05-02-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड
मुलांनो - बाबा आले आहेत तुम्हाला रावण राज्यामधून लिबरेट करून सद्गती देण्याकरिता,
नरकवासियांना स्वर्गवासी बन वि ण्याकरिता”
प्रश्न:-
बाबांनी तुम्हा
भारतवासी मुलांना कोण-कोणत्या आठवणी करून दिल्या आहेत?
उत्तर:-
हे भारतवासी मुलांनो! तुम्ही स्वर्गवासी होता. आजपासून ५ हजार वर्षांपूर्वी भारत
स्वर्ग होता, हिऱ्या-सोन्याचे महाल होते. तुम्ही साऱ्या विश्वाचे मालक होता. धरती
आकाश सर्व तुमचे होते. भारत शिवबाबांनी स्थापन केलेले शिवालय होते. तिथे पवित्रता
होती. आता पुन्हा असा भारत बनणार आहे.
गीत:-
नयन हीन को
राह दिखाओ प्रभू...
ओम शांती।
गोड-गोड रुहानी मुलांनी हे गाणे ऐकले. कोणी सांगितले? आत्म्यांच्या रुहानी बाबांनी.
तर रुहानी बाबांना रुहानी मुलांनी म्हटले की, ‘ओ बाबा’. त्यांना ईश्वर देखील म्हटले
जाते, पिता देखील म्हटले जाते. कोणता पिता? परमपिता कारण दोन पिता आहेत - एक लौकिक,
दुसरा पारलौकिक. लौकिक पित्याची मुले पारलौकिक पित्याला बोलवतात - ‘ओ बाबा’. अच्छा,
बाबांचे नाव काय? शिव. ते तर निराकार रूपामध्ये पुजले जातात. त्यांना म्हटले जाते
सुप्रीम फादर (परम पिता). लौकिक पित्याला सुप्रीम म्हटले जात नाही. उच्च ते उच्च
सर्व आत्म्यांचे पिता एकच आहेत. सर्व जीव आत्मे त्या पित्याची आठवण करतात. आत्मे हे
विसरले आहेत की आपला पिता कोण आहे? बोलावतात - ओ गॉड फादर, आम्हा नयनहीन असणाऱ्यांना
नेत्र द्या, तर आम्ही आपल्या पित्याला ओळखू. भक्तीमार्गाच्या खस्ता खाण्यापासून
सोडवा. सद्गती साठी, तिसरा नेत्र घेण्यासाठी, बाबांना भेटण्यासाठी बोलावतात कारण
बाबाच कल्प-कल्प भारतामध्ये येऊन भारताला स्वर्ग बनवतात. आता कलियुग आहे, कलियुगा
नंतर सतयुग येणार आहे. हे आहे पुरुषोत्तम संगमयुग. बेहदचे बाबा येऊन जे पतित
भ्रष्टाचारी बनले आहेत त्यांना पुरुषोत्तम बनवतात. हे (लक्ष्मी-नारायण) पुरुषोत्तम
भारतामध्ये होते. लक्ष्मी-नारायणाच्या डिनायस्टीचे (घराण्याचे) राज्य होते. आज
पासून ५ हजार वर्षांपूर्वी सतयुगामध्ये श्री लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते. याची
मुलांना आठवण करून देत आहेत. तुम्ही भारतवासी आजपासून ५ हजार वर्षांपूर्वी
स्वर्गवासी होता. आता तर सर्व नरकवासी आहेत. आजपासून ५ हजार वर्षांपूर्वी भारत
स्वर्ग होता. भारताची खूप महिमा होती, हिरे-सोन्याचे महाल होते. आता तर काहीच नाही
आहे. त्यावेळी दुसरा कोणताही धर्म नव्हता, फक्त सूर्यवंशीच होते. चंद्रवंशी देखील
नंतर येतात. बाबा समजावून सांगत आहेत तुम्ही सूर्यवंशी घराण्याचे होता. आजपर्यंत
