08-06-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड मुलांनो - हे
सारे विश्व ईश्वरीय फॅमिली आहे म्हणून गातात - ‘तुम मात-पिता हम बालक तेरे’; तुम्ही
आता प्रॅक्टिकलमध्ये गॉडली फॅमिलीचे बनले आहात”
प्रश्न:-
बाबांकडून २१
जन्मांचा पूर्ण वारसा घेण्याची सोपी विधी कोणती आहे?
उत्तर:-
संगमावर
शिवबाबांना आपला वारसदार बनवा. तन-मन-धनाने बलिहार जा (पूर्ण समर्पित व्हा), तर
तुम्हाला २१ जन्मांसाठी पूर्ण वारसा मिळेल. बाबा म्हणतात - जी मुले संगमावर आपले
जुने सर्व काही इन्शुअर करतात, त्यांना मी रिटर्नमधे २१ जन्मांपर्यंत देतो.
गीत:-
नयन हीन को
राह दिखाओ प्रभू…
ओम शांती।
मुलांनी गाणे
ऐकले. हे भक्त भगवंताला बोलावत आहेत. भगवंताला पूर्ण न जाणल्याकारणाने मनुष्य किती
दुःखी आहेत. भक्तिमार्गामध्ये किती डोकेफोड करत राहतात. फक्त याच आयुष्यातील गोष्ट
नाहीये. जेव्हापासून भक्ती सुरु झाली आहे तेव्हापासून खस्ता खात आहेत. भारतामध्येच
देवी-देवतांचे राज्य होते, ज्याला स्वर्ग सचखंड म्हटले जाते. भारत सचखंड आहे,
भारताचीच खूप जबरदस्त महिमा आहे कारण भारत परमपिता परमात्म्याचे बर्थ प्लेस आहे.
त्यांचे खरे नाव आहे शिव. शिव जयंती साजरी करतात. ‘रुद्र जयंती’ अथवा ‘सोमनाथ जयंती’
म्हटले जात नाही. ‘शिव जयंती’ अथवा ‘शिव रात्री’ म्हटले जाते. स्वर्गाची स्थापना
करणारे एकच हेवनली गॉडफादर आहेत. आता सर्व भक्तांचे भगवान जरूर एकच असले पाहिजेत.
सर्व नयनहिन आहेत अर्थात ज्ञानाचे चक्षू अथवा डिवाइन इनसाईट नाही आहे. भगवानुवाच -
मी तुम्हाला राजयोग शिकवितो, श्रीमद् भगवद्गीता आहे मुख्य. श्री अर्थात श्रेष्ठ मत.
आता तुम्हाला बुद्धिवान बनविले जाते. दिव्य चक्षू अर्थात ज्ञानाचा तिसरा नेत्र
दाखवतात. वास्तविक ज्ञानाचा तिसरा नेत्र तुम्हा ब्राह्मणांना मिळतो ज्यामुळे तुम्ही
बाबांना आणि बाबांच्या रचनेच्या आदि-मध्य-अंताला जाणता. यावेळेस सर्वांमध्ये देह
अहंकार अथवा ५ विकार आहेत म्हणून घोर अंधारामध्ये आहेत. तुम्हा मुलांकडे प्रकाश आहे.
तुमच्या आत्म्याने साऱ्या वर्ल्डच्या हिस्ट्री-जिओग्राफीला जाणले आहे. आधी तुम्ही
सर्व अज्ञानामध्ये होता. ज्ञान अंजन सद्गुरू दिया अज्ञान अंधेर विनाश. जे पूज्य होते
तेच मग आता पुजारी बनले आहेत. पूज्य आहेत प्रकाशामध्ये. पुजारी आहेत अंधारामध्ये.
परमात्म्याला आपेही पूज्य, आपेही पुजारी म्हणू शकत नाही. ते तर आहेतच परम-पूज्य.
