07-10-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड मुलांनो, उशिरा
येऊन देखील वेगाने पुरुषार्थ करा तर खूप पुढे जाऊ शकता, इतरांची चिंता सोडून आपल्या
पुरुषार्थाला लागा”
प्रश्न:-
कोणते कर्तव्य
एका बाबांचेच आहे जे कोणत्याही मनुष्याचे असू शकत नाही?
उत्तर:-
मनुष्याला
देवता बनविणे, त्याला शांतीधाम, सुखधामचे मालक बनविणे, हे कर्तव्य केवळ एका
बाबांचेच आहे जे कोणीही मनुष्य करू शकत नाही. तुम्हाला निश्चय आहे संगमावरच आपण
भगवानुवाच ऐकतो. आता स्वयं भगवान कल्पापूर्वी प्रमाणे राजयोग शिकवत आहेत.
ओम शांती।
रूहानी बेहदचे
बाबा बेहदच्या रूहानी मुलांप्रती समजावून सांगत आहेत. हा एक-एक शब्द अथवा
ज्ञान-रत्न लाखों रुपयांचे आहे. बाबांनी समजावून सांगितले आहे - परमात्म्याला
रूप-बसंत देखील म्हटले आहे. त्यांचे रूप देखील आहे आणि नाव शिवबाबा आहे. ते ज्ञानाचा
सागर आहेत, ज्या ज्ञानाद्वारे सद्गती होते. ज्ञान, धन देखील आहे तर ज्ञान, शिक्षण
देखील आहे. हे ज्ञान स्पिरिच्युअल फादर देतात. आत्म्याला म्हटले जाते -
स्पिरिच्युअल रूह. भक्ती मार्गामध्ये आत्मा, बाबांना भेटण्यासाठी किती भटकते,
त्यांना शोधत असते. समजतात देखील भगवान एक शिव आहेत तरी देखील खस्ता खात राहतात.
बाबा येऊन समजावून सांगतात की, ‘रुहानी मुलांनो, तुम्ही तर अविनाशी आहात, परमधाम
मध्ये राहणारे आहात, जिथून मग पार्ट बजावण्याकरिता इथे येता. तुम्ही दूर देशाचे
राहणारे आहात. हा ड्रामा आहे, याचे नाव आहे ‘हार-जीत’चा खेळ. सुख-दुःखाचा खेळ. बाबा
समजावून सांगत आहेत की, ‘मी आणि तुम्ही सर्व शांतीधामचे राहणारे आहोत. त्याला
निर्वाणधाम देखील म्हणतात’. पहिले तर हा निश्चय करायचा आहे की आपण तिथले राहणारे
आहोत. मज आत्म्याचा स्वधर्म आहे - शांत. आत्मा बिंदूमध्ये संपूर्ण अविनाशी पार्ट
भरलेला आहे. बाबा शिकवतात देखील तुम्हालाच, तुम्ही दुनियेतील लोकांची चिंता करता.
तुम्हाला निश्चय आहे ना की भगवानुवाच होतेच मुळी संगमावर, त्यानंतर पुन्हा कधीही
होत नाही. इतर कोणीही मनुष्याला देवता बनवू शकत नाही. शांतीधाम, सुखधामचा मालक बनवू
शकत नाही. कल्पापूर्वी देखील बाबांनी बनवले होते. आता जे प्रेसिडेंट बनले आहेत ५
हजार वर्षानंतर तेच बनणार. संपूर्ण दुनियेतील जी दृश्ये आणि घटना आहेत त्या ५ हजार
वर्षानंतर पुन्हा रिपीट होतील. वृद्ध माता इतके सर्व धारण करू शकत नाहीत म्हणून
त्यांना सांगितले जाते - फक्त ३ गोष्टी लक्षात ठेवा - आपण आत्मे शांतिधामचे राहणारे
आहोत, नंतर सुखधाममध्ये येतो आणि मग अर्ध्याकल्पानंतर जेव्हा रावण राज्य सुरू होते
तेव्हा विकारी बनतो, यालाच म्हटले जाते दुःख धाम. जेव्हा दुःखधामचा काळ पूर्ण होतो
तेव्हा बाबा म्हणतात - माझी आठवण करा. तुम्हाला शांतीधाम, सुखधाम मध्ये घेऊन
जाण्याकरिता मला यावे लागते.
