01-05-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुम्ही रावणाच्या मतावर चालून बाबांची निंदा केली आहे त्यामुळे भारत कवडी तुल्य बनला आहे, आता त्यांना ओळखून त्यांची आठवण करा तेव्हाच श्रीमंत बनाल”

प्रश्न:-
शिडीच्या चित्रामध्ये कोणते अद्भुत रहस्य सामावलेले आहे?

उत्तर:-
अर्धा कल्प आहे भक्तीचा डान्स आणि अर्धा कल्प आहे
ज्ञानाचा डान्स. जेव्हा भक्तीचा डान्स असतो तेव्हा ज्ञानाचा नाही आणि जेव्हा ज्ञानाचा असतो तेव्हा भक्तीचा नाही. अर्धा कल्प रावणाचे प्रारब्ध चालते आणि अर्धा कल्प तुम्ही मुले प्रारब्ध भोगता. हे गूढ रहस्य शिडीच्या चित्रामध्ये दडलेले आहे.

ओम शांती।
बाबा समजावून सांगत आहेत - भक्तिमार्गामध्ये खूपच भक्तीचा डान्स केला आहे, ज्ञानाचा डान्स केलेला नाही. भक्तीचा डान्स जेव्हा असतो तेव्हा ज्ञानाचा डान्स नसतो. जेव्हा ज्ञानाचा असतो तेव्हा भक्तीचा नसतो कारण भक्तीचा डान्स उतरत्या कलेमध्ये घेऊन जातो. सतयुग-त्रेतामध्ये भक्ती नसते. भक्ती सुरू होते द्वापरपासून. जेव्हा भक्ती सुरू होते तेव्हा ज्ञानाचे प्रारब्ध पूर्ण होते आणि मग उतरती कला सुरु होते. आपण कसे उतरतो, ते तर बाबाच बसून समजावून सांगतात. मी कल्प-कल्प येऊन मुलांना सांगतो - तुम्हा मुलांनी माझी खूप निंदा केली आहे. जेव्हा-जेव्हा भारतामध्ये या आदि सनातन देवी-देवता धर्माची खूप निंदा होते तेव्हा मी येतो. निंदा कशाला म्हटले जाते, ते देखील समजावून सांगतात. बाबा म्हणतात - मी येऊन विकारी नरकवासी भारताला कल्प-कल्प स्वर्गवासी बनवितो. तुम्ही आसुरी मतावर चालून माझी निंदा केल्या कारणाने किती गरीब बनले आहात. राम-राज्य होते, आता आहे रावण राज्य, ज्याला हार आणि जीत, दिवस आणि रात्र म्हटले जाते. आता विचार करा - मी कधी येऊ! ज्यांना राज्य दिले, तेच राज्य गमावून बसले आहेत. हिशोब तर सगळा समजावून सांगितलाच आहे. मी येऊन वारसा देतो आणि मग रावण येऊन तुम्हाला श्रापित करतो - भारताला खास, दुनियेला आम. भारताच्या महिमे विषयी देखील कोणाला ठाऊक नाहीये. सर्वात पहिला भारतच होता, तो कधी होता, कसा होता, कोण राज्य करत होते, या विषयी कोणालाच काहीही माहिती नाहीये. काहीच समजत नाहीत. जे देवता होते, त्यांचा चेहरा मनुष्याचा होता आणि आचरण देवतांचे होते. आता चेहरा भले मनुष्याचा आहे, परंतु आचरण आसुरी आहे; ज्यांना तुम्ही हे ज्ञान समजावून सांगता त्यांना ते समजतच नाही कारण पारलौकिक पित्यालाच जाणत नाहीत. उलट अजूनच शिव्या देत बसतात. बाबांची निंदा करता-करता एकदमच कवडी-तुल्य बनले आहेत. भारताचा डाऊन फॉल झाला आहे. जेव्हा अशी हालत होते, बाबा म्हणतात - तेव्हा मी येतो. आता तुम्हा मुलांना सन्मुख बसून सांगत आहे. कल्पापूर्वी देखील असेच सांगितले होते. ही दैवी संप्रदायाची स्थापना होत आहे, मनुष्या पासून देवता बनत आहेत. मनुष्यांना हे ठाऊक सुद्धा नाहीये की बाबा कधी येतात, सतयुग, त्रेतामध्ये तुम्ही खूप आनंदाने प्रारब्ध भोगता. मग द्वापर पासून रावणाचा शाप घेत-घेत पूर्णपणे नष्ट झाले आहेत. जसे देवता प्रारब्ध