10-11-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड
मुलांनो - तन-मन-धन अथवा मनसा-वाचा-कर्मणा अशी सेवा करा जेणेकरून बाबांकडून २१
जन्मां करिता एवजा (फळ) मिळेल, परंतु सेवेमध्ये कधीही आपसामध्ये अनबनी (मतभेद) होता
कामा नयेत”
प्रश्न:-
ड्रामा अनुसार
बाबा जी सेवा सांगत आहेत त्यामध्ये अजून जास्त तीव्रता आणण्याची विधी कोणती आहे?
उत्तर:-
आपसामध्ये एकमत असावे, कधीही कोणत्याही प्रकारची खिट-खिट नसावी (वितंडवाद नसावेत)
जर वितंडवाद असतील तर सेवा कशी कराल म्हणून आपसात मिळून संघटन बनवून सल्लामसलत करा,
एकमेकांचे मदतगार बना. बाबा तर मदतगार आहेतच परंतु “हिम्मते बच्चे मददे बाप…’ याच्या
अर्थाला यथार्थ समजून या महान कार्यामध्ये मदतगार बना.
ओम शांती।
गोड -गोड मुले इथे रुहानी बाबांकडे येतात रिफ्रेश होण्याकरिता. जेव्हा रिफ्रेश होऊन
परत जाता तर जाऊन काहीतरी जरुर करून दाखवायचे आहे. प्रत्येक मुलाने सेवेचा पुरावा
द्यायचा आहे. जसे काही-काही मुले म्हणतात - आमची सेंटर उघडण्याची इच्छा आहे.
खेड्यांमध्ये देखील सेवा करतात ना. तर मुलांना नेहमी हाच विचार राहिला पाहिजे की,
आपण मनसा-वाचा-कर्मणा, तन-मन-धनाने अशी सेवा करावी जेणेकरून बाबांकडून भविष्य २१
जन्मांचा एवजा (फळ) मिळेल. हीच चिंता आहे. आपण काही सेवा करतो का? कोणाला ज्ञान देतो
का? सारा दिवस हेच विचार आले पाहिजेत. भले सेंटर उघडतात परंतु घरामध्ये पती-पत्नीची
वादावादी होता कामा नये. कोणताही संघर्ष होता कामा नये. संन्यासी लोक घरातील
संघर्षातून सुटका करून बाहेर पडतात. डोन्ट केअर करून निघून जातात. मग गव्हर्मेंट
त्यांना थांबवते का? ते तर फक्त पुरुषच घर सोडून निघून जातात. आता काही-काही माता
देखील अशा जातात, ज्यांचा कोणी धणी-धोणी (मालक) नसतो किंवा वैराग्य येते, त्यांना
देखील ते संन्याशी पुरुष बसून शिकवतात. त्यांच्याद्वारे आपला धंदा करतात. पैसे
इत्यादी सर्व त्यांच्याकडे असते. वास्तविक घरदार सोडले तर मग पैसे ठेवण्याची गरज
राहत नाही. तर आता बाबा तुम्हा मुलांना समजावून सांगत आहेत. प्रत्येकाच्या
बुद्धीमध्ये आले पाहिजे की, आपल्याला बाबांचा परिचय द्यायचा आहे. मनुष्य तर काहीच
जाणत नाहीत, बेसमज (अज्ञानी) आहेत. तुम्हा मुलांकरिता बाबांचा आदेश आहे - ‘गोड-गोड
मुलांनो, तुम्ही स्वतःला आत्मा समजा, फक्त पंडित बनू नका’. आपले देखील कल्याण करायचे
आहे. आठवणीनेच सतोप्रधान बनायचे आहे. खूप पुरुषार्थ करायचा आहे. नाही तर खूप
पश्चाताप करावा लागेल. मुले म्हणतात - बाबा आम्ही घडोघडी विसरून जातो. संकल्प येतात.
बाबा म्हणतात - ते तर येणारच. तुम्हाला बाबांच्या आठवणीमध्ये राहून सतोप्रधान बनायचे
आहे. आत्मा जी अपवित्र आहे, तीला परमपिता परमात्म्याची आठवण करून पवित्र बनायचे आहे.
