09-05-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड
मुलांनो - तुम्हाला नशा असायला हवा की ज्या शिवाची सर्वजण पूजा करतात, तो आता आपला
पिता बनला आहे, आपण त्यांच्या सन्मुख बसलो आहोत”
प्रश्न:-
मनुष्य
ईश्वराकडे क्षमा का मागतात? आणि मग काय त्यांना क्षमा मिळते का?
उत्तर:-
मनुष्य समजतात की आपण जी पाप कर्म केली आहेत त्याची सजा ईश्वर, धर्मराजाद्वारे
देतील, म्हणून क्षमा मागतात. परंतु त्यांना आपल्या कर्मांची सजा कर्मभोगाच्या
रूपामध्ये भोगावीच लागते, ईश्वर त्यांना काही कोणते औषध देत नाहीत. गर्भ-जेलमध्ये
देखील सजा भोगायच्या आहेत, साक्षात्कार होतो की, ‘तू हे-हे केले आहेस. ईश्वरीय
डायरेक्शन प्रमाणे चालला नाहीस म्हणून ही सजा आहे’.
गीत:-
तूने रात
गंवाई…
ओम शांती।
हे कोण म्हणाले? रूहानी बाबांनी म्हटले. ते आहेत उच्च ते उच्च. सर्व
मनुष्यांपेक्षाही, सर्व आत्म्यांपेक्षाही उच्च. सर्वांमध्ये आत्माच तर आहे ना. शरीर
तर पार्ट बजावण्यासाठी मिळाले आहे. आता तुम्ही पाहता संन्यासी इत्यादींच्या देहाचा
देखील किती मान असतो. आपल्या गुरु इत्यादींची किती महिमा करतात. हे बेहदचे बाबा तर
गुप्त आहेत. तुम्ही मुले समजता शिवबाबा उच्च ते उच्च आहेत, त्यांच्यापेक्षा उच्च
कोणीही नाही. धर्मराज देखील त्यांच्या सोबत आहे कारण भक्तिमार्गामध्ये क्षमा मागतात
- ‘हे ईश्वरा, क्षमा कर’. आता ईश्वर काय करणार! इथे गव्हर्मेंट तर जेलमध्ये टाकेल.
ते धर्मराज गर्भ-जेलमध्ये दंड देतात. भोग देखील भोगावे लागतात, ज्याला कर्मभोग
म्हटले जाते. आता तुम्ही जाणता कर्मभोग कोण भोगतात? काय होते? म्हणतात - ‘हे प्रभू,
क्षमा करा. दुःख हरण करा, सुख द्या’. आता ईश्वर काही औषध-पाणी करतात का? ते तर
काहीच करू शकत नाहीत. मग ईश्वराला का सांगतात? कारण ईश्वरासोबत मग धर्मराज सुद्धा
आहे. वाईट काम केल्याने जरूर भोगावे लागते. गर्भ-जेलमध्ये सजा देखील मिळते. सर्व
साक्षात्कार होतात. साक्षात्कार केल्याशिवाय सजा मिळत नाही. गर्भ-जेलमध्ये तर कोणते
औषध इत्यादी नाहीये. तिथे सजा भोगावी लागते. जेव्हा दुःखी होतात तेव्हा म्हणतात
ईश्वरा या जेलमधून बाहेर काढ.
आता तुम्ही मुले
कोणाच्या समोर बसला आहात? उच्च ते उच्च बाबा आहेत, परंतु आहेत गुप्त. बाकी सर्वांची
तर शरीरे दिसून येतात, इथे शिवबाबांना तर आपले हात-पाय इत्यादी नाही आहेत. फूले
इत्यादी देखील कोण घेईल. यांच्या (ब्रह्मा बाबांच्या) हातानेच घ्यावी लागतील, जर
इच्छा असेल तर. परंतु कोणाकडूनही घेत नाहीत. जसे ते शंकराचार्य म्हणतात - आम्हाला
कोणी स्पर्श करू नये. तर बाबा म्हणतात - मी पतितांचे काहीही कसे घेईन. मला फूल
इत्यादीची गरज नाही. भक्तिमार्गामध्ये सोमनाथ इत्यादी मंदिरे बनवतात, फुले वाहतात.
परंतु मला तर शरीरच नाही आहे. आत्म्याला कोणी कसा स्पर्श करु शकेल! म्हणतात - मी
पतितांकडून फुले कशी घेऊ! कोणी हातही लावू शकत नाही. पतितांना स्पर्शही करू देऊ नका.
आज ‘बाबा’ म्हणतात आणि उद्या जाऊन मग नरकवासी बनतात. अशा लोकांना तर पाहू सुद्धा नका.
