11-10-26 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
18.01.2012 ओम
शान्ति
मधुबन
सेवे सोबतच एकमेकांचे
सहयोगी बनून वायुमंडळामध्ये तीव्र पुरुषार्थाची लाट पसरवा, मनजीत बनून आत्म्यांची
मनसा सेवा करा
आज विशेष स्नेहाचा
दिवस आहे. चोहो बाजूची मुले स्नेह स्वरूपाने मिलन साजरे करत आहेत. तुम्ही देखील
सर्व स्नेह स्वरूपामध्ये मग्न आहात. आज अमृतवेलेपासून चोहो बाजूची मुले
अमृतवेलेच्याही आधीपासून स्नेह रूपाने हृदयातील स्नेहाच्या मोत्यांच्या माळा घेऊन
पोहोचली होती. मनातील अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या भावनांचे बाबांसमोर वर्णन करत होती.
तुम्ही जाणता की मुलांचा स्नेह किती गोड आहे! वेगवेगळ्या भाषांमध्ये, वेगवेगळ्या
भावनेने बापदादांसमोर आपल्या मनातील गोष्ट बोलतही होती आणि डोळ्यांद्वारे,
चेहऱ्याद्वारे आपले भाव देखील स्पष्ट करत होती. बापदादा चोहो बाजूच्या मुलांचे
स्नेहाचे भाव पाहून सर्वांच्या स्नेहामध्ये मग्न झाले आणि अंतःकरणातून हेच शब्द
निघाले - ‘वाह बच्चे वाह!’ आणि मुलांच्या मुखातून ‘वाह बाबा वाह!’ ची गाणी ऐकू येत
होती. बापदादा प्रत्येक मुलाला पाहून मुलांच्या प्रेमामध्ये मग्न झाले होते आणि मुले
बाबांच्या प्रेमामध्ये मग्न झाली होती.
आजचा दिवस बाबा
मुलांना बालक सो मालक बनविण्याच्या दृष्टीने पाहत होते. आजचा दिवस मुलांच्या
राजतिलकाचा दिवस आहे. आजच्या दिवशी बापदादांनी स्वतः फरिश्ता रूपामध्ये राहून
मुलांना विश्व सेवार्थ निमित्त बनविले. स्वतः बॅकबोन बनले, मुलांना विश्वाच्या
स्टेजवर प्रत्यक्ष केले आणि बापदादा आता मुलांची सेवा पाहून, जी जबाबदारी दिली
त्याचा रिझल्ट पाहून मुलांवर खूप-खूप खूश आहेत आणि मनापासून मुबारक देत आहेत.
मुबारक असो, मुबारक असो.
बापदादांनी पाहिले की
अजूनही बाबांद्वारे दिलेल्या विश्व सेवाधारीच्या वरदानानुसार प्रत्येक मुलाने अतिशय
स्नेहाने आणि मनापासून सेवा केली आहे आणि करतही आहेत. रिझल्ट देखील बापदादांनी
पाहिला, प्रत्येक मुलाच्या मनामध्ये लगन (खोल विश्वास) आहे - ‘मेरा बाबा’ आणि
बाबांच्या हृदयामध्ये प्रेम आहे - ‘वाह मेरे बच्चे’. वर्तमान समयी मेजॉरिटी
लहान-मोठ्या सेंटर्सवरील निवासी मुलांमध्ये उमंग आहे की आता लवकरात लवकर चोहो बाजूला
बाबांना प्रत्यक्ष करायचेच आहे. हा उमंग, हा उत्साह बापदादांनी चक्कर मारून पाहिला,
लहान-मोठ्या सेवाकेंद्रावरील मुलांना खूप-खूप-खूप चांगला सेवेचा उमंग आहे आणि पुढेही
छान राहील. तर बापदादा आज स्नेहाच्या दिवशी चोहो बाजूच्या, मग देश असो अथवा विदेश,
सर्व मुलांना आपल्या दृष्टीने, मनापासून प्रेम आणि सेवेचा रिटर्न हृदयातील स्नेह,
प्रेमपूर्वक आठवण पद्मगुणा देत आहेत.
