02-11-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, तुम्ही इथे आपले राज्य-भाग्य बनविण्याकरता आला आहात, जितके आठवणीमध्ये राहाल, अभ्यासावर लक्ष द्याल तितके श्रेष्ठ भाग्य बनत जाईल”

प्रश्न:-
संगमावर तुम्ही कोणत्या श्रीमताचे पालन करून २१ जन्मांकरिता आपले श्रेष्ठ भाग्य बनवता?

उत्तर:-
संगमावर बाबांचे श्रीमत आहे - गोड मुलांनो, निर्विकारी बना. देही-अभिमानी बनण्याचा पुरेपूर पुरुषार्थ करा. कधीही कोणते पाप-कर्म करू नका तेव्हा मग २१ जन्मांकरिता श्रेष्ठ भाग्य बनेल.

गीत:-
तकदीर जगाकर आई हूँ…

ओम शांती।
गोड-गोड आणि रुहानी मुलांनी हे गाणे ऐकले. आता या दोन ओळींचा अर्थ ज्यांना समजला आहे त्यांनी हात वर करा. हे कोणी म्हटले की, ‘तकदीर जगाकर आई हूँ? आत्म्याने. सर्वांची आत्मा म्हणते - ‘मी भाग्य घडवून आले आहे’; कोणते भाग्य? नवीन दुनियेमध्ये जाण्याचे भाग्य. नवीन दुनिया आहे - स्वर्ग. ही जुनी दुनिया आहे - नरक. तर हे सर्व आत्मे म्हणत आहेत. आत्म्याला तर शरीर जरूर पाहिजे तेव्हाच तर बोलेल. जीवाचे आत्मे म्हणतात - आम्ही स्कूलमध्ये आमचे भाग्य घडविण्यासाठी आलो आहोत. शिकवणारे कोण आहेत? शिवबाबा, ज्ञानाचा सागर. मनुष्याला - देवता अथवा पतिताला - पावन, नरक वासियांना - स्वर्गवासी बनविणारे केवळ ते एक बाबाच आहेत. या नरकाला आग लागणार आहे. दुनियेमध्ये असे कोणतेही स्कूल नाही जिथे मुले म्हणतील की, ‘आम्ही बेहदच्या बाबांकडे आलो आहोत’; किंवा असा देखील कोणी नाही जो म्हणेल की, ‘मी पिता देखील आहे, टीचर देखील आहे, गुरु देखील आहे’. हे ब्रह्मा देखील असे म्हणू शकत नाही. एक शिवबाबाच म्हणतात की मी सर्वांचा पिता, टीचर, गुरु आहे. तेच बसून शिकवत आहेत. तर आता मुलांना आपले भाग्य बनवायचे आहे. मुले म्हणतात - आम्ही नवीन दुनियेतील राज्याचे भाग्य घडविण्यासाठी आलो आहोत. आम्हाला ठाऊक आहे की ही जुनी दुनिया नष्ट होणार आहे. बाबा येऊन नवीन दुनिया स्थापन करतात. तुम्ही २१ जन्मांचे राज्य-भाग्य प्राप्त करण्यासाठी शिकत आहात. जणू तुम्ही राज्य-भाग्य घडविण्यासाठी आला आहात. इथे राजयोग शिकत आहात. ही गीता तर भले त्या नाटक बनविणाऱ्यांनी बनवली आहे; परंतु याचा मग अर्थ समजावून सांगितला जातो. जसे बाबा, सर्व वेदांचे, शास्त्रांचे सार बसून समजावून सांगतात. यावेळी साऱ्या दुनियेमध्ये आहे - भक्ती. सतयुगामध्ये भक्ती, मंदिर इत्यादी काहीही नसते. तुम्ही अर्धाकल्प भक्ती केली आहे, आता तर भगवान भेटले आहेत. सर्वात पहिले भारतामध्ये या देवी-देवतांचे राज्य होते, आणि मग ८४ जन्म घेता-घेता भाग्य बिघडले आहे. आता पुन्हा भाग्य घडवत आहात. बाबा आलेच आहेत भाग्य घडविण्याकरिता. मुलांना म्हणतात - ‘माझी आठवण करा. तुम्ही खूपच पाप-आत्मा बनला आहात’. सर्वात पहिली भक्ती शिवबाबांची केली जाते, ती आहे अव्यभिचारी भक्ती. नंतर मग भक्ती देखील व्यभिचारी बनते. तर मुलांना सर्वप्रथम हा पक्का विश्वास झाला पाहिजे की ज्यांना भगवान म्हटले जाते ते आम्हाला शिकवत आहेत. त्यांना स्वतःचे असे कोणते शरीर नाहीये, ते या शरीरामध्ये (ब्रह्मा तनामध्ये) बसून बोलतात. जशी तुमची आत्मा या शरीरामध्ये आल्यामुळे बोलू लागते. कधी-कधी तर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो आणि जेव्हा स्मशानामध्ये घेऊन जातात तेव्हा अर्ध्या वाटेत चुळबुळ करू लागतात. अशी आत्मा निघून गेली आणि मग आली का? नाही. आत्मा अतिसूक्ष्म आहे ना, तर मग कुठे लपून राहिली. तर म्हणतील अनकॉन्शिअस झाली, कोणाला कळलेच नाही. असे कधी-कधी होते. चितेवरून देखील उठून बसतात, मग त्यांना उचलून बाहेर काढतात. तर हे काय झाले? आत्मा कुठे लपली आणि मग पुन्हा आपल्या जागी आली. आत्मा नसेल तर शरीर एकदम मुडद्याप्रमाणे होते. तर आत्म्यांचा देश आहे परमधाम. तुम्ही जाणता आपण तिथे त्या घरचे रहिवासी होतो. सर्वात पहिले आपण आत्मे त्या घरामधून सतयुगामध्ये आलो. भारतवासी जे देवी-देवता होते, तेच आले असतील. वास्तविक जे-जे धर्म स्थापन केले जातात ते शेवटपर्यंत कायम राहतात. बुद्धाचा धर्म अजूनही कायम आहे, क्राईस्टचा धर्म अजूनही कायम आहे. फक्त देवी-देवता धर्माचे जे राज्य करत होते त्यांचे नावच गायब झाले आहे. असा कोणीही नाही जो स्वतःला देवी-देवता धर्माचा म्हणत असेल.

