03-12-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड
मुलांनो - तुम्ही आता होलीएस्ट ऑफ द होली (परम पावन) बाबांचे दत्तक पुत्र बनला
आहात, तुम्हाला मनसामध्ये देखील होली (पवित्र) बनायचे आहे”
प्रश्न:-
होलीएस्ट ऑफ द
होली मुलांचा नशा आणि निशाण्या कोणत्या असतील?
उत्तर:-
त्यांना नशा असेल की आपण होलीएस्ट ऑफ द होली बाबांचे दत्तक पुत्र बनलो आहोत. आपण
होलीएस्ट देवी-देवता बनतो, त्यांच्या मनसामध्ये देखील वाईट विचार येऊ शकत नाहीत. ते
सुगंधित फूल असतात, त्यांच्याकडून कोणतेही उलटे कर्म होऊ शकत नाही. ते अंतर्मुखी
बनून स्वतःची तपासणी करतात की, माझ्यातून सर्वांना सुगंध येतो? माझे डोळे कशामध्येही
बुडत तर नाहीत ना?
गीत:-
मरना तेरी गली
में…
ओम शांती।
मुलांनी गाणे ऐकले मग त्याचा अर्थ देखील मनामध्ये विचार सागर मंथन करून काढला पाहिजे.
हे कोणी म्हटले - ‘मरना तेरी गली में’? आत्म्याने म्हटले कारण आत्मा पतित आहे. पावन
तर अंताला म्हणणार किंवा पावन तेव्हा म्हणणार जेव्हा शरीर देखील पावन मिळेल. आता तर
पुरुषार्थी आहेत. हे देखील जाणता - बाबांकडे येऊन मरायचे असते. एका बाबांना सोडून
दुसरे करणे म्हणजे एकाकडून मरून दुसऱ्याकडे जगणे. लौकिक पित्याचा देखील मुलगा शरीर
सोडेल तर दुसऱ्या पित्याकडे जाऊन जन्म घेईल ना. हे देखील असेच आहे. मरून मग
होलीएस्ट ऑफ द होलीचे दत्तक पुत्र बनता. होलीएस्ट ऑफ होली कोण आहेत? (बाबा) आणि होली
कोण आहेत? (संन्यासी), होय, या संन्यासी इत्यादींना म्हणणार होली (पवित्र).
तुमच्यामध्ये आणि संन्याशांमध्ये फरक आहे. ते होली बनतात परंतु जन्म तरी देखील पतिता
पासून घेतात ना. तुम्ही बनता होलीएस्ट ऑफ द होली. तुम्हाला बनविणारे आहेत -
होलीएस्ट ऑफ द होली बाबा. ते लोक घरदार सोडून होली बनतात. आत्मा पवित्र बनते ना.
तुम्ही स्वर्गामध्ये देवी-देवता असता तेव्हा तुम्ही होलीएस्ट ऑफ द होली असता. हा आहे
तुमचा बेहदचा संन्यास. तो आहे हदचा. ते ‘होली’ बनतात, तुम्ही बनता ‘होलीएस्ट ऑफ होली’.
बुद्धी देखील म्हणते - आम्ही तर नवीन दुनियेमध्ये जातो. ते संन्यासी येतातच रजो
मध्ये. फरक झाला ना. कुठे रजो, कुठे सतोप्रधान. तुम्ही ‘होलीएस्ट ऑफ होली’द्वारे
‘होलीएस्ट’ बनता. ते ज्ञानाचा सागर देखील आहेत, प्रेमाचा सागर देखील आहेत.
इंग्रजीमध्ये ओशन ऑफ नॉलेज, ओशन ऑफ लव म्हणतात. तुम्हाला किती श्रेष्ठ बनवतात. अशा
उच्च ते उच्च ‘होलीएस्ट ऑफ होली’ला बोलवता की, येऊन पतितांना पावन बनवा. पतित
दुनियेमध्ये येऊन आम्हाला होलीएस्ट ऑफ होली बनवा. तर मुलांना इतका नशा असला पाहिजे
की आपल्याला कोण शिकवत आहेत! आपण काय बनणार आहोत? दैवी गुण देखील धारण करायचे आहेत.