सुद्धा या लक्ष्मी-नारायणाची मंदिरे बनवत राहतात. परंतु लक्ष्मी-नारायणाचे राज्य
केव्हा होते, कसे मिळवले, हे कोणालाही माहित नाही. पूजा करतात परंतु जाणत नाहीत. तर
अंधश्रद्धा झाली ना. शिवाची, लक्ष्मी-नारायणाची पूजा करतात, आणि बायोग्राफी (जीवन
चरित्राला) जाणत नाहीत. आता भारतवासी स्वतः म्हणतात - आम्ही पतित आहोत. आम्हा
पतितांना पावन बनविणारे बाबा या, येऊन आम्हाला दुःखांपासून, रावण राज्यातून लिबरेट
करा (मुक्त करा). बाबाच येऊन सर्वांना मुक्त करतात. मुले जाणतात - खरोखर सतयुगामध्ये
एक राज्य होते. बापूजी देखील म्हणत होते आम्हाला पुन्हा रामराज्य पाहिजे, गृहस्थ
धर्म जो पतित बनला आहे तो पावन पाहिजे. आम्ही स्वर्गवासी बनू इच्छितो. आता
नरकवासीयांचे काय हाल झाले आहेत, पहात आहात ना. याला म्हटले जाते - हेल (नरक), आसुरी
दुनिया. हाच भारत डीटी वर्ल्ड (दैवी दुनिया) होता. बाबा बसून समजावून सांगत आहेत -
तुम्ही ८४ जन्म घेतले आहेत, ८४ लाख नाहीत. बाबा म्हणतात - तुम्ही मूलतः शांतीधामचे
राहणारे आहात. इथे तुम्ही पार्ट बजावण्यासाठी आला आहात. ८४ जन्मांचा पार्ट बजावला
आहे. पुनर्जन्म तर जरूर घ्यावा लागेल ना. ८४ पुनर्जन्म असतात.
आता बेहदचे बाबा आले
आहेत तुम्हा मुलांना बेहदचा वारसा देण्यासाठी. तुम्हा मुलांसोबत (आत्म्यांसोबत)
बोलत आहेत. इतर सत्संगांमध्ये मनुष्य, मनुष्याला भक्तिमार्गाच्या गोष्टी ऐकवतात.
अर्धा कल्प भारत जेव्हा स्वर्ग होता तेव्हा एकही पतित नव्हता. या वेळी एकही पावन
नाही. ही आहेच पतित दुनिया. गीतेमध्ये श्रीकृष्ण भगवानुवाच असे लिहिले आहे. त्याने
काही गीता ऐकवलेली नाहीये. हे लोक आपल्या धर्मशास्त्राला देखील जाणत नाहीत. आपल्या
धर्मालाच विसरून गेले आहेत. हिंदू काही धर्म नाहीये. मुख्य चार धर्म आहेत. पहिला आहे
आदि सनातन देवी-देवता धर्म. सूर्यवंशी आणि चंद्रवंशी दोन्ही मिळून म्हटले जाते
देवी-देवता धर्म, डीटीज्म. तिथे दुःखाचे नावही नव्हते. २१ जन्म तर तुम्ही
सुखधाममध्ये होता, नंतर रावण राज्य, भक्तिमार्ग सुरू होतो. भक्तिमार्ग आहेच खाली
उतरण्याचा मार्ग. भक्ती आहे - रात्र, ज्ञान आहे - दिवस. आता आहे घोर अंधाराची रात्र.
शिवजयंती आणि शिवरात्री, दोन्ही शब्द येतात. शिवबाबा कधी येतात? जेव्हा रात्र होते.
जेव्हा भारतवासी घोर अंधारामध्ये येऊन पोचतात तेव्हा बाबा येतात. बाहुल्यांची पूजा
करत राहतात, एकाचीही बायोग्राफी (जीवन चरित्र) जाणत नाहीत. भक्तीमार्गाची शास्त्रे
देखील बनणारच आहेत. हा ड्रामा, सृष्टीचक्राला देखील समजून घ्यायचे आहे.
