11-08-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड मुलांनो,
बापदादांची प्रेमपूर्वक आठवण प्राप्त करायची असेल तर सेवाधारी बना. बुद्धीमध्ये
ज्ञान भरपूर असेल तर ज्ञान वर्षा करा”
प्रश्न:-
कोणता नशा
भरलेल्या ढगांना देखील उडवून घेऊन जातो आणि बरसू देत नाही?
उत्तर:-
जर व्यर्थ
देह-अभिमानाचा नशा आला, तर भरलेले ढग देखील उडून जातील. आणि जरी बरसले तरी सेवे ऐवजी
डिस-सर्व्हिस करतील. जर बाबांवर प्रेम नसेल, त्यांच्याशी योग नसेल, तर ज्ञान असून
देखील जणू रिकामे आहेत. असे रिकामे ढग अनेकांचे कल्याण कसे बरे करतील!
ओम शांती।
आता थोडेच ढग
बाकी राहिले आहेत. ज्याप्रमाणे पाऊस जेव्हा कमी होतो, तेव्हा समुद्रावर ढग राहत
नाहीत, थंड पडतात (नाहीसे होतात). त्याचप्रमाणे इथे देखील थंड पडतात. ढग त्यांना
म्हटले जाईल जे रिफ्रेश होऊन, जाऊन ज्ञान वर्षा करतात. जर कोणी वर्षा करत नाहीत, तर
त्यांना ढग थोडेच म्हणणार. हे आहेत ज्ञानाचे ढग आणि ते आहेत पाण्याचे ढग. ज्ञानाचे
ढग जेव्हा सीझन असतो तेव्हा येतात. रिफ्रेश होऊन इतरांना देखील रिफ्रेश करतात. ढग
देखील नंबरवार असतात. काही तर खूप जोराने बरसतात. ढगांचे कामच आहे बरसणे आणि
कोमेजलेल्या रोपांना रिफ्रेश करणे. ज्यांच्यामध्ये पूर्ण ज्ञान आहे, ते लपून बसत
नाहीत. त्यांना बाबांच्या डायरेक्शनची देखील आवश्यकता नसते. ते आहेतच ढग. येतात मुळी
भरून बरसण्याकरिता. जिथे नापीक जमीन दिसेल, तिथे जाऊन तिला हिरवेगार केले पाहिजे.
महारथी मुले तर सर्व सेंटर्सना चांगल्या रीतीने जाणतात. कोणते सेंटर थंड आहे?
कोणत्या सेंटरवरील मुलांना जास्त वादळे येतात? महारथी सेवाधारी हे चांगल्या रितीने
जाणतात. बाबा देखील नेहमी म्हणतात - सेवाधारी मुलांना प्रेमपूर्वक आठवण द्या.
चांगले-चांगले ढग सेवेसाठी जातील. प्रदर्शनीमध्ये देखील सगळेच काही एकसारखे समजावून
सांगत नाहीत. मुख्य गोष्टच ही आहे. गीतेचे भगवान निराकार परमपिता परमात्मा आहेत,
साकारी श्रीकृष्ण नाहीत. समजावून सांगण्याची पद्धत खूप चांगली असली पाहिजे. पूर्ण
दिवसभर हेच विचार चालले पाहिजेत की, सर्वांना जाऊन जागे करावे. सर्वजण घोर
अंधारामध्ये पडून आहेत. सर्वांना प्रेमाने सांगत राहा की, दोन पिता आहेत. एक हदचे
आणि दुसरे बेहदचे. बेहदच्या बाबांनाच ‘पतित-पावन’ म्हटले जाते. आता तुम्हा मुलांना
बुद्धी मिळाली आहे. दुनियेतील मनुष्य भले दिसायला दिमाखदार आहेत, परंतु पत्थर-बुद्धी
आहेत. बाबा स्वतः म्हणतात - या साधू नाव धारण करणाऱ्यांचा देखील मलाच उद्धार करायचा
आहे. ते देखील रचयिता आणि रचनेला जाणत नाहीत. सतयुगा पासून मग हे ज्ञान प्रायः लोप
होते. परंतु हे कोणालाही ठाऊक नाहीये. शास्त्रांमध्ये हे ज्ञानच नाहीये. त्यांच्या
द्वारे (शास्त्रां द्वारे) कोणाचीही सद्गती होऊ शकत नाही. भगवद्गीतेचा किती मान आहे,
परंतु तो तर भक्तिमार्ग आहे. बाबा तर पतित-पावन आहेत, ते बसून राजयोग शिकवतात. तर
जरूर राजाई करिता नवीन दुनिया पाहिजे. बाबाच येऊन राजयोग शिकवतील. हे देखील आता
तुम्हाला माहित झाले आहे, ज्यांना कल्पापूर्वी समजावून सांगितले असेल, त्यांनाच आता
समजावून सांगतील आणि तेच समजतील. हे युद्ध काही ते युद्ध नाहीये, जशी नेहमी युद्ध
होत आली आहेत. ती युद्धे ८-१० वर्षे चालून पुन्हा बंद होतील. ड्रामा अनुसार जे
बॉम्ब बनले आहेत, ते काही ठेवण्यासाठी बनलेले नाहीत. पतित मनुष्यांचा मृत्यू झाल्या
शिवाय सतयुग येणार नाही. शांतीची स्थापना कशी होईल, हे देखील समजावून सांगावे लागेल.
