09-07-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - बाबा आले आहेत तुम्हाला ज्ञान रत्ने देण्यासाठी, बाबा तुम्हाला जे काही ऐकवतात किंवा समजावून सांगतात ते ज्ञान आहे, ज्ञान-रत्ने ज्ञान-सागराशिवाय इतर कोणीही देऊ शकत नाही”

प्रश्न:-
आत्म्याची व्हॅल्यू कमी होण्याचे मुख्य कारण काय आहे?

उत्तर:-
व्हॅल्यू कमी होते भेसळ पडल्यामुळे. जसे सोन्यामध्ये भेसळ घालून दागिने बनवतात तर त्याची व्हॅल्यू कमी होते. असे आत्मा जी खरे सोने आहे, त्यामध्ये जेव्हा अपवित्रतेची भेसळ पडते तेव्हा व्हॅल्यू कमी होते. यावेळी तमोप्रधान आत्म्याची कोणतीही व्हॅल्यू नाही. शरीराची देखील कोणती व्हॅल्यू नाही. आता तुमची आत्मा आणि शरीर दोन्ही आठवणीने व्हॅल्युएबल बनत आहेत.

गीत:-
यह कौन आज आया सवेरे-सवेरे…

ओम शांती।
गोड-गोड रूहानी मुलांप्रति बाबा बसून समजावून सांगतात आणि आठवणीच्या युक्त्या देखील सांगत आहेत. मुले बसली आहेत, मुलांच्या मनामध्ये आहे ‘शिव भोळे बाबा’ आलेले आहेत. समजा अर्धा तास शांतीमध्ये बसता, बोलत नाही तर तुमच्यामधील आत्मा म्हणेल की, शिवबाबांनी काही बोलावे. जाणता शिवबाबा विराजमान आहेत, परंतु बोलत नाहीत. ही देखील तुमची आठवणीची यात्रा आहे ना. बुद्धीमध्ये शिवबाबांचीच आठवण आहे. मनातून वाटते बाबांनी काही बोलावे, ज्ञान-रत्न द्यावीत. बाबा येतातच तुम्हा मुलांना ज्ञान-रत्न देण्यासाठी. ते ज्ञानाचा सागर आहेत ना. म्हणतील - मुलांनो, देही-अभिमानी होऊन रहा. बाबांची आठवण करा. हे झाले ज्ञान. बाबा म्हणतात - या ड्रामाच्या चक्राची, शिडीची आणि बाबांची आठवण करा - हे झाले ज्ञान. बाबा जे काही समजावून सांगतील त्याला ज्ञान म्हणणार. आठवणीची यात्रा देखील समजावून सांगत राहतात. ही सर्व आहेत ज्ञान-रत्न. आठवणीबद्दल ज्या गोष्टी समजावून सांगतात, ती रत्न खूप चांगली आहेत. बाबा म्हणतात - आपल्या ८४ जन्मांची आठवण करा. तुम्ही पवित्र आला होता आता पुन्हा पवित्र होऊनच जायचे आहे. कर्मातीत अवस्थेमध्ये जायचे आहे आणि बाबांकडून पूर्ण वारसा घ्यायचा आहे. तो तेव्हा मिळेल, जेव्हा आत्मा आठवणीच्या बळाने सतोप्रधान बनेल. हे शब्द खूप व्हॅल्युएबल आहेत, नोट केले पाहिजेत. आत्म्यामध्येच धारणा होते. हे शरीर म्हणजे तर ऑर्गन्स आहेत ज्याचा विनाश होतो. संस्कार चांगले किंवा वाईट आत्म्यामध्येच भरले जातात. बाबांमध्ये देखील संस्कार भरलेले आहेत - सृष्टीच्या आदि-मध्य-अंताच्या नॉलेजचे, म्हणून त्यांना नॉलेजफुल म्हटले जाते. बाबा बरोबर करून समजावून सांगतात - ८४ चे चक्र बिलकुल सोपे आहे. आता ८४ चे चक्र पूर्ण झाले आहे. आता आपल्याला परत बाबांकडे जायचे आहे. घाणेरडी (विकारी) आत्मा तर तिथे जाऊ शकत नाही. तुमची आत्मा जेव्हा पवित्र होईल तर मग हे शरीर सुटेल. पवित्र शरीर तर इथे मिळू शकत नाही. ही जुनी जुत्ती (शरीर) आहे, यापासून वैराग्य येत आहे. आत्म्याला पवित्र बनून मग भविष्यामध्ये आपल्याला पवित्र शरीर घ्यायचे आहे. सतयुगामध्ये आपण आत्मा आणि शरीर दोन्ही पवित्र होतो. यावेळेस तुमची आत्मा अपवित्र बनली आहे तर शरीर देखील अपवित्र आहे. जसे सोने तसा दागिना. गव्हर्मेंट देखील म्हणते स्वस्त सोन्याचे दागिने वापरा. त्याची किंमत कमी आहे. आता तुमच्या आत्म्याची देखील व्हॅल्यू कमी आहे. तिथे तुमच्या आत्म्याची किती व्हॅल्यू असते. सतोप्रधान आहे ना. आता आहे तमोप्रधान. भेसळ पडली आहे, काहीच कामाची राहिलेली नाहीये. तिथे आत्मा पवित्र आहे, तर खूप व्हॅल्यू आहे. आता नऊ कॅरेट बनली आहे तर काहीच व्हॅल्यू नाही आहे म्हणून बाबा म्हणतात आत्म्याला पवित्र बनवा तर शरीर देखील पवित्र मिळेल. हे ज्ञान आणखी कोणीही देऊ शकत नाही.