बाबा समजावून सांगत आहेत की, भारतवासी आपल्या धर्माला विसरले आहेत, आपला गृहस्थ धर्म पवित्र होता. संपूर्ण निर्विकारी, महाराजा-महाराणीचे राज्य होते. त्यांना म्हटले जाते भगवती लक्ष्मी आणि भगवान नारायण. वास्तविक भगवान एक आहेत, त्यांनाच ज्ञान-सागर म्हटले जाते. या लक्ष्मी-नारायणामध्ये तर कोणतेही ज्ञान नाही आहे. ज्ञानाचा सागर तर एक शिवबाबाच आहेत. ते बसून तुम्हा मुलांना ज्ञान देत आहेत. तुम्ही आता शिकत आहात, नंतर मग तिथे हे शिक्षण तुम्ही विसरून जाल. आता तुम्ही प्रत्येक जण समजता की, आपल्या आत्म्यामध्ये ८४ जन्मांचे रेकॉर्ड भरलेले आहे. आत्मा आता नॉलेज घेत आहे, आणि नंतर मग सतयुगामध्ये जाऊन आपले राज्य-भाग्य घेईल. तुम्ही म्हणाल आम्ही ८४ चे चक्र फिरलो आहोत. आता बाबांकडून आम्ही स्वर्गाची बादशाही घेत आहोत. प्रत्येकजण त्या आजोबांकडून वारसा घेतात, परंतु आपापल्या पुरुषार्थानुसार. यामध्ये कोणीही आपल्या कमाईचा हिस्सा इतर कुणाला वाटू शकत नाही. अज्ञान काळामध्ये वाटला जातो ना. बेहदचे बाबा म्हणतात - मी वैकुंठ स्थापन करतो, त्यामध्ये उच्चपद प्राप्त करणे, ते तर तुमच्या पुरुषार्थावर अवलंबून आहे. जितकी बाबांची आठवण कराल तितकी तुमची विकर्म विनाश होतील. पवित्र बनाल. सोन्याला जेव्हा भट्टीमध्ये टाकतात, तेव्हा त्यातून अशुद्धता निघून जाते आणि खऱ्या सोन्याची लडी तयार होते. ही आत्मा देखील खरे सोने होती, तिथे पार्ट बजावण्यासाठी येते. सर्वात पहिले आहे गोल्डन एज्ड आणि मग पहिली चांदीची अशुद्धता पडली. आत्मा थोडीशी इमप्योर (अशुद्ध) बनते, त्यानंतर मग हळूहळू थोडी-थोडी पवित्रता कमी होत जाते. घर देखील सुरुवातीला नवीन आणि मग हळूहळू जुने होत जाते. १०० वर्षानंतर जुने म्हटले जाईल. तशी दुनिया देखील नवीन आणि जुनी असते ना. आजपासून ५ हजार वर्षांपूर्वी नवीन होती, या देवी-देवतांचे जे राज्य होते, ते कुठे गेले? ८४ जन्म उपभोगता-उपभोगता जुने झाले. आता आत्मा देखील खराब (पतित) झाली आहे, तर शरीर देखील खराब (पतित) झाले आहे. गोऱ्या पासून सावळे बनले आहेत. श्रीकृष्णाला देखील गोरा आणि सावळा दाखवतात ना. पाय नरकाकडे आणि तोंड स्वर्गाकडे दाखवायचे आहे. तुम्ही देखील त्या कुळाचे आहात. तुमचे देखील पाय नरकाकडे आणि तोंड स्वर्गाकडे आहे. आता तुम्ही पहिले निर्वाणधाम मध्ये जाऊन नंतर मग स्वर्गामध्ये याल. कलियुगाला आग लागेल. मुसळधार पाऊस, आग, भूकंप इत्यादी