शांतीची स्थापना करणे अथवा श्रेष्ठाचारी दुनिया बनविणे, हे तर एका बाबांचेच काम आहे.
बाबा म्हणतात - इतर सर्व संगतीपासून बुद्धीचा योग तोडून एकाशी संगत जोडायची आहे.
देहा सहित जे काही दिसून येते, त्या सर्वांपासून बुद्धीचा योग तोडायचा आहे. आता
आपल्याला परत जायचे आहे, तर घराचीच आठवण करायची आहे. आता तुम्ही समजता की, हा
मृत्युलोक आहे. आपण अमरलोक मध्ये जाण्यासाठी अमर कथा ऐकत आहोत. देवतांना म्हटले जाते
दैवी गुणवाले मनुष्य. इथे तर एकही देवता असू शकत नाही. श्रीकृष्णा विषयी देखील किती
निंदा लिहून ठेवली आहे. काहीच बुद्धीमध्ये येत नाही.
आता तुम्हा मुलांनी
चांगल्या रीतीने पुरुषार्थ करायचा आहे आणि दैवी गुण धारण करायचे आहेत. दैवी गुण
कशाला म्हटले जाते - ते देखील सांगितले जाते. संपूर्ण निर्विकारी जरूर बनायचे आहे.
हा आहे पहिला मुख्य गुण. जिथे-तिथे तुम्ही पाहाल की, पवित्र असणाऱ्या समोर अपवित्र
असणारे डोके टेकवतात. सतयुगामध्ये आहेतच पवित्र, त्यामुळे तिथे मंदिरे असत नाहीत.
नंतर जेव्हा पुजारी बनतात, तेव्हा मंदिरे बनवतात. जे पावन होते, तेच पतित बनतात. हा
आहे अनेक जन्मांमधील शेवटचा जन्म. बाबा म्हणतात - या जुन्या दुनियेला, जुन्या
शरीराला देखील विसरायचे आहे. या जुन्या दुनियेला आता नष्ट व्हायचे आहे. हिला नष्ट
व्हायला वेळ लागणार नाही. ही जुनी दुनिया, धन-दौलत, मालमत्ता सर्व काही गेले की गेले.
थोडेच दिवस बाकी आहेत. दुनियेमध्ये हे थोडेच कोणाला माहीत आहे की, ही जुनी दुनिया
नष्ट होणार आहे. तुम्ही सांगता, परंतु विश्वास सुद्धा बसला पाहिजे ना. भगवानुवाच,
जेव्हा समजेल तेव्हा बुद्धीमध्ये बसेल.
बाबा तुम्हा मुलांना
सांगतात - स्वतःला आत्मा समजून मज पित्याची आठवण करा. मुले जाणतात की, बेहदचे बाबा
आम्हाला राजयोग शिकवत आहेत. ते आहेत सर्व आत्म्यांचे पिता. सर्व आत्मे ब्रदर्स आहेत.
