31-07-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - तुम्ही पहाटे उठून खूप प्रेमाने म्हणा - ‘बाबा गुडमॉर्निंग’, या आठवणी
द्वारेच तुम्ही सतोप्रधान बनाल”
प्रश्न:-
ॲक्युरेट आठवणी
द्वारे बाबांची करेंट (शक्ती) घेण्यासाठी कोणत्या मुख्य गुणांची आवश्यकता आहे?
उत्तर:-
अतिशय धैर्यवत होऊन, जाणीवपूर्वक आणि गंभीरतेने स्वतःला आत्मा समजून आठवण केल्याने
बाबांची करेंट मिळेल आणि आत्मा सतोप्रधान बनत जाईल. तुम्हाला आता बाबांच्या आठवणीने
सतावले पाहिजे कारण बाबांकडून खूप भारी वारसा मिळतो, तुम्ही काट्या पासून फूल बनता,
सर्व दैवी गुण येतात.
ओम शांती।
बाबा म्हणतात गोड मुलांनो, ततत्वम् अर्थात तुम्ही आत्मे देखील शांत स्वरूप आहात.
तुम्हा सर्व आत्म्यांचा स्वधर्म आहेच शांती. शांतीधामहून इथे येऊन मग टॉकी बनता (वाणीमध्ये
येता). ही कर्मेंद्रिये तुम्हाला मिळतातच मुळी पार्ट बजावण्याकरिता. आत्मा लहान-मोठी
होत नाही, शरीर लहान-मोठे होते. बाबा म्हणतात - मी काही शरीरधारी नाहीये. मला
मुलांना सन्मुख भेटण्यासाठी यावे लागते. समजा जसे वडील आहेत, त्यांच्या पोटी मुले
जन्म घेतात; तर ते मूल असे म्हणणार नाही की मी परमधामहून येऊन जन्म घेऊन आई-वडिलांना
भेटण्यासाठी आलो आहे. भले कोणती नवीन आत्मा जेव्हा कोणाच्या शरीरामध्ये येते किंवा
कोणती जुनी आत्मा कोणाच्या शरीरामध्ये प्रवेश करते तर तेव्हा ती असे म्हणणार नाही
की आई-वडिलांना भेटण्यासाठी आलो आहे. त्यांना ऑटोमॅटिक आई-वडील मिळतात. इथे ही आहे
नवीन गोष्ट. बाबा म्हणतात - मी परमधामहून येऊन तुम्हा मुलांच्या सन्मुख प्रकट झालो
आहे. तुम्हाला नॉलेज देतो कारण मी आहे नॉलेजफुल, ज्ञानाचा सागर, मी येतो तुम्हा
मुलांना शिकविण्याकरिता, राजयोग शिकविण्यासाठी.
तुम्ही मुले आता
संगमावर आहात, मग जायचे आहे आपल्या घरी म्हणून पावन तर जरूर बनायचे आहे. मनाला आतून
खूप आनंद झाला पाहिजे. ओहो! बेहदचे बाबा म्हणतात गोड-गोड मुलांनो, माझी आठवण करा तर
तुम्ही सतोप्रधान, विश्वाचे मालक बनाल. बाबा मुलांवर किती प्रेम करतात. असे नाही की
केवळ टीचरच्या रूपामध्ये शिकवून घरी निघून जातात. हे तर पिता देखील आहेत, टीचर
देखील आहेत. तुम्हाला शिकवतात. आठवणीची यात्रा देखील शिकवतात. तर विश्वाचे मालक
बनविणाऱ्या, पतितापासून पावन बनविणाऱ्या बाबांवर खूप प्रेम असायला हवे, पहाटे उठून
सर्वात आधी शिवबाबांना गुडमॉर्निंग केले पाहिजे. मुलांनी आपल्या मनाला विचारायचे आहे
की आपण पहाटे उठून बेहदच्या बाबांची किती आठवण करतो! पहाटे उठून बाबांना
गुडमॉर्निंग कराल, ज्ञानाच्या चिंतनामध्ये रहाल तर आनंदाचा पारा चढेल. मुख्य आहेच
आठवण याद्वारे भविष्यासाठी खूप भारी कमाई होते. कल्प-कल्पांतर ही कमाई उपयोगाला
येईल. तुम्हाला खूप धैर्यतापूर्वक, गंभीरतापूर्वक आणि जाणीवपूर्वक आठवण करायची आहे.
