01-09-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड मुलांनो, चॅरिटी
बिगिन्स ॲट होम, आपल्या परिवारवाल्यांना ज्ञान द्या, आपल्या हमजीन्सचे कल्याण करा”
प्रश्न:-
कोणत्या
श्रीमताचे पालन करणारी मुले आपल्या अवस्थेला एकरस बनवू शकतात?
उत्तर:-
अवस्थेला एकरस
बनविण्याकरिता बाबांचे श्रीमत आहे - मुलांनो, दररोज पहाटे लवकर उठून अतिशय प्रेमाने
बाबांची आठवण करा. स्वतःला आत्मा समजा आणि बाबा जे सांगतात ते ऐका. जर आठवण केली
नाहीत तर फालतू विचार चालतील, व्यर्थ संकल्प येतील, म्हणून बाबा सल्ला देतात की
मुलांनो, दररोज पहाटे लवकर उठून स्वतः स्वतःशी प्रतिज्ञा करा की चालता-फिरता,
खाता-पिता, भोजन बनवताना एका बाबांचीच आठवण करू.
ओम शांती।
गोड-गोड मुले
जाणतात की रुहानी बाबा सर्व आत्म्यांचे पिता आहेत जे सर्वात उच्च ते उच्च आहेत,
त्यांनाच ‘शिवाय नमः’ म्हणतात. फादर देखील म्हणतात, ते बाबा स्वर्गाचे रचयिता आहेत,
ज्यांना पतित-पावन, ज्ञानाचा सागर म्हटले जाते. आता तुम्हाला समजते आहे आपण
त्यांच्यासोबत बसलो आहोत. हे तुम्हा मुलांनी समजावून सांगायचे आहे. ज्याप्रमाणे काही
ठिकाणी एका गीता पाठशाळेमध्ये श्रीकृष्णाचे एक खूप उंच सहा फुटी चित्र होते. आता
श्रीकृष्णाला खरेतर छोटाच दाखवतात; आणि मग म्हणतात - गीतेचा भगवान श्रीकृष्ण होता.
तर मग गीता कधी ऐकवली बरें? बालपणी की जेव्हा सहा फुटी (मोठा) झाला तेव्हा ऐकवली?
राधा आणि श्रीकृष्णाची जोडी होती. राधा, कृष्णाची कोण लागत होती? राधेला भगवती आणि
श्रीकृष्णाला भगवान म्हणतात. या दोघांचे काय नाते आहे, हे कोणालाच ठाऊक नाहीये.
श्रीकृष्णाने गीतेचा उपदेश दिला, परंतु कधी? तुम्ही जेव्हा अशा प्रकारचे प्रश्न
विचाराल तेव्हा मनुष्य समजतील की हे तर ब्रह्माकुमार-कुमारी शिवाय इतर कोणीही विचारू
शकत नाही. कोणीही मोठ-मोठे राजा इत्यादी जे कोणी आहेत ते संन्यासींना पाहून
त्यांच्या पाया जरूर पडतात. त्यांना असे प्रश्न विचारण्याची कोणालाही हिंमतच नसते.
तुम्ही तर हिंमत ठेवता. म्हणतील - ब्रह्माकुमारींमध्ये इतके ज्ञान आहे जे बसून
रचयिता आणि रचना यांच्या विषयी इतके नॉलेज देतात. त्यांची बायोग्राफी जीवन कहाणी
ऐकवतात. तुम्ही विचारू शकता की शिवजयंती साजरी करता, पूजा इत्यादी देखील करता तर
जरूर ते कधीतरी आले असतील तेव्हाच तर शिवजयंती साजरी केली जाते? ते कधी आले? शिवबाबा
तर आहेत निराकार, त्यांना आपले शरीर नाही. शिवजयंती साजरी करतात तर जरूर शरीरामध्ये
आले असतील? निराकारची जयंती कशी बरे होऊ शकते? आत्मा तर अमर आहे. जयंती तेव्हा साजरी
केली जाते जेव्हा मृत्यू होईल आणि जन्म घेतील. आत्म्याची जयंती असत नाही. आत्मा तर
अविनाशी आहे. असे म्हणणार नाही की आत्म्याची जयंती. शिव तर आहेत निराकार, त्यांचे
लिंगाच्या रूपामध्ये चित्र ठेवले जाते. तुम्हा मुलांना हे विचार आले पाहिजेत. इथून
आपल्या घरी, कामधंद्यामध्ये गेल्यामुळे या सर्व गोष्टीच बुद्धीतून निघून जातात.
