला धन, संपत्ती, घर इत्यादी मिळेल. मुलींना वारसा मिळत नाही.
त्यांना दुसऱ्या घरी पाठवून देतात. अर्थात त्या वारसदार झाल्या नाहीत. हे बाबा तर
आहेत सर्व आत्म्यांचे पिता, यांच्याकडे सर्वांना यायचे आहे, मरायचे आहे. कोणत्यातरी
वेळी अवश्य बाबा येतात, सर्वांना घरी घेऊन जातात; कारण नवीन दुनियेमध्ये फार थोडे
मनुष्य असतात. जुन्या दुनियेमध्ये तर असंख्य आहेत, नवीन दुनियेमध्ये मनुष्य देखील
कमी आणि सुख देखील जास्त असते. जुन्या दुनियेमध्ये पुष्कळ मनुष्य आहेत म्हणून दुःख
सुद्धा खूप आहे म्हणून बोलावत राहतात. गांधीजी ज्यांना भारताचे पितामह समजत होते,
ते देखील म्हणायचे - ‘हे पतित-पावन या’. फक्त त्यांना ओळखत नव्हते. समजतात देखील
पतित-पावन परमपिता परमात्मा आहेत. तेच दुनियेचे लिबरेटर आहेत. राम-सीतेला सारी
दुनिया काही मानणार नाही ना. ही चूक आहे. संपूर्ण दुनिया परमपिता परमात्म्याला
लिबरेटर, गाईड मानते. लिबरेट करतात (मुक्ती देतात) दुःखांपासून. अच्छा दुःख देणारा
कोण? बाबा तर दुःख देऊ शकणार नाहीत कारण ते पतित-पावन आहेत. पावन दुनिया सुखधाममध्ये
घेऊन जाणारे आहेत. तुम्ही आहात त्या रुहानी बाबांची रुहानी मुले. जसे बाबा तशी मुले.
लौकिक पित्याची आहेत देहधारी मुले.
आता तुम्हा मुलांना
समजायचे आहे की आपण आत्मा आहोत, परमपिता परमात्मा आपल्याला वारसा द्यायला आले आहेत.
आपण स्टुडंट आहोत, हे विसरता कामा नये. मुलांच्या बुद्धीमध्ये असते की, शिवबाबा
मधुबनमध्ये मुरली वाजवतात. ती लाकडाची मुरली काही इथे नाहीये. श्रीकृष्णाचे डान्स
करणे, मुरली वाजवणे ते भक्ती मार्गातले आहे. तुम्ही श्रीकृष्णासाठी मुरली म्हणू शकत
नाही. मुरली शिवबाबा वाजवतात. तुमच्याकडे चांगली-चांगली गाणी बनविणारे येतील. गाणी
बहुधा पुरुषच बनवतात. तुम्हाला काही भक्तिमार्गाची गाणी इत्यादी गायची नाही आहेत.
तुम्हाला तर एका शिवबाबांचीच आठवण करायची आहे. बाबा म्हणतात - ‘मज अल्फची आठवण करा’.
‘शिव’ना बिंदू म्हणतात. व्यापारी लोक बिंदू लिहितात तेव्हा ‘शिव’ म्हणतात. एक बिंदू
लिहिला तर १० होतील, पुन्हा बिंदू लिहा तर १००... तुम्हाला देखील शिवबाबांची आठवण
करायची आहे. जितकी ‘शिव’ची आठवण करता तितके अर्ध्या कल्पासाठी खूप श्रीमंत बनता.
