11-11-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड
मुलांनो - तुम्ही मनापासून ‘बाबा-बाबा’ म्हणा तर आनंदाने रोमांच उभे राहतील,
आनंदामध्ये रहा तर मायाजीत बनाल”
प्रश्न:-
मुलांना
कोणत्या एका गोष्टीमध्ये मेहनत करावी लागते परंतु खुशी आणि आठवणीचा तोच आधार आहे?
उत्तर:-
आत्म-अभिमानी बनण्यासाठीच मेहनत लागते परंतु यानेच आनंदाचा पारा चढतो, गोड बाबांची
आठवण येते. माया तुम्हाला देह-अभिमानामध्ये आणत राहील, पैलवानासोबत पैलवान होऊन
लढेल, यामध्ये गोंधळून जायचे नाही. बाबा म्हणतात - मुलांनो, मायेच्या वादळांना घाबरू
नका, फक्त कर्मेंद्रियांद्वारे कोणतेही विकर्म करू नका.
ओम शांती।
रुहानी बाबा रुहानी मुलांना समजावून सांगत आहेत अथवा शिकवण देत आहेत, शिकवत आहेत.
मुले जाणतात शिकविणारे बाबा सदैव देही-अभिमानी आहेत. ते आहेतच निराकार, देह धारणच
करत नाहीत. पुनर्जन्मामध्ये येत नाहीत. बाबा म्हणतात तुम्हा मुलांना माझ्या सारखे
स्वतःला आत्मा समजायचे आहे. मी आहे परमपिता. परमपित्याला देह असत नाही. त्यांना
देही-अभिमानी देखील म्हणणार नाही. ते तर आहेतच निराकार. बाबा म्हणतात - मला स्वतःचा
देह नाहीये. तुम्हाला तर देह मिळत आला आहे. आता माझ्या सारखे देहापासून न्यारे होऊन
स्वतःला आत्मा समजा. जर विश्वाचे मालक बनायचे असेल तर अजून कोणती कठीण गोष्ट नाहीये.
बाबा म्हणतात - देह-अभिमानाला सोडून माझ्या सारखे बना. सदैव बुद्धीमध्ये लक्षात
राहावे की, मी आत्मा आहे, आम्हाला बाबा शिकवत आहेत. बाबा तर निराकार आहेत, परंतु
आम्हाला शिकवणार कसे? म्हणून बाबा येऊन या तना द्वारे शिकवतात. गोमुख दाखवतात ना.
आता गोमुखातून तर गंगा येऊ शकत नाही. मातेला देखील गोमाता म्हटले जाते. तुम्ही सर्व
गायी आहात. हे ब्रह्मा काही गाय नाहीये. मुखाद्वारे ज्ञान मिळते. बाबांची गाय तर
नाही आहे ना - बैलावर देखील स्वार झालेले दाखवतात. ते तर शिव-शंकर एक आहेत असे
म्हणतात. तुम्ही मुले आता समजता. शिव-शंकर एक नाहीत. शिव तर आहेत उच्च ते उच्च मग
ब्रह्मा-विष्णू-शंकर. ब्रह्मा आहेत सूक्ष्मवतनवासी. तुम्हा मुलांना विचार सागर मंथन
करून पॉईंट काढून समजावून सांगावे लागते, आणि निडर देखील बनायचे आहे. फक्त तुम्हा
मुलांनाच आनंद आहे. तुम्ही म्हणाल - आम्ही ईश्वराचे विद्यार्थी आहोत, आम्हाला बाबा
शिकवत आहेत. भगवानुवाच देखील आहे - माझ्या मुलांनो, मी तुम्हाला राजांचाही राजा
बनविण्यासाठी शिकवतो. भले कुठेही जाता, सेंटर्सवर जाता, बुद्धीमध्ये आहे की बाबा
आम्हाला शिकवत आहेत. आता जे आपण सेंटरवर ऐकत आहोत, बाबा मुरली चालवत आहेत.