बाबाच म्हणतात - मामेकम् (मज एकाची) आठवण करा. श्रीकृष्ण कसे म्हणणार. तो तर देहधारी आहे ना. बाबा म्हणतात - स्वतःला आत्मा समजून मज पित्याची आठवण करा. कोणत्याही देहधारीची आठवण करू नका. आता तुम्हाला समजले आहे आणि मग इतरांना समजावून सांगायचे आहे. शिवबाबा आहेत निराकार, त्यांचा अलौकिक जन्म आहे. तुम्हा मुलांना देखील अलौकिक जन्म देतात. अलौकिक पिता, अलौकिक मुले. लौकिक, पारलौकिक आणि अलौकिक म्हटले जाते. तुम्हा मुलांना अलौकिक जन्म मिळतो. बाबा तुम्हाला ॲडॉप्ट करून वारसा देतात. तुम्ही जाणता आम्हा ब्राह्मणांचा देखील अलौकिक जन्म आहे. अलौकिक पित्याकडून अलौकिक वारसा मिळतो. ब्रह्माकुमार-कुमारींशिवाय दुसरे कोणीही स्वर्गाचा मालक बनू शकत नाहीत. मनुष्य काहीच समजत नाहीत. तुम्हाला बाबा किती समजावून सांगतात. आत्मा जी अपवित्र बनली आहे ती आठवणीशिवाय पवित्र बनू शकत नाही. आठवणीमध्ये राहिला नाहीत तर भेसळ राहून जाईल. पवित्र बनू शकणार नाही मग सजा खावी लागेल. दुनियेतील सर्व मनुष्य आत्म्यांना पवित्र बनून परत जायचे आहे. शरीर तर जाणार नाही. बाबा म्हणतात - स्वतःला आत्मा समजणे किती अवघड असते. धंदा इत्यादीमध्ये ती अवस्था थोडीच राहते. बाबा म्हणतात - ठीक आहे, स्वतःला आत्मा समजू शकत नसाल तर शिवबाबांची आठवण करा. धंदा इत्यादी करत हीच मेहनत करा की मी आत्मा या शरीराद्वारे काम करत आहे. मी आत्माच शिवबाबांची आठवण करते. आत्माच सर्वप्रथम पवित्र होती, आता पुन्हा पवित्र बनायचे आहे. ही आहे मेहनत. यामध्ये खूप जबरदस्त कमाई आहे. इथे कितीतरी श्रीमंत आहेत, अरब-खरब आहेत परंतु ते सुख नाहीये. सर्वांच्या डोक्यावर दुःख आहे. मोठ-मोठे राजे, प्रेसिडेंट इत्यादी आज आहेत, उद्या त्यांना मारून टाकतात. परदेशामध्ये काय-काय होत राहते. श्रीमंतांवर, राजांवर तर संकटच आहे. इथे देखील जे राजे होते ते प्रजा बनले आहेत. राजांवर मग प्रजेचे राज्य झाले. ड्रामामध्ये अशी नोंद आहे. शेवटालाच अशी हालत होते. आपसामध्ये खूपच भांडत राहतील. तुम्ही जाणता कल्पापूर्वी देखील असेच झाले होते. तुम्ही गुप्त वेशामध्ये अंत:करणापासून आणि उत्कट प्रेमाने आपले गमावलेले राज्य घेत आहात. तुम्हाला ओळख मिळाली आहे - आपण तर मालक होतो, सूर्यवंशी देवता होतो. आता पुन्हा तसे बनण्यासाठी पुरुषार्थ करत आहात कारण इथे तुम्ही सत्यनारायणाची कथा ऐकत आहात. बाबांद्वारे आपण नरापासून नारायण कसे बनावे? बाबा येऊन राजयोग शिकवत आहेत. भक्तीमार्गामध्ये हे कोणी शिकवू शकत नाही. कोणत्याही मनुष्याला पिता, टीचर, गुरु म्हणणार नाही. भक्तीमध्ये किती जुन्या कहाण्या बसून ऐकवतात. आता तुम्हा मुलांना २१ जन्म विश्रांती मिळविण्यासाठी पावन तर जरूर बनावे लागेल.

