10-07-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - देह-अभिमान सोडून देही-अभिमानी बना, देही-अभिमानी असणाऱ्यांनाच ईश्वरीय संप्रदाय म्हटले जाते”

प्रश्न:-
तुम्ही मुले आता जो सत्संग करत आहात हा इतर सत्संगांपेक्षा वेगळा आहे, तो कसा?

उत्तर:-
हाच एक सत्संग आहे ज्यामध्ये तुम्ही आत्म्याचे आणि परमात्म्याचे ज्ञान ऐकता. इथे अभ्यास केला जातो. एम ऑब्जेक्ट देखील समोर आहे. इतर सत्संगांमध्ये ना अभ्यास असतो, ना कोणते एम ऑब्जेक्ट असते.

ओम शांती।
रूहानी मुलांप्रती रूहानी बाबा समजावून सांगत आहेत. रूहानी मुले ऐकत आहेत. सर्वप्रथम बाबा समजावून सांगतात - जेव्हा पण बसाल तेव्हा स्वतःला आत्मा समजून बसा. देह समजू नका. देह-अभिमानी असणाऱ्यांना आसुरी संप्रदाय म्हटले जाते. देही-अभिमानी असणाऱ्यांना ईश्वरीय संप्रदाय म्हटले जाते. ईश्वराला देह तर नाही आहे. ते सदैव आत्म-अभिमानी आहेत. ते आहेत सुप्रीम आत्मा, सर्व आत्म्यांचे पिता. परम आत्मा अर्थात उच्च ते उच्च. मनुष्य जेव्हा सर्वश्रेष्ठ भगवान म्हणतात तेव्हा बुद्धीमध्ये येते की ते निराकार लिंगरूप आहेत. निराकार लिंगाची पूजा सुद्धा केली जाते. ते आहेत परमात्मा अर्थात सर्व आत्म्यांपेक्षा श्रेष्ठ आहेत. आहेत ते देखील आत्माच, परंतु श्रेष्ठ आत्मा आहेत. ते जन्म-मरणाच्या चक्रामध्ये येत नाहीत. बाकी सर्व पुनर्जन्म घेतात आणि सगळी आहे रचना. रचता तर एक बाबाच आहेत. ब्रह्मा-विष्णू-शंकर ही देखील रचना आहे. मनुष्य सृष्टी सुद्धा सर्व रचना आहे. रचत्याला पिता म्हटले जाते. पुरुषाला (पतीला) देखील रचता म्हटले जाते. पत्नीला दत्तक घेतात मग तिच्यापासून क्रियेट करतात, पालना करतात. फक्त विनाश करत नाहीत; बाकीचे जे धर्मसंस्थापक असतात ते देखील क्रियेट करतात, मग त्यांची पालना करतात. विनाश कोणीही करत नाहीत. बेहदचे बाबा ज्यांना परम आत्मा म्हटले जाते, जसे आत्म्याचे रूप बिंदू आहे तसेच परमपिता परमात्म्याचे रूप सुद्धा बिंदू आहे. बाकी इतके मोठे लिंग जे बनवतात ते सर्व भक्तिमार्गामध्ये पूजेसाठी. बिंदूची पूजा कशी होऊ शकेल? भारतामध्ये रुद्र यज्ञ रचतात तेव्हा मातीचे शिवलिंग आणि शाळिग्राम बनवून मग त्यांची पूजा करतात. त्याला रुद्र यज्ञ म्हटले जाते. वास्तविक खरे नांव आहे - ‘राजस्व अश्वमेध अविनाशी रुद्र गीता ज्ञान यज्ञ’. जे शास्त्रांमध्ये सुद्धा लिहिलेले आहे. आता बाबा मुलांना म्हणतात - स्वतःला आत्मा समजा. बाकीचे जे काही सत्संग आहेत त्यांना आत्म्याचे किंवा परमात्म्याचे ज्ञान ना कोणाला आहे, ना कोणाला देऊ शकत. तिथे तर काही एम ऑब्जेक्ट नसते. तुम्ही मुले तर आता अभ्यास शिकत आहात. तुम्ही जाणता आत्मा शरीरामध्ये प्रवेश करते. आत्मा अविनाशी आहे, शरीर विनाशी आहे, शरीराद्वारे पार्ट बजावते. आत्मा तर अशरीरी आहे ना. म्हणतात देखील - नंगे आलो आहोत, नंगे जायचे आहे. शरीर धारण केले मग शरीर सोडून नंगे जायचे आहे. हे बाबा तुम्हा मुलांनाच बसून समजावून सांगतात. हे देखील मुले जाणतात - भारतामध्ये सतयुग होते तेव्हा देवी-देवतांचे राज्य होते, एकच धर्म होता. हे देखील भारतवासी जाणत नाहीत. बाबांना ज्यांनी जाणले नाही त्यांनी काही जाणले नाही. प्राचीन ऋषी-मुनी सुद्धा म्हणत होते - आम्ही रचता आणि रचनेला जाणत नाही. रचयिता आहेत बेहदचे बाबा. तेच रचनेच्या आदि-मध्य-अंताला जाणतात. आदि म्हटले जाते सुरुवातीच्या काळाला, मध्य मधल्या काळाला म्हटले जाते. आदि आहे - सतयुग, ज्याला दिवस म्हटले जाते, मग मध्यापासून अंतापर्यंत आहे रात्र. दिवस आहे सतयुग-त्रेतायुग, स्वर्ग आहे - वंडर ऑफ वर्ल्ड (जगातील आश्चर्य). भारतच स्वर्ग होता, ज्यामध्ये लक्ष्मी-नारायण राज्य करत होते, हे भारतवासी जाणत नाहीत. बाबा आता स्वर्गाची स्थापना करत आहेत.