‘बाबा-बाबा’ करत रहा. ही देखील तुमची यात्रा झाली. योग शब्द शोभत नाही. मनुष्य
अमरनाथ, बद्रीनाथची यात्रा करण्यासाठी पायी जातात. आता तुम्हा मुलांना तर जायचे आहे
आपल्या घरी. तुम्ही जाणता आता हे बेहदचे नाटक पूर्ण होत आहे. बाबा आले आहेत, आम्हाला
लायक बनवून घेऊन जाण्यासाठी. तुम्ही स्वतः म्हणता आम्ही पतित आहोत. पतित थोडेच
मुक्तीला प्राप्त करतील. बाबा म्हणतात - माझ्या आत्म्यांनो, तुम्ही पतित बनला आहात.
ते (दुनियावाले) शरीराला पतित समजून गंगेमध्ये स्नान करण्यासाठी जातात. आत्म्याला
तर ते निर्लेप समजतात. बाबा समजावून सांगतात - मूळ गोष्ट आहेच आत्म्याची. म्हणतात
देखील - पाप-आत्मा, पुण्य-आत्मा. हे शब्द चांगल्या रीतीने लक्षात ठेवा. समजून
घ्यायचे आहे आणि समजावून सांगायचे आहे. तुम्हालाच भाषण इत्यादी करायचे आहे. बाबा
काही गावोगाव, गल्ली-गल्लीमध्ये जाणार नाहीत. तुम्ही घरोघरी ही चित्रे ठेवा. ८४ चे
चक्र कसे फिरते, शिडीच्या चित्रामध्ये खूप क्लिअर आहे. आता बाबा म्हणतात -
सतोप्रधान बना. आपल्या घरी जायचे आहे, पवित्र बनल्याशिवाय काही तुम्ही घरी जाणार
नाही. हाच फुरना (ध्यास) लागून रहावा. बरीच मुले लिहितात - ‘बाबा, आम्हाला खूप वादळे
येतात. मनसामध्ये खूप खराब विचार येतात. पूर्वी येत नसत’.
बाबा म्हणतात - तुम्ही
हा विचार करू नका. पूर्वी काही तुम्ही युद्धाच्या मैदानात थोडेच होता. आता तुम्हाला
बाबांच्या आठवणीमध्ये राहून मायेवर विजय प्राप्त करायचा आहे. याची क्षणोक्षणी आठवण
करत रहा. गाठ मारून ठेवा. जसे माता गाठ मारतात, पुरुष लोक मग वहीत लिहितात. तुमचा
तर हा बॅज चांगली निशाणी आहे. आम्ही प्रिन्स बनतो, ही आहेच बेगर टू प्रिन्स (गरिबापासून
राजकुमार) बनण्याची गॉडली युनिव्हर्सिटी. तुम्ही प्रिन्स होता ना. श्रीकृष्ण
वर्ल्डचा प्रिन्स होता. जसे इंग्लंडचा देखील प्रिन्स ऑफ वेल्स म्हटले जाते. त्या
आहेत हदच्या गोष्टी, राधे-कृष्ण तर खूप नामीग्रामी आहेत. स्वर्गाचे
प्रिन्स-प्रिन्सेस होते ना म्हणून त्यांच्यावर सगळे प्रेम करतात. श्रीकृष्णावर तर
खूप प्रेम करतात. खरेतर दोघांवरही प्रेम करायला पाहिजे. पहिले तर राधेवर केले पाहिजे.
परंतु मुलावर जास्त प्रेम असते कारण तो वारसदार बनतो. पत्नीचे देखील पतीवर प्रेम
असते. पतीसाठीच म्हणतात - हा तुझा गुरु ईश्वर आहे. पत्नीसाठी असे म्हणत नाहीत.