बाबा म्हणतात - स्वतःला आत्मा समजा. अर्धे कल्प तर ड्रामा अनुसार देह-अभिमानी होऊन राहता, आता देही-अभिमानी बनायचे आहे. ड्रामा अनुसार आता जुन्या दुनियेला बदलून नवीन बनायचे आहे. दुनिया तर एकच आहे. जुन्या दुनियेपासून मग नवीन बनेल. नवीन दुनियेमध्ये नवीन भारत होता तर त्यामध्ये देवी-देवता होते, राजधानी देखील जाणता, यमुनेचा तीर होता, ज्याला परिस्थान देखील म्हणत होते. तिथे नॅचरल ब्युटी असते. आत्मा पवित्र बनते तर पवित्र आत्म्याला शरीर देखील पवित्र मिळते. बाबा म्हणतात - मी तुम्हाला येऊन सुंदर सो देवी-देवता बनवतो. तुम्ही मुले आपली तपासणी करत रहा, आपल्यामध्ये कोणते अवगुण तर नाहीत ना? आठवणीमध्ये राहतो? अभ्यास देखील करायचा आहे. हे आहे खूप उच्च शिक्षण. एकच शिक्षण आहे, त्या (लौकिक) शिक्षणामध्ये तर किती पुस्तके इत्यादी शिकतात. हे शिक्षण आहे उच्च ते उच्च, शिकवणारे देखील उच्च ते उच्च शिवबाबा आहेत. असे नाही की शिवबाबा काही या दुनियेचे मालक आहेत. विश्वाचे मालक तर तुम्ही बनता ना. किती नवीन-नवीन गूढ गोष्टी तुम्हाला ऐकवत राहतात. मनुष्य तर समजतात परमात्मा सृष्टीचा मालक आहे. बाबा समजून सांगत आहेत - ‘गोड-गोड मुलांनो, मी या सृष्टीचा मालक नाहीये. तुम्ही मालक बनता आणि मग राज्य गमावता. मग बाबा येऊन विश्वाचा मालक बनवतात. विश्व यालाच म्हटले जाते. मूलवतन किंवा सूक्ष्मवतनची गोष्ट नाहीये. मूलवतन मधून तुम्ही इथे येऊन ८४ जन्मांचे चक्र फिरता. मग बाबांना यावे लागते. आता पुन्हा तुम्हाला पुरुषार्थ करायला लावतो - ते प्रारब्ध मिळविण्यासाठी, जे तुम्ही गमावले आहे. जय आणि पराजयाचा खेळ आहे ना. हे रावण राज्य नष्ट होणार आहे. बाबा किती सोप्या रीतीने समजावून सांगतात. बाबा स्वतः बसून शिकवतात. तिथे तर मनुष्य, मनुष्यांना शिकवतात. आहात तुम्ही देखील मनुष्य परंतु बाबा तुम्हा आत्म्यांना बसून शिकवतात. शिक्षणाचे संस्कार आत्म्यामध्येच असतात. आता तुम्ही खूप नॉलेजफुल आहात, ते सर्व आहे भक्तीचे नॉलेज. कमाईसाठी देखील नॉलेज आहे. शास्त्रांचे देखील नॉलेज आहे. हे आहे रूहानी नॉलेज. तुमच्या रुहला (आत्म्याला) रूहानी बाबा बसून नॉलेज ऐकवतात. ५००० वर्षांपूर्वी देखील तुम्ही ऐकले होते. साऱ्या मनुष्य सृष्टीमध्ये असे कधी कोणी शिकवत नसेल. कोणालाच माहीत नाहीये की, ईश्वर कसे शिकवतात?