बाबा म्हणतात - मी तर सर्वोच्च आहे. या सर्व संन्यासी इत्यादींचा देखील ड्रामा
अनुसार उद्धार करायचा आहे. मला कोणीही ओळखतच नाही. शिवाची पूजा करतात परंतु त्यांना
हे थोडेच माहित की, हे गीतेचे भगवान आहेत आणि इथे येऊन ज्ञान देतात. गीतेमध्ये
श्रीकृष्णाचे नाव घातले आहे. श्रीकृष्णाने ज्ञान दिले तर मग शिव काय करत असतील!
त्यामुळे मग मनुष्य समजतात ते येतच नाहीत. अरे, श्रीकृष्णाला ‘पतित-पावन’ थोडेच
म्हणणार. ‘पतित-पावन’ तर मला म्हणतात ना. तुमच्यामध्ये देखील फार थोडे आहेत जे इतका
रिगार्ड ठेवू शकतात. राहतात किती साधारण, समजावून सांगतात देखील - मी या साधू
इत्यादी सर्वांचा पिता आहे. जे काही शंकराचार्य इत्यादी आहेत, या सर्वांच्या
आत्म्यांचा मी पिता आहे. या देहाचे पिता जे आहेत ते तर आहेतच, मी आहे सर्व
आत्म्यांचा पिता. सर्वजण माझी पूजा करतात. आता ते इथे सन्मुख बसले आहेत. परंतु
सर्वजण समजतात थोडेच की आपण कोणाच्या समोर बसलो आहोत.
आत्म्यांना
जन्म-जन्मांतरापासून देह-अभिमानाची सवय लागली आहे त्यामुळे बाबांची आठवण करू शकत
नाहीत. देहालाच बघतात. देही-अभिमानी असाल तर त्या बाबांची आठवण करा आणि बाबांच्या
श्रीमतावर चाला. बाबा म्हणतात - मला जाणण्यासाठी सर्व पुरुषार्थी (प्रयत्नशील) आहेत.
अंतिम समयी पूर्णपणे देही-अभिमानी बनणारेच पास होतील. बाकीच्या सर्वांमध्ये
थोडा-थोडा देह-अभिमान राहील. बाबा तर आहेत गुप्त. त्यांना काहीही देऊ शकत नाही. मुली
शिवाच्या मंदिरामध्ये देखील जाऊन समजावून सांगू शकतात. कुमारींनीच शिवबाबांचा परिचय
दिला आहे. आहेत तर कुमार-कुमारी दोन्ही जरूर. कुमारांनी देखील परिचय दिला असेल.
मातांना विशेष प्राधान्य देतात कारण त्यांनी पुरुषांपेक्षाही जास्त सेवा केली आहे.
तर मुलांना सेवेची आवड असायला हवी. जशी त्या शिक्षणाची देखील आवड असते ना. ते आहे
भौतिक शिक्षण, हे आहे रुहानी शिक्षण. भौतिक शिक्षण शिकतील, कवायत इत्यादी शिकतील,
मिळणार काहीच नाही! समजा, आता कोणाला मुलगा झाला तर धूमधडाक्यात त्याचे बारसे
इत्यादी साजरे करतात, परंतु त्याला मिळणार काय! इतका वेळच नाहीये जे काही मिळवू
शकेल. इथूनही जाऊन जन्म घेतात परंतु ते देखील समजणार तर काहीच नाहीत. इथूनच विलग
झालेला असेल तर जे शिकून गेला असेल त्यानुसारच लहानपणीच शिवबाबांची आठवण करत असेल.
हा तर मंत्र आहे ना. लहान मुलांना जर शिकवाल तर त्यांना बिंदू इत्यादी काही समजणार
नाही. फक्त ‘शिवबाबा-शिवबाबा’ म्हणत राहतील. शिवबाबांची आठवण करा तर स्वर्गाचा वारसा
मिळेल. असे त्यांना समजावून सांगाल तर ते देखील स्वर्गामध्ये येतील. परंतु उच्च पद
मिळवू शकणार नाहीत. अशी भरपूर मुले येतात, ‘शिवबाबा-शिवबाबा’ म्हणत राहतात. मग अंत
मति सो गती होईल. ही राजधानी स्थापन होत आहे. आता मनुष्य शिवाची पूजा करतात. परंतु
जाणतात थोडेच; जशी लहान मुले शिव-शिव म्हणतात परंतु समजत नाहीत. इथे देखील पूजा
करतात परंतु ओळख काहीच नाहीये. तर त्यांना सांगायला हवे, तुम्ही ज्यांची पूजा करता
तेच ज्ञानाचा सागर, गीतेचा भगवान आहेत. ते आम्हाला शिकवत आहेत. या दुनियेमध्ये दुसरा
असा कोणी मनुष्य नाही जो असे म्हणू शकेल की, ‘शिवबाबा आम्हाला राजयोग शिकवत आहेत’.