तिथे गरीब असतच नाहीत. सगळे सुखी असतात. दुःखाचे नाव सुद्धा नाही. बाबांच्या आठवणीने
विकर्म विनाश होतील. तुम्ही खूप धनवान बनाल. याला म्हटले जाते सत्य बाबांद्वारे खरी
कमाई. हीच सोबत जाईल. सर्व मनुष्य रिकाम्या हाताने जातात. तुम्हाला भरलेल्या हाताने
जायचे आहे. बाबांची आठवण करायची आहे आणि पवित्र बनायचे आहे. बाबांनी समजावून
सांगितले आहे - प्युरिटी असेल तर पीस, प्रॉस्पेरिटी मिळेल. तुम्ही आत्मा अगोदर
पवित्र होता नंतर मग अपवित्र बनता. संन्याशांना देखील सेमी पवित्र म्हणणार. तुमचा
आहे संपूर्ण संन्यास. तुम्ही जाणता ते किती सुख प्राप्त करतात. थोडे सुख आहे मग तर
दुःखच आहे. ते सर्व आहेत भक्तीमार्ग. भक्ती मार्गामध्ये हनुमानाची पूजा कराल तर
त्याचा साक्षात्कार होतो. चंडिका देवीची केवढी जत्रा भरते. ज्यांचे ध्यान करतात
त्यांचे चित्र देखील असते तर ते अवश्य समोर येणारच. परंतु त्याने काय मिळणार? अनेक
प्रकारच्या जत्रा भरतात, कारण कमाई तर होते ना. हा सर्व त्यांचा धंदा आहे. म्हणतात
- नरापासून नारायण बनवण्याच्या धंद्या व्यतिरिक्त बाकी धंद्यांमध्ये सर्व धूरच आहे.
हा धंदा कोणी विरळा करेल.
बाबांचे बनून सर्व
काही देहा सहीत बाबांना देऊन टाका कारण तुम्ही जाणता आपल्याला नवीन शरीर हवे आहे.
बाबा म्हणतात - तुम्ही कृष्णपुरीला जाऊ शकता परंतु जेव्हा आत्मा तमोप्रधानापासून
सतोप्रधान बनेल तेव्हा ना. कृष्णपुरीमध्ये असे म्हणणार नाही की, आम्हाला पावन बनवा.
इथे सर्व मनुष्यमात्र बोलावतात - ‘हे लिबरेटर या, आम्हाला या पाप-आत्म्यांच्या
दुनियेमधून लिबरेट करा’. आता तुम्ही जाणता बाबा आले आहेत आम्हाला आपल्या सोबत घेऊन
जाण्यासाठी. तिथे जाणे तर चांगले आहे ना. मनुष्य शांती इच्छितात. परंतु शांती कशाला
म्हणतात - हेच जाणत नाहीत. कर्म केल्याशिवाय तर कोणी राहू शकत नाही. शांती तर आहे
शांतीधाम मध्ये. मग हे शरीर घेऊन कर्म तर करायचेच आहे. सतयुगामध्ये कर्म करत असताना
देखील शांत असतात, अशांतीमध्ये मनुष्याला दुःख होते म्हणून म्हणतात - शांती कशी
मिळेल. आता तुम्ही मुले जाणता शांतीधाम आपले घर आहे. सतयुगामध्ये शांती-सुख सर्व
काही आहे. आता ते पाहिजे की फक्त शांती पाहिजे. इथे तर दुःख आहे म्हणून पतित-पावन
बाबांना देखील इथे बोलावतात. भक्ती करतातच मुळी भगवंताला भेटण्यासाठी. भक्ती देखील
आधी अव्यभिचारी असते, नंतर मग व्यभिचारी होते. व्यभिचारी भक्तीमध्ये पहा काय-काय
करतात. शिडीमध्ये पहा किती छान दाखवले आहे. परंतु सर्वप्रथम तर हे सिद्ध केले पाहिजे
की, भगवान कोण आहे. श्रीकृष्णाला असे कोणी बनवले! आधीच्या जन्मामध्ये हा कोण होता!
समजावून सांगण्यासाठी खूप चांगले कौशल्य पाहिजे. जे चांगली सेवा करतात, त्यांचे
अंतर्मन त्याची साक्ष देखील देते. या युनिव्हर्सिटीमध्ये जे चांगला अभ्यास करतील ते
जरूर पुढे जातील. नंबरवार तर असतातच. कोणी डल-हेड (मंद-बुद्धी) देखील असतात.
शिवबाबांना आत्मा म्हणते - ‘माझ्या बुद्धीचे कुलूप उघडा’. बाबा म्हणतात - ‘बुद्धीचे
कुलूप उघडण्यासाठीच तर मी आलो आहे’. परंतु तुमची कर्मच अशी आहेत ज्यामुळे कुलूप
उघडतच नाही. मग बाबा तरी काय करणार! खूप पापे केली आहेत, आता बाबा त्याला काय करणार!