तुम्ही मुले जाणता आता या शिक्षणाने किंगडम (राजधानी) स्थापन होत आहे. जे चांगल्या रीतीने शिकतात आणि श्रीमतावर चालतात ते हायेस्ट बनतात आणि जे बाबांची जाऊन निंदा करतात, हात सोडून जातात ते प्रजेमध्ये खूप कमी पद मिळवतात. बाबा तर एकच शिक्षण शिकवतात. शिक्षणामध्ये किती मार्जिन आहे. डीटी किंगडम (दैवी राज्य) होते ना. एकच बाबा आहेत जे इथे येऊन किंगडम स्थापन करतात. बाकी हे सर्व नष्ट होणार आहे. बाबा म्हणतात - मुलांनो, आता लवकर तयारी करा. निष्काळजीपणे वेळ वाया घालवू नका. आठवण करत नाहीत तर अतिशय मौल्यवान वेळेचे नुकसान होते. शरीर निर्वाह अर्थ धंदा इत्यादी भले करा तरी देखील - ‘हथ कार डे दिल यार डे (हाताने काम करा मनाने बाबांची आठवण करा)’. बाबा म्हणतात - माझी आठवण करा तर राजाई तुम्हाला मिळेल. ‘खुदा दोस्त’ची कहाणी देखील ऐकली आहे ना. अल्लाह अवलदीनचे नाटक देखील दाखवतात. टाळी वाजवली आणि खजिना बाहेर आला. आता तुम्ही मुले जाणता - अल्लाह तुम्हाला टाळी वाजवल्याने कशापासून काय बनवितात. एका क्षणात दिव्य दृष्टीद्वारे वैकुंठामध्ये निघून जाता. आधी मुली आपसामध्ये मिळून बसत होत्या आणि आपणच ध्यानामध्ये जात होत्या. मग जादू म्हणत होते. त्यामुळे ते बंद केले. तर या सर्व गोष्टी आहेत या वेळच्या. हातमताईची देखील कहाणी आहे ना. तोंडात मोहर घातली की माया गायब होत असे. मोहर काढली की परत माया येत होती. रहस्य तर कोणालाच समजत नव्हते. बाबा म्हणतात - ‘मुलांनो, तोंडामध्ये मोहर टाकून ठेवा’. तुम्ही शांतीचे सागर आहात, आत्मा शांती मध्ये आपल्या स्वधर्मामध्ये राहते. सतयुगामध्ये देखील जाणता आपण आत्मा आहोत. बाकी परमात्मा पित्याला कोणीही जाणत नाहीत. कधीही कोणी विचारले तर तुम्ही बोला - तिथे विकाराचे नावच नाहीये. आहेच व्हाईसलेस वर्ल्ड (निर्विकारी दुनिया). पाच विकार तिथे असतच नाहीत. देह-अभिमानच नसतो. मायेच्या राज्यामध्ये देह-अभिमानी बनतात, तिथे असतातच मुळी मोहजीत. या जुन्या दुनियेपासून नष्टोमोहा व्हायचे आहे. वैराग्य तर त्यांना येते जे घरदार सोडतात. तुम्हाला काही घरदार सोडायचे नाहीये. बाबांच्या आठवणीमध्ये रहात हे जुने शरीर सोडून जायचे आहे. सर्वांचा हिशोब चुकता होणार आहे. मग घरी निघून जाणार. हे कल्प-कल्प होते. तुमची बुद्धी आता दूर-दूर वरती जाते, ते लोक बघतात कुठेपर्यंत सागर आहे? सूर्य-चंद्रावर काय आहे? आधी समजत होते हे देवता आहेत. तुम्ही म्हणता हे तर मंडपाचे दिवे आहेत. इथे खेळ चालतो. तर हे दिवे देखील इथे आहेत. मूलवतन, सूक्ष्मवतनमध्ये हे असत नाहीत. तिथे खेळच नाहीये. हा अनादि खेळ चालत येतो. चक्र फिरत राहते, प्रलय होत नाही. भारत तर अविनाशी खंड आहे, यामध्ये मनुष्य असतातच, जलमय होत नाहीत. पशु-पक्षी इत्यादी जे पण आहेत, सर्व असतील. बाकी आता जे काही खंड आहेत, ते सतयुग-त्रेतामध्ये राहत नाहीत. तुम्ही जे काही दिव्यदृष्टीने बघितले आहे, ते मग प्रॅक्टिकलमध्ये बघणार आहात. प्रॅक्टिकलमध्ये तुम्ही वैकुंठामध्ये जाऊन राज्य करणार. ज्यासाठी पुरुषार्थ करत राहता; तरी देखील बाबा म्हणतात - आठवणीसाठी खूप मेहनत घ्यावी लागते. माया आठवण करू देत नाही. अतिशय प्रेमाने बाबांची आठवण करायची आहे. अज्ञान काळामध्ये देखील प्रेमाने बाबांची महिमा करतात. आमचा अमका असा होता, अमक्या पदावर होता. आता तुमच्या बुद्धीमध्ये संपूर्ण सृष्टी चक्र पक्के झाले आहे. सर्व धर्मांचे नॉलेज आहे. जसे तिथे आत्म्यांचा सिजरा (वंश वृक्ष) आहे, इथे मग मनुष्य सृष्टीचा सिजरा (वंश वृक्ष) आहे. ग्रेट-ग्रेट ग्रँड फादर ब्रह्मा आहेत. त्यानंतर आहे तुमची वंशावळ. सृष्टी तर चालत राहते ना.

