03-06-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड मुलांनो -
बाबांचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर सेवाभावी सपूत मुले बनून सर्वांना सुख द्या,
कोणालाही दुःख देऊ नका”
प्रश्न:-
धर्मराजाच्या
सजेपासून सुटण्याकरिता कोणत्या ईश्वरीय नियमांवर लक्ष द्यायचे आहे?
उत्तर:-
कधीही
ईश्वरासमोर केलेल्या प्रतिज्ञेची अवज्ञा करायची नाही. कोणालाही दुःख द्यायचे नाही.
क्रोध करणे, त्रास देणे अर्थात ईश्वराचे नाव बदनाम होईल असे वर्तन करणे… तर त्यांना
खूप सजा भोगावी लागते, त्यामुळे असे कोणतेही कर्म करायचे नाही. मायेची कितीही वादळे
येवोत. आजार उफाळून येईल परंतु योग्य काय, अयोग्य काय याचा बुद्धीने निर्णय घेऊन
चुकीचे कृत्य करण्यापासून नेहमी दूर राहायचे आहे.
गीत:-
कौन आया मेरे
मन के द्वारे…
ओम शांती।
हे कोणी म्हटले
- ओम् शांती. बाबा आणि दादा. हा तर मुलांना जरूर निश्चय असेल की आमचे पारलौकिक पिता
तर ‘परमपिता परमात्मा शिव’ आहेत आणि हे (ब्रह्मा) सर्व मुलांचे अलौकिक पिता आहेत,
यांनाच प्रजापिता ब्रह्मा म्हटले जाते. इतकी सारी मुले प्रजापिता ब्रह्मा शिवाय
अजून कोणाला असतात का? अगोदर नव्हती, परंतु जेव्हा पासून बेहदच्या बाबांनी
यांच्यामध्ये प्रवेश केला आहे तर हे झाले आहेत - दादा. हे दादा स्वतः म्हणतात की,
तुम्हाला पारलौकिक पित्याची प्रॉपर्टी मिळते. नातवंडे नेहमी आजोबांचे वारसदार असतात.
त्यांचा बुद्धियोग आजोबांकडे जातो कारण त्यांना आजोबांच्या प्रॉपर्टीमध्ये हक्क
मिळतो. जसे राजांच्या पोटी जी मुले जन्म घेत राहतील, ती तर असेच म्हणतील की,
वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे. वडिलोपार्जित प्रॉपर्टीवर त्यांचा निश्चितच हक्क असतो.
तुम्ही मुले जाणता की आपण बेहदच्या बाबांकडून मोठ्यात मोठी प्रॉपर्टी - स्वर्गाची
बादशाही घेत आहोत. आपल्याला ते पिता शिकवत आहेत. तुम्ही आता सन्मुख बसले आहात.
सन्मुख असण्याचा नशा देखील नंबरवार पुरुषार्थानुसार असतो. काहींच्या हृदयामध्ये तर
खूप प्रेम असते. आपण येऊन या साकार माता-पित्या द्वारे उच्च ते उच्च भगवंताचे
वारसदार बनतो. बेहदचे पिता खूप गोड आहेत, जे आम्हाला राजाईच्या लायक बनवत आहेत.
मायेने पूर्णपणे ना-लायक बनवले आहे. काल बाबांकडे कोणीतरी भेटण्यासाठी आले होते,
परंतु त्यांना थोडेच काही समजत होते. बाबांनी त्यांना समजावून सांगितले की, हे सर्व
ब्रह्माकुमार आहेत. तुम्ही देखील ब्रह्माची आणि शिव परमात्म्याची मुले आहात ना. तर
म्हणाले - ‘आहोत तर खरे’. हे फक्त ऐकून बोलले, परंतु त्यांच्या मनात भरले नाही.
तीरच लागला नाही (काळजाला भिडलेच नाही) की खरोखरच आपण त्यांची संतान आहोत. ही देखील
त्यांची मुले आहेत, वारसा घेत आहेत. तसेच आपल्या कडे देखील अशी काही मुले आहेत
ज्यांच्या बुद्धीमध्ये फार थोडे जाते. तो आनंद, तो आत्मिक नशा दिसून येत नाही.