टीचरला जर म्हणतील की, आम्ही कमी अभ्यास करणार, तर त्याला टीचर तरी काय करणार? टीचर
काही कोणती कृपा करणार नाहीत. फारफार तर एक्स्ट्रा टाइम देतील. त्यासाठी तर तुम्हाला
मनाई नाही. प्रदर्शनी रिकामी असेल, बसून प्रॅक्टिस करा. भक्तीमार्गामध्ये तर कोणी
म्हणतील माळेचा जप करा. कोणी म्हणेल हा मंत्र म्हणत राहा. इथे तर बाबा आपला परिचय
देतात. बाबांचीच आठवण करायची आहे, ज्यांच्याकडून वारसा मिळतो. सतयुगामध्ये तर
पारलौकिक पित्याचा वारसा मिळतो, मग आठवण करण्याची गरजच राहत नाही. २१ जन्मांसाठी
वारसा मिळतो, तर बाबांकडून चांगल्या रीतीने वारसा घेतला पाहिजे ना. यामध्येही बाबा
म्हणतात - कधीही विकारामध्ये जाऊ नका. थोडी जरी विकाराची टेस्ट बसली तर मग वृद्धी
होईल. सिगारेट इत्यादींची एकदा टेस्ट करतात तर संगतीचा रंग लगेच लागतो आणि मग ती
सवय सोडणे कठीण होऊन जाते. बहाणे किती करतात. कोणतीही वाईट सवय लावून घेता कामा नये.
खराब सवयी काढून टाकायच्या आहेत. बाबा म्हणतात - जिवंतपणी देहाचे भान सोडा, माझी
आठवण करा. देवतांना भोग नेहमी पवित्रच लावला जातो तर तुम्ही देखील पवित्र खा.
आता तुम्हा मुलांना
फुलासारखे हर्षित राहिले पाहिजे. कन्येला पती मिळतो तर चेहरा फुलून जातो ना. चांगले
दागिने, चांगले कपडे इत्यादी परिधान केल्यावर तर अधिकच सुंदर दिसू लागते. आता तुम्ही
तर ज्ञानाचे दागिने परिधान करता. तिथे स्वर्गामध्ये तर नॅचरल ब्युटी असते.
श्रीकृष्णाचे नावच आहे - सुंदर. राजा-राणी, प्रिन्स-प्रिन्सेस सर्व सुंदर असतात.
तिथे प्रकृति देखील सतोप्रधान बनते. लक्ष्मी-नारायणासारखी नॅचरल ब्युटी इथे कोणीही
बनवू शकत नाही. त्यांना या डोळ्यांनी कोणी पाहू थोडेच शकतात. हो, साक्षात्कार होतो,
परंतु साक्षात्काराने कोणी हुबेहूब चित्र थोडेच बनवू शकेल. हां, एखाद्या आर्टिस्टला
साक्षात्कार झाला आणि त्याच वेळी बसून बनवले तर; परंतु आहे कठीण. तर तुम्हा मुलांना
खूप नशा असला पाहिजे. आता बाबा आम्हाला नेण्यासाठी आले आहेत. बाबांकडून आम्हाला
स्वर्गाचा वारसा मिळतो. हे आपले ८४ जन्म पूर्ण झाले आहेत. अशा प्रकारचे विचार
बुद्धीमध्ये असल्याने आनंद होईल. थोडा सुद्धा विकाराचा विचार येता कामा नये. बाबा
म्हणतात - काम महाशत्रू आहे. म्हणूनच तर द्रौपदीने देखील बोलावले ना.
बाबा म्हणतात - तुम्ही
फक्त माझ्याकडूनच ऐका आणि हेच श्रीमत इतरांनाही ऐकवा. फादर शोज सन. सन शोज फादर.
