01-11-26    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   05.03.2012  ओम शान्ति   मधुबन


आता चोहो बाजूला दुःख अशांती वाढत आहे, त्यामुळे आपल्या विश्वकल्याणी स्वरूपाला प्रत्यक्ष करा, मनसा सेवा वाढवा, बाबांच्या संगतीच्या रंगाने डबल होली (डबल पवित्र) बना


आज बापदादा प्रत्येक मुलाच्या भाग्याच्या रेषा पाहत आहेत. मस्तकामध्ये चमकणाऱ्या ताऱ्याची रेषा, डोळ्यांमध्ये स्नेह आणि शक्तीची रेषा, ओठांवर हास्याची रेषा, पायामध्ये प्रत्येक पावलावर पद्मची रेषा पाहत आहेत. तुम्ही देखील सर्वजण आपल्या भाग्याच्या रेषा पाहून हर्षित होत आहात ना! मनामध्ये हेच गाता - ‘वाह माझे भाग्य!’ प्रत्येकाचे मस्तक त्या दिव्य ताऱ्याने चमकताना पाहून बापदादा देखील खुश होत आहेत आणि मनामध्ये हेच गाणे गात आहेत - ‘वाह मुलांनो वाह!’ मुलांच्या हृदयामधील कोणते गीत ऐकत आहेत? ‘वाह बाबा वाह!’ तर मुले देखील ‘वाह!’ बाबा देखील ‘वाह!’ तर ही सर्व सभा काय झाली? ‘वाह! वाह! वाह!’ तर आपल्या भाग्याला पाहून सदैव असेच हर्षित राहा जसे आता सर्वजण हर्षित होत आहात. हे भाग्य आता संगमयुगामध्येच मिळते. संगमयुगाच्या प्रत्येक क्षणाची खूप मोठी व्हॅल्यू आहे. संगमयुगाचा प्रत्येक क्षण अविनाशी होतो; कारण प्रत्येक क्षणाचा २१ जन्मांशी संबंध आहे. आताच्या एका क्षणाचा संबंध २१ जन्मांसोबत आहे. त्यामुळे चेक करा की, एक क्षण जरी व्यर्थ गेला तरीही ती केवळ एका जन्माची गोष्ट नाहीये तर २१ जन्मांच्या संबंधाची गोष्ट आहे; म्हणून बापदादा मुलांचे वेळोवेळी लक्ष वेधून घेत आहेत की संगमयुगाच्या एका क्षणाला सुद्धा, एका संकल्पाला देखील व्यर्थ गमावू नका. कारण तुम्ही फक्त एक जन्मच व्यर्थ गमावला नाहीत परंतु २१ जन्म व्यर्थ गमावलेत. संगमयुगाचे महत्व प्रत्येक क्षणी लक्षात ठेवा.

बापदादांनी व्यर्थ वेळ आणि व्यर्थ संकल्पाचे होमवर्क सर्वांना दिले होते. तर सर्वांनी होमवर्क केला का? जे समजतात की आमचे अटेंशन राहिले आणि बऱ्याच अंशी सफलता देखील प्राप्त झाली, लक्ष्य जे घेतले होते त्याचा परिणाम लक्षणापर्यंत मिळाला आहे, त्यांनी हात वर करा. अच्छा. पांडव हात वर करत आहेत? उंच हात वर करा. अजून सर्वांनी काम केलेले नाही. संगमयुगाच्या महत्वाला नेहमी बुद्धीमध्ये ठेवून जर हे लक्षात ठेवाल की, अविनाशी बाबांकडून हे कार्य मिळाले आहे. प्रत्येक क्षण अविनाशी बनणार आहे कारण अविनाशी बाबांनी हे वरदान दिले आहे. तर ते सहजच होईल.