स्वर्गामध्ये सर्व ब्रदर्स सुखी होते, कलियुगामध्ये सर्व ब्रदर्स दुःखी आहेत. सर्व
आत्मे नरकवासी आहेत. केवळ आत्माच तर असणार नाही ना, शरीर देखील पाहिजे ना. आता
तुम्हा मुलांना आत्म-अभिमानी बनायचे आहे. यामध्येच मेहनत आहे. काही मावशीचे घर
नाहीये. ही अवस्था पक्की तेव्हा होईल, जेव्हा पहिले हा निश्चय असेल की, परमपिता
परमात्मा आपल्याला शिकवत आहेत. शिवबाबा येतातच या शरीरा द्वारे शिकविण्याकरिता. आपण
देखील शरीराद्वारे ऐकतो, धारणा करतो. संस्कारा नुसारच एक शरीर सोडून दुसरे शरीर
धारण करतो. जसे बाबा सैनिकांचे उदाहरण देतात. सैनिकाचे संस्कार घेऊन जातात, तर
पुन्हा त्याच क्षेत्रामध्ये येतात. आता बाबांच्या संस्कारा विषयी देखील तुम्हाला
माहीत आहे की, निराकार बेहदच्या बाबांमध्ये कोणते संस्कार आहेत! ते मनुष्य सृष्टीचे
बीजरूप आहेत. पतित-पावन, ज्ञानाचा सागर आहेत. तेच येऊन पावन बनवतील. बाबा म्हणतात -
मामेकम् (मज एकाची) आठवण करा, तर तुमची जन्म-जन्मांतरीची विकर्म विनाश होतील. नाही
तर खूप सजा भोगाव्या लागतील. कोणतेही पद मिळणार नाही.
आता मुले जाणतात की,
बाबा आपल्याला सोपा मार्ग सांगत आहेत. म्हणतात - मनमनाभव. हा शब्द गीतेमध्येही आहे,
परंतु त्याचा अर्थ समजत नाहीत. बाबा म्हणतात - मामेकम् (मज एकाची) आठवण करा. देहा
सहित देहाच्या सर्व धर्मांना सोडून स्वतःला आत्मा समजून मज परमपिता परमात्म्याची
आठवण करा. आठवणीलाच योग-अग्नी म्हटले जाते. ‘योग’ हा सर्वसामान्य शब्द आहे.
गीतेमध्ये देखील आहे, परंतु फक्त श्रीकृष्णाचे नाव घातल्यामुळे घोर अंधार करून ठेवला
आहे. आता तुम्ही समजावून सांगता तर म्हणतात - ‘ही तुमची कल्पना आहे’. काहीच समजत
नाहीत. त्यांना तर वारसा घ्यायचाच नाहीये. अगोदर हे तर समजले पाहिजे की, हे बेहदचे
बाबा, पिता देखील आहेत, टीचर देखील आहेत आणि सद्गुरू देखील आहेत, ते आम्हाला शिकवत
आहेत. हा पक्का विश्वास पाहिजे. नवीन व्यक्ती तर यावर विश्वास करणे, असंभव आहे. काही
नवीन असणारे देखील हुशार असतात, ते समजून जातात. काही जण तर इथे येऊ देखील इच्छित
नाहीत, अजिबात समजत नाहीत. जरा सुद्धा डोक्यात जात नाही. इतके असंख्य बी.के. आहेत,
तर जरूर त्यांना बाबांकडून वारसा मिळाला असेल. ही एक फॅमिली झाली. नावच लिहिलेले आहे
- ‘ब्रह्माकुमार-कुमारी’, तर फॅमिली झाली ना. प्रजापिता ब्रह्माची फॅमिली किती मोठी
आहे, परंतु ही गोष्ट कोणाच्याही डोक्यात येऊ शकत नाही. कोणी विचारले की, तुमचे एम
ऑब्जेक्ट काय आहे? तर सांगा, बाहेर बोर्डावर लिहिलेले आहे - प्रजापिता
ब्रह्माकुमार-कुमारी, तर ही फॅमिली झाली. आजोबांकडून वारसा मिळतो. प्रजापिता ब्रह्मा
मुखाद्वारे शिवबाबा रचना रचतात. तर ते क्रिएटर झाले; स्वर्गाची रचना करतात, तर जरूर
मुलांना स्वर्गाचा वारसा देतील. तर ही फॅमिली झाली ना - बाबा, मुलगे, मुली आणि आजोबा
आहेत. ब्रह्मा देखील आहेत, शिव देखील आहेत. ते आहेत रचयिता. निराकार आहेत, तर
मुलांना वारसा कसा देतील? ब्रह्मा द्वारे वारसा देतात. हे चांगल्या रीतीने समजावून
सांगितले पाहिजे. तुम्ही बोला, हे तुमच्या पित्याचे घर आहे. याला रुद्र ज्ञान यज्ञ
म्हटले जाते. आपण ब्राह्मण आहोत, बाबांव्यतिरिक्त इतर कोणीही राजयोग शिकवू शकत नाही.
