07-10-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - भिन्न-भिन्न युक्त्या समोर ठेवून आठवणीच्या यात्रेमध्ये रहा, या जुन्या दुनियेला विसरून आपल्या स्वीट होमची आणि नवीन दुनियेची आठवण करा”

प्रश्न:-
असा कोणता ॲक्ट अथवा पुरुषार्थ आहे जो आताच चालतो, बाकी साऱ्या कल्पामध्ये केला जात नाही?

उत्तर:-
आठवणीच्या यात्रेमध्ये राहून आत्म्याला पावन बनविण्याचा पुरुषार्थ, साऱ्या दुनियेला पतिता पासून पावन बनविण्याचा ॲक्ट साऱ्या कल्पामध्ये केवळ याच संगमाच्या वेळी चालतो. हा ॲक्ट प्रत्येक कल्पामध्ये रिपीट होतो. तुम्ही मुले या अनादि अविनाशी ड्रामाच्या वंडरफुल रहस्याला जाणता.

ओम शांती।
रुहानी बाबा बसून रुहानी मुलांना समजावून सांगत आहेत म्हणून रूहानी मुलांनी देही-अभिमानी अथवा रूहानी अवस्थेमध्ये निश्चय-बुद्धी होऊन बसायचे किंवा ऐकायचे आहे. बाबांनी समजावून सांगितले आहे - आत्माच ऐकते या कर्मेंद्रियांद्वारे, हे पक्के लक्षात ठेवा. सद्गती आणि दुर्गतीचे हे चक्र तर प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये राहिलेच पाहिजे, ज्यामध्ये ज्ञान आणि भक्ती सर्व येते. चालता-फिरता बुद्धीमध्ये हे रहावे. ज्ञान आणि भक्ती, सुख आणि दुःख, दिवस आणि रात्रीचा खेळ कसा चालतो. आपण ८४ चा पार्ट बजावतो. बाबांना आठवण आहे तर मुलांना देखील आठवणीमध्ये राहण्याचा पुरुषार्थ करायला लावतात, याद्वारे तुमची विकर्म देखील विनाश होतात आणि तुम्ही राज्य देखील प्राप्त करता. जाणता ही जुनी दुनिया तर आता नष्ट होणार आहे. जसे कोणते जुने घर असते आणि नवीन घर बनवतात तर मनामध्ये निश्चय असतो - आता आपण नवीन घरी जाणार. मग घर बनविण्यामध्ये कधी वर्ष दोन वर्षे लागतात. जसे नवी दिल्लीमध्ये गव्हर्मेंट हाऊस इत्यादी बनवतात तर जरूर गव्हर्मेंट म्हणेल आम्ही ट्रान्सफर होऊन नवीन दिल्लीमध्ये जाणार. तुम्ही मुले जाणता ही संपूर्ण बेहदची दुनिया जुनी आहे. आता जायचे आहे नवीन दुनियेमध्ये. बाबा युक्त्या सांगतात - अशा प्रकारच्या युक्त्यांनी बुद्धीला आठवणीच्या यात्रेमध्ये ठेवायचे आहे. आपल्याला आता घरी जायचे आहे म्हणून स्वीट होमची आठवण करायची आहे, ज्याच्यासाठी लोक डोकेफोड करतात (खूप परिश्रम करतात). हे देखील गोड-गोड मुलांना समजावून सांगितले आहे की हे दुःखधाम आता नष्ट होणार आहे. भले तुम्ही इथे आहात परंतु ही जुनी दुनिया पसंत नाही आहे. आपल्याला आता नवीन दुनियेमध्ये जायचे आहे. भले समोर कोणतेही चित्र नसेल तरी देखील तुम्ही समजता आता जुन्या दुनियेचा अंत आहे. आता आपण नवीन दुनियेमध्ये जाणार. भक्तीमार्गाची तर किती खंडीभर चित्रे आहेत. त्याच्या तुलनेत तुमची चित्रे तर खूप थोडी आहेत. तुमची ही ज्ञानमार्गाची चित्रे आहेत आणि ती सर्व आहेत भक्ती मार्गाची. सर्व भक्ती चित्रांवरच आधारित आहे. आता तुमची तर आहेत रियल चित्रे, त्यावरून तुम्ही सांगू शकता की, चुकीचे काय आहे, बरोबर काय आहे. बाबांना म्हटलेच जाते नॉलेजफुल. तुम्हाला हे नॉलेज आहे. तुम्ही जाणता आपण साऱ्या कल्पामध्ये किती जन्म घेतले आहेत. हे चक्र कसे फिरते. तुम्हाला निरंतर