06-10-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - श्रीमतावर भारताला स्वर्ग बनविण्याची सेवा करायची आहे, आधी स्वतः निर्विकारी बनायचे आहे आणि मग दुसऱ्यांना सांगायचे आहे”

प्रश्न:-
तुम्हा महावीर मुलांना कोणत्या गोष्टीची पर्वा करायची नाहीये? फक्त कोणते चेकिंग करत स्वतःची काळजी घ्यायची आहे?

उत्तर:-
जर कोणी पवित्र बनण्यामध्ये विघ्न घालत असेल तर तुम्हाला त्याची पर्वा करायची नाहीये. फक्त चेक करा की, मी महावीर आहे? मी स्वतःला फसवत तर नाही ना? बेहदचे वैराग्य असते का? मी आप समान बनवितो का? माझ्यामध्ये क्रोध तर नाही आहे ना? जे दुसऱ्यांना सांगतो ते मी स्वतः करतो का?

गीत:-
तुम्हें पाके हमने…

ओम शांती।
यामध्ये बोलायचे नसते, ही समजून घेण्याची गोष्ट आहे. गोड-गोड रुहानी मुले समजत आहेत की आपण पुन्हा देवता बनत आहोत. संपूर्ण निर्विकारी बनत आहोत. बाबा येऊन म्हणतात - मुलांनो, काम विकाराला जिंका अर्थात पवित्र बना. मुलांनी गाणे ऐकले. आता पुन्हा मुलांना स्मृती आली आहे - आपण बेहदच्या बाबांकडून बेहदचा वारसा घेत आहोत, जो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, तिथे दुसरा कोणी हिरावून घेणारा असतच नाही. त्याला म्हटले जाते अद्वैत राज्य. नंतर मग रावण राज्य दुसऱ्याचे होते. आता तुम्हाला समजत आहे. समजावून देखील असे सांगायचे आहे. आम्ही पुन्हा भारताला श्रीमतावर व्हाइसलेस (निर्विकारी) बनवत आहोत. उच्च ते उच्च भगवान तर सर्वजण म्हणतील. त्यांनाच पिता म्हटले जाते. तर हे देखील समजावून सांगायचे आहे, लिहायचे देखील आहे - भारत जो संपूर्ण निर्विकारी स्वर्ग होता तो आता विकारी नरक बनला आहे. पुन्हा आम्ही श्रीमतावर भारताला स्वर्ग बनवत आहोत. बाबा जे सांगतात ते नोट करून मग त्यावर विचार सागर मंथन करून लिहिण्यामध्ये मदत केली पाहिजे. असे काय-काय लिहावे ज्यामुळे लोक समजतील की खरोखर भारत स्वर्ग होता. रावणाचे राज्य नव्हते. मुलांच्या बुद्धीमध्ये आहे - आता आम्हा भारतवासीयांना बाबा व्हाइसलेस (निर्विकारी) बनवत आहेत. पहिले स्वतःला बघायचे आहे - मी निर्विकारी बनलो आहे? ईश्वराला मी फसवत तर नाही ना? असे नाही की ईश्वर आपल्याला थोडेच बघतात? तुमच्या मुखातून हे शब्द निघू शकत नाहीत. तुम्ही जाणता पवित्र बनविणारे पतित-पावन एकच बाबा आहेत. भारत व्हाइसलेस होता तर स्वर्ग होता. हे देवता संपूर्ण निर्विकारी आहेत ना. यथा राजा-राणी तथा प्रजा असेल, तेव्हाच तर साऱ्या भारताला स्वर्ग म्हटले जाईल ना. आता नरक आहे. ही ८४ जन्मांची शिडी खूप चांगली चीज आहे. कोणी चांगली व्यक्ती असेल तर त्यांना सौगात सुद्धा देऊ शकता. मोठ्या-मोठ्या व्यक्तींना मोठी सौगात मिळते ना. तर तुम्ही देखील जे येतात, त्यांना समजावून सांगून अशा प्रकारच्या सौगात देऊ शकता. वस्तू ज्या असतात त्या नेहमी देण्यासाठी तयार असतात. तुमच्याकडे देखील नॉलेज तयार असले पाहिजे. शिडीच्या चित्रामध्ये पूर्ण ज्ञान आहे. आपण कसे ८४ जन्म घेतले आहेत - याची आठवण राहिली पाहिजे. ही समजून घेण्याची गोष्ट आहे ना. जरूर जे पहिल्यांदा आले आहेत त्यांनीच ८४ जन्म घेतले आहेत. बाबा ८४ जन्मांविषयी सांगून मग म्हणतात - यांच्या (ब्रह्मा बाबांच्या) अनेक जन्मांच्या अंताला