09-06-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड मुलांनो -
बाबांसोबत उडण्याकरता कम्प्लीट प्युअर बना (संपूर्ण पवित्र बना), पूर्णत: समर्पित
व्हा, हा देह माझा नाही - पूर्णपणे अशरीरी बना”
प्रश्न:-
उच्च
ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी कोणती भीती काढून टाकली पाहिजे?
उत्तर:-
काही मुले
मायेच्या वादळांना खूप घाबरतात. म्हणतात बाबा मायेची वादळे खूप हैराण करतात त्यांना
थांबवा. बाबा म्हणतात - मुलांनो, हे तर बॉक्सिंग आहे. त्या बॉक्सिंगमध्ये देखील असे
होत नाही की, एकीकडूनच वार होत राहील. जर एकाने १० बुक्के मारले तर दुसरा ५ तरी
जरूर मारेल, त्यामुळे तुम्ही घाबरायचे नाही. महावीर बनून विजयी बनायचे आहे, तेव्हाच
उच्च ध्येयापर्यंत पोहोचू शकाल.
गीत:-
दर पर आये हैं
तेरे कसम ले…
ओम शांती।
मुल
मुलांनी गाणे ऐकले. जरूर गाण्यामध्ये कोणते तरी रहस्य भरलेले आहे. जे रेकॉर्ड खरेदी
करून बाबा बसून याचा अर्थ समजावून सांगत आहेत. यालाच म्हटले जाते - जिवंतपणी मरून
बाबांचे बनणे. पित्याचे बनल्या नंतर टीचरचे बनतात, टीचरचे बनल्या नंतर मेजॉरिटी गुरु
करतात. ख्रिश्चन लोकांमध्ये देखील जेव्हा बाळ जन्माला येते तेव्हा त्याला
ख्रिश्चयनाईज करतात (ख्रिस्तीकरण करतात). जाऊन गुरूच्या मांडीवर देतात. मग पादरी
असेल किंवा कोणीही असेल. पादरी काही क्राइस्ट होत नाही. म्हणतील त्यांच्या नावावर
आम्ही ख्रिश्चन बनतो.
आता तुम्ही मुले अगोदर बाबांचे बनता, अशरीरी बनता. आपले तन-मन-धन जे काही आहे ते
बाबांना अर्पण करता. जिवंतपणी मरता अर्थात आपण आत्मे बाबांचे बनतो. हे बुद्धीमध्ये
राहिले पाहिजे. ज्या काही माझ्या वस्तू आहेत, माझे शरीर, माझे धन, दौलत, नातेवाईक
इत्यादी जे काही आहे सर्वांना विसरून जाता. मेल्यानंतर सर्व काही विसरले जाते ना.
किती मोठे ध्येय आहे. मी अशरीरी आत्मा आहे, हे पक्के करायचे आहे. असे नाही की,
तुम्ही शरीर सोडता आणि मरून जाता. नाही, आत्मा कम्प्लीट पवित्र थोडीच बनली आहे. भले
बाबांचे बनले आहात परंतु बाबा म्हणतात - तुमची आत्मा अपवित्र आहे. आत्म्याचे पंख
तुटलेले आहेत. आता आत्मा उडू शकणार नाही. तमोप्रधान असल्या कारणाने एकही मनुष्य परत
घरी जाऊ शकत नाही. मायेने एकदम पंख तोडून टाकले आहेत. बाबांनी समजावून सांगितले आहे
- आत्मा सर्वात जास्त तीव्र गतीने जाते. तिच्यापेक्षा वेगवान दुसरी कोणतीच वस्तू
नाही. आत्म्यापेक्षा तीव्र गतीने कोणीही पोहचू शकत नाही. अखेरीला मच्छरांसदृश्य
सर्व आत्मे पळत जातात. कुठे जातात? खूप दूर-दूर सूर्य-चंद्राच्याही पार पलीकडे.
तिथून मग परत यायचे नाहीये. त्यांचे रॉकेट इत्यादी तर जाऊन मग परत येते. सूर्या
पर्यंत पोहचू शकत नाहीत. तुम्हाला तर त्याहीपेक्षा खूप दूर जायचे आहे.