हे फक्त तुम्हीच जाणता आणि तरीही विसरून जाता. भगवानुवाच - मी तुम्हाला राजयोग
शिकवतो. कोणी म्हटले - भगवानुवाच, काम महाशत्रू आहे, यावर विजय मिळवा. जुन्या
दुनियेचा संन्यास करा. ते आहेत शंकराचार्य, हे आहेत शिवाचार्य. ते आम्हाला शिकवत
आहेत. ‘श्री कृष्ण आचार्य’ असे म्हणू शकत नाही. तो तर लहान मुलगा आहे. सतयुगामध्ये
ज्ञानाची गरज राहत नाही.
जिथे-जिथे शिवाची
मंदिरे आहेत, तिथे तुम्ही मुले खूप चांगली सेवा करू शकता. शिवाच्या मंदिरांमध्ये
जा, मातांनी जाणे चांगले आहे, कन्या गेल्या तर त्याहून चांगले. आता तर आपल्याला
बाबांकडून राज्यभाग्य घ्यायचे आहे. बाबा आम्हाला शिकवत आहेत मग आम्ही
महाराजा-महाराणी बनणार. उच्च ते उच्च बाबाच आहेत, अशी शिकवण कोणताही मनुष्य देऊ शकत
नाही. हे आहेच कलियुग. सतयुगामध्ये यांचे (लक्ष्मी-नारायणाचे) राज्य होते. हे
राजा-राणी कसे बनले, कोणी राजयोग शिकवला, ज्यामुळे सतयुगाचे मालक बनले? ज्यांची
तुम्ही पूजा करता ते आम्हाला शिकवून सतयुगाचा मालक बनवतात. ब्रह्मा द्वारे स्थापना,
विष्णू द्वारे पालना… पतित प्रवृत्ती मार्गवालेच पावन प्रवृत्ती मार्गामध्ये जातात.
म्हणतात देखील - ‘बाबा, आम्हा पतितांना पावन बनवा. पावन बनवून हे देवता बनवा’. तो
आहे प्रवृत्ती मार्ग. निवृत्ती मार्ग अवलंबीणाऱ्यांचा गुरु बनायचेच नाही आहे. जे
पवित्र बनतात त्यांचे गुरु बनू शकता. अशी अनेक जोडपी देखील असतात, विकारासाठी लग्न
करत नाहीत. तर तुम्ही मुले अशा प्रकारे सेवा करू शकता. आतून आवड असली पाहिजे. आपण
बाबांची सपूत मुले बनून का नाही जाऊन सेवा करणार. जुन्या दुनियेचा विनाश समोर उभा
आहे. आता शिवबाबा म्हणतात - आता काही श्रीकृष्ण असू शकत नाही. तो तर एकदाच
सतयुगामध्ये असणार. दुसऱ्या जन्मामध्ये तीच फीचर्स, तेच नाव थोडेच असेल. ८४
जन्मांमध्ये ८४ फीचर्स. हे ज्ञान श्रीकृष्ण काही कोणाला शिकवू शकत नाही. तो
श्रीकृष्ण इथे कसा येईल. आता तुम्ही या गोष्टींना समजता. अर्धा कल्प चांगले जन्म
असतात नंतर मग रावण राज्य सुरू होते. मनुष्य हुबेहूब जणू पशुसारखे बनतात. एकमेकांशी
भांडण-तंटे करत राहतात. म्हणजेच रावणाचा जन्म झाला ना. बाकी ८४ लाख जन्म तर नाही
आहेत, इतकी व्हरायटी आहे (८४ लाख योन्या आहेत). मनुष्य इतके जन्म थोडेच घेतात. तर
हे बाबा बसून समजावून सांगतात. ते आहेत उच्च ते उच्च भगवान. ते शिकवतात, नंतर मग हे
(ब्रह्मा बाबा) सुद्धा आहेत ना. जर नीट शिकला नाहीत तर कोणाकडे तरी जाऊन दास-दासी
बनाल. शिवबाबांकडे दास-दासी बनणार का? बाबा तर समजावून सांगतात - जर नीट शिकला
नाहीत तर सतयुगामध्ये जाऊन दास-दासी बनाल. जे काहीच सेवा करत नाहीत, खाल्ले-प्याले
आणि झोपले ते काय बनणार! बुद्धीमध्ये तर येते ना की, हे काय बनतील! आम्ही तर महाराजा
बनणार. आमच्या समोरही येणार नाहीत. स्वतः देखील समजतात - आम्ही असे बनणार. परंतु
तरीही लाज कुठे आहे. आपण आपली उन्नती करून काहीतरी मिळवावे हे समजतच नाहीत. तेव्हा
बाबा म्हणतात - असे समजू नका की, हे ब्रह्मा सांगत आहेत, नेहमी शिवबाबांसाठी समजा.