भोगता-भोगता त्रेताच्या अंताला पूर्णपणे नष्ट होतात आणि नंतर मग रावणाचे आसुरी प्रारब्ध सुरू होते. भक्ती देखील पहिली अव्यभिचारी असते, मग व्यभिचारी होते. शिडीचे चित्र अचूक बनले आहे. प्रत्येक वस्तू सतोप्रधान सतो, रजो, तमो बनते. भेसळ पडत जाते. तुम्हा मुलांना तर खूप चांगल्या रीतीने समजावून सांगितले जाते, परंतु धारणा कमी पडते. कोणामध्ये तर हे ज्ञान समजावून सांगण्यासाठी अजिबात डोकेच नाहीये. कोणी खूप चांगले अनुभवी आहेत, ज्यांची धारणा खूप चांगली असते. नंबरवार तर असतात ना. स्टूडेंट एक समान नसतात. प्रत्येकाला काही ना काही नंबर जरूर दिला जातो. कोणालाही समजावून सांगणे खूप सोपे आहे. बाबा म्हणतात - माझी आठवण करा. मी तुमचा बेहदचा पिता, सृष्टीचा रचयिता आहे. माझी आठवण केल्याने तुम्हाला बेहदचा वारसा मिळेल. आठवणी द्वारेच भेसळ निघून जाईल. फक्त एवढेच समजावून सांगा की तुम्ही भारतवासी सतयुगामध्ये सतोप्रधान होता, आता कलियुगामध्ये तमोप्रधान बनला आहात. आत्म्यामध्येच भेसळ पडते. पवित्र बनल्या शिवाय तिथे कोणीही जाऊ शकत नाही. नवीन दुनियेमध्ये आहेतच सतोप्रधान. कपडा नवीन असतो तेव्हा म्हटले जाईल सतोप्रधान, मग जुना तमोप्रधान होतो. आता सर्वांचा कपडा फाटण्यालायक बनला आहे. सर्व जण जडजडीभूत अवस्थेला प्राप्त झालेले आहेत. जे विश्वाचे मालक होते, तेच एकदम गरीब बनले आहेत. मग त्यांनाच श्रीमंत बनायचे आहे. या गोष्टींना मनुष्य जाणत नाहीत. भारत स्वर्ग होता, या लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते, बाकीचे सर्व धर्माचे तर नंतर आले आहेत. बाबा तुम्हाला सत्य गोष्टी बसून सांगत आहेत. गीतेचा पहा किती मान आहे. वाचता-वाचता एकदम खाली कोसळले आहेत (अधोगती झाली आहे), तेव्हाच तर बोलावतात - ‘हे पतित-पावन या’. आम्ही भ्रष्टाचारी बनलो आहोत. सद्गती तर भगवंतच देऊ शकतात. बाकी शास्त्रांमध्ये तर सर्व आहे भक्तिमार्ग. तुमच्या बुद्धीमध्ये पक्के झाले आहे - आम्ही बाबांच्या ज्ञानाद्वारे देवता बनतो. आता साऱ्या दुनियेपासून वैराग्य आहे. संन्यासी देखील भक्ती करतात, गंगा स्नान इत्यादी करतात ना. भक्ती देखील सतोप्रधान, मग रजो, तमो होते. इथे देखील असेच आहे. अर्धा कल्प ब्रह्माचा दिवस, अर्धा कल्प ब्रह्माची रात्र गायली जाते. ब्रह्मा सोबत जरूर ब्राह्मणांचा देखील असेल. तुम्ही आता दिवसामध्ये जात आहात, भक्तीची रात्र पूर्ण होत आहे. भक्तीमध्ये तर खूप दुःख आहे, त्याला रात्र म्हटले जाते. अंधारामध्ये धक्के खात राहतात - भगवंताला भेटण्याकरिता. भक्ती मार्गामध्ये सद्गती देणारे कोणीच असत नाही. तुमच्या व्यतिरिक्त इतर कोणीही यथार्थ रीतीने भगवंताला ओळखत नाहीत. आत्मा देखील बिंदू, परमात्मा देखील बिंदू आहेत, ही गोष्ट कोणीही समजू शकत नाहीत. परमात्माच स्वतः येऊन ब्रह्मा तनाद्वारे समजावून सांगत आहेत. त्यांनी मग भागीरथ, नंदीच्या रूपामध्ये दाखवला आहे. आता नंदीची तर गोष्टच नाही. बाबा सर्व गोष्टी चांगल्या रीतीने समजावून सांगत आहेत परंतु कोणाच्या बुद्धीमध्ये पूर्ण रीतीने बसत नाहीत.