आता समयानुसार जो
उमंग आहे की बाबांना प्रत्यक्ष करायचे आहे, तो उमंग हळू-हळू आत्म्यांच्या मनामध्ये
देखील उत्पन्न होऊ लागला आहे. समजतात की ब्रह्माकुमारींनी काहीतरी प्राप्त केले आहे,
परिवर्तन होत आहे. यापूर्वी जसे समजत होते की, ‘माहित नाही काय करत आहेत’, आणि आता
इथपर्यंत आले आहेत की, ‘चांगले कार्य करत आहेत. जे आम्ही करू शकत नाही ते यांनी
करून आपल्या संघटनमध्ये सफलता प्राप्त केली आहे’; म्हणून आज बापदादा समोर बसलेल्या
मुलांना आणि चोहो बाजूला जी पण मुले ऐकत आहेत, पाहत आहेत त्या सर्व मुलांना विशेष
हृदयापासूनचा स्नेह, अंतःकरणातील प्रेम देत आहेत. आता पुढे काय करायचे आहे? सेवेची
मुबारक तर बापदादांनी दिली, आता बापदादांना हेच हवे आहे की, आता प्रत्येक मुलाने हा
उमंग-उत्साह, दृढ निश्चय आणि तीव्र पुरुषार्थ करायचा आहे की आता पित्यासमान फरिश्ता
बनायचेच आहे. कारण आता सर्वांना बाबांसोबत रिटर्न जर्नी करायची आहे. समान फरिश्ता
बनायचेच आहे कारण सर्वांचा वायदा आहे - सोबत येणार, सोबत राज्य करणार. तर ब्रह्मा
बाबा देखील फरिश्ता बनले, मग तुम्ही त्यांच्या सोबत कसे जाणार? ब्रह्मा बाबांनी
प्रत्यक्ष जीवनामध्येच फरिश्तापणाचे स्वरूप दाखवले. किती जबाबदारी होती! सर्वांना
योगी बनवायचेच आहे, परंतु इतकी जबाबदारी असताना देखील तुम्ही सर्वांनी पाहिले किती
न्यारे आणि प्यारे राहिले. सदैव निश्चिंत बादशहा बनून राहिले, चिंता नव्हती,
निश्चिंत बादशाह. असेच तुम्हा मुलांना देखील आता पित्यासमान निश्चिंत बादशहा फरिश्ता
बनायचेच आहे. हा दृढ संकल्प आहे, बनायचेच आहे! की असा विचार करता की, आज ना उद्या
बनूच!
आता बापदादांनी पाहिले
की आता समयानुसार जितका सेवेचा उमंग-उत्साह प्रॅक्टिकलमध्ये आहे, तितकेच आता तीव्र
पुरुषार्थी बनायचे आहे आणि बनवायचे आहे, संपन्न बनायचे आहे आणि बनवायचे आहे, या
मुद्द्यावर सुद्धा आता स्वतः देखील उमंग-उत्साहामध्ये राहा आणि वायुमंडळामध्ये
देखील उमंग-उत्साह निर्माण करा. एकमेकांचे सहयोगी बनून आता वायुमंडळामध्ये तीव्र
पुरुषार्थाची लाट पसरवा. एकमेकांमध्ये सेवेचा जसा उमंग वायुमंडळामध्ये पसरवला आहे,
तशी आता बापदादा मुलांप्रति हीच शुभ आशा बाळगत आहेत की, ही लाट आता संपूर्ण
वायुमंडळामध्ये पसरावी. बापदादा खूश आहेत परंतु अजूनही पुरुषार्थ बाकी आहे, तीव्र
पुरुषार्थ करायचा आहे. आता प्रत्येक मुलाच्या बाबतीत बापदादांची हीच अपेक्षा आहे
की, प्रत्येक मुलाने ‘आशेचा तारा’ बनावे. असा तारा आहात का? ज्यांना असे वाटते की,
आम्ही बाबांच्या आशेचे तारे बनून असा उमंग-उत्साह वायुमंडळामध्ये पसरवू, त्यांनी
हात वर करा. अच्छा. हात तर खूप छान वर करत आहेत. बापदादा हातांना पाहून खुश होत
आहेत. मेजॉरीटींनी हात वर केला आहे, पाठीमागच्या लोकांचे हात दिसले नाहीत परंतु
पुढच्या लोकांचे दिसले. आता पाठीमागचे लोकही हात वर करत आहेत, मुबारक असो, मुबारक
असो. अच्छा.