बाबाच मुलांना डायरेक्शन देतात - ‘माझ्या आज्ञाधारक मुलांनो, तुम्हाला आदेश देतो,
माझी आठवण करा तर तुमची पापे नष्ट होतील’. सर्वप्रथम हीच एक गोष्ट सांगा की,
निराकार शिवबाबा म्हणतात माझी आठवण करा - मी पतित-पावन आहे. माझ्या आठवणीनेच विकर्म
विनाश होतील दुसरा कोणताही उपाय नाही आणि ना कोणी सांगू शकणार. असंख्य संन्यासी
इत्यादी आहेत, निमंत्रण देतात की, योग कॉन्फरन्समध्ये येऊन सहभागी व्हा. आता
त्यांच्या हठयोगाने कोणाचे कल्याण तर होणार नाहीये. अनेक योग-आश्रम आहेत ज्यांना या
राजयोगा विषयी अजिबात ठाऊकच नाही आहे. बाबांनाच जाणत नाहीत. बेहदचे बाबाच येऊन
खरा-खरा योग शिकवतात. बाबा तुम्हा मुलांना आप समान बनवतात. जसा मी निराकार आहे.
टेम्पररी या शरीरामध्ये आलो आहे. भाग्यशाली रथ तर जरूर मनुष्याचाच असेल. बैलाचा तर
म्हणता येणार नाही. बाकी घोडागाडी इत्यादीचा तर प्रश्नच नाही आणि ना युद्धाची गोष्ट
आहे. तुम्ही जाणता आपल्याला मायेशी युद्ध करायचे आहे. गायले देखील जाते - माया ते
हारे हार…’ तुम्ही खूप चांगल्या रीतीने समजावून सांगू शकता - परंतु आता शिकत आहात.
काहीजण शिकता-शिकता देखील एकदम जमिनीवर कोसळतात (पतन होते). काहीतरी भांडण होते.
दोन बहिणींचे देखील आपसामध्ये पटत नाही, लुन-पाणी (खारे-पाणी) होतात. तुमचे
आपसामध्ये कोणतेही भांडण होता कामा नये. भांडणे होतील तर बाबा म्हणतील हे काय सेवा
करणार. खूप चांगले असणाऱ्यांची देखील अशी हालत होते. आता माळा बनवली गेली तर
म्हणणार डिफेक्टेड माळा आहे. यांच्यामध्ये अजून हे-हे अवगुण आहेत. ड्रामा प्लॅन
अनुसार बाबा सेवा देखील करवून घेत राहतात. डायरेक्शन देत राहतात. दिल्लीमध्ये
चोहोबाजूंनी सेवेचा घेराव टाका. हे फक्त एकट्याला थोडेच करायचे आहे, आपसामध्ये
एकत्र येऊन सल्लामसलत करायची आहे. सर्वांचे मत एक झाले पाहिजे. बाबा एक आहेत परंतु
मदतगार मुलांशिवाय काम थोडेच करतील. तुम्ही सेंटर उघडता, बाबांचे मत घेता. बाबा
विचारतात मदत करणारे आहात? म्हणतात - होय बाबा, जर मदत देणारे नसतील तर काहीही करू
शकणार नाही. घरी देखील मित्र-संबंधी इत्यादी येतात ना. भले शिव्या देवो, ते तुम्हाला
त्रास देत राहतील. तुम्ही त्याची चिंता करू नका.
तुम्हा मुलांना
आपसामध्ये बसून सल्लामसलत करायची आहे. जसे सेंटर उघडतात तेव्हा देखील सर्व मिळून
लिहितात - ‘बाबा आम्ही ब्राह्मणीच्या सल्ल्याने हे काम करत आहोत’. सिंधी भाषेमध्ये
म्हणतात - ब त १२ (एका सोबत २ जोडल्याने १२ होतात) बाराजण असतील तर अजूनच चांगले मत
समोर येईल. काही ठिकाणी एकमेकांचे मत घेत नाहीत. आता असे कोणते काम होऊ शकते का?
बाबा म्हणतील जोपर्यंत तुमचे आपसात संघटनच नसेल तर तुम्ही इतके मोठे कार्य कसे करू
शकणार. छोटे दुकान, मोठे दुकान देखील असते ना. आपसामध्ये एकत्र येऊन गट तयार करतात.
असे कोणी म्हणत नाहीत की, बाबा तुम्ही मदत करा. पहिले तर मदतगार बनवले पाहिजेत. मग
बाबा म्हणतात - ‘हिम्मते बच्चे मददे बाप’. पहिले तर आपले मदतगार बनवा. बाबा आम्ही
एवढे करतो बाकीची मदत तुम्ही करा. असे नाही, अगोदर तुम्ही मदत करा. ‘हिम्मते मर्दा…’
याचा देखील अर्थ समजत नाहीत. पहिले तर मुलांची हिंमत पाहिजे. कोण-कोण काय मदत करतात?
