08-10-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड मुलांनो,
तुम्हाला आता आवाजाच्या पलीकडे जायचे आहे, त्यामुळे मुखावाटे ‘शिव-शिव’ म्हणण्याची
देखील गरज नाही”
प्रश्न:-
एका बाबांनाच
सर्वशक्तीमान, ज्ञानाचा सागर म्हटले जाते, इतर कोणालाही नाही - असे का?
उत्तर:-
कारण एका
बाबांचीच आठवण केल्यामुळे आत्मा पतितापासून पावन बनते. एक बाबाच आहेत जे पतितांना
पावन बनवतात, इतर कोणताही देहधारी मनुष्य पावन बनवू शकत नाही. बाबा तुम्हाला रावण
राज्यातून मुक्त करतात. तुम्ही शिवबाबांकडून शक्ती घेता, जितकी जास्त आठवण कराल
तितकी शक्ती मिळेल आणि अशुद्धता निघत जाईल.
गीत:-
ओम नमो शिवाय...
ओम शांती।
गोड-गोड
सिकीलध्या मुलांनी (दीर्घ काळानंतर भेटलेल्या मुलांनी) भक्तीची महिमा ऐकली. तुम्ही
देखील महिमा गात होतात. आता तुम्ही महिमा गात नाही आणि ना तुमच्यासाठी महिमा
करण्याची गरज आहे. जे भक्त करतात ते तुम्ही मुले करू शकत नाही. तुम्ही भक्त होतात,
आता तुम्हाला भगवान भेटले आहेत. सर्वांना एकत्र तर भेटू शकत नाही. बाबा सर्वांना
एकत्र कसे शिकवतील? हे तर होऊ शकत नाही. सर्व भक्त देखील एकत्र होऊ शकत नाहीत. हां,
बाबांना तुम्हाला शिकवायचे आहे जरूर, कारण हा राजयोग आहे. सूर्यवंशी, चंद्रवंशी
राज्य स्थापन होणार आहे. मुलांनी प्रदर्शनीमध्ये समजावून सांगायचे आहे, सण
इत्यादींवर देखील तुम्ही खूप चांगली सेवा करू शकता. तुम्हाला स्वतःसाठीच राज्य
स्थापन करायचे आहे. तुम्ही शिव-शक्ती, महारथी सेना आहात; बाकी कोणती ड्रिल इत्यादी
तुम्ही शिकत नाही. तुम्ही रूहानी ड्रिल शिकता. ही भारतातली ड्रिल प्रसिद्ध आहे. ही
योग लावण्याची ड्रिल आहे. आत्म्याला परमपिता परमात्म्यासोबत योग लावायचा आहे.
त्यांच्याकडून वारसा घ्यायचा आहे. यामध्ये युद्धाची काही गोष्ट नाहीये. तुम्ही
बाबांकडून वारसा घेत आहात. यामध्ये युद्धाचा काहीही संबंध नाही. तुम्ही बेहद बाबांचे
वारसदार आहात. तर बाबांचे बनून बाबांच्या श्रीमतानुसार चालायचे आहे. बाबांचे मत
युद्ध इत्यादीसाठी नाहीये. बाबा फक्त म्हणतात - ‘गोड-गोड मुलांनो, तुम्ही सतोप्रधान
होतात, राज्य करत होतात. आता तुम्हाला स्मृती आली आहे. बाबा म्हणतात - तुम्ही आपल्या
जन्मांना जाणत नाही. गातात देखील की, मनुष्य ८४ जन्म घेतात. ८४ लाख या तर थापा आहेत.
भक्तिमार्गामध्ये ज्याला जे वाटले ते वाचत राहतात. ड्रामा अनुसार ही भक्तिमार्गाची
सामुग्री आहे. सतयुग, त्रेतामध्ये भक्ती असत नाही. भक्ती वेगळी आहे, ज्ञान वेगळे आहे.
