03-11-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड मुलांनो,
बाबांकडून जे नॉलेज मिळाले आहे ते कायम बुद्धीमध्ये ठेवायचे आहे, पहाटे लवकर उठून
स्वदर्शन चक्रधारी बनून विचार सागर मंथन करायचे आहे”
प्रश्न:-
या ईश्वरीय
शिक्षणाचा कोणता एक नियम आहे? त्याच्यासाठी कोणते डायरेक्शन मिळालेले आहे?
उत्तर:-
या ईश्वरीय
शिक्षणाचा हा नियम आहे की, नियमितपणे शिकणे. कधी शिकायचे, तर कधी नाही असा नियम
नाहीये. बाबांनी अभ्यासासाठी खूप प्रबंध केलेले आहेत. अभ्यास (मुरली) इथून पोस्टाने
जातो. ७ दिवसांचा कोर्स करून मग कुठेही राहून अभ्यास करु शकता. अभ्यास कधीही
बुडवायचा नाही.
गीत:-
ओम् नमो शिवाय...
ओम शांती।
जी मुले इथे
बसलेली आहेत ती रचयिता आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताची अथवा स्वदर्शन चक्राची आठवण
करत आहेत. बाबांनी मुलांना नॉलेज दिले आहे की स्वदर्शन चक्रधारी बना. तुम्हा
ब्राह्मण मुलांचा उद्देश आहे ‘स्वदर्शन चक्रधारी’ बनणे. मूलवतन, सूक्ष्मवतन,
स्थूलवतन या ८४ जन्मांच्या चक्राला देखील बुद्धीमध्ये ठेवायचे आहे. बाकीचे सर्व काही
बुद्धीतून काढून टाकायचे आहे. आता तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे की, खरोखर
बाबांनी आम्हाला सूर्यवंशी, चंद्रवंशी बनविले होते, मग आम्ही ८४ जन्म घेतले आहेत.
चालता-फिरता, उठता-बसता मज आत्म्याला हे बाबांचे आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताचे
ज्ञान आहे. आता तुम्हाला शिवबाबांनी शूद्रापासून ब्राह्मण बनवले आहे. तुम्ही ८४
जन्मांच्या चक्राची बाजोली कशी खेळता ते बाबांनी समजावून सांगितले आहे. सर्वप्रथम
आम्ही ब्राह्मण आहोत. आम्हा ब्राह्मणांना ब्रह्मा द्वारे रचणारे शिवबाबा आहेत.
रचयिता आणि रचना यांच्या ज्ञानानेच तुम्ही स्वदर्शन चक्रधारी बनता. हे नॉलेज
बुद्धीमध्ये कायम ठेवायचे आहे. पहाटे उठून स्वदर्शन चक्रधारी बनून बसायला हवे. आम्ही
आमच्या ८४ जन्मांच्या चक्राला जाणले आहे. आम्हा सर्व आत्म्यांचे रचयिता एक बाबाच
आहेत. म्हणतात देखील - आम्ही सर्व भाऊ-भाऊ आहोत. आमचे पिता ते परमधाममध्ये राहणारे,
निराकार परमपिता परमात्मा आहेत. आम्ही देखील तिथे राहत होतो, ते आमचे बाबा आहेत.
‘बाबा’ शब्द खूप सुंदर आहे. शिवबाबांच्या मंदिरामध्ये जाऊन किती पूजाअर्चा करतात,
खूप आठवण करतात. बाबा म्हणतात - मी तुम्हाला मनुष्यापासून देवता, तुच्छ-बुद्धीपासून
स्वच्छ-बुद्धी बनवतो. तुच्छ-बुद्धी अर्थात शूद्र-बुद्धीपासून स्वच्छ-बुद्धी बनवले
होते अर्थात श्रेष्ठ-बुद्धी, पुरुषोत्तम-बुद्धी बनवले होते. सर्वच स्त्री-पुरुष या
लक्ष्मी-नारायणाला नमन करतात; परंतु हे जाणत नाहीत की हे कोण आहेत? केव्हा आले, काय
केले? बाबांनी समजावून सांगितले आहे हा भारत अविनाशी खंड आहे, कारण भारत हा अविनाशी
बाबा, परमपिता परमात्म्याची जन्मभूमी आहे. पतित-पावन, सर्वांच्या सद्गतीदात्याचे
जन्मस्थान आहे तर हे मोठ्यात मोठे तीर्थस्थान झाले. इतका नशा कोणाला थोडाच आहे की
ही परमपिता परमात्म्याची, सर्वांच्या सद्गतीदात्या बाबांची जन्मभूमी आहे?