बाबांच्या आठवणीमध्ये आणि या नॉलेजमध्ये रममाण होऊन राहायचे आहे. बाबा तुम्हाला संपूर्ण रचयिता आणि रचनेचे नॉलेज देतात. तर बाबांची देखील आठवण राहते. बाबांनी सांगितले आहे - मी तुमचा पिता, टीचर, सद्गुरु आहे. तुम्ही फक्त एवढेच समजावून सांगा की, बाबा म्हणतात - तुम्ही मला पतित-पावन, लिबरेटर, गाईड म्हणता ना. कुठले गाईड? शांतीधाम, मुक्तीधामचे. तिथपर्यंत बाबा नेऊन सोडतील. मुलांना शिकवून-सवरून, गुल-गुल (फूल) बनवून घरी नेऊन सोडतील. बाबांशिवाय दुसरे कोणीही घेऊन जाऊ शकत नाही. भले कोणी कितीही तत्त्व ज्ञानी अथवा ब्रह्म ज्ञानी असेल. ते समजतात आम्ही ब्रह्म मध्ये लीन होणार. तुमच्या बुद्धीमध्ये आहे की शांतीधाम तर आपले घर आहे. तिथे जाऊन मग सर्वात पहिले आपण नवीन दुनियेमध्ये येणार. ते सर्व (इतर धर्मांचे) नंतर येणारे आहेत. तुम्ही जाणता सर्व धर्म कसे नंबरवार येतात. सतयुग-त्रेतामध्ये कोणाचे राज्य आहे. त्यांचे धर्मशास्त्र कोणते आहे. सूर्यवंशी-चंद्रवंशींचे तर एकच शास्त्र आहे. परंतु ती गीता काही रियल नाहीये कारण तुम्हाला जे ज्ञान मिळते ते तर इथेच नष्ट होते. तिथे कोणतेही शास्त्र नसते. द्वापर पासून जे धर्म येतात त्यांची धर्मशास्त्रे अजूनही आहेत. आजही चालत आहेत. आता पुन्हा एका धर्माची स्थापना होत आहे तर बाकी सर्व नष्ट होणार आहे. म्हणत असतात एक राज्य, एक धर्म, एक भाषा, एक मत असावे. ते तर एकाद्वारेच स्थापन होऊ शकते. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये सतयुगापासून कलियुग अंतापर्यंतचे संपूर्ण ज्ञान आहे. बाबा म्हणतात - आता पावन बनण्याकरिता पुरुषार्थ करा. तुम्हाला पतित बनण्यामध्ये अर्धे कल्प लागले आहे. खरे तर सारे कल्पच म्हणावे लागेल, ही आठवणीची यात्रा तर तुम्ही आताच शिकता. तिथे (सतयुग-त्रेतामध्ये) काही ही नाहीये. तिथे पतितापासून पावन होण्याचा पुरुषार्थ करत नाहीत. ते अगोदरच राजयोग शिकून इथूनच पावन होऊन जातात. त्याला म्हटले जाते सुखधाम. तुम्ही जाणता साऱ्या कल्पामध्ये केवळ आताच आपण आठवणीच्या यात्रेचा पुरुषार्थ करतो. परत पतित दुनियेला पावन बनविण्याकरिता हाच पुरुषार्थ अथवा जो ॲक्ट चालतो तो पुन्हा कल्पानंतरच रिपीट होईल. चक्र तर जरूर फिरणार ना. तुमच्या बुद्धीमध्ये या सर्व गोष्टी आहेत की, हे नाटक आहे, सर्व आत्मे पार्टधारी आहेत ज्यांच्यामध्ये अविनाशी पार्ट भरलेला आहे. जसा तो ड्रामा चालत राहतो. परंतु ती फिल्म (रीळ) घासून जुनी होते. ही आहे अविनाशी. हे देखील आश्चर्य आहे. किती छोट्याशा आत्म्यामध्ये सारा पार्ट भरलेला आहे. बाबा तुम्हाला किती गुह्य ते गुह्य महीन गोष्टी समजावून सांगतात. आता कोणीही ऐकतात तर म्हणतात हे तर खूप वंडरफुल गोष्टी सांगतात. आत्मा काय आहे, ते आता समजले आहे. शरीराला सर्व समजतात. डॉक्टर लोक तर मनुष्याच्या हार्टला देखील बाहेर काढून मग पुन्हा आत घालतात. परंतु आत्म्याविषयी कोणालाच ठाऊक नाही आहे. आत्मा पतितापासून पावन कशी बनते, ते देखील कोणीही जाणत नाही. पतित आत्मा, पावन आत्मा, महान आत्मा म्हणतात ना. सर्व बोलावतात देखील की, ‘हे पतित-पावन येऊन