09-08-26 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
02.03.2011 ओम
शान्ति
मधुबन
“मास्टर सर्वशक्तिवान
या स्वमानाच्या सीटवर राहून, एकमेकांना उमंग-उत्साह देत, सहयोगी बनून व्यर्थ
संकल्पांची रुईची फुले अर्पण करून नंबर वनचे इनाम घ्या”
आज तुम्ही सर्व आणि
त्यासोबत चोहो बाजूची सर्व मुले अमृतवेलेपासून अतिशय प्रेमाने भरलेल्या आपल्या
प्रेमाच्या आणि आनंदाच्या शुभेच्छा देत आहेत. तर बाबा देखील तुम्हा सर्व सिकीलध्या
मुलांना या जयंतीच्या शुभेच्छा देण्याकरिता आले आहेत. एक-एक बच्चा बाबांसाठी अतिशय
लाडका, काळजाचा तुकडा आहे. तर बापदादा आपल्या बाहूंच्या माळेद्वारे (आपल्या कवेत
घेऊन) तुम्हा सर्वांना मुबारक देत आहेत.
बापदादा पाहत आहेत की
तुम्ही तर समोर शुभेच्छा देत सुद्धा आहात आणि घेत सुद्धा आहात; परंतु चोहो बाजूची
मुले अनेक स्थानांवरून शुभेच्छा देत आहेत आणि बाबा देखील देश-विदेशातील सर्व
ठिकाणच्या मुलांना अतिशय स्नेहपूर्वक शुभेच्छा देत आहेत. बापदादा पाहत आहेत की,
प्रत्येक बच्चा आनंदी चेहऱ्याने प्रेमाच्या सागरामध्ये हिंदोळे घेत आहे. बाबांना
आनंद आहे की बाबा एकटे येत नाहीत मुलांसोबतच येतात कारण बाबा येतातच यज्ञ
रचण्याकरिता. तर यज्ञामध्ये कोण असतात? ब्राह्मण, म्हणून बाबा एकटे येत नाहीत परंतु
मुलांसोबत आले आहेत कारण हीच जयंती सर्व जयंतीं पेक्षा वंडरफुल आहे. संपूर्ण
कल्पामध्ये ही एकच जयंती अशी आहे जी बाबा आणि मुलांचा एकत्र जन्म होतो म्हणून या
जयंतीला म्हटलेच जाते हिरे-तुल्य जयंती. बाबा देखील विशेष आदि रत्न मुलांना विशेष
मुबारक देत आहेत. तर तुम्ही सर्व आज मुबारक देण्यासाठी आला आहात की घेण्यासाठी
देखील आला आहात! बाबांचे म्हणणेच आहे - सोबत राहू, सोबत उडू, सोबत येऊ आणि ब्रह्मा
बाबांसोबत राज्य करू. सोबत राहण्याचा वायदा आहे. तुम्ही देखील काय म्हणता? जिथे बाबा
तिथे आम्ही देखील सोबतच असणार. हा आहे मुलांचा बाबांसोबत, बाबांचा मुलांसोबत वायदा.
देहाने भले कुठेही राहत असाल, परंतु तुमच्या हृदयामध्ये सदैव बाबा सोबत आहेत
म्हणूनच बाबांना ‘दिलाराम’ म्हटले जाते. इथे यादगार देखील दिलवाला (देलवाडा) मंदिर
आहे. तर सर्वांच्या हृदयामध्ये दिलाराम सोबत आहेत ना! आणि बाबा नेहमी मुलांना सांगत
असतात की, कधीही एकटे राहू नका. नेहमी सोबत आहोत, सोबत राहायचेच आहे. एकटे असाल तर
माया आपला चान्स घेते आणि बाबा सोबत आहेत तर स्वयं लाईट हाऊस सोबत आहे,
त्यांच्यासमोर तर माया दुरूनच पळून जाते, जवळ सुद्धा येऊ शकत नाही; म्हणूनच मुलांचा
बाबांशी आणि बाबांचा मुलांशी सदैव सोबत राहण्याचा वायदा आहे. तुमचा सर्वांचा देखील
वायदा आहे ना! सोबत आहोत, सोबत राहू. सोबत असणे चांगले वाटते ना. हां, जरूर हात वर
करा.