चिंतन केले जात नाही. गुरु इत्यादींच्या बेड्यांमध्ये देखील खूपजण अडकून पडलेले
आहेत, काही विचारू नका. अबला खूप भोळ्या असतात ना. तुम्ही त्यांना विचारू शकता -
शिवजयंती साजरी केली जाते परंतु ते आहेत कोण? त्यांनी येऊन काय केले आणि कधी आले?
जयंती अर्थातच जन्म. निराकार शिव यांचा जन्म साजरा करतात, आता ते निराकार आहेत तर
त्यांचा मग जन्म कसा काय साजरा केला जातो? कोणामध्ये आले (प्रवेश केला)? आत्मा
शरीरामध्ये प्रवेश करते तेव्हा म्हटले जाते - जन्म झाला. आत्मा तर आत्माच आहे.
शरीरामध्ये प्रवेश करते तेव्हा म्हणणार - आत्म्याने शरीर धारण केले आहे, पार्ट
बजावण्याकरिता. ते तर आहेत निराकार. त्यांनी कसा जन्म घेतला? कोणामध्ये आले? त्यांना
तर परमात्मा म्हटले जाते, हे कोणालाच ठाऊक नाहीये. भले शास्त्रे इत्यादी पुष्कळ
शिकलेले आहेत, परंतु काहीही माहित नाहीये. आता तुम्ही ज्ञानाने भरपूर आहात. आता
तुम्हाला ज्ञानच ऐकवायचे आहे. काहीजण तर दोन-तीन वर्षे येतात आणि मग अज्ञानाची
प्रवेशता होते. बाबा मग अज्ञानाला काढून ज्ञानाची धारणा करून घेतात. आता तुम्हा
मुलांना ज्ञान दिले जात आहे. परंतु पती ज्ञानामध्ये, आणि पत्नी अज्ञानामध्ये तर
जणूकाही हंस आणि बगळा बनले; त्यामुळे पहिले तर पत्नीला ज्ञान दिले पाहिजे. पत्नी,
पतीला गुरु ईश्वर मानते तर पत्नीला गुरुची आज्ञा मानली पाहिजे ना. ही कुठली गोष्ट
आहे. तिथे तर (सतयुगामध्ये तर) आज्ञा मानणे न मानणे हा प्रश्नच नसतो. सर्वजण
प्रेमाने राहतात. तिथे अशी कोणती गोष्ट असतच नाही, तर चॅरिटी बिगिन्स ॲट होम. पत्नी
ज्ञानामध्ये येते, पती येत नसेल तर काय करू शकते. भू-भू करायचे आहे (सतत पाठपुरावा
करत रहायचा आहे). मुलांनी देखील भू-भू करायचे आहे. आपल्या हमजीन्सचे कल्याण करायचे
आहे. त्यांना देखील सांगावे की, बाबांची आठवण करा. आता युद्ध समोर उभे आहे, बाबा
आलेले आहेत. मनुष्य बोलावतात - ‘हे पतित-पावन या’. जेव्हा की पतित दुनियेचा विनाश
होणार आहे तर तुम्ही मग पतित का बनता! माता ज्ञानामध्ये आहे तर मातेचे काम आहे
आपल्या हमजीन्सचे कल्याण करणे.
आता तुम्ही बाबांकडून २१ जन्मांकरिता संपूर्ण राज्य घेता. तुम्हाला कोणीही हात लावू
शकत नाही. तुम्ही साऱ्या विश्वाचे मालक बनता. फरक बघा किती आहे. असा वारसा
देणाऱ्याची किती आठवण केली पाहिजे. इथे तर असे बरेच आहेत जे पूर्ण दिवसामध्ये
शिवबाबांची आठवणच करत नाहीत. सारा दिवस घरातल्या, कामधंद्याच्या भानगडीच डोक्यात
असतात. नाहीतर पहाटे उठून बाबांची अतिशय प्रेमाने आठवण केली पाहिजे. ‘बाबा, आम्ही
तुमच्याशी प्रतिज्ञा करतो - तुमच्याकडून आम्ही वारसा जरूर घेऊ. बाबा तुम्ही किती
गोड आहात. तुमच्या आठवणीने आमची विकर्म विनाश होतील. मनातल्या मनात स्वतःशी गोष्टी
करणे, याला विचार सागर मंथन करणे म्हटले जाते. बाबा तुमच्याकडून आम्ही पूर्ण वारसा
घेऊनच सोडणार. आता आम्हाला तमोप्रधानापासून सतोप्रधान जरूर बनायचे आहे, तेव्हाच तर
सतयुगी राज्य प्राप्त करू. बाबा तुमची आम्ही निरंतर आठवण करू. ६३ जन्मांमध्ये आम्ही
किती पापे केली आहेत. डोक्यावर पापांचे किती ओझे आहे त्यामुळे बाबा आम्ही तुमची खूप
आठवण करतो. बाबा, आम्ही भोजन बनवताना, फिरण्यासाठी गेलो तरी देखील तुमच्या
आठवणीमध्ये राहू. अशाप्रकारे गोष्टी करत प्रतिज्ञा कराल तर विकर्म विनाश होत जातील.
