11-06-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड मुलांनो - पूर्ण
वारसा घेण्याकरिता एका बाबांवरच प्रेम करा, तुमचे प्रेम कोणत्याही देहधारीवर असता
कामा नये”
प्रश्न:-
जे आपल्या दैवी
संप्रदायाचे असतील त्यांच्या नजरे समोर कोणते शब्द फिरत राहतील?
उत्तर:-
जेव्हा तुम्ही
त्यांना सांगाल की, ‘बाबांची आठवण केल्याने विकर्म विनाश होतात आणि देवी-देवता
धर्माची स्थापना होते’; तर हे शब्द त्यांच्या नजरे समोर फिरत राहतील. त्यांच्या
बुद्धीमध्ये येईल की, आपल्याला देवता बनायचे आहे त्यामुळे आपले खाणे-पिणे शुद्ध
असायला हवे.
गीत:-
भोलेनाथ से
निराला…
ओम शांती।
भोलेनाथची मुले
ऐकत आहेत. कोणा द्वारे? भोलेनाथ द्वारे. भोलेनाथ ‘शिव’नाच म्हटले जाते. त्यांचे
नावच ‘शिव’ आहे. भोलेनाथची मुले अर्थात शिवाची मुले. आत्मे ऐकत आहेत या कानांद्वारे.
आता तुम्ही मुले आत्म-अभिमानी बनले आहात. मुले टेपरेकॉर्डर वरूनही मुरली ऐकतात तर
समजतात शिवबाबा आम्हाला आपला परिचय देत आहेत की, मी सर्व आत्म्यांचा पिता आहे.
ज्यांना तुम्ही परमपिता परम-आत्मा अर्थात परमात्मा म्हणता. त्यांना नेहमी फादरच
म्हटले जाते. हे कोण म्हणते की ते फादर आहेत? आत्मा. आत्म्याला आता ज्ञान मिळाले आहे,
इतर कोणत्याही मनुष्य मात्राला हे ज्ञान नाही आहे. मज आत्म्याला दोन पिता आहेत. एक
साकार, एक आहेत निराकार. ते परमपिता आहेत, हे स्पष्टीकरण दुसरे कोणीही देऊ शकत नाही.
बाबांव्यतिरिक्त इतर कोणीही असे विचारू शकत नाही. बाबाच विचारतात - तुम्ही हे जे
म्हणता, ‘परमपिता परमात्मा’, ‘गॉड फादर’, ते तुम्ही कोणाला उद्देशून म्हणता? लौकिक
पित्याला की पारलौकिक पित्याला? लौकिक पित्याला ‘गॉड फादर’ म्हणता येईल का? हिंदी
मध्ये शब्द देखील आहे - ‘परमपिता’. ते तर एकच निराकार आहेत. ईश्वर, प्रभू अथवा
भगवान म्हटल्याने काही पिता असल्याचे सिद्ध होत नाही. गॉड फादर शब्द चांगला आहे.
आत्म्याने म्हटले ते आमचे गॉड फादर आहेत. लौकिक फादर तर केवळ शरीराचे पिता आहेत.
तुम्हा सर्वांना विचारले जाते की, ‘तुम्हाला किती पिता आहेत?’ एक आहे लौकिक, दुसरा
आहे पारलौकिक. दोघांमध्ये मोठा कोण? जरूर म्हणतील - पारलौकिक फादर. त्यांची महिमा
आहे - सर्व पतितांना पावन बनविणारा पारलौकिक पिता. हे देखील आता तुम्हाला समजते आहे.
दुनियेमध्ये हे कोणीही समजत नाहीत. बाबांनी समजावून सांगितले आहे - तुमचे पारलौकिक
पित्यावर प्रेम आहे. इतरांची आहे विनाश काले विपरीत बुद्धी. विनाशाची आता वेळ आहे.
तीच महाभारताची लढाई आता लागणार आहे. विमाने, रणगाडे इत्यादी एकमेकांना सप्लाय करत
आहेत. सर्वांना देत राहतात. पैसे घेऊन ज्याला जे पाहिजे ते त्याला देत जातात.