बाबा म्हणतात - तुम्ही स्वतःला आत्मा समजा. आपण फर्स्टक्लास (सर्वोत्तम) आत्मा आहोत. यावेळी सर्व मनुष्यमात्र देह-अभिमानी आहेत. बाबा आत्म-अभिमानी बनवतात. आत्मा ही काय चीज आहे ते देखील बाबा सांगतात. मनुष्य काहीही जाणत नाहीत. भले म्हणतात देखील - ‘भृकुटी के बीच चमकता है अजब सितारा’, परंतु तो काय आहे, त्याच्यामध्ये कसा पार्ट भरलेला आहे, ते काहीही जाणत नाहीत. आता तुम्हाला बाबांनी समजावून सांगितले आहे, तुम्हा भारतवासीयांना ८४ जन्मांचा पार्ट बजावायचा असतो. भारतच श्रेष्ठ खंड आहे, जे काही मनुष्यमात्र आहेत त्यांचे हे तीर्थस्थान आहे, सर्वांची सद्गती करण्यासाठी बाबा इथे येतात. रावणराज्यातून मुक्त करून गाईड बनून घेऊन जातात. मनुष्य तर असेच बोलून टाकतात, अर्थ काहीही जाणत नाहीत. भारतामध्ये पहिले देवी-देवता होते. त्यांनाच मग पुनर्जन्म घ्यावा लागतो. भारतवासीच सो देवता, मग क्षत्रिय, वैश्य, शूद्र बनतात. पुनर्जन्म घेतात ना. हे ज्ञान पूर्ण रीतीने समजण्यासाठी ७ दिवस लागतात. पतित बुद्धीला पावन बनवायचे आहे. हे लक्ष्मी-नारायण पावन दुनियेमध्ये राज्य करत होते ना. भारतामध्ये त्यांचेच राज्य होते दुसरा कोणताही धर्म नव्हता. एकच राज्य होते. भारत किती पवित्र होता. हिरे-माणकांचे महाल होते; मग रावणराज्यामध्ये पुजारी बनले आहेत. पुन्हा भक्तिमार्गामध्ये ही मंदिरे इत्यादी बनवली आहेत. सोमनाथचे मंदिर होते ना. फक्त एकच मंदिर तर असणार नाही. इथे देखील शिवाच्या मंदिरांमध्ये इतकी हिरे-माणके होती जी मोहम्मद गजनवी उंटच्या उंट भरून घेऊन गेला. इतकी संपत्ती होती, ऊंटच तर काय कितीतरी लाखो ऊंट घेऊन आले तरी देखील घेऊन जाऊ शकणार नाहीत. सतयुगामध्ये सोने, हिरे-माणकांचे तर अनेक महाल होते. मोहम्मद गजनवी तर आत्ता आला आहे. द्वापरमध्ये देखील किती महाल इत्यादी असतात. ते मग भूकंपामध्ये आत गडप होतात. रावणाची काही सोन्याची लंका असत नाही. रावण राज्यामध्ये तर भारताची ही अशी अवस्था होते. १०० टक्के अधर्मी, दुराचारी, दिवाळखोर, पतित म्हटले जाते विकारी दुनियेला; नवीन दुनियेला म्हटले जाते - निर्विकारी. भारत शिवालय होता, ज्याला जगातील आश्चर्य म्हटले जाते. फार थोडे मनुष्य होते. आता तर करोडो मनुष्य आहेत. विचार केला पाहिजे ना. आता तुम्हां मुलांसाठी हे पुरुषोत्तम संगमयुग आहे, जेव्हा बाबा तुम्हाला पुरुषोत्तम, पारस-बुद्धी बनवत आहेत. बाबा तुम्हाला मनुष्यापासून देवता बनण्यासाठी सुमत देत आहेत. बाबांच्या मतासाठीच गायले जाते - ‘तुम्हरी गत-मत न्यारी…’ याचा देखील अर्थ कोणीही जाणत नाहीत. बाबा समजावून सांगतात - मी असे श्रेष्ठ मत देतो, ज्यामुळे तुम्ही देवता बनता. आता कलियुग पूर्ण होत आहे, जुन्या दुनियेचा विनाश समोर उभा आहे. मनुष्य एकदमच घोर अंधारामध्ये कुंभकर्णाच्या निद्रेमध्ये झोपलेले आहेत; कारण म्हणतात शास्त्रांमध्ये लिहिले आहे की, कलियुग तर अजून छोटे मूल आहे, ४० हजार वर्षे बाकी आहेत. ८४ लाख योनी समजल्याकारणाने कल्पाचे आयुर्मान सुद्धा प्रदीर्घ करून ठेवले आहे. वास्तविक आहेत ५ हजार वर्षे. बाबा समजाऊन सांगतात तुम्ही ८४ जन्म घेता, ८४ लाख नाही. बेहदचे बाबा तर या सर्व शास्त्र इत्यादींना जाणतात म्हणून तर सांगतात ही सर्व भक्तिमार्गाची आहेत, जी अर्धा कल्प चालतात, याद्वारे मला कोणीही भेटत नाहीत. ही देखील विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जर कल्पाची कालमर्यादा लाखो वर्षे म्हटली तर मग भरमसाठ लोकसंख्या असली पाहिजे. जेव्हा की २ हजार वर्षांमध्ये ख्रिश्चनांची संख्या इतकी झाली आहे. भारताचा खरा धर्म देवी-देवता धर्म आहे, तोच चालत आला पाहिजे, परंतु आदि सनातन देवी-देवता धर्माला विसरल्यामुळे म्हणतात - आमचा हिंदू धर्म आहे. हिंदू धर्म काही असतच नाही. भारत किती श्रेष्ठ होता. आदि सनातन देवी-देवता धर्म होता तेव्हा विष्णुपुरी होती. आता आहे रावणपुरी. तेच देवी-देवता ८४ जन्मानंतर काय बनले आहेत. देवतांना निर्विकारी समजून स्वतःला विकारी समजून त्यांची पूजा करतात. सतयुगामध्ये भारत निर्विकारी होता, नवीन दुनिया होती, ज्याला नवीन भारत म्हणतात. हा आहे जुना भारत. नवीन भारत कसा होता, जुना भारत काय आहे, नवीन दुनियेमध्ये भारतच नवीन होता, आता जुन्या दुनियेमध्ये भारत सुद्धा जुना आहे. काय अवस्था झाली आहे. भारतच स्वर्ग होता, आता नरक आहे. भारत सर्वात पवित्र होता, आता सर्वात अपवित्र आहे, सर्वांकडून भीक मागत आहे. प्रजेकडून सुद्धा भीक मागतात. ही तर समजून घेण्यासारखी गोष्ट आहे ना. आजच्या देह-अभिमानी मनुष्यांना थोडे जास्त पैसे मिळाले की समजतात आम्ही तर स्वर्गातच बसलो आहोत. सुखधामला (स्वर्गाला) अजिबातच जाणत नाहीत कारण पत्थर-बुद्धी आहेत. आता त्यांना पारस-बुद्धी बनविण्यासाठी ७ दिवसांच्या भट्टीमध्ये बसवा कारण पतित आहेत ना. पतितांना काही इथे बसवू शकत नाही. इथे पावनच राहू शकतात. पतितांना परवानगी देऊ शकत नाही.