गीते मध्ये देखील आहे ना - मनमनाभव अर्थात मामेकम् (मज एकाची) आठवण करा. तर आम्ही
त्या एका बाबांचीच आठवण करतो. भक्तिमार्गामध्ये गातात की - बाबा तुम्ही याल तेव्हा
आम्ही तुमच्या वर वारी जाऊ, आम्ही तुमचे बनू. मी आत्मा या देहाला सोडून तुमच्या
सोबत जाईन. तुमचे बनलो, तर जरूर तुमच्यासोबत सुद्धा जाऊ. साखरपुडा करतात तर साजन
सोबत घेऊन जाईल ना. हे शिव साजन देखील तुम्हाला सांगत आहेत - ‘मी तुम्हाला या
दुःखातून सोडवून सुखधाम मध्ये घेऊन जाईन’. मग आपल्या-आपल्या पुरुषार्था नुसार जाऊन
राज्य करणार, जे जितके ज्ञान धन धारण करतील तितके उच्च पद प्राप्त करतील. लहान-लहान
कुमारी देखील सेवा करत आहेत. त्यांनीच मोठ-मोठ्या विद्वान, पंडित इत्यादींना
समजावून सांगायचे आहे, आवड असली पाहिजे. जेव्हा कुस्ती खेळतात तेव्हा मोठी-मोठी
आव्हाने देतात की, याच्या सोबत मी लढणार (कुस्ती खेळून जिंकणार). सेवाभावी मुलांनी
आरामात झोपून राहता कामा नये. आराम हराम आहे. जे पण स्वतःला महारथी समजतात, त्यांनी
सुखाने झोपायचे नाही. सेवेसाठी फेरी मारली पाहिजे. आजकाल बाबा मोठ्या प्रमाणात
प्रदर्शनी बनवून घेत आहेत. मोठमोठ्या व्यक्तींना निमंत्रण पाठवा. आता नाही आले, तर
नंतर येतील. साधू-संत, महात्मा कोणीही असोत, त्यांना जागे करत राहा, परंतु संवाद
साधणारा महारथी पाहिजे. ज्यांचा बाबांसोबत योग नाही, प्रेम नाही, ते तर जणू रिकामे
ढग आहेत. ते काय करणार! हे तर जाणता की, शिकलेल्यां समोर अशिक्षित ओझे वाहतील.
प्रत्येक जण स्वतःला समजू शकतो की, मी कितपत अभ्यास केला आहे? सेवा करून दाखवतो का?
ढग जर भरलेला असेल आणि वर्षा करत नसेल, तर तो ढग काय कामाचा? प्रत्येकाला स्वतःची
समज असली पाहिजे. फालतू देह-अभिमानाच्या नशेमध्ये राहाल, तर कायमचे उच्च पद गमावून
बसाल. बाबांना सेवेची किती आवड आहे. सरकारला सांगितले पाहिजे की, आम्हाला हॉल
उपलब्ध करून द्या, जिथे आम्ही ही रुहानी सेवा करून मनुष्याला देवता बनवू शकतो. बाबा
आलेच आहेत राजयोग शिकविण्याकरिता, परंतु अतिशय युक्तीने समजावून सांगितले पाहिजे.
जे भाषणच करणे जाणत नाहीत, ते थोडेच समजावून सांगू शकतील. ते उच्च पद प्राप्त करू
शकणार नाहीत. पद तेच प्राप्त करतील, जे सेवा करतील. मोठमोठ्या व्यक्तींना लिहा तर
खरे की, ‘या नॉलेज शिवाय भारताचे अथवा दुनियेचे कल्याण होऊ शकत नाही’. मुख्य आहे
एज्युकेशन. या लक्ष्मी-नारायणाने देखील शिक्षणा द्वारेच हे पद प्राप्त केले ना.
मागील जन्मामध्ये राजयोग शिकले आहेत. आम्ही देखील आता इथे शिकत आहोत. शाळेमध्ये
स्टुडंट समजतात की, आम्ही ही परीक्षा देऊन मग जाऊन हे-हे बनणार. जे नॉलेज तुम्हाला
मिळते, ते या दुनियेसाठी नाहीये. तुम्ही देखील भविष्य २१ जन्मांसाठी, प्रारब्ध
बनविण्याकरिता शिकत आहात. ते (दुनियावाले) शिकतात या जन्मातील सुखासाठी. तर ते
शिक्षण (लौकिक शिक्षण) देखील घ्यायचे आहे आणि सोबत हे शिक्षण (रुहानी शिक्षण) देखील
शिकायचे आहे, यामध्ये घाबरण्याचे कारण नाही. स्पिरिच्युअल नॉलेज का घेऊ नये. चित्रे
घेऊन जाऊन समजावून सांगितले पाहिजे. तुम्ही बोला - हे नॉलेज सर्वांसाठी अतिशय
आवश्यक आहे. परंतु मुले अजून सेवेसाठी उभी राहत नाहीत. नोकरीच्या ओझ्यामध्येच अडकून
राहतात. बंधनमुक्त असतील, तर सेवेमध्ये लागले पाहिजे. सगळेच काही श्रीमतावर चालणारे
नाहीत. मध्येच माया घोटाळा करते. काही-काही मुलांना सेवेची खूप आवड आहे, परंतु तो
नशा चढत नाही की, आपण जाऊन अनेकांचे कल्याण करावे. तर बाबांना देखील आश्चर्य वाटते
की, जर का तुम्ही मोठे झाला आहात, तर मग गोंधळून का जाता! तुम्ही सांगू शकता की,
आम्हाला तर भारताचा उद्धार करायचा आहे. खरी सेवा करून मनुष्याला देवता बनवायचे आहे.