शिवबाबांचा तर रिगार्ड ठेवायचा आहे ना. त्यांच्यासोबत मग धर्मराज देखील आहे. नाही
तर धर्मराजाचे खूप फटके देखील खातील. कुमारींना तर खूप हुशार असायला हवे. असे थोडेच
आहे की इथे ऐकले आणि बाहेर गेल्यावर खल्लास. भक्तीमार्गाची किती सामग्री आहे. आता
बाबा म्हणतात - विष (काम विकार) सोडा. स्वर्गवासी बना. अशा प्रकारची स्लोगन बनवा.
बहाद्दूर वाघिणी बना. बेहदचे बाबा मिळाले आहेत मग कसली काळजी आहे. गव्हर्मेंट
धर्मालाच मानत नाही तर ते मग मनुष्यापासून देवता बनण्यासाठी कसे बरे येतील. ते
म्हणतात - आम्ही कोणत्याही धर्माला मानत नाही. आम्ही सर्वांना एक समजतो; तर मग
भांडण-तंटे का आहेत? खोटे ते खोटे, रत्तीभर सुद्धा खरे नाही. सर्वप्रथम खोटेपणाची
सुरुवात ईश्वर सर्वव्यापी पासूनच होते. हिंदू धर्म असा कोणता धर्म तर नाही आहे.
ख्रिश्चनांचा आपला धर्म चालत आला आहे. ते स्वतःला बदलत नाहीत. हा एकच धर्म आहे जो
आपल्या धर्माला बदलून हिंदू म्हणतात आणि मग कसली-कसली नावे ठेवतात, श्री श्री अमके…
आता ‘श्री’ अर्थात श्रेष्ठ आहेत कुठे. श्रीमत देखील कोणाचे नाहीये. हे तर त्यांचे
आयर्न एजेड मत आहे. त्याला श्रीमत कसे म्हणू शकतो. आता तुम्ही कुमारींनी तयार व्हा
म्हणजे कोणालाही समजावून सांगू शकाल. परंतु योगयुक्त चांगल्या हुशार मुली हव्यात.
अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) स्व-उन्नती
करण्यासाठी बाबांच्या सेवेमध्ये तत्पर रहायचे आहे. फक्त खाणे, पिणे, झोपणे हे म्हणजे
पद गमावणे आहे.
२) बाबांचा आणि
शिक्षणाचा मान ठेवायचा आहे. देही-अभिमानी बनण्याचा पुरुषार्थ पूर्णपणे करायचा आहे.
बाबांच्या शिकवणींना धारण करून सपूत बच्चा बनायचे आहे.
वरदान:-
सेवा करत
असताना उपराम स्थितीमध्ये राहणारे योगयुक्त, युक्तियुक्त सेवाधारी भव
जे योगयुक्त,
युक्तियुक्त सेवाधारी आहेत ते सेवा करताना देखील नेहमी उपराम राहतात. असे नाही की
सेवा जास्त आहे म्हणून अशरीरी बनू शकत नाही. परंतु लक्षात रहावे की, माझी सेवा नाही,
बाबांनी दिली आहे; म्हणजे मग निर्बंधन रहाल. ‘मी ट्रस्टी आहे, बंधनमुक्त आहे’, अशी
प्रॅक्टिस करा. अतिच्या काळामध्ये अंतिम स्टेज, कर्मातीत अवस्थेचा अभ्यास करा. जसे
मधून-मधून संकल्पांच्या ट्राफिकला कंट्रोल करता तसे अतीच्या काळामध्ये अंतिम स्टेजचा
अनुभव करा तेव्हा अंतिम समयी पास विथ ऑनर बनू शकाल.
बोधवाक्य:-
शुभ भावना
‘कारणा’ला ‘निवारण’मध्ये परिवर्तन करते.
अव्यक्त इशारे -
रूहानी रॉयल्टी आणि प्युरीटीची पर्सनॅलिटी धारण करा:-
पवित्रता ब्राह्मण
जीवनातील विशेष जन्माची विशेषता आहे. पवित्र संकल्प ब्राह्मणांच्या बुद्धीचे भोजन
आहे. पवित्र दृष्टी ब्राह्मणांच्या डोळ्यांचा प्रकाश आहे, पवित्र कर्म ब्राह्मण
जीवनाचा विशेष धंदा आहे. पवित्र संबंध आणि संपर्क ब्राह्मण जीवनाची मर्यादा आहे. अशा
महान गोष्टीला अंगीकारताना मेहनत करू नका, जबरदस्तीने अंगीकारू नका. ही पवित्रता तर
तुमच्या जीवनाचे वरदान आहे.