अंतर्मनामध्ये आनंदाचा पारा खूप चढला पाहिजे. तो सारा चेहऱ्यावर देखील दिसून येतो.
आता तुम्हा सजणींचा ज्ञान शृंगार केला जात आहे. तुम्ही जाणता, आपण साजनच्या सजणी
आहोत. एका शेतकऱ्याच्या मुलीची कथा आहे ना. एक राजा, शेतकऱ्याच्या मुलीला घेऊन आला
परंतु तरीही तिला राजाईमध्ये मजा आली नाही, तर मुलीला परत गावामध्ये सोडून आला.
म्हणाला - ‘तू राजाईच्या लायक नाहीस’. इथे देखील बाबा शृंगार करतात की तू
भविष्यामध्ये महाराणी बन. श्रीकृष्णासाठी देखील म्हणतात की, पट्टराणी बनविण्याकरिता
पळवून नेले परंतु अर्थ काहीच समजत नाहीत. सर्व आहेत - इरिलिजस माइंडेड (अधार्मिक
वृत्तीचे). समजतात, अशीच दुनिया चालत राहते. निसर्ग आहे. असे पुष्कळ आहेत जे
मंदिरे-धार्मिक स्थळे अशा ठिकाणी जात सुद्धा नाहीत. ना शास्त्रे इत्यादीला मानतात.
गव्हर्नमेंट देखील धर्माला मानणारे नाही आहे. भारत कोणत्या धर्माचा होता, आता
कोणत्या धर्माचा आहे, अजिबात जाणत नाहीत. आता तुम्ही मुले आहात दैवी कुळाचे. जसे ते
ख्रिश्चन कुळाचे आहेत, तसे तुम्ही ब्राह्मण कुळाचे आहात. बाबा म्हणतात - सर्वप्रथम
तुम्हा मुलांना पतित शुद्रा पासून ब्राह्मण बनवतो. पावन बनता-बनता मग २१ जन्मांकरिता
तुम्ही दैवी संप्रदायाचे बनाल. दैवी गोद मध्ये जाल. अगोदर तुम्ही आसुरी गोदमध्ये
होता. आसुरी गोद मधून आता तुम्ही ईश्वरीय गोद मध्ये आले आहात. एका पित्याची मुले
बहिण-भाऊ आहात. हे एक आश्चर्य आहे. सर्वजण म्हणतील - आम्ही ब्राह्मण कुळाचे आहोत.
आम्हाला तर श्रीमतावर चालायचे आहे, सर्वांना सुख द्यायचे आहे, मार्ग दाखवायचा आहे.
दुनियेमध्ये असा कोणीही नाही जो आपल्या तोंडाने सांगू शकेल की, बेहदच्या बाबांकडून
बेहदचा वारसा कसा घेतला जातो. तुम्हाला बेहदचे बाबा मिळाले आहेत. तुम्हीच त्यांची
संतान बनला आहात. बुद्धीने जाणता कल्पापूर्वी ज्यांनी बाबांकडून वारसा घेतला असेल,
तेच येऊन घेतील. थोडे जरी बुद्धीमध्ये असेल तर कधी ना कधी इथे येऊन पोहचतील. आले तर
काही ना काही घेण्याकरिताच येतील.
तुमच्यामध्ये देखील
नंबरवार जाणतात. आज पावन बनण्यासाठी आले आहेत आणि उद्या मग पतित बनतात. कोणाची वाईट
संगत लागल्याने मग विसरून जातात आणि बाबांचे बनून मग बाबांना सोडले तर खूप पाप-आत्मा
बनतात. जसे कोणी कोणाचा खून करतात तर पाप लागते. ते पाप देखील कमीच आहे. इथे जे
बाबांचे बनून मग बाबांना सोडचिठ्ठी देतात, प्रतिज्ञा करून मग विकारी बनतात तर खूप
पाप लागते. अज्ञान काळामध्ये इतके पाप लागत नाही जितके ज्ञानामध्ये लागते. अज्ञान
काळामध्ये माणसामध्ये क्रोध तर सामान्य गोष्ट आहे. इथे जर तुम्ही कोणावर क्रोध केला
तर शंभर पटीने दंड होतो. अवस्था पूर्णपणे ढासळते कारण ईश्वराचा आदेश मानत नाही.