सर्व पोतामेल लिहीतील - अमके-अमके ही मदत करतात. कायदेशीर लिहून देतील. बाकी असे
थोडेच एक-एकजण म्हणेल की, आम्ही सेंटर उघडतो मत द्या. असे तर बाबा उघडू शकत नाही
काय? परंतु असे तर होऊ शकत नाही? कमिटीला आपसामध्ये भेटावे लागते. तुमच्यामध्ये
देखील नंबरवार आहेत ना. कोणाला तर अजिबात काहीच समजत नाही. कोणी खूप हर्षित होत
राहतात. बाबांना तर वाटते या ज्ञानामध्ये खूप आनंद झाला पाहिजे. एकच पिता, टीचर,
गुरु मिळतात तर किती आनंद झाला पाहिजे ना. या गोष्टी दुनियेमध्ये कोणीही जाणत नाहीत.
शिवबाबाच ज्ञानाचे सागर, पतित-पावन, सर्वांचे सद्गती दाता आहेत. सर्वांचे पिता
देखील ते एकच आहेत. हे बाकी कोणाच्याही बुद्धीमध्ये नाहीये. आता तुम्ही मुले जाणता
तेच नॉलेजफुल, लिबरेटर, गाईड आहेत. तर बाबांच्या मतावर चालावे लागेल. आपसामध्ये
मिळून सल्लामसलत करायची आहे. खर्च करायचा आहे. एकाच्याच मतावर तर चालू शकत नाही.
सर्व मदतगार पाहिजेत. ही देखील बुद्धी हवी ना. तुम्हा मुलांना घरोघरी मेसेज द्यायचा
आहे. मुले विचारतात - ‘लग्नाचे निमंत्रण मिळाले आहे, जाऊ का?’ बाबा म्हणतात - का
नाही, जा, जाऊन आपली सेवा करा. अनेकांचे कल्याण करा. भाषण देखील करू शकता. मृत्यू
समोर उभा आहे, बाबा म्हणतात - मामेकम् (मज एकाची) आठवण करा. इथे सर्व पाप-आत्मे
आहेत. पित्यालाच शिव्या देत राहतात. बाबांपासून तुम्हाला बेमुख करतात. गायन देखील
आहे विनाश काले विपरीत-बुद्धी. कोणी म्हटले? बाबांनी स्वतः म्हटले आहे - माझ्याशी
प्रीत-बुद्धी नाही आहे. विनाशकाले विपरीत-बुद्धी आहे. मला जाणतच नाहीत. ज्यांची
प्रीत-बुद्धी आहे, जे माझी आठवण करतात, तेच विजय प्राप्त करतात. भले प्रीत आहे परंतु
आठवण करत नाहीत तरी देखील कमी पद प्राप्त करतील. बाबा मुलांना डायरेक्शन देतात.
मुख्य गोष्ट सर्वांना मेसेज द्यायचा आहे. बाबांची आठवण करा तर पावन बनून, पावन
दुनियेचे मालक बना. ड्रामा अनुसार बाबांना वृद्ध शरीराचा आधार घ्यावा लागतो.
वानप्रस्थ अवस्थेमध्ये प्रवेश करतात. मनुष्य वानप्रस्थ अवस्थेमध्येच भगवंताला
भेटण्याची मेहनत करतात. भक्तीमध्ये तर समजतात - जप-तप इत्यादी करणे हे सर्व भगवंताला
भेटण्याचे रस्ते आहेत. केव्हा भेटेल ते काहीच माहित नाही. जन्म-जन्मांतर भक्ती करत
आले आहेत. भगवान तर काही कोणाला भेटतच नाही. हे समजत नाहीत की बाबा येतीलच तेव्हा,
जेव्हा जुन्या दुनियेला नवीन बनवायचे असेल. रचयिता बाबाच आहेत, चित्र तर आहेत परंतु
त्रिमूर्तीमध्ये ‘शिव’ला दाखवत नाहीत. शिवबाबाशिवाय ब्रह्मा-विष्णू-शंकर दाखवतात,
जसा काही गळा कापलेला आहे. बाबांशिवाय निधनके (बिना धनीचे) बनतात. बाबा म्हणतात -
मी येऊन तुम्हाला धनका (धनीचे) बनवतो. २१ जन्म तुम्ही धनके (धनीचे) बनता. कसलाही
त्रास राहत नाही. तुम्ही देखील म्हणाल - जोपर्यंत बाबा भेटत नाहीत, तोपर्यंत आम्ही
देखील बिलकुल निधनके तुच्छ-बुद्धी होतो. ‘पतित-पावन’ असे म्हणतात - परंतु ते केव्हा
येणार, हे जाणत नाहीत. पावन दुनिया आहेच नवीन दुनिया. बाबा किती सोपे करून सांगतात.