सर्वांना पूज्य बनविणारे. त्यांना म्हटले जाते परम-पूज्य, परमपिता परम-आत्मा अर्थात
परमात्मा. श्रीकृष्णाला थोडेच असे म्हणणार. त्यांना सगळेच काही गॉडफादर म्हणणार
नाहीत. निराकार गॉडलाच सर्वजण गॉडफादर म्हणतात. ते देखील आहेत तर ‘आत्मा’ परंतु
‘परम’ आहेत म्हणून त्यांना ‘परमात्मा’ म्हटले जाते. ते परम-आत्मा सदैव परमधाम मध्ये
राहणारे आहेत. इंग्रजीमध्ये त्यांना सुप्रीम सोल म्हटले जाते. बाबा म्हणतात, तुम्ही
गाता देखील - ‘आत्मा परमात्मा अलग रहे बहुकाल…’ असे नाही ‘परमात्मा, परमात्मा से
अलग रहे बहुकाल…’ नाही; आत्मा सो परमात्मा, परमात्मा सो आत्मा म्हणणे हे एक नंबरचे
अज्ञान आहे. आत्मा तर जन्म-मरणामध्ये येते. परमात्मा थोडेच पुनर्जन्मामध्ये येतात.
बाबा बसून समजावून सांगत आहेत - तुम्ही भारतवासी, स्वर्गवासी पूज्य होता.
ह्युमिनिटीचे (मानवजातीचे) पूज्य सर्व देवी-देवता होते. ही सर्व ईश्वराची फॅमिली आहे.
ईश्वर आहेत रचता. गायले जाते - ‘तुम मात-पिता हम बालक तेरे…’ तर फॅमिली झाली ना.
ठीक आहे, निदान हे तरी सांगा की, तुम्ही मात-पिता कोणाला म्हणता? हे कोण म्हणते?
आत्मा म्हणते - ‘तुम मात-पिता… तुमच्या कृपेने स्वर्गाचे भरभरून सुख आम्हाला
स्वर्गामध्ये मिळाले होते’. तुम्ही मात-पिता येऊन स्वर्गाची स्थापना करता. तर आम्ही
तुमची संतान बनतो. बाबा म्हणतात - मी संगमावरच येऊन नवीन दुनियेकरिता राजयोग शिकवितो.
लोकांची बुद्धी पूर्णपणे भ्रष्ट झाली आहे. स्वर्गाला नरक समजतात. म्हणतात - तिथे
देखील कंस, जरासंधी, हिरण्यकश्यपू इत्यादी होते. बाबा येऊन समजावून सांगतात - तुम्ही
विसरला आहात काय.(?) माझी तर शिवजयंती देखील तुम्ही भारतामध्येच साजरी करता. गायले
देखील जाते - शिवरात्री. कोणती रात्री? ही ब्रह्माची बेहदची रात्र आहे. बाबा
संगमावरच येऊन रात्रीचा दिवस अर्थात नरकापासून स्वर्ग बनवितात. शिवरात्रीचा अर्थ
देखील कोणालाच ठाऊक नाहीये. भगवान आहेत निराकार. मनुष्यांची तर प्रत्येक जन्मामध्ये
शरीराची नावे बदलतात. परमात्मा म्हणतात - माझे काही शरीराचे नाव नाहीये. माझे नाव
‘शिव’च आहे. मी फक्त वृद्ध वानप्रस्थ तनाचा आधार घेतो. हे (ब्रह्मा बाबा) पूज्य होते,
आता पुजारी बनले आहेत. शिवबाबा येऊन स्वर्ग रचतात, आपण त्यांची मुले आहोत तर जरूर
आपण स्वर्गाचे मालक असलो पाहिजे ना. शिवबाबा आहेत उच्च ते उच्च.
ब्रह्मा-विष्णू-शंकराचा आपला-आपला पार्ट आहे. प्रत्येक आत्म्यामध्ये आपल्या
सुख-दुःखाचा पार्ट नोंदलेला आहे. तुम्ही जाणता आपण शिवबाबांचे वारसदार बनलो होतो.