पतित-पावनची जयंती भारतामध्ये झाली आहे. शिवजयंती साजरी करतात तर जरूर ‘शिव’चा जन्म
इथेच होतो. हा भारत खूप मोठे तीर्थस्थान आहे. परंतु ड्रामा अनुसार कोणाला हेच ठाऊक
नाही आहे की, हे आपल्या गॉडफादरचे अथवा मात-पिता, पतित-पावन, सर्वांच्या
सद्गतीदात्याचे जन्मस्थान आहे; म्हणून भारत-भूमीला ‘वंदे मातरम्’ म्हणतात अर्थात या
भूमीवर या मुली ज्या श्रीमतावर भारताला स्वर्ग बनवत आहेत त्यांना हा नशा असला पाहिजे
की, आम्ही श्रीमतावर भारताला कल्प-कल्प स्वर्ग बनवत आहोत. जे जितके श्रीमतानुसार
चालतील तितके उच्च पद मिळवतील. भारतवासीयांनी कल्पाचा कालावधी लाखो वर्षे लिहिला आहे.
तुम्ही जाणता बाबा ज्यांचे जन्मस्थान, हा भारत आहे, त्यांनी जो धर्म स्थापन केला,
त्याची ही गीता आहे. गीता कोणी सांगितली, हे भारतवासी विसरले आहेत. किती फरक झाला
आहे. कुठे निराकार शिव आणि कुठे श्रीकृष्ण. तुम्ही जाणता श्रीकृष्णाची आत्मा जी गोरी
होती ती आता अनेक जन्मांच्या शेवटच्या जन्मात तमोप्रधान बनली आहे. आता मी
यांच्यामध्ये प्रवेश करून पुन्हा श्रीकृष्ण, गोरा बनवत आहे म्हणून श्रीकृष्णाला
सावळा आणि गोरा, श्याम आणि सुंदर म्हटले जाते. हा सतयुगातील पहिल्या नंबरचा सुंदर
राजकुमार होता. याची महिमा आहे - मर्यादा पुरुषोत्तम, अहिंसा परमोधर्म. भारतवासी हे
जाणत नाहीत की राधे-कृष्ण आणि लक्ष्मी-नारायण यांचे आपसामध्ये काय नाते आहे! बाबा
म्हणतात - आत्तापर्यंत तुम्ही जे काही शिकत आला आहात, त्यामध्ये काहीही अर्थ नाहीये.
आता तुम्ही सन्मुख बसला आहात. तुम्ही जाणता, की बाबा ५ हजार वर्षांनंतर आम्हाला
पुन्हा राजयोगाचे शिक्षण देत आहेत. तुम्ही जाणता श्रीकृष्णाच्या आत्म्याने देखील
मागच्या जन्मामध्ये हे ज्ञान प्राप्त केले आहे, जे आत्ता करत आहेत, ज्यांचे नाव मी
‘ब्रह्मा’ असे ठेवले आहे. श्रीकृष्णाच्या अनेक जन्मांतील अंतिम जन्मामध्ये मी
यांच्यामध्ये प्रवेश करतो. तुम्ही मरजीवा बनला आहात ना. तुमची अव्यक्त नावे देखील
ठेवली होती. आता ठेवत नाही, कारण बऱ्याचजणांनी सोडचिठ्ठी दिली. बाबांचे बनून नाव
धारण करून नंतर मग पळून जायचे, हे काही शोभत नाही; म्हणून नाव देणे बंद केले. आता
तुम्ही ब्राह्मण बनला आहात. प्रजापिता ब्रह्माची मुले, शिवबाबांची नातवंडे आहात.
बाबा म्हणतात - तुम्हाला माझ्याकडून वारसा घ्यायचा असेल तर माझी आठवण करा. यांचा हा
अनेक जन्मांतील अंतिम जन्म आहे. सूक्ष्मवतनमध्ये जो ब्रह्मा दाखवतात तो तर पावन आहे.
