12-01-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुम्हाला पावन दुनियेमध्ये जायचे आहे त्यामुळे काम महाशत्रूवर विजय प्राप्त करायचा आहे, कामजीत, जगतजीत बनायचे आहे”

प्रश्न:-
प्रत्येकजण आपल्या ॲक्टिव्हिटीने कोणता साक्षात्कार सर्वांना करवू शकतात?

उत्तर:-
मी हंस आहे की बगळा आहे? हा साक्षात्कार प्रत्येकजण आपल्या ॲक्टिव्हिटीने सर्वांना करवू शकतात; कारण हंस कधी कोणाला दुःख देणार नाही. बगळे दुःख देतात, ते विकारी असतात. तुम्ही मुले आता बगळ्यापासून हंस बनला आहात. तुम्हा पारस-बुद्धी बनणाऱ्या मुलांचे कर्तव्य आहे सर्वांना पारस-बुद्धी बनविणे.

ओम शांती।
जेव्हा ‘ओम् शांती’ म्हटले जाते तेव्हा आपल्या स्वधर्माची आठवण होते. घराची देखील आठवण येते परंतु घरी बसून तर रहायचे नाही आहे. बाबांची मुले आहात तर जरूर आपल्या स्वर्गाची देखील आठवण करावी लागेल. तर ‘ओम् शांती’ म्हटल्याने हे सर्व ज्ञान बुद्धीमध्ये येते. मी आत्मा शांत स्वरूप आहे, शांतीचे सागर बाबांचा मुलगा आहे. जे बाबा स्वर्ग स्थापन करतात ते बाबाच आम्हाला पवित्र-शांत स्वरूप बनवतात. मुख्य गोष्ट आहे पवित्रतेची. दुनियाच पवित्र आणि अपवित्र बनते. पवित्र दुनियेमध्ये एकही विकारी नसतो. अपवित्र दुनियेमध्ये पाच विकार आहेत, म्हणून म्हटले जाते - विकारी दुनिया. ती आहे निर्विकारी दुनिया. निर्विकारी दुनियेतून शिडी उतरत-उतरत मग खाली विकारी दुनियेमध्ये येतात. ती आहे - पावन दुनिया, ही आहे - पतित दुनिया. तो आहे दिवस, सुख. ही आहे भटकण्याची रात्र. तसे तर रात्रीचे कोणी भटकत नाही. परंतु भक्तीला भटकणे म्हटले जाते.

