11-07-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - सर्वप्रथम सर्वांना बाबांचा योग्य परिचय देऊन गीतेचा भगवान सिद्ध करा म्हणजे तुमचे नाव प्रसिद्ध होईल”

प्रश्न:-
तुम्ही मुलांनी चारही युगांमध्ये फेरी मारली आहे, त्याचा रिवाज भक्तीमार्गामध्ये चालू आहे, तो कोणता?

उत्तर:-
तुम्ही चारही युगांमध्ये फेरी मारली आहे, ते (भक्तीवाले) मग सर्व शास्त्रे, चित्रे इत्यादींना रथामध्ये ठेऊन चारी दिशांना परिक्रमा करतात. आणि मग देवघरात आणून झोपवतात. तुम्ही ब्राह्मण, देवता, क्षत्रिय… बनता. हे चक्र फिरण्याच्या बदली त्यांनी परिक्रमा करणे सुरु केले आहे. हा देखील रिवाज आहे.

ओम शांती।
रुहानी बाबा बसून रुहानी मुलांना समजावून सांगत आहेत की, जेव्हा कोणाला हे ज्ञान समजावून सांगता तर पहिले हे क्लिअर करा की पिता एक आहे; असे विचारायचे नाहीये की, ‘पिता एक आहे की अनेक आहेत’. यामुळे तर मग अनेक म्हणतील. म्हणायचेच आहे - ‘पिता, रचता गॉडफादर एक आहे. तो सर्व आत्म्यांचा पिता आहे’. सुरुवातीलाच असेही सांगता कामा नये की ते बिंदू आहेत, यामुळे मग गोंधळून जातील. सर्व प्रथम तर हे चांगल्या रीतीने समजावून सांगा की, पिता दोन आहेत - लौकिक आणि पारलौकिक. लौकिक पिता तर प्रत्येकाचे असतातच परंतु त्यांना (पारलौकिक पित्याला) कोणी खुदा, कुणी गॉड म्हणतात. आहेत एकच. सर्व एकाचीच आठवण करतात. सर्वप्रथम हा निश्चय पक्का करून घ्या की, फादर आहेत स्वर्गाची रचना करणारे. ते इथे येतील स्वर्गाचा मालक बनविण्यासाठी, ज्याला शिवजयंती देखील म्हणतात. हे देखील तुम्ही मुले जाणता स्वर्गाचे रचता भारतामध्येच स्वर्ग रचतात, ज्यामध्ये देवी-देवतांचेच राज्य असते. तर सर्वप्रथम बाबांचाच परिचय द्यायचा आहे. त्यांचे नाव आहे - शिव. गीतेमध्ये भगवानुवाच आहे ना. सर्वप्रथम तर हा निश्चय पक्का करवून मग लिहून घेतले पाहिजे. गीतेमध्ये आहे भगवानुवाच - मी तुम्हाला राजयोग शिकवतो अर्थात नरापासून नारायण बनवतो. हे कोण बनवू शकते? जरूर समजावून सांगावे लागेल. ईश्वर कोण आहे हे देखील मग समजावून सांगायचे आहे. सतयुगामध्ये पहिल्या नंबरमध्ये जे लक्ष्मी-नारायण आहेत, जरूर तेच ८४ जन्म घेत असतील. मागाहून मग बाकी इतर धर्मांचे येतात. त्यांचे इतके जन्म असू शकत नाहीत. पहिले येणाऱ्यांचेच ८४ जन्म असतात. सतयुगामध्ये तर काही शिकत नाहीत. जरूर संगमावरच शिकत असतील. तर सर्वप्रथम बाबांचा परिचय द्यायचा आहे. जशी आत्मा दिसून येत नाही, समजू शकतो, तसेच परमात्म्याला सुद्धा बघू शकत नाही. बुद्धीद्वारे समजतो की ते आम्हा आत्म्यांचे पिता आहेत. त्यांना म्हटले जाते परम आत्मा. ते सदैव पावन आहेत. त्यांना येऊन पतित दुनियेला पावन बनवायचे असते. तर पहिले पिता एक आहे, हे सिद्ध करून सांगितल्याने गीतेचा भगवान श्रीकृष्ण नाही, हे देखील सिद्ध होईल. तुम्हा मुलांना सिद्ध करून सांगायचे आहे, एका बाबांनाच ट्रुथ म्हटले जाते. बाकी कर्मकांड आणि तीर्थयात्रा इत्यादींच्या गोष्टी सर्व भक्तीच्या शास्त्रांमध्ये आहेत. ज्ञानामध्ये काही याचे कोणते वर्णन सुद्धा नाही आहे. इथे कोणतेही शास्त्र नाही. बाबा येऊन सर्व रहस्य समजावून सांगतात. सर्वात अगोदर तुम्ही मुलेच या गोष्टीवर विजय मिळवाल की भगवान एक निराकार आहेत, ना की साकार. परमपिता परमात्मा शिवभगवानुवाच; ज्ञानाचा सागर सर्वांचा पिता ते आहेत. श्रीकृष्ण काही सर्वांचा पिता असू शकत नाही, तो कोणाला म्हणू शकत नाही की, ‘देहाचे सर्व धर्म सोडून मामेकम् (मज एकाची) आठवण करा’. आहे खूप सोपी गोष्ट. परंतु मनुष्य शास्त्रे इत्यादी वाचून, भक्तीमध्ये पक्के झाले आहेत. आजकाल शास्त्रांना (धर्मग्रंथ) इत्यादींना गाडीमध्ये ठेवून परिक्रमा करतात. चित्रांना, ग्रंथाला देखील परिक्रमा करवून मग घरी आणून झोपवतात. आता तुम्ही मुले जाणता आपण देवतापासून क्षत्रिय, वैश्य, शूद्र बनतो, हे चक्र फिरतो. या चक्राच्या बदली ते मग परिक्रमा करवून देवघरात नेऊन ठेवतात. परिक्रमा करण्याचा त्यांचा एक निश्चित दिवस असतो. तर सर्वप्रथम हे