स्थूल रूपामध्ये तर भले म्हणतात की, ‘आम्ही बाबांना खूप आठवण करतो’ परंतु ॲक्युरेट
आठवण करण्यामध्ये मेहनत आहे. जे बाबांची जास्त आठवण करतात त्यांना जास्त करेंट मिळतो
कारण आठवणीला आठवण मिळते. योग आणि ज्ञान दोन गोष्टी आहेत. योगाचा खूप जबरदस्त
सब्जेक्ट आहे. योगाद्वारेच आत्मा सतोप्रधान बनते. आठवणी शिवाय सतोप्रधान होणे असंभव
आहे. चांगल्या रीतीने प्रेमाने बाबांची आठवण कराल तर ऑटोमॅटिकली करेंट मिळेल. हेल्दी
बनाल. करेंटने आयुष्य देखील वाढते. मुले आठवण करतात तर बाबा देखील सर्चलाईट देतात.
गोड मुलांनी हे पक्के
लक्षात ठेवायचे आहे. शिवबाबा आम्हाला शिकवत आहेत. शिवबाबा पतित-पावन देखील आहेत.
सद्गती दाता देखील आहेत. सद्गती अर्थात स्वर्गाची राजाई देतात. बाबा किती गोड आहेत.
किती प्रेमाने मुलांना बसून शिकवतात. बाबा, दादाद्वारे (ब्रह्मा बाबांद्वारे)
आपल्याला शिकवतात. बाबा मुलांवर किती प्रेम करतात, कोणताही त्रास देत नाहीत. फक्त
एवढेच म्हणतात - माझी आठवण करा आणि चक्राची आठवण करा. बाबांच्या आठवणीने हृदय एकदम
शीतल झाले पाहिजे. एका बाबांचीच आठवण सतवायला पाहिजे कारण बाबांकडून किती जबरदस्त
वारसा मिळतो. स्वतःला पाहिले पाहिजे - ‘माझे बाबांवर किती प्रेम आहे. माझ्यामध्ये
कितपत दैवी गुण आहेत!’ कारण तुम्ही मुले आता काट्यांपासून फूल बनत आहात. जितके-जितके
योगमध्ये रहाल तितके काट्यांपासून फूल, सतोप्रधान बनत जाल. जे अनेक काट्यांना फूल
बनवतात त्यांनाच खरे सुगंधी फूल म्हटले जाईल. ते कधी कोणाला काटा लावणार नाहीत (दुःख
देणार नाहीत). क्रोध देखील खूप मोठा काटा आहे. अनेकांना दुःख देतात. आता तुम्ही मुले
काट्यांच्या दुनियेमधून किनाऱ्यावर आला आहात, तुम्ही आहात संगमावर. जसे माळी फुलांना
वेगळ्या पॉटमध्ये काढून ठेवतात तसेच तुम्हा फुलांना देखील आता संगमयुगी पॉटमध्ये
वेगळे ठेवले आहे. मग तुम्ही फुले स्वर्गामध्ये जाल. कलियुगी काटे भस्म होतील.
बाबा म्हणतात - ‘गोड
मुलांनो, जितके तुम्ही अनेकांचे कल्याण कराल तितके तुम्हालाच ऊजुरा (प्रतिफळ) मिळेल.
अनेकांना रस्ता सांगाल तर अनेकांचे आशीर्वाद मिळतील. ज्ञान रत्नांनी झोळी भरून मग
दान करायचे आहे. ज्ञान सागर तुम्हाला रत्नांच्या थाळ्या भरभरून देत आहेत, जे त्याचे
दान करतात तेच सर्वांना प्रिय वाटतात. मुलांना किती आनंद झाला पाहिजे. जी हुशार मुले
असतील ती तर म्हणतील आम्ही बाबांकडून पूर्णच वारसा घेणार. एकदम चिकटून राहतील.
