11-08-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड
मुलांनो - तुम्हाला अभ्यासाने आपली कर्मातीत अवस्था बनवायची आहे, त्याचसोबत
पतितापासून पावन बनण्याचा रस्ता देखील सांगायचा आहे, रूहानी सेवा करायची आहे”
प्रश्न:-
कोणता मंत्र
लक्षात ठेवलात तर पाप कर्मांपासून वाचाल?
उत्तर:-
बाबांनी मंत्र दिला आहे - ‘हिअर नो ईव्हिल, सी नो ईव्हिल… हाच मंत्र लक्षात ठेवा.
तुम्हाला आपल्या कर्मेंद्रियांद्वारे कोणतेही पाप करायचे नाही आहे. कलियुगामध्ये
सर्वांकडून पाप कर्मच होतात म्हणून बाबा ही युक्ती सांगतात, पवित्रतेचा गुण धारण करा
- हाच नंबर वन गुण आहे.
ओम शांती।
मुले कुणाच्या सन्मुख बसली आहेत. बुद्धीमध्ये जरूर चालत असेल की, आम्ही पतित-पावन
सर्वांचे सद्गती दाता, आमच्या बेहदच्या बाबांसमोर बसलो आहोत. भले ब्रह्माच्या
तनामध्ये आहेत तरी देखील आठवण त्यांची करायची आहे. मनुष्य काही सर्वांची सद्गती करू
शकत नाहीत. मनुष्याला पतित-पावन म्हटले जात नाही. मुलांना स्वतःला आत्मा समजावे
लागेल. आम्हा सर्व आत्म्यांचे ते पिता आहेत. ते बाबा आम्हाला स्वर्गाचा मालक बनवत
आहेत. हे मुलांनी जाणले पाहिजे आणि मग आनंद देखील झाला पाहिजे. हे देखील मुले
जाणतात की, आपण नरकवासी पासून स्वर्गवासी बनत आहोत. खूप सोपा मार्ग मिळाला आहे.
फक्त आठवण करायची आहे आणि आपल्यामध्ये दैवी गुण धारण करायचे आहेत. स्वतःला तपासत
राहायचे आहे. नारदाचे उदाहरण देखील आहे. हे सर्व दृष्टांत, ज्ञानाचे सागर बाबांनीच
दिले आहेत. जे कुणी संन्यासी इत्यादी दृष्टांत देतात ते सर्व बाबांनी दिलेले आहेत.
भक्तीमार्गामध्ये फक्त गात राहतात. कासवाचा, सापाचा, भ्रामरीचा दृष्टांत देतील.
परंतु स्वतः काहीच करू शकत नाही. बाबांनी दिलेले दृष्टांत भक्तिमार्गामध्ये पुन्हा
रिपीट करतात. भक्तिमार्ग आहेच भूतकाळाचा. या वेळी जे प्रॅक्टिकलमध्ये होते त्याचे
मग गायन होते. भले देवतांचा जन्म दिवस अथवा भगवंताचा जन्म दिवस साजरा करतात परंतु
जाणत काहीच नाहीत. आता तुम्ही समजत जाता. बाबांकडून शिकवण घेऊन पतितापासून पावन
सुद्धा बनता आणि पतितांना पावन बनण्याचा रस्ता देखील सांगता. ही आहे तुमची मुख्य
रुहानी सेवा. सर्वप्रथम कोणालाही आत्म्याचे ज्ञान द्यायचे आहे. तुम्ही आत्मा आहात.
आत्म्याविषयी देखील कोणालाच माहित नाहीये. आत्मा तर अविनाशी आहे. जेव्हा वेळ होतो
आत्मा येऊन शरीरामध्ये प्रवेश करते तर स्वतःला निरंतर आत्मा समजायचे आहे. आम्हा
आत्म्यांचे पिता परमपिता परमात्मा आहेत. परम टीचर सुद्धा आहेत. हे देखील मुलांच्या
कायम लक्षात राहिले पाहिजे. हे विसरता कामा नये. तुम्ही जाणता आता परत जायचे आहे.
