07-08-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड मुलांनो, आता
पर्यंत जे काही शिकला आहात, ते विसरून एका बाबांचीच आठवण करा”
प्रश्न:-
भारतामध्ये
सतयुगी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी कोणते बळ पाहिजे?
उत्तर:-
पवित्रतेचे बळ.
तुम्ही सर्वशक्तिवान बाबांसोबत योग लावून पवित्र बनता. हे पवित्रतेचेच बळ आहे,
ज्याद्वारे सतयुगी स्वराज्याची स्थापना होते. यामध्ये युद्ध इत्यादीची कोणतीही
गोष्ट नाही. ज्ञान आणि योग बल हेच पावन दुनियेचा मालक बनवतात. याच बळाद्वारे एकमताची
स्थापना होते.
गीत:-
आखिर वह दिन
आया आज…
ओम शांती।
मुलांनी गाणे
ऐकले. हे गाणे काही आपण बनवलेले नाहीये. जसे इतर वेद-शास्त्रांचे सार समजावून
सांगितले जात आहे, तसेच ही देखील जी गाणी बनवली आहेत, त्यांचे देखील सार समजावून
सांगतात. मुले जाणतात की, नावाडी अथवा बागवान अथवा सद्गती दाता एक बाबाच आहेत. भक्ती
करतात जीवनमुक्ती करिता. परंतु जीवनमुक्ती अथवा सद्गती दाता एक भगवानच आहेत. त्याचा
अर्थ फक्त मुलेच समजू शकतात, मनुष्य समजत नाहीत. सद्गती अर्थात दुःखातून सोडवून
शांतीची प्राप्ती करवितात. भारतवासी मुले जाणतात की, इथे पवित्रता, सुख, शांती होती,
जेव्हा या लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते. राधे-कृष्णाचे राज्य म्हणू शकत नाही.
वास्तविक मातांची हमजिन्स राधा आहे. तिच्यावर अधिक प्रेम केले पाहिजे, तरी देखील
श्रीकृष्णावर खूप प्रेम करतात. त्याला झोपाळ्यावर झोके देतात. श्रीकृष्णाची
जन्माष्टमी देखील साजरी करतात. राधेची जयंती साजरी करत नाहीत. वास्तविक दोघांचीही
साजरी केली पाहिजे. काहीच समजत नाहीत. त्यांच्या जीवन कहाणीला तर कोणीही जाणत नाहीत.
बाबा येऊन स्वतःची आणि सर्वांची जीवन कहाणी सांगतात. मनुष्य म्हणतात देखील ‘शिव
परमात्माय नमः’, परंतु त्यांच्या जीवन कहाणीला जाणत नाहीत. मनुष्याच्या जीवन कहाणीला
इतिहास-भूगोल म्हटले जाते, जगाचा इतिहास-भूगोल तर सांगितला जातो ना - ‘किती
प्रदेशावर राज्य करत होते, किती भूभागावर राज्य करत होते, कसे राज्य केले’ आणि नंतर
ते कुठे गेले… या गोष्टी कोणीही जाणत नाही. तुम्हा मुलांना व्यवस्थित समजावून
सांगितले जाते. रचयिता आणि रचनेचे नॉलेज मुलांना समजावून सांगतात. तुम्हा मुलांना
समजले आहे की, बरोबर आता कलियुगाचा अंत आणि सतयुगाचा आदि आहे. संगमावरच परमपिता
परमात्मा येऊन मनुष्याला पतितापासून पावन देवता बनवतात. उत्तम पुरुष अथवा
पुरुषोत्तम बनवतात, कारण या वेळचे मनुष्य उत्तम नाहीत, कनिष्ठ आहेत. उत्तम, मध्यम,
कनिष्ठ, सतो, रजो, तमो असतात. जे चांगल्या रीतीने ज्ञान ऐकतील, त्यांना सतोगुणी
म्हणता येईल, जे थोडे ऐकतील, त्यांना रजोगुणी म्हणता येईल आणि जे ऐकतच नाहीत,
त्यांना तमोगुणी म्हणता येईल. शिक्षणामध्ये देखील असेच असते. तुम्हा मुलांना
सतोप्रधान शिक्षण पाहिजे, म्हणून तुम्हाला सतोप्रधान लक्ष्मी-नारायण बनण्याचे ज्ञान
दिले जाते. नरापासून नारायण आणि नारी पासून लक्ष्मी बनायचे आहे. गीते विषयी देखील
तुम्ही म्हणता की, खरी गीता ही आहे. तुम्ही लिहू देखील शकता - ही आहे खरी गीता
पाठशाळा अर्थात सत्य नारायण बनण्याची कथा अथवा खरी अमर कथा, खरी तीजरीची कथा. सर्व
चित्रे तर तुमच्याकडे आहेत, यामध्ये संपूर्ण ज्ञान आहे. तुम्ही मुले आता प्रतिज्ञा
करता की, आम्ही प्रजापिता ब्रह्माकुमार-कुमारी भारताला सतोप्रधान स्वर्ग बनवूनच सोडू.