उधारीवर देखील घेतात. तर विमाने, दारुगोळा इत्यादी हे सर्व खरेदी करतात. या सर्व
वस्तू खूप महागड्या असतात. परदेशी लोक हे सर्व बनवतात, आणि मग ते विकतात. भारतवासी
थोडेच विमाने इत्यादी विकतात. या सर्व वस्तू बाहेरून आलेल्या आहेत. आता ज्या वस्तू
खरेदी करतात तर जरुर उपयोगात आणतील. फेकून देण्याकरिता थोडेच घेतील. ते आहेत, विनाश
काले विपरीत बुद्धी - यादव संप्रदाय, जे युरोपमध्ये राहतात. त्यामध्ये सर्व जण आले.
भारत तर अविनाशी खंड आहे कारण अविनाशी बाबांचा बर्थ प्लेस आहे. बाबा येतातच तेव्हा
जेव्हा जुनी दुनिया नष्ट होणार आहे आणि जन्म तिथे घेतात जिथे कधी विनाश होणार नाहीये.
बाबा आले होते म्हणून तर शिव जयंती साजरी करतात परंतु त्यांना हे माहीत नाही की
शिवबाबा केव्हा येतात. येतात देखील त्या वेळेला जेव्हा की विनाशासाठी तयारी होत आहे.
आता बाबा म्हणतात ते
आहेत युरोपवासी यादव संप्रदाय जे सतयुगामध्ये नसतात. ना बौद्धि, ना ख्रिश्चन इत्यादी
कोणीही नसतात. आता बाबा म्हणतात त्यांची आहे विनाश काले विपरीत बुद्धी कारण परमात्मा
पित्याला सर्वव्यापी म्हटले आहे. तुम्ही आहात विनाश काले प्रीत बुद्धी. तुम्ही
बाबांना जाणता. तुम्ही समजता आम्ही ८४ जन्म घेतले आहेत. ८४ जन्मांमध्ये पाप-आत्मा
तमोप्रधान बनलो आहोत. भारतवासीयांनी ८४ जन्म घेतले आहेत. आता नाटक पूर्ण होत आहे,
सर्वांना परत घरी जायचे आहे. तुम्हाला बाबा राजयोग शिकवत आहेत. ही आहे सर्वांची
महाविनाशाची वेळ अर्थात मृत्यूचा समय. तर त्या यादवांची देखील ईश्वराशी प्रीत बुद्धी
नाही आहे, म्हणून विनाश काले विपरीत बुद्धी म्हटले जाते. कोणत्याही देहधारी
मनुष्यावर प्रेम करायचे नाही. ती तर आहे रचना, त्याच्याकडून वारसा मिळू शकत नाही.
भावाला भावाकडून थोडाच वारसा मिळतो. हे तर चांगल्या रीतीने समजावून सांगितले आहे.
तुम्ही मुले आता समजता
- त्यांची आहे विनाशकाले विपरीत बुद्धी आणि तुमची आहे प्रीत बुद्धी. यामध्ये देखील
ज्यांच्या मनात उत्कट प्रेम आहे, त्यांचे बाबांवर पूर्ण प्रेम असते ते म्हणतात -
आम्ही बाबांकडून २१ जन्म स्वर्गाचा वारसा घेतो. ते बाबाच सत्य सांगतात - इतर
कोणावरही प्रेम करायचे नाही. जेव्हा नवीन घर बनवतात तर मग नवीन घरावर प्रेम जडते.
कळते की, जुने घर आता पाडले जाणार आहे. तर आपण सुद्धा जुन्या दुनियेला मनातून काढून
टाकत जातो (विसरत जातो). बाबा समजावून सांगत आहेत - दिवसें-दिवस वायुमंडळ खराब होत
जाईल. बघत आहात किती दंगली होत आहेत, तर लक्षात येईल की बस्स, हे आताच सर्व संपेल.
आपल्याला जायचे आहे नवीन दुनियेमध्ये. तर नवीन दुनियेची आठवण करावी लागेल. बेहदच्या
बाबांची आणि वारशाची आठवण करायची आहे, बाकी कोणाची आठवण केल्याने काहीच मिळणार नाही.