विनाश समोर उभा आहे. सतयुगामध्ये दैवी परिवार खूप छोटा असतो. कलियुगामध्ये तर किती
असंख्य मनुष्य आहेत. अनेक धर्म, अनेक मते आहेत. सतयुगामध्ये हे काहीच नसते. मुलांनी
संपूर्ण दिवस या गोष्टी बुद्धीमध्ये आणायच्या आहेत. हा अभ्यास आहे ना. त्या
अभ्यासामध्ये तर किती पुस्तके इत्यादी असतात. प्रत्येक क्लासमध्ये नवीन-नवीन पुस्तके
खरेदी करावी लागतात. इथे तर कोणतेही पुस्तक अथवा शास्त्रे इत्यादींचा प्रश्नच नाही.
यामध्ये तर एकच गोष्ट आहे, एकच अभ्यास आहे. इथे जेव्हा ब्रिटिश गव्हर्मेंट होते,
राजांचे राज्य होते, तर स्टॅम्पवर देखील राजा-राणी शिवाय इतर कुणाचाही फोटो टाकत
नसत. आजकाल तर बघा भक्त इत्यादी जे कोणी होऊन गेले आहेत त्यांचे देखील स्टॅम्प बनवत
राहतात. या लक्ष्मी-नारायणाचे राज्य असेल तेव्हा चित्र देखील एकाच महाराजा-महाराणीचे
असेल. असे नाही की भूतकाळामध्ये जे देवता होऊन गेले आहेत त्यांची चित्रे नष्ट झाली
आहेत. नाही, जुन्यात जुने देवतांचे चित्र खूप मनापासून घेतात कारण शिवबाबांच्या
नंतर आहेत देवता. या सर्व गोष्टी तुम्ही मुले धारण करत आहात इतरांना रस्ता
सांगण्यासाठी. हे आहे अगदी नवे शिक्षण. तुम्हीच हे ऐकले होते आणि पद प्राप्त केले
होते इतर कोणीही जाणत नाहीत. तुम्हाला राजयोग परमपिता परमात्मा शिकवत आहेत. महाभारत
लढाई देखील प्रसिद्ध आहे. काय होते ते तर पुढे गेल्यावर बघतील. कोण काय म्हणतात,
कोण काय म्हणतात. दिवसेंदिवस लोकांना जाणीव होत जाते. म्हणतात देखील वर्ल्ड वॉर सुरु
होईल. त्यापूर्वी तुम्हा मुलांना आपल्या अभ्यासाने कर्मातीत अवस्था प्राप्त करायची
आहे. बाकी असुरांचे आणि देवतांचे काही युद्ध होत नाही. यावेळी तुम्ही ब्राह्मण
संप्रदाय आहात जे मग जाऊन दैवी संप्रदाय बनता म्हणून या जन्मामध्ये दैवी गुण धारण
करत आहात. एक नंबरचा दैवी गुण आहे - पवित्रतेचा. तुम्ही या शरीराद्वारे किती पाप
करत आले आहात. आत्म्यालाच म्हटले जाते पाप-आत्मा, आत्मा या कर्मेंद्रियांद्वारे किती
पाप करत राहते. आता ‘हिअर नो ईव्हिल…’ कोणाला म्हटले जाते? आत्म्याला. आत्माच
कानांनी ऐकते. बाबांनी तुम्हा मुलांना स्मृती दिली आहे की तुम्ही आदि सनातन
देवी-देवता धर्मवाले होता, चक्र फिरून आला आहात आता पुन्हा तुम्हाला तेच बनायचे आहे.
ही गोड स्मृती आल्याने पवित्र बनण्याची हिंमत येते. तुमच्या बुद्धीमध्ये आहे आपण कसा
८४ चा पार्ट बजावला आहे. सर्वप्रथम आम्ही हे होतो. ही कहाणी आहे ना. बुद्धीमध्ये आले
पाहिजे ५ हजार वर्षांपूर्वी आपण सो देवता होतो. मी आत्मा मूलवतनची राहणारी आहे. आधी
हा जरा सुद्धा विचार नव्हता की, आम्हा आत्म्यांचे ते घर आहे. तिथून आम्ही पार्ट
बजावण्यासाठी येतो. सूर्यवंशी-चंद्रवंशी… बनलो. आता तुम्ही ब्रह्माची संतान
ब्राह्मण वंशी आहात. तुम्ही ईश्वरीय औलाद बनला आहात. ईश्वर बसून तुम्हाला शिक्षा
देत आहेत. हे सुप्रीम पिता, सुप्रीम टीचर, सुप्रीम गुरु देखील आहेत. आपण त्यांच्या
मताद्वारे सर्व मनुष्यांना श्रेष्ठ बनवितो. मुक्ती-जीवनमुक्ती दोन्ही श्रेष्ठ आहेत.
