05-06-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - बाबांच्या सोबत तेव्हाच जाऊ शकाल जेव्हा या जुन्या दुनियेशी बेहदचे वैराग्य असेल”

प्रश्न:-
स्वयं भगवान समर्थ असताना देखील त्यांनी रचलेल्या यज्ञामध्ये विघ्ने का पडतात?

उत्तर:-
कारण की रावण भगवंतापेक्षाही तीखा (शक्तिशाली) आहे. त्यामुळे जेव्हा त्याचे राज्य हिरावून घेतले जाईल तर जरूर तो विघ्न उत्पन्न करणारच. सुरुवातीपासून ड्रामा अनुसार या यज्ञामध्ये विघ्ने पडतच आली आहेत, आणि पडणारच आहेत. आपण पतित दुनियेमधून पावन दुनियेमध्ये ट्रान्सफर होत आहोत तर पतित मनुष्य जरूर विघ्ने उत्पन्न करणारच.

गीत:-
ओ दूर के मुसाफिर…

ओम शांती।
गोड-गोड रुहानी (आत्मिक) मुलांनी गाण्याची ओळ ऐकली. ज्याप्रमाणे वेद-शास्त्र इत्यादी भक्तिमार्गाचा रस्ता दाखवतात, त्याचप्रमाणे गाणी देखील थोडा मार्ग दाखवतात. ते (दुनियावाले) तर काहीच समजत नाहीत. शास्त्रांमधील कथा इत्यादी ऐकणे, तो तर जसा कनरस आहे. आता मुले जाणतात - दूर देशाचा प्रवासी कोणाला म्हटले जाते. आत्मा जाणते - आम्ही देखील दूरचे प्रवासी आहोत, आमचे घर शांतीधाम आहे. मनुष्यांना जर या गोष्टी समजल्या नाहीत तर जणू त्यांना काहीच समजलेले नाही. बाबांना न जाणल्यामुळे सृष्टी चक्राला देखील कोणीही जाणत नाही. हे आत्मा समजते की, शिवबाबा म्हणतात - ‘मी टेम्पररी जीव-आत्मा बनतो. तुम्ही स्थायी जीव-आत्मा आहात’. मी फक्त संगमावरच टेम्पररी जीव-आत्मा आहे. ते देखील तुमच्यासारखा बनत नाही (विकारातून जन्म घेत नाही). मी स्वतःचा परिचय देण्यासाठी या जीवामध्ये (ब्रह्मा तनामध्ये) प्रवेश करतो. नाही तर तुम्हाला परिचय कसा मिळणार? बाबांनी समजावून सांगितले आहे - रुहानी बाबा एकच आहेत, ज्यांना शिवबाबा किंवा भगवान म्हणतात. बाकीचे कोणीही जाणत नाहीत. यामध्ये पवित्रता देखील बंधनकारक आहे. सर्वात जास्त बंधनकारक आहे स्वतःला आत्मा समजणे; ज्या दूरदेशच्या प्रवाशाची, पतित-पावनची भक्तिमार्गामध्ये आठवण करतात. ते रुहानी बाबा समजावून सांगत आहेत की, मी सर्वांना घेऊन जाणार. कोणालाही सोडून जाणार नाही, परत तर सर्वांना जायचे आहे. प्रलय देखील होणार नाहीये. भारत खंड तर राहतोच. भारत खंडाचा कधीही विनाश होत नाही. सतयुगाच्या आदि काळामध्ये फक्त भारत खंडच असतो. कल्पाच्या संगमावर जेव्हा बाबा येतात तेव्हा आदि सनातन देवी-देवता धर्म स्थापन करावा लागतो. बाकी सर्व धर्म नष्ट होणार आहेत. तुम्ही देखील आदि सनातन देवी-देवता धर्म स्थापन करण्यामध्ये मदत करत आहात. तर तुम्ही गाणे ऐकलेत, म्हणतात - बाबा, आम्हाला देखील सोबत घेऊन जा. बाबा म्हणतात - असे सोबत कोणीही येऊ शकत नाही, जोपर्यंत जुन्या दुनियेबद्दल वैराग्य येत नाही. नवीन घर बनते तेव्हा जुन्या घरावरील प्रेम नष्ट होते. तुम्ही देखील जाणता ही जुनी दुनिया नष्ट होणार आहे. आता नवीन दुनियेमध्ये जायचे आहे. जोपर्यंत सतोप्रधान बनणार नाही तोपर्यंत