मनुष्य भक्तिमार्गामध्ये तर किती आठवण करतात. आई-वडील, मित्र-नातेवाईक या सर्वांची
आठवण करत असताना तरी देखील मग देवी-देवतांची किती आठवण करतात. गंगेच्या पाण्याने
स्नान करतात, तिलाच पतित-पावनी म्हणतात. असे दाखवतात की, तीर मारला आणि गंगा
उत्पन्न झाली. गंगा जल मुखामध्ये देतात. समजतात की, थोडे जरी गंगाजल मिळाले तरी
मुक्ती मिळेल. बाबा म्हणतात इथे आहेत ज्ञानाच्या गोष्टी. तुम्ही थोडे जरी ज्ञान ऐकले
तरी फळ मिळते. ही ज्ञान ऐकण्याची गोष्ट आहे. अमृत पिण्याची गोष्ट नाही आहे, हे
ज्ञान आहे. असे समजू नका की भोगाच्या दिवशी अमृत पाजतात. नाही, ते तर गोड पाणी आहे.
बाकी ही आहे ज्ञानाची गोष्ट. ज्ञान अर्थात बाबा आणि सृष्टीच्या आदि-मध्य-अंताला
जाणणे. हे सृष्टी चक्र कसे फिरते, कोण ८४ जन्म घेतात. सगळेच काही घेऊ शकत नाहीत.
सर्वात पहिले भारतवासीच येतात. तेच पूर्ण ८४ जन्म घेतात. जे देवता होते तेच ८४ जन्म
भोगून पतित बनतात. बाबा येऊन पुन्हा काट्यापासून फूल बनवतात. मनुष्य
देह-अभिमानामध्ये येऊन ५ विकारांमध्ये अडकून पडतात. आता आहे रावण-राज्य. सतयुग होते
दैवी-राज्य. शिवबाबाच स्वर्ग पुरी रचतात. सूर्यवंशी लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते.
आता तुम्ही जाणता स्थापना होत आहे. तुमची विनाश काले प्रीत बुद्धी आहे, म्हणून विजयी
आहात. साऱ्या विश्वावर तुम्ही विजय प्राप्त करता. हे व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे.
आपण भारतवासी जे आता कलियुगामध्ये आहोत ते पुन्हा परिवर्तित होऊन स्वर्गामध्ये
जाणार. जुन्या दुनियेला सोडायचे आहे. ही विकारी नाती, याला बंधन म्हटले जाते. तुम्ही
विकारी बंधनामधून बाहेर पडून निर्विकारी नात्यामध्ये जाता; मग दुसऱ्या जन्मामध्ये
तुम्ही विकारी बंधनामध्ये येणार नाहीत. तिथे आहेच निर्विकारी नाते, यावेळी आसुरी
बंधन आहे. आत्मा म्हणते - माझे प्रेम शिवबाबांवर आहे. तुम्हा ब्राह्मणांची प्रीत आहे
कारण यथार्थ रीतीने जाणता. बाबांना, सृष्टी चक्राला जाणून तुम्ही मग इतरांना देखील
समजावून सांगता. जितके जे इतरांना हे ज्ञान समजावून सांगतील तर अनेकांचे कल्याण
करतील. ज्यांना जास्त समजते तेच हुशार आहेत, उच्च पद देखील तेच प्राप्त करतात. सेवा
कमी करतात तर पद देखील कमी दर्जाचे मिळेल. पतित तर सगळी दुनिया आहे. प्रत्येकाला
पतितापासून पावन बनण्याचा मार्ग सांगायचा आहे, दुसरा कोणताच उपाय नाही. आठवणीनेच
विकर्म विनाश होतील. जे दैवी संप्रदायाचे आहेत त्यांच्या समोर हे शब्द गुंजत राहतील,
समजतील हे तर योग्यच आहे.
खरोखर आपण देवी-देवता
बनत आहोत. आपले भोजन देखील शुद्ध पाहिजे. दैवी गुण देखील इथेच धारण करायचे आहेत,
सर्व गुण संपन्न बनायचे आहे. आता तुम्ही बनत आहात. हे लक्ष्मी-नारायण देवता आहेत,
यांना भोग लावतात तर सिगरेट इत्यादीचा भोग लावतात काय? सिगरेट पिणारे उच्च पद
प्राप्त करू शकत नाहीत. ती काही दैवी वस्तू नाही आहे. सिगरेट पिणे किंवा लसूण-कांदा
इत्यादी खातील तर जास्तच अधोगती होईल. म्हणतात - हे सोडल्याने तब्येत खराब होते.
बाबा सांगतात - शिवबाबांची आठवण करा. या सर्व सवयी सोडून द्या तर तुमची सद्गती होईल.