बाबा बसून समजावून सांगत आहेत - मुलांनो, मी तुम्हा आत्म्यांचा पिता आहे. तुम्ही माझी आठवण करा आणि वारशाची

आठवण करा तर तुमची विकर्म विनाश होतील. तरी देखील तुम्ही म्हणता - बाबा, आम्ही विसरून जातो. व्वा! अशा साजनला अथवा पित्याला विसरायचे असते काय! पत्नी, पतीला अथवा मुले आपल्या वडिलांना कधी विसरतात काय? मग इथे तुम्ही कसे काय विसरता? म्हणता देखील - बाबा, तुम्ही आम्हाला स्वर्गाचा मालक बनवत आहात आणि तरी देखील विसरून जातो. बाबा म्हणतात - आठवण केली नाहीत तर आत्म्यामध्ये जी कट (गंज) चढलेली आहे, ती कशी निघणार. मुख्य गोष्ट आहेच मुळी आठवणीची. आपला इतर धर्माशी संबंध नाही आहे. शाळेमध्ये तर इतिहास-भूगोल समजावून सांगता. कोणी तर अजिबातच समजत नाहीत. बाबा (स्वयं भगवान) शिकवत आहेत, हेच बुद्धीमध्ये बसत नाही. अच्छा, बाबांची आणि वारशाची तरी आठवण करा की हे देखील विसरून जाता! ज्याच्यासाठी अर्ध्या कल्पापासून भक्ती करत आला आहात, त्या पित्याची तुम्ही आठवण करू शकत नाही. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे, आता आपण हे शरीर सोडून राजाई मध्ये जाणार, हा अंतिम जन्म आहे. सूक्ष्मवतनमध्ये त्यांची फीचर्स तर तीच पाहता, वैकुंठामध्ये देखील पाहता. जाणता हे मम्मा-बाबाच लक्ष्मी-नारायण बनतात. तुम्ही जेव्हा सतयुगामध्ये असता तेव्हा समजता की, हे एक शरीर सोडून दुसरे घ्यायचे आहे. तिथे त्यांना हे माहीत नसते की, सतयुगा नंतर त्रेता येईल, द्वापर येईल, आपण उतरत जाणार. ज्ञानाची गोष्टच राहत नाही. पुनर्जन्म घेत राहतात. तिथे आत्म-अभिमानी असतात मग आत्म-अभिमानी पासून देह-अभिमानी बनतात. हे नॉलेज केवळ तुम्हा ब्राह्मणांनाच आहे इतर कोणाकडेच नाहीये. हे ज्ञान-ज्ञानेश्वर, जे ज्ञानाचे सागर पिता आहेत, तेच ऐकवतात. ते जरूर ब्रह्माची मुले, ब्राह्मणांनाच ऐकवतील. ब्रह्माची मुले आहेत - ब्राह्मण संप्रदाय. रात्रं-दिवसाचा फरक आहे. तुम्ही पुरुषार्थ करून संपूर्ण गुणवान बनता. संपूर्ण निर्विकारी, गृहस्थ व्यवहारामध्ये रहात असताना देखील तुम्ही बाबांची आठवण करा, कर्म तर करायचेच आहेत. बुद्धीचा योग बाबांसोबत लागलेला असावा. कर्म भले कोणतेही करा, मग ते सुतार काम करा किंवा राजाई करा. राजा जनकाचे देखील गायन आहे ना. राजाई करत रहा परंतु बुद्धीचा योग बाबांसोबत लावा तेव्हाच वारसा मिळेल. बाबा म्हणतात - मनमनाभव, मामेकम् (मज एकाची) आठवण करा. शिवबाबा म्हणतात केवळ ‘शिव’ म्हटल्याने लिंग रुप आठवणीत येईल. बाकी सर्वांच्या तर शरीराचे नाव घेतले जाते, पार्ट शरीरा द्वारे बजावतात. आता तुम्हाला आत्म-अभिमानी बनविले जाते, जे अर्धा कल्प चालते. यावेळी सर्व आहेत देह-अभिमानामध्ये. तिथे असतील यथा राजा-राणी तथा प्रजा. आयुष्य तर सर्वांचे दीर्घ असते. इथे सर्वांचे आयुष्य कमी आहे. तर बाबा सन्मुख बसून मुलांना किती चांगल्या रीतीने समजावून सांगत आहेत - हे आत्म्यांनो, कारण आत्मा ज्ञान घेते, धारणा आत्म्यामध्ये होते. बाबांना तर शरीर नाहीये. आत्म्यामध्येच सारे ज्ञान आहे. आत्मा देखील स्टार आहे, बाबा देखील स्टार आहेत. ते पुनर्जन्म घेत नाहीत, आत्मे पुनर्जन्म घेतात म्हणून बाबांनी काम दिले होते की परमात्म्याची महिमा आणि मुलांची महिमा लिहून आणा. दोघांची महिमा वेगवेगळी आहे. श्रीकृष्णाची वेगळी महिमा आहे. ते साकार, ते निराकार. इतके गुणवान कोणी बनविले? जरूर म्हणणार परमात्म्याने बनविले.