बाबा, आम्ही तुमच्या आठवणीमध्येच भोजन बनवणार. आम्हाला सतोप्रधान जरूर बनायचे आहे.
माहित नाही उद्या शरीर सुटले तर आम्ही सतोप्रधान बनणारच नाही! मृत्यूची भीती आहे
ना. बाबा आम्ही जीवात जीव असे पर्यंत तुमच्याकडून वारसा जरूर घेणार. तर मग पाहिले
पाहिजे की आजच्या पूर्ण दिवसभरामध्ये मी बाबांची किती आठवण केली. कोणत्याही
परिस्थितीमध्ये आठवणीच्या यात्रेमध्ये जरूर राहायचे आहे. गृहस्थ व्यवहारामध्ये
देखील राहायचे आहे. युक्तीने चालायचे आहे. अशाप्रकारे तीव्र वेगाने पुरुषार्थाला
लागला तर आठवण देखील राहील आणि आयुष्य देखील वाढेल. भविष्यामध्ये तुमचे आयुष्य
वाढेल, आठवण केली नाहीत तर पद देखील कमी दर्जाचे होईल. पुरुषार्थ करून बाबांकडून
वारसा तर घ्यायचा आहे ना आणि स्वदर्शन चक्रधारी बनायचे आहे. जसे हिंदूंना ख्रिश्चन
बनविण्यासाठी नन्स खूप फिरत असतात. घरोघरी, दुकानांमध्ये जातात; सर्वांना म्हणतात -
बायबल घ्या, हे घ्या. आमच्या ख्रिश्चन धर्मामध्ये खूप सुख आहे. त्यांचे देखील मिशन
आहे, बौद्धांचे देखील मिशन आहे. हिंदू लोक हे समजत नाहीत की हे काय करत आहेत! आमच्या
हिंदू धर्मवाल्यांना ख्रिश्चन बनवत राहतात. तुम्ही प्रदर्शनीमध्ये किती समजावून
सांगता. भले ओपिनियन (अभिप्राय) देखील लिहून देतात आणि घरी गेले की संपले. यासाठी
म्हणूनच गायले गेले आहे - वानरांच्या समोर रत्न ठेवा तरीही ते दगड समजून फेकून
देतील. तर ही देखील अविनाशी ज्ञान-रत्न दगड समजून फेकून देतात, एवढे देखील समजत नाही.
हो, जे या धर्माचे असतील त्यांनाच टच होईल. गोष्ट खूप सोपी आहे. बाबा स्वर्गाचे
रचयिता आहेत. बाबा भारतामध्येच येतात आणि तेही एकदाच येतात.
बाबा म्हणतात - तुम्ही मज पतित-पावन पित्याला बोलावत आला आहात. आता मी आलेलो आहे,
तुम्हाला स्वर्गाचा मालक बनविण्याकरिता. तुम्ही म्हणता देखील आम्ही या भ्रष्टाचारी
सृष्टीला श्रेष्ठाचारी बनवूनच सोडणार. आता तर सर्व नरकवासी आहेत. तुम्ही आता
शिवबाबांच्या श्रीमतावर आहात. शिव भगवानुवाच - ‘मी तुम्हाला स्वर्गाचा मालक,
राजांचाही राजा बनवतो’. गीतेमध्ये खूप छान लिहिलेले आहे; म्हणतात - मी या साधूंचा
देखील उद्धार करण्याकरिता येतो. तर हे ज्ञान त्यांना देखील ऐकवले पाहिजे ना.
बोलावतात देखील - ‘हे पतित-पावन सीतांचे राम’. आता याचा अर्थ देखील समजत नाहीत.