धर्मराजाचा आदेश मिळतो - ‘पवित्र बनायचे आहे’. तुम्ही ईश्वराचे बनून थोडे जरी
त्यांच्या आज्ञेचे उल्लंघन केले तरी शंभर पटीने दंड होतो. क्रियेटर तर ते एकच आहेत.
ब्रह्मा-विष्णु-शंकर हे देखील त्यांची रचना आहेत. धर्मराज देखील क्रियेशन (रचना) आहे.
धर्मराजाच्या रूपाचा देखील बाबा साक्षात्कार घडवतात. आणि मग त्यावेळी सिद्ध करून
सांगतात - बघ तू प्रतिज्ञा केली होतीस, मी कधीही क्रोध करणार नाही, कोणाला दुःख
देणार नाही, तरीही तू यांना दुःख दिलेस, त्रास दिलास. आता भोग सजा. साक्षात्कार
केल्याशिवाय सजा देत नाहीत. पुरावा तर पाहिजे ना. ते देखील समजतात - खरोखर, मी
बाबांना सोडून हे कुकर्म केले आहे. बदनामी केल्याने मग अनेकांवर संकट येते. किती
अबला बंधनामध्ये येतात. सगळा दंड बदनामी करणाऱ्यावर पडतो; म्हणून बाबा म्हणतात -
मोठ्यात मोठा पाप-आत्मा बघायचा असेल तर इथे बघा. धोब्याकडे जेव्हा खूप मळलेले,
सडलेले कपडे असतात तर फटका मारल्याने लगेच फाटतात. तर इथे देखील सटका (फटका) सहन न
झाल्याने निघून जातात. ईश्वराच्या गोद मध्ये येऊन डायरेक्ट त्यांची अवज्ञा केली (आज्ञेचे
उल्लंघन केले) तर सजा भोगावी लागेल. जी मुख्य ब्राह्मणी पार्टी घेऊन येते, तिच्यावर
खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी (जबाबदारी) आहे. एकाने जरी हात सोडला, विकारी बनला तर
त्याचे पाप, घेऊन येणाऱ्यावर येईल. असेच कोणालाही इंद्रसभेमध्ये घेऊन येता कामा नये.
नीलम परी, पुखराज परीची कथा देखील आहे ना. इंद्र सभेमध्ये कोणाला लपवून घेऊन आली तर
इंद्रसभेमध्ये वास येऊ लागला. तर घेऊन येणारीवर दंड पडला. अशी काहीतरी कथा आहे की,
ती शिळा बनली. बाबा पारसनाथ बनवतात आणि जर अवज्ञा केली तर शिळा बनतात. राजाई
प्राप्त करण्याचे सौभाग्य गमावून बसतात. समजा, एखादा गरीब राजाचा दत्तक पुत्र बनला.
मग जर का तो नालायक बनला आणि राजाने हाकलून दिले तर त्याचे काय होईल. मग गरीब तो
गरीबच बनून राहील. इथे देखील असेच आहे. मग खूप दुःख अनुभव होईल; म्हणून बाबा
म्हणतात - कधीही कोणतीच अवज्ञा करायची नाही. बाबा आहेत साधारण त्यामुळे शिवबाबांना
विसरून साकारमध्ये बुद्धी येते. आता तुम्हा मुलांना श्रीमत मिळत आहे. जे घाणेरडे (पतित)
बनले आहेत, ते मग इंद्रसभेमध्ये बसू शकत नाहीत. प्रत्येक सेंटर इंद्रप्रस्थ आहे,
जिथे ज्ञानाची वर्षा होत आहे. नीलम परी, पुखराज परी नावे तर आहेत ना. नीलम, रत्नाला
म्हटले जाते. ही मुलांची नावे ठेवली जातात. कोणी तर खूप चांगले जणू रत्न आहेत,
काहीच फ्लो (डाग) नाही आहे. रत्नांमध्ये काही-काही खूप डागाळलेले (सदोष) असतात. काही
एकदम प्युअर असतात. इथे देखील नंबरवार रत्ने आहेत. काही-काही रत्ने खूप मौल्यवान
आहेत. खूप चांगली सेवा करतात. कोणी तर मग सेवा करण्या ऐवजी डिससर्विस (ईश्वरीय