फादर कोण? शिव फादर. शिव आणि शाळीग्राम यांचे गायन आहे. शिवबाबा जे समजावून सांगतात
त्यावर फॉलो करा. फॉलो फादर. हे गायन त्यांचे आहे, बाबा म्हणतात - गोड मुलांनो, फॉलो
करून पवित्र बना, फॉलो केल्यानेच तुम्ही स्वर्गाचे मालक बनाल. लौकिक पित्याला फॉलो
केल्याने ६३ जन्म तुम्ही शिडी खाली उतरता (पतित बनता). आता पारलौकिक पित्याला फॉलो
करून वर चढायचे आहे. बाबांसोबत घरी जायचे आहे. बाबा म्हणतात - एक-एक रत्न लाखो
रुपयांचे आहे. बाबा दररोज समजावून सांगत राहतात - गोड-गोड मुलांनो सर्वप्रथम
सर्वांना दोन पित्याचा परिचय द्यायचा आहे. लौकिक पिता पतित बनण्याचा वारसा देतात.
पारलौकिक पिता पावन बनण्याचा वारसा देतात. किती फरक आहे. आता पारलौकिक पिता सांगत
आहेत - पावन बना. विकारामध्ये जाणाऱ्याला पतित म्हटले जाते.
तुमचे मिशन आहे -
पतितांना पावन बनविण्याचा मार्ग सांगणारे. पारलौकिक बाबा देखील आता म्हणतात - पावन
बना, जेव्हा की विनाश समोर उभा आहे. तर आता काय केले पाहिजे? अवश्य पारलौकिक
बाबांच्या मतावर चालले पाहिजे ना. प्रदर्शनीमध्ये अशी देखील प्रतिज्ञा लिहून घेतली
पाहिजे. पारलौकिक बाबांना फॉलो करणार? पतित बनणे सोडणार? लिहा. बाबाच गॅरंटी घेतात,
तुम्ही देखील गॅरंटी घेऊ शकता. तुम्ही पतित बनताच कशाला ज्यामुळे मग हाका मारता -
हे पतित-पावन या. संपूर्ण गोष्टच आहे प्युरिटीवर (पवित्रतेवर). तुम्हा मुलांना
दिवसेंदिवस आनंदात राहिले पाहिजे. आम्हाला बाबा स्वर्गाचा वारसा देत आहेत. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) कोणतीही
खराब सवय लावून घ्यायची नाही. जिवंतपणी देहाचे भान सोडायचे आहे. फुलासारखे हर्षित
राहायचे आहे.
२) पारलौकिक बाबांना
फॉलो करून पावन बनायचे आहे. त्यांच्या श्रीमतावर चालण्याची प्रतिज्ञा करायची आहे आणि
करवून घ्यायची आहे.
वरदान:-
निर्विकारी
अथवा फरिश्ता स्वरूपाच्या स्थितीचा अनुभव करणारे आत्म-अभिमानी भव
जी मुले आत्म-अभिमानी
बनतात ते सहजच निर्विकारी बनतात. आत्म-अभिमानी स्थिती द्वारे मनसामध्ये देखील
निर्विकारीपणाच्या स्टेजचा अनुभव होतो. असे निर्विकारी, की ज्यांना कोणत्याही
प्रकारची अपवित्रता अथवा ५ तत्वांचे आकर्षण आकर्षित करत नाही - त्यांनाच फरिश्ता
म्हटले जाते. यासाठी साकारमध्ये राहत असताना आपल्या निराकारी आत्म-अभिमानी
स्थितीमध्ये स्थित होऊन राहा.
बोधवाक्य:-
जीवनामध्ये
अतींद्रिय सुखाचा अनुभव करण्यासाठी विशेष अमृतवेलेला एकांतप्रिय बना.
हे अव्यक्त इशारे -
आता आपल्या ‘दाता’ स्वरूपाला प्रत्यक्ष करा.
ब्राह्मण आत्म्यांकडे
ज्ञान तर आधीपासूनच आहे परंतु त्यांच्या प्रति दोन प्रकारे दाता बनाः- १) ज्या
आत्म्याला, ज्या शक्तीची आवश्यकता असेल, त्या आत्म्याला मनसाद्वारे अर्थात शुद्ध
वृत्ती, व्हायब्रेशन्स द्वारे शक्तींचे दान अर्थात सहयोग द्या. २) कर्माद्वारे सदैव
आपल्या जीवनामध्ये गुणमूर्त बनून, प्रत्यक्ष सॅम्पल बनून इतरांना सहज गुण धारण
करण्याचा सहयोग द्या, याला म्हटले जाते गुण दान. दान याचा अर्थ आहे - सहयोग देणे.