तुम्हा मुलांशिवाय दुसऱ्या कोणत्याही ऋषी-मुनी इत्यादींच्या बुद्धीमध्ये हे ज्ञानच
नाहीये. त्यांना हे देखील माहीत नाही आहे की, सुख वेगळी गोष्ट आहे, दुःख वेगळी
गोष्ट आहे. सुख, बाबा देतात आणि दुःख, रावण देतो. तुम्ही जे सूर्यवंशी, चंद्रवंशी
होता, ते आता ८४ चे चक्र पूर्ण करून शूद्रवंशी बनला आहात. बाबा आठवण करून देत आहेत
- तुम्ही विश्वाचे मालक होता. तुम्ही ८४ जन्म उपभोगून खाली उतरत, तुच्छ-बुद्धि
तमोप्रधान बनला आहात. सतोप्रधान असणाऱ्यांना स्वच्छ उच्च-बुद्धी वाले म्हटले जाते.
तमोप्रधान असणाऱ्याला नीच-बुद्धी म्हटले जाते. नीच बुद्धीवाले उच्च बुद्धीवाल्यांना
नमन करतात. हे तुम्हाला देखील माहीत नव्हते की आम्हीच उच्च (श्रेष्ठ) होतो, आता
आम्हीच नीच बनलो आहोत. बाबांनी समजावून सांगितले आहे, ज्याने पहिल्या नंबरमध्ये
जन्म घेतला असेल तोच सतोप्रधान बनेल. ८४ जन्म देखील सूर्यवंशीच घेतील. आता तुम्ही
समजता आपण विश्वाचे मालक होतो तेव्हा पावन सतोप्रधान होतो. पतित थोडेच विश्वाचे
मालक बनू शकतात. त्यांची महिमा बघा किती श्रेष्ठ आहे. सर्वगुण संपन्न... त्रेतामध्ये
१४ कला संपूर्ण म्हणत नाहीत. सूर्यवंशीला १६ कला संपूर्ण म्हणतात. १४ कलाच्या नंतर
‘संपूर्ण’ हा शब्द येणार नाही. ‘संपूर्ण’ शब्द, १६ कला असणाऱ्यांनाच लिहायचा आहे.
आता तुम्ही मुले, १६ कला संपूर्ण बनता.
मुलांना हे देखील
समजावून सांगण्यात आले आहे की, हे ज्ञान अतिशय सोपे आहे, यापेक्षा सोपी दुसरी
कोणतीही गोष्ट नाही. बाबा दयाळू आहेत ना. बाबा जाणतात मुले भक्तीमध्ये धक्के
खाऊन-खाऊन थकून गेले असणार म्हणून असे दाखवले आहे की, द्रौपदीचे पाय चेपले. बाबांकडे
वृद्ध माता येतात. बाबा म्हणतात - तुम्ही भक्तीचे धक्के खाऊन थकला आहात, त्यामुळे
बाबा आता तुमची सर्व थकावट दूर करतात. भक्तीमध्ये राम-राम जपत राहतात, माळा जपत
राहतात. बाबांचा (ब्रह्मा बाबांचा) पादरी लोकांशी देखील संपर्क होता. पादरी देखील
बायबल घेऊन बसून समजावून सांगत राहतात. पुष्कळजण ख्रिश्चन बनतात. इथे या ज्ञानामध्ये
माळा इत्यादी जपण्याचा प्रश्नच नाही. बाबा म्हणतात - स्वतःला आत्मा समजून बाबांची
आठवण करा. मुखाने शिव-शिव असे देखील म्हणायचे नाहीये. आपण तर आवाजाच्या पलीकडे
जाणारे आहोत. बाबा खूप सोपी युक्ती सांगतात की, माझी आठवण करा तर अशुद्धी निघून
जाईल आणि गृहस्थ व्यवहारामध्ये राहत असताना पवित्र बनायचे आहे. कमळाचे फूल खूप
प्रसिद्ध आहे. तिची खूप पंचायत असते (विस्तार खूप असतो) परंतु तरी देखील न्यारे आणि
प्यारे राहते. तुम्ही देखील विषय सागरामध्ये राहत असताना न्यारे-प्यारे राहा. हा
विषय-सागर आहे, याला नदी म्हणणार नाही.
तुम्ही मुले आता किती
बुद्धिवान बनता, असे बुद्धिवान बनल्यामुळे तुम्ही महाराजकुमार बनता. तुम्हाला तर
खूप आनंद झाला पाहिजे. पुरुषार्थ केला पाहिजे, मुलगा असो अथवा मुलगी दोघांच्याही
आत्म्याला पुरुषार्थ करायचा आहे. लौकिक नात्यामध्ये पित्याचा वारसा फक्त मुलांना
मिळतो, मुलीला नाही. इथे सर्व आत्म्यांना वारसा मिळतो. बाबा समजावून सांगत आहेत -
आठवणीच्या यात्रे द्वारेच तुम्ही उच्च पद प्राप्त करू शकता. प्रदर्शनीमध्ये
सर्वप्रथम बाबांचा परिचय द्यायचा आहे त्यानंतर बाबांच्या वारशा विषयी बोलायचे आहे.