सूक्ष्मवतनच्याही वर मूलवतन मध्ये जायचे आहे. आत्म्याला पंख मिळतात. हिशोब चुकता
करून आत्मा पवित्र बनते. कयामतच्या वेळेची (महाविनाशाच्या काळाची) खूप महिमा
लिहिलेली आहे. सर्व आत्म्यांना हिशोब चुकता करून जायचे आहे. आता तर सर्व आत्मे
अस्वच्छ, पाप आत्मा आहेत. भले मोठे गुरु, साधू-संन्याशी इत्यादी आहेत. समजतात आपण
गुरु आहोत. अहम् ब्रह्मास्मि… अहम् ब्रह्मोह्म. आम्ही ब्रह्म मध्ये पोहोचलो आहोत.
आता बसले तर आहेत इथे, आणि मग ब्रह्म मध्ये कसे काय पोहोचलेले आहेत. आता तुम्ही
जाणता आपण आत्मे ब्रह्म मध्ये राहणारे आहोत. परंतु आता तिथे कोणीही जाऊ शकत नाही.
सर्व आत्मे इथेच पुनर्जन्म घेतात. हा बेहदचा ड्रामा आहे. सर्व ॲक्टर्सना पार्ट
बजावण्याकरिता तिथून जरूर यायचे आहे. सर्वांचे आत्मे स्टेजवर आलेले आहेत. जेव्हा
विनाशाची वेळ असते तेव्हा सर्वजण येतात, तिथे राहून काय करतील! ॲक्टर पार्ट
बजावल्याशिवाय घरात थोडाच असा बसून राहील. नाटकामध्ये जरूर यावे लागेल. तिथून (परमधामहून)
जेव्हा सर्व आत्मे निघून येतात तेव्हा मग बाबा सर्वांना घेऊन जातात. बाबा म्हणतात -
मी भले इथे आहे तरी देखील आत्मे येत राहतात, वृद्धी होत राहते, नंबरवार. मग तुम्ही
जाणार देखील नंबरवार. सर्वकाही तुमच्या अवस्थेवर अवलंबून आहे, म्हणून तुम्हाला
मरजीवा बनायचे आहे. ‘मी आत्मा आहे’, हा निश्चय करणे मेहनतीचे काम आहे. मुले वारंवार
देह-अभिमानामध्ये येऊन विसरून जातात. देही-अभिमानी तेव्हाच राहतील जेव्हा कम्प्लीट
सरेंडर होतील, बाबा हे सर्वकाही तुमचे आहे. मी देखील तुमचा आहे. हा देह जसा की माझा
नाही आहे, याला मी सोडून देतो. बाबा मी तुमचा आहे. बाबा म्हणतात - माझे बना आणि बाकी
सर्वांमधील आसक्ती काढून टाका. बाकी असे नाही की इथेच येऊन बसायचे आहे. तुम्हाला
तुमचा काम-धंदा करायचा आहे. घर सांभाळायचे आहे. मुलांना आपल्या माता-पित्याचे ऋण
फेडायचे आहे. त्यांची सेवा करून परतफेड करायची आहे. मुलांवर माता-पित्याच्या
संगोपनाचे ऋण चढते. आता बाबा तुमचे संगोपन करत आहेत. सुरुवातीला जे पण आले होते
सर्वांनी लगेच स्वतःला सरेंडर केले. स्वतःजवळ काहीच ठेवले नाही, सरेंडर केले, त्या
धनाने तुम्ही मुले भारताला पावन बनवत आहात. भारतच संपूर्ण पवित्र होता.
भारतवासियांसारखे पवित्र, सुखी कोणीच असू शकत नाही. भारत सर्वात मोठे तीर्थ आहे.
जिथे पतित-पावन बाबा येऊन साऱ्या सृष्टीला, पतितांना देखील पवित्र बनवितात. आता ही
तत्वे इत्यादी सर्व दुश्मन आहेत. भूकंप होईल, वादळे येतील कारण तमोप्रधान आहेत.
नैसर्गिक आपत्ती येतील, खूप दुःख देतील. यावेळी सर्व दुःखाच्याच गोष्टी आहेत.