बापदादांनी पाहिले की
विशेषकरून मनामध्ये कोणत्याही गोष्टीचा उमंग-उत्साह येतो तेव्हा ते कार्य साकार
रूपामध्ये चांगले होते; म्हणून बापदादा यावेळी स्नेहाच्या दिवशी हा होमवर्क देत
आहेत की प्रत्येक मुलाचा मनामुळे जो संकल्प आणि वेळ व्यर्थ जातो; जेव्हा कधीही एखादा
व्यर्थ संकल्प येतो तेव्हा सर्वांना अनुभव असेल की त्याच्यामागे वेळ किती वेस्ट जातो.
एनर्जी किती वेस्ट जाते. तर बापदादा हा होमवर्क देऊ इच्छित आहेत की, हे दोन महिने
प्रत्येक मुलाने मनाचे व्यर्थ संकल्प आणि व्यर्थ वेळेची बचत करण्यासाठी स्वतःकरिता
विधि बनवावी. या दोन महिन्यांमध्ये प्रत्येकाने आपला चार्ट ठेवावा की व्यर्थ वेळ,
व्यर्थ संकल्पांवर किती कंट्रोल केले? कारण आता समयानुसार तुम्हा सर्वांना मनसा
शक्तीद्वारे आत्म्यांची मनसा सेवा करण्याची वेळ येईल. यासाठी सदैव मनावर अटेंशन
ठेवणे गरजेचे आहे. म्हटले देखील आहे - ‘मनजीत जगतजीत’. तर मनमनाभवच्या
वायुमंडळामध्ये मनातील व्यर्थ समाप्त करायचे आहे. करू शकता? कराल ना? जे हे करू
शकतात त्यांनी हात वर करा. बापदादा इनाम देतील. स्वतःचा रिझल्ट स्वतः पाहा. मन आनंदी
असेल तर मनाचा आनंद सर्वांना वाटाल. या पुरुषार्थामध्ये सर्वांनी जास्तीत-जास्त
पुढचा नंबर घेण्यावर अटेंशन ठेवा. संकल्प, समय या दोन्ही मधून व्यर्थ समाप्त आणि
समर्थ संकल्प समर्थ वेळ येणाऱ्या काळामध्ये वायुमंडळामध्ये पसरेल.
बापदादा एका गोष्टीवर
मुलांना पाहून खूश आहेत. कोणत्या गोष्टीवर? की प्रत्येक मुलाने सेवा तर केली आहे
परंतु त्याच सोबत बापदादांचा जो इशारा आहे की डबल राजा बना. जाणता ना! एक म्हणजे -
स्वराज्य अधिकारी आणि दुसरे - भविष्य राज्य अधिकारी. स्वराज्य अधिकारी आणि बाबांना
नशा आहे की असा कोणताही पिता नाही ज्याचे प्रत्येक मूल स्वराज्य अधिकारी असेल.
तुम्ही सर्व स्वराज्य अधिकारी आहात ना! स्व वर आत्मा राज्य करणारी आहे.
कर्मेंद्रियांच्या वश नाही, राज्य अधिकारी. तर बाबा हेच इच्छित आहेत की प्रत्येक
बच्चा सदैव स्वराज्य अधिकारी राहावा, कधी-कधी नाही. असे बनू शकता? हे दोन महिने जे
दिले आहेत, यामध्ये नोट करा की, मी स्वराज्य अधिकारी होतो? की कर्मेंद्रियांच्या वश
बनलो? आता कर्मातीत बनायचे आहे, वेळ जवळ येत आहे. तर काय करायचे आहे? चालता-फिरता
स्वराज्य अधिकारी बनायचेच आहे. हे संस्कार तुम्हा ब्राह्मण मुलांचेच आहेत. डबल
राज्य आहे - स्वराज्य आणि मग भविष्यामध्ये विश्व राज्य. बापदादा चक्कर मारून मुलांचा
रिझल्ट नोट करत असतात; तर ‘सदैव स्वराज्य अधिकारी’, यामध्ये आता अटेंशन हवे. तर
बापदादांनी दोन कामे दिली आहेत - एक म्हणजे हे दोन महिने, मी स्वराज्य अधिकारी
कितपत बनून राहतो? तो आपला रिझल्ट पाहायचा आहे आणि त्याच सोबत मनाच्या कंट्रोलिंग
पॉवरद्वारे, रूलिंग पॉवरद्वारे व्यर्थ समाप्त करायचे आहे. यामध्ये जे नंबर घेतील
त्यांना बापदादा इनाम देतील. पसंत आहे? करायचे आहे ना! कराल? कराल ना! मान हलवा.
