12-07-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड
मुलांनो - तुम्हाला खरा-खरा वैष्णव बनायचे आहे, खरे वैष्णव भोजनाच्या पथ्यासोबत
पवित्र देखील राहतात”
प्रश्न:-
कोणता अवगुण
गुणामध्ये परिवर्तन झाला तर बेडा पार होऊ शकतो?
उत्तर:-
सर्वात मोठा अवघड आहे मोह. मोहामुळे नातलगांची आठवण सतावत राहते. जर कोणाच्या
नातेवाईकाचा मृत्यू झाला तर बारा महिनेपर्यंत त्याची आठवण करत राहतात. तोंड झाकून
रडत राहतील, आठवण येत राहील. अशीच जर बाबांची आठवण सतावत राहीली, दिवस-रात्र बाबांची
आठवण कराल तर मग तुमचा बेडाच पार होईल. जसे लौकिक नातलगांची आठवण करता तशी बाबांची
आठवण करा तर अहो सौभाग्य…
ओम शांती।
बाबा दररोज मुलांना समजावून सांगतात की स्वतःला आत्मा समजून बाबांच्या आठवणीमध्ये
बसा. आज बाबा त्यामध्ये ॲड करत आहेत - ते केवळ बाबाच नाहीत तर त्यांच्याशी असलेले
दुसरेही नाते समजून घ्यायचे आहे. मुख्य गोष्टच ही आहे - परमपिता परमात्मा शिव,
त्यांना गॉडफादर देखील म्हणतात, ज्ञानसागर देखील आहेत. ज्ञानसागर असल्याकारणाने
टीचर देखील आहेत, राजयोग शिकवतात. हे समजावून सांगितल्याने समजतील की, सत्य बाबा
यांना शिकवत आहेत. प्रॅक्टिकल गोष्ट हे ऐकवतात. ते सर्वांचे पिता देखील आहेत, टीचर
देखील आहेत, सद्गती दाता देखील आहेत आणि मग त्यांना नॉलेजफुल म्हटले जाते. बाबा,
टीचर, पतित-पावन, ज्ञानसागर आहेत. सर्वप्रथम तर बाबांची महिमा केली पाहिजे. ते
आपल्याला शिकवत आहेत. आपण आहोत ब्रह्माकुमार-कुमारी. ब्रह्मा देखील रचना आहे
शिवबाबांची आणि आता आहे देखील संगमयुग. एम ऑब्जेक्ट देखील राजयोगाचे आहे, आम्हाला
राजयोग शिकवतात. तर टीचर देखील आहेत हे सिद्ध झाले. आणि हे शिक्षण आहेच मुळी नवीन
दुनियेसाठी. इथे बसून हे पक्के करा - आपल्याला काय-काय समजावून सांगायचे आहे. ही
आतून धारणा झाली पाहिजे. हे तर जाणता कोणाला जास्त धारणा होते, कोणाला कमी. इथे
देखील ज्ञानामध्ये जे जास्त हुशार बनून पुढे जातात त्यांचे नाव होते. पद देखील उच्च
असते. पथ्य देखील बाबा सांगत राहतात. तुम्ही पूर्ण वैष्णव बनता. वैष्णव अर्थात जे
शाकाहारी असतात. मांस-मदिरा इत्यादी खात नाहीत. परंतु विकारामध्ये तर जातात, मग बाकी
वैष्णव बनला तर काय झाले. वैष्णव कुळाचे म्हटले जातात अर्थात कांदा इत्यादी तमोगुणी
पदार्थ खात नाहीत. तुम्ही मुले जाणता - तमोगुणी पदार्थ कोण-कोणते असतात. काही चांगली
माणसे देखील असतात, ज्यांना रिलीजस माइंडेड (धार्मिक वृत्तीचे) अथवा भक्त म्हटले
जाते. संन्याशांना म्हणणार - पवित्र आत्मा आणि जे दान इत्यादी करतात त्यांना
म्हणणार - पुण्य-आत्मा. यावरून देखील हे सिद्ध होते की, आत्माच दान-पुण्य करते
म्हणून पुण्य-आत्मा, पवित्र-आत्मा म्हटले जाते. आत्मा काही निर्लेप नाहीये. असे
चांगले-चांगले शब्द लक्षात ठेवले पाहिजेत. साधूंना देखील महान-आत्मा म्हटले जाते.