बाबांनी सांगितले आहे की, प्रत्येक ब्राह्मण मुलाच्या पावलामध्ये पद्मची रेषा आहे. विचार करा एका पावलामध्ये पद्मची रेषा आहे, तर मग किती पद्मांसाठी संगमयुगावर गोल्डन चान्स आहे. प्रत्येकाने हे आपले भाग्य लक्षात ठेवायचे आहे. बरीच मुले विचार करतात की बापदादा काय इच्छित आहेत? बापदादा हेच इच्छितात की एक-एक बच्चा डबल राजा बनावा. आता स्वराज्य अधिकारी आणि भविष्यामध्ये विश्वराज्य अधिकारी. कोणताही बच्चा डबल राजा बनण्यामध्ये मागे राहू नये. तर प्रत्येक बच्चा डबल राज्य अधिकारी आहे ना! मान हलवा. तर प्रत्येक बच्चा डबल राज्य अधिकारी आहे! मान हलवा. तर बाबांना किती आनंद होतो. बापदादा प्रत्येक मुलाचे रेकॉर्ड रोज पाहतात, तर काय पाहतात? प्रत्येकाने आपल्या मनामध्ये तर ओळखले असेलच. राज्य अधिकारी तर बनला आहात परंतु आता जे स्वराज्य अधिकारी आहात, स्वराज्य अधिकारी अर्थात मन-बुद्धी-संस्कारांना आपल्या कंट्रोलमध्ये चालवणारे. जेव्हा हवे, जसे हवे तसे अधिकारामध्ये राहतील. जशी ही स्थूल कर्मेंद्रिये हात आहेत, पाय आहेत आपल्या कंट्रोलमध्ये राहतात तसेच मन-बुद्धी-संस्कार जेव्हा हवे, जसे हवे तशी रूलिंग पॉवर आणि कंट्रोलिंग पॉवर असावी. आता दिसायला नंबरवार भरपूर जण आहेत. आहेत तर हे देखील माझेच. ‘मी’ मन नाही, ‘माझे’ मन आहे. संस्कार माझे आहेत, बुद्धी माझी आहे परंतु कंट्रोलिंग पॉवर आणि रूलिंग पॉवर नंबरवार आहे. बापदादा समया विषयी सूचना देखील वेळोवेळी देत आले आहेत, त्या समयानुसार तुम्हा लोकांचा प्रत्येकाचा स्वमान आहे - विश्वकल्याणकारी. आता समयानुसार प्रत्येक मुलाला विश्वकल्याणी स्वरूपाला प्रत्यक्ष करण्याची वेळ आहे. चोहो बाजूला दुःख अशांती वाढत आहे. तुमचे भाऊ, तुमच्या बहिणी, परिवार दुःखी होत आहेत तर तुम्हाला तुमच्या परिवारावर दया येत नाही!

आता बापदादा हाच इशारा देत आहेत स्व-पुरुषार्थासोबत विश्व सेवा, जशी वाचेची सेवा वर्तमान समयी चांगली धूमधाम मध्ये करत आहात. बापदादा खुश आहेत, या ७५ वर्षांच्या ज्युबिलीने सर्वांच्या मनामध्ये मेजॉरिटी सेवेचा उमंग आणला आहे. बापदादा हे पाहून खुश आहेत, परंतु आता मनसा सेवेची देखील गरज आहे कारण सर्व बाजूनी विश्वकल्याणकारी बनायचे आहे, त्यामध्ये मनसा, वाचा आणि कर्मणा अर्थात चलन आणि चेहऱ्यातून या तिन्ही प्रकारच्या सेवेची आता आवश्यकता आहे. रोज चेक करा तिन्ही सेवांमध्ये किती परसेंट सेवा केली? वाचेमध्ये तर बापदादांनी देखील सर्टिफिकेट दिले, परंतु आता मनसा सूक्ष्म व्हायब्रेशन्सद्वारे आत्म्यांच्या दुःख अशांतीचा आधार बनावे लागेल. तुम्हाला दया येत नाही काय? बापदादांना तर मुलांवर मग ती कशीही असली तरी देखील मुले तर आहेत ना, दया येते. तर आता प्रत्येक मुलाला फक्त सेंटर-कल्याणी नाही, झोन-कल्याणी नाही तर विश्व-कल्याणी बनायचे आहे. तर बापदादा आता याकडे लक्ष वेधत आहेत आपल्या भक्तांचे कल्याणकारी बना कारण या संगमयुगाचे खूप मोठे महत्व आहे. आता संगमयुगामध्ये जो पाहिजे, जितका पाहिजे तितका बाबांकडून सहयोग मिळू शकतो. तर ऐकले, आता काय करायचे आहे? मनसा सेवेला वाढवा. आपल्या कार्या अनुसार जशी ट्रॅफिक कंट्रोलची वेळ निश्चित केलेली आहे, अशीच प्रत्येकाने मनसा सेवेची देखील वेळ निश्चित केली पाहिजे. जेव्हा अजून दुःख वाढेल त्यावेळी सर्वांचे लक्ष त्या भयग्रस्त वातावरणाकडे असेल, परंतु आता मनसा सेवेची वेळ आहे म्हणून प्रत्येक मुलाने आपले ‘विश्वकल्याणी’चे स्वरूप इमर्ज करायचे आहे. विश्वकल्याणामध्ये स्व-कल्याण आपोआप आणि सहज होऊन जाईल. कारण जर मन फ्री असेल तर व्यर्थ येते परंतु मन जर बिझी असेल तर व्यर्थ सहजच समाप्त होईल. तर बापदादा जेव्हा फेरी मारून चोहो बाजूला देश-विदेशातील अज्ञानी मुलांना पाहतात तेव्हा दया येते, त्यामुळे आता तुम्ही देखील सर्वजण दुःख हर्ता आणि सुख कर्ता बना.

