01-06-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - बाबांचे श्रीमत आहे की, या जुन्या दुनियेपासून आपले तोंड फिरवा, जीवनमुक्ती करिता तुम्ही दैवी मॅनर्स धारण करा”

प्रश्न:-
कोणते मॅनर्स बाबांव्यतिरिक्त इतर कोणीही शिकवू शकत नाहीत?

उत्तर:-
पवित्र बनणे आणि बनविणे - हा आहे सर्वात श्रेष्ठ दैवी मॅनर्स. तुम्ही घरी-गृहस्थी मध्ये राहत असताना पवित्र रहा, हे शिक्षण एक बाबाच देतात, इतर कोणीही देऊ शकत नाही. तुम्हा मुलांचा बेहदचा संन्यास आहे. तुम्ही या जुन्या दुनियेलाच बुद्धीने विसरता. तुम्ही जाणता पवित्रतेच्या धारणेने बाकी इतर सर्व मॅनर्स स्वतःच येतात.

गीत:-
आज अंधेरे में हैं हम इंसान…

ओम शांती।

मुलांनी गाण्याची एक ओळ ऐकली. एकीकडे आहे सगळी दुनिया - भक्तिमार्गवाले आणि दुसरीकडे आहात तुम्ही मुले ज्ञानमार्गवाले. ते भक्तीची शिडी चढत राहतात आणि तुम्ही मुले मग ज्ञानाची शिडी चढता, भक्तीची शिडी उतरता. मुले जाणतात - अर्ध्या कल्पापासून भक्तीची शिडी चढावी लागते. भक्ती देखील पहिली अव्यभिचारी असते, नंतर व्यभिचारी बनते. पूर्णपणे अंधश्रद्धेमध्ये येतात. अजिबात काहीच समजत नाहीत. गातात देखील - ‘आम्ही अंधारात आहोत’. सद्गुरु विना घोर अंध:कार. गुरु तर इथे पुष्कळ आहेत. आता खरा गुरु कोण आहे? साधू-संत, महात्मा, भगत इत्यादी सर्वच साधना करतात अथवा आठवण करतात. शास्त्रे, वेद, उपनिषद इत्यादी सर्व वाचतात तरी देखील म्हणतात, भगवान जेव्हा येतील तेव्हाच आपली सद्गती करतील. सद्गतीदात्यालाच पतित-पावन म्हटले जाते. आता तुम्ही मुले घोर अंधकारामध्ये नाही. तुम्ही ज्ञानाच्या प्रकाशामध्ये आला आहात. पतित-पावन बाबांना जाणता आणि त्यांची आठवण देखील करता. जितका जो बच्चा आठवण करतो आणि ज्ञानाची धारणा करतो तितका त्याचा अज्ञान रुपी अंधार नष्ट होतो. आता प्रकाशामध्ये घेऊन जाणारे तर एक बाबाच आहेत. ‘ज्ञान अंजन सद्गुरु दिया…’ कोणता सुरमा नाहीये. ही ज्ञानाची गोष्ट आहे. ज्ञाना सोबत योग देखील असतो. जे मनुष्य भक्ती शिकवतात, तर जरूर त्यांच्याशी देखील योग लागून राहतो. आता तुम्हा मुलांचा बुद्धियोग लागलेला आहे, निराकार परमपिता परमात्म्यासोबत. तुमच्यामध्ये देखील नंबरवार आहेत. तुम्हा मुलांव्यतिरिक्त इतर कोणत्याही मनुष्य मात्राचा परमपिता परमात्मा सर्वशक्तिमान सोबत तर योगच नाहीये. तुम्हाला बाबांकडून मुक्ती, जीवनमुक्ती-धाम सोबत योग लावावा लागतो. जीवनमुक्तीसाठी दैवी मॅनर्स देखील खूप चांगले पाहिजेत. यावेळी सर्वांचे मॅनर्स आसुरी आहेत. परमपिता परमात्म्याचे देखील गुण गायले जातात ना. मनुष्य सृष्टीचे बीजरूप आहेत, सत्य आहेत, चैतन्य आहेत, आनंदाचा सागर, ज्ञानाचा सागर आहेत. पवित्रतेचा सागर आहेत फॉर एव्हर. त्यांचे हे पद अविनाशी आहे दुसऱ्या कोणत्याही मनुष्याचे हे अविनाशी पद असू शकत नाही. भले आत्ता तुम्ही ज्ञानाचा सागर, पवित्रतेचा सागर बनता, परंतु लिमिटेड (मर्यादित काळासाठी) बनता ना. बाबा म्हणतात - मी अनलिमिटेड (अमर्याद काळासाठी) आहे. तुम्ही अनलिमिटेड बनू शकत नाही. नाहीतर मग सृष्टीचा खेळ कसा चालेल? ८४ जन्म कसे भोगाल? तुम्ही फॉर एव्हर बनू शकत नाही. तुम्हाला लिमिटेड बनवितो, २१ जन्मांकरिता तुम्ही बनता. २१ पिढी देखील लिहिलेले आहे. तुम्ही फॉर एव्हर बनणे, हा ड्रामामध्ये कायदा नाही. मी तर आहेच एव्हर प्युअर. मी राहतोच मुळी परमधाममध्ये. माझ्याकडे ज्ञान, पवित्रता इत्यादी आहेच आहे (शाश्वत आहे). तुम्ही विसरता त्यामुळे मग यावेळी बाबाच येऊन मुलांना घोर अंधारातून काढून ज्ञान आणि योगाद्वारे पवित्र बनवितात; इतर कोणीही असे म्हणू शकत नाहीत की, ‘मी परमधामहून आलो आहे, आता माझी आठवण करा’. या माझ्या महावाक्यांची कोणीही कॉपी करू शकत नाही. मी येतोच तुम्हा मुलांना २१ जन्मांकरिता राजांचाही राजा बनविण्याकरिता. तर बनले पाहिजे ना. बनतील देखील तेच जे कल्पापूर्वी बनले होते.