बाबांवर खूप प्रेम असेल कारण जाणता प्राण देणारे बाबा मिळाले आहेत. नॉलेजचे वरदान
असे देतात ज्याद्वारे आपण कोणापासून कोण बनतो, इन्साल्वेंट पासून साल्वेंट (पतितापासून
पावन) बनतो. इतका भंडारा भरपूर करतात. जितकी बाबांची आठवण कराल तितके प्रेम निर्माण
होईल, कशिश (ओढ) उत्पन्न होईल. सुई स्वच्छ असते तेव्हा चुंबकाकडे खेचली जाते ना.
बाबांच्या आठवणीने कट निघून जात राहील. एका बाबांशिवाय इतर कोणाचीही आठवण येऊ नये.
बाबा म्हणतात - ‘गोड
मुलांनो, चुका करू नका. स्वदर्शन चक्रधारी बना, लाईट हाऊस बना’. स्वदर्शन चक्रधारी
बनण्याची चांगली प्रॅक्टिस झाली की मग तुम्ही जणू ज्ञान सागर बनाल. जसे स्टुडंट्स
शिकून टीचर बनतात ना. तुमचा धंदाच हा आहे. सर्वांना स्वदर्शन चक्रधारी बनवा तेव्हाच
चक्रवर्ती राजा-राणी बनाल. बाबा म्हणतात - ‘मुलांनो, तुमच्याशिवाय मला देखील बेचैन
वाटते. जेव्हा वेळ जवळ येते तर बेचैन वाटू लागते. बस्स, आता मी जातोच. मुले खूप
बोलावत आहेत, खूप दुःखी आहेत. दया येते म्हणून मी तुम्हा मुलांना सर्व दुःखातून
सोडविण्यासाठी येतो. आता तुम्हा मुलांना घरी यायचे आहे, मग तिथून तुम्ही आपोआप
सुखधाममध्ये निघून जाल. तिथे मी तुमचा सोबती बनणार नाही. आपल्या अवस्थेनुसार तुमची
आत्मा निघून जाईल. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) बाबांची
करेंट (शक्ती) ऑटोमॅटिक घेण्यासाठी अतिशय प्रेमाने बाबांची आठवण करायची आहे. ही
आठवणच हेल्दी बनवेल. करेंट घेतल्यानेच आयुष्य वाढेल. आठवणीनेच बाबांची सर्चलाईट
मिळेल.
२) निष्काळजीपणा
सोडून स्वदर्शन चक्रधारी, लाईट हाऊस बनायचे आहे, याद्वारेच ज्ञान सागर बनून
चक्रवर्ती राजा-राणी बनाल.
वरदान:-
सर्वांना
खुशखबर ऐकविणारे आनंदाच्या खजिन्याने भरपूर भंडारा भव
नेहमी आपल्या या
स्वरूपाला समोर ठेवा की आम्ही आनंदाच्या खजिन्याने भरपूर भंडार आहोत. जे काही अगणित
आणि अविनाशी खजिने मिळाले आहेत त्या खजिन्यांना स्मृतीमध्ये आणा. खजिन्यांना
स्मृतीमध्ये आणल्याने आनंद होईल आणि जिथे आनंद आहे तिथे नेहमीसाठी दुःख दूर होतात.
खजिन्यांच्या स्मृतीने आत्मा समर्थ बनते (शक्तिशाली बनते), व्यर्थ समाप्त होते.
भरपूर आत्मा कधीही हलचलमध्ये येत नाही, ती स्वतः देखील आनंदी राहते आणि इतरांना
देखील खुशखबर ऐकवते.
बोधवाक्य:-
योग्य बनायचे
असेल तर कर्म आणि योग यांचा बॅलन्स ठेवा.
अव्यक्त इशारे -
संकल्पांची शक्ती जमा करून श्रेष्ठ सेवेच्या निमित्त बना:-
सेवेमध्ये वाणीद्वारे
संदेश देण्यासाठी वेळ देखील देता, संपत्ती देखील लावता, हलचलमध्ये सुद्धा येता,
थकूनही जाता… परंतु श्रेष्ठ संकल्पाच्या सेवेमध्ये हे सर्व वाचेल. तर या संकल्प
शक्तीला वाढवा. दृढता संपन्न संकल्प करा म्हणजे प्रत्यक्षता देखील लवकर होईल.