सतयुगामध्ये तर मातांची महिमा आहे. पहिले लक्ष्मी मग नारायण. अंबेचा किती रिगार्ड
ठेवतात. ब्रह्माची मुलगी आहे. ब्रह्माचा इतका नाही आहे, ब्रह्माचे मंदिर अजमेरमध्ये
आहे. जिथे मेळे इत्यादी भरतात. अंबेच्या मंदिरामध्ये देखील मेळा भरतो. वास्तविक हे
सर्व मेळे खराब बनवण्यासाठीच आहेत. तुमचा हा मेळा आहे स्वच्छ बनण्याचा. स्वच्छ
बनण्याकरिता तुम्हाला स्वच्छ बाबांची आठवण करायची आहे. पाण्याने काही पाप नष्ट होत
नाहीत. गीतेमध्ये देखील भगवानुवाच आहे - ‘मनमनाभव’. सुरुवातीला आणि शेवटी हे शब्द
आहेत. तुम्ही मुले जाणता - आम्ही देखील सुरुवातीला भक्ती सुरू केली आहे. सतोप्रधान
भक्ति मग सतो-रजो-तमो भक्ती असते. आता तर बघा दगड-माती इत्यादी सर्वांची पूजा करतात.
या सर्व आहेत अंधश्रद्धा. यावेळी तुम्ही संगमावर बसला आहात. हे उलटे झाड आहे ना.
वरती आहे बीज. बाबा म्हणतात - या मनुष्य सृष्टीचे बीज रचता मी आहे. आता नव्या
दुनियेची स्थापना करत आहे. सैपलिंग (कलम) लावतात ना. झाडाची जुनी पाने गळून जातात.
नवी-नवी पालवी फुटते. आता बाबा देवी-देवता धर्माची स्थापना करत आहेत. अनेक पाने
आहेत जी मिक्स झाली आहेत. स्वतःला हिंदू म्हणवतात. वास्तविक हिंदू आहेतच मुळी आदि
सनातन देवी-देवता धर्माचे. हिंदुस्थानचे वास्तविक नावच आहे - भारत, जिथे देवता वास
करत होते. दुसऱ्या कोणत्याही देशाचे नाव बदलत नाही, याचे नाव बदलले आहे. हिंदुस्थान
म्हणतात. बौद्ध लोक असे म्हणणार नाहीत की, आमचा धर्म जपानी किंवा चिनी आहे. ते तर
आपल्या धर्माला बौद्धच म्हणतील. तुमच्यापैकी कोणीही स्वतःला आदि सनातन देवी-देवता
धर्माचा म्हणत नाही. जर कोणी म्हटले तर विचारा - तो धर्म कधी आणि कोणी स्थापन केला?
काहीही सांगू शकणार नाहीत. कल्पाचा कालावधीच भलामोठा केला आहे, याला म्हटले जाते
अज्ञान अंध:कार. एक म्हणजे आपल्या धर्माविषयी तर पत्ताच नाही, दुसरे म्हणजे
लक्ष्मी-नारायणाच्या राज्याला खूप दूर घेऊन गेले आहेत म्हणून घोर अंध:कार म्हटले
जाते. ज्ञान आणि अज्ञानामध्ये किती फरक आहे. ज्ञान सागर आहेतच एक शिवबाबा. त्यातून
जणू काही तुम्हाला एक लोटाभर देतात. कोणालाही फक्त एवढेच सांगा की, शिवबाबांची आठवण
करा तर विकर्म विनाश होतील. हे जसे ओंजळभर पाणी झाले ना. कोणी तर स्नान करतात, कोणी
घडा भरून नेतात. कोणी छोटीशी लोटी भरून नेतात. रोज एक-एक थेंब मटक्यात टाकून त्याला
ज्ञान-जल समजून पितात. विलायतमध्ये देखील वैष्णव लोक गंगाजलाचे घडे भरून घेऊन जातात.
मग मागवत राहतात. आता हे तर सारे पाणी डोंगरावरूनच येते. वरून देखील पाणी शिंपडतात.
