02-07-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड मुलांनो, तुम्ही
विकारांचे दान द्या तर राहूचे ग्रहण उतरेल, दे दान तर सुटेल ग्रहण”
प्रश्न:-
वृक्षपती बाबा
आपल्या भारतवासी मुलांवर बृहस्पतीची दशा बसविण्याकरिता कोणती आठवण करून देतात?
उत्तर:-
हे भारतवासी
मुलांनो, तुमचा आदि सनातन देवी-देवता धर्म अति श्रेष्ठ होता. तुम्ही सर्वगुण संपन्न,
१६ कला संपूर्ण होता. तुम्ही मज सागराची मुले काम चितेवर बसून काळे झाले आहात,
ग्रहण लागले आहे. आता मी तुम्हाला पुन्हा गोरे बनविण्याकरिता आलो आहे, ही स्मृती
आल्याने बृहस्पतीची दशा बसते.
गीत:-
ओम् नमो शिवाय...
ओम शांती।
ही कोणाची
महिमा ऐकलीत? बेहदच्या बाबांची. उच्च ते उच्च पिता तर परमपिता परमात्माच आहेत.
लौकिक पित्यासाठी तर सर्व जण असे म्हणणार नाहीत. मुले जाणतात सर्व आत्म्यांचे
पारलौकिक पिता तेच सर्वश्रेष्ठ आहेत. त्यांचे नावच आहे - ‘शिव’. नाव-रूपाशिवाय तर
कोणतीही वस्तू असत नाही. यावेळी सर्वांना राहूचे ग्रहण लागलेले आहे, म्हणून याला
आइरन एज्ड वर्ल्ड (कलियुगी दुनिया) म्हटले जाते. दशा देखील असतात, बृहस्पतीची दशा,
शुक्राची दशा... आता तुमच्यावर बृहस्पतीची दशा आहे. ज्यांची महिमा ऐकली, उच्च ते
उच्च भगवान शिवबाबा. त्यांचे मूलतः नाव आहे - शिव. बाकी तऱ्हेतऱ्हेची अनेक नावे
ठेवली आहेत. त्यांचे मूळचे नाव आहे - शिवबाबा. बाबा समजावून सांगतात - मी बीजरूप,
चैतन्य आहे. सत्-चित् म्हणतात आणि पुन्हा मग म्हणतात ते सुखाचा सागर आहेत, आनंद,
शांतीचा सागर आहेत. सारी महिमा त्या एकाचीच आहे. भारतवासी महिमा गातात परंतु समजत
काहीच नाहीत. एकदम पत्थर-बुद्धी बनले आहेत. पत्थर-बुद्धी कोणी बनवले? रावणाने.
सतयुगामध्ये भारतवासी पारस-बुद्धी होते, आज पासून ५ हजार वर्षांपूर्वी हा भारत
पारसपुरी होता, जिथे देवी-देवता राहत होते. भारतच अविनाशी खंड म्हणून गायला गेला आहे.
भारतातच पारस-बुद्धी देवता होते, यावेळी पत्थर-बुद्धी पतित असतात. पतित कसे बनतात,
हे देखील बाबांनी समजावून सांगितले आहे. द्वापर पासून जेव्हा काम-चितेवर बसले आहेत
तेव्हा काळे बनतात. काम-अग्नीमध्ये सर्व जण भस्म झाले आहेत. त्यातूनही खास भारताची
गोष्ट आहे. भारतामध्ये पारस-बुद्धी देवतांचे राज्य होते, त्याला विष्णुपुरी,
रामराज्य देखील म्हटले जात होते. बाबा येऊन हे सांगत आहेत - ‘गोड-गोड लाडक्या
मुलांनो, जेव्हा तुम्ही सतयुगामध्ये होता, तेव्हा सर्वगुण संपन्न होता’. ही तुमची
महिमा आहे. तिथे विकार नसतात. द्वापर पासून रावण राज्य, ५ विकारांचे राज्य सुरू झाले
आहे. तर रामराज्य बदलून रावण राज्य बनते. आता ग्रहण लागलेले आहे. भारत पूर्णतः काळा
झाला आहे. बृहस्पतीची दशा सर्वात चांगली असते. भारतावर बृहस्पतीची दशा सतयुगामध्ये
होती. मग त्रेतामध्ये शुक्राची दशा, म्हणजे दोन कला कमी झाल्या. त्याला म्हटलेच जाते
सिल्व्हर एज्ड (त्रेतायुग). नंतर मग द्वापर, कलियुग आले. शिडी उतरत आले, शनीची दशा
सुरू झाली. यावेळी सर्वांवर राहूची दशा आहे. सूर्याला ग्रहण लागते तेव्हा म्हणतात -
‘दे दान तर सुटेल ग्रहण’.