तुम्ही मुले आता इथे आला आहात सद्गती मिळविण्याकरिता. तुमच्या आत्म्यामध्ये सर्व पाप होते, ५ विकार होते. त्यातही मुख्य आहे काम विकार, ज्यामुळेच मनुष्य पाप-आत्मा बनतात. हे तर प्रत्येक जण जाणतो आम्ही पतित आहोत आणि पाप-आत्मा देखील आहोत. एका काम विकारामुळे सर्व क्वालिफिकेशन (पात्रता) बिघडून जाते म्हणून बाबा म्हणतात - काम विकाराला जिंका तर तुम्ही जगतजीत अर्थात नव्या विश्वाचे मालक बनाल. तर आतून इतका आनंद वाटला पाहिजे. मनुष्य पतित बनतात तर काहीच समजत नाहीत. बाबा समजावून सांगतात - कोणताही विकार असू नये. मुख्य आहे काम विकार, यावरून किती हंगामा करतात (गोंधळ माजवतात). घराघरात किती अशांती, हाहाकार माजतो. यावेळी दुनियेमध्ये हाहाकार का आहे? कारण पाप आत्मे आहेत. विकारांमुळेच असुर म्हटले जाते. आता तुम्ही समजता यावेळी दुनियेमध्ये कोणतीही कामाची गोष्ट नाहीये, भंभोरला (जुन्या दुनियेला) आग लागणार आहे. जे काही या डोळ्यांनी दिसून येते, या सगळ्याला आग लागणार आहे. आत्म्याला काही आग लागत नाही. आत्मा तर सदैव जशी इन्शुर आहे (सुरक्षित आहे), सदैव जिवंत राहते. आत्म्याचा कधी इन्शुरन्स (विमा) काढतात का? शरीराचा विमा काढला जातो. आत्मा अविनाशी आहे. मुलांना सांगितले गेले आहे - हा खेळ आहे. आत्मा तर वर राहणारी ५ तत्वांपासून अगदी वेगळी आहे. दुनियेतील सर्व सामग्री ५ तत्वांनी बनते. आत्मा काही ५ तत्वांनी बनत नाही. आत्मा सदैव आहेच. फक्त पुण्य-आत्मा, पाप-आत्मा बनते. आत्म्यालाच नाव दिले जाते पुण्य-आत्मा, पाप-आत्मा. ५ विकारांमुळे किती घाणेरडे बनतात. आता बाबा आले आहेत पापांपासून मुक्त करण्यासाठी. विकारच सारे कॅरॅक्टर (चारित्र्य) बिघडवतात. कॅरॅक्टर (चारित्र्य) कशाला म्हटले जाते, हे देखील समजत नाहीत. हे आहे उच्च ते उच्च रुहानी गव्हर्मेंट. तुम्हाला पांडव गव्हर्मेंट न म्हणता ईश्वरीय गव्हर्मेंट म्हणू शकतो. तुम्ही समजता आपण ईश्वरीय गव्हर्मेंट आहोत. ईश्वरीय गव्हर्मेंट काय करते? आत्म्यांना पवित्र बनवून देवता बनवते. नाहीतर देवता कुठून आले? हे कोणीही जाणत नाहीत, आहेत तर हे देखील मनुष्य परंतु देवता कसे होते, त्यांना असे कोणी बनवले? देवता तर असतातच स्वर्गामध्ये. तर त्यांना स्वर्गवासी कोणी बनवले? स्वर्गवासी मग जरूर नरकवासी बनतात आणि पुन्हा स्वर्गवासी. हे देखील तुम्ही जाणत नव्हता तर मग बाकीचे तरी कसे जाणतील! आता तुम्ही समजता की ड्रामा पूर्व नियोजित आहे, इतके सर्व ॲक्टर्स आहेत. या सर्व गोष्टी बुद्धीमध्ये असल्या पाहिजेत. अभ्यास तर बुद्धीमध्ये असायला हवा ना आणि पवित्र देखील जरूर बनायचे आहे. पतित बनणे अतिशय वाईट गोष्ट आहे. आत्माच पतित बनते. एकमेकांमध्ये पतित बनतात. पतितांना पावन बनविणे हा तुमचा धंदा आहे. पावन बना तर पावन दुनियेमध्ये याल. हे आत्मा समजते. आत्मा नसेल तर शरीर देखील राहू शकत नाही, प्रतिसाद मिळू शकत नाही. आत्मा जाणते मी खरे तर पावन दुनियेची रहिवासी आहे. आता बाबांनी समजावून सांगितले आहे तुम्ही अगदीच अडाणी होता, म्हणून पतित दुनियेच्या लायक बनला आहात. आता जोपर्यंत पावन बनणार नाही तोपर्यंत स्वर्गाच्या लायक बनू शकणार नाही. स्वर्गाची तुलना देखील संगमावर केली जाते. तिथे थोडीच तुलना करू शकणार. इथे संगमयुगावरच तुम्हाला सर्व ज्ञान मिळते. पवित्र बनण्याचे शस्त्र मिळते. हे एकालाच म्हटले जाते की, ‘पतित-पावन बाबा, आम्हाला असे पावन बनवा’. हे (लक्ष्मी-नारायण) स्वर्गाचे मालक आहेत ना. तुम्ही जाणता आम्हीच स्वर्गाचे मालक होतो मग ८४ जन्म घेऊन पतित बनलो आहोत. श्याम आणि सुंदर, यांचे नाव देखील असे ठेवले आहे. श्रीकृष्णाचे चित्र सावळे बनवतात परंतु अर्थ थोडेच समजतात. कृष्णा विषयी देखील तुम्हाला किती क्लियर स्पष्टीकरण मिळते. यामध्ये (गीतेमध्ये) दोन दुनिया केल्या आहेत. वास्तविक दोन दुनिया काही नाही आहेत. दुनिया एकच आहे. ती नवीन आणि जुनी होते. सुरुवातीला छोटी मुले नवीन असतात मग मोठी होऊन म्हातारी होतात. तर तुम्ही समजावून सांगण्यासाठी किती डोकेफोड करता, आपली राजधानी स्थापन करत आहात ना. लक्ष्मी-नारायणाला समजले आहे ना. समजल्याने किती गोड बनले आहेत. कोणी समजावून सांगितले? भगवंताने. युद्ध इत्यादीचा तर प्रश्नच नाही. ईश्वर किती बुद्धिमान, नॉलेजफुल आहेत. किती पवित्र आहेत. सर्व मनुष्य शिवाच्या चित्रासमोर (शिवलिंगा समोर) जाऊन नमस्कार करतात परंतु ते कोण आहेत, काय करतात, हे कोणीही जाणत नाही. ‘शिव काशी विश्वनाथ गंगा…’ बस्स फक्त एवढेच गुणगुणत राहतात. जरा सुद्धा अर्थ समजत नाहीत. अर्थ सांगितला तर म्हणतील तुम्ही काय आम्हाला सांगणार. आम्ही तर वेद-शास्त्र इत्यादी सर्व शिकलो आहोत. परंतु राम-राज्य कशाला म्हटले जाते, हे देखील कोणीही जाणत नाही. राम-राज्य सतयुगी नवीन दुनियेला म्हटले जाते. तुमच्यामध्ये देखील नंबरवार आहेत, ज्यांना धारणा होते. काही तर विसरुनही जातात कारण अगदीच पत्थर-बुद्धी बनले आहेत. तर आता पारस-बुद्धी जे बनले आहेत त्यांचे काम आहे इतरांना पारस-बुद्धी बनविणे. पत्थर-बुद्धी असणाऱ्यांची कृत्ये देखील तशीच चालू राहतील कारण हंस आणि बगळे झाले ना. हंस कधी कोणाला दुःख देत नाहीत. बगळे दुःख देतात. बरेच जण असे आहेत ज्यांचे वर्तनच बगळ्यासारखे असते, त्यांच्यामध्ये सर्व विकार असतात. इथे देखील असे बरेच विकारी मनुष्य येतात, ज्यांना असुर म्हटले जाते. ओळखता येत नाही. अनेक सेंटर्सवर देखील विकारी येतात, बहाणा करतात, आम्ही ब्राह्मण आहोत, परंतु खोटे आहेत. याला म्हटलेच जाते खोटी दुनिया. ती नवीन दुनिया खरी दुनिया आहे. आता आहे संगम. किती फरक आहे. जे खोटे बोलणारे, खोटे काम करणारे आहेत, ते थर्ड ग्रेड बनतात. फर्स्ट ग्रेड, सेकंड ग्रेड तर असतात ना.

