10-08-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड मुलांनो, जसे
बाबा अपकारींवर देखील उपकार करतात, तसे तुम्ही देखील फॉलो फादर करा, सुखदायी बना,
या देहाला विसरत जा”
प्रश्न:-
देही-अभिमानी
राहणाऱ्या मुलांची मुख्य लक्षणे कोणती असतील?
उत्तर:-
१) त्यांचे
आपसामध्ये खूप-खूप रुहानी प्रेम असेल. २) ते कधी एकमेकांच्या उणिवांचे वर्णन करणार
नाहीत. ३) ते अतिशय सुखदायी (सुख देणारे) असतील. ४) त्यांचा आनंद कधीही गायब होणार
नाही. ते सदैव असीम आनंदामध्ये राहतील. ५) ते कधीही मतभेदामध्ये येणार नाहीत. ६)
आपण आत्मे भाऊ-भाऊ आहोत, या स्मृतीमुळे ते गुणग्राही असतील. त्यांना सर्वांचे गुणच
दिसतील. ते स्वतः देखील गुणवान असतील आणि इतरांना देखील गुणवान बनवतील. ७) त्यांना
एका बाबांशिवाय इतर कोणाचीही आठवण येणार नाही.
ओम शांती।
तुम्ही सर्व
मुले उच्च ते उच्च बेहदच्या बाबांच्या सन्मुख बसला आहात. तुम्ही किती भाग्यशाली
आहात, ज्यांना असे बाबा मिळाले आहेत. तुम्ही ज्ञान-सागर बाबांकडे ज्ञान रत्नांनी
आपली झोळी भरण्यासाठी, कमाई करण्यासाठी आला आहात. बाबा तुम्हा गोड-गोड मुलांना किती
श्रेष्ठतेकडे घेऊन जातात. बाबा तर फक्त तुम्हा मुलांनाच पाहतात, त्यांना काही कोणाची
आठवण करायची नाहीये. यांच्या आत्म्याला (ब्रह्मा बाबांच्या आत्म्याला) तर बाबांची
आठवण करायची आहे. बाबा म्हणतात - ‘आम्ही दोघेही फक्त तुम्हा मुलांनाच पाहतो’.
ब्रह्माबाबा म्हणाले - ‘मज आत्म्याला काही साक्षी होऊन पाहायचे नाहीये, परंतु
बाबांसोबत मी देखील तसेच पाहतो. मी बाबांसोबत राहतो तर खरे ना! त्यांचा मुलगा आहे,
त्यामुळे त्यांच्या सोबत पाहतो. मी विश्वाचा मालक बनून फिरतो. जणूकाही मीच हे सर्व
करत आहे. मी दृष्टी देत आहे.’ देहा सहित सर्व काही विसरायचे असते. बाकी पिता आणि
मुलगा जणू एक होतात. तर बाबा समजावून सांगत आहेत - गोड मुलांनो, भरपूर पुरुषार्थ करा.
जसे बाबा अपकारींवर देखील उपकार करतात, तसे तुम्ही देखील फॉलो फादर करा, सुखदायी बना.
आपसामध्ये कधीही भांडण-तंटे करु नका. स्वतःला आत्मा समजून या देहाला विसरत जा. एका
बाबांशिवाय इतर कोणाचीही आठवण येऊ नये. ही देखील जणू जिवंतपणी मृतवत अशी अवस्था आहे.
जणूकाही या दुनियेमधून मृत झाला आहात. म्हणतात देखील - आप मुये मर गई दुनिया (तुम्ही
मेलात की तुमच्यासाठी दुनिया मेली). इथे तुम्हाला जिवंतपणी मरायचे आहे. शरीराचे भान
नाहीसे करत राहा. एकांतामध्ये बसून अभ्यास करत राहा. पहाटे एकांतामध्ये बसून स्वतःशी
गोष्टी करा. अतिशय उमंगाने बाबांची आठवण करा - ‘बाबा बस्स, आता मी तुमच्या कुशीत आलो
की आलो’. बस्स, एकाच्याच आठवणीमध्ये शरीराचा अंत व्हावा… यालाच म्हटले जाते एकांत.
बाबांची आठवण करता-करता ही शरीर रूपी कातडी सुटेल (देहाचा त्याग केला जाईल).