सिगरेटची सवय तर अनेकांमध्ये असते. स्पष्टीकरण दिले तर जाते, देवतांना कधीही असा
भोग लावला जात नाही. तर तुम्हाला यांच्या सारखे इथेच बनायचे आहे. तुम्ही छी-छी
पदार्थ खात राहाल तर तोच वास येत राहील. सिगरेट किंवा दारू पिणाऱ्यांचा लांबूनच वास
येतो. तर तुम्हा मुलांना दैवी गुण धारण करायचे आहेत, वैष्णव बनायचे आहे. जणू
विष्णूची संतान आहे, तुम्ही विष्णू अर्थात दैवी संतान बनता. इथे तुम्ही आहात
ईश्वरीय संतान. हा तुमचा सर्वोत्तम जन्म आहे. देवतांपेक्षाही उत्तम तुम्हीच आहात.
तुम्ही इतरांना देखील उत्तम बनविणारे आहात. ही आहे बेहदच्या पित्याची मिशनरी.
ख्रिश्चन लोकांची मिशनरी असते ना. आपल्या ख्रिश्चन धर्मामध्ये अनेकांना कन्व्हर्ट
करतात. ही आहे ईश्वरीय मिशनरी. तुम्ही शूद्र पासून ब्राह्मण धर्मामध्ये कन्व्हर्ट
होऊन मग देवता धर्मामध्ये कन्व्हर्ट होता. तुम्ही जाणता आपण शूद्रा पासून आता
ब्राह्मण बनलो आहोत. तुम्ही जिवंतपणी मेलेले आहात मग जाऊन देवता बनणार. गर्भातून
जन्म मिळेल.
इथे तुम्हाला बाबांनी
धर्माचे संतान बनवले आहे, धर्मात्मा बनविण्याकरिता. बाबांनी तुम्हाला आपले बनवले आहे.
मुलांना बाबा शिकवत आहेत, ब्राह्मणापासून मग देवता बनतात. हे मनुष्य किती श्रेष्ठ
आहेत, यांच्यामध्ये सर्व दैवी गुण आहेत. जेव्हा तुम्ही आत्मा पवित्र बनाल, तर मग
शरीर देखील पवित्र पाहिजे. जुने शरीर नष्ट व्हायचेच आहे तर मग तुम्हाला नवीन
सतोप्रधान शरीर पाहिजे. सतयुगामध्ये ५ तत्वे देखील सतोप्रधान बनतील. बाबा म्हणतात -
तुम्ही शूद्र वर्णामध्ये होता. आता पुन्हा ब्राह्मण वर्णाचे बनला आहात, मग दैवी
वर्णामध्ये याल. ८४ जन्म घेणार ना. ब्राह्मण वर्णाला नाहीसे केले आहे. आता बाबा
शूद्रा पासून ब्राह्मण बनवून मग देवता बनवतात. आता तुम्ही ब्राह्मण आहात शिखा.
बाजोली असते ना (कोलांटी उडीचा खेळ असतो ना). आता तुम्ही ब्राह्मण आहात नंतर मग
देवता, क्षत्रिय… पुन्हा ब्राह्मण बनाल. याला चक्र म्हटले जाते. आता तुम्ही
ब्राह्मण वर्णामध्ये आहात. हे नॉलेज आता आहे, नंतर मग तर प्रारब्ध मिळेल. तिथे
कायमचे सुखी राहाल, २१ जन्म नंबरवार यावेळच्या पुरुषार्थानुसार. कोणी राजाई
घराण्यात, कोणी प्रजेमध्ये जातील. राजाई घराण्यात खूप सुख आहे. मग कला कमी होतात.
तुम्हाला ८४ जन्मांचे ज्ञान मिळाले आहे. स्मृती आली आहे. बाबा येऊन समजावून सांगतात
- गोड-गोड मुलांनो, तुमचे आता ८४ जन्म पूर्ण झाले आहेत. कोणी ८४ जन्म, ८०, ५० किंवा
६० जन्म देखील घेतले आहेत. तुम्ही भारतवासीच सर्वात जास्त सुख उपभोगता. या
ड्रामामध्ये तुमचे नाव प्रसिद्ध आहे. देवतांपेक्षाही तुम्ही श्रेष्ठ आहात. तुम्ही
जाणता आपण सो पूज्य बनतो. सतयुगामध्ये आपण कोणाचीही पूजा करत नाही, ना कोणी आमची
पूजा करतात. तिथे आपण आहोतच पूज्य, नंतर मग कला कमी होत जातात. आपण पूज्य पासून
पुन्हा पुजारी बनून डोके टेकवू लागतो. द्वापर पासून आपण पुजारी बनणे सुरू करतो.