सिद्ध करून सांगायचे आहे की श्रीकृष्ण भगवानुवाच नाही परंतु शिव भगवानुवाच आहे. शिवच पुनर्जन्म रहित आहेत. ते येतात जरूर, परंतु त्यांचा दिव्य जन्म आहे. भागीरथवर येऊन स्वार होतात. पतितांना येऊन पावन बनवतात. रचता आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताचे रहस्य समजावून सांगतात, जे ज्ञान इतर कोणीही जाणत नाहीत. बाबांना आपणच येऊन आपला परिचय द्यायचा आहे. मुख्य गोष्ट आहेच बाबांच्या परिचयाची. तेच गीतेचा भगवान आहेत, हे तुम्ही सिद्ध करून सांगाल तर तुमचे नाव खूप प्रसिद्ध होईल. तर अशी पत्रके छापून त्यामध्ये चित्र इत्यादी लावून मग विमानातून खाली टाकावीत. बाबा मुख्य-मुख्य गोष्टी समजावून सांगत राहतात. जर तुम्ही एका गोष्टीमध्ये जिंकलात तर बस्स, तुम्ही विजयी झालात. यामध्ये तुमचे नाव खूप प्रसिद्ध झाले आहे, यामध्ये कोणी कटकट करणार नाहीत. ही खूप क्लिअर गोष्ट आहे. बाबा म्हणतात - मी सर्वव्यापी कसा होऊ शकतो. मी तर येऊन मुलांना ज्ञान ऐकवतो. बोलावतात देखील - येऊन पावन बनवा. रचता आणि रचनेचे ज्ञान ऐकवा. महिमा देखील बाबांची वेगळी आहे आणि श्रीकृष्णाची वेगळी आहे. असे नाही शिवबाबा येऊन मग श्रीकृष्ण आणि नारायण बनतात, ८४ जन्मांमध्ये येतात! नाही. या सर्व गोष्टी समजावून सांगण्यामध्ये तुमची बुद्धी व्यस्त राहिली पाहिजे. मुख्य आहेच गीता. भगवानुवाच आहे, तर जरूर भगवंताचे मुख पाहिजे ना. भगवान तर आहे निराकार. आत्मा मुखाविना बोलणार कशी. म्हणूनच तर म्हणतात मी साधारण तनाचा आधार घेतो. जे प्रथम लक्ष्मी-नारायण बनतात तेच ८४ जन्म घेत-घेत शेवटी येतात तेव्हा मग त्यांच्याच तनामध्ये येतात. श्रीकृष्णाच्या अनेक जन्मांच्या अंतीम जन्मामध्ये येतात. अशा प्रकारे विचार सागर मंथन करा की एखाद्याला कसे समजावून सांगावे. एकाच गोष्टीने तुमचे नाव प्रसिद्ध होईल. रचता बाबांविषयी सर्वांना माहीत होईल. मग तुमच्याकडे पुष्कळ लोक येतील. तुम्हाला बोलावतील की इथे येऊन भाषण करा त्यामुळे सर्वप्रथम अल्फ (बाबांविषयी) सिद्ध करून समजावून सांगा. तुम्ही मुले जाणता - बाबांकडून आपण स्वर्गाचा वारसा घेत आहोत. बाबा दर ५ हजार वर्षानंतर भारतामध्येच भाग्यशाली रथामध्ये (ब्रह्मा तनामध्ये) येतात. हे आहेत सौभाग्यशाली, ज्या रथामध्ये भगवान येऊन बसतात; काही कमी आहे का. भगवान यांच्या तनामध्ये बसून मुलांना समजावून सांगतात की, ‘मी अनेक जन्मांच्या अंतीम जन्मामध्ये यांच्यामध्ये प्रवेश करतो’. श्रीकृष्णाच्या आत्म्याचा रथ आहे ना. तो स्वतः काही श्रीकृष्ण नाहीये. अनेक जन्मांतील शेवटचा जन्म आहे. प्रत्येक जन्मामध्ये फीचर्स, ऑक्युपेशन इत्यादी बदलत राहते. अनेक जन्मांच्या अंताला मी ज्यांच्यामध्ये प्रवेश करतो तेच मग श्रीकृष्ण बनतात. येतात संगमयुगावर. आपण देखील बाबांचे बनून बाबांकडून वारसा घेतो. बाबा शिकवून सोबत घेऊन जातात, जास्त काही त्रासाचा प्रश्नच नाही. बाबा फक्त म्हणतात - ‘मामेकम् (मज एकाची) आठवण करा’; तर हा नीट विचार केला पाहिजे की कशा पद्धतीने लिहावे. हीच मुख्य चूक आहे ज्यामुळे भारत अनराइटियस, इरिलीजस, इनसॉल्व्हंट (दुराचारी, अधर्मी, दिवाळखोर) बनला आहे. बाबा पुन्हा येऊन राजयोग शिकवतात. भारताला नीतिमान आणि पवित्र बनवतात. साऱ्या दुनियेला राइटियस (नीतिमान) बनवतात. त्या वेळी साऱ्या विश्वाचे मालक तुम्हीच आहात. म्हणतात ना - विश यू लॉंग लाईफ अँड प्रॉस्पेरिटी अर्थात तुम्हाला उदंड आयुष्य आणि भरभराटीचे जावो. बाबा आशीर्वाद देत नाहीत की कायम उदंड आयुष्य लाभो. हे साधू लोक म्हणतात - अमर रहा. तुम्ही मुले समजता अमर तर जरूर अमरपुरीमध्ये असतील. मग मृत्युलोक मध्ये अमर कसे म्हणणार. तर मुले जेव्हा मीटिंग इत्यादी करतात तेव्हा बाबांना सल्ला विचारतात. बाबा आगाऊ सल्ला देतात सर्वांनी आपापले मत लिहून पाठवा भले मग एकत्र पाठवा. मत मुरलीमध्ये लिहिल्याने तर सर्वांपर्यंत पोहोचू शकते. २-३ हजार खर्च वाचेल. या २-३ हजारातून तर २-३ सेंटर उघडू शकतो. चित्र इत्यादी घेऊन गावागावात गेले पाहिजे.