सर्व आहेत भक्तिणी अथवा सीता. त्या बोलावत आहेत - ‘हे राम, येऊन आम्हा सीतांचा
उद्धार करा’. आणि मग म्हणतात - ‘रघुपति राघव राजाराम…’ वास्तविक राजा रामची गोष्ट
नाहीये. मुख्य चूक ही आहे की, ‘शिव’च्या नावा ऐवजी श्रीकृष्णाचे नाव घातले आहे.
विचारले पाहिजे श्रीकृष्णाला किंवा रामाला काळे का दाखवले आहे? सतयुग, त्रेतामध्ये
आहेतच सुंदर, नंतर मग श्याम बनतात. पहिले आहेत गोल्डन एज्ड, सिल्व्हर एज्ड, मग कॉपर
आणि आयर्न एज्ड. यावेळी आहे आयर्न एज्ड. गोल्डन एज्ड होते तेव्हा किती मान होता. तर
युक्तीने जाऊन हे समजावून सांगितले पाहिजे. ते (संन्यासी) काही इतक्या लवकर आपला
हट्ट सोडणार नाहीत. मनुष्यसृष्टी रुपी झाडाचे आयुष्य खूप मोठे असते, त्यामुळे झाड
जडजडीभूत अवस्थेला प्राप्त होते, आयुष्य तर दुनियेचे देखील आहे ना. नवीन दुनिया आणि
जुनी दुनिया. जुनी अर्थात कलियुग, तमोप्रधान दुनिया. यामध्ये एकही कोणी सतोप्रधान
असू शकत नाही. आता तमोप्रधान असणाऱ्यांना नष्ट व्हायचे आहे. नवीन दुनिया कोण स्थापन
करतील? तेच बाबा. असे नाही की प्रलय होतो. बाबांना बोलावतातच तेव्हा जेव्हा पतित
बनतात. आणि मग म्हणतात, येऊन पावन बनवा. येणार तर जरूर जुन्या दुनियेमध्येच.
पतित-पावन म्हणतात तर जरूर शेवटीच येतील. स्वतः सांगतात - मी कल्प-कल्प, कल्पाच्या
संगमयुगावर पावन दुनिया बनविण्याकरिता येतो. आता आहे संगम.
आता बाबा सर्वांना सद्गतीमध्ये घेऊन जातात. तर अशा बाबांच्या श्रीमतावर चालले पाहिजे
ना. आपल्या अवस्थेला मजबूत करायचे आहे. पहाटे लवकर उठून बाबांची आठवण केली पाहिजे.
स्वतःला आत्मा समजायचे आहे. ही शरीराची कर्मेंद्रिये आहेत. बाबा म्हणतात - ‘माझ्या
मुलांनो, मी तुम्हाला जे सांगतो ते ऐका’. मुक्ती-जीवनमुक्तीसाठी दुसऱ्या इतर
कोणाचीही गोष्ट ऐकू नका. परमधामवरून बाबा आले आहेत पावन बनविण्याकरिता. मग तुम्ही
जुन्या शास्त्रांची आठवण का करता? भक्ती करतातच यासाठी की, भगवान भेटेल. ते तर
सर्वांचे सद्गती दाता बाबा आहेत ना. बाबांशिवाय हे नॉलेज इतर कोणीही देऊ शकत नाही.
या लक्ष्मी-नारायणाला देखिल हे राज्य कसे मिळाले? आत्म्यासाठी म्हणतात की, तो बिंदू
आहे, ‘चमकता है अजब सितारा’. बाबा समजावून सांगत आहेत - तुम्ही मला ‘परमात्मा
सुप्रीम सोल’ म्हणता. लौकिक पित्याला कधी ‘परमात्मा’ म्हणाल का? परमात्मा जे
परमधाममध्ये राहतात त्यांना ‘सुप्रीम सोल’ म्हणतात. ते तुमचे पिता आहेत. ते येऊन
यांच्यामध्ये (ब्रह्मा बाबांमध्ये) प्रवेश करतील. गुरु, शिष्याच्या बाजूला बसेल ना.