सर्वप्रथम त्यांचा हा निश्चय पक्का करवून घ्या की, हे तुमचे बेहदचे पिता आहेत.
त्यांना हे समजावून सांगायचे आहे की, भगवान एकच आहेत; ब्रह्मा, विष्णू, शंकर देखील
भगवान नाहीत, ते देवता आहेत. भगवान पतित-पावन निराकार बाबा आहेत. त्यांची महिमाच
वेगळी आहे. आजकाल प्रदर्शनीमध्ये त्रिमूर्तीच्या चित्रावर समजावून सांगावे लागते.
ते पिता आहेत, हे दादा आहेत. वारसा त्यांच्याकडून मिळतो. ते निराकार आहेत मग
त्यांच्याकडून वारसा कसा मिळेल! ते सर्वांचे रचयिता आहेत. ब्रह्मा, विष्णू, शंकर हे
देखील रचना आहेत. रचनेला वारसा रचयित्याकडूनच मिळू शकतो. ते निराकार बाबा यांच्या
द्वारे वारसा देतात. रचयिता सर्वांचा एकच आहे; म्हणून गायले जाते - सर्वांचा सद्गती
दाता एक. त्यांना ज्ञान सागर म्हटले जाते. बाकी ते सर्व शास्त्रांची ऑथॉरिटी आहेत.
हे ज्ञान-सागर स्वतः ऑथॉरिटी आहेत. वर्ल्ड ऑलमाइटी ऑथॉरिटी स्वतः सांगत आहेत की, मी
वेद-शास्त्रांना जाणतो आणि तुम्हाला त्यांचे सार समजावून सांगतो. ही सर्व
भक्तिमार्गाची सामग्री आहे जी सतयुग, त्रेतामध्ये नसते. भक्तीद्वारेच शिडी खाली
उतरायची असते. सर्वशक्तिमान म्हणून एक बाबांचेच गायन केले जाते. त्यांच्यासोबत योग
लावल्यानेच आपण पवित्र बनतो, तर ते सर्वशक्तिमान झाले ना. आम्हा सर्वांना
पतितापासून पावन बनवतात. रावणराज्यातून मुक्त करतात. तुम्ही आता शिवबाबांकडून शक्ती
घेत आहात. जितकी अधिक आठवण कराल तितकी अधिक शक्ती मिळेल आणि अशुद्धी निघून जाईल.
तुम्हाला रात्रं-दिवस हीच चिंता राहिली पाहिजे की आपण पतितापासून पावन,
तमोप्रधानापासून सतोप्रधान बनावे. मायेची वादळे येतील. बाबा म्हणतात - सावध राहिले
पाहिजे. तुमचे मायेसोबत युद्ध आहे. अनेक फालतू विकल्प येतील. जे अज्ञान काळामध्ये
देखील कधी आले नसतील ते देखील येतील. तुम्ही युद्धाच्या मैदानामध्ये आहात. संपूर्ण
मेहनत आठवणीच्या यात्रेमध्ये आहे. भारताचा योग प्रसिद्ध आहे. ‘योग’साठीच बाबा
समजावून सांगतात की, तुम्ही स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. अशा प्रकारे इतर
कोणताही मनुष्य समजावून सांगू शकत नाही. ते (दुनियावाले) म्हणतात की, सर्व जण
भगवंताची रूपे आहेत. जिकडे पाहतो तिकडे परमात्माच परमात्मा आहे. बाबा समजावून सांगत
आहेत - तुम्ही आत्मा आहात, ८४ जन्म उपभोगता. जर सर्वजण परमात्मा आहेत तर मग परमात्मा
जन्म-मरणाच्या फेऱ्यामध्ये येतात काय? आत्मा एक शरीर सोडून दुसरे शरीर धारण करते.
आत्म्यामध्येच चांगले-वाईट संस्कार असतात. चांगले संस्कार असणाऱ्यांची महिमा गातात.