यावेळी तुम्ही ईश्वरीय संप्रदायाचे आहात. तुम्हाला बाबा शिकवत आहेत. नंतर मग प्रारब्ध उपभोगता. सतयुगामध्ये काही कोणी शिकवणार नाही. भक्ती मार्गाची सामुग्रीच नष्ट होते. या दुनियेचे वैराग्य देखील पाहिजे अर्थात देहा सहित देहाचे सर्व संबंध सोडून स्वतःला अशरीरी आत्मा समजायचे आहे. अशरीरी आलो होतो, अशरीरी जायचे आहे. ही जुनी दुनिया नष्ट होणार आहे, आपण सर्व नवीन दुनियेमध्ये जाणार आहोत. बस्स ही आठवणीची मेहनत करत राहा, यामध्येच नापास होतात. आठवण करत नाहीत. जे कोणी हे ज्ञान समजून घेण्याकरिता येतात त्यांना देखील हेच सांगायचे आहे - शिवबाबा ब्रह्मा द्वारे सांगतात की, माझी आठवण कराल तर आठवणी द्वारे तुमच्यातील भेसळ निघून जाईल, तुम्ही विष्णुपुरीचे मालक बनाल. विष्णुपुरीच स्वर्गपुरी आहे. तर जितके शक्य होईल बाबांची आठवण करा, ज्या पित्याची अर्धा कल्प आठवण केली आहे ते आता सन्मुख आले आहेत. म्हणत आहेत - माझी आठवण करा, त्यांना कोणीही जाणत नाही. स्वतःच येऊन आपला परिचय देतात. मी जो आहे, जसा आहे, तसा कोणी विरळेच जाणतात आणि निश्चय करतात. आणि निश्चय करतात तर मग पुरुषार्थ करून वारसा प्राप्त करतात. शिवबाबा म्हणतात - माझी आठवण केल्यानेच तुमची विकर्म विनाश होतील आणि तुम्ही पवित्र बनून पवित्र दुनियेचे मालक बनाल. कोणतेही विकर्म करायचे नाही. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) पुरुषार्थ करून संपूर्ण गुणवान बनायचे आहे. कर्म कोणतेही असेल परंतु बाबांच्या आठवणीमध्ये राहून करायचे आहे. कोणतेही विकर्म करायचे नाही.

२)हा जुना कपडा (शरीर) जडजडीभूत झाला आहे, यातून मोह काढून टाकायचा आहे. आत्म्याला सतोप्रधान बनविण्याचा पूर्णपणे पुरुषार्थ करायचा आहे.