तर पाहा दुनियेतील लोकांच्या होळीमध्ये आणि तुमच्या होळीमध्ये किती अंतर आहे! बापदादांनी यापूर्वी देखील सांगितले आहे की तुमचे भक्त तुम्ही लोकांनी केलेल्या कामाची कॉपी करण्यामध्ये हुशार आहेत; कारण या सर्व विधी द्वापरमध्ये येणाऱ्या आत्म्यांनी बनवल्या आहेत. तर त्यांचा तो सर्वात पहिला जन्म होता ना त्यामुळे त्यांची बुद्धी देखील जसा नियम आहे, आधी सतोप्रधान, मग रजो आणि तमोमध्ये येतात, तर त्यावेळी त्यांची बुद्धी त्यांच्या हिशोबाने सतो होती म्हणून तुमच्या प्रत्येक विशेषतेला, तुम्ही सदैव उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये राहता त्याला उत्सवाच्या रूपामध्ये साजरी करण्यास सुरुवात केली आहे. जसे शिवरात्रीला देखील सांगितले ना कॉपी करण्यात किती हुशार आहेत. तसेच आता देखील तुम्ही संगमावर सदैव उत्साहामध्ये राहता, तर तुमच्या उत्साहाला त्यांनी उत्सवाच्या रूपामध्ये यादगार बनवले आहे. तर होळीमध्ये काय करतात? तुम्ही देखील तुमच्या जीवनाला रंगवले आहे परंतु तुमचा रंग कोणता आहे? तुम्हा सर्वांचा रंग आहे - बाबांच्या संगतीचा रंग. तर सर्व वेळ बाबांच्या संगतीच्या रंगामध्ये राहता ना! तर त्यांनी देखील रंग तर बनवला, परंतु बॉडी कॉन्शस आहेत ना! तर स्थूल रंग बनवला आहे. परंतु तुम्ही सर्वजण सदैव या कल्याणकारी संगमाच्या वेळी या रंगामध्ये, संगतीच्या रंगामध्ये राहता ना! रंग लावला आहे ना! संगतीचा रंग लागला आहे आणि इंग्रजीमध्ये पवित्रतेला ‘होली’ म्हटले जाते. तर संगतीच्या रंगामध्ये तुम्ही ‘होली’ अर्थात ‘पवित्र’ बनता. पवित्र बनला आहात ना! पवित्रतेचे व्रत सर्वांनी पक्के घेतले आहे ना! नंबरवार जरी आहेत परंतु ब्राह्मण बनणे अर्थात पवित्रतेचे व्रत घेणे; कारण बाबा सदैव पवित्र आहेत. आहेतच पवित्र स्वरूप. बनावे लागत नाही. स्वरूपच पवित्रता आहे. तर होळीची विशेषता जाणता काय आहे? पवित्र तर तुम्ही बनताच; परंतु तुम्ही संगतीच्या रंगामध्ये डबल पवित्र बनता. पवित्र तर धर्मपिता, महान आत्मे देखील बनतात परंतु ते फक्त आत्म्याला पवित्र बनवतात. शरीर आणि आत्मा दोन्ही पवित्र, ते तुम्ही भविष्यामध्ये बनता. सुरुवातीपासून पाहा, द्वापरपासून जे कोणी आले आहेत, पवित्र बनले आहेत परंतु कोणीही डबल पवित्र बनलेले नाहीत. शरीरही पवित्र आत्मा देखील पवित्र. तुम्ही जेव्हा भविष्यामध्ये राज्य अधिकारी बनाल तेव्हा आत्मा आणि शरीर दोन्ही पवित्र असतील. संपूर्ण चक्र फिरा. द्वापरपासून आले आहेत, द्वापरपासून आतापर्यंत पाहा, कोणी डबल पवित्र बनले आहेत का! तर तुम्ही डबल पवित्र, इतके महान का बनला आहात? कारण तुम्हाला कोणता रंग लागला आहे? परमात्म्याच्या संगतीचा रंग लागला आहे. तर जशी परम-आत्मा पवित्र आहे तर तुम्ही देखील २१ जन्म डबल पवित्र राहता. भले मग धर्मपिता आले आहेत, परंतु ते देखील डबल पवित्र नाहीत. तुमचे भाग्य आहे कारण तुम्ही राहताच आहात परमात्म्याच्या संगतीमध्ये. संगतीचा रंग इतका पक्का असतो की तुम्ही डबल पवित्र बनता.