महान् परमात्मा असे कधी म्हटले जात नाही. तर सर्वव्यापी म्हणणे चुकीचे आहे. सर्व
आत्मे आहेत, जे पण आहेत सर्वांमध्ये आत्मा आहे. शिकले सवरलेले जे आहेत ते सिद्ध
करून सांगतात की, झाडामध्ये देखील आत्मा आहे. म्हणतात ८४ लाख योन्या ज्या आहेत
त्यांच्यामध्ये देखील आत्मा आहे. आत्मा नसती तर वृद्धी कशी झाली असती! मनुष्याची जी
आत्मा आहे ती तर जडमध्ये जाऊ शकत नाही. शास्त्रांमध्ये अशा काही गोष्टी लिहिलेल्या
आहेत. इंद्रप्रस्थमधून धक्का दिला तर दगड बनला. आता बाबा बसून समजावून सांगतात, बाबा
मुलांना म्हणतात - देहाची सर्व नाती तोडून स्वतःला आत्मा समजा. मामेकम् (मज एकाची)
आठवण करा. बस्स, तुमचे ८४ जन्म आता पूर्ण झाले. आता तमोप्रधानापासून सतोप्रधान
बनायचे आहे. दुःखधाम आहे - अपवित्र धाम. शांतीधाम आणि सुखधाम आहे - पवित्र धाम. हे
तर समजता ना. सुखधाम मध्ये राहणाऱ्या देवतांच्या समोर डोके टेकवतात. यावरून सिद्ध
होते भारतामध्ये नवीन दुनियेमध्ये पवित्र आत्मा होते, उच्चपद वाले होते. आता तर
गातात - ‘मुझ निर्गुण हारे में कोई गुण नाही’. आहेत देखील असेच. कोणताही गुण नाहीये.
माणसांमध्ये मोह देखील खूप असतो, मेलेल्याची देखील आठवण असते. बुद्धिमध्ये येते ही
माझी मुले आहेत. पती किंवा मुलगा मेला तर त्यांची आठवण करत राहतात. पत्नी बारा
महिन्यापर्यंत तर खूप आठवण करते, तोंड झाकून रडत राहते. असे तोंड झाकून तुम्ही जर
दिवस-रात्र बाबांची आठवण केलीत तर बेडाच पार होईल. बाबा म्हणतात - जशी पतीची तू
आठवण करतेस तशी माझी आठवण कर तर तुझी विकर्म विनाश होतील. बाबा युक्त्या तर सांगतात
की असे-असे करा.
पोतामेल (दिवसाचा
हिशोब) बघतात आज इतका खर्च झाला, इतका फायदा झाला, रोज बॅलन्स काढत राहतात. काहीजण
दरमहा काढतात. इथे तर हे खूप जरुरी आहे, बाबांनी वारंवार समजावून सांगितले आहे. बाबा
म्हणतात - तुम्ही मुले सौभाग्यशाली, हजार पटीने भाग्यशाली, करोड पटीने भाग्यशाली,
पदम, अरब, खरब पटीने भाग्यशाली आहात. जी मुले स्वतःला सौभाग्यशाली समजतात, ते जरूर
बाबांना चांगल्या रीतीने आठवण करत राहतील. तेच गुलाबाची फुले बनतील. हे तर
नटशेलमध्ये (थोडक्यात) समजावून सांगायचे असते. बनायचे तर आहे सुगंधी फूल. मुख्य आहे
आठवणीची गोष्ट. संन्याशांनी ‘योग’ शब्द म्हटले आहे. लौकिक पिता असे म्हणणार नाही
की, ‘माझी आठवण करा’ किंवा असे विचारणार नाहीत की, ‘माझी आठवण करता का?’ वडीलांना
मुलांची, मुलांना वडिलांची आठवण आहेच आहे. हा तर नियम आहे. इथे (ज्ञानामध्ये)
विचारावे लागते कारण माया विसरायला लावते. इथे येतात, समजतात की आपण बाबांकडे जात
आहोत; तर बाबांची आठवण राहिली पाहिजे म्हणून बाबा चित्र देखील बनवतात तर ते देखील
सोबत असावे. सर्वप्रथम नेहमी बाबांची महिमा करायला सुरुवात करा. हे आपले बाबा आहेत,
असे तर सर्वांचे पिता आहेत. सर्वांचा सद्गती दाता, ज्ञानाचा सागर नॉलेजफुल आहेत.