तुम्हा मुलांना सूक्ष्मवतनच्या गोष्टींमध्ये जास्ती इंटरेस्ट असता कामा नये. ब्रह्मा, विष्णु, शंकर इत्यादी चित्रे आहेत तर यावर थोडेसे समजावून सांगितले जाते. मध्येच यांचा थोडासा पार्ट आहे. तुम्ही जाता, भेटता बाकी अजून काहीच नाहीये त्यामुळे यामध्ये जास्त इंटरेस्ट घेतला जात नाही. इथे आत्म्याला बोलावले जाते, त्यांना दाखवतात. काहीजण तर येऊन रडतात देखील. कुणी प्रेमाने भेटतात. कोणी दुःखाचे अश्रू गाळतात. हा सर्व ड्रामामध्ये पार्ट आहे, ज्याला चिट-चॅट म्हटले जाईल. ते (या दुनियेतील) लोक तर ब्राह्मणांमध्ये जेव्हा कोणाच्या आत्म्याला बोलावतात तेव्हा त्यांना कपडे इत्यादी घालतात. आता ते शरीर तर नष्ट झाले, बाकी घालणार कोण? तुमच्याकडे ती रीत नाही आहे. रडणे इत्यादीचा तर प्रश्नच नाही. तर उच्च ते उच्च बनायचे आहे, ते कसे बनायचे. जरूर मध्ये संगमयुग आहे जेव्हा पवित्र बनतात. तुम्ही एक गोष्ट सिद्ध कराल तर म्हणतील हे तर अगदी बरोबर सांगत आहेत. ईश्वर कधी खोटे थोडेच बोलू शकतात. मग अनेकांचे प्रेम देखील जडेल, पुष्कळ येतील. वेळेवर मुलांना सर्व पॉईंट्स देखील मिळत राहतात. अंताला काय-काय होणार आहे, ते देखील बघतील, युद्ध सुरु होईल, बॉम्ब सुटतील. अगोदर मृत्यू तिकडे (विदेशामध्ये) आहे. इथे तर रक्ताच्या नद्या वाहणार आहेत आणि नंतर मग दुधा-तुपाची नदी. सर्वप्रथम धूर विदेशातून निघेल. भय देखील तिथे आहे. किती मोठ-मोठे बॉम्ब्स बनवतात. त्यामध्ये काय-काय टाकतात, जे शहराला एकदम खलास करून टाकतात. स्वर्गाची राजाई कोणी स्थापन केली हे देखील सांगायचे आहे. हेवनली गॉडफादर जरूर संगमावरच येतात. तुम्ही जाणता आता संगम आहे. तुम्हाला मुख्य गोष्ट समजावून सांगितली जाते ती म्हणजे बाबांच्या आठवणीची, ज्याद्वारेच पापे नष्ट होतील. भगवान जेव्हा आले होते तेव्हा त्यांनी म्हटले होते - ‘मामेकम् (मज एकाची) आठवण करा तर तुम्ही सतोप्रधान बनाल’. मुक्तिधाम मध्ये जाल. मग पहिल्यापासून चक्र रिपीट होईल. डीटीज्म, इस्लामिज्म, बुद्धिज्म… (देवी-देवता धर्म, इस्लामी धर्म, बौद्ध धर्म…) तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये हे सर्व नॉलेज असले पाहिजे ना. आनंद होतो की, आपण किती कमाई करतो, ही अमर-कथा, अमर-बाबा तुम्हाला ऐकवतात. तुमची अनेक नावे ठेवली आहेत. सर्वप्रथम मुख्य आहे डीटीजम (देवी-देवता धर्म) नंतर मग सर्वांची वृद्धी होत-होत झाड वाढत जाते. अनेकानेक धर्म, अनेक मते होतात. हा एकच धर्म एका श्रीमताद्वारे स्थापन होतो. द्वैतचा तर प्रश्नच नाही. हे रूहानी नॉलेज रूहानी बाबा बसून समजावून सांगतात. तुम्हा मुलांनी आनंदात राहिले पाहिजे.