शिवबाबांनी स्वर्गवासी बनविले होते, तेव्हाच तर त्यांची सर्वजण आठवण करतात - ‘ओ गॉड
दया करा’. साधू देखील साधना करतात कारण इथे दुःख आहे म्हणून निर्वाणधामला जाऊ
इच्छितात. ‘आत्मा, परमात्म्यामध्ये लीन होते अथवा मी आत्मा सो परमात्मा’ असे समजणे
चुकीचे आहे. आता तुम्ही म्हणता, आपण आत्मे परमधाममध्ये राहणारे आहोत नंतर मग देवता
कुळामध्ये येणार, आणि मग ८४ जन्म घेणार. आपण आत्मे वर्णांमध्ये येतो. शिवबाबा
जन्म-मरणामध्ये येत नाहीत. फक्त नारायणाची डिनायस्टी होती (घराणे होते). जसे
ख्रिश्चन घराण्यामध्ये एडवर्ड दी फर्स्ट, सेकंड, थर्ड चालते. तसे तिथे देखील
लक्ष्मी-नारायण दी फर्स्ट, लक्ष्मी-नारायण दी सेकंड, थर्ड, अशी आठ घराणी चालतात. आता
तुम्हा ब्राह्मणांचा तिसरा नेत्र उघडला आहे. बाबा बसून आत्म्यांशी बोलतात. तुम्ही
असे ८४ चे चक्र फिरवून इतके-इतके जन्म घेत आले आहात. वर्णांचे देखील एक चित्र
बनवतात ज्यामध्ये देवता, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, ब्राह्मण दाखवतात. आता तुम्ही
जाणता हम सो ब्राह्मण शिखा आहोत. यावेळी आपण प्रॅक्टिकलमधे ईश्वरीय संतान आहोत. या
सहज राजयोग आणि ज्ञानाने आपल्याला भरभरून सुख मिळते. कोणी मग सूर्यवंशी राजधानीचा
वारसा घेतात, तर कोणी चंद्रवंशीचा. पूर्ण राजधानी स्थापन होत आहे. प्रत्येकजण आपल्या
पुरुषार्थाने हे पद प्राप्त करतील. कोणी जर विचारले की, ‘आता शिकता-शिकता जर माझे
शरीर सुटले तर कोणते पद मिळेल?’ तर बाबा सांगू शकतात. योगाद्वारेच आयुष्य वाढते,
विकर्म विनाश होतात; पतितापासून पावन बनण्याचा इतर कोणताही उपाय नाही. पतित-पावन असे
म्हणताच भगवंताची आठवण होते. परंतु भगवान आहेत कोण? हे जाणत नाही. बाबा म्हणतात -
मी येतोच मुळी भारतामध्ये. हे माझे जन्मस्थान आहे. सोमनाथाचे मंदिर किती आलिशान आहे
- हे बाबा बसून मुलांना समजावून सांगत आहेत. भक्तिमार्गामध्ये मग यादगार (स्मृतिस्थळे)
बनण्यास सुरुवात होते. जेव्हा पुजारी बनतात तेव्हा सर्वप्रथम सोमनाथाचे मंदिर
बनवतात. भारत तर सतयुग-त्रेतामध्ये खूप श्रीमंत होता. मंदिरांमध्ये देखील अथाह धन
होते. भारत हिरे-तुल्य होता. आता तर भारत गरीब कवडी-तुल्य आहे. पुन्हा बाबा येऊन
भारताला हिरे-तुल्य बनवितात. कोणालाही विचारा - क्रिएटर कोण आहेत? असे म्हणतील -
परमात्मा. ते कुठे आहेत? तर म्हणतील - ते तर सर्वव्यापी आहेत. बाबा म्हणतात - हे
संपूर्ण झाड जडजडीभूत अवस्थेला प्राप्त झाले आहे.
स्वतःला बघा की, आपण
लायक बनलो आहोत जेणेकरून बाबा-मम्माच्या सिंहासनावर बसू शकतो? ही आहेच पतित दुनिया.
पवित्रता आहे मुख्य. आता तर नो हेल्थ, नो वेल्थ, नो हॅपिनेस आहे. हे आहेच मृग तृष्णा
समान राज्य. यावरून देखील शास्त्रांमध्ये दुर्योधनाची कहाणी लिहिली आहे. दुर्योधन,
विकारी असणाऱ्याला म्हटले जाते. द्रौपदी म्हणतात - आमची लाज राखा. सर्व द्रौपदी
आहेत ना. या मुली स्वर्गाचे द्वार आहेत. बाबा किती चांगल्या रीतीने समजावून सांगतात.