बाबा म्हणतात - पवित्रतेचा देखील संपूर्ण पुरावा द्यायचा आहे. बरेच जण म्हणतात की, पती-पत्नी दोघेही एकत्र राहून पवित्र राहतात, हे तर अशक्य आहे. तर मुलांनी समजावून सांगितले पाहिजे. योगबळ नसल्याकारणाने इतकी सोपी गोष्ट देखील पूर्णपणे समजावून सांगू शकत नाहीत. त्यांना ही गोष्ट कोणीही समजावून सांगत नाहीत की, इथे आम्हाला स्वयं भगवान शिकवत आहेत. आणि ते सांगत आहेत की, पवित्र बनल्याने तुम्ही २१ जन्म स्वर्गाचे मालक बनाल. ती आहे पवित्र दुनिया. पवित्र दुनियेमध्ये कोणीही पतित असू शकत नाही. ५ विकारच नाही आहेत. ते आहे व्हाईसलेस वर्ल्ड (निर्विकारी दुनिया). हे आहे विशश वर्ल्ड (विकारी दुनिया). जर आम्हाला सतयुगाची बादशाही मिळणार असेल तर मग आम्ही का नाही एका जन्मासाठी पावन बनणार बरे! आम्हाला जबरदस्त लॉटरी मिळते. तर आनंद होतो देवी-देवता पवित्र आहेत ना. अपवित्र पासून पवित्र देखील बाबाच बनवतील. तर सांगितले पाहिजे आमच्यासाठी हे प्रलोभन आहे. बाबाच असे बनवतात. नवीन दुनिया तर बाबांशिवाय इतर कोणीही बनवू शकणार नाही. मनुष्यापासून देवता बनविण्याकरिता भगवानच येतात, ज्यांची रात्र गायली जाते. हे देखील समजावून सांगितले आहे की ज्ञान, भक्ती, वैराग्य. ज्ञान आणि भक्ती अर्धी-अर्धी आहे. भक्ती नंतर आहे वैराग्य. आता घरी जायचे आहे, हे शरीर रुपी कपडे काढायचे आहेत. या छी-छी दुनियेमध्ये राहायचे नाहीये. ८४ चे चक्र आता पूर्ण झाले. आता व्हाया शांतीधाम जायचे आहे. सर्वप्रथम अल्फ विषयीची गोष्ट विसरायची नाही. हे देखील मुले समजतात ही जुनी दुनिया नष्ट होणार आहे. बाबा नवीन दुनिया स्थापन करतात. स्वर्गाची स्थापना करण्यासाठी बाबा अनेकदा आले आहेत. नरकाचा विनाश होणार आहे. नरक किती मोठा आहे, स्वर्ग किती छोटा आहे. नवीन दुनियेमध्ये एकच धर्म असतो. इथे आहेत अनेक धर्म. एक धर्म कोणी स्थापन केला? ब्रह्माने तर केला नाही. ब्रह्माच पतित सो मग पावन बनतात. माझ्यासाठी तर म्हणणार नाहीत की, पतित सो पावन. पावन आहेत तेव्हा लक्ष्मी-नारायण नाव आहे. ब्रह्माचा दिवस, ब्रह्माची रात्र. हे प्रजापिता आहेत ना. शिवबाबांना अनादि क्रिएटर म्हटले जाते. ‘अनादि’ शब्द बाबांकरिता आहे. बाबा अनादि तर आत्मे देखील अनादि आहेत. खेळ देखील अनादि आहे. पूर्वनियोजित ड्रामा आहे. स्व आत्म्याला सृष्टीचक्राच्या आदि-मध्य-अंत, आणि कालावधीचे ज्ञान मिळते. हे कोणी दिले? बाबांनी. तुम्ही २१ जन्मांसाठी धनके (श्रीमंत) बनता आणि मग रावणाच्या राज्यात निधनके (गरीब) बनता. इथूनच कॅरॅक्टर्स (चारित्र्य) बिघडायला सुरुवात होते, विकार आहेत ना. बाकी दोन दुनिया काही नाही आहेत. मनुष्य तर मग समजतात नरक-स्वर्ग सर्व एकाच वेळी चालतात (एकाच वेळी अस्तित्वात असतात). आता तुम्हा मुलांना किती क्लियर समजावून सांगितले जाते. आता तुम्ही गुप्त आहात. शास्त्रांमध्ये तर काय-काय लिहिले आहे. सुताचा किती गुंता झाला आहे (गोष्टी किती गुंतागुंतीच्या झाल्या आहेत). हा गुंता बाबांशिवाय इतर कोणीही सोडवू शकणार नाही. त्यांनाच बोलावतात - ‘आम्ही काही कामाचे राहिलेलो नाही, येऊन पावन बनवा आमचे कॅरॅक्टर (चारित्र्य) सुधारा. तुमचे कॅरेक्टर किती सुधारतात. काहीजणांचे तर सुधारण्याऐवजी अजूनच बिघडते. वर्तनावरूनही समजून येते. आज महारथी हंस म्हटले जातात, उद्या बगळा बनतात. उशीर लागत नाही. माया देखील गुप्त आहे ना. क्रोध काही दिसतो थोडाच. भौ-भौ करतात तर मग ते बाहेर पडल्यावर दिसून येते. आणि मग आश्चर्यवत् सुनन्ती… कथन्ती भागन्ती होतात. किती कोसळतात (अधोगती होते). एकदम पत्थर बनतात. इंद्रप्रस्थाची देखील गोष्ट आहे ना. समजून तर येतेच. अशाने मग सभेमध्ये येता कामा नये. थोडे-फार ज्ञान ऐकले असेल तर स्वर्गामध्ये येतातच. ज्ञानाचा विनाश होऊ शकत नाही.