सतोप्रधान देवी-देवता बनू शकणार नाही; म्हणून बाबा वारंवार समजावून सांगत आहेत - स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करत राहा. सद्गती करणारा दूरचा एकच प्रवासी आलेला आहे, त्यांना दुनिया ओळखत नाही. सर्वव्यापी म्हटले आहे. आता तुम्ही मुले नंबरवार पुरुषार्थानुसार जाणता की आपण शिवबाबांची संतान आहोत. येता देखील तेव्हा समजता की, आम्ही बापदादांकडे जात आहोत, तर ही फॅमिली झाली. ही आहे ईश्वरीय फॅमिली. एखाद्याला भरपूर मुले असतात तर मोठी पलटण बनते. शिवबाबांची मुले जे इतके बी. के. भाऊ-बहिणी आहेत, ही देखील मोठी पलटण बनते. ब्रह्माकुमार-कुमारी सर्वजण जाणतात - आम्ही बेहदच्या बाबांकडून वारसा घेत आहोत. शास्त्रांमध्ये दाखवतात की पांडव आणि कौरव द्यूत खेळले. राज्य पणाला लावले. आता राज्य ना कौरवांचे आहे, ना पांडवांचे आहे. मुकुट इत्यादी काहीच नाहीये. दाखवतात की, त्यांना शहरातून हद्दपार करण्यात आले, शस्त्रास्त्रे इत्यादी लपवून ठेवली गेली. या सर्व आहेत दंतकथा. ना पांडवांचे राज्य आहे, ना कौरवांचे राज्य आहे. ना त्यांचे आपसात युद्ध झाले आहे. लढाई तर राजांमध्ये लागते, हे तर भाऊ-भाऊ आहेत. लढाई झाली आहे कौरव आणि यवनांची. बाकी भावंडे एकमेकांना कसे काय मारतील? दाखवतात - पांडव, कौरव भांडले. शेवटी ५ पांडव उरले आणि एक कुत्रा राहिला. ते देखील सगळे पहाडावर विरघळून मेले. सारा खेळच संपला. राजयोगाचा अर्थच निघाला नाही.

आता तुम्ही मुले जाणता बाबा कल्प-कल्प येऊन एका धर्माची स्थापना करतात. बोलावतात देखील - हे पतित-पावन बाबा या, येऊन पतितापासून पावन बनवा. सतयुगामध्ये सूर्यवंशी राजधानीच असते. ब्रह्माद्वारे विष्णूपुरीची स्थापना होत आहे. आता बाबा आले आहेत तर त्यांच्या डायरेक्शनवर चालायचे आहे. कमलपुष्प समान पवित्र राहायचे आहे. कन्यांना तर असे म्हणणार नाही की, गृहस्थ व्यवहारामध्ये राहून कमलपुष्प समान राहा. त्या तर आहेतच पवित्र. हे गृहस्थींसाठी सांगितले जाते. कुमार आणि कुमारींनी तर लग्नच करता कामा नये. नाही तर त्या देखील गृहस्थी होऊन जातील. एक गंधर्व विवाहाचे नाव देखील आहे. कन्येला मार मिळतो तेव्हा लाचारीच्या परिस्थितीत गंधर्व विवाह करविला जातो. वास्तविक मार देखील सहन केला पाहिजे, परंतु अधरकुमारी बनता कामा नये. बाल ब्रह्मचाऱ्याचा खूप मोठा मान असतो. लग्न केले तर हाफ पार्टनर झाले. कुमारांना सांगितले जाते - तुम्ही तरी पवित्र राहा. गृहस्थव्यवहारवाल्यांना म्हटले जाते - गृहस्थ व्यवहारामध्ये राहून कमलपुष्प समान बना. त्यांनाच मेहनत करावी लागते. लग्न न केल्यामुळे बंधन राहणार नाही. कन्येला तर शिकायचे आहे आणि ज्ञानामध्ये खूप मजबूत होऊन राहायचे आहे. लहान कुमारिका ज्या अल्पवयीन आहेत, त्यांना तर आम्ही घेऊ शकत नाही. त्या आपल्या घरी राहून शिकू शकतात. माता-पिता ज्ञानामध्ये आले तर अल्पवयीन मुलीला घेऊ शकतो. ही तर शाळा म्हटली तर शाळा