सतयुगामध्ये आहेत सर्व सुखाच्या गोष्टी. तिथे ही वादळे किंवा गर्मी इत्यादी काहीच
नसते. तुमच्यामध्ये देखील या गोष्टी फार थोड्यांनाच समजतात. आज आहेत उद्या नाहीत तर
म्हणणार - काहीच समजलेले नाही. भले इथे येतात परंतु सगळेच कायम थोडेच राहतात. इथून
गेले १० दिवसानंतर समाचार लिहितात - बाबा, अमक्याला मायेने खाल्ले. असे होत राहते.
छोटे फूल जेव्हा मोठे होईल तेव्हाच तर त्याला फळ येईल. त्यांच्यामध्ये मग इतरांना
आप समान बनविण्याची ताकद असते. ते फळ देतात.
बाबांचे बनलात तर प्रजा देखील बनवायची आहे, वारसदार देखील बनवायचा आहे, पंडे बनून
बाबांकडे आले, बस्स आम्ही पोहचलो. असे नको, लक्ष्य मोठे आहे. म्हणतात वादळे खूप
येतात. तुम्ही बाबांचे बनला आहात, संकटे तर येतीलच. म्हणतात - बाबा, आम्ही तुमचेच
होतो. तुमच्याकडून वारसा घेतला होता मग पुनर्जन्म घेत ८४ जन्म पार केले आणि मग येऊन
तुमचे बनलो आहोत. मी तर तुमच्याकडून वारसा घेऊनच राहणार. तर अशा बाबांची किती आठवण
करावी लागेल आणि आप समान बनवून फळ द्यावे लागेल. नाही तर माळा कशी बनेल. बाबांचे
वारसदार कसे बनवाल. प्रजा देखील पाहिजे, मग वारसदारही पाहिजेत, जे गादीवर बसतील.
बाबांकडे तर खूप येतात, आणि नंतर मग सोडचिठ्ठी देतात. बुद्धीचा योग तुटला, खेळ संपला.
बरीच मुले बाबांना येऊन विचारतात - ‘बाबा, अवस्थेला पक्के कसे करावे जेणेकरून
कोणतीही वादळे येणार नाहीत’. यासाठी मार्ग तर बाबा सांगतच असतात की, बाबांची आठवण
करा. वादळे तर येणारच. बॉक्सिंगमध्ये कधी असे पाहिले आहे जो फक्त एकच मार खात राहतो.
जरूर दोघांमध्येही हिंमत असेल. ५ बुक्के जर एकाने मारले तर दुसरा १० मारत असेल. हे
देखील बॉक्सिंग आहे. बाबांची आठवण करत रहाल तर माया पळून जाईल, परंतु हे लगेच तर
होणार नाही. माये सोबत झुंजावे लागेल. असे समजू नका माया बुक्का मारणार नाही. भले
कोणीही असेल, ही जबरदस्त बॉक्सिंग आहे. अनेक जण घाबरतात, माया एकदम नाकामध्ये दम
करून सोडते. हे रणांगण आहे ना. बुद्धियोग लावण्यामध्येच माया खूप विघ्न टाकते.
मेहनत सगळी योगामध्येच आहे. भले बाबा म्हणतात - ज्ञानी तू आत्मा मला प्रिय आहेत.
परंतु असे नाही की, फक्त ज्ञान देणारेच प्रिय आहेत. पहिले तर निरंतर योग पाहिजे.
बाबांची आठवण करायची आहे. मायेच्या विघ्नांना घाबरायचे नाही. विश्वाचे मालक बनता
ना. सगळेच बनतील? १६,१०८ ची माळा तर खूप मोठी आहे. शेवटी जाऊन पूर्ण होईल.