ज्यांचा बुद्धियोग पूर्णपणे लागलेला असेल तर धारणा देखील होईल. नॉलेज ब्रह्मचर्य
अवस्थेमध्येच शिकले जाते. बाबा म्हणतात - गृहस्थ व्यवहारामध्ये राहत असताना
कमलपुष्प समान राहायचे आहे. दोन्ही बाजूंनी तोड निभावायची आहे. मरायचे देखील जरूर
आहे. मनुष्य मरते वेळी त्याला मंत्र दिला जातो. बाबा म्हणतात - तुम्ही सर्व मरणार
आहात. मी काळांचाही काळ सर्वांना परत घेऊन जाणार आहे. तर आनंद झाला पाहिजे ना. मग
जे चांगल्या रीतीने शिकतील करतील ते स्वर्गाचे मालक बनतील. जे नीट शिकणार नाहीत ते
प्रजापद मिळवतील. तुम्ही इथे आला आहात राज्यपद प्राप्त करण्याकरिता. हे शिक्षण आहे,
यामध्ये अंधश्रद्धेची तर गोष्टच नाही. हे शिक्षण आहे राजाईसाठी. जसे त्या शिक्षणाचे
एम ऑब्जेक्ट असते - बॅरिस्टर बनायचे असेल तर योग जरूर शिकविणाऱ्या टीचर सोबत ठेवावा
लागेल. इथे तुम्हाला स्वयं भगवान शिकवत आहेत तर त्यांच्यासोबत योग लावायचा आहे. बाबा
म्हणतात - मी परमधाम, खूप दुरून येतो. परमधाम किती उंचावर आहे. सूक्ष्मवतनपेक्षाही
उंचावर आहे; तिथून येण्यासाठी मला सेकंद लागतो. त्यांच्यापेक्षा वेगवान दुसरे काहीही
असू शकत नाही. सेकंदामध्ये जीवनमुक्ती देतो. जनकाचे उदाहरण आहे ना. आता तर नरक जुनी
दुनिया आहे. नवीन दुनिया स्वर्गाला म्हटले जाते. बाबा नरकाचा विनाश करवून स्वर्गाचा
मालक बनवितात. बाकी सर्व आत्मे शांतीधाम मध्ये निघून जातात. आत्मा इमॉर्टल (अमर) आहे.
तिला पार्ट देखील इमॉर्टल (अविनाशी) मिळालेला आहे. तर मग आत्मा छोटी-मोठी कशी असू
शकते अथवा जळून मरू कशी शकते? आहेच मुळी स्टार. छोटी-मोठी असू शकत नाही. आता तुम्ही
आहात गॉड फादरली स्टुडंट. गॉड फादर नॉलेजफुल, ब्लिसफुल आहेत. ते तुम्हाला शिकवत
आहेत. तुम्ही जाणता या शिक्षणाने आपण सो देवी-देवता बनणार. तुम्ही भारताची सेवा करत
आहात. सर्वप्रथम तर बाबांचे बनायचे आहे, बाकीच्या ठिकाणी तर गुरुकडे जातात, त्यांचे
बनतात अथवा त्यांना आपला गुरु बनवितात. इथे तर आहेत पिता. तर पहिले पित्याची संतान
बनावे लागेल. बाबा मुलांना आपली संपत्ती देतात. बाबा म्हणतात - मुलांनो, तुम्ही
एक्सचेंज करा. तुमचे कखपण माझे, माझे सर्वकाही तुमचे. देहासहित जे काही आहे ते सर्व
मला द्या. मी तुमच्या आत्म्याला आणि शरीराला दोन्हीला पवित्र बनवेन आणि मग राज्य पद
देखील देईन. तुमच्याकडे जे काही आहे त्याचा बळी चढवा तर जीवनमुक्ती मिळेल. बाबा, हे
सर्व तुमचे आहे. बाबा म्हणतात - तुम्ही मला वारसदार बनवा. मी तुम्हाला २१ जन्म
वारसदार बनवतो. फक्त माझ्या मतावर चाला. भले काम-धंदा इत्यादी करा, परदेशात जा,
काहीही करा. फक्त माझ्या मतावर चाला. सावध राहा, माया तुम्हाला वारंवार पछाडेल.
कोणतेही विकर्म करायचे नाही. श्रीमतावर चालाल तर श्रेष्ठ बनाल. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) आत्मा आणि
शरीर दोन्हीला पावन बनविण्याकरिता देहासहीत जे काही आहे ते सर्व बाबांच्या हवाली
करून त्यांच्या श्रीमतावर चालायचे आहे.
२) मात-पित्याच्या
सिंहासनाच्या पात्र बनण्यासाठी स्वतःला लायक बनवायचे आहे. लायक बनण्यासाठी
प्रामुख्याने पवित्रतेची धारणा करायची आहे.
वरदान:-
संगमयुगावर
अतींद्रिय सुखाचा अनुभव करणारे डबल प्राप्तीचे अधिकारी भव
जी मुले संगमयुगावर
अतींद्रिय सुखाचा अनुभव करतात त्यांना कायम शांती आणि आनंद अशा डबल प्राप्तीचा नशा
असतो कारण अतींद्रिय सुखामध्ये या दोन्ही प्राप्ती सामावलेल्या आहेत. आता तुम्हा
मुलांना जी बाबा आणि वारशाची प्राप्ती आहे ती साऱ्या कल्पामध्ये होऊ शकत नाही.