वरदान:-
नेहमी अतींद्रिय सुखाची अनुभूती करणारे अटल अखंड स्वराज्य अधिकारी भव

जी मुले संगमयुगावर कायमस्वरूपी अतींद्रिय सुखाचा वारसा प्राप्त करतात अर्थात ज्यांचा पित्याच्या विलवर (संपत्तीवर) पूर्ण अधिकार असतो ते विल पॉवरवाले (इच्छाशक्तिवाले) असतात. त्यांना अतूट, अटळ अतींद्रिय सुखाची अनुभूती होते. असे वारसदार अर्थात संपूर्ण वारशाचे अधिकारीच भविष्यामध्ये अटळ-अखंड स्वराज्याचा अधिकार प्राप्त करतात.

बोधवाक्य:-
जिथे ‘माझे’पणा येतो तिथे बुद्धीचा फेरा सुरु होतो (बुद्धीचे भटकणे सुरु होते).

मातेश्वरीजींची अनमोल महावाक्ये :-

“चढती कला आणि उतरती कला याचे मुख्य मूळ काय आहे?”

अनेक मनुष्य हा प्रश्न विचारतात की, ‘जेव्हा एवढा पुरुषार्थ करून जीवनमुक्ती पद प्राप्त करतात तर मग तिथे असे कोणते कारण बनते ज्यामुळे आपली अधोगती होते?’ भले आपण म्हणतो की, हार आणि जितचा खेळ आहे; यामध्ये चढती कला आणि उतरती कला होण्याचे देखील कोणते कारण जरूर आहे, ज्या कारणाच्या आधारावर हा खेळ चालतो. जसे पुरुषार्था द्वारे आपण चढत आहोत (चढती कला होते) तसेच अधोगती होण्याचे देखील कोणते तरी कारण जरूर आहे. आता कारण देखील काही फारसे मोठे नाहीये, एक छोटीशी चूक आहे; जसे परमात्मा म्हणतात - ‘माझी आठवण कराल तर मी तुम्हाला मुक्ती-जीवनमुक्ती पद देईन’. तसेच जेव्हा बॉडी-कॉन्शस होऊन परमात्म्याला विसरतो तेव्हा अधोगती होते. आणि मग वाममार्गामध्ये जातो तर मग ५ विकारांमध्ये फसल्यामुळे दुःख सहन करतात; तर हा झाला आपलाच दोष, ना की रचयित्याचा दोष आहे. जे लोक म्हणतात सुख-दुःख परमात्माच देतात हे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. बाबा सुख रचतात, दुःख रचत नाहीत. बाकी आपण श्रेष्ठ कर्माद्वारे सुख प्राप्त करतो आणि भ्रष्ट कर्माद्वारे दुःख भोगतो. बाकी चांगल्या कर्माचे फळ आणि वाईट कर्माचा दंड परमात्म्याद्वारे अवश्य मिळतो. परंतु असे म्हणता येत नाही की, सुख-दुःख दोन्ही परमात्माच देतात, नाही. परमात्मा तर चढत्या कलेमध्ये आपल्या सोबत आहेत, बाकी कोसळवणारी (पतन करणारी) आहे - माया. सामान्य रीतीने देखील कोणी सोबत घेतात अथवा मदत घेतात ती सुखासाठीच घेतात. बाकी दुःख घेण्यासाठी काही कोणी कोणाची मदत घेत नाही. बाकी तर जसे-जसे कर्म तसा-तसा फळाचा परिणाम मिळतो. तर या ड्रामामध्ये सुख-दुःखाचा खेळ आपल्या कर्मानुसारच बनलेला आहे, परंतु तुच्छ-बुद्धि मनुष्य या रहस्याला जाणत नाहीत. अच्छा. ओम् शांती.

हे अव्यक्त इशारे - सदैव अचल, अडोल एकरस स्थितीचा अनुभव करा.

समयानुसार आता सदैव अचल-अडोल सर्व खजिन्यांनी संपन्न राहा. थोडे जरी डगमग झालात तरी सर्व खजिन्यांचा अनुभव होणार नाही. बाबांकडून मिळालेल्या खजिन्यांना नेहमी कायम ठेवण्याचे साधन आहे - सदैव अचल अडोल राहणे. अचल राहिल्याने नेहमीच आनंदाची अनुभूती होत राहील. जसे विनाशी धन, नाव-मान-शान, खुर्ची इत्यादी मिळते तर आनंद होतो ना. हा तर अविनाशी आनंद आहे परंतु हा आनंद त्यांनाच होईल जे अचल अडोल, एकरस स्थितीमध्ये राहतील.