मुले लिहितात - ‘बाबा, आमच्याकडे माया खूप वादळे घेऊन येते. आम्हाला मनसामध्ये
शुद्ध बनू देत नाही, असे वाईट विचार का येतात जेव्हा की आम्हाला होलीएस्ट ऑफ होली
बनायचे आहे?’ बाबा म्हणतात - आता तुम्ही बिलकुल अन-होलीएस्ट ऑफ होली बनले आहात.
अनेक जन्मांच्या अंतामध्ये आता बाबा पुन्हा तुम्हाला जोरदारपणे शिकवत आहेत. तर
मुलांच्या बुद्धीमध्ये हा नशा असला पाहिजे - आपण काय बनत आहोत. या लक्ष्मी-नारायणाला
असे कोणी बनवले? भारत स्वर्ग होता ना. यावेळी भारत तमोप्रधान भ्रष्टाचारी आहे. मग
त्याला आम्ही होलीएस्ट ऑफ होली बनवतो. बनविणारा तर जरूर पाहिजे ना. स्वतःमध्ये
देखील हा नशा असला पाहिजे की आम्हाला देवता बनायचे आहे. त्यासाठी गुण देखील असे असले
पाहिजेत. एकदम खालून वर चढला आहात. शिडीच्या चित्रामध्ये देखील ‘उत्थान आणि पतन’
लिहिलेले आहे ना. जे खाली घसरलेले आहेत (पतन झाले आहे) ते स्वतःला होलीएस्ट ऑफ होली
कसे म्हणू शकतील. होलीएस्ट ऑफ होली बाबाच येऊन मुलांना बनवतात. तुम्ही इथे आलेच
आहात विश्वाचा मालक होलीएस्ट ऑफ होली बनण्यासाठी, तर किती नशा असला पाहिजे. बाबा
आम्हाला इतके श्रेष्ठ बनविण्याकरिता आले आहेत. मनसा-वाचा-कर्मणा पवित्र बनायचे आहे.
सुगंधित फूल बनायचे आहे. सतयुगाला म्हटले जाते - फुलांचा बगीचा. कसलीही दुर्गंधी असू
नये. दुर्गंधी देह-अभिमानाला म्हटले जाते. कोणातही कु-दृष्टी जाऊ नये. असे उलटे काम
होऊ नये जे मनाला खात राहील आणि खाते बनेल. तुम्ही २१ जन्मांसाठी धन जमा करता.
तुम्ही मुले जाणता आपण खूप संपत्तीवान बनत आहोत. आपल्या आत्म्याला पहायचे आहे की,
मी दैवी गुणांनी संपन्न आहे? जसे बाबा म्हणतात तसा मी पुरुषार्थ करतो. तुमचे एम
ऑब्जेक्ट तर बघा कसे आहे. कुठे संन्यासी, कुठे तुम्ही!
तुम्हा मुलांना नशा
असला पाहिजे की आपण कोणाकडे दत्तक गेलो आहोत! आम्हाला काय बनवतात? अंतर्मुखी होऊन
बघितले पाहिजे - आपण कितपत लायक बनलो आहोत? आपल्याला किती गुल-गुल (फूल) बनले पाहिजे,
ज्यामुळे सर्वांना ज्ञानाचा सुगंध येईल? तुम्ही अनेकांना सुगंध देता ना. आप समान
बनवता. पहिले तर हा नशा असला पाहिजे - आम्हाला शिकविणारे कोण आहेत! ते तर सर्व आहेत
भक्ती मार्गातील गुरु. ज्ञानमार्गामध्ये तर एका परमपिता परमात्म्याशिवाय इतर कोणीही
गुरु असू शकत नाही. बाकी आहेत भक्ती मार्गाचे गुरु. भक्ती असतेच कलियुगामध्ये.