सूक्ष्मवतनमध्ये काही प्रजापिता तर असू शकत नाही. बाबा म्हणतात - हे व्यक्त ब्रह्मा
आहेत, झाडाच्या शेवटी उभे आहेत. इथे पवित्र फरिश्ता बनण्यासाठी झाडाखाली मुलांसोबत
योग मध्ये बसले आहेत. त्यामुळे सूक्ष्मवतनमध्ये दाखवावा लागेल. प्रजापिता इथे देखील
जरूर पाहिजे. ते अव्यक्त, हे व्यक्त. तुम्ही देखील फरिश्ता बनण्यासाठी आला आहात.
याच्यामध्येच मनुष्य गोंधळून जातात; कारण हे एकदम नवीन ज्ञान आहे. कोणत्याही
शास्त्र इत्यादी मध्ये हे ज्ञान नाहीये. सर्वश्रेष्ठ निराकार परमपिता परमात्मा
भगवान एकच आहेत, सर्व आत्म्यांचे पिता आहेत. त्यांचे राहण्याचे ठिकाण परमधाम आहे.
सर्व जण त्यांची आठवण करतात की, ‘या, आमच्यावर मायेची सावली पडली आहे. पतित बनलो
आहोत’. या गोष्टी नवीन मुलांच्या बुद्धीमध्ये बसणार नाहीत. आता तुम्ही रचनेच्या
आदि-मध्य-अंताला जाणता. सतयुगामध्ये आपण फार थोडे जण राज्य करत होतो. तिथे अधर्माची
गोष्ट असू शकत नाही. शास्त्रांमध्ये किती गोष्टी लिहून ठेवल्या आहेत, परंतु
त्यांच्यामध्ये काहीच अर्थ नाहीये. शिडी उतरता-उतरता आता शेवटी येऊन पतित बनले आहेत.
आता तुम्ही जम्प मारता (झेप घेता). तुम्हाला खाली उतरण्यासाठी ८४ जन्म लागले आणि आता
सेकंदामध्ये जम्प करता.
तुम्ही मुले आता
राजयोग शिकत आहात, नंतर मग शांतीधाममध्ये जाऊन सुखधाममध्ये याल. हे आहे दुःखधाम.
सर्वात पहिले तुम्ही खाली आला आहात त्यामुळे बाबा देखील सर्वात पहिले तुम्हालाच
भेटतात. इथे बाबा आणि मुले, आत्मा आणि परमात्म्याचा मेळावा भरतो. हिशोब आहे ना -
आम्ही बाबांपासून वेगळे होऊन ५ हजार वर्षे लोटली आहेत. सर्वात पहिला स्वर्गामध्ये
पार्ट बजावला, तिथून मग पार्ट बजावत-बजावत तुम्ही खाली उतरत आला आहात. आता तुम्ही
बाबांकडे आला आहात, बाकीचे जे थोडे-फार असतील ते देखील येतील. मग तुमचे शिक्षण
संपेल; सर्वांना इथे (साकार वतनमध्ये) यायचेच आहे. तिथे (परमधाम) जेव्हा पूर्ण
रिकामे होईल, तेव्हा मग बाबा सर्वांना घेऊन जातील. या समजून घेण्याच्या गोष्टी आहेत.
नियमितपणे शिकायचे आहे. शाळेमध्ये कधी जायचे, कधी नाही जायचे हा लॉ (नियम) नाहीये.
बाबांनी शिकण्यासाठी खूप प्रबंध देखील केले आहेत. नाहीतर कधीही कोणाकडे पोस्टाने
अभ्यास (मुरली) जात नाही. हा बेहदच्या बाबांचा अभ्यास पोस्टाने जातो. किती पेपर
छापले जातात. कुठे-कुठे जातात. ७ दिवसांचा कोर्स करून मग कुठेही अभ्यास करत राहा.
यावेळी सर्व अर्ध्या कल्पाचे रोगी आहेत, म्हणून ७ दिवस भट्टीमध्ये ठेवावे लागते. हा
५ विकारांचा रोग संपूर्ण दुनियेभर पसरला आहे. सतयुगामध्ये तुमची काया निरोगी होती,
तुम्ही एव्हर-हेल्दी, एव्हर-वेल्दी (सदैव निरोगी, सदैव समृद्ध) होतात. आता तर काय
हाल झाले आहेत. हा सारा खेळ भारतावर बनलेला आहे. तुम्हाला ८४ जन्मांची आता स्मृती
आली आहे. कल्प-कल्प तुम्हीच स्वदर्शनचक्रधारी बनता आणि चक्रवर्ती राजा देखील बनता.