बापदादांनी पाहिले की
प्रत्येक बच्चा अमृतवेलेला बाबांसोबत मनातील गोष्टी भरपूर करतात. तसा तर वेळ मिळत
नाही परंतु अमृतवेलेला प्रत्येकजण खूप गोड-गोड मनातील गोष्टी करतो आणि बाबा देखील
प्रत्येक मुलाच्या मनातील गोष्टी ऐकून सर्व गोष्टींची उत्तरे देखील देतात. सर्वांना
एका गोष्टीचा खूप आनंद आहे की, आम्ही हृदयापासून म्हणतो - ‘माझे बाबा’, तर बाबा हजर
होतात. हजूर हाजिर होतात. यामध्ये फक्त मनाची गोष्ट आहे, अजून काही करण्याची गरज
नाही, हृदयापासून म्हटले - माझे बाबा, आणि हजूर हाजिर.
तर आज चोहोबाजूंनी
बापदादांच्या कानात गोड गाणे वाजत होते. कोणते गाणे? ‘मेरा बाबा, प्यारा बाबा, मीठा
बाबा’, आणि बापदादा देखील मुलांच्या प्रेमामध्ये एकरूप झाले होते आणि आहेत. आता
बापदादा तुमच्या प्रेमाच्या दिव्य कर्तव्याला पाहून म्हणतात की, तुमचे भक्त ते
देखील काही कमी बुद्धीचे नाहीत. त्यांनी देखील तुमच्या यादगारची कॉपी खूप चांगली
केली आहे. द्वापरमध्ये आले, सर्वात पहिला जन्म तसाही सतोप्रधान असतो कारण परमधाम
मधून आत्मा येते. तर आज भक्तांकडे देखील दृष्टी गेली. तर कॉपी खूप युक्तियुक्त (तर्कशुद्ध
पद्धतीने) केली आहे कारण तुमचे अगदी सुरुवातीचे विशेष भक्त जसे तुमचे प्रॅक्टिकल
कर्म आहे तर त्यांनी देखील तशीच्यातशी यादगारची कॉपी सुंदर बनवली आहे. परंतु तुमचे
प्रॅक्टिकल जीवन आहे, त्यांचे यादगार रूपात आहे. जसे तुम्ही व्रत घेतले, कोणते व्रत
घेतले? पवित्रतेचे. तर ते देखील व्रत घेतात, व्रताची कॉपी केली आहे; परंतु तुमचे
व्रत एका जन्मामध्ये घेतल्याने अनेक जन्म ते व्रत चालते. ते एका दिवसासाठी पवित्र
सुद्धा राहतात आणि खाणे-पिणे देखील शुद्ध ठेवतात. तुमचे २१ जन्मांचे व्रत, आणि
त्यांचे अल्पकाळासाठी आहे. त्याचप्रमाणे जागरण, तुम्ही प्रकाशामध्ये आलात तर
संपूर्ण विश्वातील अंधार नाहीसा केलात. अर्धे कल्प अंधार येऊ शकत नाही. मनातील
अंधार नाहीसा केलात आणि बाहेर प्रकृतीचे दुःख, तो अंधार नाहीसा केलात. त्याची देखील
कॉपी केली आहे, जागरण करतात. आणखी एक गोष्ट, तुम्ही बाबांवर बलिहार गेलात, बळी
चढलात. पूर्ण सरेंडर झालात तर त्यांनी देखील कॉपी केली आहे; परंतु स्वतःला करत
नाहीत, स्वतःला बळी चढवत नाहीत, कोणाला चढवतात? जाणता ना! बकऱ्याला बळी चढवतात.