आता जे येऊन बाबांचे
बनले आहेत, तेच वारसा प्राप्त करतील. ही सूर्यवंशी, चंद्रवंशी राजधानी स्थापन होत
आहे. करोडो मनुष्य येऊन काही ना काही बाबांकडून ऐकतील, समजतील. वृद्धी होत जाईल.
तुम्हाला सगळीकडे जाऊन समजावून सांगावे लागेल. वर्तमानपत्रा द्वारे देखील अनेक जण
ऐकतील, पाकिस्तानमध्ये देखील वर्तमानपत्राद्वारे वाचतील. तिथे बसून देखील हे ज्ञान
ऐकतील. साऱ्या दुनियेमध्ये गीतेचा प्रचार मोठ्या प्रमाणात आहे. बाबा म्हणतात -
मामेकम् (मज एकाची) आठवण करा आणि वारशाची आठवण करा. ही माहिती वर्तमानपत्रांमध्ये
वाचतील यामुळे देखील अनेक ब्राह्मण बनतील, ज्यांना वारसा घ्यायचा असेल ते तर जरूर
येऊन घेतील. आता वेळ फार थोडा शिल्लक आहे, वृद्धी होत राहील. उशिराने आले तर मग
वेगाने पुरुषार्थ करावा लागेल. कल्पापूर्वी जितके स्वर्गवासी बनले होते, तितके आता
देखील जरूर बनतील. यामध्ये जराही फरक पडू शकत नाही. शांतीधामवाले शांतीधाममध्ये
जातील. आणि मग आपल्या-आपल्या वेळेवर पार्ट बजावण्याकरिता येतील. आता बाबा म्हणतात -
मुलांनो, माझी आठवण करा तर तुम्ही घरी पोहोचाल. संन्यासी मुक्तीसाठी अथक प्रयत्न
करत असतात, म्हणून ते सर्वांना हेच सांगत असतात की, मुक्तीच ठीक आहे. सुख तर
कागविष्ठा समान आहे. शास्त्रांमध्ये लिहिलेले आहे की, सतयुगामध्ये देखील दुःखाच्या
गोष्टी होत्या, काहीच समजत नाहीत. एकीकडे म्हणतात - परमात्म्याला यायचे आहे.
पतित-पावन परमात्मा या, येऊन आम्हाला मार्ग सांगा. दुसऱ्या बाजूने म्हणतात की, गंगा
पतित-पावनी आहे. गंगा स्नान, यज्ञ-तप, यात्रा करणे हे सर्व भगवंताला भेटण्याचेच
मार्ग आहेत. जर का तुम्ही परमात्म्याला बोलावत आहात, तर मग धक्के का खात आहात! हे
सर्व भक्तिमार्गा विषयी नोंदलेले आहे. लोक मात्र जे मनात येते ते बोलत राहतात.
परमात्म्याला भेटण्यासाठी किती मेहनत करतात. आता भगवंताला भेटण्यासाठी भक्त जातील
की भगवंताला यावे लागेल? पतित आत्मा तर जाऊ शकत नाही. बाबाच घेऊन जाण्याकरिता येतात.
सर्व आत्म्यांचा पंडा एकच आहे. तुम्ही देखील पवित्र बनून त्यांच्या मागोमाग निघून
जाल. साजन तुम्हाला महाराजा-महाराणी बनविण्याकरिता तुमचा ज्ञान-रत्नांनी शृंगार करत
आहेत. बाकी श्रीकृष्णसाठी दाखवतात की, अमकीला पळवून नेले, पट्टराणी बनवले. या गोष्टी
काही लागू होत नाहीत. तुम्ही मुले जाणता आपण स्वर्गाची महाराणी बनणार. तुम्हीच
स्वर्गवासी होता. आता बाबा पुन्हा बनविण्याकरिता आले आहेत. ८४ जन्मांची गोष्ट आहे.