तुम्ही जाणता - किती मुले पवित्र बनतात, किती अजामिल प्रमाणे पापी बनतात. कित्येकजण अशुद्ध गलिच्छ (पतित अपवित्र) बनतात. बाबांनाच येऊन मळलेले कपडे स्वच्छ करावे लागतात (पतित आत्म्याला स्वच्छ करावे लागते). आत्माच मलीन बनते (अपवित्र बनते). बाबा आत्म्यालाच समजावून सांगतात की, ‘तुला मायेने किती मलीन बनविले आहे, केवळ या एका जन्माचीच गोष्ट नाहीये. ही तर जन्म-जन्मांतरीची गोष्ट आहे, ज्यामुळे आत्म्याला स्वच्छ करण्याकरिता लक्ष्य-सोप देतो’. बाबा म्हणतात - माझी आठवण करा तर तुमची आत्मा जी विझून गेली आहे ती, जितकी-जितकी मज पित्याची आठवण कराल तितकी या योगाद्वारे जागृत होईल. बाबा आठवण करून देत आहेत, तुम्हाला मी स्वर्गामध्ये पाठवले होते मग मायेने तुम्हाला मलीन (पतित) बनविले आहे. आता पुन्हा मी तुम्हाला स्वर्गाचा मालक बनविण्याकरिता आलो आहे. मी या ब्रह्मा तनाद्वारे शिकवण देत आहे. बाबा आत्म्यांशी बोलतात, हे मुलांनो, लौकिक पित्याला विस्मृत करून, देहा सहीत देहाची सर्व नाती विसरून मज आपल्या पित्याची आठवण करा तर तुमची आत्मा स्वच्छ होत जाईल. मग तुम्हाला भविष्यामध्ये शरीर देखील नवीन मिळेल. आणि मग तत्व इत्यादी सर्व नवीन सतोप्रधान बनतात. बाबा म्हणतात - आता या जुन्या दुनियेला विसरत जा. माझी आठवण कराल तर तुम्ही माझ्याकडे येऊन मग स्वर्गामध्ये जाल. ही जुनी दुनिया आहे. इथे कोणतीही वस्तू बनवतात तर त्या वस्तूचे नवीन नाव ठेवतात. जसे नवी दिल्ली, जुनी दिल्ली म्हणतात. परंतु दुनिया तर जुनीच आहे ना. आता तुम्हा मुलांचा या जुन्या दुनियेमधून बुद्धियोग पूर्णपणे निघून गेला पाहिजे. आम्हा आत्म्यांचे स्वीट होम अथवा निर्वाणधाम आहे, जिथे जायचे आहे. स्वतःला आत्मा निश्चय करावे लागेल. बाबा म्हणतात - माझी आठवण करा तर अंत मती सो गति होईल. मनुष्य तर अनेकांची आठवण करतात. कोणी कोणत्या गुरूची आठवण करतात, कोणी श्रीकृष्णाची आठवण करतात. श्रीकृष्ण इत्यादी कुठे गेले? हे कुणालाच ठाऊक नाही. हेच समजत नाहीत की, पुनर्जन्मामध्ये सर्वांना यावेच लागते. हा रीती-रिवाज सृष्टीच्या सुरुवातीपासूनच चालत आलेला आहे. सतयुगाच्या सुरुवातीला देवी-देवता आहेत, जरूर पुनर्जन्म तिथूनच सुरू झाले असतील. सर्वात पहिला आहे श्रीकृष्ण - प्रथम पवित्र मनुष्य, त्याची महिमा जास्त आहे. लक्ष्मी-नारायणाची इतकी नाही, कारण छोटी मुले पवित्र सतोप्रधान, असतात तर महिमा मुलांची गायली जाते. श्रीकृष्णाची खूप महिमा आहे, परंतु हे जाणत नाहीत की, कृष्णपुरी कुठे आहे. वैकुंठ म्हटले देखील सतयुगाला आहे, तरीही माहीत नाही श्रीकृष्णाला द्वापर मध्ये कसे म्हटले गेले आहे. तीच गोष्ट दुसऱ्या कोणत्या नाव, रूप देशामध्ये असू शकत नाही. तेच नाव-रूप दुसऱ्या जन्मामध्ये असू शकत नाही. श्रीकृष्ण तर सतयुगामध्ये होते. तुम्ही जाणता - हेच जगत अंबा, जगतपिता जाऊन लक्ष्मी-नारायण बनतात. सतयुगाला कृष्णपुरी म्हटले जाते. आता आहे कंसपुरी. ही सर्व आसुरी नावे आहेत. तिथे होता दैवी संप्रदाय, इथे आहे आसुरी संप्रदाय. बाबा मुलांना संगमयुगावर येऊन समजावून सांगत आहेत, ते बाबा आहेत - रचयिता. त्यांना म्हटले जाते - मनुष्य सृष्टीचे बीजरूप. तर जरूर नवीन मनुष्य सृष्टी रचतील. तुम्ही गाता देखील - ‘बाबा, तुम्ही पतित-पावन आहात. या पतित सृष्टीला येऊन पावन बनवा. पावन सृष्टी रचून पतित सृष्टीचा विनाश करा’. खरोखर ब्रह्मा द्वारे पावन सृष्टी रचून शंकरा द्वारे पतित सृष्टीचा विनाश करवितात. या गोष्टी इतर कोणीही जाणत नाहीत. आता तुम्ही मुले बाबांसोबत योग लावता. तुम्ही पाहता बाबा मळलेल्या कपड्यांना (पतित आत्म्यांना) सटका मारतात. कोणी तर फाटून जातात, कोणी तुटतात. कोणी तर खूपच मळलेले, अजामिल सारखे पापी आहेत, ज्यामुळे अजिबातच धारणा होत नाही. बाबा किती चांगल्या गोष्टी समजावून सांगतात. गोड लाडक्या मुलांनो, मज मोस्ट बिलवेड पित्याची आठवण करा. मोस्ट बिलवेड सुखधामची आठवण करा. हे देखील तुम्ही आता जाणता. दुनियेमध्ये कोणालाच माहीत नाही. हे तर आहेच अति दुःख-धाम. मनुष्य त्राही-त्राही करत राहतात, एकमेकांना मारतात. मग म्हणतात - ‘हे परमेश्वरा रक्षण करा’, हे जरूर मुखातून निघेल. बाबा तर लिबरेटर आहेत.