त्रेताच्या अंतापर्यंत किती प्रिन्स-प्रिन्सेस बनतात, काही तरी खुणा आहेत ना. ८ च्या
देखील खुणा आहेत. १०८ च्या देखील खुणा आहेत. या अगदी बरोबर आहेत. त्रेताच्या अखेरीला
इतके १६,१०८ प्रिन्स-प्रिन्सेस असतात. सुरुवातीला काही असणार नाहीत. पहिले थोडेच
असतात नंतर मग वृद्धी होत जाते. ते सर्व इथेच बनतात. चान्स खूप चांगला आहे परंतु
मेहनतही खूप आहे. गाण्यामध्ये देखील म्हटले आहे, ‘कधीही सोडणार नाही, मग मरून जाईन…’
बाबा हे तन-मन-धन सर्व तुमचे आहे. आम्ही अशरीरी बनून तुमची आठवण करतो. बुद्धियोग
तुमच्याशीच लावणार. मग बाबा म्हणतात - ‘हे सर्व काही तुम्हा मुलांसाठीच आहे’. मुले
म्हणतात - ‘आमचे सर्व काही तुमचे आहे’. म्हणतात ना, हे सर्व भगवंताने दिले आहे! आता
बाबा म्हणतात - हे सर्व नष्ट होणार आहे. तुमच्याकडे काय आहे? हे शरीर देखील नष्ट
होईल. आता मी पुन्हा तुम्हाला नवीन बदली करून देतो. फक्त एक्सचेंज करतात ना. तर बाबा
म्हणतात - मुलांनो, अशरीरी बना. माझी आठवण करा. बुद्धीने सर्व काही सरेंडर करा. राजा
हरिश्चंद्राची कथा आहे ना. म्हणाला - अमानत ठेवून घ्या.
बाबा म्हणतात - या सर्व शास्त्र इत्यादींचे सार मी तुम्हाला समजावून सांगतो. मीच
तुम्हाला ब्रह्मामुखाद्वारे राजा-राणी बनविले होते; आता पुन्हा बनवत आहे. कधीही
मनुष्य, मनुष्याला गीता ऐकवून, राजयोग शिकवून राजा-राणी बनवू शकत नाही. मग गीता
ऐकून काय फायदा. बाबा म्हणतात - मी स्वतः कल्प-कल्प येऊन तुम्हाला स्वर्गाचा मालक
बनवतो. माझे बनाल तेव्हाच तर वारसदार बनाल ना. तर जितके योगमध्ये राहाल तितके शुद्ध
बनत जाल. ‘बाबा, हे सर्व काही तुमचे आहे. मी तर ट्रस्टी आहे. तुमच्या आदेशा शिवाय
मी काहीही करणार नाही’. शरीर निर्वाह कसा करायचा आहे - त्यासाठी देखील मत घेतात (बाबांचा
सल्ला घेतात). जास्त करून गरीबच पूर्ण पोतामेल देतात. श्रीमंत काही देऊ शकत नाहीत.
सरेंडर होऊ शकत नाहीत, कोणी विरळाच निघतो. जसे एक जनक राजाचे नाव आहे. मुले-बाळे
आहेत, जॉईंट प्रॉपर्टी आहे तर ती वेगळी कशी होणार. श्रीमंत लोक आपली प्रॉपर्टी कशी
काढतील, ज्यामुळे सरेंडर होतील? बाबा आहेतच गरीब-निवाज. सर्वात गरीब माता आहेत,
त्यांच्या पेक्षा जास्त गरीब कन्या आहेत. कन्येला कधी वारसाचा नशा नसतो. मुलांना
पित्याच्या संपत्तीचा नशा असतो. तर त्या सर्व गोष्टींना सोडून मग वैकुंठाचा वारसा
घ्यावा लागेल. दान नेहमी गरिबालाच दिले जाते. भारत आहे सर्वात गरीब, अमेरिका खूप
श्रीमंत आहे. त्याला वारसा देतात काय? भारत सर्वात श्रीमंत होता, दुसरा कोणताही
धर्म नव्हता. फक्त भारतवासीच होते, एक भाषा होती. गॉड इज वन. मी, एक साम्राज्य, एक
धर्म, एक भाषा स्थापन करतो. मी एकटा सर्वशक्तिमान, एक गव्हर्नमेंट स्थापन करतो.
एकापासून मग दोन, मग तीन होतील. आता कितीतरी धर्म आहेत पुन्हा जरूर एक धर्म आला
पाहिजे. ५ हजार वर्षांची गोष्ट आहे. एक धर्म होता. विद्वानांनी सतयुगाचा कालावधी
लाखो वर्षे लिहिला आहे. सतयुग म्हणजे काय हेच समजतच नाहीत. समजतात, अमका स्वर्गवासी
झाला, कदाचित वर गेला. दिलवाडा मंदिरामध्ये देखील स्वर्ग वर छतावर दाखवला आहे. तर
मनुष्य गोंधळून जातात. वास्तवामध्ये स्वर्ग काही वर नाही. तुम्ही आता जाणता बाबांकडे
जाऊन, मग पुन्हा इथेच येऊन राज्य करणार. हे ज्ञान बुद्धीमध्ये राहिले पाहिजे,
जेणेकरून कोणालाही सांगू शकाल. कच्च्या मुलांना तर माया चिमणी खाऊन टाकेल; म्हणून
फोटो देखील मागवले जातात. रजिस्टर ठेवले जाते.