तुम्ही जाणता बाबा आम्हाला शिकवत आहेत, तुम्ही अनुभवाने सांगता तर हा शुद्ध अहंकार असला पाहिजे की, भगवान आम्हाला शिकवत आहेत, अजून काय हवे! जर का आपण विश्वाचे मालक बनत आहोत तर मग आनंद का होत नाही की निश्चयामध्ये कुठे संशय आहे. बाबांविषयी शंका येता कामा नये. माया संशयामध्ये आणून विसरायला लावते. बाबांनी सांगितले आहे - माया डोळ्यांद्वारे खूप धोका देते. चांगली वस्तू बघितली की मन तळमळत राहील की खावे, डोळ्यांनी बघता म्हणून मारण्यासाठी क्रोध येतो. जर बघितलेच नाही तर मारणार कसे. डोळ्यांनी बघता तेव्हाच तर लोभ, मोह देखील येतो. धोका देणारे मुख्य आहेत डोळे. यांच्यावरती पूर्णपणे नजर ठेवली पाहिजे. आत्म्याला ज्ञान मिळते, तेव्हा मग क्रिमिनलपणा (विकारी पणा) सुटतो. असेही नाही की डोळ्यांना काढून टाकायचे आहे. तुम्हाला तर विकारी दृष्टीला पवित्र दृष्टी बनवायची आहे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) सदैव याच नशेमध्ये किंवा खुशीमध्ये रहायचे आहे की आम्हाला भगवान शिकवत आहेत. कोणत्याही गोष्टीमध्ये संशय-बुद्धी व्हायचे नाही. शुद्ध अहंकार ठेवायचा आहे.