आता रुहानी बाबा
मुलांना समजावून सांगत आहेत - हे आहे रुहानी ज्ञान. हे काही शास्त्रांमधील ज्ञान
नाही आहे. शास्त्रांच्या ज्ञानाला भक्तिमार्ग म्हटले जाते. सतयुग-त्रेतामध्ये भक्ती
नसते. ज्ञान आणि भक्ती, नंतर आहे वैराग्य अर्थात या जुन्या दुनियेला सोडायचे असते.
हा आहे शूद्र वर्ण. विराट रूप दाखवतात - ब्राह्मण, देवता, क्षत्रिय, वैश्य... ही
भारताचीच कहाणी आहे. विराट रूप बनवतात देखील, परंतु पत्थर-बुद्धी असल्याने समजत
नाहीत. पत्थर-बुद्धी का आहेत? कारण पतित आहेत. भारतवासीच पारस-बुद्धी होते, संपूर्ण
निर्विकारी होते. आज पासून ५ हजार वर्षांपूर्वी भारत स्वर्ग होता, दुसरा कोणताही
खंड नव्हता, हे बाबाच समजावून सांगतात. हा राजयोग कोण शिकवतात? शिवाचार्य. हे आहेत
ज्ञानाचे सागर. कोणत्याही मनुष्याला ज्ञानाचा सागर, सर्वांचा पतित-पावन म्हणू शकत
नाही. सर्वांचे लिबरेटर एक बाबाच आहेत. दुःखामध्ये रावणापासून लिबरेट करण्यासाठी
बाबा स्वतः येतात, आणि मग गाईड बनून घेऊन जातात. त्यांना रुहानी पंडा म्हटले जाते.
बाबा म्हणतात - मी तुम्हा सर्व आत्म्यांचा पंडा आहे, सर्वांना परत घरी घेऊन जाणार.
माझ्या सारखा गाईड कोणीही असत नाही. म्हणतात देखील - गॉड फादर इज लिबरेटर, गाईड,
ब्लिसफुल... सर्वांवर दया करतात कारण सागराची सर्व मुले काम-चितेवर बसून जळून खाक
झाली आहेत. त्यातूनही खास भारताची गोष्ट आहे. बाबा म्हणतात - तुम्ही १६ कला संपूर्ण,
संपूर्ण निर्विकारी होता. आता काम चितेवर बसून तुम्ही काय बनला आहात! आता पुन्हा
बाबा आले आहेत. वृक्षपती बाबा येऊन मनुष्य मात्रांवर बृहस्पतीची दशा बसवतात. खास
भारतावर आणि बाकी साऱ्या विश्वावर यावेळी राहूचे ग्रहण लागलेले आहे. बाबा म्हणतात -
मीच येऊन भारताची खास, दुनियेची सर्वसामान्य गती-सद्गती करतो. तुम्ही इथे आलाच आहात
पारस-बुद्धी बनण्यासाठी. सर्व आशिकांचे माशूक एकच मोस्ट बिलवेड बाबा आहेत. सर्व
देशांमध्ये लिंग जरूर बनवतात कारण सर्वांचे पिता आहेत ना. शिवाची मंदिरे भारतामध्ये
मोठ्या प्रमाणात आहेत, ज्याला शिवालय अर्थात राहण्याचे स्थान म्हटले जाते.
सतयुगामध्ये आहेत देवी-देवता धर्माचे मनुष्य, परंतु तो धर्म कधी होता, त्यांचे
राज्य कधी होते… हे काहीच माहीत नाही आहे. सतयुगाचा कालावधी खूपच प्रदीर्घ लिहिला
आहे. बाबा बसून समजावून सांगत आहेत - तुमच्यावर आता २१ जन्मांसाठी बृहस्पतीची दशा
बसत आहे. वृक्षपती आहेत ज्ञानाचा सागर, पतित-पावन, ज्यांना सर्वजण बोलावतात. ‘तुम
मात-पिता हम बालक तेरे’, सर्वजण त्यांची महिमा करतात. खरोखर सतयुग-त्रेतामध्ये
भरभरून सुख होते. जर का बाबा हेवनली गॉडफादर आहेत, स्वर्गाचे रचयिता आहेत तर जरूर
आपण देखील स्वर्गामध्ये असायला हवे. बाबा समजावून सांगत आहेत - तुम्ही सर्व
स्वर्गवासी होता, आता नरकवासी बनला आहात. भारताचाच आदि सनातन देवी-देवता धर्म आहे.
जसे ख्रिश्चन धर्माचे आहेत, ते ख्रिश्चन धर्माचेच म्हणून चालत आले आहेत. बाबा
म्हणतात - जर का तुम्ही देवी-देवता धर्माचे होता, तर मग तुम्ही देवी-देवता धर्माचे
असूनही आपल्या धर्माला विसरला का आहात!