आता तुम्ही संगमयुगामध्ये बसला आहात. तुम्ही जाणता - बाबा आम्हाला असे पुरुषोत्तम बनवत आहेत. ही खरी सत्यनारायणाची कथा आहे. सत्य बाबा तुम्हाला नरापासून नारायण बनण्याचा राजयोग शिकवत आहेत. ज्ञान केवळ एका बाबांकडेच आहे, ज्यांना ज्ञानाचा सागर म्हटले जाते. शांतीचा सागर, पवित्रतेचा सागर, ही त्या एकाचीच महिमा आहे. दुसऱ्या कोणाचीही महिमा असू शकत नाही. देवतांची महिमा वेगळी आहे, परमपिता परमात्मा शिवबाबांची महिमा वेगळी आहे. ते आहेत पिता, श्रीकृष्ण आहे देवता. सूर्यवंशी सो चंद्रवंशी सो वैश्यवंशी… मनुष्य तर ‘हम सो’ याचा अर्थ देखील समजत नाहीत. मी आत्मा सो परमात्मा म्हणतात, किती चुकीचे आहे. आता तुम्ही समजता की भारताची चढती कला आणि उतरती कला कशी होते. हे ज्ञान आहे, ती सर्व आहे भक्ती. सतयुगामध्ये सर्व पावन होते, राजा-राणीचे राज्य होते. तिथे मंत्री सुद्धा नसतात कारण राजा-राणी स्वतःच मालक आहेत. बाबांकडून वारसा घेतलेला आहे. त्यांना चांगली बुद्धी आहे, लक्ष्मी-नारायणाला कोणाकडून सल्ला घेण्याची आवश्यकता नसते. तिथे मंत्री नसतात. भारतासारखा पवित्र कोणता देश नव्हता. महान पवित्र देश होता. नावच होते स्वर्ग, आता नरक आहे. नरकापासून मग पुन्हा स्वर्ग तर बाबाच बनवतील. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) एका बाबांच्या सु-मताप्रमाणे चालून मनुष्यापासून देवता बनायचे आहे. या सुखदायक संगमयुगामध्ये स्वतःला पुरुषोत्तम, पारस-बुद्धी बनवायचे आहे.

