05-10-25    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   03.03.2007  ओम शान्ति   मधुबन


“परमात्म संगतीमध्ये, ज्ञानाचा गुलाल, गुण आणि शक्तींचा रंग लावणे हीच खरी होळी साजरी करणे आहे”


आज बापदादा आपल्या लकीएस्ट आणि होलीएस्ट मुलांशी होळी साजरी करण्यासाठी आले आहेत. दुनियावाले तर कोणताही उत्सव केवळ साजरा करतात परंतु तुम्ही मुले फक्त साजरा करत नाही, साजरा करणे अर्थात बनणे. तर तुम्ही होली अर्थात पवित्र आत्मे बनला आहात. तुम्ही सर्व कोणते आत्मे आहात? होली अर्थात महान पवित्र आत्मे. दुनियावाले तर शरीराला स्थूल रंग लावून रंगतात परंतु तुम्हा आत्म्यांनी आत्म्याला कोणत्या रंगाने रंगवले आहे? सर्वात चांगल्यात चांगला रंग कोणता आहे? अविनाशी रंग कोणता आहे? तुम्ही जाणता, तुम्ही सर्वांनी परमात्म संगाचा रंग आत्म्याला लावला आहे ज्यामुळे आत्मा पवित्रतेच्या रंगामध्ये रंगून गेली. हा परमात्म संगाचा रंग किती महान आणि सहज आहे त्यामुळे परमात्म संगतीचे महत्व म्हणून आता अंतिम वेळी सुद्धा सत्संगाचे महत्व आहे. सत्संगाचा अर्थच आहे परमात्म संगतीमध्ये राहणे, जो सर्वात सहज आणि उच्च ते उच्च आहे, अशा संगतीमध्ये राहणे अवघड आहे का? आणि या संगाच्या रंगामध्ये राहिल्याने जसे परमात्मा उच्च ते उच्च आहेत तशी तुम्ही मुले देखील उच्च ते उच्च पवित्र महान आत्मे पूज्य आत्मे बनला आहात. हा अविनाशी संगाचा रंग आवडतो ना! दुनियावाले किती प्रयत्न करतात परम-आत्म्याची संगत तर सोडाच नुसती आठवण करण्यासाठी देखील किती मेहनत करतात. परंतु तुम्ही आत्म्यांनी बाबांना जाणले, अंतःकरणापासून म्हटले - “माझे बाबा”. बाबांनी म्हटले “माझी मुले” आणि रंग लागला. बाबांनी कोणता रंग लावला? ज्ञानाचा गुलाल लावला, गुणांचा रंग लावला, शक्तींचा रंग लावला, ज्या रंगाने तुम्ही तर देवता बनलात परंतु आता कलियुगाच्या अंतापर्यंत देखील तुमच्या पवित्र मुर्त्या देव आत्म्यांच्या रूपामध्ये पुजल्या जातात. पवित्र आत्मे अनेक बनतात, महान आत्मे खूप बनतात, धर्म आत्मे बरेच बनतात परंतु तुमची पवित्रता, देव आत्म्यांच्या रूपामध्ये आत्मा देखील पवित्र बनते आणि आत्म्यासोबत शरीर देखील पवित्र बनते. इतकी श्रेष्ठ पवित्रता बनली कशी? केवळ संगाच्या रंगाने. तुम्ही सर्व अभिमानाने म्हणता, जर कोणी तुम्हा मुलांना विचारले, परमात्मा कुठे राहतात? परमधाम मध्ये तर आहेतच परंतु आता संगमामध्ये परमात्मा तुमच्या सोबत कुठे राहतात? तुम्ही काय उत्तर द्याल? परमात्म्याला आता आम्हा पवित्र आत्म्यांचे दिल तख्तच चांगले वाटते. असे आहे ना? तुमच्या हृदयामध्ये बाबा राहतात, आणि तुम्ही बाबांच्या हृदयामध्ये राहता. जे राहतात त्यांनी हात वर करा. राहता का? (सर्वांनी हात वर केला) अच्छा. खूप छान. अभिमानाने म्हणता परमात्म्याला माझ्या हृदयाशिवाय इतर कुठे चांगले वाटत नाही कारण कंबाइंड राहता ना! कंबाइंड राहता का? बरीच मुले कंबाइंड म्हणत असताना सुद्धा सदैव बाबांच्या कंपनीचा फायदा घेत नाहीत. कंपेनियन तर बनवले आहे, पक्के आहे ना. ‘माझे बाबा’ म्हटलेत तर कंपेनियन तर बनवले आहे परंतु सदैव कंपनीचा (सोबत असल्याचा) अनुभव करणे, यामध्ये अंतर पडते. यामध्ये बापदादा बघतात याचा फायदा घेणारे नंबरवार आहेत. कारण काय असते? तुम्ही सगळे चांगल्या रीतीने जाणता.