होतील. पतित आत्मे सर्व हिशोब चुकता करून घरी निघून जातील. शेवटी थोडेसे वाचतील. पवित्र आत्मे येत जातील. आता तर सर्व आहेत काटे. काम-कटारी चालविणे, हे आहे काटा टोचणे. इथे तर बाबा म्हणतात की, संपूर्ण निर्विकारी बनायचे आहे. बाबा म्हणतात - माझी आठवण करा तर मी तुम्हाला स्वर्गाचा वारसा देईन, तुम्ही पवित्र बनाल. तुम्ही जेव्हा पावन होता तेव्हा गृहस्थ व्यवहार देखील पवित्र होता. आता तुम्ही पतित बनला आहात तर गृहस्थ व्यवहार देखील अपवित्र, विकारी आहे. सतयुगामध्ये व्यवहार-धंदा देखील सचोटीने चालतो. तिथे खोटे इत्यादी बोलण्याची गरजच राहत नाही, खोटे तेव्हा बोलले जाते जेव्हा जास्त पैसा कमावण्याचा मोह होतो. तिथे तर अथाह धन मिळते. धनधान्य इत्यादीची कोणतीही किंमत नसते. तिथे कोणीही गरीब असतच नाही, जे चांगला पुरुषार्थ करतील ते महाराजा बनतील. हिरे-माणकांचे महाल मिळतील. पुरुषार्थ पूर्णपणे केला नाहीत तर प्रजेमध्ये निघून जाल. राजा-राणी आणि मग प्रिन्स-प्रिन्सेस संपूर्ण घराणे असते ना. मग प्रजेमध्ये देखील नंबरवार श्रीमंत आणि गरीब प्रजा असते. तिथे तर सर्व पवित्र असतील. राजा-राणी, वजीर देखील एकच. तिथे काही फारसे वजीर असत नाहीत. राजामध्ये राज्य चालवण्याची ती ताकद असते. तर बाबा जसे समजावून सांगतात तसे मुलांनी देखील हे ज्ञान समजावून सांगितले पाहिजे. आपण भारतवासी देवी-देवता होतो. सतयुगामध्ये आमचे राज्य होते. गृहस्थ व्यवहारामध्ये आपण पवित्र होतो, स्वर्गवासी होतो आणि नंतर मग पतित बनता-बनता नरकवासी बनलो आहोत. आता पुन्हा स्वर्गवासी बनत आहोत. हा खेळ बनलेला आहे. एका जन्मामध्ये स्वर्गवासी बनाल आणि मग नरकवासी बनण्यामध्ये ८४ जन्म घ्यावे लागतील. शिडीच्या चित्रामध्ये अगदी स्पष्ट करून दाखवले आहे. आता बुद्धीमध्ये आले आहे की आपण जाऊन स्वर्गामध्ये राज्य करणार. आता बाबांकडून वारसा घेत आहोत. बाबाच सत्य काय ते सांगून नरापासून नारायण बनवतात. ते लोक जे सत्यनारायणाची कथा ऐकवतात ते काही नरापासून नारायण बनत नाहीत. तर ती कथा खोटी झाली ना. इथे तुम्ही बसलेच आहात नरापासून नारायण बनण्याकरिता, ते असे थोडेच म्हणतात की पवित्र बना, मामेकम् (मज एकाची) आठवण करा. सत्यनारायणाची कथा पौर्णिमेच्या दिवशी ऐकवतात. आता यावेळी १६ कला असलेल्या चंद्राला ‘पौर्णिमा’ म्हटले जाते. जेव्हा शेवट चंद्राची कोर शिल्लक राहते, जिला ‘अमावास्या’ म्हटले जाते.