बाबांकडे समाचार
येतात - ‘अमक्याने एकच असा ज्ञानाचा तीर मारला, जो मी बाबांचा बनलो’. शास्त्रांमध्ये
देखील लिहिलेले आहे - कुमारींद्वारा बाण मारले. अरे, बाबांना का विसरले आहात? याला
ज्ञान-बाण म्हटले जाते. फक्त बाबांची आठवण करून द्यायची आहे. बाकी कोणत्या
हिंसक-बाणाची गोष्ट नाही आहे. बाबा म्हणतात - मी, ब्रह्मामुखाद्वारे सर्व
शास्त्रांचे रहस्य तुम्हाला समजावून सांगत आहे. ब्रह्मा तर जरूर इथेच असले पाहिजेत.
त्यांनी मग विष्णूच्या नाभी कमळातून ब्रह्मा दाखविला आहे. ठाऊक तर काहीच नाही.
मनुष्यांनी तर जे आले ते लिहिले आहे. घाण (विकार) तर खूप आहे. रिद्धी-सिद्धी वाले
देखील पुष्कळ झाले आहेत. सत्य जेव्हा बाहेर पडते तेव्हा खोटे लोक त्याला विरोध
करतात. आता तुम्ही समजता की शिवबाबा आहेत निराकार, आणि हे ब्रह्मा आहेत साकार. बाकी
नाभी इत्यादीची तर काही गोष्टच नाही आहे. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) आता ज्ञानी
तू आत्मा बनायचे आहे, केवळ ज्ञान ऐकणारा आणि ऐकविणारा नाही. आठवणीची मेहनत करायची
आहे. अशरीरी होऊन अशरीरी बाबांची आठवण करायची आहे.
२) बाबांचे बनून इतर
सर्व गोष्टींमधून आसक्ती काढून टाकायची आहे. हा देह सुद्धा माझा नाही. पूर्णत:
देही-अभिमानी बनून कंप्लिट सरेंडर (संपूर्ण समर्पण) व्हायचे आहे.
वरदान:-
मास्टर ऑलमाइटी
ऑथॉरिटीच्या सीटवर सेट राहणारे सहज आणि सदा कर्मयोगी भव
ज्याप्रमाणे एखाद्या
मशीनला सेट केले जाते तर एकदा सेट केल्याने मग ते मशीन ऑटोमॅटिक चालत राहते. तर
अशाच प्रकारे मास्टर ऑलमाइटी ऑथॉरिटीच्या स्टेजवर स्वतःला एकदाच सेट करा, म्हणजे मग
कधीही कमजोरीचे शब्द निघणार नाहीत. प्रत्येक संकल्प, शब्द किंवा कर्म त्याच सेटिंग
प्रमाणे ऑटोमॅटिक चालत राहतील. हीच सेटिंग सहज आणि कायमसाठी कर्मयोगी, निरंतर
निर्विकल्प समाधीमध्ये राहणारा सहजयोगी बनवेल.
बोधवाक्य:-
‘मी’ च्या ऐवजी
‘बाबा-बाबा’ म्हणणे - हाच आठवणीचा पुरावा आहे.
हे अव्यक्त इशारे -
सदैव हर्षित राहण्याकरिता आपल्या नेचरला (स्वभावाला) सरळ बनवा, सहनशील बना.
जे सहनशील आहेत तेच
ड्रामाच्या ढालीवर टिकून राहू शकतात आणि हर्षित राहू शकतात. सहनशीलता नसेल तर
ड्रामाच्या ढालीला पकडणे देखील अवघड आहे. यावेळी जे काही कर्म करता त्यामध्ये
करन-करावनहार ची स्मृती सदैव राहावी. करविणारे बाबा आहेत, करणारा मी निमित्त आहे,
जर ही स्मृती ठेवून कर्म कराल तर अनुभव होईल की, आपण साक्षी होऊन पार्ट बजावत आहोत.