वाईट संस्कार असणाऱ्यांना पापी-नीच म्हणतात. बाबा पवित्र बनण्याची सोपी युक्ती
सांगतात. मनसा-वाचा-कर्मणा कोणालाही दुःख द्यायचे नाही. स्वतःला देखील दुःख द्यायचे
नाही. कोणतेही विकर्म, चोरी इत्यादी करता कामा नये. जर कुठे खोटे बोलावे लागत असेल
तर बाबांना त्याविषयी मत विचारा. सर्वांत मोठे पाप आहे काम-कटारी चालवणे, ती चालवू
नका.
बाबा म्हणतात -
मुलांनो, हातांनी काम करत असताना बुद्धीचा योग माझ्याशी लावा. ‘हथ कार डे… बुद्धी
यार डे’ (हात कामात राहू देत... बुद्धी प्रियतमाशी जोडलेली राहू दे). बाबा सर्जन
देखील आहेत. सर्वांचा आजार एक सारखा असू शकत नाही. कर्म देखील एकसारखे असू शकत
नाहीत. म्हणून पावलो-पावली विचारले पाहिजे. लक्ष्य खूप उच्च आहे. अमरनाथच्या
यात्रेला जातात तेव्हा म्हणतात - ‘अमरनाथ की जय, बद्रीनाथ की जय’. हे बद्रीनाथ, आमचे
रक्षण करा. आता तुम्हाला तीर्थ यात्रा इत्यादी काहीही करायचे नाही. या ज्ञानाच्या
गोष्टी बाबाच समजावून सांगतात. हा त्यांचाच पार्ट आहे. बाबांसोबत तुम्ही देखील
पार्टधारी आहात. जो जितका अभ्यास करेल तितके उच्च पद प्राप्त करेल. यामध्ये कोणाचाही
मोठेपणा नाही. मोठेपणा फक्त एकाचाच आहे, जे सर्व मनुष्यांची सद्गती करतात. सर्व
मुलांना पतितापासून पावन बनवतात. बाबा म्हणतात - ड्रामामध्ये मला देखील पार्ट
मिळालेला आहे. ५ तत्त्वांना देखील आपला-आपला पार्ट मिळालेला आहे, तो बजावायचा आहे.
धरणीकंप होणार आहेत, विनाश व्हायचाच आहे. तुमचा देखील ड्रामामध्ये पार्ट आहे,
यामध्ये कसली बढाई आहे? राज्य करता-करता पतित बनला. तुम्ही देखील पूर्वी काय होता?
वर्थ नॉट ए पेनी (कवडीमोल होता). आता तुम्ही विश्वाचे मालक बनता, हा तुमचा पार्ट आहे;
तरीही पुन्हा आपल्याला असे बनायचेच आहे. यामध्ये बढाई करण्याची अथवा महिमेची काही
गोष्ट नाही. हा पूर्व-नियोजित ड्रामा आहे. बाबा देखील येऊन आपला पार्ट बजावतात.
भक्तलोक स्तुती करतात, महिमा गातात, ते काम आपण करू शकत नाही. इथे तर बाबांची आठवण
करायची आहे. बाबा, या ड्रामाचे रहस्य तर खूप वंडरफुल आहे! जे कोणालाही माहीत नाही.
बाबा, आम्ही सतयुगामध्ये हे देखील विसरून जाणार! किती विचित्र ड्रामा आहे! अशा
रीतीने स्वतःशीच गोष्टी करा. एखादा पार्टधारी चांगला पार्ट बजावतो तर टाळ्या
वाजवतात. आपण देखील म्हणतो - गोड बाबांचा, शिवबाबांचा अतिशय सुंदर पार्ट आहे! आपण
देखील बाबांसोबत चांगला पार्ट बजावत आहोत. बाबा किती चांगल्या रीतीने समजावून
सांगतात, तरी देखील कोणाला समजत नाही तेव्हा हे लक्षात येते की, हे आपल्या
राजधानीमध्ये येणारे नाहीत. हे देखील जाणता जे ब्राह्मण बनले होते तेच ब्राह्मण
बनून नंतर मग देवता बनतील. देवतांमध्ये देखील प्रजा इत्यादी सर्व प्रकारचे बनतील.