ड्रामातील काही गुह्य
रहस्ये (संदेशी मुलींद्वारा)
१) या विराट
फिल्ममध्ये (ड्रामामध्ये) प्रत्येक मनुष्य आत्म्यामध्ये आपापल्या पोझिशन अनुसार
संपूर्ण जीवनाचे ज्ञान अथवा ॲक्ट अगोदरच मर्ज रूपामध्ये असते. जीवात्म्यामध्ये
संपूर्ण जीवनाची ओळख मर्ज असल्या कारणाने वेळेवर इमर्ज होते. प्रत्येकामध्ये
आपापल्या संपूर्णतेच्या अवस्थेनुसार माहिती किंवा ॲक्ट जी मर्ज आहे, तिच वेळ
आल्यावर इमर्ज होते ज्यामुळे तुम्ही प्रत्येक जण जानी-जाननहार बनता.
२) या विराट फिल्मची
सेकंदा-सेकंदाची ॲक्ट नवीन असल्या कारणाने तुम्हाला असे वाटेल जसेकाही आत्ताच इथे
आले आहे. प्रत्येक सेकंदाची ॲक्ट वेगळी असते, नाही म्हणायला कल्पा पूर्वीचीच घडी
रिपीट होते परंतु ज्यावेळी प्रॅक्टिकल लाईफमध्ये वावरता, त्यावेळी तीच ॲक्ट नवीन
वाटू लागते. याच समजुतीने पुढे चालत रहा. असे कोणी म्हणू शकत नाही की, ‘मी तर ज्ञान
प्राप्त केले, आता मी जाते’; नाही. जोपर्यंत विनाश होत नाही तोपर्यंत संपूर्ण ॲक्ट
आणि संपूर्ण ज्ञान नवीन आहे.
३) या विराट ड्रामाची
जी भावी बनलेली आहे…, ती निश्चयामुळेच बनलेली आहे. भावीला कोणी टाळतो किंवा बनवितो
ते सर्व आपल्यावर आहे. स्वतःचा शत्रू आणि स्वतःचा मित्र मीच आहे. आता तुम्हाला खूप
रमणीक, स्वीट बनायचे आहे आणि बनवायचे आहे.
४) या विराट
फिल्ममध्ये हे सहन करणे देखील तुमच्यासाठी कल्पापूर्वीचे एक गोड स्वप्न आहे कारण
तरीही तुम्हाला काहीच होत नाही, ज्यांनी पण तुम्हाला त्रास दिला आहे ते देखील
म्हणतील की मी यांना इतका त्रास दिला, दुःख दिले, परंतु तरीही हे तर डिवाइन युनिटी,
सुप्रीम युनिटी, (दैवी एकता, सर्वोच्च एकता), विजयी पांडव बनून राहतात. या
पूर्वनिर्धारित भावीला कोणीही टाळू शकत नाही.
५) या विराट
फिल्ममध्ये पहा कसे वंडर आहे, जे तुम्ही प्रत्यक्ष पांडव देखील येऊन पोहोचले आहात
आणि तुमची जुनी चित्रे आणि निशाण्या देखील अजूनपर्यंत कायम आहेत. ज्याप्रमाणे जुने
पेपर, जुने ग्रंथ, गीता ग्रंथ इत्यादी जपून ठेवतात. मग त्याचा खूप मान असतो. अशा
जुन्या वस्तू कायम असताना देखील आता नवीन वस्तूंचा शोध लावला जातो. जुनी गीता
प्रॅक्टिकल मध्ये असताना, नवीन गीतेचा शोध लावला आहे. जुन्याचा अंत तेव्हा होईल
जेव्हा नवीन स्थापित होईल. आता तुम्ही प्रॅक्टिकल मध्ये ज्ञानाला जीवनामध्ये
प्रत्यक्ष धारण केल्याने दुर्गा, काली इत्यादी बनल्या आहात. मग जुन्या स्थूल जड
चित्रांचा विनाश होतो आणि नवीन चैतन्य स्वरूपाची स्थापना होते.