आता बाबा म्हणतात - तुम्हाला पुरुषार्थ करून उच्च पद प्राप्त करायचे आहे. जर विकारामध्ये गेलात तर पद भ्रष्ट कराल. सूर्यवंशी, चंद्रवंशी बनाल मग वैश्यवंशी, शूद्रवंशी. आता तुम्ही समजता हे चक्र कसे फिरते. ते (दुनियावाले) तर कलियुगाचा कालावधीच ४० हजार वर्षे आहे असे म्हणतात. शिडी तर खाली उतरायची असते ना. ४० हजार वर्षे असतील मग तर मनुष्य खंडीभर होतील. फक्त ५ हजार वर्षांमध्येच इतके मनुष्य आहेत, ज्यांना पुरेसे अन्न देखील मिळत नाही. तर इतक्या हजार वर्षांमध्ये किती वृद्धी होईल. तर बाबा येऊन धीर देतात. पतित मनुष्यांना तर भांडायचेच आहे. त्यांची बुद्धी इकडे वळू शकत नाही. आता तुमची बुद्धी बघा किती बदलते तरी देखील माया धोका जरूर देते. इच्छा मात्रम् अविद्या. कोणती इच्छा केली तर गेलाच. वर्थ नॉट ए पेनी बनतात. चांगल्या-चांगल्या महारथींना देखील माया कोणत्या ना कोणत्या प्रकारे कधी पण धोका देत राहते. मग ते हृदयामध्ये स्थान मिळवू शकत नाहीत. जसे लौकिक आई-वडिलांच्या हृदयामध्ये स्थान मिळवू शकत नाहीत. काही मुले तर अशी असतात जी आपल्या पित्याला देखील मारून टाकतात. परिवाराला संपवून टाकतात. महान पाप-आत्मे आहेत. रावण काय करायला लावतो, खूप खराब दुनिया आहे. याच्यावर (या घाणेरड्या दुनियेमध्ये) कधीही मन गुंतवायचे नाही. पवित्र बनण्यासाठी खूप हिंमत पाहिजे. विश्वाच्या बादशाहीचे बक्षीस घेण्यासाठी पवित्रता महत्वाची आहे म्हणून बाबांना म्हणतात की, येऊन पावन बनवा. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) मायेच्या धोक्यापासून वाचण्यासाठी इच्छा मात्रम् अविद्या बनायचे आहे. या घाणेरड्या दुनियेमध्ये मन गुंतवायचे नाही.