बापदादांनी यापूर्वी सुद्धा सांगितले आहे जर मनामध्ये रावणाची कोणतीही जुनी मालमत्ता, जुन्या संस्कारांच्या रूपामध्ये राहीली असेल तर रावणाची वस्तू परक्याची वस्तू झाली ना! परक्याची वस्तू कधीही आपल्या जवळ ठेवली जात नाही, तिला फेकून दिले जाते. परंतु बापदादांनी बघितले आहे, रुहरिहानमध्ये ऐकतात देखील की मुले काय म्हणतात, ‘बाबा, मी काय करू, माझे संस्कारच असे आहेत’. हे काय तुमचे आहेत, जे म्हणता माझे संस्कार? असे म्हणणे राइट आहे की, ‘माझे जुने संस्कार आहेत, माझी नेचर आहे’, हे राइट आहे? राइट आहे का? जे समजतात राइट आहे त्यांनी हात वर करा. कोणीही हात वर करत नाही. तर मग म्हणता कशासाठी? चुकून असे म्हणता का? जर मरजीवा बनला आहात, तुमचे आता सरनेम (आडनाव) काय आहे? जुन्या जन्माचे सरनेम आहे की बी.के. चे सरनेम आहे? आपले सरनेम काय लिहिता? बी. के. की अमुक, अमुक…? जर मरजीवा बनला आहात तर जुने संस्कार माझे संस्कार कसे झाले? हे जुने तर परक्याचे संस्कार झाले. माझे तर नाही झाले ना! तर या होळी मध्ये काहीतरी जाळणार ना! होळीमध्ये जाळले देखील जाते आणि रंग सुद्धा लावला जातो, तर तुम्ही सगळे या होळीमध्ये काय जाळणार? ‘माझे संस्कार’, हे आपल्या ब्राह्मण डिक्शनरी मधून नष्ट करा. जीवन देखील एक डिक्शनरी आहे ना! तर आता कधीही स्वप्नामध्ये देखील असा विचार करू नका, संकल्पाची तर गोष्टच सोडा परंतु जुन्या संस्कारांना ‘माझे संस्कार’ मानणे, असा स्वप्नामध्ये सुद्धा विचार करू नका. आता तर जे बाबांचे संस्कार तेच तुमचे संस्कार, तुम्ही सर्व म्हणता ना आमचे लक्ष्य आहे - बाप समान बनणे. तर सर्वांनी आपल्या मनामध्ये दृढ संकल्पाची ही प्रतिज्ञा स्वतःशी केलीत का? चुकून सुद्धा ‘माझे’ म्हणू नका. ‘माझे-माझे’ म्हणता ना, तर जे जुने संस्कार आहेत ते फायदा घेतात. जेव्हा ‘माझे’ म्हणता ना तर ते अजूनच चिकटून बसतात, निघतच नाहीत.

बापदादा सर्वांना कोणत्या रूपामध्ये पाहू इच्छितात? जाणता तर आहात, आणि मानता सुद्धा. बापदादा प्रत्येक मुलाला भृकुटीचे तख्तनशीन, स्वराज अधिकारी राजा मुलगा, अधीन मुलगा नाही, राजा मुलगा, कंट्रोलिंग पॉवर, रुलिंग पॉवर, मास्टर सर्वशक्तिवान स्वरूपामध्ये पाहत आहेत. तुम्ही तुमचे कोणते रूप बघता? हेच ना, राज्य अधिकारी आहात ना! अधीन तर नाही आहात ना? अधीन आत्म्यांना तुम्ही सर्वजण अधिकारी बनविणारे आहात. आत्म्यांवर दयाळू बनून त्यांना अधीन पासून अधिकारी बनविणारे आहात. तर तुम्ही सर्व होळी साजरी करण्यासाठी आला आहात ना?