तुम्हाला ही सर्वांना खबर द्यायची आहे. गांधीजी देखील पावन राज्य इच्छित होते, तर
जरूर आता पतित राज्य आहे. आपण स्वतः पतित आहोत, हे कोणीही समजू शकत नाही. रावण
म्हणजे ५ विकार. म्हणतात राम राज्य पाहिजे, तर जरूर आसुरी संप्रदायाचे झाले ना,
परंतु हे कोणाच्याही बुद्धी मध्ये येत नाही. किती मोठ-मोठ्या गुरू लोकांना देखील
इतकी साधी गोष्ट समजत नाही. तुम्ही मुले खबर देता की, आम्ही श्रीमतावर ब्रह्मा
द्वारे ५ हजार वर्षांपूर्वी प्रमाणे दैवी राज्य स्थापन करू. हे आहे पुरुषोत्तम
संगमयुग, जेव्हा तुम्ही ‘कनिष्ठ पुरुष’ पासून ‘सतोप्रधान पुरुषोत्तम’ बनता. मर्यादा
पुरुषोत्तम केवळ आदि सनातन देवी-देवता धर्मच आहे. आता एकाच देवी-देवता धर्माची
स्थापना होते, तेव्हा मग इतर धर्म असणारच नाहीत. तुम्ही मुले सिद्ध करून समजावून
सांगता की, सतयुगामध्ये एक धर्म आणि एकच राज्य होते. भले त्रेतामध्ये सूर्यवंशीं
मधून बदलून चंद्रवंशीमध्ये जातात, परंतु भाषा एकच असेल. आता तर भारतामध्ये अनेक भाषा
आहेत. मुले जाणतात की, आपल्या राज्यामध्ये एकच भाषा होती. आजकाल तर खूप काही पाहत
राहाल. जसे प्रवास करत असताना आपल्या देशाच्या जवळ येत जातात, तेव्हा आनंद होतो की
आता आपण आपल्या घरी आलो. बस्स, आता जाऊन भेटणार. तुम्हाला देखील आपल्या राजधानीचा
साक्षात्कार होत राहिल. आपल्या पुरुषार्थाचा देखील साक्षात्कार होईल. पाहाल की, बाबा
आम्हाला किती सांगत आहेत की पुरुषार्थ करा, नाहीतर हाय-हाय कराल आणि पदाचा दर्जा
देखील कमी होईल. ‘योग’ची यात्रा सर्वांना सांगत राहा. समजावून सांगणे तर खूप सोपे
आहे. शिडीवर समजावून सांगायला किती सोपे आहे. जे उशिरा येतात त्यांना दिवसेंदिवस
सहज ज्ञान मिळते. एक आठवडा समजून घेतले तरी सहजपणे समजेल. चित्रे अशी बनलेली आहेत,
ज्यांच्यामध्ये अचूक स्पष्टीकरण आहे. ८४ जन्मांचे चक्र अगदी अचूक आहे. हे
भारतवासीयांकरिता आहे. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये संपूर्ण ज्ञान आहे. तुम्ही
जाणता की, पतित-पावन, सद्गती दाता शिवबाबांच्या मतावर आम्ही पुन्हा एकदा सहज राजयोग
बळाद्वारे, आपल्या तन-मन-धनाने भारताला स्वर्ग बनवत आहोत. दुसऱ्या कोणाचेही आम्ही
घेत नाही. आमच्याच तन-मन-धनानेच सेवा करतो. जे जितके करतील, ते आपल्याच भविष्याकरिता
करत आहेत. तुम्हीच घरातील सदस्य आहात. तुमच्या द्वारेच बाबा सतयुगी स्वराज्याची
स्थापना करवून घेत आहेत. खर्च देखील तुम्हीच कराल. तुमचा फारसा काही खर्च नाहीये.