बकऱ्यालाच का शोधले इतर कोणाला शोधले नाही. सर्वजण हसत आहेत, तुम्ही जाणता! बाबा
तुम्हा मुलांना वारंवार जो इशारा देतात की, ‘मी’पणा सोडून निमित्त भाव धारण करा, तर
त्यांनी देखील बकऱ्याला शोधले आहे कारण तो देखील में-में करतो. तर भक्तांची बुद्धी
खरोखरच विलक्षण आहे ना! तुमचे भक्त आहेत ना. बाबांचे, तुमचे भक्त आहेत. म्हणून बाबा
तुमच्या भक्तांना देखील जे खऱ्या अंतःकरणापासून भक्ती करतात, त्यांना काही ना काही
भक्तीचे फळ देतात. ते देखील सदैव सत्यनिष्ठ आणि सात्विकपणे राहतात, आनंदी राहतात.
दुःखामध्ये दुःखी होत नाहीत कारण ते निखळ भावनेने भक्ती करतात. तर बाबा देखील आजकाल
तुम्हा मुलांना हाच इशारा देत आहेत की, ‘मी’पणा आणू नका; ‘मी जे सांगतो तेच व्हावे.
मीच बरोबर सांगतो, तेच झाले पाहिजे’, हा ‘मी-मी’. एक आहे साधारण ‘मी’, जो ‘मी
शरीरधारी आहे’, ‘मी देहधारी आहे’, तर एक आहे - साधारण ‘मी’ आणि दुसरा आहे - सूक्ष्म
‘मी’. यामध्ये बाबांच्या देणगीला देखील, ‘मी केले, मी बोललो, मी करतो’, बाबांनी
दिलेल्या विशेषतांमध्ये देखील ‘मी’पणा येतो. ज्ञानाची समज, विशेषतांची समज त्यामध्ये
देखील सूक्ष्म ‘मी’पणा येतो. तर बाबा इशारा देत राहतात की, ‘मी’ आणि ‘माझे’, सदैव
‘माझे बाबा’, तिकडेच मनाची ओढ असावी. हदचे ‘माझे’, ‘माझे नाव’, ‘माझी शान’, याला
नष्ट करून ‘मी बाबांचा, बाबा माझे’, किती आनंद होतो! स्वयं भगवान माझे झाले, आणखी
काय हवे! तर एक आहे - साधारण ‘माझे’, आणि एक आहे - सूक्ष्म ‘माझे’. हा सूक्ष्म
‘माझे’पणा मलीन बनवतो आणि ‘माझे बाबा’ मालामाल करतो.
तर आज बर्थ डे साजरा
करण्यासाठी आला आहात. स्वतःचा देखील बर्थ डे साजरा करायला आला आहात ना! बाबा
मुलांशिवाय काहीही करत नाहीत म्हणून आज बाबा मुलांच्या जन्मोत्सवाची मुबारक
देण्यासाठी आले आहेत, ‘वाह माझ्या मुलांनो वाह!’ आता एक गोष्ट सांगू, तयार आहात!
सांगू? करावे लागेल. हात वर करा, कराल? डबल फॉरेनर्स कराल? टीचर्स कराल? अच्छा. तर
आज बापदादा जसे यादगार मध्ये शिव परमात्म्याच्या यादगारमध्ये रुईची फुले वाहतात,
गुलाबाची नाहीत, इतर कोणतीही फुले वाहत नाहीत, रुईची फुले वाहतात. तर आज बापदादा
तुम्हाला कोणती गोष्ट अर्पण करावी, तो होमवर्क देऊ इच्छित आहेत. तयार आहात ना! अच्छा.