२) पवित्रतेचा संपूर्ण पुरावा द्यायचा आहे. सर्वात उच्च कॅरॅक्टर आहेच मुळी पवित्रता. स्वतःला सुधारण्यासाठी पवित्र जरूर बनायचे आहे.

वरदान:-
त्रिकालदर्शी स्थितीमध्ये स्थित राहून सदैव अचल आणि साक्षी राहणारे नंबर वन भाग्यवान भव

त्रिकालदर्शी स्थितीमध्ये स्थित होऊन प्रत्येक संकल्प, प्रत्येक कर्म करा आणि प्रत्येक गोष्टीला बघा; ‘हे का’, ‘हे काय’ - असे प्रश्नचिन्ह नसावे, नेहमीच फुलस्टॉप. नथिंग न्यू. प्रत्येक आत्म्याच्या पार्टला चांगल्या रीतीने जाणून पार्टमध्ये या. आत्म्यांच्या संबंध-संपर्कामध्ये येताना न्यारे आणि प्रेमाचे संतुलन असावे म्हणजे मग हलचल (अशांतता) नष्ट होईल. असे कायम अचल आणि साक्षी रहा - हीच आहे नंबर वन भाग्यवान आत्म्याची निशाणी.

बोधवाक्य:-
सहनशीलतेचा गुण धारण करा तर कठोर संस्कार देखील शितल होतील.

अव्यक्त इशारे:- या अव्यक्ती महिन्यामध्ये बंधनमुक्त राहून जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करा.

तुम्हा लोकांचे स्लोगन आहे - ‘मुक्ती आणि जीवन-मुक्ती आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे’. परमधाममध्ये तर हे कळणार सुद्धा नाही की मुक्ती काय आहे, जीवन-मुक्ती काय आहे, याचा अनुभव या ब्राह्मण जीवनामध्ये आत्ता करायचा आहे.