बाबा आठवण करून देत
आहेत - तुमचा सर्वात श्रेष्ठ धर्म होता, श्रेष्ठ कर्म होते. आता तुम्ही नीच, पापी,
कंगाल बनले आहात; तुम्ही आहातच देवतांचे पुजारी, तर मग स्वतःला हिंदू का म्हणवून
घेता? भारताची ही काय अवस्था झाली आहे. जे देवता धर्माचे आहेत ते विकारी बनल्यामुळे
स्वतःला देवता म्हणत नाहीत. बाबा म्हणतात - आता या पतित दुनियेचा अंत आहे, महाभारत
लढाई देखील समोर उभी आहे. भगवानुवाच - मी तुम्हाला सतयुगासाठी राजयोग शिकवतो. भगवान
तर एकच आहेत, आपण त्यांची मुले शाळीग्राम आहोत. बाबा म्हणतात - तुम्ही जे पूज्य होता
तेच आता पुजारी भक्त बनले आहात. आता पुन्हा पूज्य देवता बनण्यासाठी ज्ञान घेत आहात.
मग द्वापर पासून पूज्य सो पुजारी बनाल. तुम्ही पूर्ण ८४ जन्म घेता. ज्यांनी ८४ जन्म
घेतले आहेत तेच येऊन ब्रह्माकुमार-कुमारी बनतील. ब्रह्मा द्वारे आदि सनातन धर्माची
स्थापना - हे देखील गायले गेले आहे. प्रजापिता आहेत तर मुले देखील भरपूर असतील. ती
तर जरूर इथेच पाहिजेत. किती प्रचंड प्रमाणात प्रजा आहे. या ब्राह्मणांनाच मग देवता
बनायचे आहे. बाबा येऊन शूद्रा पासून बदलून ब्राह्मण धर्माची स्थापना करतात. या
संगमयुगावरच आदि सनातन देवी-देवता धर्माची स्थापना होते. हे आहे कल्याणकारी संगमयुग.
या लढाईलाच कल्याणकारी म्हटले जाते. या विनाशानंतरच मग स्वर्गाचे गेट उघडते. तुम्ही
इथे आला आहात स्वर्गवासी बनण्याकरिता अथवा विष्णुपुरीमध्ये जाण्याकरिता. तुम्हा
मुलांवर आता अविनाशी बृहस्पतीची दशा आहे. १६ कला संपूर्ण म्हटले जाते. मग दोन कला
कमी होतात तेव्हा मग शुक्राची दशा म्हटले जाते. सतयुगामध्ये बृहस्पतीची दशा आहे,
त्रेतामध्ये मग शुक्राची दशा. मग खाली घसरत आला आहात (पतित होत आला आहात), मंगळाची,
शनीची, राहूची दशा देखील असते. जन्म-जन्मांतर उलट्या दशा फिरत आला आहात. आता
बाबांद्वारे बृहस्पतीची दशा बसली आहे. हे आहेत बेहदचे बाबा, ज्ञानाचा सागर,
पतित-पावन. तेच तुमचे पिता देखील आहेत, शिक्षक देखील आहेत, सद्गुरू देखील आहेत. बाकी
सर्व खोटे आहेत, कोणाचीही सद्गती करू शकत नाहीत. याला म्हटले जाते विशश वर्ल्ड (विकारी
दुनिया). ते आहे व्हाईसलेस वर्ल्ड (निर्विकारी दुनिया). आता विशश वर्ल्डमध्ये सर्व
जण खूप दुःखी आहेत. युद्ध, मारामारी काय-काय होत आहे, याला म्हटले जाते - खुने
नाहेक…(विनाकारण रक्तपात). काहीही चूक नसताना काय-काय करत राहतात. एकच बॉम्ब असा
काही टाकतील की एका झटक्यात सगळे खलास होतील. ही तीच संगमयुगाची वेळ आहे. तुम्हा
देवतांसाठी मग नवीन दुनिया पाहिजे. तर आता बाबा म्हणतात - ‘गोड-गोड मुलांनो,
मनमनाभव’. हे कोणत्या बाबांनी सांगितले? शिवबाबांनी. ते तर निराकार आहेत. तसेही
निराकार तर तुम्ही देखील आहात. परंतु तुम्ही पुनर्जन्मामध्ये येता, मी येत नाही.
यावेळी सर्व पतित आहेत, एकही पावन नाही. पतित बनायचेच आहे. सतो-रजो-तमोमध्ये खाली
उतरावे लागेल. यावेळी संपूर्ण झाड जडजडीभूत अवस्थेला प्राप्त झाले आहे. दुनिया
पूर्णपणे जुनी झाली आहे. आता पुन्हा तिला नवीन बनवावे लागेल. पतित दुनियेमध्ये बघा
किती मनुष्य आहेत. पावन दुनियेमध्ये फार थोडे राज्य करतात. एकच धर्म होता, दुसरा
कोणताही धर्म नव्हता. भारतालाच हेवन म्हटले जाते. गायले जाते - ‘घट ही में सूर्य,
घट ही में चन्द्रमा…’ सतयुगामध्ये ९ लाख असतील, नंतर मग वृद्धी होते. सुरुवातीला
फुलांचे झाड खूप छोटे असते, काट्यांचे किती मोठे जंगल आहे. दिल्लीमध्ये मुगल गार्डन
बघा किती सुंदर आहे. त्यापेक्षा मोठे कोणतेही गार्डन नाही. जंगल बघा किती मोठे असते.