८४ लाख जन्म कोणाच्या लक्षातही राहणार नाहीत. सतयुगाला लाखो वर्षे सांगितली आहेत,
त्रेताला कमी सांगितली आहेत. हा हिशोब काही जुळत नाही. बाबा किती सोपे करून सांगतात
की, फक्त दोन गोष्टींची आठवण करायची आहे - अल्फ आणि बे (बाबा आणि बादशाही). म्हणजे
मग तुम्ही पवित्र देखील बनाल, उडू देखील शकाल आणि उच्च पद देखील प्राप्त कराल. तर
याकडे लक्ष ठेवले पाहिजे की कसेही करून बाबांची आठवण करायची आहे. मायेची वादळे
देखील येतील, परंतु हार खायची नाही. भले कोणी क्रोध देखील करेल परंतु तुम्ही काहीही
बोलू नका. संन्यासी देखील म्हणतात मुखामध्ये मोहर ठेवा, म्हणजे मग तो बोलून-बोलून
मग चूप होईल. बाबा देखील म्हणतात - एखादा जर रागाने बोलत असेल तर तुम्ही शांत होऊन
बघत रहा. कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला शिवबाबांची आठवण करायची आहे. बाबांच्या
आठवणीद्वारेच वारसा देखील आठवेल. तुमच्या अतींद्रिय सुखाचे गायन आहे की, आपण २१
जन्मांकरिता स्वर्गाचे परिजादे (राजकुमार) बनणार. तिथे दुःखाचे नाव सुद्धा नसेल.
तुम्ही ५०-६० जन्म सुख उपभोगता, सुखाचा हिशोब जास्त आहे. सुख आणि दुःख सारख्याच
प्रमाणात असेल तर फायदाच काय! तुमच्याकडे धन देखील पुष्कळ असते. काही काळापूर्वी इथे
देखील खूप स्वस्त धान्य होते. राजे लोकांची खूप मोठी राजाई होती. त्या काळात बाबांनी
(ब्रह्मा बाबांनी) दहा आणे मण बाजरी विकली आहे. तर त्याच्याही पूर्वी किती स्वस्ताई
असेल. फार थोडे मनुष्य असतील, अन्न-धान्याची काळजी नसेल. आता हे तर लक्षात राहिले
पाहिजे की पहिले आपण घरी जाऊन नंतर नवीन दुनियेमध्ये येऊन नवीन पार्ट बजावणार. तिथे
आमचे शरीर देखील सतोप्रधान तत्वांनी बनेल. आता ५ तत्वे पूर्णपणे तमोप्रधान पतित बनली
आहेत. आत्मा आणि शरीर दोन्ही पतित आहेत. तिथे शरीर रोगी बनत नाही. या सर्व समजून
घेण्याच्या गोष्टी आहेत. मुलांना इथे (सेंटरवर) चांगल्या रीतीने समजावून सांगतात आणि
मग घरी गेल्यावर विसरून
जातात. इथे ढग भरून किती खुश होतात आणि बाहेर गेल्यावर विसरून जातात. पूर्वीच्या
काळात रास-विलास (नाच-गाणे) खूप चालत असे. नंतर मग ते सर्व बंद केले. लोकांना वाटत
असे - जादू आहे. भक्तीमध्ये जेव्हा नवधा भक्ती करतात तेव्हा मुश्किलीने साक्षात्कार
होतो. इथे भक्तीची तर गोष्टच नाही, बसल्या-बसल्या साक्षात्कारामध्ये जात होते,
म्हणून जादू आहे असे समजत होते.
आजकाल दुनियेमध्ये
किती भगवान बनले आहेत. नाव ठेवतात - ‘सिताराम’, ‘राधेकृष्ण’ इत्यादी. कुठे ते
स्वर्गाचे मालक आणि कुठे हे नरकवासी. यावेळी सर्व नरकवासी आहेत. शिडीच्या
चित्रामध्ये हे स्पष्ट दाखवले आहे. शिडीचे चित्र मुलांनी आपल्या विचार सागर मंथना
मधून बनवले आहे. बाबा देखील खुश झाले. शिडीमध्ये सर्व गोष्टी येतात. द्वापरपासून
विकारी राजे भक्ति करत-करत कसे खाली आले आहेत. आता तर कोणताही ताज नाहीये. चित्रावर
समजावून सांगणे सोपे होते. ८४ जन्मांमध्ये अशी उतरती कला होते, आणि मग चढती कला कशी
होते. गातात देखील - ‘चढती कला तेरे भाने भाने सर्व का भला’. बाबा येऊन सर्वाना सुख
देतात. सर्वजण बोलावतात की, ‘ओ बाबा, आमचे दुःख हरण करा आणि सुख द्या’. परंतु ते कसे
दुःख हरण करतात आणि कसे सुख मिळते हे कोणालाच ठाऊक नाहीये.