२) सूक्ष्मवतनच्या गोष्टींमध्ये जास्त इंटरेस्ट ठेवायचा नाही. आत्म्याला सतोप्रधान बनविण्याचा पूर्णत: पुरुषार्थ करायचा आहे. आपसामध्ये सल्लामसलत करून सर्वांना बाबांची खरी ओळख द्यायची आहे.

वरदान:-
पास विद ऑनर बनण्यासाठी पुरुषार्थाची गती तीव्र आणि ब्रेक पॉवरफुल ठेवणारे यथार्थ योगी भव

वर्तमान समयानुसार पुरुषार्थाची गती तीव्र आणि ब्रेक पॉवरफुल हवेत तेव्हाच शेवटी पास विद ऑनर बनू शकाल कारण त्यावेळच्या परिस्थिती बुद्धीमध्ये अनेक संकल्प आणणाऱ्या असतील, त्यावेळी सर्व संकल्पांपासून दूर एका संकल्पामध्ये स्थित होण्याचा अभ्यास हवा. ज्यावेळी विस्तारामध्ये विखुरलेली बुद्धी असेल त्यावेळी स्टॉप करण्याची प्रॅक्टिस हवी. स्टॉप करणे आणि होणे. जितका वेळ पाहिजे तितका वेळ बुद्धीला एका संकल्पामध्ये स्थित करा - हाच आहे यथार्थ योग.

बोधवाक्य:-
तुम्ही ओबिडियंट सर्व्हंट (आज्ञाधारक सेवक) आहात आणि म्हणून तुम्ही अलमस्त (निष्काळजी) राहू शकत नाही. सेवक अर्थात सदैव सेवेवर उपस्थित.

अव्यक्त इशारे - संकल्पांची शक्ती जमा करून श्रेष्ठ सेवेच्या निमित्त बना:- जसे इंजेक्शन द्वारे रक्तामध्ये शक्ती भरतात. तसे तुमचा श्रेष्ठ संकल्प इंजेक्शनचे काम करेल. संकल्पाद्वारे संकल्पामध्ये शक्ती यावी - आता या सेवेची खूप आवश्यकता आहे. स्वतःच्या सेफ्टीसाठी देखील शुभ आणि श्रेष्ठ संकल्पाची शक्ती आणि निर्भयतेची शक्ती जमा करा तेव्हाच शेवट सुंदर आणि बेहदच्या कार्यामध्ये सहयोगी बनून बेहदच्या विश्वाचे राज्य अधिकारी बनू शकाल.