रावणाची प्रवेशता होते. हे देखील दुनियेमध्ये कोणाला माहित नाही. आता तुम्ही जाणता,
सतयुगामध्ये आपण १६ कला संपूर्ण होतो, मग एक दिवस जरी गेला तर त्याला पौर्णिमा
थोडीच म्हणणार. हे देखील असेच आहे. थोडे-थोडे रहाटा प्रमाणे चक्र फिरत राहते. आता
तुम्हाला पूर्ण १६ कला संपूर्ण बनायचे आहे, ते देखील अर्ध्या कल्पासाठी. मग कला कमी
होतात, हे तुम्हाला बुद्धीमध्ये ज्ञान आहे तर तुम्हा मुलांना किती नशा असला पाहिजे.
खूप जणांच्या हे लक्षातही येत नाही की, इतके आपल्याला शिकवणारे कोण आहेत? ओशन ऑफ
नॉलेज (ज्ञानाचा सागर). मुलांना तर म्हणतात - मुलांनो नमस्ते. तुम्ही ब्रह्मांडाचे
देखील मालक आहात, तिथे तुम्ही सर्वजण राहता आणि मग विश्वाचे देखील तुम्ही मालक बनता.
तुमचा उत्साह वाढविण्याकरिता बाबा म्हणतात - तुम्ही माझ्यापेक्षाही उच्च बनता. मी
विश्वाचा मालक बनत नाही, माझ्यापेक्षाही तुम्हाला श्रेष्ठ महिमा असणारा बनवतो. मुले
जेव्हा मोठ्या हुद्द्यावर जातात तर वडील समजतील ना की, याने शिकून इतके उच्च पद
मिळवले आहे. बाबा देखील म्हणतात - मी तुम्हाला शिकवत आहे. आता आपले जितके पद बनवू
इच्छिता, तेवढा पुरुषार्थ करा. बाबा आम्हाला शिकवत आहेत - आधी तर याचा नशा चढला
पाहिजे. बाबा तर कधीही येऊन बोलतात. ते तर जसे की यांच्यामध्ये (ब्रह्मा बाबांमध्ये)
आहेतच. तुम्ही मुले त्यांची आहात ना. हा रथ देखील त्यांचा आहे ना. तर असे होलीएस्ट
ऑफ होली बाबा आलेले आहेत, तुम्हाला पावन बनवतात. तुम्ही मग इतरांना पावन बनवा. मी
रिटायर होतो. जेव्हा तुम्ही होलीएस्ट ऑफ होली बनता तर इथे कोणीही पतित येऊ शकत नाही.
हे होलीएस्ट ऑफ होलीचे चर्च आहे. त्या चर्चमध्ये तर सर्व विकारी जातात, सर्व पतित
अन-होली आहेत. हे तर खूप मोठे होली चर्च आहे. इथे कोणीही पतित पाय देखील ठेवू शकत
नाही. परंतु आता असे करू शकत नाही. जेव्हा मुले देखील अशी बनतील तेव्हा असे कायदे
काढले पाहिजेत. इथे कोणीही आत येऊ शकणार नाही. विचारतात ना - आम्ही येऊन सभेमध्ये
बसू का? बाबा म्हणतात - ऑफिसर्स इत्यादींकडे काम असते त्यामुळे त्यांना बसवावे लागते.
जेव्हा तुमचे नाव प्रसिद्ध होईल मग तुम्हाला कोणाचीही पर्वा नाही. आता पर्वा करावी
लागते, होलीएस्ट ऑफ होलीना देखील त्रास सहन करावा लागतो. आता नाही म्हणू शकत नाहीत.
जेव्हा प्रभाव पडेल तेव्हा मग लोकांची शत्रुता देखील कमी होईल. तुम्ही देखील
समजावून सांगाल - आम्हा ब्राह्मणांना राजयोग शिकविणारे होलीएस्ट ऑफ होली बाबा आहेत.