शास्त्रांमध्ये हे ज्ञान नाहीये. ते आहे भक्तीचे ज्ञान, तत्त्वज्ञान. ते काही
सद्गतीचे ज्ञान नाहीये. बाबा म्हणतात - मी येऊन तुम्हाला ब्रह्मा द्वारे यथार्थ
ज्ञान ऐकवतो. बोलावतात देखील, आम्हाला सुखधाम, शांतीधामचा रस्ता सांगा. बाबा
म्हणतात - आजपासून ५ हजार वर्षांपूर्वी सुखधाम होते, ज्यामध्ये तुम्ही सार्या
विश्वावर राज्य करत होता. सूर्यवंशी घराण्याचे राज्य होते. बाकी सर्व आत्मे
शांतीधाममध्ये होते. तिथे ९ लाख गायले जातात. तुम्हा मुलांना आजपासून ५ हजार
वर्षांपूर्वी खूप श्रीमंत बनवले होते. एवढे धन दिले होते मग ते तुम्ही कुठे गमावले?
तुम्ही किती श्रीमंत होता. आता याला भारत कोण म्हणेल. भारतच सर्वात उच्च ते उच्च
खंड आहे. वास्तविक हे सर्वांचे तीर्थस्थान आहे, कारण पतित-पावन बाबांचे जन्मस्थान
आहे. जे पण धर्म आहेत, सर्वांची बाबा येऊन सद्गती करतात. आता रावणाचे राज्य साऱ्या
सृष्टीमध्ये आहे, फक्त लंकेमध्येच नव्हते. सर्वांमध्ये ५ विकारांचा प्रवेश आहे.
जेव्हा सूर्यवंशी राज्य होते तेव्हा हे विकारच नव्हते. भारत व्हाईसलेस (निर्विकारी)
होता. आता विशश (विकारी) आहे. सतयुगामध्ये दैवी संप्रदाय होता. तेच मग ८४ जन्म
भोगून आता आसुरी संप्रदायाचे बनले आहेत नंतर मग दैवी संप्रदायाचे बनतात. भारत खूप
श्रीमंत होता. आता गरीब बनला आहे म्हणून भीक मागत आहेत.
बाबा म्हणतात - तुम्ही
किती श्रीमंत होता. तुमच्यासारखे सुख कोणालाच मिळू शकत नाही. तुम्ही साऱ्या विश्वाचे
मालक होता, धरती-आकाश सर्व काही तुमचे होते. बाबा आठवण करून देत आहेत, भारत
शिवबाबांनी स्थापन केलेले शिवालय होते. तिथे पवित्रता होती, त्या नव्या दुनियेमध्ये
देवी-देवता राज्य करत होते. भारतवासी तर हे देखील जाणत नाहीत की, राधे-कृष्णाचे
आपसात काय नाते आहे? दोघेही वेगवेगळ्या राजधानीचे होते आणि स्वयंवरानंतर
लक्ष्मी-नारायण बनले आहेत. हे ज्ञान कोणत्याही मनुष्यामध्ये नाही. परमपिता
परमात्माच ज्ञानाचे सागर आहेत, तेच तुम्हाला हे रुहानी ज्ञान देत आहेत, हे
अध्यात्मिक ज्ञान केवळ एक बाबाच देऊ शकतात. आता बाबा म्हणतात - आत्म-अभिमानी बना.