आणि होलीचा दुसरा अर्थ आहे ‘हो ली’. घडून गेले, जे झाले ते झाले. होली. तर ‘हो ली’ करता येते का? जे घडून गेले ते गेले. ‘हो ली’ या शब्दाचा अर्थ काय निघतो? जे होऊन गेले ते गेले. याच्यामुळे तुम्ही २१ जन्म डबल होली (डबल पवित्र) राहता. केवळ एक जन्म नाही, कारण संगमाच्या एक-एक सेकंदाचे कनेक्शन २१ जन्मांसोबत आहे. इथे जर तुम्ही एक सेकंद किंवा एक मिनिट सफल केले तर २१ जन्म तुमचे सफल होत राहतील, गॅरंटी आहे. तर अशी होळी साजरी केली आहे का? ‘हो ली’ करता येते का? जे होऊन गेले ते गेले, ‘हो ली’. आणि तिसरी रूपरेषा काय करतात? आधी जाळतात आणि मग साजरे करतात. तर तुम्ही काय केले? योग-अग्नीद्वारे आपल्या कमजोरींना, संस्कारांना, जे अनेक जन्मांचे उलटे संस्कार आहेत त्यांना योग-अग्नीने जाळले आहे ना! जाळले आहेत की अजून देखील जाळत आहात? जाळले आहेत? जे समजतात आम्ही योग-अग्नीने आपले आधीचे संस्कार जाळले आहेत, जळून गेले आहेत त्यांनी हात वर करा. जळून गेले आहेत की अजूनही येत असतात? थोडे-थोडे तर येतात? बापदादांकडे जेव्हा आपला चार्ट पाठवतात ना, तर म्हणतात - बऱ्याच प्रमाणात तर जुने संस्कार निघून गेले आहेत, सांगण्याच्या बाबतीत चतुर आहेत ना! तर म्हणतात बरेचसे तर नष्ट झाले आहेत, कधी-कधी थोडासा संस्कार इमर्ज होतो. परंतु जाळणे अर्थात जाळणे. जळाल्यानंतर नामोनिशाण सुद्धा राहत नाही. मेल्यानंतर शरीराचे यादगार शवाच्या रूपात तर दिसून येते परंतु जळाल्यानंतर पूर्णपणे नष्ट होते. जसे रावणाला देखील पाहा फक्त मारले नाही, तर जाळले सुद्धा, ज्यामुळे एकदम नामोनिशाणच नष्ट. तर तुम्ही देखील सर्वजण स्वतःला नोट करा की, संस्कारांना मारले आहे की जाळले आहे? भस्म केले आहे? जुन्या संस्कारांना जर जाळले नाही, तर ते अधून-मधून इमर्ज होतात. परंतु भक्तांनी सगळ्या गोष्टींची कॉपी केली आहे. तुम्ही जाळता, ते देखील जाळतात आणि मग साजरे करतात. जाळल्या शिवाय साजरा करत नाहीत. तर, तुम्ही तर संस्कारांना जाळून होली (पवित्र) बनला आहात. कोणी बनत आहात, कोणी बनला आहात. तर तुम्ही होळी साजरी केली? बाबांच्या संगतीच्या रंगाची. आता संगतीमध्ये बसला आहात ना, तर संगतीच्या रंगाची होळी साजरी केली ना! साजरी केली? हात वर करा. साजरी केली. होळी साजरी करणे अर्थात होली बनणे, पवित्र बनणे. जसे बाबा, तशी मुले आहेत. जर समजा तुमचा एखादा संस्कार जो जळालेला नाहीये, आणि कधीतरी इमर्ज होतो, तर चांगले वाटते का? संकल्प येतो ना की, आता तीव्र पुरुषार्थाने याला जाळायचेच आहे. फक्त मारायचे नाही; काय आहे काहीजणांनी संस्कारांना मारले आहे, तर मेलेल्यामध्ये कधी पुन्हा जीव येतो. जर जाळून टाकाल तर मग पुन्हा कधीही येणार नाही.