तुम्हाला फक्त शिवबाबांची आठवण करायची आहे, कुमारींना कसला खर्च करायचा?
त्यांच्याकडे काय आहे? बाबा मुलांकडून फी घेतील का? काहीही नाही. शाळांमध्ये तर
सर्वात अगोदर फीची गोष्ट करतात. तिथे शिक्षणामध्ये किती खर्च होतो. इथे तर शिवबाबा
मुलांकडून पैसे कसे घेतील! शिवबाबांना स्वतःकरिता घर थोडेच बांधायचे आहे, ज्यासाठी
पैसे घेतील. तुम्हा मुलांना भविष्य स्वर्गामध्ये जाऊन हिरे-माणकांचे महाल बांधायचे
आहेत, म्हणून तुम्ही इथे जे काही करता, त्याचे रिटर्न म्हणून भविष्यामध्ये तुम्हाला
महाल मिळतो. या नीट समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. जितके जे तन-मन-धनाने सेवा करतील,
ते तिथे तसेच प्राप्त करतील. कॉलेज अथवा हॉस्पिटल बांधतात, त्यासाठी १० लाख, २० लाख
खर्च करावे लागतात. इथे काही एवढा खर्च करावा लागत नाही. छोट्याशा घरामध्ये रुहानी
कॉलेज कम हॉस्पिटल बनवतात. पांडवांचा आदि पती कोण होता? त्यांनी तर श्रीकृष्णाचे
नाव लिहिले आहे; वास्तविक आहेत - निराकार भगवान. तुम्हाला श्रीमत देणारे भगवान आहेत.
बाकीचे तर सर्वजण आहेत रावणाच्या मतावर, रावण राज्यामध्ये आहेत. रावणाच्या मतावर
किती डर्टी बनले आहेत. आता हीच जुनी सृष्टी, तीच पुन्हा नवीन बनते. सृष्टीवर फक्त
भारतच होता. ‘नवीन भारत’ आणि ‘जुना भारत’ असे म्हणू. नवीन भारत तर स्वर्ग होता. मग
भारत जुना आहे, तर नरक आहे. याला रौरव नरक म्हटले जाते. ही मनुष्य मात्रांचीच गोष्ट
आहे. इथे सुखाचे नामोनिशाणही नाही. हे काही सुख थोडेच आहे. संन्यासी देखील म्हणतात
- या वेळचे सुख काग-विष्ठे समान आहे, म्हणून ते गृहस्थ व्यवहाराचा त्याग करतात. ते
काही स्वर्ग अथवा सतयुगाची स्थापना करू शकत नाहीत. श्रीकृष्णपुरी तर परमात्माच
स्थापन करतात. श्रीकृष्णाची आत्मा आणि शरीर दोन्ही सतोप्रधान होते, म्हणून
श्रीकृष्णावर खूप प्रेम करतात, कारण पवित्र आहे ना. गायले देखील जाते - लहान मूल
ब्रह्म-ज्ञानी समान असते. लहान मुलांना विकारां विषयी माहिती नसते. संन्याशांना तरी
देखील माहिती असते. मूल तर जन्मतःच महात्मा असते. मुलांना तर ‘पवित्र फूल’ म्हटले
जाते. नंबरवन फूल आहे - श्रीकृष्ण, स्वर्ग नवीन दुनियेचा पहिला प्रिन्स. जन्म घेतला
तर म्हणतील - फर्स्ट प्रिन्स. श्रीकृष्णाची तर सर्वजण आठवण करतात की, श्रीकृष्णा
सारखे मूल व्हावे. आता बाबा म्हणतात - जे बनायचे आहे ते बना. फक्त एकच श्रीकृष्ण
थोडेच बनतो! प्रिन्स ऑफ वेल्स किती बनतात? सेकंड, थर्ड असतात ना. तर इथे देखील
डिनायस्टी (घराणे) आहे. वडिलांच्या नंतर मग दुसरे गादीवर बसतील. जशी राजघराणी असतात,
तसे हे घराणे आहे. तुमचा संबंधच ख्रिश्चनांशी आहे. श्रीकृष्ण आणि ख्रिश्चन दोघांची
राशी एकच आहे. आपसामध्ये देवाण-घेवाण देखील खूप चालते. भारतातून ते किती धन घेऊन
गेले आहेत. आता ते परत देत आहेत. रिटर्न सर्विस करत आहेत. हे युरोपवासी आपसामध्ये
युद्ध करून नष्ट होतील. यावर एक गोष्ट देखील आहे - दोन बोके भांडले, मधल्यामध्ये
माकडाने लोणी खाल्ले. ही गोष्ट आताची आहे. ते आपसामध्ये लढतील आणि राज्य-भाग्य
तुम्हाला मिळणार आहे. आता तुम्हा मुलांकडे अथाह ज्ञान आहे. तुम्हा मुलांच्या
बुद्धीमध्ये आहे की, आम्ही सर्व ब्रह्माकुमार-कुमारी आहोत. असे नाही की, आम्ही
गुजराती आहोत, आम्ही बंगाली आहोत. असे नाहीये. हा मतभेद देखील निघून गेला पाहिजे.