तुमच्या देखील लक्षात येते, आपण बाबांचे बनलो आहोत, तर स्वर्गाचे मालक जरूर बनणार.
शिवबाबा आहेत बेहदचे मालक. बाबांनीच येऊन सुख-शांतीचा वारसा दिला होता. सतयुगामध्ये
सुख होते - बाकी सर्व आत्मे शांतीधाम मध्ये होते. आता या गोष्टींना तुम्ही समजता.
शिवबाबा कशासाठी आले असतील? जरूर नवीन दुनिया रचण्याकरिता. पतितांना पावन
बनविण्याकरिता आले असतील. श्रेष्ठ कार्य केले असेल, मनुष्य अगदीच घोर अंधारामध्ये
आहेत. बाबा म्हणतात - हे देखील ड्रामामध्ये नोंदलेले आहे. तुम्हाला मुलांना बाबा
जागे करतात. तुम्हाला आता संपूर्ण ड्रामा ठाऊक आहे - कशी नवीन दुनिया मग जुनी होते.
बाबा म्हणतात बाकी सर्व काही सोडून एका बाबांची आठवण करा. आम्हाला कोणाचा तिरस्कार
वाटत नाही. हे सांगावे लागते. ड्रामा अनुसार मायेचे राज्य देखील होणार आहे. आता
पुन्हा बाबा म्हणतात - ‘गोड-गोड मुलांनो, आता हे चक्र पूर्ण होत आहे. आता तुम्हाला
ईश्वरीय मत मिळत आहे, त्यावर चालायचे आहे. आता ५ विकारांच्या मतावर चालायचे नाही.
अर्धे कल्प तुम्ही मायेच्या मतावर चालून तमोप्रधान बनला आहात. आता मी तुम्हाला
सतोप्रधान बनविण्याकरिता आलो आहे. सतोप्रधान, तमोप्रधान असा हा खेळ आहे. निंदा
करण्याचा काही प्रश्नच नाही. म्हणतात - भगवंताने हे अवागमनाचे नाटक रचलेच कशासाठी?
कशासाठी हा प्रश्नच उद्भवत नाही. हे तर ड्रामाचे चक्र आहे, जे पुन्हा रिपीट होत
राहते. ड्रामा अनादि आहे. आता आहे कलियुग, सतयुग पास्ट झाले (होऊन गेले) आहे. आता
पुन्हा बाबा आले आहेत. ‘बाबा-बाबा’ म्हणत रहा तर कल्याण होत राहील. बाबा म्हणतात -
या अतिशय गूढ आणि मनोरंजक गोष्टी आहेत. म्हटले जाते वाघिणीच्या दुधासाठी सोन्याचे
भांडे पाहिजे. सोन्याची बुद्धी कशी बनेल? आत्म्यामध्येच बुद्धी आहे ना. आत्मा म्हणते
- माझी बुद्धी आता बाबांकडे आहे. मी बाबांची खूप आठवण करतो. बसल्या-बसल्या बुद्धी
इतर ठिकाणी भटकते ना. बुद्धीमध्ये काम-धंदा आठवत राहील. तुमचे म्हणणे ऐकणार नाहीत.
मेहनत आहे. जितका-जितका मृत्यू जवळ येत जाईल - तुम्ही खूप आठवणीमध्ये रहाल. मृत्यू
जवळ आला की सगळे सांगतात - आता भगवंताची आठवण कर. आता बाबा स्वतः म्हणतात - माझी
आठवण करा. तुम्हा सर्वांची वानप्रस्थ अवस्था आहे. माघारी जायचे आहे म्हणून आता माझी
आठवण करा. दुसरी कोणतीही गोष्ट ऐकू नका. जन्म-जन्मांतरीचे ओझे तुमच्या डोक्यावर आहे.