हे राज्य स्थापन होत आहे, यामध्ये नंबरवार पदे असतील. प्रजा देखील अनेक प्रकारची
पाहिजे. मनाला विचारले पाहिजे की, मी किती जणांना आप समान स्वदर्शनचक्रधारी बनवतो?
जितके जो बनवेल तोच उच्च पद प्राप्त करेल. तुम्हाला बाबा, मायेशी युद्ध करायला
शिकवत आहेत, युधिष्ठिर आणि धृतराष्ट्र देखील दाखवतात. गायले देखील जाते - ‘माया जीते
जगतजीत’; किती काळ तुमचा विजय कायम राहिला, आणि मग हार किती काळ खाता, हे देखील
तुम्ही जाणता. हे भौतिक युद्ध नाहीये. ना देवतांचे आणि असुरांचे युद्ध आहे. ना
कौरवांचे आणि पांडवांचे युद्ध आहे. झूठी काया, झूठी माया... हा भारत झूठ खंड आहे.
सच खंड होता. जेव्हापासून रावण राज्य सुरू झाले तेव्हापासून झूठ खंड बनला.
ईश्वराबद्दल किती खोटे बोलतात. किती कलंक लावतात. ‘कलंगी अवतार’ (कल्की अवतार)
देखील गायला गेला आहे. सर्वात जास्त कलंक बाबांवरच लावतात. त्यांच्यासाठी म्हणतात -
कूर्म-मत्स्य अवतार, दगड-धोंड्यामध्ये ईश्वर आहे. किती शिव्या देतात. ही सभ्यता आहे
का? आता तुम्हाला प्रकाश मिळाला आहे. तुम्ही जाणता - बाबा आम्हाला रचता आणि रचनेच्या
आदि-मध्य-अंताचे रहस्य समजावून सांगत आहेत, जे इतर कोणीही जाणत नाहीत. बाबाच सद्गती
दाता आहेत. बाबांच्या ज्ञानाद्वारे सर्वांची सद्गती होते. बाकी जे स्वतःच
दुर्गतीमध्ये आहेत ते दुसऱ्यांची सद्गती कसे काय करतील. मी येऊन तुम्हाला राजांचाही
राजा बनवतो. तुम्हीच पवित्र पूज्य होता, आता येऊन पुजारी बनले आहात. पवित्र राजांची,
अपवित्र राजे पूजा करतात. सतयुगामध्ये डबल सिरताज (डबल मुकुटधारी) होतात. विकारी
राजे बनतात, तेव्हा मग सिंगल ताज राहतो. ते देखील महाराजा-महाराणी आहेत. परंतु
पवित्र असणाऱ्या समोर अपवित्र असणारे जाऊन डोके टेकतात. ते पवित्र
प्रवृत्तीमार्गवाले भारतवासी, तेच भारतवासी आता पतित प्रवृत्तीमार्गवाले बनतात. आता
बाबा म्हणतात - तुमचा या मृत्युलोकमध्ये शेवटचा जन्म आहे. आता तुम्हाला सतयुगामध्ये
घेऊन जाण्यासाठी मी पुन्हा आलो आहे. हे मुसळांचे युद्ध (मिसाईल्सचे युद्ध) ५ हजार
वर्षांपूर्वी देखील झाले होते. ही जुनी दुनिया नष्ट होणार आहे. बाबा समजावून सांगत
आहेत - गृहस्थ व्यवहारामध्ये राहत असताना कमलपुष्प समान बनायचे आहे. कमलपुष्प समान
तुम्ही ब्राह्मण बनला आहात. परंतु ही निशाणी विष्णूला दिली आहे, कारण तुम्ही सदैव
एकरस राहत नाही. आज कमलपुष्प समान बनता, आणि मग दोन वर्षानंतर पुन्हा पतित बनता.
तुमचे हे सर्वोत्तम
कूळ आहे. तुम्ही ब्राह्मण शिखा आहात. मग पुनर्जन्म घेत-घेत देवता, क्षत्रिय, वैश्य,
शूद्र बनता. शूद्राचे एका झटक्यात देवता थोडेच बनाल? ब्राह्मण शिखा तर पाहिजे. आता
ब्राह्मणांना बाबा शिकवत आहेत. तर अशा बाबांना सोडचिठ्ठी थोडीच दिली पाहिजे! बाबा
म्हणतात - आश्चर्यवत मेरा बनन्ती, सुनन्ती आणि तरीही भागन्ती होऊन मायेचे बनन्ती.
