04-10-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड
मुलांनो - श्रेष्ठ ते श्रेष्ठ बनण्यासाठी स्वयं भगवान तुम्हाला श्रेष्ठ मत देत
आहेत, ज्याद्वारे तुम्ही नरक वासी पासून स्वर्गवासी बनता”
प्रश्न:-
देवता बनणाऱ्या
मुलांनी विशेष कोणत्या गोष्टींवर लक्ष ठेवले पाहिजे?
उत्तर:-
कधी कोणत्याही बाबतीत नाराज व्हायचे नाही, चेहरा मुडद्यासारखा करायचा नाही. कोणालाही
दुःख द्यायचे नाही. देवता बनायचे असेल तर तोंडातून सदैव फुले निघाली पाहिजेत. जर
काटे किंवा दगड निघत असतील तर दगड ते दगडच राहिलात. खूप चांगले गुण धारण करायचे
आहेत. इथेच सर्वगुणसंपन्न बनायचे आहे. सजा खावी लागली तर मग चांगले पद मिळणार नाही.
ओम शांती।
नवीन विश्वाचे अथवा नव्या दुनियेचे मालक बनणाऱ्या रुहानी मुलांप्रती रुहानी बाबा
बसून समजावून सांगत आहेत. हे तर मुले समजतात की बाबा आले आहेत बेहदचा वारसा
देण्यासाठी. आपण लायक नव्हतो. म्हणतात - ‘हे प्रभू, मी लायक नाही आहे, मला लायक बनवा’.
बाबा मुलांना समजावून सांगत आहेत - तुम्ही मनुष्य तर आहात, हे देवता देखील मनुष्य
आहेत परंतु यांच्यामध्ये दैवीगुण आहेत. यांना खरे-खरे मनुष्य म्हणणार. मनुष्यांमध्ये
आसुरी गुण असतील तर वर्तणूक पशूप्रमाणे होते. दैवी गुण नसतील तर त्याला आसुरी गुण
म्हटले जाते. आता बाबा पुन्हा येऊन तुम्हाला श्रेष्ठ देवता बनवत आहेत. सचखंडामध्ये
रहाणारे खरे-खरे मनुष्य हे लक्ष्मी-नारायण आहेत, यांना मग देवता म्हटले जाते.
यांच्यामध्ये दैवी गुण आहेत. भले गातात देखील - ‘हे पतित-पावन या’. परंतु पावन राजे
कसे असतात मग पतित राजे कसे असतात, हे रहस्य कोणीही जाणत नाहीत. तो भक्तिमार्ग आहे.
ज्ञान तर इतर कोणीही जाणत नाहीत. तुम्हा मुलांना बाबा समजावून सांगतात आणि असे
बनवतात. कर्म तर हे देवतासुद्धा सतयुगामध्ये करतात परंतु पतित-कर्म करत नाहीत.
त्यांच्यामध्ये दैवी गुण आहेत. छी-छी काम (विकारी काम) न करणारेच स्वर्गवासी असतात.
नरक वासीकडून माया छी-छी काम (विकारी काम) करवून घेते. आता भगवान बसून श्रेष्ठ काम
करवून घेतात आणि श्रेष्ठ मत देतात की अशी छी-छी कामे करू नका. श्रेष्ठ ते श्रेष्ठ
बनण्यासाठी श्रेष्ठ ते श्रेष्ठ मत देतात. देवता श्रेष्ठ आहेत ना. राहतात देखील नवीन
दुनिया स्वर्गामध्ये. हे देखील तुमच्यामधील नंबरवार पुरुषार्थानुसार जाणतात म्हणून
माळा देखील ८ ची किंवा १०८ ची असते, फारफार तर १६१०८ ची सुध्दा जरी म्हटले, तरी ते
काय झाले? इतके करोड मनुष्य आहेत, त्यांच्यामधून १६ हजार निघाले तर काय झाले. एक
चतुर्थांश सुद्धा नाही. बाबा मुलांना किती श्रेष्ठ बनवतात, दररोज मुलांना समजावून
सांगतात की कोणतेही विकर्म करू नका. तुम्हाला असे बाबा मिळाले आहेत तर खूप आनंद झाला
पाहिजे. तुम्ही समजता की, आपल्याला बेहदच्या बाबांनी दत्तक घेतले आहे. आपण त्यांचे
बनलो आहोत. बाबा आहेत स्वर्गाचे रचयिता. तर अशा स्वर्गाचा मालक बनण्या लायक सर्वगुण
संपन्न बनावे लागेल. हे लक्ष्मी-नारायण सर्वगुणसंपन्न होते. यांच्या लायकीची महिमा
केली जाते, मग ८४ जन्मा नंतर न-लायक बनतात. एक जन्म जरी खाली उतरलात तरी थोडी कला
कमी झाली. अशी हळू-हळू कमी होत जाते. जसा ड्रामा देखील रहाटा प्रमाणे चालतो ना.