मज आपल्या परमपिता परमात्मा शिवची आठवण करा. आठवण केल्यानेच सतोप्रधान बनाल. तुम्ही
इथे येताच मुळी मनुष्यापासून देवता अथवा पतितापासून पावन बनण्यासाठी. आता हे आहे
रावण राज्य. भक्तीमार्गामध्ये रावण राज्य सुरू होते. रावणाने काही एका सीतेला
चोरलेले नाही. तुम्ही सर्व भक्ती करणारे, रावणाच्या पंजामध्ये आहात. सारी सृष्टी ५
विकार रुपी रावणाच्या कैदमध्ये आहे. सर्वजण शोक वाटीकेमध्ये दुःखी आहेत. बाबा येऊन
सर्वांना लिबरेट (मुक्त) करतात. आता बाबा पुन्हा स्वर्ग बनवत आहेत. असे नाही की
ज्यांच्याजवळ खूप धन आहे, ते स्वर्गामध्ये आहेत. नाही, आता आहेच मुळी नरक. सर्वजण
पतित आहेत म्हणून गंगेमध्ये जाऊन स्नान करतात, समजतात गंगा पतित-पावनी आहे. परंतु
पावन तर कोणीही बनत नाही. पतित-पावन तर बाबांनाच म्हटले जाते, नद्यांना नाही. हा
सर्व आहे भक्तिमार्ग. बाबाच येऊन या गोष्टी समजावून सांगतात. आता तुम्ही हे तर जाणता
की, एक आहे लौकीक पिता, दुसरे मग प्रजापिता ब्रह्मा आहेत अलौकिक पिता आणि ते (शिवबाबा)
आहेत पारलौकिक पिता. तीन पिता आहेत. शिवबाबा, प्रजापिता ब्रह्माद्वारे ब्राह्मण
धर्म स्थापन करतात. ब्राह्मणांना देवता बनविण्यासाठी राजयोग शिकवतात. बाबा एकदाच
येऊन आत्म्यांना राजयोग शिकवतात. आत्मे पुनर्जन्म घेतात. आत्माच म्हणते - मी एक
शरीर सोडून दुसरे घेते. बाबा म्हणतात - स्वतःला आत्मा समजून मज पित्याची आठवण करा
तर तुम्ही पावन बनाल. कोणत्याही देहधारीची आठवण करू नका. आता हा आहे मृत्यू लोकाचा
अंत. अमरलोकची स्थापना होत आहे. बाकी इतर अनेक धर्म नष्ट होतील. सतयुगामध्ये एकच
देवता धर्म होता. नंतर त्रेतामध्ये चंद्रवंशी राम-सीता. तुम्हा मुलांना संपूर्ण
चक्राची आठवण करून देत आहेत. शांतीधाम, सुखधामची स्थापना बाबाच करतात. मनुष्य,
मनुष्याला सद्गती देऊ शकत नाहीत. ते सर्व आहेत भक्ती मार्गातील गुरु. भक्ती
मार्गामध्ये मनुष्य अनेक प्रकारची चित्रे (मुर्त्या) बनवून पूजा करून नंतर जाऊन
म्हणतात - ‘बुडून जा, बुडून जा’. खूप पूजा करतात, खाऊ-पिऊ घालतात, आता खातात तर
ब्राह्मण लोकच. याला म्हटले जाते बाहुल्यांची पूजा. किती अंधश्रद्धा आहे. आता
त्यांना कोण समजावून सांगेल.
बाबा म्हणतात - आता
तुम्ही आहात ईश्वरीय संतान. तुम्ही आता बाबांकडून राजयोग शिकत आहात. ही राजधानी
स्थापन होत आहे. प्रजा तर पुष्कळ बनणार आहे. कोटींमध्ये कोणीतरी राजा बनतात.
सतयुगाला म्हटले जाते फुलांचा बगीचा. आता आहे काट्यांचे जंगल. आता रावण राज्य बदलत
आहे. हा विनाश होणारच आहे. हे ज्ञान आता फक्त तुम्हा ब्राह्मणांना मिळत आहे.