आहे, घर म्हटले तर घर आहे आणि सत्संग म्हटले तर सत्संग आहे. सत् अर्थात एक बाबा, ज्यांच्यासाठीच म्हणतात - ‘ओ दूर के मुसाफिर…’ आत्मा गोरी (पावन) बनते. बाबा म्हणतात - मी प्रवासी सदैव गोरा असतो. प्युरिटी मध्ये राहणारा आहे. मी येऊन सर्व आत्म्यांना पवित्र गोरा बनवितो; अजून तर असा कोणी प्रवासी नाहीये. बाबा समजावून सांगत आहेत - मी आलो आहे रावण राज्यामध्ये. हे शरीर देखील परक्याचे आहे. तुमची आत्मा म्हणेल - हे माझे शरीर आहे. बाबा म्हणतील - हे माझे शरीर नाहीये, हे यांचे शरीर आहे. हे पतित शरीर माझे नाहीये. मी येतोच यांच्या अनेक जन्मांच्या अंतिम जन्मामध्ये. जो नंबर वन पावन होता, तोच नंबर लास्ट अर्थात शेवटी विकारी बनतो. पहिला नंबर १६ कला संपूर्ण होता. आता एकही कला राहिलेली नाही. पतित तर सर्व आहेतच. तर बाबा दूरदेशचा प्रवासी झाला ना. तुम्ही आत्मे देखील प्रवासी आहात. इथे येऊन पार्ट बजावता. या सृष्टी चक्राला कोणीही जाणत नाही. भले कोणी कितीही शास्त्र इत्यादी शिकला असेल परंतु हे ज्ञान कोणीही देऊ शकत नाही. बाबा समजावून सांगतात - मी या तनामध्ये प्रवेश करून या आत्म्यांना ज्ञान देतो. ते तर मनुष्य, मनुष्याला शास्त्रांचे ज्ञान देतात. ते झाले भक्त. सद्गती दाता तर एकच आहेत. तेच ज्ञानाचे सागर आहेत, त्याना न जाणल्यामुळे देह-अभिमान येतो. ते कोणी असे तर सांगत नाहीत की, स्वतःला आत्मा निश्चय करा. आत्मा शिकते. हे कोणीही सांगत नाहीत कारण देह-अभिमान आहे. आता दूरचा प्रवासी तर शिवबाबांनाच म्हणणार. तुम्ही जाणता आपण ८४ जन्मांचे चक्र पूर्ण केले आहे.