हे तर बाबांना मुलांचे
खूप आवडते, सर्वजण ‘हाँ जी’ करतात. तर आज वाढदिवसानिमित्त बाबांचा हा संकल्प आहे की
सर्वांनी एकमेकांना उमंग-उत्साह देत, एकमेकांचे सहयोगी बनत व्यर्थ संकल्पाचे रुईचे
फूल अर्पण करा. व्यर्थ संकल्प ना करायचे आहेत, ना ऐकायचे आहेत आणि ना संगती मध्ये
येऊन व्यर्थ संकल्पांच्या संगाचा रंग लावून घ्यायचा आहे; कारण जिथे व्यर्थ संकल्प
असेल तिथे आठवणीचा संकल्प, ज्ञानाचे मधुर बोल, ज्याला मुरली म्हणता, ते शुद्ध
संकल्प स्मृतीमध्ये राहणार नाहीत. भले मुरली ऐकता देखील, वाचता सुद्धा, ते तर
आवश्यक आहे. ब्राह्मणांचा नियम आहे परंतु ती ऐकण्या पुरतीच राहील. मनामध्ये मनन
चालणार नाही. विचार कराल, म्हणाल की आजची मुरली खूप छान होती. विचार करत आहे काय
होती... वरदान सुद्धा खूप छान होते, परंतु आठवेल तेव्हा ना. व्यर्थ संकल्प
मन-बुद्धीला स्वतःकडे आकर्षित करणारे आहेत. तुम्हाला ठाऊक आहे बाबांसमोर मुले मग
काय म्हणतात? बाबा, इंटरेस्टेड समाचार तर ऐकायला हवा ना. नॉलेजफुल बनायचे असते,
परंतु व्यर्थ गोष्टी पद-प्राप्ती मध्ये नुकसान करतील. तर काय तुम्ही सर्वजण व्यर्थ
संकल्पांबद्दल बाबांसोबत वायदा करता? तुम्ही म्हणाल - व्यर्थ संकल्प आम्हाला तर नको
असतात परंतु ते येतात. इच्छा नसते परंतु येतात. तर बाबांना दृढ संकल्पाने दिल्याने,
आधी देणे येते का? बाबांना देऊन टाकले. दिलेली वस्तू जर तुमच्याकडे परत ही आली, तर
दिलेली वस्तू तुम्ही स्वतःकडे ठेवाल, की परत कराल? जर दिलेली वस्तू तुम्ही स्वतःकडे
ठेवली तर तुमचे टायटल काय असेल? तर बाबांना एकदा आपल्या आवडीने दृढतेने देऊन टाका
आणि वारंवार चेक करा की, दिलेली वस्तु आपल्याकडे परत तर आली नाही ना! दुसऱ्याची
वस्तू आपली बनवणे, याला चांगले मानले जात नाही. तर दररोज विश्रांतीच्या आधी,
विश्रांती नंतर घ्या आधी चेक करा - आज दिवसभरामध्ये कोणता व्यर्थ संकल्प तर आला नाही
ना? केला तर नाही? दिलेली वस्तू परत तर घेतली नाही ना?
तर आज बर्थ डे
निमित्त सौगात देण्याची हिंमत आहे ना! आहे हिंमत? हात वर करा, हिंमत आहे? तर जिथे
हिंमत आहे तिथे बापदादा देखील तुम्हाला सौगात देतील. तुम्ही मनापासून म्हणा - ‘माझे
बाबा, दयाळू कृपाळू बाबा, तुम्ही ही वस्तू घेऊन टाका’. जर मनापासून म्हणाल तर बाबा
एक्स्ट्रा गिफ्ट देतील कारण हिंमत तुमची, एक्स्ट्रा मदत बाबा देतील. जिथे हिंमत आहे
तिथे बाबांची मदत अवश्य असतेच, हा तर अनुभव केला आहे ना; कारण बापदादा बऱ्याच
काळापासून सूचना देत आहेत की, आता तीव्र पुरुषार्थाचा मार्ग आहे - तीन बिंदू लावणे.
बिंदू आहे, बाबा बिंदूची आठवण करायची आहे आणि झालेल्या गोष्टीला बिंदू लावायचा आहे,
फुलस्टॉप बिंदू आहे, ज्याला बापदादा म्हणतात मनन करा, बिंदू बनायचे आहे, बिंदू
पाहायचे आहे आणि बिंदू लावायचा आहे; म्हणून बिंदूचे खूप महत्त्व आहे. आजकालच्या
जमान्यामध्ये देखील बिंदूचे महत्त्व आहे. बघा, पैसे मोजतात ना. आजकाल सर्वांचे
प्रेम, सर्वात जास्त कशावर आहे? पैशांवर. तर पैसा वाढतो कसा? बिंदू लावत जा, १० वर
बिंदू लावा १०० होतील. दुसरा बिंदू लावा तर १००० होतील. तर बिंदूचे महत्त्व आहे
परंतु खरा बिंदू कोणता आहे ते विसरून गेले आहेत. तर आज बाबांना वाढदिवसाची भेट दिली?