साधारण तनामध्ये प्रवेश करतो. मग यांचे नाव ठेवतो ब्रह्मा. यांच्याद्वारे ब्राह्मण रचतो. नाहीतर ब्राह्मण कुठून आणू. ब्रह्माचा पिता कधी ऐकला आहे का? जरूर भगवानच म्हणणार. ब्रह्मा आणि विष्णूला दाखवतात सूक्ष्मवतनमध्ये. बाबा तर म्हणतात - मी यांच्या ८४ जन्मांच्या अंतामध्ये प्रवेश करतो. ॲडॉप्ट केले जाते तर नाम बदलले जाते. संन्यास देखील घ्यायला लावला जातो. संन्यासी देखील जेव्हा संन्यास घेतात तर लगेचच विसरून जात नाहीत, आठवण जरूर राहते. तुम्हाला देखील आठवण राहील परंतु तुम्हाला त्यांच्याबद्दल वैराग्य आहे कारण तुम्ही जाणता हे सर्व कब्रदाखल होणार आहेत तर मग आपण त्यांची आठवण का बरें करावी. ज्ञानाद्वारे सर्व काही चांगल्या रीतीने समजून घ्यायचे आहे. ते देखील ज्ञानामुळेच घरदार सोडतात. त्यांना जर विचारले की घरदार कसे सोडले तर सांगत नाहीत. मग त्यांना युक्तीने विचारले जाते - तुम्हाला वैराग्य कसे आले, आम्हाला सांगाल तर आम्ही देखील तसे करू. तुम्ही टेंप्टेशन (प्रलोभन) देता की पवित्र बना, बाकी तुम्हाला तर सर्व आठवण आहे. लहानपणापासूनचे सर्व काही सांगू शकता. बुद्धीमध्ये सर्व ज्ञान आहे. कसे हे सर्व जण ड्रामाचे ॲक्टर्स आहेत जे पार्ट बजावतच आले आहेत. आता सर्वांचे कलियुगी कर्मबंधन तुटणार आहेत. मग जातील शांतीधाममध्ये. तिथून परत सर्वांचे नवीन नाते जुळेल. समजावून सांगण्याचे पॉईंट्स देखील बाबा चांगले-चांगले देत राहतात. हेच भारतवासी आदि सनातन देवी-देवता धर्माचे होते तेव्हा व्हाइसलेस (निर्विकारी) होते आणि मग ८४ जन्मा नंतर विशश (विकारी) बनले. आता परत व्हाइसलेस (निर्विकारी) बनायचे आहे. परंतु पुरुषार्थ करवून घेणारा पाहिजे. आता तुम्हाला बाबांनी सांगितले आहे. बाबा म्हणतात तुम्ही तेच आहात ना. मुले देखील म्हणतात - ‘बाबा, तुम्ही देखील तेच आहात’. बाबा म्हणतात - कल्पापूर्वी देखील तुम्हाला शिकवून राज्य-भाग्य दिले होते. कल्प-कल्प असेच करत राहणार. ड्रामामध्ये जे काही झाले, विघ्न आली, तरी देखील पडतील. जीवनामध्ये काय-काय होते, लक्षात तर राहते ना. यांना (ब्रह्मा बाबांना) तर सर्व लक्षात आहे. सांगतात देखील - गावातला मुलगा होता आणि वैकुंठाचा मालक बनला. वैकुंठामध्ये खेडवळ कसा असेल - हे आता तुम्ही जाणता. यावेळी तुमच्यासाठी देखील ही जुनी दुनिया एका गावासारखी आहे. कुठे वैकुंठ, कुठे हा नरक. मनुष्य तर मोठ-मोठ्या बिल्डींग इत्यादी बघून समजतात की हाच स्वर्ग आहे. बाबा म्हणतात ही तर सर्व दगड-माती आहे याची काहीच किंमत नाही. सर्वात जास्त किंमत हिऱ्याची असते. बाबा म्हणतात - विचार करा सतयुगामध्ये तुमचे सोन्याचे महाल कसे होते. तिथे तर सर्व खाणी भरलेल्या असतात. प्रचंड प्रमाणात सोने असते. तर मुलांना किती आनंद झाला पाहिजे. जेव्हा कधी उदासीनता येते तर बाबांनी सांगितले आहे - कितीतरी अशी गाणी आहेत जी तुम्हाला एका क्षणात आनंद देतील. सर्व ज्ञान बुद्धीमध्ये येते. तुम्ही समजता बाबा आपल्याला विश्वाचे मालक बनवतात. ते कधी कोणी हिरावून घेऊ शकत नाही. अर्ध्याकल्पासाठी आपण सुखधामचे मालक बनतो. राजाचा मुलगा समजतो की, मी या हदच्या राज्याचा वारसदार आहे. तुम्हाला किती नशा असला पाहिजे - आपण बेहदच्या बाबांचे वारसदार आहोत. बाबा