अमावस्या अर्थात अंधारी रात्र. सतयुग-त्रेताला दिवस आणि द्वापर-कलियुगाला रात्र म्हटले जाते. हे सर्व पॉईंट्स नीट समजून घ्यायचे आहेत. हे शिवबाबा बसून शिकवत आहेत. ते पिता देखील आहेत, टीचर देखील आहेत आणि गुरु देखील आहेत. यांच्यामध्ये (ब्रह्मा बाबांमध्ये) प्रवेश करून आत्म्यांना शिकवतात.

बाबा म्हणतात - जशी यांची आत्मा भृकुटीच्या मध्यभागी बसली आहे, मी देखील येऊन इथे बसतो. तुम्हाला बसून शिकवतो. अगोदर तुम्ही पावन होतात, नंतर मग पतित बनला आहात. आता मज पित्याची आठवण करा, पवित्र बनल्याशिवाय घरी परत जाऊ शकत नाही. पवित्र बनाल तेव्हाच उडू शकाल. आता बोलावतात देखील - ‘हे पतित-पावन या, पावन बनवा, तेव्हाच आम्ही उडू शकू. आपल्या घरी मुक्तिधाम मध्ये जाऊ’. ते आहे आम्हा आत्म्यांचे घर. पतित कधीही घरी जाऊ शकत नाहीत. हे चांगल्या रीतीने या अभ्यासाला धारण करतील ते लवकर स्वर्गामध्ये येतील, नाहीतर उशिराने येतील. नवीन घरामध्ये आले पाहिजे ना. नवीन घरामध्येच मजा आहे. सर्वात पहिले तर सतयुगामध्ये आले पाहिजे. मम्मा, बाबा सतयुगामध्ये जातात, मग आपण उशिराने का जावे! तुम्ही देखील ब्रह्मा बाबांना फॉलो करा. बाबांची आठवण करत राहा. कोणत्याही गोष्टीमध्ये काही अडचण असेल तर शिवबाबांना विचारा. श्रीमताद्वारेच श्रेष्ठ बनाल. जुन्या दुनियेमध्ये तर ५ विकार रुपी रावणाच्या मतावर चालत आले आहात. सर्वात पहिला आहे - देह-अभिमान. आता तुम्हा मुलांना देही-अभिमानी बनायचे आहे. मी आत्मा परमधामची राहणारी आहे, त्याला शांतीधाम म्हटले जाते. अशा प्रकारच्या गोष्टी दुसरा कोणीही समजावून सांगू शकणार नाही. बाबाच समजावून सांगतात - तुमची आत्मा या कर्मेंद्रियांद्वारे ऐकत आहे, सतयुगामध्ये शरीर कधीही आजारी पडत नाही. इथे तर बसल्या-बसल्या अकाली मृत्यू होतो. सतयुगामध्ये अशी कोणतीही गोष्ट असत नाही, त्याला म्हटलेच जाते हेवन, स्वर्ग, पॅराडाईज. मग आपण चक्र फिरून पुनर्जन्म घेत-घेत ८४ चा फेरा पूर्ण केला आहे, आणि आता मग बाबा येऊन मुलांना स्वर्गाच्या लायक बनवत आहेत. आता तुम्ही नवीन दुनियेच्या लायक बनला आहात. आता तर नरक आहे. आता तुम्ही आला आहात नरकवासी पासून स्वर्गवासी बनण्याचे भाग्य घडविण्यासाठी. म्हणतात - आम्ही आमचे भाग्य घडविण्यासाठी शिवबाबांकडे आलो आहोत. कल्प-कल्प दर ५ हजार वर्षानंतर आम्ही आमचे भाग्य घडवतो. आम्ही स्वर्गवासी बनतो आणि नंतर मग रावण राज्य सुरू झाल्यावर आम्ही विकारी बनतो. आता सर्व जण विकारी, पतित आहेत. तेव्हाच तर बाबा येऊन नवीन दुनिया स्थापन करतात. नवीन दुनियेमध्ये फक्त तुम्ही मुलेच असाल. बाकी सर्व शांतीधाममध्ये निघून जातील. आत्म्यांचे झाड वरती आहे, मग ते आपल्या-आपल्या वेळेवर येतील. जेव्हा राज्य असेल तेव्हा तिथे इतर धर्माचे असणार नाहीत. मग द्वापरमध्ये रावण राज्य सुरू होईल. या सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे धारण करायच्या आहेत. इथे नरकवासी पासून स्वर्गवासी बनायचे आहे. नरकवासी मनुष्याला - असुर आणि स्वर्गवासी मनुष्याला - देवता म्हटले जाते. आता सर्व जण आसुरी स्वभावाचे आहेत. आता बाबा बसून पुरुषार्थ करवून घेत आहेत. बाबा म्हणतात - पवित्र बना. प्रत्येक गोष्टीमध्ये विचारत राहा. कोणी विचारतात की ‘बाबा, धंद्यामध्ये खोटे बोलावे लागते, खोटे बोलल्याने थोडे पाप तर चढेल ना’. ते मग बाबांची आठवण करत राहाल तर ते पाप नष्ट होईल. आजकालच्या दुनियेमध्ये सर्वजण पापच करत राहतात. किती रिश्वत (लाच) खात असतात. ही प्रदर्शनीची चित्रे एक प्रकारे नकाशे आहेत, असे नकाशे कुठेही असत नाहीत. जर कोणी पाहून कॉपी करून जरी बनवले, तरीही ते त्याचा अर्थ मात्र अजिबात समजू शकणार नाहीत. प्रदर्शनी, मेळावे या ठिकाणी तर पुष्कळ लोक येतात. तर त्यांना सांगितले जाते - ७ दिवस हे ज्ञान समजून घेण्यासाठी या, म्हणजे मग तुम्ही स्वर्गवासी बनण्या लायक बनाल. आता नरकवासी आहात शिडीच्या चित्रामध्ये पहा किती स्पष्ट दाखवले आहे. ही आहे पतित दुनिया, पावन दुनिया वरच्या बाजूला उभी आहे.