तुम्ही जाणता - बाबा आले आहेत विशेष करून आम्हा मुलांना आणि सामान्यपणे बाकी सर्वांना सुखधाममध्ये घेऊन जाण्याकरिता. तुम्हा मुलांमध्ये देखील नंबरवार आहेत ज्यांना हा नशा आहे. हे शिक्षण काही कमी नाहीये, आणि शिकवतात देखील पाहा कोणाला. अजामिल सारख्या पाप-आत्म्यांना शिकवून स्वर्गाचा मालक बनवतात. तमोप्रधान तर सगळेच आहेत, त्यांना सतोप्रधान दुनियेमध्ये घेऊन जावे लागते. मुलांना वारंवार समजावून सांगतात की इथे दैवी गुण धारण करायचे आहेत. इथे तुमच्या बुध्दीमध्ये एम-ऑब्जेक्ट आहे. हे पवित्रतेचे मॅनर्स इतर कोणीही शिकवत नाहीत. संन्याशी तर घरदार सोडायला सांगतात. इथे बाबा म्हणतात - तुम्हाला घरदार सोडायचे नाहीये. तुम्हाला तर या जुन्या दुनियेला सोडायचे आहे. तो आहे हदचा संन्यास, हा आहे बेहदचा संन्यास. त्या संन्याशांना देखील किती मान मिळतो. साधू समाज गव्हर्मेंटला देखील सल्ला देतात. पुढे चालून हे संन्यासी इत्यादी देखील तुम्हा मातांच्या पायाशी लोळण घेतील (माथा टेकवतील). मातांशिवाय त्यांचा उद्धार होऊ शकत नाही, कारण तुम्ही नॉलेज देता. बाकी पायाशी लोळण घेण्याची गोष्ट नाहीये. हो, कोणी नमस्ते किंवा राम-राम करतात तर प्रतिसाद तर द्यायचा आहे. बाबा देखील म्हणतात - मुलांनो, नमस्ते. मी तुम्हा मुलांना माझ्या पेक्षाही श्रेष्ठ बनवतो. तुम्हाला ब्रह्मांड आणि सृष्टी दोन्हींचा मालक बनवतो आणि मी वानप्रस्थ मध्ये निघून जातो. परंतु तुम्हाला श्रीमतावर चालावे देखील लागेल. या जुन्या दुनियेपासून तोंड फिरवावे लागेल. राम, रावण आणि सीतेचे खेळणे आहे ना. सीता रावणाकडे पाठ करते, रामाकडे तोंड करते. श्रीकृष्णाचे देखील चित्र आहे - नरकाला लाथ मारत आहे आणि स्वर्गाचा गोळा हातामध्ये आहे. बाबा खूप चांगल्या रीतीने समजावून सांगतात परंतु कोणी विरळा व्यापारीच हा व्यापार करेल. बाबांना आपले जुने तन-मन-धन देऊन नवीन घेईल. हा खूप फर्स्ट क्लास इन्शुरन्स आहे. बाबा म्हणतात - तुम्ही आपल्या आत्म्याला पवित्र बनवाल तर मग शरीर देखील पवित्र मिळेल, आणि मग तुम्ही स्वर्गाची राजाई कराल; म्हणून त्यांना सौदागर, जादूगर देखील म्हटले आहे. पतितांना पावन बनविणे - ही ईश्वरीय जादुगिरी म्हणावी लागेल ना. बाबा म्हणतात - नरकवासींना स्वर्गवासी बनवा, कशी फर्स्ट क्लास जादू आहे. यामध्ये प्राप्ती खूप आहे. बाबा म्हणतात - राजांचाही राजा बना, फॉलो करा. बाबा बसले आहेत ना. हे (ब्रह्मा बाबा) अधरकुमार आहेत, मम्मा कुमारी कन्या आहे. तर फॉलो करावे लागेल. वारसा बाबांकडून मिळणार आहे. तुम्ही म्हणाल आम्ही भाऊ-बहिणी बाबांकडून वारसा घेत आहोत. तसे पाहिले तर लौकिक रित्या बहिणीला वारसा मिळत नाही, भावाला वारसा मिळतो. इथे तर तुम्हा सर्वांनाच मिळणार आहे कारण तुम्ही सर्व आत्मे आहेत ना. बाबा म्हणतात - तुम्हा सर्वांना माझ्याकडे यायचेच आहे. नंतर मग हे बहिण-भावाचे नाते सुद्धा तुटेल. तिथे निर्वाणधाममध्ये आहे - पिता आणि मुलांचे नाते, म्हणून म्हटले आहे - वुई आर ऑल ब्रदर्स (आपण सर्व बांधव आहोत). जर ईश्वराला सर्वव्यापी म्हटले तर मग फादरहूड होते (पितृभाव होतो). या सर्वव्यापीच्या ज्ञानाने किती नुकसान केले आहे.