अंतामध्ये मग सर्व व्यभिचारी बनतात. हे शरीर ५ तत्वांचे बनलेले आहे, त्याची कोणी
पूजा करू लागतात तर त्याला म्हटले जाते भूत पूजा. प्रत्येकामध्ये ५ भूते आहेत.
देह-अभिमानाचे भूत, काम-क्रोधाचे भूत. भूत संप्रदाय म्हणा किंवा आसुरी संप्रदाय
म्हणा, गोष्ट एकच आहे. बाबाच येऊन मग दैवी संप्रदाय बनवतात. बाबा येऊन या
भूतांपासून (५ विकारांपासून) सोडवतात आणि आपल्यासोबत योग लावून देवता बनवतात.
गुरुनानकने देखील महिमा केली आहे की, परमपिता परमात्म्याने मनुष्याला देवता बनविले.
तेच पतितांना पावन बनवणारे आहेत. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१)
ब्राह्मणापासून देवता बनण्याकरिता ज्या पण छी-छी (वाईट) सवयी आहेत त्या सर्व सोडून
द्यायच्या आहेत. शुद्रांना ब्राह्मण धर्मामध्ये कन्व्हर्ट करून देवता बनविण्यासाठी
या ईश्वरीय मिशनच्या कार्यामध्ये सहयोगी बनायचे आहे. दारू, सिगरेट या ज्या पण वाईट
सवयी आहेत त्या सोडून द्यायच्या आहेत.
२)या विनाशाच्या
वेळेला एका बाबांवरच खरे प्रेम असले पाहिजे. जुने घर कोसळणार आहे, म्हणून यामधून
आपले मन काढून नवीन दुनियेमध्ये गुंतवायचे आहे.
वरदान:-
श्रेष्ठ कर्मा
द्वारे सिमरण योग्य (नाम-जपण्या योग्य) बनणारे योगयुक्त, युक्तियुक्त भव
तुमचे प्रत्येक कर्म
जितके श्रेष्ठ असेल तितकेच श्रेष्ठ आत्म्यांकडून तुमचे सिमरण केले जाईल (नाम-जप केला
जाईल). भक्तीमध्ये नावाचा जप करतात, परंतु इथे जे श्रेष्ठ आत्मे आहेत त्यांच्या
गुणांना आणि कर्मांना आदर्श बनविण्याकरिता नाम-जप करतात. तर तुम्ही श्रेष्ठ
कर्मांच्या आधारे सिमरण योग्य (नाम-जप करण्या योग्य) बनत जाल, यासाठी योगयुक्त बना.
योगयुक्त बनल्यानेच प्रत्येक संकल्प, शब्द किंवा कर्म अवश्य युक्तियुक्त होईल,
त्यांच्याकडून अयुक्त कर्म (अयोग्य कर्म) अथवा संकल्प होऊच शकत नाही - हे देखील
कनेक्शन आहे.
बोधवाक्य:-
निमित्त आणि
निर्माणचित्त - हीच खऱ्या सेवाधारीची लक्षणे आहेत.
हे अव्यक्त इशारे -
सदैव हर्षित राहण्याकरिता आपल्या नेचरला (स्वभावाला) सरळ बनवा, सहनशील बना.
सरळचित्त स्वभाव असेल
तर हर्षित राहण्याबरोबरच डोळ्यांमधून, चेहऱ्यावरून आणि वर्तनामधून मधुरता प्रत्यक्ष
रूपामध्ये दिसून येईल. मुखावाटे कधीही कटू वचन निघणार नाहीत. त्यांचे मन, बुद्धी,
बोलणे सर्व एक समान असेल. मनात एक, बोलण्यात दुसरे - हे सरळपणाचे लक्षण नाही. सरळ
स्वभाव असणारे नेहमी निर्माणचित्त, निरहंकारी, नि:स्वार्थी असतात.