आपण एका पित्याची संतान आहोत. ब्रह्मा द्वारे शिवबाबांच्या श्रीमतावर आम्ही पुन्हा
आमचे स्वराज्य स्थापन करत आहोत - ज्ञान आणि योगबलाद्वारे. योगबलाद्वारेच आपण पावन
बनतो. बाबा आहेत सर्वशक्तिमान, त्यांच्याकडून बळ मिळते. तुम्ही विश्वाची बादशाही
घेता. यामध्ये तुम्ही युद्ध इत्यादी काहीही करत नाही. हे संपूर्ण पवित्रतेचे बळ आहे.
म्हणतात देखील की, येऊन पतितापासून पावन बनवा, तर हे आठवणीचेच बळ आहे. असे होऊ नये
की, तिथे उलट्या धंद्यामध्ये जाऊन (दुनियावी कामधंद्यामध्ये व्यस्त होऊन) सर्व काही
विसरून जाल. इथे सन्मुख तर ज्ञान सागराच्या लाटा बघत असता. नद्यांमध्ये तशा लाटा
नसतात. सागराची एक लाट किती नुकसान करते. जेव्हा भूकंप होईल, तेव्हा सागर देखील
खवळेल. सागराला सुकवून (भर घालून) जी जमीन घेतली आहे, ती जमीन मग किती किंमतीला
विकतात. तुम्ही जाणता की, ही बॉंम्बेच राहणार नाहीये. पूर्वी ही बॉंम्बे थोडीच होती!
एक छोटेसे गाव होते. या माता तर भोळ्या आहेत. त्या इतक्या शिकलेल्या नाहीत. इथे तर
(या ज्ञानमार्गामध्ये तर) शिकलेले सर्व काही विसरायचे आहे. तुम्ही काहीही शिकलेले
नसाल तर चांगलेच आहे. शिकलेले मनुष्य समजून घेताना किती प्रश्न विचारतात. इथे तर
फक्त बाबांची आठवण करायची आहे. कोणत्या देहधारी मनुष्याची आठवण करण्याची गोष्ट
नाहीये. महिमा आहेच एका बेहदच्या बाबांची. तुम्ही जाणता की, उच्च ते उच्च आहेत एक
भगवान आणि मग दुसऱ्या नंबरवर आहेत ब्रह्मा. त्यांच्या पेक्षा उच्च कोणीही नाही.
यांच्यापेक्षा मोठी असामी कोणीही नाही, परंतु राहतात बघा किती सर्वसामान्य असल्या
प्रमाणे. मुलांसोबत किती सर्वसामान्य असल्यासारखे बसतात. ट्रेनमधून जातात, कोणी कसे
ओळखणार की हे कोण आहेत! भगवान येऊन ज्ञान देतात, तर जरूर प्रवेश करून ज्ञान देतील
ना. जर श्रीकृष्ण असता तर गर्दी झाली असती. मग तर शिकवू देखील शकले नसते, सर्वजण
फक्त दर्शन घेत राहिले असते. इथे तर बाबा गुप्त, साधारण वेषामध्ये बसून मुलांना
शिकवत आहेत.
तुम्ही आहात गुप्त
सेना. तुम्ही जाणता की, आपण आत्मे योगबलाद्वारे पुन्हा आपले राज्य स्थापन करत आहोत.