तर आज, जुन्या संस्काराला जाळायचे आहे की मेलेलाच ठीक आहे? जाळण्याची शक्ती आहे? आहे शक्ती? संकल्प करू शकता? बरेचजण बाबांना म्हणतात, बापदादांशी रुहरिहान करतात ना, खूप गोड-गोड रुहरिहान करतात, म्हणतात - बाबा, आम्ही तर खूप प्रयत्न केला, परंतु तो पुन्हा-पुन्हा येतो. इच्छा नसते परंतु तो येतो. याचे कारण माहीत आहे? जाळता, बापदादा पाहतात, पुरुषार्थ भरपूर करतात परंतु पुरुषार्थासोबत दृढ संकल्पाची आवश्यकता आहे. दृढता सफलतेची चावी आहे. जो दृढ संकल्प केला जातो, ‘दृढ’ याचा अर्थच आहे की तो पुन्हा परत येणार नाही. तर मग ठाऊक आहे, खूप गोड-गोड गोष्टी करतात. जेव्हा तो पुन्हा येतो ना, तर काय म्हणतात ठाऊक आहे? रुहरिहान तर सर्वजण करतात ना! खूप गोड रुहरिहान करतात, म्हणतात इच्छा तर नसते, परंतु येतो. तर याचा अर्थ शक्ती कमी आहे ना! दृढता कमी आहे ना! दृढ संकल्पधारी बना. करायचेच आहे. आणि त्या दृढ संकल्पाला दररोज चेक करा की, कोणत्या कारणामुळे दृढतेमध्ये पुन्हा कमजोरी आली? आणि त्या परिस्थितीवर विशेष लक्ष देत राहा की हा पुन्हा येऊ नये. मास्टर सर्वशक्तिवानाच्या सीटवर बसून त्या संकल्पाला, संस्काराला समाप्त करा. बरीच मुले म्हणतात की, ‘आम्ही बऱ्याचदा असा अनुभव करतो की कधी-कधी जेव्हा एखादी शक्ती हवी असते ना तर त्या वेळी ती शक्ती येत नाही’. तसेतर शक्ती आहे, परंतु कधी गरजेच्या वेळी शक्तीला इमर्ज करतो ना, तरीसुद्धा येत नाही. आहेत मास्टर सर्वशक्तिमान. तुमचे टायटल काय आहे? मास्टर सर्वशक्तिमान, आणि म्हणत काय आहात? शक्ती वेळेवर येत नाही. याचे कारण काय? तुम्ही आपल्या मास्टर सर्वशक्तिमानच्या सीटवर सेट होत नाही. आता एखाद्या ऑफिसमध्ये जरी गेलात तरी ते विशिष्ट काम करणाऱ्याकडे ऑथॉरिटी असेल आणि तो ऑर्डर करेल तर ती मानतात ना. असेच दुसरे कोणीतरी म्हणेल तर मानतील का? तर तुमची सीट आहे - मास्टर सर्वशक्तिमान. त्या सीटवर सेट होत नसाल तर आवाहन करून देखील शक्ती वेळेवर येत नाही. यासाठी बापदादांनी वारंवार हे सांगितले आहे की, आपल्या मनाला बिझी ठेवा. दिवसभरामध्ये कधी कोणत्या शक्तीला इमर्ज ठेवा, कधी कोणत्या शक्तीला इमर्ज करून पहा की त्याची ताकद काय आहे? असे अनुभव करत राहाल, आपल्या सीटवर सेट राहाल तर शक्ती तुमच्यासमोर सदैव ‘जी हाजिर’ होईल. तुमची शक्ती आहे ना! तर होळी साजरी केली का? तुम्ही तर सदैव होळी साजरी करत असता. सदैव बाबांच्या संगतीचा रंग लावतच राहता. रंगामध्ये रंगलेले आहात ना? अच्छा.