या गोष्टी काही शास्त्रांमध्ये नाहीत. आता तुम्ही जाणता ते आमचे पिता आहेत. ५ हजार
वर्षांपूर्वी देखील बाबांनी योग शिकवला होता की माझी आठवण करा आणि विष्णुपुरीची
आठवण करा तर जरूर संगमामध्येच म्हणतील ना. सतयुगामध्ये एक धर्म होता. तर जरूर पुन्हा
एक धर्म असेल ना. इतके सर्व धर्म नष्ट होतील. हा काळ तोच आहे. बाबा म्हणतात - माझी
आठवण करा तर मी तुम्हाला विश्वाचा मालक बनवेन. बाबांच्या आठवणी द्वारेच तुम्ही
तमोप्रधानापासून सतोप्रधान बनाल. बाबा म्हणतात - जी मुले चांगली सेवा करतात, त्यांची
मी आठवण करतो कारण ते माझे मदतगार आहेत. अनेकांचे कल्याण करतात तर ते मला खूप प्रिय
वाटतात. तुम्हाला तर एक बाबाच प्रिय वाटतात ज्यांच्याकडून वारसा मिळतो. त्यामुळे
तुम्हा मुलांना चांगल्या रीतीने पुरुषार्थ करावा लागेल. आठवणीच्या यात्रेमध्ये
राहायचे आहे. फालतू विचार देखील खूप येतील. भक्तिमार्गामध्ये स्वतःला मारतात देखील
की, आपल्याला शिवाचे दर्शन व्हावे, दर्शनासाठी खूप मेहनत करतात. इथे तुम्ही समजता
बाबांच्या आठवणीद्वारे पापे नष्ट होतील आणि २१ जन्मांसाठी वारसा मिळेल. दर्शन
झाल्याने काही पाप भस्म होत नाहीत. बाबा जे विश्वाचा मालक बनवतात. त्यांची तर खूप
प्रेमाने आठवण केली पाहिजे. आता तुमच्या बुद्धीमध्ये आहे की आपण काय बनत आहोत.
दुसऱ्या जन्मामध्ये आम्ही जाऊन हे-हे बनणार. हे कॉलेज आहेच मुळी सतयुगाचे
प्रिन्स-प्रिन्सेस बनण्याचे. बाबा येऊन धर्मासोबतच डीटी किंगडमची (दैवी राज्याची)
स्थापना करतात. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक
आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) बाबांनी
मुक्ती-जीवनमुक्तीकरिता ज्या काही ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या आहेत, त्याच
ऐकायच्या आहेत आणि धारण करायच्या आहेत, बाकी सर्व विसरून जायचे आहे. आपले आणि आपल्या
लौकिक परिवाराचे कल्याण करायचे आहे.
२) व्यर्थ विचारांना
नष्ट करण्याकरिता पहाटे लवकर उठून विचार सागर मंथन करायचे आहे. आठवणीच्या
यात्रेमध्ये व्यस्त राहायचे आहे.
वरदान:-
ज्ञान-योगाच्या
पॉवरफुल किरणांद्वारे जुन्या संस्कार रुपी किटाणूंना भस्म करणारे मास्टर ज्ञानसूर्य
भव
कितीही पतित असलेल्या
वातावरणाला बदलण्याकरिता अथवा जुन्या संस्कार रुपी किटाणूंना भस्म करण्याकरिता हेच
लक्षात रहावे की, मी मास्टर ज्ञानसूर्य आहे. सूर्याचे काम आहे प्रकाश देणे आणि
कचऱ्याला नष्ट करणे. तर ज्ञान-योगाच्या शक्तीद्वारे अथवा श्रेष्ठ वर्तनाद्वारे हेच
कार्य करत रहा. जर शक्ती कमी असेल तर ज्ञान फक्त प्रकाश देईल परंतु जुने संस्कार
रूपी किटाणू नष्ट होणार नाहीत; त्यामुळे पहिले योग तपस्ये द्वारा शक्तिशाली बना.
बोधवाक्य:-
शुभ भावना,
शुभकामनेचे श्रेष्ठ संकल्पच जमेचे खाते वाढवतात.
हे अव्यक्त इशारे -
आता आपल्या ‘दाता’ स्वरूपाला प्रत्यक्ष करा.
वर्तमान समयी तुम्ही
मुले आपले दयाळू आणि दात्याचे स्वरूप प्रत्यक्ष करा. तुमचे सर्व भंडारे (खजिने)
निरंतर खुले राहिले पाहिजेत. अनादि, आदि ‘दाता’पणाचे संस्कार आपल्या जीवनामध्ये
सदैव इमर्ज ठेवून, परमात्मा संदेश वाहक बनून विश्वामध्ये बाबांच्या प्रत्यक्षतेचा
संदेश पसरवा. बेहदचे दाता बनून पृथ्वीच्या गोळ्यावर उभे राहून, बेहदच्या सेवेमध्ये
व्हायब्रेशन पसरवा. महान दाता बना.