६) या विराट फिल्म
प्लैन अनुसार संगमाच्या गोड वेळेला तुम्ही अनन्य दैवी मुलेच विकारांवर विजय प्राप्त
करून वैकुंठाची स्वीट लॉटरी प्राप्त करता. तुमचे हे ललाट किती लकी आहे. यावेळी
तुम्ही नर आणि नारी अविनाशी ज्ञाना द्वारे पूज्य योग्य देवता पद प्राप्त करता, हीच
आहे या संगमाच्या सुंदर आणि अद्भुत काळाची अद्भुत रित.
७) ईश्वर साक्षी होऊन
पाहत आहे की मी ज्या ॲक्टर्सना अनेक दागिन्यांनी, आभूषणांनी श्रृंगारून या सृष्टी
रुपी स्टेजवर डान्स करण्यासाठी पाठविले होते ते कसे ॲक्ट करत आहेत. मी माझ्या दैवी
मुलांना सोन्याचे धन, चांदीचे धन देऊन सांगितले होते की ही आभूषणे, हे दागिने घालून
प्रसन्नचित्त होऊन साक्षी बनून ॲक्ट देखील करा आणि साक्षी होऊन या खेळाला देखील पहा.
अडकून पडू नका परंतु अर्धा कल्प राज्यभाग्य भोगून मग अर्धा कल्प आपणच रचलेल्या
मायेमध्ये अडकून पडले आहेत. आता पुन्हा मी तुम्हाला सांगतो या मायेला सोडून द्या.
या ज्ञान मार्गामध्ये विकारी कार्य बदलून निर्विकारी बनल्याने आदि-मध्य-अंत
दुःखातून मुक्त होऊन जन्म-जन्मांतरासाठी सुख प्राप्त कराल.
८) आपल्यापेक्षा
कोणत्याही उच्च अवस्था असणाऱ्या द्वारे जर कोणती सावधानी (इशारा) मिळत असेल तर
त्याला राजयुक्त समजून स्वीकारण्यामध्येच कल्याण आहे. त्याच्यामधील गहिऱ्या रहस्याला
जाणून घेतले पाहिजे की यामध्ये अवश्य कोणते कल्याण सामावलेले आहे. हा जो पॉईंट मला
यांच्या द्वारे मिळाला आहे तो अतिशय योग्यच आहे, त्याला अतिशय आनंदाने स्वीकारले
पाहिजे कारण माझ्याकडून कधी कोणती चूक झाली तर तो पॉईंट आठवल्यामुळे स्वतःला करेक्ट
करू शकेन त्यामुळे कोणत्याही प्रकारची सावधानी (इशारा) असेल खूप विशाल-बुद्धीने
धारण केल्याने तुम्ही उन्नतीला प्राप्त करू शकाल.
९) आता तुम्हाला
निरंतर अंतर्मुखी होऊन योगामध्ये रहायचे आहे कारण अंतर्मुखी झाल्याने स्वतःला पाहू
शकाल. केवळ पाहणार नाही, तर परिवर्तन देखील करू शकाल. हीच आहे सर्वोत्तम अवस्था.
जेव्हा ठाऊक आहे प्रत्येकजण आपल्या अवस्थे प्रमाणे पुरुषार्थी आहे तर कोणत्याही
पुरुषार्थीसाठी आरग्यु करणे (वादविवाद घालणे) योग्य नाही कारण ते आपल्या स्टेज
अनुसार पुरुषार्थी आहेत, त्यांच्या स्टेजला (स्थितीला) पाहून त्यांच्याकडून गुण घ्या.
जर गुण घेऊ शकत नसाल तर त्या गोष्टीला सोडून द्या.
१०) तुम्ही नेहमी
आपल्या सर्वोत्तम लक्ष्याला समोर पाहून स्वतःलाच बघा. तुम्ही प्रत्येकजण व्यक्तिगत
पुरुषार्थी आहात, तुम्ही स्वतःकडे दृष्टी ठेवून पुढे पळत रहा, कोणी भले काहीही करत
असेल परंतु मी आपल्या स्वरूपामध्ये स्थित राहीन, अन्य कोणालाही बघणार नाही. आपल्या
बुद्धी योगबळाद्वारे मी त्याच्या अवस्थेला ओळखेन. अंतर्मुखतेच्या अवस्थेद्वारेच
तुम्ही अनेक परीक्षांमध्ये पास होऊ शकता. अच्छा. ओम् शांती.