बाबा समजावून सांगतात - मुलांनो, नरापासून नारायण बनायचे आहे तर तुमची जी कथनी (बोलणे) आहे, तिच करनी (कृती) असावी. पहिले आपल्या अवस्थेला पहायचे आहे. बाबा आम्ही तर तुमच्याकडून पूर्ण वारसा घेऊनच सोडणार, तर मग तसे वर्तन देखील हवे. हे एकच शिक्षण आहे, नरापासून नारायण बनण्याचे. हे तुम्हाला बाबाच शिकवतात. राजांचाही राजा तुम्हीच बनता, दुसरे कोणीही खंडामध्ये असत नाहीत. तुम्ही पवित्र राजे बनता, मग बिना लाईटवाले अपवित्र राजे पवित्र राजांची मंदिरे बनवून पूजा करतात. आता तुम्ही शिकत आहात. स्टुडंट आपल्या टीचरला का विसरतात! म्हणतात - ‘बाबा, माया विसरायला लावते’. दोष मग मायेला देतात. अरे, आठवण तर तुम्हाला करायची आहे ना. मुख्य टीचर एकच आहे, बाकी सर्व आहेत नायब टीचर्स (सहाय्यक शिक्षक). बाबांना विसरता, ठीक आहे, टीचरची आठवण करा. तुम्हाला तीन चान्स दिले जातात. एकाला विसरलात तर दुसऱ्याची आठवण करा. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) बाबांकडून पूर्ण वारसा घेण्याकरिता जी कथनी असेल तीच करनी असावी (जे बोलणे असेल तीच कृती असावी), हा पुरुषार्थ करायचा आहे. मोहजीत बनायचे आहे.

२) कायम हे लक्षात राहावे की, आपण शांतीच्या सागराची मुले आहोत, आपल्याला शांतीमध्ये रहायचे आहे. तोंडामध्ये मोहर टाकून ठेवायची आहे. निष्काळजीपणे आपला वेळ वाया घालवायचा नाही.

वरदान:-
संघटन रुपी किल्ल्याला मजबूत बनविणारे सर्वांचे स्नेही, संतुष्ट आत्मा भव

संघटनची शक्ती विशेष शक्ती आहे. एकमत असणाऱ्या संघटनच्या किल्ल्याला कोणीही हलवू शकत नाही. परंतु त्याचा आधार आहे - एकमेकांचे स्नेही बनून सर्वांना रिगार्ड देणे आणि स्वतः संतुष्ट राहून सर्वांना संतुष्ट करणे. ना कोणी डिस्टर्ब व्हावे ना कोणी कोणाला डिस्टर्ब करावे. सर्वांनी एकमेकांना शुभ भावना आणि शुभकामनेचा सहयोग देत रहावा तर हा संघटनचा किल्ला मजबूत होईल. संघटनची शक्तीच विजयाची विशेष आधार स्वरूप आहे.

बोधवाक्य:-
जेव्हा प्रत्येक कर्म यथार्थ आणि युक्तीयुक्त असेल तेव्हा म्हणणार पवित्र आत्मा.

अव्यक्त इशारे - संकल्पांची शक्ती जमा करून श्रेष्ठ सेवेच्या निमित्त बना:-

प्रत्येक मुलगा जो स्वयंप्रती अथवा सेवेप्रती उमंगांचे चांगले-चांगले संकल्प करतो की, ‘आत्तापासून हे करणार, असे करणार, अवश्य करणार, करूनच दाखवणार…’ अशा श्रेष्ठ संकल्पाचे बीज जो पेरतो, त्या संकल्पाला अर्थात बीजाला प्रॅक्टिकल मध्ये आणण्यासाठी त्याची पालना करत रहा तर ते बीज फल स्वरूप बनेल.