अच्छा.
बापदादांनी आज
सर्वांचे जे प्रेम आहे ते स्वीकार केले. अमृतवेलेला तर वतनमध्ये देखील पुष्कळ
मुलांची रिमझिम होती. आज वतनमध्ये ॲडव्हान्स पार्टी देखील आपल्या हृदयातील स्नेह
देण्यासाठी आणि घेण्यासाठी आली होती. आता ते बाबांना विचारत आहेत की, शेवटी आमचा हा
पार्ट कधीपर्यंत? तर काय उत्तर देऊ? पहिल्या लाईन मध्ये असणाऱ्यांनी सांगा, काय
उत्तर देऊ? काय म्हणाली? (दादी जानकी म्हणाल्या - ‘आम्ही रेडी आहोत’) तुम्ही
एकट्याच जाणार का? (सर्वजण जातील) तुमचे प्रेम आहे ना, असे सोडून राज्य कसे करणार?
(ॲडव्हान्स पार्टीवाले आम्हाला सोडून निघून का गेले?) त्यांचा पार्ट होता ना.
त्यांना जायचेच होते. आता तुम्ही हा प्रयत्न करा की लवकर-लवकर संघटन तयार करा. जे
दोन महिने काम दिले आहे ना, जर हे काम तुम्ही सर्वांकडून करून घ्याल, रिझल्ट काढाल
तर लवकर होईल. (बाबांवरील प्रेमासाठी करून घेऊ) प्रेम तर आहे, प्रेमामध्ये सर्वजण
पास आहेत. बापदादा बघतात की स्नेह सर्वांचा आहे परंतु स्नेहासोबत शक्ती देखील पाहिजे.
यासाठी अमृतवेलेला पॉवरफुल बनवा. बसतात, बापदादा बसल्या बद्दल मुबारक देत आहेत,
परंतु बसण्याचे वायुमंडळ शक्तिशाली हवे, कोणी कसे बसतात, तर कोणी कसे. जर तुम्ही
फोटो काढला ना, तर तुम्हाला स्वतःलाच वाटेल की, आता आणखी कशाची तरी गरज आहे.
बापदादांनी ज्वालामुखी योगाबद्दल जे सांगितले आहे, त्यावर आता आणखी गांभीर्याने
लक्ष द्या. पुरुषार्थ तर सगळेच करत आहेत, परंतु पुरुषार्थाच्या आधी ‘तीव्र’ शब्द
जोडा. आता बापदादांनी प्रत्येक मुलाला हा दोन महिन्यांचा कालावधी दिला आहे, या
काळामध्ये तुम्ही जितके अटेंशन द्याल, तर अटेंशन सोबत बापदादा देखील तुम्हाला
एक्स्ट्रा सहयोग देतील. मनाचे मालक, मनाला असे चालवा जसे पायांना आणि हातांना चालवता.
जे हवे आहे ते करता ना! आता तुम्हाला वाटले की इथे नाही तिथे ठेवू, तर ठेवू शकता
ना! असा माइंड कंट्रोल, जो हवा तोच मनाने संकल्प करावा. रोज रात्री रिझल्ट पाहा की,
आज मनाची रूलिंग पॉवर, कंट्रोलिंग पॉवर कितपत राहिली? आता लवकरात-लवकर व्यर्थला
समाप्त केले पाहिजे, आता समर्थ बनून वायुमंडळमध्ये समर्थपणाची शक्ती पसरवा. बापदादा
तर मुलांचे दुःख, वेदना, हाका ऐकून तुम्हा मुलांद्वारे आता लवकर समाप्ती करू इच्छित
आहेत. ऐकवले ना, पुरुषार्थ तर सगळेच करत आहेत परंतु आता ‘तीव्र’ ला ॲड करा. करायचेच
आहे; करू, पाहू…, हे करू-पाहू चालणार नाही.