आम्हाला पावन बनवा’. परंतु आत्मा कशी पावन बनेल - त्याच्याकरिता पाहिजे अविनाशी सर्जन. आत्मा त्यांना बोलावते जे पुनर्जन्म रहित आहेत. आत्म्याला पवित्र बनविण्याचे औषध त्यांच्या जवळ आहे. तर तुम्हा मुलांना आनंदाने शहारे आले पाहिजेत - स्वयं भगवान शिकवत आहेत, जरूर तुम्हाला भगवान-भगवती बनवतील. भक्तिमार्गामध्ये या लक्ष्मी-नारायणाला भगवान-भगवतीच म्हणतात. तर यथा राजा-राणी तथा प्रजा असेल ना. आप समान पवित्र देखील बनवतात. ज्ञान सागर देखील बनवतात, मग आपल्याही पेक्षा मोठ्या विश्वाचा मालक बनवतात. पवित्र, अपवित्रतेचा पूर्ण पार्ट तुम्हाला बजावायचा आहे. तुम्ही जाणता बाबा आलेले आहेत पुन्हा आदि सनातन देवी-देवता धर्म स्थापन करण्यासाठी. ज्याच्यासाठीच म्हणतात की, हा धर्म प्राय: लोप झाला आहे. त्याची वडाच्या झाडाशी तुलना केली गेली आहे. शाखा खूप निघतात, खोड राहिलेले नाही. या देखील किती धर्मांच्या शाखा निघाल्या आहेत, फाउंडेशन देवता धर्मच राहिलेला नाही. प्राय: लोप झाला आहे. बाबा म्हणतात - तो धर्म आहे परंतु धर्माचे नाव बदलले आहे. पवित्र नसल्या कारणाने स्वतःला देवता म्हणू शकत नाहीत. नाहीत तेव्हाच तर बाबा येऊन रचना रचतील ना. आता तुम्ही समजता आपण पवित्र देवता होतो. आता पतित बनलो आहोत. प्रत्येक वस्तू अशीच होते. तुम्हा मुलांनी हे विसरता कामा नये. पहिले मुख्य लक्ष्य आहे बाबांची आठवण करण्याचे, ज्याद्वारेच पावन बनायचे आहे. सर्व हेच बोलतात - ‘आम्हाला पावन बनवा’. असे म्हणणार नाहीत की, आम्हाला राजा-राणी बनवा. तर तुम्हा मुलांना खूप अभिमान वाटला पाहिजे. तुम्ही जाणता आपण तर भगवंताची मुले आहोत. आता आपल्याला जरूर वारसा मिळाला पाहिजे. कल्प-कल्प हा पार्ट बजावला आहे. झाड वाढतच जाईल. बाबांनी चित्रांवर देखील समजावून सांगितले आहे की, ही आहेत सद्गतीची चित्रे. तुम्ही तोंडी देखील समजावून सांगता, चित्रांवर देखील समजावून सांगता. तुमच्या या चित्रांमध्ये सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे रहस्य आहे. जी मुले सेवा करणारी आहेत ती आप समान बनवत जातात. शिकून मग इतरांना शिकविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जितके जास्त शिकाल तितके उच्च पद प्राप्त कराल. बाबा म्हणतात - मी तदबीर (पुरुषार्थ) तर करवितो, परंतु तकदीर (भाग्य) देखील हवे ना. प्रत्येकजण ड्रामा अनुसार पुरुषार्थ करत राहतात. ड्रामाचे रहस्य देखील बाबांनी सांगितले आहे. बाबा, पिता देखील आहेत, टीचर देखील आहेत. सोबत घेऊन जाणारे खरे-खरे सद्गुरु देखील आहेत. ते बाबा आहेत अकाल मुर्त. आत्म्याचे हे तख्त आहे ना, जिथून हा पार्ट बजावतात. तर बाबांना देखील पार्ट बजावण्याकरिता, सद्गती करण्याकरिता तख्त पाहिजे ना. बाबा म्हणतात - मला साधारण तनामध्ये यायचे आहे. मी कोणताही दिमाख किंवा थाटमाट ठेवू शकत नाही. त्या गुरूंचे फॉलोअर्स लोक तर गुरूसाठी सोन्याचे सिंहासन, बंगला इत्यादी बनवतात. तुम्ही काय बनवाल? तुम्ही मुले देखील आहात, स्टूडंट देखील आहात. तर तुम्ही त्यांच्यासाठी काय कराल? कुठे बनवाल? हे तर साधारण आहेत ना.