सेवेच्या विरुद्ध कृत्ये) करतात. गुलाबाची फुले आणि रुईच्या फुलांमध्ये देखील किती
फरक आहे. शिवावर दोन्ही वाहतात. आता तुम्ही ओळखले आहे की, आपल्यामध्ये फूल कोण-कोण
आहेत. त्यांचीच सर्वजण मागणी करतात की बाबा आम्हाला चांगली-चांगली फुले द्या. आता
चांगली-चांगली फुले कुठून आणावी. रत्न-ज्योत फुले तर सर्वसामान्य आहेत. हा बगीचा आहे
ना. तुम्ही ज्ञान गंगा देखील आहात. बाबा तर सागर आहेत ना. हे (ब्रह्मा) आहेत
ब्रह्मपुत्रा, सर्वात मोठी नदी. कलकत्त्यामध्ये ब्रह्मपुत्रा नदी खूप मोठी आहे. जिथे
सागर आणि नदीचा खूप मोठा मेळा भरतो. बरोबर, बाबा ज्ञान सागर आहेत. हे (ब्रह्मा)
चैतन्य ज्ञान सागर आहेत. तुम्ही देखील चैतन्य ज्ञान नद्या आहात. त्या तर आहेत
पाण्याच्या गंगा. खरेतर नद्यांना तुमचीच नावे दिली गेली आहेत परंतु आसुरी
संप्रदायवाले हे देखील विसरले आहेत. हरिद्वारला गंगेच्या काठावर चतुर्भुजचे चित्र
दाखविले आहे. त्यांना देखील ते गंगा म्हणतात; परंतु मनुष्य हेच समजत नाहीत की हे
चतुर्भुज कोण आहेत. बरोबर, यावेळी तुम्ही स्वदर्शन चक्रधारी बनता. तुम्ही आहात खऱ्या
ज्ञानाच्या नद्या. ती आहे पाण्याची. तिथे जाऊन स्नान करतात. समजत काहीच नाही. फक्त
एवढे समजतात की गंगा देवी आहे. मनुष्याला तर कधी ४-८ भुजा असत नाहीत. काहीच अर्थ
समजत नाहीत. तुम्ही मुले जाणता - बाबा आपल्याला काय बनवत आहेत. आपण तर १०० टक्के
निर्बुद्ध होतो. बाबांची गोद घेतल्याने आम्ही स्वर्गाचे मालक बनतो. भले इथे कोणी
राजा असेल परंतु स्वर्गाचे सुख आणि आताचे सुख यामध्ये रात्रं-दिवसाचा फरक आहे.
तुमच्यामध्ये कोणी असे देखील आहेत जे बाबांना जाणत नाहीत आणि स्वतःला देखील जाणत
नाहीत. बघितले पाहिजे की, मी किती सुगंध देतो? उलट-सुलट तर बोलत नाही ना? क्रोध तर
करत नाही ना? बाबा लगेच वागणुकीवरून समजतात की हा मुलगा कसा असेल. सेवाभावी मुले
बाबांना खूप प्रिय वाटतात. सगळेच काही एक सारखे प्रिय वाटू शकत नाहीत. अशा मुलांसाठी
आतून आपोआप आशीर्वाद निघतात. बाबांचा नाफरमानबरदार (आज्ञेचे उल्लंघन करणारा) मुलगा
असेल तर बाबा म्हणतील असा मुलगा मेलेला बरा. किती नाव बदनाम करतात, याला म्हटले जाते
भाग्य. कोणाच्या भाग्यात काय आहे, लगेच माहीत होते.
बाबा समजावून सांगत
आहेत - हा सपुत मुलगा आहे, मग तो कपूत आहे. बापदादांना ओळखले नाही, वारसा घेणे
नशिबातच नसेल तर काय करणार. या ज्ञान मार्गामध्ये कायदे खूप कडक आहेत. वडील पवित्र
बनतील आणि मुलगा बनणार नसेल तर तो मुलगा हक्कदार होऊ शकत नाही. त्याला मुलगा समजणार
नाहीत. मग म्हणतील - आम्ही तर शिवबाबांना वारसदार बनवणार, म्हणजे मग बाबा आम्हाला
२१ जन्मांकरिता रिटर्नमधे देतील. याचा अर्थ असा नाही की बाबांकडेच येऊन बसायचे आहे.