बाबांना आश्चर्य वाटते की, तो नशा चढत नाही; म्हणून बाबा म्हणतात - रजो-बुद्धी आहेत.
संधी खूप चांगली आहे. असे देखील अनेक आहेत, ज्यांना नॉलेजचा अहंकार खूप आहे, परंतु
तरीही ते डिस-सर्व्हिस खूप करतात. हे तर गूळ जाणे आणि गुळाची गोणी जाणे. राहूचे
ग्रहण बसते. बृहस्पतीची दशा उतरून राहूची दशा बसते. आता-आता बघाल तर चांगला चालत आहे;
आता-आता बघाल तर पुन्हा ग्रहचारी बसते, खाली पडतात (पतन होते). मुलांनी तर खूप
बहादूर बनायचे आहे. विडा उचलायचा आहे. आम्ही या भारताला स्वर्गवासी बनवूनच सोडू.
तुमचा धर्म आहे - नरकवासीयांना स्वर्गवासी बनवणे, भ्रष्टाचाऱ्यांना श्रेष्ठाचारी
बनवणे. बाबा नशा तर खूप चांगला चढवतात, परंतु मुलांना नंबरवार नशा चढतो. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) बंधनमुक्त
बनून भारताची खरी सेवा करायची आहे. रुहानी सेवा करून मनुष्याला देवता बनवायचे आहे.
ज्ञानाच्या अहंकारा मध्ये यायचे नाही. रुहानी नशेमध्ये राहायचे आहे.
२) निश्चयबुद्धी बनून
सर्वप्रथम आपली अवस्था पक्की करायची आहे. देहा सहित जे काही दिसते, त्या
सर्वांपासून बुद्धीचा योग तोडायचा आहे आणि एका बाबांसोबत जोडायचा आहे.
वरदान:-
करणे आणि
सांगणे - या दोन्हीला समान बनवून क्वालिटीची सेवा करणारे सच्चे सेवाधारी भव
कायम यावर लक्ष राहावे
की, अगोदर करायचे आहे आणि नंतर सांगायचे आहे. सांगणे सोपे असते, करण्यामध्ये मेहनत
आहे आणि मेहनतीचे फळ चांगले असते. परंतु जर इतरांना सांगता आणि स्वतः करत नसाल, तर
सेवे सोबतच डिस-सर्व्हिस देखील प्रत्यक्ष होते. जसे अमृतामध्ये विषाचा एक थेंब जरी
पडला तरी सारे अमृत विष बनते; अगदी तसेच कितीही सेवा करा, परंतु एक छोटीशी चूक
संपूर्ण सेवेला नष्ट करते. म्हणून सर्व प्रथम स्वतःकडे लक्ष द्या, तेव्हाच म्हणणार
सच्चे सेवाधारी.
बोधवाक्य:-
अनेकतेमध्ये
एकता आणणे, बिघडलेले सुधारणे - ही सर्वात मोठी विशेषता आहे.
हे अव्यक्त इशारे -
अपवित्रतेच्या बीजाला सुद्धा नष्ट करून संपूर्ण स्वच्छ (पवित्र) बना.
जेव्हा अपवित्रता
अर्थात काम महाशत्रूने स्वप्नामध्ये अथवा संकल्पामध्ये देखील वार करू नये, तेव्हा
म्हणणार - डबल अहिंसक. नेहमी आपण भाऊ-भाऊ आहोत, ही स्मृती सहज आणि स्वतः स्मृति
स्वरूपामध्ये राहावी. कधीही आपल्या संपूर्ण सतोप्रधान स्टेजवरून खाली घसरून स्वतःचा
घात करू नका. आत्म्याच्या खऱ्या गुण-स्वरूप आणि शक्ति-स्वरूप स्थिती पासून खाली येणे
अर्थात विस्मृत होणे, हे देखील पापाच्या खात्यामध्ये जमा होते.