तुम्ही सुद्धा हळू-हळू खाली उतरता तर १२५० वर्षांमध्ये दोन कला कमी होतात. मग
रावणराज्यामध्ये लवकर-लवकर कला कमी होत जातात. ग्रहण लागते. जसे सूर्य-चंद्राला
सुद्धा ग्रहण लागते ना. असे नाही की चंद्राला-ग्रहांना ग्रहण लागत नाही, सर्वांना
पूर्ण ग्रहण लागलेले आहे. आता बाबा म्हणतात - आठवणीनेच ग्रहण उतरेल. कोणतेही पाप करू
नका. एक नंबर पाप आहे देह-अभिमानामध्ये येणे. हे फार वाईट पाप आहे. मुलांना या एका
जन्मासाठीच शिक्षण मिळते कारण आता दुनिया बदलणार आहे. पुन्हा कधी असे शिक्षण मिळत
नाही. बॅरिस्टरी इत्यादींचे शिक्षण तर तुम्ही जन्म-जन्मांतर घेत आला आहात. शाळा
वगैरे तर नेहमीचे आहेच. हे ज्ञान एकदा मिळाले, बस्स. ज्ञान सागर बाबा एकदाच येतात.
ते आपले आणि आपल्या रचनेच्या आदि-मध्य-अंताचे सर्व ज्ञान देतात. बाबा किती सोपे
करून सांगतात - तुम्ही आत्मे पार्टधारी आहात. आत्मे आपल्या घरून येऊन इथे पार्ट
बजावतात. त्याला मुक्तीधाम म्हटले जाते. स्वर्ग आहे - जीवनमुक्ती. इथे तर आहे
जीवन-बंध. हे शब्द देखील यथार्थपणे लक्षात ठेवायचे आहेत. मोक्ष कधी मिळत नाही.
मनुष्य म्हणतात मोक्ष मिळू दे अर्थात आवागमनापासून (येण्या-जाण्यापासून) सुटका होऊ
दे. परंतु पार्टमधून तर निघू शकत नाही. हा अनादि पूर्वनियोजित खेळ आहे. जगाचा
इतिहास-भूगोल हुबेहूब रिपीट होतो. सतयुगामध्ये तेच देवता येतील. त्यानंतर मग इस्लामी,
बौद्ध इत्यादी सर्व येतील. हे मानवी झाड बनेल. याचे बीज वरती आहे. बाबा आहेत मनुष्य
सृष्टीचे बीजरूप. मनुष्य सृष्टी तर आहेच परंतु सतयुगामध्ये खूप छोटी असते, मग
हळू-हळू खूप वृद्धी होत जाते. अच्छा, मग छोटी कशी होईल? बाबा येऊन पतिता पासून पावन
बनवतात. किती थोडे पावन बनतात. कोटींमधून कोणी निघतात. अर्धा कल्प फार थोडे असतात.
अर्ध्या कल्पामध्ये किती वृद्धी होते. तर सर्वात जास्त संप्रदाय (संख्या) त्या
देवतांचा असला पाहिजे कारण सर्वात प्रथम हे येतात, परंतु दुसऱ्या-दुसऱ्या
धर्मांमध्ये निघून जातात कारण बाबांनाच विसरले आहेत. हा आहे एकाच चुकीचा खेळ!