शिवबाबा म्हणतात - यावेळी सर्व अजामील आहेत. मुख्य गोष्ट आहे आठवणीची यात्रा
ज्याद्वारे तुम्ही पावन बनाल आणि आपसामध्ये प्रेम देखील असायला हवे. एकमेकांचे मत
घेतले पाहिजे. बाबा प्रेमाचे सागर आहेत ना. तर तुम्ही देखील एकमेकांशी प्रेमाने
वागले पाहिजे. देही-अभिमानी बनून बाबांची आठवण करायची आहे. बहिण-भावाचे नाते देखील
विसरावे लागते. भावा-बहिणीशी देखील योग ठेवू नका. एका बाबांसोबतच योग ठेवा. बाबा
आत्म्यांना म्हणतात - ‘माझी आठवण करा तर तुमची विकारी दृष्टी नष्ट होईल’.
कर्मेंद्रियांद्वारे कोणतेही विकर्म करता कामा नये. मनसामध्ये वादळे जरूर येतील. हे
खूप मोठे ध्येय आहे. बाबा म्हणतात - ‘पहा, कर्मेंद्रिये धोका देत असतील तर सावध व्हा’.
जर उलट काम केलेत तर खलास. ‘चढे तो चाखे वैकुण्ठ का मालिक…’ मेहनत केल्याशिवाय
थोडेच काही होते. खूप मेहनत आहे. ‘देहा सहित देहाचे…’ काहींना तर काहीच बंधन नसते
तरी देखील अडकून राहतात. बाबांच्या श्रीमतावर चालत नाहीत. लाख दोन लाख आहेत, भले
मोठे कुटुंब आहे तरी देखील बाबा म्हणतील जास्त धंदा इत्यादी मध्ये अडकू नका.
वानप्रस्थी बना. खर्च इत्यादी कमी करा. गरीब लोक किती साधेपणाने राहतात. आता
काय-काय वस्तू निघाल्या आहेत, काही विचारू नका. श्रीमंताचा खर्चच खर्च चालू असतो.
नाही तर पोटाला काय पाहिजे? एक पाव किलो पीठ. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) एकमेकांशी
खूप प्रेमाने वागायचे आहे परंतु भावा-बहिणीशी योग ठेवायचा नाही. कर्मेंद्रियांद्वारे
कोणतेही विकर्म करायचे नाही.
२) एका ईश्वरीय मतावर
चालून सतोप्रधान बनायचे आहे. मायेचे मत सोडून द्यायचे आहे. आपसामध्ये संघटन मजबूत
करायचे आहे, एकमेकांचे मदतगार बनायचे आहे.
वरदान:-
लक्ष्य अनुसार
लक्षण याचा बॅलन्स ठेवण्याच्या कलेद्वारे चढत्या कलेचा अनुभव करणारे बाप समान
संपन्न भव
मुलांमध्ये विश्व
कल्याणाची कामना देखील आहे तर बाप समान बनवण्याची श्रेष्ठ इच्छा देखील आहे; परंतु
लक्ष्य अनुसार जी लक्षणे स्वतःला किंवा इतरांना दिसतात त्यामध्ये अंतर आहे म्हणून
बॅलन्स ठेवण्याची कला आता चढत्या कलेमध्ये धारण करून या अंतराला संपवा. संकल्प आहे,
परंतु दृढता संपन्न संकल्प असावा तेव्हा बाप समान संपन्न बनवण्याचे वरदान प्राप्त
होईल. आता जी स्वदर्शन आणि परदर्शन दोन्ही चक्रे फिरतात, व्यर्थ गोष्टींचे जे
त्रिकालदर्शी बनता - यामध्ये परिवर्तन करून स्वचिंतन स्वदर्शन चक्रधारी बना.
बोधवाक्य:-
आपल्या
हर्षितमुख चेहऱ्याद्वारे सर्व प्राप्तींची अनुभूती करविणे हीच खरी सेवा आहे.
अव्यक्त इशारे:-
अशरीरी आणि विदेही स्थितीचा अभ्यास वाढवा. अभ्यास करा - देह आणि देहाच्या देशाला
विसरून अशरीरी परमधाम निवासी बना, नंतर परमधाम निवासी पासून अव्यक्त स्थितीमध्ये
स्थित व्हा, नंतर मग सेवेसाठी आवाजामध्ये या, सेवा करत असताना देखील आपल्या
स्वरूपाच्या स्मृतीमध्ये रहा, आपल्या बुद्धीला जिथे पाहिजे तिथे एका सेकंदा पेक्षाही
कमी वेळेमध्ये टिकवा, तेव्हाच पास विद् ऑनर बनाल.