बाबा म्हणतात - ५ हजार वर्षांपूर्वी देखील समजावून सांगितले होते की मुलांनो, तुम्ही आपल्या जन्मांना जाणत नाही. मी जाणतो - गीतेमध्ये पिठात मिठाप्रमाणे काहीतरी आहे. तोच गीतेचा एपिसोड, तीच महाभारताची लढाई, तेच मनमनाभव-मध्याजी भव चे ज्ञान आहे. मामेकम् (मज एकाची) आठवण करा. लढाई देखील बरोबर झाली आहे. पांडवांचा विजय झाला. विजयी माळा विष्णूची गायली जाते. शास्त्रांमध्ये तर दाखवले आहे पांडव वितळून मेले. मग माळ कुठून बनली? आता तुम्ही समजता की आम्ही विष्णूची माळा बनण्याकरिता इथे आलो आहोत. वरती आहेत पतित-पावन बाबा. त्यांचे यादगार हवे ना. भक्तिमार्गामध्ये यादगार गायले जाते. कोणी ८ ची माळ, कोणी १०८ ची माळ, कोणी १६,१०८ ची माळ बनवली आहे. गातात - ‘चढती कला तेरे भाने सर्व का भला’. आता तुम्ही जाणता - आपली चढती कला आहे. आपण निघून जाऊ आपल्या सुखधाममध्ये; मग तिथून आम्ही खाली कसे उतरतो, ८४ जन्म कसे घेतो, हे सर्व ज्ञान तुमच्या बुद्धीमध्ये आहे. हे ज्ञान विसरता कामा नये. आमची सर्व दुःखे दूर करण्यासाठी, शाप मुक्त करून सुखाचा वारसा देण्याकरिता बाबा आले आहेत. रावणाच्या शापामुळे सर्वांना दुःख होते. तर आता बाबांची आणि वारशाची आठवण करायची आहे. तुम्ही जाणता - आपण सूर्यवंशीयांनी भारतावर राज्य केले. भारतामध्येच शिवबाबा येतात. भारतच स्वर्ग होता, याची वारंवार बुद्धीमध्ये आठवण करावी लागेल. ज्यांनी ८४ जन्मांची फेरी मारली नसेल, ते ना धारणा करतील, ना करवून घेतील; त्याच्याबद्दल असे समजले जाईल की, याने ८४ जन्म घेतलेले नाहीत. ते उशिरा येतात, स्वर्गामध्ये येत नाहीत. सर्वात आधी जाणे तर चांगले आहे ना. नवीन घरात आधी स्वतः राहतात मग भाड्याने देतात. मग ते तर सेकंड हँड झाले ना. सतयुग आहे नवीन दुनिया. त्रेता सेकंड हँड म्हणणार. तर आता बुद्धीमध्ये येते की, आपण स्वर्ग, नवीन दुनियेमध्ये जावे. पुरुषार्थ करायचा आहे, प्रजा देखील बनत जाईल. तुम्हाला समजत जाईल की माळेमध्ये कोण-कोण ओवले जाऊ शकतात. जर कोणाला थेट सांगितले की, तुम्ही येणार नाही तर हार्टफेल होईल (मन दुखावेल) म्हणून सांगितले जाते की पुरुषार्थ करा, स्वतःची तपासणी करा की आपला बुद्धियोग भटकत तर नाही ना! तुमचे शिवबाबांवर प्रेम किती वाढत चालले आहे! म्हणतात देखील - आम्ही बापदादांकडे जातो. शिवबाबांकडून दादांद्वारे वारसा घेण्यासाठी जातो. अशा बाबांकडे तर अनेक वेळा जावे. परंतु गृहस्थ व्यवहार देखील सांभाळायचा आहे. भले खूप श्रीमंत आहेत परंतु इतकी सवड नाही. पूर्ण निश्चय नाही. नाही तर महिना दोन महिन्यांनंतर येऊन रिफ्रेश होऊ शकतात. त्यांना घडोघडी कशिश (आकर्षण) होत राहील. सुईवर गंज चढलेला असतो तेव्हा चुंबक तितकेसे खेचत नाही. ज्यांचा पूर्ण योग असेल त्यांना लगेच आकर्षण वाटेल आणि धावत येतील. जेवढा गंज निघत जाईल, तेवढे आकर्षण वाढत जाईल. आपण चुंबकाला भेटावे. एक गाणे आहे - ‘चाहे मारो, चाहे कुछ भी करो, हम दर से कभी नहीं निकलेंगे…’. परंतु ती अवस्था तर शेवटी होईल. गंज निघालेला असेल तेव्हा ती अवस्था होईल. बाबा म्हणतात - ‘हे आत्म्यांनो, मनमनाभव’; राहा भले आपल्या गृहस्थ व्यवहारामध्ये. असे नाही की पळून येऊन इथेच राहायचे आहे. सागरापाशी ढगांना यायचे आहे - रिफ्रेश होण्याकरिता. मग सेवेवर जायचे आहे. बंधन जेव्हा नष्ट होईल तेव्हा कुठे सेवेवर जाऊ शकतील. आई-वडिलांना आपल्या मुलांचा सांभाळ करायचा आहे. बाबांच्या आठवणीमध्ये राहायचे आहे. पवित्र बनायचे आहे.