आजकाल मनुष्य गीता
तोंडपाठ करून ऐकवतात, नटशेलमध्ये (थोडक्यात) अर्थ समजावून सांगतात. संस्कृतमध्ये
श्लोक तोंडपाठ करून ऐकवतात, तर म्हणतात हे तर महात्मा हुशार आहेत. लाखो मनुष्य जाऊन
त्यांच्या पाया पडतात. त्या शिक्षणामध्ये (लौकिक शिक्षणामध्ये) तर १५-२० वर्षे
लागतात. त्यांच्यामध्ये कोणी बुद्धिवान असतात तर लगेच श्लोक इत्यादी तोंडपाठ करून
ऐकवू लागतात, त्यामुळे त्यांच्याकडे प्रचंड प्रमाणात पैसा गोळा होतो. हे सर्व कमाई
करण्याचे मार्ग आहेत. जेव्हा एखाद्याचे दिवाळे निघते तेव्हा देखील ते जाऊन संन्यास
धारण करतात, तेव्हा मग सर्व चिंता दूर होतात; आणि मग काही ना काही मंत्र-तंत्र पाठ
करतात, भ्रमण करत राहतात. ट्रेनमधून देखील भ्रमण करत राहतात. इथे तर बाबा म्हणतात
की स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. बाबा आणि आत्मे सर्व निराकारी दुनियेमध्ये
राहतात. तिथून साकारी दुनियेमध्ये पार्ट बजावण्याकरिता येतात. आता नाटक पूर्ण होणार
आहे. तुम्ही तमोप्रधान असल्याकारणाने परत जाऊ शकत नाही. आता बाबा आले आहेत तुम्हाला
सतोप्रधान बनविण्याकरिता. सगळे आपल्या घरी जातील. बाकी स्वर्गामध्ये फक्त
देवी-देवतांचे राज्य असेल. शांतीधाम, सुखधाम, दुःखधाम… ही कधी अस्तित्वात असतात हे
देखील कोणाच्या बुद्धीमध्ये येणार नाही कारण घोर अंधारामध्ये आहेत. समजतात की,
कलियुगाचा अंत अजून इतक्या हजार वर्षांनंतर होईल. काही हिशोबच नाहीये. लोकसंख्या
वाढत जाते, अन्नाचा तुटवडा होतो. आता अजून ४० हजार वर्षे बाकी असतील तर माहित नाही
काय होईल. जे काही बोलतात ते पूर्णपणे खोटे, रत्तीभर देखील खरे नाही. आता बाबा,
रावणावर कसा विजय प्राप्त करायचा आहे हे शिकवत आहेत. रावणावर तुम्हीच विजय प्राप्त
करता. साऱ्या दुनियेला रावणापासून सोडवता. तुमची शक्तीसेना आहे, तुम्ही भारताला
स्वर्ग बनवत आहात. किती चांगल्या-चांगल्या गोष्टी समजावून सांगतात. तर मग तुम्हाला
बाबांची आणि वारशाची आठवण करून किती आनंदात राहिले पाहिजे. ज्ञानमार्गामध्ये आनंद
खूप असतो. आता बाबा आलेले आहेत, आता आम्ही या जुन्या दुनियेमधून गेलो की गेलो.