तुम्ही जाणता की, ही
जुनी दुनिया आणि जुना देह नष्ट होणार आहे. बाकी पुरुषार्थ करण्यासाठी संगमाचा हा
थोडासा वेळ मिळाला आहे. मुले विचारतात - बाबा, हे शिक्षण कधी पर्यंत चालेल? बाबा
म्हणतात - ‘जोपर्यंत दैवी राजधानीची स्थापना होत नाही, तोपर्यंत शिकवित राहणार,
नंतर मग नवीन दुनियेमध्ये ट्रान्सफर व्हाल’. हे जुने शरीर आहे, त्यामुळे काही ना
काही कर्मभोग सुद्धा सुरूच राहतो; यामध्ये बाबांनी मदत करावी, अशी अपेक्षा ठेवता
कामा नये. दिवाळे निघाले, आजारी पडला, तर बाबा म्हणतील - हा तुझ्या कर्मांचा हिशोब
आहे. होय, तरी देखील ‘योग’द्वारे आयुष्य वाढेल. स्वतः मेहनत करा, कृपेची याचना करू
नका. जितकी बाबांची आठवण कराल, यामध्येच कल्याण आहे; जितके शक्य होईल तितके योग
बलाचा उपयोग करा. भक्तिमार्गामध्ये गातात - ‘मुझे पलकों में छिपा लो…’ एखाद्या
प्रिय व्यक्ती किंवा वस्तूला ‘नूरे रत्न’, ‘प्राणप्रिय’ म्हणतात. हे बाबा तर अतिशय
प्रिय आहेत, परंतु गुप्त आहेत. त्यांच्याप्रती प्रेम तर असे असले पाहिजे की, काही
विचारूच नका. मुलांना तर बाबा आपल्या डोळ्यांच्या पापण्यांमध्येच लपवतात. पापण्या
म्हणजे काही हे डोळे नव्हेत, ही तर बुद्धीची गोष्ट आहे. मोस्ट बिलवेड निराकार बाबा
आम्हाला शिकवत आहेत. ते ज्ञानाचा सागर, सुखाचा सागर, प्रेमाचा सागर आहेत. अशा मोस्ट
बिलवेड बाबांवर किती प्रेम असले पाहिजे! मुलांची किती निष्काम सेवा करतात. तुम्हा
मुलांना हिऱ्या समान बनवतात. बाबा किती गोड आहेत. किती निरहंकारी बनून तुम्हा
मुलांची सेवा करतात, तर तुम्हा मुलांनी देखील तितक्याच प्रेमाने सेवा केली पाहिजे.
श्रीमतावर चालले पाहिजे. जर कुठे आपल्याच मर्जीने चालाल, तर आपलेच भाग्य गमावून
बसाल.
तुम्हा मुलांचे
आपसामध्ये खूप-खूप रुहानी प्रेम असले पाहिजे, परंतु देह-अभिमानामध्ये आल्यामुळे
एकमेकांमध्ये ते प्रेम राहत नाही. एकमेकांच्या उणिवाच काढत राहतात - ‘अमका असा आहे,
तो असे करतो…’ तुम्ही जेव्हा देही-अभिमानी होता, तेव्हा कोणाच्याही उणिवा काढत
नव्हता. आपसामध्ये खूप प्रेम होते, आता पुन्हा तीच अवस्था धारण करायची आहे. पूर्वी
तुम्ही किती गोड होता, पुन्हा तसेच गोड आणि सदैव सुखदायी (सुख देणारे) बना.
देह-अभिमानामध्ये आल्यामुळे दुःखदायी बनला आहात, त्यामुळे तुमचा रुहानी आनंद नाहीसा
झाला आहे. आयुष्य देखील कमी झाले आहे. आता बाबा पुन्हा तुम्हाला सतोप्रधान बनवून
सदैव सुखदायी बनविण्यासाठी आले आहेत. तुम्ही जितकी बाबांची आठवण करत राहाल, तितक्या
उणिवा नाहीशा होत जातील. मतभेद दूर होत जातील. हे पक्के लक्षात राहावे की, आपण
भाऊ-भाऊ आहोत. आत्मा भाऊ-भाऊ म्हणून पाहिल्याने सदैव गुणच दिसतील. सर्वांना गुणवान
बनविण्याचा प्रयत्न करा. अवगुण सोडून गुण धारण करा. कधीही कोणाची निंदा करू नका.