बाबांनी समजावून सांगितले आहे - ज्ञान यज्ञामध्ये अनेक प्रकारची विघ्ने पडतात. म्हणतात - ईश्वर तर समर्थ आहे मग विघ्न का? लोकांना ठाऊकच नाहीये, रावण भगवंतापेक्षाही शक्तिशाली आहे. त्याचे राज्य हिरावून घेतले जात आहे त्यामुळे अनेक प्रकारची विघ्ने पडत राहतात. ड्रामा प्लॅननुसार तरीही विघ्ने पडणारच. सुरुवातीपासूनच पतितांची विघ्ने पडतात. शास्त्रांमध्ये देखील लिहिलेले आहे - श्रीकृष्णाला १६१०८ पट्टराण्या होत्या. सर्पाने दंश केला. रामाची सीता चोरली गेली. आता रावण स्वर्गामध्ये कुठून येणार. खोटेपणा तर खूप आहे. म्हणतात की विकाराशिवाय मुले कशी होणार. त्यांना माहितीच नाही - जे वारसा घेणारे असतील तेच येऊन समजून घेतील. तर या ज्ञान यज्ञामध्ये असुरांची विघ्ने पडतात. पतिताला असुर म्हटले जाते. आहेच मुळी रावण संप्रदाय. आता तुम्ही संगमावर आहात. रावण राज्यापासून दूर गेला आहात तरी देखील थोडा प्रभाव येतोच. बुद्धीमध्ये हे ज्ञान आहे की आपण जात आहोत. बसलो तर इथेच आहोत. बुद्धीमध्ये ज्ञान आहे. बसला इथे आहात परंतु त्याबद्दल जणू वैराग्य आहे. हि छी-छी (घाणेरडी) दुनिया कब्रस्तान बनणार आहे. भिन्न-भिन्न पॉईंट्सवरून समजावून सांगितले जाते. खरेतर एकच पॉईंट आहे - मनमनाभव. कित्येकांची पत्रे येतात - ‘बाबा, मी बंधनामध्ये अडकलेली आहे’. द्रौपदी काही एकच तर नाहीये, हजारों असतील. आता तुम्ही पतित दुनियेमधून पावन दुनियेमध्ये ट्रान्सफर होत आहात. जे कल्पापूर्वी फूल बनले असतील तेच निघतील. गार्डन ऑफ अल्लाह ची इथे स्थापना होईल. काही-काही तर इतकी छान-छान फुले असतात जी पाहताच सुखद वाटते. नावच आहे किंग ऑफ फ्लॉवर्स. ५ दिवस जरी ठेवले तरी टवटवीत राहते. सुगंध पसरत राहील. इथे देखील जे बाबांची आठवण करतात आणि आठवण करून देतात त्यांचा सुगंध पसरतो. सदैव आनंदी राहतात. अशा गोड-गोड मुलांना पाहून बाबा हर्षित होतात. त्यांच्यासमोर बाबांचा ज्ञान डान्स खूप छान होतो. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. रुहानी पित्याचा रुहानी मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) ज्ञानामध्ये आणि योगामध्ये मजबूत बनायचे आहे. जर कोणतेही बंधन नसेल तर जाणूनबुजून बंधनामध्ये अडकायचे नाही. बालब्रह्मचारी होऊन राहायचे आहे.

२) आता आपली चढती कला आहे, बाबा आपली सर्व दुःखे दूर करण्यासाठी, शाप नष्ट करून वारसा देण्यासाठी आले आहेत. बाबांची आणि वारशाची आठवण करून अपार आनंदामध्ये राहायचे आहे. तपासणी करायची आहे की, माझा बुद्धियोग कुठे भटकत तर नाही ना.

वरदान:-
सामावून घेण्याच्या आणि सामना करण्याच्या शक्तीद्वारे सेवेमध्ये सफलता प्राप्त करणारे रूहानी सेवाधारी भव

रूहानी सेवाधाऱ्यांना सेवेशिवाय काहीही सुचत नाही, ते मन्सा-वाचा-कर्मणा सेवेतून एक सेकंद सुद्धा विश्रांती घेत नाहीत म्हणूनच ते बेस्ट बनतात. ते सेवेमध्ये सफलता प्राप्त करण्यासाठी नेहमी हेच लक्षात ठेवतात की, सामावून घेणे आणि सामना करणे - हेच आपले ध्येय आहे. ते आपल्या जुन्या संस्कारांना सामावून घेतात आणि सामना मायेशी करतात, ना की दैवी परिवाराशी. अशी मुले जी नॉलेजफुल असण्यासोबतच पॉवरफुल देखील आहेत त्यांनाच म्हटले जाते - रूहानी सेवाधारी.

बोधवाक्य:-
लहान गोष्टीला मोठे करू नका, वातावरणाला शक्तिशाली बनवा.

हे अव्यक्त इशारे - सदैव हर्षित राहण्याकरिता आपल्या नेचरला (स्वभावाला) सरळ बनवा, सहनशील बना.

दुनियेमध्ये लोकं जिवंत असून देखील निराशेच्या चितेवर बसलेली आहेत, अशा आत्म्यांना मरजीवा बनवा, नवीन जीवनाचे दान द्या. आपल्या खुशनसीब (भाग्यवान), हर्षित मुख चेहऱ्याद्वारे त्यांना मानवी जीवनामध्ये जगणे शिकवा. तुम्हाला पाहून त्यांच्यामध्ये हिंमत, उमंग-उत्साह यावा, यासाठी आपल्या नेचरला (स्वभावाला) सरळ बनवा आणि सदैव कमलपुष्प समान स्थितीच्या आसनावर डबल लाईट स्थितीमध्ये स्थित राहा.