विसरल्यामुळे गरीब होतात. विसरत-विसरत एकदम विसरूनच जातात. भक्ती देखील पहिली एकाची
करतात कारण सर्वांची सद्गती करणारा एक आहे मग दुसऱ्या कोणाची भक्ती कशाला करायला
पाहिजे. या लक्ष्मी-नारायणाला देखील बनविणारे तर शिवच आहेत ना! श्रीकृष्ण बनवणारा
कसा असेल? असे तर होऊ शकत नाही. राजयोग शिकविणारा श्रीकृष्ण कसा असेल? तो तर आहे
सतयुगाचा प्रिन्स. किती चूक केली आहे. बुद्धीला पटत नाही. आता बाबा म्हणतात माझी
आठवण करा आणि दैवीगुण धारण करा. कोणताही प्रॉपर्टीचा वाद इत्यादी असेल तर त्याला
मिटवून टाका. भांडण करता-करता तर प्राण सुद्धा निघून जातील. बाबा म्हणतात - याने
हक्क सोडला तर काही भांडण इत्यादी थोडेच केले. कमी दिले मिळाले तर जाऊ दे, त्याच्या
बदल्यात केवढी राजाई मिळाली. बाबा (ब्रह्मा बाबा) सांगतात - ‘मला विनाशाचा आणि
राजाईचा साक्षात्कार झाला तर किती आनंद झाला. मला विश्वाची बादशाही मिळणार आहे
त्याच्यापुढे हे सर्व काय आहे. असे थोडेच कोणी उपाशी मरेल, बिना पैसेवाले देखील पोट
तर भरतातच ना. मम्मा ने काही आणले का. मम्माला किती आठवण करतात. बाबा म्हणतात -
आठवण करता हे तर ठीक आहे, परंतु आता मम्माच्या नावा-रूपाची आठवण करायची नाही.
आपल्याला देखील तिच्यासारखी धारणा करायची आहे. आपण देखील मम्मासारखे चांगले बनून
गादी लायक बनणार. फक्त मम्माची महिमा केल्याने थोडेच तिच्यासारखे व्हाल. बाबा तर
म्हणतात - मामेकम् (मज एकाची) आठवण करा, आठवणीच्या यात्रेमध्ये रहायचे आहे.
मम्मासारखे ज्ञान ऐकवायचे आहे. मम्माच्या महिमेचा पुरावा मिळेल जेव्हा तुम्ही देखील
असे महिमा लायक बनून दाखवाल. फक्त ‘मम्मा-मम्मा’ म्हटल्याने पोट भरणार नाही. अजूनच
पोट पाठीला लागेल. शिवबाबांची आठवण केल्याने पोट भरेल. या दादाची (ब्रह्मा बाबांची)
आठवण केल्याने पोट भरणार नाही. आठवण करायची आहे एकाची. बलिहारी एकाची आहे. सेवेच्या
युक्त्या रचल्या पाहिजेत. सदैव मुखावाटे फुले निघावीत. जर काटे, दगड निघत असतील तर
दगड ते दगडच राहीलात. खूप चांगले गुण धारण करायचे आहेत. तुम्हाला इथे सर्वगुण
संपन्न बनायचे आहे. सजा खाल तर मग चांगले पद मिळणार नाही. इथे मुले येतात बाबांकडून
डायरेक्ट ऐकण्याकरिता. इथे बाबा ताजा-ताजा नशा चढवतात. सेंटरवर नशा चढतो आणि मग घरी
गेले, नातलग इत्यादींना बघितले आणि संपलेच. इथे तर तुम्ही समजता आम्ही बाबांच्या
परिवारामध्ये बसलो आहोत. तिथे (जुन्या दुनियेमध्ये) आसुरी परिवार असतो. किती भांडणे
इत्यादी असतात. तिथे गेल्यानेच कचरापट्टीमध्ये जाऊन पडतात. इथे तर तुम्ही बाबांना
विसरायचे देखील नाहीये. दुनियेमध्ये खरी शांती कोणालाही मिळू शकत नाही. पवित्रता,
सुख, शांती, संपत्ती बाबांशिवाय इतर कोणीही देऊ शकत नाही. असे नाही की बाबा
आशीर्वाद देतात - ‘आयुष्यमान भव’, ‘पुत्रवान भव’. नाही, आशीर्वादाने काहीच मिळत नाही.