२) सात दिवसांच्या भट्टीमध्ये बसून पतित बुद्धीला पावन बुद्धी बनवायचे आहे. सत्य बाबांकडून सत्यनारायणाची सत्य कथा ऐकून नरापासून नारायण बनायचे आहे.

वरदान:-
प्रत्येक खजिन्याला बाबांच्या डायरेक्शन प्रमाणे कार्यामध्ये वापरणारे ऑनेस्ट अर्थात इमानदार भव

ऑनेस्ट अर्थात इमानदार त्याला म्हटले जाते जो बाबांकडून प्राप्त झालेल्या खजिन्यांना बाबांच्या डायरेक्शन शिवाय कोणत्याही कार्यामध्ये वापरत नाही. जर तुम्ही वेळ, बोल, कर्म, श्वास किंवा संकल्प, परमत किंवा संगदोषामध्ये येऊन व्यर्थ गोष्टींमध्ये घालवत असाल, स्व-चिंतना ऐवजी पर-चिंतन करता, स्वमानाऐवजी कोणत्याही प्रकारच्या अभिमानामध्ये येता, श्रीमता ऐवजी मन मतानुसार चालता तर तुम्हाला इमानदार म्हणता येणार नाही. हे सर्व खजिने विश्व कल्याणासाठी मिळाले आहेत, ते त्याच्यासाठीच वापरणे हेच आहे इमानदार बनणे.

बोधवाक्य:-
अपोजिशन (विरोध) मायेला करायचा आहे, दैवी परिवाराला नाही.

अव्यक्त इशारे - संकल्पांची शक्ती जमा करून श्रेष्ठ सेवेच्या निमित्त बना:- सर्व आत्मे एकच बेहदचा दैवी परिवार आहे, आपल्या परिवारातील एकही आत्मा वरदानापासून वंचित राहू नये - असा उमंग-उत्साहाचा श्रेष्ठ संकल्प सदैव मनामध्ये रहावा. आपल्या कुटुंबामध्येच व्यस्त राहू नका, बेहदच्या स्टेजमध्ये स्थित होऊन, बेहदच्या आत्म्यांच्या सेवेचा श्रेष्ठ संकल्प करा, हेच सफलतेचे सोपे साधन आहे.