आजकाल बघा बिल्डिंग देखील किती उंच १०० मजल्यापर्यंत बनवतात. सतयुगात तर असे होणार
नाही. तिथे तर तुम्हाला इतकी जमीन मिळते की काही विचारू नका. इथे राहण्यासाठी जमीन
नाहीये, म्हणून तर इतके मजले बनवतात. तिथे धान्य देखील अमाप पिकत होते. जसे
अमेरिकेमध्ये पुष्कळ धान्य पिकले तर जाळून टाकतात. हा आहे मृत्युलोक. तो आहे अमरलोक.
अर्धा कल्प तुम्ही तिथे सुखामध्ये राहता. काळ आत प्रवेश करू शकत नाही. यावर एक कथा
देखील आहे. ही आहे बेहदची गोष्ट. बेहदच्या गोष्टींवरुन मग हदच्या गोष्टी बसून तयार
केल्या आहेत. धर्मग्रंथ (गीता) पूर्वी किती लहान होता. आता तर किती मोठा केला आहे.
शिवबाबा आकाराने किती छोटे आहेत, त्यांची देखील किती मोठी प्रतिमा बनवली आहे.
बुद्धाचे चित्र, पांडवांची चित्रे खूप उंचच उंच बनवली आहेत. असे तर कोणी असत नाही.
तुम्हा मुलांना तर हे एम ऑब्जेक्टचे चित्र (लक्ष्मी-नारायणाचे चित्र) प्रत्येक घरात
ठेवायचे आहे. आम्ही शिकून हे बनत आहोत. मग रडले थोडेच पाहिजे. जे रडतात ते गमावतात.
देह-अभिमानामध्ये येतात. तुम्हा मुलांना आत्म-अभिमानी बनायचे आहे, यामध्येच मेहनत
करावी लागते. आत्म-अभिमानी बनल्यानेच आनंदाचा पारा चढतो. गोड बाबांची आठवण येते.
बाबांकडून आम्ही स्वर्गाचा वारसा घेत आहोत. बाबा आम्हाला या भाग्यशाली रथामध्ये
प्रवेश करून शिकवतात. रात्रंदिवस बाबा-बाबा अशी आठवण करत रहा. तुम्ही अर्ध्या
कल्पाचे आशिक आहात. भक्त भगवंताची आठवण करतात. भक्त आहेत अनेक. ज्ञानामध्ये सर्वजण
एका बाबांची आठवण करतात. तेच सर्वांचे पिता आहेत. ज्ञान सागर बाबा आम्हाला शिकवत
आहेत. तुम्हा मुलांना तर रोमांच उभे राहिले पाहिजेत. मायेची वादळे तर येणारच. बाबा
(ब्रह्मा बाबा) म्हणतात - सर्वात जास्ती वादळे तर मला येतात कारण मी सर्वात पुढे आहे.
माझ्याकडे येतात तेव्हाच तर मला समजते - मुलांकडे किती येत असतील. गोंधळून जात
असतील. अनेक प्रकारची वादळे येतात जी अज्ञान काळात सुद्धा कधी येत नसतील, ती देखील
येतात. पहिली मला आली पाहिजेत, नाहीतर मी मुलांना कसे समजावून सांगू शकेन. हे आहेत
फ्रंटला (सर्वात पुढे). रुस्तम (पैलवान) आहेत तर माया देखील पैलवानाशी पैलवान होऊन
लढते. मल्लयुद्धा मध्ये सगळेच काही एकसारखे नसतात. फर्स्ट, सेकंड, थर्ड ग्रेड असते.
सर्वात जास्ती वादळे बाबांकडे येतात, म्हणून बाबा म्हणतात या वादळांना घाबरू नका.
फक्त कर्मेंद्रियांद्वारे कोणतेही विकर्म करू नका. बरेचजण म्हणतात - ज्ञानामध्ये आलो
आहोत तर हे असे का होते, यापेक्षा तर ज्ञान घेतले नसते तर चांगले झाले असते.