ही लोकांची चूक आहे. संन्यासी इत्यादी देखील आशीर्वाद करू शकत नाहीत. आज आशीर्वाद
देतात आणि उद्या स्वतःच मरून जातात. पोप देखील बघा किती होऊन गेले आहेत. गुरु
लोकांची गादी चालते, लहानपणीच मरून जातात तर मग दुसरा करतात किंवा छोट्या चेल्याला
गुरु बनवतात. हे तर बापदादा आहेत देणारे. हे घेऊन काय करतील. बाबा तर निराकार आहेत
ना. घेतील साकारमध्ये असणारे. ही देखील समजून घेण्याची गोष्ट आहे. असे कधीही म्हणता
कामा नये की, आम्ही शिवबाबांना देतो. नाही, आम्ही शिवबाबांकडून पदम घेतले आहे,
दिलेले नाही. बाबा तर तुम्हाला अगणित देतात. शिवबाबा तर दाता आहेत, तुम्ही त्यांना
कसे देणार? ‘मी दिले’, असे समजल्याने मग देह-अभिमान येतो. आपण शिवबाबांकडून घेत
आहोत. बाबांकडे इतकी असंख्य मुले येतात, येऊन राहतात तर प्रबंध पाहिजे ना. तर जणू
तुम्ही देता स्वतःसाठी. त्यांना आपल्यासाठी थोडेच काही करायचे आहे. राजधानी देखील
तुम्हाला देतात म्हणून करता देखील तुम्हीच आहात. तुम्हाला माझ्या पेक्षाही उच्च
बनवतो. अशा बाबांना तुम्ही विसरून जाता. अर्धाकल्प - पूज्य, अर्धाकल्प - पुजारी.
पूज्य बनल्याने तुम्ही सुखधामचे मालक बनता आणि मग पुजारी बनल्याने दुःखधामचे मालक
बनता. हे देखील कोणाला माहित नाही आहे की, बाबा केव्हा येऊन स्वर्गाची स्थापना
करतात. या गोष्टींना तुम्ही संगम-युगी ब्राह्मणच जाणता, बाबा इतक्या चांगल्या रीतीने
समजावून सांगतात तरी देखील बुद्धीमध्ये येत नाही. जसे बाबा समजावून सांगतात तसे
युक्तीने समजावून सांगितले पाहिजे. पुरुषार्थ करून असे श्रेष्ठ बनायचे आहे. बाबा
मुलांना म्हणतात की, मुलांमध्ये खूप चांगले दैवी गुण असले पाहिजेत. कोणत्याही
गोष्टीवरून नाराज व्हायचे नाही, चेहरा मुडद्यासारखा करायचा नाही. बाबा म्हणतात - आता
असे कोणतेही काम करू नका. चंडीका देवीची देखील जत्रा भरते. चंडिका त्यांना म्हणतात
ज्या बाबांच्या मतावर चालत नाहीत. ज्या दुःख देतात, अशा चंडिकांची देखील जत्रा भरते.
मनुष्य अज्ञानी आहेत ना, अर्थ थोडेच समजतात. कोणातही ताकद नाही, ते तर जसे खोखले
आहेत (दिखाऊ आहेत). तुम्ही बाबांची चांगल्या रीतीने आठवण करता तर बाबांद्वारे
तुम्हाला ताकद मिळते. परंतु इथे राहून देखील अनेकांची बुद्धी बाहेर भटकत राहते;
म्हणून बाबा म्हणतात - इथे चित्रांच्या समोर बसून रहा तर तुमची बुद्धी यामध्ये बिझी
राहील. गोळ्याच्या चित्रावर शिडीच्या चित्रावर कोणालाही समजावून सांगाल तर बोला -
सतयुगामध्ये फार थोडे मनुष्य असतात. आता तर असंख्य मनुष्य आहेत. बाबा म्हणतात - मी
ब्रह्माद्वारे नवीन दुनियेची स्थापना करतो, जुन्या दुनियेचा विनाश करवितो. अशा
प्रकारे बसून प्रॅक्टिस केली पाहिजे. आपले तोंड आपणच उघडू शकता. आतमध्ये (मनामध्ये)
जे चालते त्याला बाहेर देखील काढले पाहिजे. मुके तर नाही आहात ना. तर घरी आरडाओरडा
करण्यासाठी तोंड उघडते, ज्ञान सांगण्यासाठी उघडत नाही! चित्र तर सर्वांना मिळू
शकतात, हिम्मत ठेवली पाहिजे - आपल्या घराचे कल्याण करावे. आपली खोली चित्रांनी सजवा
तर तुम्ही बिझी रहाल. ही जशी तुमची लायब्ररी होईल. दुसऱ्यांचे कल्याण करण्यासाठी
चित्रे इत्यादी लावली पाहिजेत. जे येतील त्यांना समजावून सांगा. तुम्ही खूप सेवा करू
शकता. थोडे जरी ऐकले तरी प्रजा बनतील. बाबा उन्नतीच्या इतक्या युक्त्या सांगतात.