संन्याशांना ऑफ होलीएस्ट होली थोडेच म्हणणार. ते येतातच रजोगुणामध्ये. ते विश्वाचे
मालक बनू शकतात काय? आता तुम्ही पुरुषार्थी आहात. कधी-कधी खूप चांगले वर्तन असते,
कधी तर मग असे वर्तन असते ज्यामुळे नाव बदनाम करतात. सेंटर्सवर असे खूप येतात जे
जरासुद्धा ओळखत नाहीत. तुम्ही स्वतः देखील विसरता की आपण काय बनत आहोत. बाबा देखील
वर्तना वरून समजतात - हे काय बनतील? भाग्यामध्ये उच्चपद असेल तर वर्तन खूप रॉयल्टीने
होईल. फक्त याची आठवण रहावी की, आम्हाला शिकवतात कोण, तरीही परमानंद होईल. आपण
गॉडफादरली स्टुडंट आहोत तर किती रीगार्ड ठेवला पाहिजे. आता अजून शिकत आहेत. बाबा तर
असे समजतात अजून वेळ लागेल. प्रत्येक गोष्टीमध्ये नंबरवार तर असतातच. घर देखील आधी
सतोप्रधान असते मग सतो-रजो-तमो होते. आता तुम्ही सतोप्रधान, १६ कला संपूर्ण बनणार
आहात. इमारत बनत जाते. तुम्ही सर्वजण मिळून स्वर्गाची इमारत बनवत आहात. याचा देखील
तुम्हाला खूप आनंद झाला पाहिजे. भारत जो अन-होलीएस्ट ऑफ अन-होली (अति पतित) बनला आहे,
त्याला आम्ही होलीएस्ट ऑफ होली (परम पवित्र) बनवतो, तर स्वतःवर किती लक्ष ठेवले
पाहिजे. आपली दृष्टी अशी असू नये ज्यामुळे आपले पदच भ्रष्ट होईल. असे नाही की, जर
बाबांना लिहिले तर बाबा काय म्हणतील. नाही, आता तर सर्वजण पुरुषार्थ करत आहेत.
त्यांना देखील आता होलीएस्ट ऑफ होली थोडेच म्हणणार. जेव्हा बनतील तेव्हा मग हे शरीर
सुद्धा राहणार नाही. तुम्ही देखील होलीएस्ट ऑफ होली बनता. बाकी त्यामध्ये पदे आहेत.
त्यासाठी पुरुषार्थ करायचा आहे आणि करवून घ्यायचा आहे. बाबा पॉईंट्स तर खूप देत
राहतात. कोणी आले तर फरक स्पष्ट करून दाखवा. कुठे हे होलीएस्ट ऑफ होली, कुठे ते होली.
या लक्ष्मी-नारायणाचा तर जन्मच सतयुगामध्ये होतो. ते येतातच नंतर, किती फरक आहे.
मुले समजतात - शिवबाबा आपल्याला असे बनवत आहेत. म्हणतात मामेकम् (मज एकाची) आठवण करा.
स्वतःला अशरीरी आत्मा समजा. उच्च ते उच्च शिवबाबा शिकवून उच्च ते उच्च बनवत आहेत,
ब्रह्मा द्वारे आपण हे शिकत आहोत. ब्रह्मा सो विष्णू बनतो. हे देखील तुम्ही जाणता.
मनुष्य तर काहीही समजत नाहीत. आता साऱ्या सृष्टीवर रावण राज्य आहे. तुम्ही रामराज्य
स्थापन करत आहात, ज्याला तुम्ही जाणता. ड्रामा अनुसार आपण स्वर्ग स्थापन करण्यालायक
बनत आहोत. आता बाबा लायक बनवत आहेत. बाबांशिवाय इतर कोणीही शांतीधाम, सुखधामला घेऊन
जाऊ शकत नाही. थापा मारत राहतात की, अमका स्वर्गात गेला, मुक्तिधाममध्ये गेला. बाबा
म्हणतात - हे विकारी, पतित आत्मे शांतीधाममध्ये कसे जातील. तुम्ही सांगू शकत असाल
तर समजतील की यांना किती अभिमान आहे. असे विचार सागर मंथन करा की, कसे समजावून
सांगावे. चालता-फिरता मनामध्ये असे आले पाहिजे. आपणही धीर धरला पाहिजे, जेणेकरून
आपण सुद्धा लायक बनू. भारतवासीच पूर्ण लायक आणि पूर्ण न-लायक बनतात. आणखी कोणी नाही.