आता तुम्हा मुलांकडे बाबांची आठवण आहे. बाबांची आठवण करण्यासाठीच जास्त मेहनत करावी लागते. असे नाही की तुम्हाला कोणी नेष्ठामध्ये बसवतील. तुम्हाला तर लक्ष्य मिळालेले आहे. इथे तर तुम्ही फक्त मुरली बसून ऐकवता. योग तर तुमचा नेहमीच लागलेला असतो. मुरली ऐकली आणि मग चालता-फिरता आठवणीमध्ये राहायचे आहे. आपण यात्रेवर जात आहोत. जितके होऊ शकेल आठवणीमध्ये राहायचे आहे. ८ तास सर्विस करा, ती देखील सूट आहे. बाकीचा वेळ द्यायचा आहे. मूळ गोष्ट आहेच पवित्रतेची. तुम्ही जाणता हे आहे काट्यांचे फॉरेस्ट (जंगल). एकमेकांना काटे टोचत राहतात. आता बाबा म्हणतात - श्रीमतावर चाला. शिवबाबा देखील बोलत आहेत, ब्रह्मा देखील बोलत आहेत, परंतु तुम्ही जाणता आम्हाला शिवबाबा शिकवत आहेत, तुम्ही स्टुडंट्स आहात. तुम्ही म्हणता - ते आमचे पिता देखील आहेत, टीचर आणि सद्गुरु देखील आहेत. गॅरंटी देतात की तुम्हाला परत घरी घेऊन जाईन. अशी गॅरंटी इतर कोणीही देऊ शकत नाही. हे बाबाच म्हणतात - गॉड फादरच सुख देणारा धर्म स्थापन करतात. त्या पित्याला कोणीही ओळखत नाही. जर बाबांना ओळखतील तर बाबांच्या प्रॉपर्टी विषयी देखील माहिती होईल. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) एम ऑब्जेक्टला नेहमी समोर ठेवून दैवी गुण धारण करायचे आहेत. सतोप्रधान दुनियेमध्ये जाण्याकरिता पवित्रतेचे मॅनर्स धारण करायचे आहेत. बुद्धीने बेहदचा संन्यास करायचा आहे.