बापदादांना सुद्धा आनंद होत आहे की सगळे स्नेहाच्या विमानामधून पोहोचले, सर्वांपाशी विमान आहे ना! बापदादांनी प्रत्येक ब्राह्मणाला जन्मत:च मनाच्या विमानाची गिफ्ट दिली आहे. तर सर्वांकडे मनाचे विमान आहे? विमानामध्ये व्यवस्थित पेट्रोल आहे ना? पंख ठीक आहेत? स्टार्ट करण्याचा आधार ठीक आहे ना? चेक करता का? असे विमान जे तिन्ही लोकांमध्ये सेकंदामध्ये जाऊ शकते. जर हिंमत आणि उमंग-उत्साहाचे दोन्ही पंख योग्य पद्धतीने असतील तर एका सेकंदामध्ये स्टार्ट होऊ शकते. स्टार्ट करण्याची चावी कोणती आहे? ‘माझे बाबा’. ‘माझे बाबा’ म्हणा तर मन जिथे पोहोचायला हवे तिथे पोहोचू शकते. दोन्ही पंख नीट असले पाहिजेत. कधीही हिंमत सोडायची नाही. कशासाठी? बापदादांचा वायदा आहे, वरदान आहे, तुमच्या हिंमतीचे एक पाऊल आणि हजार पावलांची मदत बाबांची. भले मग कितीही कठीण संस्कार असेल, कधीही हिंमत सोडू नका. कारण काय आहे? सर्वशक्तीवान बाबा मदतगार आहेत आणि कंबाइंड आहेत, कायम उपस्थित आहेत. तुम्ही हिंमतीने सर्वशक्तीवान कंबाइंड बाबांवर अधिकार ठेवा आणि दृढ रहा, होणारच आहे, बाबा माझे, मी बाबांची आहे, या हिंमतीला कधी विसरू नका. तर काय होईल? जो ‘आता कसे करू’, हा संकल्प येतो तो ‘कसे’ शब्द बदलून ‘असे’ होईल. ‘कसे करू, काय करू’, नाही. असे झालेलेच आहे. विचार करता - ‘करत तर आहे, होईल, व्हायला तर हवे, बाबा मदत तर देतील…’ झालेलेच आहे, दृढ निश्चयबुद्धी असणाऱ्यांना मदत देण्यासाठी बाबा बांधील आहेत. फक्त रूप थोडेसे चेंज करता, बाबांवर हक्क दाखवता परंतु रूप चेंज करता. ‘बाबा, तुम्ही मदत तर करणार ना! तुम्ही तर बांधील आहात ना!’ तर ‘ना’ लावता. निश्चय-बुद्धी, निश्चित विजय झालेलाच आहे कारण बापदादांनी प्रत्येक मुलाला जन्मत:च विजयाचा तिलक मस्तकावर लावला आहे. दृढतेला आपल्या तीव्र पुरुषार्थाची चावी बनवा. प्लॅन खूप छान बनवता. बापदादा जेव्हा रुहरिहान (आत्मिक बातचीत) ऐकतात, रुहरिहान खूप हिंमतवाली करतात, प्लॅन देखील खूप पॉवरफुल बनवता परंतु प्लॅनला जेव्हा प्रॅक्टिकलमध्ये करता तेव्हा प्लेन-बुद्धी बनून करत नाही. त्यामध्ये थोडेसे ‘करत तर आहे’, ‘व्हायला तर हवे…’ असे स्वतः मध्ये निश्चयासोबत संकल्प नाहीत, परंतु वेस्ट संकल्प मिक्स करता.