काहीजणांमध्ये अशा उणिवा आहेत, ज्या ते स्वतः देखील समजू शकत नाहीत, ते स्वतःला खूप
चांगले समजतात; परंतु उणीव असल्याकारणाने कुठे ना कुठे उलटे बोल मुखातून निघून
जातात. सतोप्रधान अवस्थेमध्ये अशा गोष्टी होत नाहीत. आपण आपल्याला पहा की, मी किती
गोड बनलो आहे? बाबांवर माझे किती प्रेम आहे? बाबांवर असे प्रेम असावे की, बाबांना
एकदम चिकटून राहाल. बाबा तुम्ही आम्हाला किती श्रेष्ठ आणि हुशार बनवता, स्वर्गाचा
मालक बनवता. अशी मनातल्या मनात बाबांची महिमा करून आनंदाने भावविभोर झाले पाहिजे.
रुहानी आनंदामध्ये राहिले पाहिजे. गातात देखील - ‘खुशी जैसी खुराक नहीं’. बाबा
भेटल्याचा देखील किती आनंद झाला पाहिजे! संगमावरच तुम्हा मुलांना २१ जन्म सदैव
खुशीमध्ये राहण्याचा खुराक मिळतो; त्यानंतर कोणालाही कोणत्याही गोष्टीची चिंता राहत
नाही. आता किती चिंता आहेत, म्हणून त्यांचा परिणाम शरीरावर देखील होतो. तुम्हाला तर
कोणत्याही गोष्टीची चिंता नाही. हा खुशीचा खुराक तुम्ही एकमेकांना खाऊ घालत राहा.
एकमेकांचे असे जबरदस्त आदरातिथ्य करायचे आहे. असे आदरातिथ्य मनुष्य, मनुष्याचे करू
शकत नाही. तुम्ही बाबांच्या श्रीमतावर हे आदरातिथ्य करता. खुश खैराफत (कुशल समाचार)
देखील हाच आहे की, कोणालाही बाबांचा परिचय देणे. हा ज्ञान आणि योगाचा फर्स्टक्लास
वंडरफुल खुराक आहे. हा खुराक केवळ एकाच रुहानी सर्जन कडून मिळतो. ‘मनमनाभव’,
‘मध्याजी भव’ - बस्स, या दोन महावाक्यांचा हा खुराक आहे. मोस्ट बिलवेड बाबांकडून
विश्वाची बादशाही मिळते, ही काही साधी गोष्ट थोडीच आहे! ही दोन महावाक्येच प्रसिद्ध
आहेत. या दोन महावाक्यांद्वारेच तुम्ही एव्हर हेल्दी, एव्हर वेल्दी बनता. तर तुम्हा
मुलांनी या गोष्टींचे चिंतन करून हर्षित राहिले पाहिजे. ‘गॉडली स्टुडंट लाइफ इज द
बेस्ट’ - हे गायन देखील आताचे आहे. जितके शक्य होईल तितका हा रुहानी खुराक एकमेकां
पर्यंत पोहोचवा, एकमेकांची उन्नती करा, आपला वेळ वाया घालवू नका. अत्यंत संयमाने,
गंभीरतेने आणि समजून-उमजून बाबांची आठवण करा, आपले जीवन हिऱ्या समान बनवा.
गोड मुलांनो,
बाबांकडून जे श्रीमत मिळते, त्यामध्ये निष्काळजीपणा करता कामा नये. बाबांचा संदेश
सर्वांपर्यंत पोहोचवायचा आहे. बाबांचा संदेश सर्वांना मिळणार तर आहे ना. संदेश
अतिशय सोपा आहे - फक्त एवढेच सांगा - ‘स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा आणि
कर्मेंद्रियां द्वारे मन्सा-वाचा-कर्मणा कोणतेही वाईट कर्म करू नका’. एक दिवस
तुमच्या या सायलेन्सच्या शक्तीचा आवाज पसरेल. दिवसेंदिवस तुमची उन्नती होत जाईल.
तुमचे नाव प्रसिद्ध होत जाईल. सर्वजण समजतील की, ही चांगली संस्था आहे, चांगले
कार्य करत आहे आणि मार्ग देखील अतिशय सोपा सांगत आहे. हे ब्राह्मणांचे झाड खूप वाढत
जाईल, प्रजा बनत राहील. सेंटर्स खूप वृद्धीला प्राप्त होतील. तुमची प्रदर्शनी देखील
गावोगाव होईल. तुम्हा मुलांना खूप मोठी सेवा करायची आहे. तुमची नवीन-नवीन सेंटर्स
उघडत जातील, जिथे अनेक मनुष्य येऊन आपले जीवन हिऱ्या समान बनवत राहतील. तुम्हाला
खूप प्रेमाने एकेकाची काळजी घ्यायची आहे. जेणेकरून एखाद्या बिचाऱ्याचा पाय घसरू नये.