आज बापदादा प्रत्येक मुलाला एक स्वमान देत आहेत - प्रत्येक मुलाने ‘दृढ संकल्पधारी विशेष आत्मा’ बनावे. संकल्प केला आणि पूर्ण झाला, याला म्हटले जाते - दृढ संकल्प. म्हणतात - दृढ संकल्प केला, परंतु दृढता अर्थातच सफलता. जर सफलता नसेल तर त्याला दृढता म्हणता येणार नाही. तर आता ‘दृढता भव’! हा आपला विशेष स्वमान दररोज अमृतवेलेला स्मृतीमध्ये आणा आणि त्या विधीनुसार पुढे जात राहा. संगमयुगाचा काळ अतिशय सुंदर आहे, एक सेकंद नाही, एक सेकंद एक वर्षाच्या प्राप्ती समान आहे; म्हणून बापदादा सांगतच असतात की, एक सेकंद सुद्धा व्यर्थ जाऊ नये. एक संकल्प सुद्धा व्यर्थ जाऊ नये. समर्थ बना आणि समर्थ बनवा. ठीक आहे ना! अच्छा.

चोहो बाजूंच्या होलीएस्ट मुलांना जे प्रत्येक पावलावर ‘माझे बाबा, माझे बाबा’ असे म्हणत उडत आहेत तसेच सदैव आपल्या तीव्र पुरुषार्थाद्वारे पुढे जात आहेत आणि इतरांना पुढे नेत राहतात अशा बापदादांच्या हृदयातील नूरे रत्नांना बापदादा खूप-खूप-खूप-खूप अंतःकरणापासून प्रेम देत आहेत. त्याचसोबत होळीची मुबारक देखील देत आहेत; कारण वास्तविक पाहता तुम्हीच होली (पवित्र) आहात, बाकी दुसरे तर कोणी डबल होली (डबल पवित्र) बनत नाही. तुम्हीच डबल होली बनता म्हणून पद्मपटीने मुबारक असो, मुबारक असो.

वरदान:-
स्वतःवर बापदादांना कुर्बान करवून घेणारे त्यागमूर्त, निश्चय-बुद्धी भव

बाबा भेटले, सर्व काही मिळाले या खुमारीमध्ये अथवा नशेमध्ये सर्व काही त्याग करणारी ज्ञान-स्वरूप, निश्चय-बुद्धी मुले बाबांद्वारे जेव्हा आनंद, शांती, शक्ती अथवा सुखाचा अनुभव करतात तेव्हा लोकलाजेची सुद्धा पर्वा न करता, सदैव पुढेच पावले टाकत राहतात. त्यांना दुनियेतील सर्व काही तुच्छ, असार अनुभव होते. अशा त्यागमूर्त, निश्चय-बुद्धी मुलांवर बापदादा आपल्या सर्व संपत्तीसहित कुर्बान होतात. मुले जसा संकल्प करतात की, ‘बाबा, आम्ही तुमचे आहोत’, तर बाबा देखील म्हणतात की, ‘जे बाबांचे, ते तुमचे’.

सुविचार:-
सहजयोगी ते आहेत जे आपल्या प्रत्येक संकल्पामधून आणि कर्मातून बाबांच्या प्रेमाचे व्हायब्रेशन पसरवतात.

हे अव्यक्त इशारे - ब्रह्माबाबांप्रमाणे संपन्न आणि संपूर्ण स्थितीचा अनुभव करा.

तुम्हा सर्व ब्राह्मण आत्म्यांनी जन्म घेताच हे व्रत घेतले आहे की, आम्हाला पित्यासमान संपन्न आणि संपूर्ण बनायचे आहे. जसे सर्वजण ‘एव्हररेडी’ शब्द बोलता, तसेच संपन्न आणि संपूर्ण बनण्यामध्ये एव्हररेडी बना, यामध्ये निष्काळजीपणा येऊ नये.