आता समयानुसार प्लेन-बुद्धी बनून संकल्पाला साकार रूपामध्ये आणा. जरा देखील कमजोर संकल्प इमर्ज करू नका. लक्षात ठेवा की आता पहिल्यांदाच करत नाही आहात, अनेक वेळा केलेले फक्त आता रिपीट करत आहात. आठवा कल्प-कल्प किती वेळा विजयी बनला आहात! तुम्ही अनेक वेळा विजयी झाला आहात, अनेक कल्पापासून विजय तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. या अधिकाराने निश्चय-बुद्धी बनून दृढतेची चावी लावा, विजय तुम्हा ब्राह्मण आत्म्यांशीवाय अजून कुठे जाईल! विजय तुम्हा ब्राह्मणांचा जन्मसिध्द अधिकार आहे, गळ्यातील माळा आहे. नशा आहे ना? ‘होईल’, की ‘नाही होईल’, असे नको. झालेलेच आहे. इतके निश्चय-बुद्धी बनून प्रत्येक कार्य करा, विजय निश्चित आहेच. असे निश्चय-बुद्धी आत्मे, हाच नशा ठेवा की विजय आहेच, ‘आहे’ की ‘नाही’, ‘आहेच’. हाच नशा ठेवा. होतो, आहोत, आणि असणार. तर असे होली आहात ना! होलीएस्ट तर आहातच. तर ज्ञानाच्या गुलालाची होळी बापदादांसोबत खेळलात, आता अजून काय खेळणार?

बापदादांनी बघितले की बहुतांशी सर्वांना उमंग-उत्साह खूप छान येतो, ‘असे करणार, तसे करणार, असे होईल’. बापदादा देखील खूप खुश होतात परंतु असा उमंग-उत्साह सदैव इमर्ज रहावा, कधी-कधी तो मर्ज होतो, कधी इमर्ज होतो. मर्ज होऊ नये, इमर्जच रहावा कारण सारे संगमयुगच तुमचा उत्सव आहे. ते तर कधी-कधी उत्सव यासाठी साजरा करतात, कारण खूप काळ टेन्शनमध्ये असतात ना, तर समजतात आता उत्साहामध्ये नाचू, गाऊ, खाऊ, म्हणजे थोडा बदल होईल. परंतु तुम्हा लोकांकडे तर प्रत्येक सेकंदाला नाचणे आणि गाणे आहेच. तुम्ही सदैव मनामध्ये आनंदाने नाचत राहता ना! की नाही! नाचता, आनंदाने नाचता येते ना? नाचता येते का? ज्यांना येते त्यांनी हात वर करा. नाचता येते, अच्छा. येत असेल तर मुबारक असो. तर सदैव नाचत राहता की कधी-कधी?

बापदादांनी या वर्षीचा होमवर्क दिला होता - या दोन शब्दांबद्दल कधीही विचार करू नका, ‘समटाइम’ आणि ‘समथिंग’. हा होमवर्क केला आहे का? का अजूनही ‘समटाइम’ आहेच? ‘समटाइम’, ‘समथिंग’ समाप्त. या नाचण्यामध्ये थकण्याचा तर काही प्रश्नच नाही. भले मग रेस्ट करत असाल, किंवा काम करत असाल, नाहीतर चालत असाल, किंवा बसलेले असाल, खुशीचा डान्स तर करू शकताच आणि बाबांच्या प्राप्तीचे गाणे देखील गाऊ शकता. गाणे देखील येते ना, हे गाणे तर सर्वांना येते. गाणे म्हणायला तर कोणाला येते कोणाला येत नाही; परंतु बाबांच्या प्राप्तीचे, बाबांच्या गुणांचे गाणे तर सर्वांना येते ना. तर बस प्रत्येक दिवस उत्सव आहे, प्रत्येक क्षण उत्सव आहे, आणि सदैव नाचा आणि गात रहा दुसरे कोणते काम तर दिलेलेच नाहीये. हीच दोन कामे आहेत ना - नाचा आणि गा. तर एन्जॉय करा. ओझे कशाला उचलता? एन्जॉय करा, नाचा, गा बस्स. अच्छा. होळी तर साजरी केली ना! आता रंगाची होळी सुद्धा साजरी करणार ना? अच्छा, भक्त लोक तुम्हालाच तर कॉपी करणार ना! तुम्ही भगवंतासोबत होळी खेळता तर भक्त सुद्धा कोणत्या ना कोणत्या तुम्हा देवतांसोबत होळी खेळत राहतात. अच्छा.