आपण आपल्या घरी जाणार मग पवित्र आत्मे येऊन राज्य करतील. हे चक्र आहे ना. याला
म्हटले जाते स्वदर्शन चक्र. ही ज्ञानाची गोष्ट आहे. बाबा म्हणतात - तुमचे हे
स्वदर्शन चक्र थांबता कामा नये. फिरत राहिल्याने विकर्म विनाश होतील. तुम्ही या
रावणावर विजय मिळवाल. पापे नष्ट होतील. आता स्मृती आली आहे, चिंतन करण्यासाठी. असे
नाही, बसून माळा जपायची आहे. आत्म्याच्या आत ज्ञान आहे जे तुम्हा मुलांना इतर
भाऊ-बहिणींना समजावून सांगायचे आहे. मुले देखील मददगार तर बनतील ना. तुम्हा
मुलांनाच स्वदर्शन चक्रधारी बनवतो. हे ज्ञान माझ्यामध्ये आहे. म्हणून मला ज्ञानाचा
सागर मनुष्य सृष्टीचे बीजरूप म्हणतात. त्यांना बागवान म्हटले जाते. देवी-देवता
धर्माचे बीज शिवबाबांनीच लावले आहे. आता तुम्ही देवी-देवता बनत आहात. हे संपूर्ण
दिवस आठवत रहा तरीही तुमचे खूप कल्याण आहे. दैवी गुण देखील धारण करायचे आहेत.
पवित्र देखील बनायचे आहे. स्त्री-पुरुष दोघे एकत्र राहत असताना पवित्र बनता. असा
धर्म तर असत नाही. निवृत्ती मार्गवाले ते तर फक्त पुरुष बनतात. म्हणतात ना -
स्त्री-पुरुष दोघे एकत्र पवित्र राहू शकत नाहीत, अवघड आहे. सतयुगामध्ये होते ना.
लक्ष्मी-नारायणाची महिमा सुद्धा गातात.
आता तुम्ही जाणता बाबा
आम्हाला शूद्रा पासून ब्राह्मण बनवून मग देवता बनवतात. आम्हीच पूज्य पासून पुजारी
बनू. मग जेव्हा वाममार्गामध्ये जातील तेव्हा शिवाचे मंदिर बनवून पूजा करतील. तुम्हा
मुलांना आपल्या ८४ जन्मांचे ज्ञान आहे. बाबाच म्हणतात - तुम्ही आपल्या जन्मांना
जाणत नाही, मी सांगतो. असे दुसरा कोणताही मनुष्य म्हणू शकणार नाही. तुम्हाला आता
बाबा स्वदर्शन चक्रधारी बनवतात. तुम्ही आत्मा पवित्र बनत आहात. शरीर तर इथे पवित्र
बनू शकत नाही. आत्मा पवित्र बनते तेव्हा मग अपवित्र शरीराला सोडावे लागते. सर्व
आत्म्यांना पवित्र बनून जायचे आहे. पवित्र दुनिया आता स्थापन होत आहे. बाकी सर्व
स्वीट होमला निघून जातील. हे लक्षात राहिले पाहिजे.
बाबांच्या आठवणी सोबत
घराची देखील आठवण जरूर हवी कारण आता परत घरी जायचे आहे. घरीच (परमधामध्येच) बाबांची
आठवण करायची आहे. जरी तुम्ही जाणता बाबा या तनामध्ये येऊन आम्हाला ऐकवत आहेत परंतु
बुद्धी परमधाम स्वीट होम पासून दूर जाता कामा नये. टीचर घर सोडून येतात, तुम्हाला
शिकविण्याकरिता. शिकवून मग खूप दूर निघून जातात. सेकंदामध्ये कुठेही जाऊ शकतात.