हे जुने शरीर सोडून जाऊन नवीन गोरे शरीर धारण करू. आता आहोत - आसुरी संप्रदाय, नंतर
बनणार - दैवी संप्रदाय. आत्मा म्हणते की, मी नवीन दुनियेमध्ये दैवी शरीर धारण करून
जाऊन राज्य करेन. आत्मा मेल (पुरुष) आहे, शरीर प्रकृती (फिमेल) आहे. आत्मा सदैव मेल
आहे. बाकी शरीर, कार्मिक हिशोबानुसार मेल अथवा फीमेलचे मिळते. परंतु मी अविनाशी
आत्मा आहे. हे चक्र फिरत राहते. कलियुगाचा विनाश देखील जरूर होणार. विनाशाची चिन्हे
देखील समोर बघत आहात. तीच महाभारत लढाई आहे, तर जरूर भगवान देखील असतील. कोणत्या
रूपामध्ये, कोणत्या तनामध्ये आहेत, हे तुम्हा मुलांव्यतिरिक्त कोणालाही माहीत नाही.
सांगतात देखील - मी अगदी साधारण तनामध्ये येतो. मी श्रीकृष्णाच्या तनामध्ये येत नाही.
हेच पूर्ण ८४ जन्म घेतात. मी यांच्या अनेक जन्मांतील अंतिम जन्माच्याही अंतामध्ये
येतो. ८४ जन्म सूर्यवंशी घराण्यातीलच घेतात. तेच पहिल्या नंबरमध्ये येतील. साकारी
झाड आणि निराकारी झाड या दोन्हींचे तुम्हाला संपूर्ण ज्ञान आहे. मूलवतनमधून
क्रमवारीने आत्मे येतात. सर्वप्रथम देवी-देवता धर्माचे आत्मे येतात, त्यानंतर
नंबरवार इतर धर्माचे आत्मे येतात. चित्रांमधील स्पष्टीकरण तर खूप सुंदर आहे. मुलांनी
समजावून सांगायचे आहे. कुमारींनी उभे राहिले पाहिजे. तुम्ही मुली अशा प्रकारे गोष्टी
समजावून सांगाल, तर आश्चर्यच ठरेल ना. किती नाव कमवाल! लौकिक आणि अलौकिक दोन्ही नावं
उज्ज्वल कराल. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) संगमयुगावर
श्रेष्ठ कर्म करून पुरुषोत्तम बनायचे आहे. कोणतेही असे कर्म करायचे नाही जे कनिष्ठ
बनवेल.
२) गुप्त रूपामध्ये
बाबांचे मदतगार बनून भारताला स्वर्ग बनविण्याची सेवा करायची आहे. आपल्याच
तन-मन-धनाने भारताला स्वर्ग बनवायचे आहे. आठवण आणि पवित्रतेचे बळ जमा करायचे आहे.
वरदान:-
आपल्या
संपूर्ण स्टेजद्वारा सर्व प्रकारची अधीनता नष्ट करणारे प्रकृतिजीत भव
जेव्हा तुम्ही आपल्या
संपूर्ण स्टेजमध्ये स्थित व्हाल, तेव्हा प्रकृतीवर देखील विजय अर्थात अधिकाराचा
अनुभव होईल. संपूर्ण स्टेजमध्ये कोणत्याही प्रकारची अधीनता राहत नाही. परंतु अशी
संपूर्ण स्टेज बनविण्यासाठी तीन गोष्टी एकत्र पाहिजेत:- १) रुहानियत, २) रुहाब आणि
३) दयाळूपणाचा गुण. जेव्हा या तिन्ही गोष्टी प्रत्यक्ष रूपामध्ये, स्थितीमध्ये,
चेहऱ्यावरून अथवा कर्मामध्ये दिसून येतील, तेव्हा म्हणणार अधिकारी अथवा प्रकृतिजीत
आत्मा.
बोधवाक्य:-
श्रीमताचा
लगाम मजबूत असेल, तर मन रूपी घोडा पळू शकत नाही.
हे अव्यक्त इशारे -
अपवित्रतेच्या बीजाला सुद्धा नष्ट करून संपूर्ण स्वच्छ (पवित्र) बना.
जर कोणतीही अपवित्रता
वृत्ती, स्मृती अथवा संकल्पामध्ये असेल, तर ब्राह्मणपणाच्या स्थितीमध्ये स्थित राहू
शकत नाही; म्हणून पावलोपावली सावध रहा. अनेक विशेषतांसोबत जर कोणती एक जरी कमजोरी
असेल, तर ती एक कमजोरी अनेक विशेषतांना नष्ट करते.