आज बऱ्याच मुलांची ई-मेल देखील आली आहेत, पत्रे सुद्धा आली आहेत, फोन देखील आले आहेत, जी काही साधने आहेत त्यांच्या द्वारे होळीची मुबारक पाठवली आहे. बापदादांपाशी तर जेव्हा संकल्प करता ना तेव्हाच पोहोचते. परंतु चोहो बाजूची मुले विशेष आठवण करतात आणि केली आहे, बापदादा सुद्धा प्रत्येक मुलाला पदमा-पद्म आशीर्वाद आणि पद्मगुणा हृदयापासूनची प्रेमपूर्वक आठवण रिटर्नमध्ये प्रत्येकाला नावासहित विशेषता सहित देत आहेत. जेव्हा संदेशी जाते ना तर प्रत्येक जण आपापल्या तर्फे आठवण देतात. ज्यांनी दिलेली जरी नसली ना, तरीही बापदादांपाशी पोहोचली आहे. हीच तर परमात्म-प्रेमाची विशेषता आहे. हा प्रत्येक दिवस किती सुंदर आहे. भले मग गावामध्ये असाल किंवा खूप मोठ्या-मोठया शहरांमध्ये आहात, गावामध्ये राहणाऱ्यांची सुद्धा आठवण साधन नसतानाही बाबांपाशी पोहोचते कारण बाबांकडे स्पिरिच्युअल साधने तर खूप आहेत ना! अच्छा.

आजकालच्या जमान्यामध्ये डॉक्टर्स म्हणतात औषधे सोडा, एक्सरसाइज करा, तर बापदादा सुद्धा म्हणत आहेत की युद्ध करणे सोडा, मेहनत करणे सोडा, साऱ्या दिवसभरामध्ये ५-५ मिनिटे मनाची एक्सरसाइज करा. एका मिनिटामध्ये निराकारी, एका मिनिटामध्ये आकारी, एका मिनिटामध्ये सर्व ठिकाणचे सेवाधारी, संपूर्ण दिवसभरामध्ये ही मनाची ५ मिनिटांची एक्सरसाइज वेगवेगळ्या वेळी करा. तर सदैव निरोगी रहाल, मेहनती पासून वाचाल. होऊ शकते ना! मधुबनवाले होऊ शकते? मधुबन आहे फाऊंडेशन, मधुबनचे वायब्रेशन चोहो बाजूला इच्छा नसली तरी पोहोचते. मधुबनमध्ये कोणतीही गोष्ट झाली ना, तर साऱ्या भारतामध्ये, जागोजागी लगेच दुसऱ्या दिवशी पोहोचते. मधुबनमध्ये अशी काही साधने लावलेली आहेत, कोणतीही गोष्ट लपून रहात नाही, चांगली सुद्धा तर पुरुषार्थाची देखील. तर मधुबन जे करेल ते वायब्रेशन आपोआप आणि सहज पसरेल. पहिले मधुबन निवासींनी वेस्ट थॉट्स स्टॉप करावेत, होऊ शकते हे? होऊ शकते का? हे समोर पुढे बसले आहेत ना! मधुबन निवासी हात वर करा. तर मधुबन निवासी आपसामध्ये असा कोणता प्लॅन बनवा ज्यामुळे वेस्ट संकल्प बंद होतील. बापदादा असे म्हणत नाहीत की संकल्पच बंद करा. वेस्ट संकल्प फिनिश. फायदा तर काहीच नाही, उलटा त्रासच होतो. हे होऊ शकते? जे मधुबन निवासी समजतात आपसात मिटिंग करून हे करू, त्यांनी हात वर करा. करणार, करायचे असेल तर उंच हात वर करा. दोन्ही हात वर करा. मुबारक असो. बापदादा अंतःकरणातून आशीर्वाद देत आहेत. मुबारक देत आहेत. हिंमत आहे मधुबनवाल्यांमध्ये, जे पाहिजे ते करू शकतात. करून देखील घेऊ शकतात. मधुबनच्या बहिणी सुद्धा आहेत, बहिणींनी हात वर करा. पूर्ण हात वर करा. मिटिंग करा. दादी तुम्ही मिटिंग घ्या. पहा सगळे हात वर करत आहेत. आता हात वर केल्याची लाज ठेवा. अच्छा.