दिली का? मनापासून दिली? ‘का, काय’ तर करणार नाही ना? कसे करू, काय करू? ही ‘का-का’
ची भाषा वाईट आहे. ‘का करू, कसे करू, का, काय’, का-का करायचे नाही. तर भेट
देण्यासाठी आनंदाने हात वर केला आहे की संगठनमध्ये मजबूरीने हात वर केला आहे? कारण
मजबूरीने करणाऱ्याचे ‘सदैव’ होणार नाही, ‘कधी-कधी’ होईल. मनापासून करणारा -
‘करायचेच आहे, बनायचेच आहे’. सौगात दिली, द्यायचीच आहे. असा आनंदाने संकल्प कराल तर
तुम्हा सर्वशक्तिवान पित्याची मुले मास्टर सर्वशक्तिवानसाठी काही मोठी गोष्ट आहे
काय! सीटवर राहा, ‘मास्टर सर्वशक्तिवान’च्या सीटवर कायम सेट राहा. विसरायचे नाही.
स्वमान (उपाधी) आहे ना हा. आपला स्वमान (उपाधी) सोडायला होत नाही. उपाधी साठी तर
भांडत असतात. तर म्हणूनच आज बाबांना प्रेम दाटून आले की, छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये
आपला स्वमान, परमात्म्याकडून मिळालेला स्वमान, लोकांकडून मिळालेला स्वमान (उपाधी)
त्याचा देखील किती नशा असतो! हा ‘मास्टर सर्वशक्तिवान’, स्वमान तर परमात्म्याद्वारे
मिळाला आहे. जे हवे ते करू शकता. आहे ना हिंमत? मान हलवा. हात हलवू नका, मान हलवा.
हिंमत आहे? टीचर्स. तुम्हाला करून घ्यावे लागेल, लक्ष द्यावे लागेल. तुम्ही कराल आणि
इतरांचे लक्ष याकडे वेधून त्यांच्याकडूनही हे करून घ्याल. निमित्त आहात ना! मग पाहू
कोणता क्लास, कोणाचा क्लास नंबर घेतो? मग चांगले इनाम देऊ. कोणते इनाम देणार ते
जाहीर करणार नाही. उत्तम इनाम देऊ. संपूर्ण क्लासच्या क्लासने प्रयत्न करायचा आहे.
असे नाही की एकानेच केले, नाही. मेजॉरिटींनी (जास्तीत जास्त मुलांनी) करावे.
तर आज बापदादांना
प्रत्येक मुला विषयी प्रेम दाटून येत आहे की, प्रत्येकाने नंबर वनमध्ये यावे. टू
मध्ये देखील नाही. पहिल्या राजगादीवर बसणार नाहीत, सिंहासनावर तर दोघे बसतील परंतु
पहिली राजधानी, पहिल्या राजघराण्याच्या नात्यामध्ये यावे. दोन नंबर तर फिक्स आहेत,
परंतु राज्य करायचे आहे, राज्याधिकारी बनायचे आहे तर पहिल्या राज्यामध्ये यावे. तर
बापदादांचे हेच मुलांवर प्रेम आहे की एक-एक बच्चा कोणत्या ना कोणत्या विशेषतेमध्ये
नंबर वन यावा. नंबरवार नाही, नंबर वन. आहे उमंग? नंबर वन मध्ये यायचे आहे की जे
मिळेल ते ठीक? ‘ठीक आहे, ठीक आहे’, करायचे नाही. बाबांची आशा आहे की, प्रत्येक
मुलाने कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये उल्लेखनीय काम करून नंबर वन मध्ये यावे. चार
सब्जेक्ट आहेत, कोणत्या ना कोणत्या सब्जेक्टमध्ये नंबर वन बनायचेच आहे. ‘बनायचेच आहे’,
यावर अंडरलाईन करा. चला जास्त मेहनत देत नाही, कोणत्याही एका सब्जेक्ट मध्ये नंबर
वन. हे तर सोपे आहे ना. बाकी आजच्या दिवशी अमृतवेलेला प्रत्येक बच्चा जे कोणी मीलन
साजरे करत होते, अतिशय आनंदी, आनंदाने हसणारा, आनंदी चेहरा दिसत होता. आणि बाबांनी
देखील प्रत्येक मुलाला ‘सदैव उडती कला’ हे वरदान दिले. चालणारी कला नाही, उडती कला.