लक्ष्मी-नारायणाला देखील हे ज्ञान असत नाही. हे ज्ञान प्रायः लोप होते. भक्ती
मार्गामध्ये कोणीही बाबांना जाणत नाही. बाबाच रचता आहेत. ब्रह्मा-विष्णु-शंकर देखील
रचना आहेत. परमात्मा सर्वव्यापी म्हटल्याने सर्व पिता होऊन जातात. वारशाचा हक्क
राहत नाही. बाबा तर येऊन सर्व मुलांना वारसा देतात. सर्वांचे सद्गती दाता एक बाबाच
आहेत. हे देखील समजावून सांगितले आहे की, ८४ जन्म तेच घेतात जे सर्वप्रथम
सतयुगामध्ये येतात. ख्रिश्चन लोकांचे जन्म किती असतील? फारफार तर ४० जन्म असतील. हा
हिशोब काढला जातो. एका भगवंताला शोधण्यासाठी किती खस्ता खातात. तुम्ही आता खस्ता
खाणार नाही. तुम्हाला फक्त एका बाबांची आठवण करायची आहे. ही आहे आठवणीची यात्रा. ही
आहे पतित-पावन गॉड फादरली युनिव्हर्सिटी (ईश्वरीय विद्यापीठ). तुमची आत्मा शिकते.
मग साधू-संत म्हणतात - आत्मा निर्लेप आहे. अरे आत्म्यालाच कर्मानुसार दुसरा जन्म
घ्यावा लागतो. आत्माच चांगले अथवा वाईट काम करते. यावेळी तुमचे कर्म विकर्म होते.
तिथे (स्वर्गामध्ये) कर्म अकर्म होतात. तिथे विकर्म होत नाहीत. ती आहे
पुण्य-आत्म्यांची दुनिया. या सर्व समजून घेण्याच्या आणि समजावून सांगण्याच्या गोष्टी
आहेत. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१)
काट्यांपासून फूल बनून फुलांचा बगीचा (सतयुग) स्थापन करण्याची सेवा करायची आहे.
कोणतेही वाईट कर्म करायचे नाही.
२) आत्मिक ज्ञान जे
बाबा ऐकवत आहेत तेच सर्वांना ऐकवायचे आहे. आत्म-अभिमानी बनण्याची मेहनत करायची आहे.
एका बाबांचीच आठवण करायची आहे, कोणत्याही देहधारीची नाही.
वरदान:-
निंदा-स्तुती,
जय-पराजयामध्ये समान स्थिती ठेवणारे बाप समान संपन्न आणि संपूर्ण भव
जेव्हा आत्म्याची
संपूर्ण आणि संपन्न स्थिती बनते तर निंदा-स्तुती, जय-पराजय, सुख-दुःख सर्वांमध्ये
समानता राहते. दुःखामध्ये देखील चेहरा आणि मस्तकावर दुःखाच्या आठ्या ऐवजी सुख आणि
आनंदाच्या रेषा दिसाव्यात, निंदा ऐकत असताना देखील अनुभव व्हावा की ही निंदा नाही,
संपूर्ण स्थितीला परिपक्व बनविण्याकरिता हे महिमा योग्य शब्द आहेत - अशी समानता
असावी तेव्हा म्हटले जाईल बाप समान. वृत्तीमध्ये जरा देखील हे येऊ नये की हे दुश्मन
आहेत, शिव्या देणारे आहेत आणि हे महिमा करणारे आहेत.
बोधवाक्य:-
निरंतर योग
अभ्यासावर लक्ष द्या तेव्हाच फर्स्ट डिव्हिजनमध्ये नंबर मिळेल.
हे अव्यक्त इशारे:-
एकता आणि विश्वासाच्या विशेषतेद्वारे सफलता संपन्न बना.
ब्राह्मण परिवाराची
विशेषता आहे - अनेक असताना देखील एक. तुमच्या सर्व सेवाकेंद्रांचे व्हायब्रेशन असे
असावे जे सर्वांना हा अनुभव व्हावा की हे अनेक नाहीत परंतु एकच आहेत. तुमचे एकतेचे
व्हायब्रेशन साऱ्या विश्वामध्ये एक धर्म, एक राज्य स्थापन करेल. तर विशेष अटेंशन
देऊन भिन्नतेला समाप्त करून एकता प्रस्थापित करा.