ट्रेटर बनन्ती, माझी निंदा करावन्ती... त्याला म्हटले जाते - सद्गुरूचा निंदक
स्वर्गाचे ठौर (पद) प्राप्त करू शकत नाही. बाकी भक्तिमार्गाचे जे गुरु आहेत, ते काही
सद्गती दाता नाहीत. सर्व आत्म्यांचे पिता, टीचर, गुरु एकमेव निराकार बाबा आहेत. तेच
सर्वांचा उद्धार करण्यासाठी आले आहेत. पुढे जाऊन समजतील परंतु टू लेट होतील. ते मग
आपल्याच धर्मामध्ये निघून जातील. सर्वश्रेष्ठ आहे देवता धर्म. त्याच्यापेक्षाही
श्रेष्ठ तुम्ही ब्राह्मण आहात, जे बाबांच्या सोबत बसला आहात. तुम्हाला शिकविणारा
विचित्र आणि विदेही आहे. बाबा म्हणतात - मला देह नाहीये. मला शिव म्हणतात. माझे नाव
बदलू शकत नाही, बाकी सर्वांच्या शरिरांची नावे बदलतात. मी परम-आत्मा आहे, माझी
जन्मपत्रिका कोणी काढू शकत नाही. जेव्हा बेहदची रात्र होते, तेव्हा मी दिवस
बनविण्याकरिता येतो. आता आहे संगम, या गोष्टी चांगल्या तऱ्हेने समजून घेऊन मग धारण
केल्या पाहिजेत. आठवत राहिले पाहिजे. तुम्ही मुले इथे येता तेव्हा तुम्हाला मोकळा
वेळ मिळतो. इथे विचार सागर मंथन चांगल्या प्रकारे करू शकता. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) सर्वोत्तम
कुळाच्या स्मृतीद्वारे गृहस्थ व्यवहारामध्ये राहून कमलपुष्प समान पवित्र बनायचे आहे.
कधीही सद्गुरूची निंदा करायची नाही.
२) श्रीमतावर भारताला
स्वर्ग बनविण्याची सेवा करायची आहे. स्वदर्शनचक्रधारी बनायचे आहे आणि बनवायचे आहे.
जेव्हा पण वेळ मिळेल तेव्हा विचार सागर मंथन जरूर करायचे आहे.
वरदान:-
सदैव
कल्याणकारी भावने द्वारा गुणग्राही बनणारे अचल-अडोल भव
आपली स्थिती अचल-अडोल
बनविण्यासाठी सदैव गुणग्राही बना. जर प्रत्येक गोष्टीमध्ये गुणग्राही बनाल तर मग
तुम्ही कधीही डळमळणार नाही. गुणग्राही अर्थात कल्याणाची भावना. अवगुणांमध्ये गुण
पाहणे याला म्हणतात गुणग्राही; त्यामुळे अवगुण असणाऱ्यामधून देखील गुण उचला. जसे ते
अवगुणांमध्ये पक्के आहेत तसे तुम्ही गुणांमध्ये पक्के राहा. गुणांचे ग्राहक बना,
अवगुणांचे नाही.
बोधवाक्य:-
आपले सर्व काही
बाबांना अर्पण करून सदैव हलके राहणारेच फरिश्ते आहेत.
हे अव्यक्त इशारे -
ब्रह्माबाबांप्रमाणे संपन्न आणि संपूर्ण स्थितीचा अनुभव करा.
पित्यासमान
बनण्याकरिता ब्रह्मा बाबांना फॉलो करत जा. विचार करा, ब्रह्मा बाबा संपूर्ण कसे बनले?
त्यांची अशी कोणती विशेषता होती? संपूर्णतेचा विशेष आधार काय होता? ब्रह्माबाबांनी
आपला प्रत्येक क्षण सफल केला. प्रत्येक श्वास, प्रत्येक सेकंद सफल केला. तर
पित्यासमान बनण्यासाठी लक्ष्य ठेवा की सफल करायचे आहे आणि सफलतामूर्त बनायचे आहे.