स्नेहाचा देखावा
देखील आज पाहिला, प्रत्येकाच्या मनामध्ये किती प्रेम आहे परंतु जितके प्रेम आहे ना,
तितकीच सोबत शक्ती देखील हवी. आता शक्तीला भरा. कधीही कोणत्याही बहिणींनी स्वतःला
केवळ ‘शक्ती’ नाही परंतु ‘शिवशक्ती’ समजा. शिवशक्ती, बाबा सोबत आहेत. पांडवांसोबत
‘पांडवपती’ सोबत आहे. तर आता काय कराल? जे बापदादांनी सांगितले आहे - पुरुषार्थाच्या
आधी ‘तीव्र’ शब्द लावा. वायुमंडळ बनवा. एकमेकांचे सहयोगी बनून प्रत्येकाने आपापल्या
ज्या ठिकाणी राहता, त्या स्थानाला शक्तिशाली बनवा, साथीदारांना शक्तिशाली बनवा. तर
आता काय कराल? नवीनता कराल ना! जेव्हा ‘माझे बाबा’ म्हणता, तर माझ्यासारखे बनावे तर
लागेल ना! प्रत्येकाने आपल्या मनामध्ये दृढ संकल्प करा. संकल्प तर चांगले-चांगले
करता, अमृतवेलेला बापदादा पाहतात की संकल्प चांगले करता की, आम्ही हे करणार, असे
करणार, तसे करणार; परंतु जेव्हा कर्मयोगी बनता, संबंध-संपर्कामध्ये येता तेव्हा
त्यामध्ये फरक पडतो. ‘कर्मयोगी’ स्थिती यावर जास्त अटेंशन हवे. अच्छा.
सर्वजण आनंदी तर आहात
ना? आनंदी आहात? पाहा, नवीन मुले देखील किती येतात! जे नवीन पहिल्यांदा आले आहेत
त्यांनी हात वर करा. पाहा किती आहेत! अर्धा क्लास नवीन आला आहे. बापदादा आलेल्या
नवीन मुलांना पाहून खूश आहेत कारण लास्ट समाप्तीच्या वेळेआधी तर आला आहात. परंतु
जितके लेट आला आहात तितकाच तीव्र पुरुषार्थ करावा लागेल कारण या थोड्या वेळामध्ये
तुम्हाला पूर्ण २१ जन्मांचे भविष्य बनवायचे आहे. इतके अटेंशन ठेवावे लागेल. वेळ
वाचवा, सेकंद सुद्धा व्यर्थ घालवू नका. तीव्र पुरुषार्थी बनून राहा, साधारण
पुरुषार्थाने पोहोचणे कठीण आहे. तरीही बापदादा आलेल्या मुलांना मनापासून मुबारक देत
आहेत. अच्छा.
टीचर्स बहिणी भरपूर
आल्या आहेत - टीचर्सना पाहून तर बापदादा खूप खूश होतात कारण ज्या निमित्त टीचर्स
बनल्या आहेत, त्या बापदादांना प्रत्यक्ष करण्यासाठी निमित्त बनलेल्या आहेत.
कोणत्याही टीचरला पाहून खुश होतात कारण टीचर्स अर्थातच ज्यांच्या फीचर्समधून फ्युचर
दिसून यावे. तुमचे फ्युचर काय आहे? फ्युचर आहे - सदैव दिलखुश, सदैव अधिकारी, अधीन
होणारे नाही. तर टीचर्सचे फीचर्स हा साक्षात्कार घडवतात. प्रत्येक टीचरने सदैव हेच
समजावे, भले कुठे बोला, कुठे नको बोलू, तरीही चालेल, परंतु वर्तमान समयाची प्राप्ती
आणि भविष्याची प्राप्ती मात्र तुमचे फीचर्स, तुमचा चेहरा दाखवतो. सदैव यावर अटेंशन
ठेवा की, आमचा चेहरा असा साक्षात्कार घडवणारा असावा. कोणीही टीचर समोर आले, टीचरला
पाहून एक तर खुशमिजाज व्हावेत (हलके आणि आनंदी व्हावेत), त्यांच्या जीवनामध्ये आनंद
दिसून यावा. अशा खुशनुमा आणि खुशकिस्मत (आनंदी आणि भाग्यवान) आहात. बापदादांनी
पाहिले आहे की, प्रत्येक टीचरचे लक्ष्य चांगले आहे. करायचेच आहे, बनायचेच आहे. असे