आत्मा किती छोटा बिंदू आहे. आश्चर्य वाटले पाहिजे. बाबांनी आत्म्याचे देखील ज्ञान
दिले आहे. हे देखील तुम्ही जाणता स्वर्गामध्ये कोणतीही घाणेरडी गोष्ट असत नाही,
ज्यामध्ये हात-पाय अथवा कपडे इत्यादी घाण होतील. देवतांचा पोशाख किती सुंदर आहे.
किती फर्स्ट क्लास कपडे असतील. धुण्याची देखील गरज नाही. यांना बघून किती आनंद झाला
पाहिजे. आत्मा जाणते भविष्य २१ जन्म आपण हे बनणार. बस बघत राहिले पाहिजे. हे चित्र
सर्वांकडे असले पाहिजे. यामध्ये खूप आनंद झाला पाहिजे की, बाबा आम्हाला हे बनवतात.
अशा बाबांची आपण मुले मग रडतो कशाला! आपल्याला थोडीच कोणती चिंता वाटली पाहिजे.
देवतांच्या मंदिरामध्ये जाऊन महिमा गातात - ‘सर्वगुण संपन्न… अच्युतम् केशवम्…’ किती
नावे बोलत जातात. हे सर्व शास्त्रांमध्ये लिहिलेले आहे ज्याची आठवण करतात.
शास्त्रांमध्ये कोणी लिहिले? व्यासांनी. किंवा कोणी नवे नवे देखील बनवत राहतात.
पूर्वी ग्रंथ खूप छोटा होता, हाताने लिहिलेला होता. आता तर किती मोठा बनवला आहे.
जरूर ॲडिशन केले असेल. आता गुरुनानक तर येतातच धर्माची स्थापना करण्यासाठी. ज्ञान
देणारा तर एकच आहे. क्राईस्ट देखील येतात फक्त धर्माची स्थापना करण्यासाठी. जेव्हा
सर्वजण येतात मग तेव्हा परत जातील. घरी पाठविणारा कोण? क्राईस्ट आहे काय? नाही. तो
तर वेगळ्या नावा-रूपामध्ये तमोप्रधान अवस्थेमध्ये आहे. सतो, रजो, तमोमध्ये येतात
ना. यावेळी सर्व तमोप्रधान आहेत. सर्वांची जडजडीभूत अवस्था आहे ना. पूर्वजन्म
घेत-घेत यावेळी सर्व धर्मवाले येऊन तमोप्रधान बनले आहेत. आता सर्वांना परत जायचे आहे
जरूर. पुन्हा चक्र फिरले पाहिजे. पहिला नवीन धर्म पाहिजे जो सतयुगामध्ये होता.
बाबाच येऊन आदि सनातन देवी-देवता धर्माची स्थापना करतात. मग विनाश देखील होणार आहे.
स्थापना, विनाश मग पालना. सतयुगामध्ये एकच धर्म असेल. ही स्मृती येते ना. सर्व चक्र
स्मृतीमध्ये आणायचे आहे. आता आपण ८४ चे चक्र पूर्ण करून परत घरी जाऊ. तुम्ही
चालते-बोलते स्वदर्शन चक्रधारी आहात. ते (दुनियावाले) मग म्हणतात कृष्णाला स्वदर्शन
चक्र होते, त्याने सर्वांना मारले. अकासुर, बकासुर इत्यादींची चित्रे दाखवली आहेत.
परंतु अशी कोणती गोष्ट नाहीये.
तुम्हा मुलांना आता
स्वदर्शन चक्रधारी बनून रहायचे आहे कारण स्वदर्शन चक्राने तुमची पापे भस्म होतात.
आसूरीपणा नष्ट होतो. देवतांचे आणि असुरांचे युद्ध तर होऊ शकत नाही. असुर आहेत
कलियुगामध्ये, देवता आहेत सतयुगामध्ये. मध्यावर आहे संगमयुग. शास्त्र आहेतच
भक्तिमार्गाची. ज्ञानाचे नामोनिशाणही नाही. सर्वांसाठी ज्ञानसागर एक बाबाच आहेत.