२) मोस्ट बिल्वेड बाबांची आणि आपल्या सुखधामची आठवण करायची आहे. या दुःख-धाम मधून बुद्धीचा योग काढून टाकायचा आहे.

वरदान:-
सर्वांचे गुण पाहण्याच्या आणि संतुष्ट करण्याच्या उत्कंठेद्वारे (प्रबळ इच्छेद्वारे) नेहमी कायमचे उत्साहामध्ये राहणारे गुणमूर्त भव

नेहमी एकरस (कायमचे) उमंग-उत्साहामध्ये राहण्याकरिता जे कोणी संपर्कामध्ये येतात त्यांना संतुष्ट करण्याची प्रबळ इच्छा असावी. कोणालाही पाहाल तर त्याच्याकडून सतत गुण घेत रहा. सर्वांच्या गुणांचे बळ मिळाल्याने उत्साह कायमचा टिकून राहील. उत्साह कमी तेव्हा होतो जेव्हा इतरांची विविध रूपे, विविध गोष्टी बघता, ऐकता. परंतु गुणांना पाहण्याची उत्कंठा असेल (प्रबळ इच्छा असेल) तर उत्साह कायमचा टिकून राहील आणि सर्वांचे गुण पाहिल्याने स्वतः देखील गुणमूर्त बनाल.

बोधवाक्य:-
बेहदच्या वैराग्य वृत्तीचे फाउंडेशन मजबूत असेल तर सेकंदामध्ये अशरीरी बनणे सोपे आहे.

हे अव्यक्त इशारे - सदैव हर्षित राहण्याकरिता आपल्या नेचरला (स्वभावाला) सरळ बनवा, सहनशील बना.

आपल्या या चेहऱ्याला सदैव हर्षित बनविणे - ही संगमयुगाची सर्वात मोठी गिफ्ट आहे. चेहऱ्यावर कधीही कोणती तणावाची रेषा नसावी. जसा पौर्णिमेचा चंद्रमा किती आकर्षक दिसतो, तसा तुमचा चेहरा सदैव हर्षित असावा. चेहरा असा तेजस्वी असावा की इतरही तुमच्या चेहऱ्यामध्ये आपले रूप पाहू शकतील, यासाठी आपल्या नेचरला (स्वभावाला) सरळ बनवा, सहनशील बना.