आहे ना? लक्ष्य काय आहे? हेच लक्ष्य आहे ना! तर हे लक्ष्य लक्षणामध्ये दिसून येते
सुद्धा, परंतु अजून जास्त दिसून आले पाहिजे. जो कोणी येईल, तो जरूर आनंद घेऊन जाईल;
कारण प्रत्येक मनुष्यासाठी आनंद आवश्यक आहे. इच्छा असते, परंतु बनू शकत नाहीत; तर
टीचर्स अर्थात फीचर्स द्वारे सुद्धा सेवा करावी. इतरांना अनुभव व्हावा की, या काय
बनल्या आहेत! आता पुढे जाऊन तुमचा चेहरा आणि चलन, ही सेवा जास्त करेल. कारण जशी वेळ
नाजूक येईल तसा वेळ कमी मिळेल परंतु इच्छा वाढेल की, ‘काहीतरी मिळावे, काहीतरी
मिळावे’. यासाठी टीचर्सनी सदैव असे एव्हररेडी राहिले पाहिजे, जेणेकरून कोणीही आला
तर तो कमीत-कमी काहीतरी घेऊनच जावा. चेहरा आणि चलनद्वारे सुद्धा काही ना काही घेऊन
जावा. दात्याची मुले आहात ना! बापदादा तर टीचर्सना पाहून खूप खुश होतात. मनापासून
गुण गातात - ‘वाह टीचर्स वाह!’ कारण प्रत्येक टीचर सेवा तर करतेच आणि रात्री आपला
रिझल्ट पाहत देखील असतील की, आजची सेवा कशी काय झाली! स्वतःचा चार्ट तर स्वतःच
पाहतात. सेवेचे जे लक्ष्य ठेवले होते तेवढे झाले का? जर काही कारणाने झाले नाही, तर
दुसऱ्या दिवशी डबल करा. असेच सोडू नका कारण टीचर्स अर्थात निमित्त दात्याची मुले,
दाता. तर बापदादा खूश होतात, भले मग त्या छोट्या सेंटरच्या असोत किंवा मोठ्या
सेंटरच्या, परंतु त्याग करून सेवास्थानावर येणे, ही देखील हिंमत आहे ना. तर बापदादा
तुमच्या हिंमतीवर तर खूश आहेत. आता अजून साथीदार बनवा. अजून आणखी टीचर्स तयार करा
कारण सेवा वाढणारच आहे. आता थोडा गोंधळ माजेल आणि त्यानंतर सर्वजण उत्कंठेने तुमच्या
समोर येतील. सर्व्हिस वाढणार आहे, कमी होणार नाही. अच्छा!
वरदान:-
स्वमानाच्या
सीटवर स्थित राहून मायेला सरेंडर करायला लावणारे श्रेष्ठ स्वमानधारी भव
संगमयुगाचा सर्वात
श्रेष्ठ स्वमान आहे - ‘मास्टर सर्वशक्तिमान’च्या स्मृतीमध्ये राहणे. जसा एखादा मोठा
ऑफिसर अथवा राजा जेव्हा स्वमानाच्या सीटवर स्थित असतो तेव्हा इतरही त्याला सन्मान
देतात. जर का तो स्वतःच सीटवर नसेल तर मग त्याची ऑर्डर कोणीही मानणार नाही; तसेच
तुम्ही देखील स्वमानधारी बनून आपल्या श्रेष्ठ स्वमानाच्या सीटवर सेट राहा म्हणजे मग
माया तुमच्यासमोर सरेंडर होईल.
सुविचार:-
साक्षीपणाच्या
स्थितीमध्ये राहून दिलारामच्या सोबतीचा (बाबांच्या सोबतीचा) अनुभव करणारेच लवलीन
आत्मा आहेत.
हे अव्यक्त इशारे -
परोपकाराच्या भावनेने संपन्न बनून अपकारीवर देखील उपकार करा.
अपकारीवर देखील उपकार
करणे, हेच ‘ज्ञानी तू आत्म्या’चे कर्तव्य आहे. जसे बाबांनी निंदेला देखील कल्याणकारी
दृष्टीने पाहिले. उपकारीवर उपकार तर दुनियावाले सुद्धा करतात, भक्त-आत्मे देखील
करतात; परंतु ‘ज्ञानी तू आत्मा’ याचा अर्थ आहे - सर्वांप्रती कल्याणाची भावना,
संकल्प मात्र सुद्धा अकल्याणाची भावना नसावी. अपकारीवर देखील उपकार कराल, तेव्हाच
म्हटले जाईल - विश्व कल्याणकारी.