स्वर्गाची स्थापना करतात, आपण २१ जन्मांकरिता वारसदार बनतो. किती आनंद झाला पाहिजे. ज्यांचा वारसदार बनता त्यांची देखील आठवण जरूर करायची आहे. आठवण केल्याशिवाय काही वारसदार बनू शकत नाही. आठवण कराल तर पवित्र बनाल तेव्हाच वारसदार बनू शकाल. तुम्ही जाणता श्रीमतावर आपण विश्वाचे मालक डबल मुकुटधारी बनतो. जन्मो-जन्मी आपण राज्य करणार. मनुष्याचे भक्ती मार्गामध्ये असते विनाशी दान-पुण्य. तुमचे आहे अविनाशी ज्ञान धन. तुम्हाला किती मोठी लॉटरी मिळते. कर्मानुसार फळ मिळते ना. कोणी मोठ्या राजाचा मुलगा बनतो तर मग मोठी हदची लॉटरी म्हणणार. सिंगल मुकुटधारी साऱ्या विश्वाचे मालक तर बनू शकत नाहीत. डबल मुकुटधारी विश्वाचे मालक तुम्ही बनता. त्यावेळी दुसरे कोणते राज्य नसतेच मुळी. मग दुसरे धर्म मागाहून येतात. त्यांची जोपर्यंत वृद्धी होते तोपर्यंत आधीचे राजे विकारी बनल्यामुळे मतभेदामध्ये येऊन तुकडे-तुकडे वेगळे करतात. पहिले तर साऱ्या विश्वावर एकच राज्य होते. तिथे असे म्हणणार नाही की हे आधीच्या जन्मातील कर्मांचे फळ आहे. आता बाबा तुम्हा मुलांना श्रेष्ठ कर्म शिकवत आहेत. जसे-जसे जो कर्म करेल, सेवा करेल तर त्याचे रिटर्न देखील तसेच मिळेल. चांगलेच कर्म करायचे आहे. एखादे कर्म केले, आणि समजू शकत नसाल तर श्रीमत घ्यायचे आहे. पत्रांमधून सतत विचारत राहिले पाहिजे. आता प्राईम मिनिस्टर आहेत, तुम्ही समजू शकता की किती टपाल येत असेल. परंतु ते काही एकटे वाचत नाहीत. त्यांच्यासमोर खूप सेक्रेटरी असतात, ते सर्व टपाल बघतात. जी अतिशय महत्वाची असतील, पास करतील तेव्हा प्राइम मिनिस्टरच्या टेबलावर ठेवतील. इथे देखील असे होते. मुख्य-मुख्य पत्रांना तर त्वरित उत्तर देतात. बाकीच्यांसाठी प्रेमपूर्वक आठवण लिहितात. प्रत्येकाला स्वतंत्रपणे पत्र लिहित बसणे हे तर होऊ शकत नाही, खूप अवघड आहे. मुलांना किती आनंद होतो - ओहो! आज बेहदच्या बाबांचे पत्र आले आहे. शिवबाबा ब्रह्मा द्वारे रिस्पॉंड (प्रतिसाद) देतात. मुलांना खूप आनंद होतो. सर्वात जास्त गदगद होतात बंधनात असलेल्या. ओहो! आम्ही बंधनामध्ये आहोत, बेहदचे बाबा आम्हाला कसे पत्र लिहितात. डोळ्यांमध्ये साठवून ठेवतात. अज्ञान काळामध्ये पतीला परमात्मा समजणाऱ्यांना जेव्हा पतीचे पत्र येत असे तेव्हा त्याचे चुंबन घ्यायच्या. तुमच्यामध्ये देखील बापदादांचे पत्र पाहून कितीतरी मुलांना एकदम रोमांच उभे राहतात. प्रेमाचे अश्रू येतात. पत्राचे चुंबन घेतील, डोळ्यांना स्पर्श करतील. खूप प्रेमाने पत्र वाचतात. बंधनात असलेल्या काही कमी आहेत का. बऱ्याच मुलांवर माया विजय प्राप्त करते. कोणी मग समजतात आम्हाला तर पवित्र जरूर बनायचे आहे. भारत व्हाईसलेस (निर्विकारी) होता ना. आता विशश आहे. आता जे व्हाईसलेस (निर्विकारी) बनणारे असतील, तेच पुरुषार्थ करतील - कल्पापूर्वी प्रमाणे. तुम्हा मुलांना इतरांना समजावून सांगणे खूप सोपे. तुमचा देखील हा प्लॅन आहे ना. आता गीतेचे युग चालू आहे. गीतेचेच पुरुषोत्तम युग गायले गेले आहे. तुम्ही देखील असे लिहा - गीतेचे हे पुरुषोत्तम युग आहे. जेव्हा की जुनी दुनिया बदलून नवीन होते. तुमच्या बुद्धीमध्ये आहे - बेहदचे बाबा जे आमचे टीचर देखील आहेत, त्यांच्याकडून आम्ही राजयोग शिकत