बाबांची आठवण करा तर तुमची विकर्म विनाश होतील. बाकी गंगेमध्ये जाऊन अगदी बुडून
राहिलात तरी देखील विकर्म विनाश होणार नाहीत. या सर्व आहेत अंधश्रद्धा.
हरिद्वारमध्ये तर साऱ्या शहराची घाण येऊन गंगेमध्ये पडते. सागरामध्ये किती घाण पडते.
नद्यांमध्ये देखील कचरा पडत राहतो, त्याने मग पावन कसे बनू शकाल. मायेने सर्वांना
एकदम निर्बुद्ध बनवले आहे.
बाबा मुलांनाच
सांगतात की, माझी आठवण करा. तुमची आत्मा बोलावते ना - ‘हे पतित-पावन या’. तुमच्या
शरीराचे ते लौकिक पिता तर आहेतच. पतित-पावन एक बाबाच आहेत. आता आपण त्या पावन
बनविणाऱ्या बाबांची आठवण करतो. जीवनमुक्तिदाता एकच आहेत, दुसरा कोणीही नाही. इतक्या
सोप्या गोष्टीचा अर्थ देखील कोणी समजत नाहीत. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) मुखावाटे
ज्ञानरत्न काढण्याची प्रॅक्टिस करायची आहे. कधीही मुखा वाटे काटे अथवा दगड काढायचे
नाहीत. आपले आणि घराचे कल्याण करण्यासाठी घरामध्ये चित्रे सजवून लावायची आहेत,
त्यावर विचार सागर मंथन करून इतरांना समजावून सांगायचे आहे. बिझी रहायचे आहे.
२) बाबांकडून
आशीर्वाद मागण्याऐवजी त्यांच्या श्रेष्ठ मतावर चालायचे आहे. बलिहारी शिवबाबांची आहे
त्यामुळे त्यांचीच आठवण करायची आहे. हा अभिमान येऊ नये की आपण बाबांना इतके दिले.
वरदान:-
बाप समान
स्थिती द्वारा समयाला समीप आणणारे तत त्वम् चे वरदानी भव
‘माझे’पणाची भावना
नष्ट करणे अर्थात बाप समान स्थितीमध्ये स्थित होऊन समयाला समीप आणणे आहे. जिथे
आपल्या देहामध्ये अथवा आपल्या कोणत्याही वस्तूमध्ये ‘माझे’पणा असेल तिथे समानतेमध्ये
परसेंटेज आहे, परसेंटेज अर्थात डिफेक्ट, असा डिफेक्टवाला कधीही परफेक्ट बनू शकत नाही.
परफेक्ट बनण्यासाठी बाबांच्या प्रेमामध्ये सदा लवलीन होऊन रहा. सदैव प्रेमामध्ये
लवलीन राहिल्याने सहजच इतरांना देखील आप-समान आणि बाप-समान बनवू शकाल. बापदादा
आपल्या लवली आणि लवलीन राहणाऱ्या मुलांना नेहमी तत त्वम् चे वरदान देतात.
बोधवाक्य:-
एकमेकांच्या
विचारांना रिगार्ड द्या तर स्वतःचे रेकॉर्ड चांगले बनेल.
अव्यक्त इशारे:- स्वयं
प्रति आणि सर्वांप्रती मनसाद्वारे योगाच्या शक्तींचा प्रयोग करा.
मनसा सेवेसाठी मन,
बुद्धी व्यर्थ विचार करण्यापासून मुक्त असली पाहिजे. ‘मनमनाभव’च्या मंत्राचे सहज
स्वरूप असले पाहिजे, ज्या श्रेष्ठ आत्म्यांची मनसा अर्थात संकल्प श्रेष्ठ आणि
शक्तिशाली आहेत, शुभ-भावना, शुभ-कामनावाले आहेत ते मनसाद्वारे शक्तींचे दान देऊ
शकतात.