बाबांची आठवण केल्याने सतोप्रधान बनाल. नाहीतर सजा खावी लागेल; त्यानंतर थोडाफार
रोटी तुकडा मिळेल (शेवटी छोटेसे पद मिळेल), त्याने फायदाच काय. जितके शक्य होईल आपला
पुरुषार्थ करायचा आहे. श्रीमतावर चालायचे आहे . पावलो-पावली बाबांकडून सल्ला घ्यायचा
आहे. काहीजण म्हणतात - बाबा, धंद्यामध्ये खोटे बोलावे लागते. बाबा म्हणतात -
धंद्यामध्ये तर खोटे असतेच, तुम्ही बाबांची आठवण करत राहा. असे नाही, विकारामध्ये
जाऊन नंतर मग म्हणाल की मी बाबांच्या आठवणीमध्ये होतो. नाही, विकारामध्ये गेलात तर
मेलात. ही तर बाबांसोबत प्रतिज्ञा केली आहे ना. पवित्रतेसाठीच राखी बांधली जाते.
क्रोधासाठी कधी राखी बांधली जात नाही. रक्षाबंधनचा अर्थच आहे की विकारामध्ये जायचे
नाही. मनुष्य म्हणतात - ‘पतित-पावन या’.
तुम्हा मुलांना आतून
अत्यंत आनंद झाला पाहिजे. बाबा आपल्याला शिकवत आहेत, मग बाबा आम्हाला सोबत घेऊन
जातील. तिथून स्वर्गामध्ये निघून जाऊ. जितकी होऊ शकेल पहाटे उठून बाबांची आठवण
करायची आहे. आठवण करणे अर्थात कमाई करणे, यामध्ये आशीर्वादाची गरजच काय. असे थोडेच
म्हणायचे आहे की, तुम्ही आशीर्वाद द्या तेव्हा मी आठवण करेन. सर्वांवर आशीर्वाद
करतील तर सगळेच स्वर्गामध्ये जातील. इथे तर मेहनत करायची आहे. जितकी होऊ शकेल
बाबांची आठवण करायची आहे. बाबा अर्थात वारसा. जितकी आठवण कराल तितकी राजाई मिळेल,
आठवणीनेच खूप फायदा आहे. स्वस्त सौदा आहे. असा स्वस्त सौदा कोणीही देऊ शकत नाही. हा
देखील कोणी विरळेच घेतात. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) जेव्हा कोणी
क्रोध करत असेल तेव्हा अतिशय शांत राहायचे आहे. क्रोधी सोबत क्रोधी बनायचे नाही.
मायेच्या कोणत्याही वादळापुढे हार खायची नाही.
२) पहाटे लवकर उठून
बाबांची आठवण करायची आहे, आपली कमाई करायची आहे. पवित्रतेची पक्की राखी बांधायची आहे.
वरदान:-
आपल्या
अव्यक्त शांत स्वरूपाद्वारे वातावरणाला अव्यक्त बनविणारे साक्षात मूर्त भव
जसे सेवेचे प्रोग्राम
बनविता तसे पहाटे पासून रात्री पर्यंत आठवणीच्या यात्रेमध्ये कसे आणि कधी राहायचे
आहे, याचा देखील एक प्रोग्राम बनवा आणि मधून-मधून दोन-तीन मिनिटांकरिता संकल्पांच्या
ट्रॅफिकला स्टॉप करा, जेव्हा कोणी जास्तच व्यक्त भावामध्ये दिसेल तर त्याला काहीही
न बोलता आपले असे अव्यक्त शांत रूप धारण करा जेणेकरून तो देखील इशाऱ्यानेच समजून
जाईल; यामुळे वातावरण अव्यक्त राहील. एक अनोखेपणा दिसून येईल आणि तुम्ही
साक्षात्कार घडविणारे साक्षात्कार मूर्त बनाल.
बोधवाक्य:-
संपूर्ण सत्यता
हाच पवित्रतेचा आधार आहे.
हे अव्यक्त इशारे -
परोपकाराच्या भावनेने संपन्न बनून अपकारीवर देखील उपकार करा.
जर तुमचा एखादा सहयोगी
भाऊ अथवा बहीण, परिवारातील आत्मे, अजाणतेपणी अथवा बालिश हट्टाने अल्पकालीन वस्तूला
कायम स्वरूपाची प्राप्ती समजून, अल्पकालीन मान-शान, नाव अथवा अल्पकालीन प्राप्तीची
इच्छा बाळगत असतील, तर दुसऱ्याला मान देऊन स्वतः निर्मान बनणे हाच परोपकार आहे. हे
देणेच कायमसाठी घेणे आहे.