आहोत. चांगल्या रीतीने शिकाल तर डबल मुकुटधारी बनाल. किती मोठे स्कूल आहे. राजाई स्थापन होत आहे. प्रजा देखील जरूर अनेक प्रकारची असेल. राजाईची वृद्धी होत जाईल. कमी ज्ञान घेणारे नंतर मागाहून येतील. जसा जो पुरुषार्थ करतील तसे ते अगोदर येत जातील. हा सर्व पूर्वनियोजित खेळ आहे. हे ड्रामाचे चक्र रिपीट होत आहे ना. आता तुम्ही बाबांकडून वारसा घेत आहात. बाबा म्हणतात पवित्र बना. यामध्ये कोणी विघ्न आणत असेल तर पर्वा करता कामा नये. भाकर तुकडा तर मिळू शकतो ना. मुलांना पुरुषार्थ केला पाहिजे तर आठवण राहील. बाबा भक्तीमार्गाचे उदाहरण सांगतात - पूजा करते वेळी बुद्धीयोग बाहेर जात असे तेव्हा आपला कान पकडत होते, चापट मारत होते. आता तर हे आहे ज्ञान. यामध्ये देखील मुख्य गोष्ट आहे आठवणीची. आठवण राहिली नाही तर स्वतःला थप्पड मारले पाहिजे. माया माझ्यावर तू विजय का प्राप्त करतेस. मी काय इतका कच्चा आहे. मला तर यावर विजय प्राप्त करायचा आहे. आपली चांगल्या प्रकारे काळजी घ्यायची आहे. स्वतःला विचारा मी इतका महावीर आहे? इतरांना देखील महावीर बनविण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. जितके अनेकांना आप समान बनवाल तितका उच्च दर्जा असेल. आपले राज्य-भाग्य घेण्यासाठी रेस करायची आहे. जर आपल्यामध्येच क्रोध असेल तर दुसऱ्यांना सांगाल की क्रोध करायचा नाही. हा खरेपणा झाला नाही ना. लाज वाटली पाहिजे. दुसऱ्यांना सांगायचे आणि ते उच्च बनतील, आपण खालीच राहिलो, हा देखील काही पुरुषार्थ आहे काय! (पंडिताची कहाणी सांगतात) बाबांची आठवण करत तुम्ही या विषय सागरातून क्षीरसागरामध्ये जाता. बाकी ही सर्व उदाहरणे बाबा बसून समजावून सांगतात, जी मग भक्तिमार्गामध्ये रिपीट करतात. भ्रामरीचे देखील उदाहरण आहे. तुम्ही ब्राह्मणी आहात ना - बी. के., हे तर खरे-खरे ब्राह्मण झाले. प्रजापिता ब्रह्मा कुठे आहेत? जरूर इथेच असतील ना. तिथे थोडेच असतील. तुम्हा मुलांना खूप हुशार बनले पाहिजे. बाबांचा प्लॅन आहे मनुष्याला देवता बनविण्याचा. ही चित्रे देखील आहेत समजावून सांगण्यासाठी. यामध्ये लिखाण देखील असे आकर्षक असले पाहिजे. गीतेच्या भगवानाचा हा प्लॅन आहे ना. आपण ब्राह्मण आहोत शेंडी. फक्त एकाची गोष्ट थोडीच असते. प्रजापिता ब्रह्मा तर शेंडी ब्राह्मणांची झाली ना. ब्रह्मा आहेतच ब्राह्मणांचे पिता. यावेळेस खूप मोठे कुटुंब असेल ना. जे मग तुम्ही दैवी कुटुंबामध्ये येता. यावेळी तुम्हाला खूप आनंद होतो कारण लॉटरी मिळते. तुमचे नाव खूप प्रसिद्ध आहे. वंदे मातरम्, शिवची शक्ती सेना तुम्ही आहात ना. ते तर सर्व आहेत खोटे. पुष्कळ असल्यामुळे गोंधळून जातात त्यामुळे राजधानी स्थापन करण्यामध्ये मेहनत लागते. बाबा म्हणतात - हा ड्रामा पूर्व नियोजित आहे. यामध्ये माझा देखील पार्ट आहे. मी आहे सर्वशक्तिमान. माझी आठवण केल्यामुळे तुम्ही पवित्र बनता. सर्वात जास्त चुंबक आहेत शिवबाबा, तेच सर्वोच्च ठिकाणी राहतात. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) नेहमी याच नशेमध्ये अथवा आनंदामध्ये रहायचे आहे की आपण २१ जन्मांकरिता बेहदबाबांचे वारसदार बनलो आहोत, ज्यांचे वारसदार बनलो आहोत त्यांची आठवण देखील करायची आहे आणि पवित्र देखील जरूर बनायचे आहे.