जितकी जास्त सेंटर्स असतील, तितके जास्त लोक येऊन जीवनदान प्राप्त करतील. जेव्हा
तुम्हा मुलांचा प्रभाव दिसून येईल, तेव्हा तुम्हाला अनेक लोक बोलावतील की, इथे येऊन
आम्हाला मनुष्यापासून देवता बनवण्याचा राजयोग शिकवा. पुढे जाऊन खूप गाजावाजा होईल
की, तेच भगवान येऊन आबू मध्ये पोहोचले आहेत.
तुम्ही मुले पाहत
आहात की, या वेळी जुन्या दुनियेमध्ये इंटरनॅशनल स्तरावर अनेक संघर्ष चालू आहेत. आता
हे सर्व संघर्ष नष्ट होणार आहेत, त्याची तुम्हाला कोणतीही चिंता करायची नाहीये.
तुम्ही सर्वांना सांगा की, याची पर्वा करू नका, आता ही जुनी दुनिया गेली की गेली,
अशा जुन्या दुनियेचा मोह ठेवायचा नाही, जर मोह असेल, हृदय शुद्ध नसेल, तर अपार आनंद
देखील राहणार नाही. मुलांना अथाह ज्ञान धनाचा खजिना मिळत राहतो, तर अपार आनंद झाला
पाहिजे. जितके हृदय शुद्ध असेल, तितके इतरांना देखील शुद्ध बनवाल. ‘योग’च्या स्थिती
द्वारेच हृदय शुद्ध बनते. तुम्हा मुलांना योगी बनण्याची आणि इतरांना योगी बनविण्याची
देखील आवड असली पाहिजे. जर देहामध्ये मोह असेल, देह-अभिमान असेल, तर समजा आपली
अवस्था खूप कच्ची आहे. देही-अभिमानी मुलेच खरे हिरे बनतात, म्हणून जितके शक्य होईल
तितका देही-अभिमानी बनण्याचा अभ्यास करा. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) बाबांसारखे
निरहंकारी बनून अतिशय प्रेमाने सर्वांची सेवा करायची आहे. श्रीमतावर चालायचे आहे.
आपल्याच मतावर चालून भाग्याला गमावायचे नाही.
२) संगमावर बाबांकडून
जो आनंदाचा खुराक मिळाला आहे, तोच खुराक स्वतःदेखील खा आणि इतरांनाही खाऊ घालत रहा.
आपला वेळ वाया घालवायचा नाही. अतिशय संयमाने, गंभीरतेने आणि समजून-उमजून बाबांची
आठवण करून आपले जीवन हिऱ्या समान बनवायचे आहे.
वरदान:-
आसक्तीला
अनासक्ती मध्ये परिवर्तित करणारे शक्ति स्वरूप भव
शक्ति स्वरूप
बनण्यासाठी आसक्तीला अनासक्ती मध्ये परिवर्तित करा. आपल्या देहामध्ये, नात्यांमध्ये
अथवा कोणत्याही वस्तू मध्ये जर कुठेही आसक्ती असेल, तर माया देखील येऊ शकते आणि मग
तुम्ही शक्ति रूप बनू शकणार नाही; त्यामुळे पहिले तुम्ही अनासक्त बना, तेव्हाच
मायेच्या विघ्नांशी सामना करू शकाल. विघ्न आल्यानंतर ओरडण्या ऐवजी अथवा घाबरण्या
ऐवजी शक्ति रूप धारण करा, तेव्हाच तुम्ही विघ्न विनाशक बनाल.
बोधवाक्य:-
दया
निःस्वार्थ आणि मोह-मुक्त असावी - स्वार्थाने भरलेली नसावी.
मातेश्वरीजींची अनमोल
महावाक्ये:-
“जीवनातील आशा पूर्ण होण्याचा सुंदर काळ”
आपल्या सर्व
आत्म्यांची खूप काळापासून ही आशा होती की, जीवनामध्ये सदैव सुख-शांती मिळावी. आता
अनेक जन्मांची ही आशा कधीतरी पूर्ण होणारच की! आता हा आपला अंतिम जन्म आहे, त्या
अंतिम जन्माचा देखील अंतिम समय आहे. असे कोणीही समजू नये की, मी तर अजून लहान आहे.