बाबांशिवाय कोणतीही आत्मा पवित्र बनून घरी परत जाऊ शकत नाही. पार्ट जरूर बजावायचा
आहे, तर आता आपल्या ८४ च्या चक्राची देखील आठवण करायची आहे. आता आपण सतयुगी नव्या
जन्मामध्ये जातो. असा जन्म परत कधीही मिळत नाही. शिवबाबा मग ब्रह्मा बाबा. लौकिक,
पारलौकिक आणि हे आहेत अलौकिक पिता. याच काळातील ही गोष्ट आहे, यांना अलौकिक म्हटले
जाते. तुम्ही मुले त्या शिवबाबांची आठवण करता. ब्रह्माची नाही. भले ब्रह्माच्या
मंदिरामध्ये जाऊन पूजा करतात, ते देखील तेव्हा पुजतात जेव्हा सूक्ष्मवतनमध्ये
संपूर्ण अव्यक्त मुर्त आहेत. हे शरीरधारी पूजेच्या लायक नाहीत. हे तर मानव आहेत ना.
मानवाची पूजा होत नाही. ब्रह्माला दाढी दाखवतात त्यावरून माहित होते की हे इथले
आहेत. देवतांना दाढी असत नाही. या सर्व गोष्टी मुलांना समजावून सांगितल्या आहेत.
तुमचे नाव प्रसिद्ध आहे म्हणून तुमचे मंदिर देखील बनलेले आहे. सोमनाथाचे मंदिर किती
उच्च ते उच्च आहे. सोमरस पाजला, मग काय झाले? मग इथे देखील दिलवाडा मंदिर बघा.
मंदिर हुबेहूब यादगार बनलेले आहे. खाली तुम्ही तपस्या करत आहात, वरती आहे स्वर्ग.
मनुष्य समजतात स्वर्ग कुठे वरती आहे. मंदिरामध्ये देखील खाली स्वर्ग कसा बनवणार!
म्हणून मग वरती छतावर बनवला आहे. बनविणारे काही समजत नाहीत. मोठ-मोठे करोडपती आहेत
त्यांना हे समजावून सांगायचे आहे. तुम्हाला आता ज्ञान मिळाले आहे तर तुम्ही अनेकांना
देऊ शकता. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) आतून
आसूरीपणाला नष्ट करण्यासाठी चालता-फिरता स्वदर्शन चक्रधारी होऊन रहायचे आहे.
संपूर्ण चक्र स्मृतीमध्ये आणायचे आहे.
२) बाबांच्या आठवणी
सोबतच बुद्धि परमधाम घरामध्ये देखील लागलेली असावी. बाबांनी ज्या स्मृती दिल्या
आहेत त्यांचे चिंतन करून आपले कल्याण करायचे आहे.
वरदान:-
सर्वगुणसंपन्न
बनण्या सोबतच कोणत्या एका विशेषतेमध्ये विशेष प्रभावशाली भव
जसे डॉक्टर्स जनरल
आजारांचे नॉलेज तर ठेवतातच परंतु त्याचसोबत कोणत्याही एका बाबतीत विशेष नॉलेजसाठी
प्रसिद्ध होतात, तसेच तुम्हा मुलांनी सर्वगुण संपन्न तर बनायचे आहे परंतु तरीही एका
विशेषतेला विशेष रूपाने अनुभवामध्ये आणून, सेवेमध्ये लावून पुढे जात रहा. जसे
सरस्वतीला विद्येची देवी, लक्ष्मीला धनाची देवी म्हणून पुजतात. असे आपल्यामध्ये
सर्वगुण, सर्व शक्ती असताना देखील एका विशेषतेमध्ये विशेष रिसर्च करून स्वतःला
प्रभावशाली बनवा.
बोधवाक्य:-
विकार रुपी
सापांना सहजयोगाची शैय्या बनवा तर सदैव निश्चिंत रहाल.
अव्यक्त इशारे:-
सहजयोगी बनायचे असेल तर परमात्म प्रेमाचे अनुभवी बना.
जेव्हा मनच बाबांचे
आहे तर मग मन कसे लावावे! प्रेम कसे करावे! हा प्रश्नच उद्भवू शकत नाही. कारण सदैव
लवलीन राहतो, प्रेम स्वरूप, मास्टर प्रेमाचा सागर बनतो, तेव्हा प्रेम करावे लागत
नाही, तर प्रेमाचे स्वरूप बनतो. जितकी-जितकी ज्ञान सूर्याची किरणे अथवा प्रकाश
वाढेल, तितक्या जास्तीच प्रेमाच्या लाटा उसळतील.