२) बाबा जी श्रेष्ठ कर्म शिकवत आहेत, तिच कर्म करायची आहेत. श्रीमत घेत रहायचे आहे.

वरदान:-
स्थूल देश आणि शरीराच्या स्मृती पासून दूर सूक्ष्म देशाचे वेषधारी भव

जसे आजकालच्या दुनियेमध्ये जसे कर्तव्य तसा वेश धारण करतात, तसे तुम्ही देखील ज्यावेळी जे कर्म करू इच्छिता तसा वेश धारण करा. आता-आता साकारी आणि आता-आता आकारी. असे बहुरूपी बना तर सर्व स्वरूपांच्या सुखांचा अनुभव करू शकाल. हे आपलेच स्वरूप आहे. दुसऱ्यांची वस्त्रे फिट होऊ दे किंवा न होऊ दे परंतु आपले वस्त्र सहजच धारण करू शकता म्हणून या वरदानाला प्रॅक्टिकल अभ्यासामध्ये आणा तर अव्यक्त मिलनाचे विचित्र अनुभव करू शकाल.

बोधवाक्य:-
सर्वांचा आदर करणारेच आदर्श बनू शकतात. सन्मान द्या तेव्हा सन्मान मिळेल.

अव्यक्त इशारे:- स्वयं प्रति आणि सर्वांप्रती मनसा द्वारे योगाच्या शक्तींचा प्रयोग करा.

जसे आपल्या स्थूल कामाच्या प्रोग्रामला दिनचर्येप्रमाणे सेट करता, तसा आपल्या मनसा समर्थ स्थितीचा प्रोग्राम सेट करा तर कधी अपसेट होणार नाही. जितके आपल्या मनाला समर्थ संकल्पांमध्ये बिझी ठेवाल तर मनाला अपसेट होण्यासाठी वेळच मिळणार नाही. मन नेहमी सेट अर्थात एकाग्र असेल तर आपोआपच चांगली व्हायब्रेशन्स पसरतात. सेवा होते.