आता तुम्ही मुले शिव बाबांना प्रॉमिस करता की बाबा, आम्ही नरकवासीपासून स्वर्गवासी जरूर बनणार. आता तुम्ही शिवालयमध्ये जाण्याकरिता तयारी करत आहात, त्यामुळे कधीही विकारामध्ये जायचे नाही. मायेची वादळे तर खूप येतील परंतु कधीही विवस्त्र (पतित) व्हायचे नाही. पतित झाल्याने खूप मोठी चूक होईल आणि मग धर्मराजाची खूप कडक शिक्षा भोगावी लागेल. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) मनुष्यापासून देवता बनण्याकरिता जो पण आसुरी स्वभाव आहे, खोटे बोलण्याची सवय आहे, त्या सर्वांचा त्याग करायचा आहे. दैवी स्वभाव धारण करायचा आहे.

२) घरी जाण्याकरिता पवित्र जरूर बनायचे आहे. मायेची वादळे आली तरीही कर्मेंद्रियांद्वारे कधीही कोणतेही विकर्म करायचे नाही.

वरदान:-
अधिकारीपणाच्या स्थिती द्वारे बाबांना आपला साथीदार बनविणारे सदा विजयी भव

बाबांना साथीदार बनविण्याची सोपी पद्धत आहे - अधिकारीपणाची स्थिती. जेव्हा अधिकारीपणाच्या स्थितीमध्ये स्थित राहता तेव्हा व्यर्थ संकल्प अथवा अशुद्ध संकल्पांच्या गोंधळामध्ये अथवा इतर अनेक प्रकारच्या मोहामध्ये अडकून बुद्धी विचलित होणार नाही. बुद्धीच्या एकाग्रतेद्वारे सामना करणे, पारखणे आणि निर्णय घेणे या शक्ती विकसित होतात; ज्या मायेच्या अनेक प्रकारच्या आक्रमणापासून सहजच विजयी बनवतात.

बोधवाक्य:-
राजयोगी तो आहे जो सेकंदामध्ये सारामधून विस्तारामध्ये आणि विस्तारामधून सारामध्ये जाण्याचा अभ्यास करतो.

हे अव्यक्त इशारे - ब्रह्मा बाबांप्रमाणे संपन्न आणि संपूर्ण स्थितीचा अनुभव करा.

ब्रह्माबाबांनी संपूर्ण बनण्याकरिता अगदी सुरुवातीपासून शेवटच्या दिवसापर्यंत आपले सर्व खजिने सफल केले; याचे प्रत्यक्ष प्रमाण पाहिले की ते संपूर्ण फरिश्ता बनले. तर हे लक्ष्य ठेवा की, मला पित्या समान संपन्न आणि संपूर्ण बनायचेच आहे. भले मग कितीही पुरुषार्थ करावा लागला, परंतु हे निश्चित आहे की पित्या समान बनायचेच आहे.