लहान असो अथवा मोठा, सुख तर सर्वांनाच पाहिजे ना. परंतु दुःख कशामुळे मिळते, त्याचे
देखील अगोदर ज्ञान पाहिजे. आता तुम्हाला नॉलेज मिळाले आहे की, या ५ विकारांमध्ये
अडकल्यामुळे हे जे कर्मबंधन तयार झाले आहे, त्याला परमात्म्याच्या आठवण रूपी अग्नी
द्वारे भस्म करायचे आहे, हा आहे कर्मबंधनातून मुक्त होण्याचा सोपा उपाय. या
सर्वशक्तिमान बाबांची चालता-फिरता, श्वासोश्वास आठवण करा. आता हा उपाय सांगण्याची
मदत स्वतः परमात्मा येऊन करत आहेत, परंतु यामध्ये पुरुषार्थ तर प्रत्येक आत्म्याला
आपला आपल्यालाच करायचा आहे. परमात्मा तर पिता, टीचर आणि गुरूच्या रूपा मध्ये येऊन
आम्हाला वारसा देत आहेत. तर पहिले त्या बाबांचे बनायचे आहे, नंतर शिक्षका कडून
शिकायचे आहे, ज्या शिक्षणा द्वारे भविष्य जन्म-जन्मांतर सुखाचे प्रारब्ध बनेल
अर्थात जीवनमुक्तीच्या पदामध्ये पुरुषार्था अनुसार पद मिळते. आणि गुरूच्या रूपामध्ये
पवित्र बनवून मुक्ती देतात. तर या रहस्याला समजून घेऊन असा पुरुषार्थ करायचा आहे.
हीच वेळ
जुना हिशोब नष्ट करून नवीन जीवन बनविण्याची आहे, याच वेळी जितका पुरुषार्थ करून
आपल्या आत्म्याला पवित्र बनवाल, तितकेच शुद्ध रेकॉर्ड भरेल आणि मग ते संपूर्ण कल्प
चालेल. तर संपूर्ण कल्पाचा आधार या वेळच्या कमाईवर आहे. पहा, या वेळीच तुम्हाला
आदि-मध्य-अंताचे ज्ञान मिळत आहे, आपल्याला सो देवता बनायचे आहे आणि आपली चढती कला
आहे; मग तिथे जाऊन प्रारब्ध भोगाल. तिथे देवतांना पुढे काय होणार हे माहीत नसते की,
आपण घसरणार आहोत (आपले पतन होणार आहे). जर हे माहीत असते की, सुख भोगल्यानंतर खाली
घसरायचेच आहे, तर खाली घसरण्याच्या चिंतेमुळे सुख देखील उपभोगू शकणार नाहीत. म्हणून
हा ईश्वरीय नियम रचलेला आहे की, मनुष्य सदैव चढण्याचा पुरुषार्थ करतो, अर्थात
सुखाकरिता कमाई करतो. परंतु ड्रामामध्ये अर्धा-अर्धा पार्ट पूर्व-नियोजित आहे, ज्या
रहस्याला आम्हीच जाणतो. परंतु जेव्हा सुखाची वेळ आहे, तेव्हा पुरुषार्थ करून सुख
प्राप्त करायचे आहे, हीच पुरुषार्थाची विशेषता आहे. ॲक्टरचे काम आहे - ॲक्ट करताना
पूर्ण नेटाने पार्ट बजावणे, जेणेकरून पाहणारे ‘वाह-वाह’ करतील. म्हणूनच
हिरो-हिरोईनचा पार्ट देवतांना मिळाला आहे, ज्यांचे यादगार चित्र गायले जाते आणि
पूजले जाते. निर्विकारी प्रवृत्ती मध्ये राहून कमलपुष्प समान अवस्था बनविणे, हीच
देवतांची विशेषता आहे. या विशेषतेला विसरल्या मुळेच भारताची अशी दुर्दशा झाली आहे.
आता पुन्हा असे जीवन बनविणारे स्वयं परमात्मा आलेले आहेत. आता त्यांचा हात धरल्याने
जीवनरूपी नौका पार होईल. अच्छा. ओम् शांती.
हे अव्यक्त इशारे -
अपवित्रतेच्या बीजाला सुद्धा नष्ट करून संपूर्ण स्वच्छ (पवित्र) बना.
‘मी संगमयुगी
ब्राह्मण आहे’, हा व्यर्थ संकल्प, अपवित्रतेचे संस्कार, शूद्राचे संस्कार आणि
स्वरूप आहेत. असा अनुभव व्हावा की, हे अपवित्रतेचे आणि विस्मृतीचे संस्कार, जे माझे
अर्थात ब्राह्मणाचे नाहीत, परंतु शूद्रपणाचे आहेत. त्यांना आपले समजता, म्हणून
तुम्ही मायेच्या वश होऊन हैराण होता.