यावेळची प्राप्ती - अतींद्रिय सुख आणि नॉलेज देखील पुन्हा कधीही मिळू शकत नाही. तर
या डबल प्राप्तीचे अधिकारी बना.
बोधवाक्य:-
एक-दोघांच्या
संस्कारांना जाणत असताना देखील त्यांच्याशी जुळवून घेऊन चालणे - हेच उन्नतीचे साधन
आहे.
मातेश्वरीजींची अनमोल
महावाक्ये –
“सच्चे पातशाह परमात्म्या सोबत सच्चे होऊन राहा”
यावेळी आपल्याला
परमात्मा पित्याद्वारे हा आदेश मिळाला आहे की, ‘निरंतर माझ्या आठवणीमध्ये राहा’.
योगाचा अर्थच आहे ईश्वरीय आठवणीमध्ये राहणे, योगाचा अर्थ काही ध्यान नाही आहे. आपला
हा सहजयोग जो चालता-फिरता, कामकाज करताना त्यांच्या आठवणीमध्ये राहणे, ज्याला
निरंतर अखंड योग म्हटले जाते; परंतु यामध्ये निरंतर राहण्याची प्रॅक्टिस करण्याची
आवश्यकता आहे. जर त्यांच्या आदेशावर आज्ञाधारक होऊन राहिला नाहीत, कोणती अवज्ञा
कराल तर दंड जरूर भोगावा लागेल. त्यांचा आदेश आहे - जसे मी कर्म करतो मला बघून
तुम्ही देखील फुटस्टेप घ्या (पाऊल उचला), नाहीतर मायेचा फटका बसेल. सच्च्या पातशाह
सोबत सच्चे होऊन राहा, जे पण काही मायेचे विघ्न सतावेल ते देखील त्यांच्यासमोर ठेवले
पाहिजे, तर त्यांच्या मदतीमुळे माया दूर होईल, रस्ता क्लिअर होईल. मग तर जिथे
बसवतील, जसे चालवतील, जे काही खाऊ घालतील रस्ता क्लियर होऊन जाईल. अशी साथ
देण्यासाठी खूप हिंमत पाहिजे. असे महान सौभाग्यशाली फार थोडे निघतील, ते विजयी
माळेमध्ये जातील. बाकी भाग्यशाली आहेत जे थोडे-फार घेऊन जाऊन प्रजा बनतील; तर थोडे
मिळाले त्यामध्ये खुश व्हायचे नाही. स्वतःची इच्छा तर पूर्ण व्हावी, साहस ठेवून पुढे
जायचे आहे. माया विघ्न टाकेल परंतु त्यावर विजय प्राप्त करायचा आहे, यामध्ये जर चूक
केली तर निश्चयाची कमी आहे, काही आपल्या धारणांमध्ये कमी आहे, ही तर आपली चूक आहे.
यामध्ये लोक-लाज, कुळ-मर्यादेला तोडावे लागते; जेव्हा हे तोडाल तेव्हाच खऱ्या
पारलौकिक दैवी मर्यादेला प्राप्त कराल. ही विकारी दुनिया तर जाणार आहे; बघा, मीरेने
देखील लोक-लाज सोडली तेव्हा गिरीधरला प्राप्त केले. जर त्या लोक-लाजेची पर्वा कराल
तर या दैवी-लोकचे सदस्य बनू शकणार नाही. आता कल्याणार्थ ईश्वरीय सल्ला तर दिला जातो,
आता हा आपल्या बुद्धीने निर्णय करायचा आहे. काय करायचे आहे, काय उचित आहे?
हे अव्यक्त इशारे -
सदैव हर्षित राहण्याकरिता आपल्या नेचरला (स्वभावाला) सरळ बनवा, सहनशील बना.
जे सरळचित्त आहेत तेच
सदैव हर्षित राहतात. हर्षितचित्त तर सर्वांना आकर्षित करतात. ‘हर्षित’चा अर्थच आहे
अतिंद्रीय सुखामध्ये झुलणे. ज्ञानाचे सिमरण करत, अव्यक्त स्थितीचा अनुभव करत
अतींद्रिय सुखामध्ये झुलणे, याला म्हटले जाते - हर्षित. यासाठी साक्षीपणाच्या सीटवर
सेट राहून माया आणि प्रकृतीच्या पपेट शो ला मनोरंजनाच्या रूपामध्ये बघा.