सतयुगी गार्डन देखील खूप छोटे आहे. मग हळू-हळू वृद्धी होत-होत मोठे होत जाते. आता
तर काट्यांचे जंगल झाले आहे. रावण आल्याने काटे बनतात. हे आहे काट्यांचे जंगल.
आपसात भांडतात तर एकमेकांना मारूनच टाकतात. किती क्रोध आहे, वानरा पेक्षाही वाईट
म्हटले जाते. तर बाबा म्हणतात - ‘माझ्या लाडक्या मुलांनो, तुमच्यावर आता वृक्षपतीची
दशा आहे. आता दे दान तर सुटेल ग्रहण’. संपूर्ण निर्विकारी आता इथे बनायचे आहे. मग
हे शरीर सोडून जाऊन मग शिवालयामध्ये याल. शिवालयामध्ये खूप सुख असते. देवी-देवतांचे
राज्य आहे. सतयुगाला शिवालय म्हटले जाते, कलियुगाला म्हटले जाते - वेश्यालय. हे
वेश्यालय रावणाने स्थापन केले आहे. आता बाबा म्हणतात - पतिता पासून पावन बनायचे आहे,
कसे बनाल? काय त्रिवेणीमध्ये, गंगेमध्ये स्नान केल्याने पावन बनाल? हे तर
जन्म-जन्मांतर करत आला आहात. करोडो मनुष्य जाऊन स्नान करतात. पुष्कळ नद्या, नाले,
तलाव इत्यादी आहेत, जिथे पाणी दिसते तिथे जाऊन स्नान करतात कारण स्वतःला पतित
समजतात. आता पारसनाथ तुमची पारस-बुद्धी बनवत आहेत. तर अशा पारसनाथ बाबांची किती
प्रेमाने आठवण केली पाहिजे. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) या
काट्यांच्या दुनियेमधून फुलांच्या बगीच्यामध्ये जाण्याकरिता जे काही काटे (विकार)
आहेत, त्यांना काढून टाकायचे आहे. पारस बनविणाऱ्या बाबांची अतिशय प्रेमाने आठवण
करायची आहे.
२) या कल्याणकारी
संगमयुगावर शूद्रा पासून ब्राह्मण सो देवता बनण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. राहूचे
ग्रहण उतरण्यासाठी विकारांचे दान द्यायचे आहे.
वरदान:-
संगमयुगावर
प्रत्येक कर्म कलेच्या रूपामध्ये करणारे १६ कला संपन्न भव
संगमयुग विशेष कर्म
रूपी कला दाखविण्याचे युग आहे. ज्यांचे प्रत्येक कर्म कलेच्या रूपामध्ये असते
त्यांच्या प्रत्येक कर्माचे किंवा गुणांचे गायन होते. १६ कला संपन्न अर्थात
प्रत्येक व्यवहार संपूर्ण कलेच्या रूपामध्ये दिसून यावा - हीच संपूर्ण स्टेजची
निशाणी आहे. जसे साकारच्या (ब्रह्मा बाबांच्या) बोलण्यामध्ये, चालण्यामध्ये...
सर्वांमध्ये विशेषता पाहिली, तर ही कला झाली. उठण्या-बसण्याची कला, बघण्याची कला,
चालण्याची कला होती. सर्वांमध्ये न्यारेपणा आणि विशेषता होती. तर असे फॉलो फादर
करून १६ कला संपन्न बना.
बोधवाक्य:-
पॉवरफुल तो आहे
जो लगेच पारखून निर्णय करतो.
हे अव्यक्त इशारे -
ज्वालास्वरूप स्थितीमध्ये राहून शक्तिशाली आठवणीचा अनुभव करा.
तुम्हा मुलांचा योग
जेव्हा ज्वाला स्वरूप शक्तिशाली होईल तेव्हा पवित्रतेची अग्नी सेकंदामध्ये
विश्वातील कचऱ्याला भस्म करू शकेल. पवित्रतेची ही शक्ती महान शक्ती आहे. शेवटी,
जेव्हा तुम्ही संपूर्ण पवित्र बनाल तेव्हा तुमच्या श्रेष्ठ संकल्पाच्या दृढ
विश्वासाच्या अग्नीने हा सर्व कचरा भस्म होईल.