तर आज बापदादांचे हे वरदान लक्षात ठेवा. बापदादांनी तुमच्या आणि आपल्या जयंतीला काय
वरदान दिले? ‘उडती कला भव’. तुम्ही देखील दिवसभर शिवरात्री उत्सव मनामध्ये साजरा
केला आहे ना! तर तुम्ही सर्वजण चांगले आहात, असेच चांगले राहाल, उत्तम ते उत्तम
राज्यपद प्राप्त कराल. तुम्ही सर्वजण छान आहात ना! बाबा तर चांगलेच पाहतात. अच्छा.
चोहो बाजूचे मग ते
सन्मुख बसले आहेत किंवा आपापल्या स्थानावर बसून साजरा करत आहेत, बापदादा देखील
सर्वांना पाहून हर्षित होत आहेत आणि मुले देखील बाबांचे मीलन पाहून आनंदित होत आहेत.
परंतु आजपासून संकल्प ठेवा - सदैव आनंदी. कधी-कधी राहणारे नाही, सदैव आनंदी. कोणीही
बघेल, तुमच्या चेहऱ्याला पाहून असे वाटले पाहिजे की ही खूप भाग्यवान आत्मा दिसून
येत आहे. तुमचे भाग्य, तुमच्या कृतीतून आणि चेहऱ्यावरून दिसून यावे. असे नाही की,
फक्त मनामध्ये खूप काही साठवून ठेवले आहे, असे नको. तुमचा भाग्यशाली चेहरा, आनंदी
चेहरा इतरांना परिचय करून देईल. चेहरा बोलेल - काहीतरी आहे. तुमच्या चेहऱ्याने सेवा
करावी. बाबांपर्यंत घेऊन यावे. आनंदी राहणे, हे देखील सेवेचे साधन आहे. तर चोहो
बाजूच्या मुलांना तुमच्या वाढदिवसाच्या सुद्धा पद्मपटीने मुबारक असो, मुबारक असो,
मुबारक असो. अच्छा.
वरदान:-
संशयाच्या
संकल्पांना समाप्त करून मायाजीत बनणारे विजयी रत्न भव
कधीही आधीपासूनच हा
संशयाचा संकल्प उत्पन्न होऊ नये की, ‘माहीत नाही आम्ही फेल होऊ’, संशयबुद्धी
झाल्यानेच हार होते; म्हणून सदैव हाच संकल्प असावा की, ‘आम्ही विजय प्राप्त करूनच
दाखवू’. विजय तर आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे, असे अधिकारी बनून कर्म केल्याने विजय
अर्थात सफलतेचा अधिकार अवश्य प्राप्त होतो, याद्वारेच विजयी रत्न बनाल म्हणून
मास्टर नॉलेजफुलच्या मुखातून कधीही ‘माहित नाही’ हा शब्द निघता कामा नये.
सुविचार:-
दयेची भावना सहजच
निमित्त भाव इमर्ज करते.
हे अव्यक्त इशारे -
अपवित्रतेच्या बीजाला सुद्धा नष्ट करून संपूर्ण स्वच्छ (पवित्र) बना.
जसे लाजाळूचे झाड थोडा
जरी हात लावला तरी शक्तीहीन होते, त्यासाठी वेळ लागत नाही. तसेच तुम्ही एका
सेकंदाच्या शुद्ध संकल्पाच्या शक्तीद्वारे मायेला लाजाळूच्या झाडासारखे मूर्छित
करून टाका. आपले निजी-स्वरूप (मूळ स्वरूप), वरदानी-स्वरूप, सदैव लक्षात ठेवा; म्हणजे
मग अपवित्रता अथवा विस्मृतीचे नामोनिशाणही राहणार नाही.