मुलांना हे देखील समजावून सांगत असतात - वेश्यांची सेवा करा. गरिबांचा देखील उद्धार करायचा आहे. मुले प्रयत्न देखील करतात, बनारसला देखील गेले आहेत. त्यांना तुम्ही जागृत कराल तर म्हणतील - वाह! बी.के. ची तर कमालच आहे - वेश्यांना देखील ज्ञान देतात. त्यांना देखील समजावून सांगायचे आहे - आता तुम्ही हा धंदा सोडून शिवालयाचे मालक बना. हे नॉलेज शिकून मग इतरांनाही शिकवा. वेश्या देखील इतरांना शिकवू शकतात. शिकून हुशार होतील तर मग आपल्या ऑफिसर्सना देखील समजावून सांगतील. हॉलमध्ये चित्रे इत्यादी ठेवून बसून समजावून सांगा तर सर्वजण म्हणतील वाह! वेश्यांना देखील शिवालयवासी बनविण्याकरिता या बी.के. निमित्त बनल्या आहेत. मुलांमध्ये सेवेचे विचार चालले पाहिजे. तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. अहिल्या, कुब्जा, भिल्लिणी, गणिका या सर्वांचा उद्धार करायचा आहे. गायन देखील आहे - साधूंचा देखील उद्धार केला आहे. हे तर समजता साधूंचा उद्धार होईल शेवटी. आता जर ते तुमचे बनले तर सारा भक्तिमार्गच संपून जाईल. क्रांती होईल. संन्यासी लोकच जर आपले आश्रम सोडून देतील, बस्स आम्ही हरलो. हे सर्व अखेरीला होईल. बाबा डायरेक्शन देत राहतात - असे-असे करा. बाबा तर कुठे बाहेर जाऊ शकत नाहीत. बाबा म्हणतील मुलांकडे जाऊन शिका. समजावून सांगण्याच्या युक्त्या तर सर्व मुलांना सांगत राहतात. असे काम करून दाखवा जेणेकरून लोकांच्या मुखावाटे ‘वाह-वाह’ निघेल. गायन देखील आहे शक्तींमध्ये ज्ञानाचे बाण भगवंताने भरले होते. हे आहेत ज्ञान बाण. तुम्ही जाणता हे बाण तुम्हाला या दुनियेतून त्या दुनियेमध्ये घेऊन जातात. तर तुम्हा मुलांना अतिशय विशाल-बुद्धी बनायचे आहे. एका ठिकाणी जरी तुमचे नाव झाले, गव्हर्मेंटला समजले तर मग खूप प्रभाव दिसून येईल. एका स्थानावरून जरी कोणी चांगले ५-७ ऑफिसर्स निघाले तर ते वर्तमानपत्रांमध्ये टाकायला सुरूवात करतील. म्हणतील - हे बी.के. वेश्यांची देखील त्या धंद्यापासून सुटका करून त्यांना शिवालयाचे मालक बनवितात. खूप वाह-वाह होईल. धन इत्यादी सर्व त्या घेऊन येतील. तुम्ही धनाचे काय कराल! तुम्ही मोठ-मोठी सेंटर्स उघडाल. पैशाने चित्रे इत्यादी बनवावी लागतात. मनुष्य पाहून खूप आश्चर्यचकित होतील. म्हणतील सर्वात पहिले तर तुम्हाला प्राईज द्यायला पाहिजे. गव्हर्मेंट हाऊसमध्ये देखील तुमची चित्रे घेऊन जातील. यावर खूप फिदा होतील. हृदयामध्ये इच्छा जागृत झाली पाहिजे - मनुष्यांना देवता कसे बनवावे. हे तर जाणता ज्यांनी कल्पापूर्वी घेतले होते तेच घेतील. इतके धन इत्यादी सर्व काही सोडून देणे, यामध्ये मेहनत आहे. बाबांनी (ब्रह्मा बाबांनी) म्हटले - ‘मला आपले घर-दार, मित्र-संबंधी इत्यादी काहीच नाहीत, मला काय आठवणार, बाबांशिवाय आणि तुम्हा मुलांशिवाय काहीच नाही आहे. सर्व काही एक्स्चेंज केले आहे. बाकी बुद्धी कुठे जाईल. बाबांना रथ दिला आहे. जसे तुम्ही तसा मी सुद्धा शिकत आहे. फक्त रथ (तन) बाबांना लोन दिला आहे’.