सर्वांना अनादि पार्ट मिळालेला आहे. सृष्टी देखील एकच आहे, तीच चालत राहते. गॉड इज
वन, क्रिएशन इज वन. तेच चक्र फिरत राहते. मनुष्य संशोधन करतात की, चंद्रावर काय आहे
ते पाहावे! त्याच्याहीवरती काय आहे! त्याच्यावर आहे सूक्ष्मवतन. तिथे काय बघाल?
लाईटच लाईट. मनुष्य खूप प्रयत्न करत असतात परंतु विज्ञानाला देखील मर्यादा आहे ना.
मायेची देखील खूप प्रलोभने आहेत. विज्ञान सुखासाठी देखील आहे तर दुःखासाठी देखील आहे.
तिथे (सतयुगामध्ये) विमाने इत्यादी कधी खाली कोसळणार नाहीत. दुःखाची गोष्टच नसते.
इथे तर दुःखच दुःख आहे. चोर लुटून नेतात, आगीत जळून जाते. तिथे घरे खूप अवाढव्य
असतात. संपूर्ण अबू इतकी जमीन प्रत्येक राजाची असेल. तुम्ही आला आहात स्वर्गवासी
बनण्याकरिता. बाबांची आठवण करा तर अशुद्धी निघून जाईल. तुम्ही सर्व आशिक आहात, आता
माशूक तुम्हाला म्हणत आहेत की, मामेकम् (मज एकाची) आठवण करा तर अमरपुरीचे मालक बनाल.
तिथे कधी अकाली मृत्यू होत नाही. सतयुगामध्ये आहे - श्रेष्ठाचारी दुनिया, ही आहे -
भ्रष्टाचारी दुनिया. कित्येक बी.के. बाबांकडून वारसा घेत आहेत. तुम्ही देखील वारसा
घ्या. जर श्रीमतावर चालला नाहीत तर उच्च पद प्राप्त करू शकणार नाही. दर ५ हजार
वर्षानंतर बाबा स्वर्ग बनविण्याकरिता येतात. कलियुगामध्ये असंख्य मनुष्य असतात,
सतयुगामध्ये फार थोडे असतात, तर विनाश जरूर होणारच, यासाठी महाभारत लढाई समोर उभी
आहे. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) मनसा, वाचा,
कर्मणा कोणालाही दुःख द्यायचे नाही. वाईट संस्कारांना काढून टाकून आता चांगले
संस्कार धारण करायचे आहेत. कोणतेही विकर्म होऊ नये यावर लक्ष द्यायचे आहे.
२) या विचित्र
ड्रामामध्ये आपल्या श्रेष्ठ भाग्याला पाहून आपणच आपल्याशी गोष्टी करायच्या आहेत की,
‘मी स्वयं भगवंतासोबत पार्ट धारी आहे. माझा किती सुंदर पार्ट आहे’.
वरदान:-
प्रेमाच्या
रिटर्नमध्ये समानतेचा अनुभव करणारे सर्वशक्ती संपन्न भव
जी मुले बाबांच्या
प्रेमामध्ये सदैव एकरूप होऊन राहतात त्यांना प्रेमाच्या प्रतिसादामध्ये पित्यासमान
बनण्याचे वरदान प्राप्त होते. जे सदैव स्नेहयुक्त आणि योगयुक्त असतात ते स्वतः सर्व
शक्तींनी संपन्न बनतात. सर्व शक्ती सदैव सोबत असतील तर विजय झालेलाच आहे. ज्यांना
ही स्मृती राहते की सर्वशक्तिमान बाबा आमचे साथी आहेत, ते कधीही कोणत्याही गोष्टीने
विचलित होऊ शकत नाहीत.
बोधवाक्य:-
पुरुषार्थी
जीवनामध्ये जो सदैव संतुष्ट आणि आनंदी राहणारा असतो तोच खुशनसीब आहे (भाग्यशाली आहे).
हे अव्यक्त इशारे -
परोपकाराच्या भावनेने संपन्न बनून अपकारीवर देखील उपकार करा.
यावेळी असा परोपकारी
ग्रुप पाहिजे जो देणारा दाता असेल. जसे संपन्न असलेले राजे सदैव प्रजेला देणारे
असतात. संपन्न असणाऱ्या राजांचा हात कधीही घेणारा असणार नाही, देणारा असेल. तुम्ही
मुले तर स्वर्गाचे विश्व महाराजा बनून दात्याच्या रूपाचा पार्ट बजावणारे आहात, तर
आत्ता पासून तेच संस्कार स्वतःमध्ये भरा.