आता बाबा तुम्हाला लायक बनवत आहेत. नॉलेज खूप मजेशीर आहे. आतून अतिशय आनंद होतो की,
आम्ही या भारताला होलीएस्ट ऑफ होली बनवणार. वर्तन खूप रॉयल पाहिजे.
खाण्या-पिण्यावरून, वर्तनावरून सर्व काही समजते. शिवबाबा तुम्हाला इतके उच्च बनवतात.
त्यांची संतान बनला आहात तर नाव प्रसिद्ध करायचे आहे. वर्तन असे असावे ज्यामुळे
समजतील की ही होलीएस्ट ऑफ होलीची मुले आहेत. हळू-हळू तुम्ही बनत जाल. महिमा होत
जाईल. आणि मग कायदे-कानून सर्व काही बनतील, ज्यामुळे कोणीही पतित आतमध्ये येऊ शकणार
नाही. बाबा समजू शकतात, यासाठी अजून वेळ लागेल. मुलांना खूप पुरुषार्थ करायचा आहे.
आपली राजधानी देखील तयार व्हायला हवी. मग करण्यामध्ये काही हरकत नाही. मग तर इथून
खाली आबू रोड पर्यंत रांग लागेल. आता तुम्ही पुढे जा. बाबा तुमच्या भाग्याला वाढवत
राहतात. पदम भाग्यशाली सुद्धा नियमानुसार म्हणतात ना. पायामधे पद्म दाखवतात ना. ही
सर्व तुम्हा मुलांची महिमा आहे. तरी देखील बाबा म्हणतात - मनमनाभव, बाबांची आठवण करा.
अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) असे कोणतेही
काम करायचे नाही ज्यामुळे मन आतल्या आत खात राहील. पूर्ण सुगंधित फूल बनायचे आहे.
देह-अभिमानाची दुर्गंधी काढून टाकायची आहे.
२) वर्तन खूप रॉयल
पाहिजे. होलीएस्ट ऑफ होली बनण्याचा पूर्ण पुरुषार्थ करायचा आहे. दृष्टी अशी असू नये
ज्यामुळे पद भ्रष्ट होईल.
वरदान:-
निराशेच्या
चितेवर बसलेल्या आत्म्यांना नवीन जीवन दान देणारे त्रिमूर्ती प्राप्तींनी संपन्न भव
संगमयुगावर
बाबांद्वारे सर्व मुलांना एव्हर हेल्दी, वेल्दी आणि हॅपी (निरोगी, समृद्ध आणि आनंदी)
राहण्याचे त्रिमूर्ती वरदान प्राप्त होते, जी मुले या तिन्ही प्राप्तींनी सदा
संपन्न राहतात त्यांचा भाग्यवान, हर्षितमुख चेहरा पाहून मानवी जीवनामध्ये जगण्याचा
उमंग-उत्साह येतो कारण आता मनुष्य जिवंत असून देखील निराशेच्या चितेवर बसलेले आहेत.
आता अशा आत्म्यांना मरजीवा बनवा. नव्या जीवनाचे दान द्या. सदैव लक्षात रहावे की, या
तिन्ही प्राप्ती आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. तिन्ही धारणांसाठी डबल अंडरलाईन करा.
बोधवाक्य:-
न्यारे आणि
अधिकारी होऊन कर्मामध्ये येणे - हीच बंधनमुक्त स्थिती आहे.
अव्यक्त इशारे:- आता
संपन्न अथवा कर्मातीत बनण्याचा ध्यास धरा.
कर्मातीतचा अर्थच आहे
- सर्व प्रकारच्या हदच्या स्वभाव-संस्कारांपासून अतीत अर्थात न्यारे. हद आहे - बंधन,
बेहद आहे - निर्बंधन. ब्रह्मा बाप समान आता हदच्या ‘माझे-माझे’पणातून मुक्त होण्याचा
अर्थात कर्मातीत होण्याचा अव्यक्ती दिवस साजरा करा, यालाच स्नेहाचा पुरावा देणे असे
म्हटले जाते.