तुम्ही जाणता आपण पुरुषार्थ करत आहोत, सूर्यवंशी घराण्यामध्ये सर्वप्रथम येण्याकरिता. ही आहेच नरापासून नारायण बनण्याची कथा. तिसरा नेत्र आत्म्याला मिळतो. आपण आत्मा शिकून, नॉलेज ऐकून देवता बनत आहोत. मग आपण राजांचेही राजा बनणार. शिवबाबा म्हणतात मी तुम्हाला डबल मुकुटधारी बनवितो. तुमची बुद्धी आता किती प्रगल्भ झाली आहे, ड्रामा अनुसार कल्पापूर्वी प्रमाणे. आता आठवणीच्या यात्रेमध्ये देखील रहायचे आहे. सृष्टीचक्राची देखील आठवण करायची आहे. जुन्या दुनियेला बुद्धीने विसरायचे आहे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) लक्षात रहावे की आता आपल्यासाठी नवीन दुनिया स्थापन होत आहे, ही दुःखाची जुनी दुनिया नष्ट झाली की झाली. ही दुनिया अजिबात आवडता कामा नये.

२) जसे बाबांनी (ब्रह्मा बाबांनी) आपले सर्व काही एक्सचेंज केले त्यामुळे बुद्धी कुठेच भटकत नाही. असे फॉलो फादर करायचे आहे. मनामध्ये बस हीच इच्छा रहावी की आपण मनुष्याला देवता बनविण्याची सेवा करावी, या वेश्यालयाला शिवालय बनवावे.

वरदान:-
देह-अभिमानाच्या रॉयल रूपाला देखील समाप्त करणारे साक्षी आणि दृष्टा भव

इतरांच्या गोष्टींना रिगार्ड न देणे, कट करणे - हे देखील देह-अभिमानाचे रॉयल रूप आहे जे आपला किंवा दुसऱ्यांचा अपमान करते; कारण जो कट करतो त्याला अभिमान येतो आणि ज्याची गोष्ट कट करतो त्याला अपमान वाटतो म्हणून ‘साक्षी दृष्टा’च्या वरदानाला स्मृतीमध्ये ठेवून, ड्रामाची ढाल आणि ड्रामाच्या पट्ट्यावर प्रत्येक कर्म आणि संकल्प करत असताना, ‘मी’पणाच्या या रॉयल रूपाला देखील समाप्त करून प्रत्येकाच्या गोष्टीला सन्मान द्या, स्नेह द्या तर ते नेहमी करिता सहयोगी होतील.

बोधवाक्य:-
परमात्म श्रीमत रुपी जलाच्या आधारे कर्म रूपी बिजाला शक्तिशाली बनवा.

अव्यक्त इशारे:- स्वयं प्रति आणि सर्वांप्रती मनसा द्वारे योगाच्या शक्तींचा प्रयोग करा.

प्रत्येक क्षणी, प्रत्येक आत्म्याप्रती शुभ भावना आणि शुभ कामनेची शुद्ध व्हायब्रेशनवाली मनसा स्वतःला आणि इतरांनाही अनुभव व्हावी. मनापासून प्रत्येक क्षणी सर्व आत्म्यांप्रती आशीर्वाद निघत रहावेत. मनसा नेहमी याच सेवेमध्ये बिझी रहावी. ज्याप्रमाणे वाणीच्या सेवेमध्ये बिझी राहण्याचे अनुभवी झाला आहात. जर सेवा मिळाली नाही तर स्वतःला रिकामे अनुभव करता. तशी प्रत्येक क्षणी वाणी सोबतच मनसा सेवा स्वतः होत रहावी.