नाही, गृहस्थ व्यवहारामध्ये राहून सर्वांना सांभाळायचे देखील आहे, परंतु ट्रस्टी
होऊन राहायचे आहे. असे नाही की तुमची मुले इत्यादींना बाबा बसून सांभाळतील. नाही,
असे विचार करणारे भटकतात. इथे बाबांकडे तर खूप पवित्र पाहिजेत. अपवित्र कोणी बसू
शकत नाही. नाहीतर पत्थर-बुद्धी बनाल. बाबा काही शाप देत नाहीत. हा तर एक कायदा आहे.
बाबा म्हणतात - आता सावध राहा. कर्मेंद्रियांद्वारे कोणते पाप केले तर हा मेला. खूप
मोठे लक्ष्य आहे. बाबांचा मुलगा बनलात की मग सगळे आजार उफाळून येतील. घाबरायचे नाही.
वैद्य लोक देखील सांगतात - अमक्या औषधाने तुमचा आजार बाहेर उफाळून येईल. तुम्ही
घाबरू नका. बाबा देखील स्वतः सांगतात. तुम्ही बाबांचे बनलात की मग माया रावण
तुम्हाला खूप हैराण करेल. खूप वादळे घेऊन येईल. आता तुम्हाला योग्य आणि अयोग्यची
बुद्धी मिळाली आहे. इतर कोणालाच योग्य आणि अयोग्यची बुद्धी नाही आहे, सर्वांची आहे
विनाशकाले विपरीत-बुद्धि. तुमच्यामध्ये देखील प्रीत-बुद्धी नंबरवार पुरुषार्था
नुसार आहेत. प्रीत बुद्धि असणारे बाबांची सेवा खूप चांगली करतील. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) ईश्वराची
संतान बनून जराही त्यांच्या आदेशाचे उल्लंघन करायचे नाही. या कर्मेंद्रियांद्वारे
कोणतेही कुकर्म करायचे नाही. उलट-सुलट शब्द बोलायचे नाहीत. सपुत बनून बाबांचे
आशीर्वाद घ्यायचे आहेत.
२) ट्रस्टी बनून
आपल्या गृहस्थ व्यवहाराला सांभाळायचे आहे. ज्ञान मार्गाचे जे कायदे आहेत त्यावर
व्यवस्थितरित्या चालायचे आहे. योग्य आणि अयोग्यला समजून घेऊन माये पासून सावध
राहायचे आहे.
वरदान:-
तडफडणाऱ्या
भिकारी, तहानलेल्या आत्म्यांची तहान भागविणारे सर्व खजिन्यांनी संपन्न भव.
जसे लाटांमध्ये
तरंगणारी आणि बुडणारी आत्मा एका काडीचा आधार शोधत असते. असेच दुःखाची एक लाट येऊ
द्या आणि मग पहा, सुख-शांतीचे भिकारी अनेक आत्मे तडफडत तुमच्या समोर येतील. अशा
तहानलेल्या आत्म्यांची तहान भागविण्यासाठी स्वतःला अतींद्रिय सुख आणि सर्व शक्तींनी,
सर्व खजिन्यांनी भरपूर करा. सर्व खजिने इतके जमा असावेत जेणेकरून आपली स्थिती देखील
टिकून राहील आणि इतर आत्म्यांना देखील संपन्न बनवू शकाल.
बोधवाक्य:-
कल्याणाची
भावना ठेवून शिकवण द्या तेव्हाच शिकवण काळजाला भिडेल.
हे अव्यक्त इशारे -
सदैव हर्षित राहण्याकरिता आपल्या नेचरला (स्वभावाला) सरळ बनवा, सहनशील बना.
सदैव हर्षित राहणे हा
ज्ञानाचा गुण आहे, यामध्ये फक्त रुहानियत ॲड करायची आहे. हर्षितपणाचा संस्कार देखील
एक वरदान आहे, जे वेळेवर खूप सहयोग देते. जे स्वतः सदैव हर्षित राहतात ते कसलेही मन
असणाऱ्यांना देखील हर्षित करतात, इझी नेचरवाले आपल्या खुशनुमा हर्षित चेहऱ्याद्वारे
भारी वायूमंडळाला देखील हलके बनवतात.