संकल्पच आले नसते. अरे हे तर युद्ध आहे ना. पत्नी समोर असतानाही पवित्र दृष्टी रहावी,
समजायचे आहे की, आम्ही शिवबाबांची मुले भाऊ-भाऊ आहोत मग प्रजापिता ब्रह्माची संतान
बनल्यावर भाऊ-बहीण झालो. मग विकार कुठून आला. ब्राह्मण आहेत सर्वोच्च शिखा. तेच मग
देवता बनतात तर आम्ही भाऊ-बहीण आहोत. एका बाबांची मुले कुमार-कुमारी. जर दोघे
कुमार-कुमारी बनून राहिले नाहीत तर भांडणे होतात. अबलांवर अत्याचार होतात. पुरुष
देखील लिहितात माझी पत्नी तर जशी पुतना आहे. खूप मेहनत आहे. तरुणांना तर खूप मेहनत
करावी लागते. आणि जे गंधर्व-विवाह करून एकत्र राहतात, त्यांची तर कमाल आहे. त्यांना
खूप उच्च पद मिळू शकते. परंतु जेव्हा अशी अवस्था धारण करतील तेव्हा. ज्ञानामध्ये
अतिशय हुशार होतील. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) मायेच्या
वादळांना घाबरायचे किंवा गोंधळून जायचे नाही. फक्त लक्ष ठेवायचे आहे
कर्मेंद्रियांकडून कोणते विकर्म होऊ नये. ज्ञान सागर बाबा आम्हाला शिकवतात - याच
आनंदामध्ये रहायचे आहे.
२) सतोप्रधान
बनण्यासाठी आत्म-अभिमानी बनण्याची मेहनत करायची आहे, ज्ञानाचे विचार सागर मंथन
करायचे आहे, आठवणीच्या यात्रेमध्ये रहायचे आहे.
वरदान:-
शुभ
चिंतनाद्वारे ज्ञान-सागरामध्ये सामावून जाणारे (एकरूप होणारे) अतींद्रिय सुखाचे
अनुभवी भव जसे सागरामध्ये राहणारे जीव-जंतू सागराशी एकरूप झालेले असतात, बाहेर पडू
इच्छित नाहीत, मासा देखील पाण्यामध्येच राहतो, सागर आणि पाणी हाच त्याचा संसार आहे.
अगदी तसेच तुम्ही मुले देखील शुभ-चिंतनाद्वारे ज्ञान-सागर बाबांमध्ये सदैव एकरूप
होऊन रहा, जोपर्यंत सागरामध्ये एकरूप होण्याचा अनुभव होत नाही तोपर्यंत अतींद्रिय
सुखाच्या झोपाळ्यावर झुलण्याचा, सदैव हर्षित राहण्याचा अनुभव करू शकणार नाही. यासाठी
स्वतःला एकांतवासी बनवा अर्थात सर्व आकर्षणाच्या व्हायब्रेशन पासून अंतर्मुखी बना.
बोधवाक्य:-
आपल्या
चेहऱ्याला असे चालते-फिरते म्युझियम बनवा ज्यामध्ये बाबा बिंदू दिसून येईल.
अव्यक्त इशारे:-
अशरीरी आणि विदेही स्थितीचा अभ्यास वाढवा. आपल्या शरीराच्या बंधनापासून न्यारे
बनण्यासाठी स्वतःला अवतार समजा. ‘मी अवतार आहे’, या स्मृतीमध्ये राहून शरीराचा आधार
घेऊन कर्म करा. परंतु कर्तेपणाच्या भाना पासून न्यारे होऊन कर्म करा. ‘मी केले, मी
करतो…’ या संकल्पाला सुद्धा समर्पित करा म्हणजे तुम्ही कर्माच्या बंधनामध्ये बांधले
जाणार नाही. देहामध्ये असूनही विदेही अवस्थेचा अनुभव कराल.