ब्रह्मा बाबांनी अखेरीला जे वरदान दिले - निराकारी, निर्विकारी, निरहंकारी, हे ब्रह्मा बाबांचे लास्ट वरदान, एक खूप मोठी सौगात मुलांप्रती राहिली. तर काय आता लगेच सेकंदामध्ये ब्रह्मा बाबांची सौगात मनाने स्वीकार करू शकता? दृढ संकल्प करू शकता की बाबांच्या सौगातला सदैव प्रॅक्टिकल लाईफ मध्ये (कायम प्रत्यक्ष जीवनामध्ये) आणायचे आहे? कारण आदि देवनी दिलेली सौगात कमी नाहीये. ब्रह्मा ग्रेट-ग्रेट ग्रँड फादर आहेत, त्यांची सौगात कमी नाहीये. तर आपापल्या पुरुषार्थाप्रमाणे संकल्प करा की आजच्या दिवशी होली अर्थात जे होऊन गेले, हो-ली, होऊन गेले. परंतु आतापासून सौगातीला वारंवार इमर्ज करून ब्रह्मा बाबांना सेवेचे रिटर्न द्याल. पहा ब्रह्मा बाबांनी शेवटच्या दिवसापर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत सेवा केली. ही ब्रह्मा बाबांची मुलांवरील प्रेमाची, सेवेवरील प्रेमाची निशाणी आहे; तर ब्रह्मा बाबांना रिटर्न देणे अर्थात दिलेल्या सौगातीला वारंवार जीवनामध्ये रिवाइज करून प्रॅक्टिकल मध्ये आणणे. तर सर्वांनी आपल्या मनामध्ये ब्रह्मा बाबांच्या स्नेहाच्या रिटर्न मध्ये संकल्प दृढ करा, हे आहे ब्रह्मा बाबांच्या स्नेहाच्या सौगातीचे रिटर्न. अच्छा.

चोहो बाजूच्या लकीएस्ट, होलीएस्ट मुलांना सदैव दृढ संकल्पाची चावी प्रॅक्टिकल मध्ये आणणाऱ्या हिंमतवान मुलांना, सदैव आपल्या मनाला विविध प्रकारच्या सेवेमध्ये बिझी ठेवणाऱ्या, प्रत्येक पावलाला पद्मांची कमाई जमा करणाऱ्या मुलांना, सदैव दररोज उत्साहामध्ये राहणाऱ्या, प्रत्येक दिवसाला उत्सव समजून साजरा करणाऱ्या, सदैव खुशनसीब मुलांना बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.

वरदान:-
लव आणि लवलीन स्थितीच्या अनुभवाद्वारे सर्व काही विसरणारे सदैव देही-अभिमानी भव कर्मामध्ये, वाणीमध्ये, संपर्कामध्ये, नात्यामध्ये प्रेम आणि स्मृती व स्थितीमध्ये लवलीन होऊन रहा तर सर्व काही विसरून देही-अभिमानी बनाल. प्रेमच बाबांच्या समीप संबंधामध्ये घेऊन येते, सर्वस्व त्यागी बनवते. या प्रेमाच्या विशेषतेमुळे किंवा लवलीन स्थितीमध्ये राहिल्यानेच सर्व आत्म्यांचे भाग्य आणि भाग्याला जागृत करू शकता. हे प्रेमच भाग्याच्या लॉकची चावी आहे. ही मास्टर-की (चावी) आहे. याने कोणत्याही दुर्भाग्यशाली आत्म्याला भाग्यशाली बनवू शकता.

सुविचार:-
स्वतःच्या परिवर्तनाची वेळ निश्चित करा तर विश्व परिवर्तन स्वतः होईल.

अव्यक्त इशारे:- स्वयं प्रति आणि सर्वांप्रती मनसा द्वारे योगाच्या शक्तींचा प्रयोग करा. मनसा शक्तीचे दर्पण आहे - बोल आणि कर्म. भले अज्ञानी आत्मे, भले ज्ञानी आत्मे - दोघांच्याही संबंध-संपर्कामध्ये येताना बोल आणि कर्म शुभ-भावना, शुभ-कामनावाले असावेत. ज्यांची मनसा शक्तिशाली अथवा शुभ आहे त्यांची वाचा आणि कर्मणा स्वतःच शक्तिशाली शुद्ध होईल, शुभ-भावना वाली होईल. मनसा शक्तिशाली अर्थात आठवणीची शक्ति श्रेष्ठ असेल, शक्तिशाली असेल, सहजयोगी असतील.