बाबा आपल्याला सृष्टीचक्राच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान देतात, ज्याद्वारे आपण
त्रिकालदर्शी बनतो. या सृष्टीवर त्रिकालदर्शी कोणताही मनुष्य असू शकत नाही. बाबा
म्हणतात - हे लक्ष्मी-नारायण देखील त्रिकालदर्शी नाहीत. हे त्रिकालदर्शी बनून काय
करतील! तुम्ही बनता आणि बनविता. या लक्ष्मी-नारायणामध्ये ज्ञान असते तर परंपरा चालू
राहिली असती. मध्येच तर विनाश होतो त्यामुळे परंपरा काही चालू शकत नाही. तर मुलांनी
या अभ्यासाचे चांगल्या रीतीने चिंतन करायचे आहे. तुमचे देखील उच्च ते उच्च शिक्षण
संगमावरच होते. तुम्ही आठवण करत नाही, देह-अभिमानामध्ये येता तर माया जोराने थप्पड
मारते. जेव्हा १६ कला संपूर्ण बनाल तेव्हा विनाशाची देखील तयारी होईल. ते विनाशासाठी
आणि तुम्ही अविनाशी पदासाठी तयारी करत आहात. कौरव आणि पांडवांचे युद्ध झालेले नाही,
कौरवांचे आणि यादवांचे युद्ध होते. ड्रामा अनुसार पाकिस्तान देखील झाले. त्याची
देखील सुरुवात केव्हा झाली जेव्हा तुमचा जन्म झाला. बाबा आले आहेत सर्व
प्रॅक्टिकलमध्ये झाले पाहिजे ना. इथल्यासाठीच म्हणतात - रक्ताच्या नद्या वाहतात तर
मग तुपाची नदी वाहणार. अजूनही बघा भांडत राहतात. अमके शहर द्या नाही तर युद्ध करणार.
इथून जाऊ नका, हा आमचा रस्ता आहे. आता ते काय करतील. आगबोटी जातील कशा! मग सल्ला
मसलत करतात. जरूर सल्ला विचारत असतील. मदतीची आशा वाटत असेल, ती आपसामध्येच नष्ट
करतील. इथे मग सिव्हिल वॉरची (अंतर्गत युद्धाची) ड्रामामध्ये नोंद आहे.
आता बाबा म्हणतात -
गोड मुलांनो, अतिशय हुशार बना. इथून बाहेर घरी गेल्यावर मग विसरून जाऊ नका. इथे
तुम्ही येताच कमाई जमा करण्यासाठी. छोट्या-छोट्या मुलांना घेऊन येता तर त्यांच्या
बंधनामध्ये रहावे लागते. इथे तर ज्ञान-सागराच्या तीरावर येता, जितकी कमाई कराल तितके
चांगले आहे. यामध्ये तत्पर राहिले पाहिजे. तुम्ही येताच अविनाशी ज्ञान रत्नांची झोळी
भरण्यासाठी. गातात देखील ना - ‘भोलानाथ भर दे झोली’. भक्त तर शंकराच्या समोर जाऊन
म्हणतात - झोळी भरा. ते तर शिव-शंकर एक आहेत असेच समजतात. शिवशंकर महादेव म्हणतात.
तर महादेव मोठे ठरतात. अशा छोट्या-छोट्या गोष्टी नीट समजून घ्यायच्या आहेत.
तुम्हा मुलांना
समजावून सांगितले जाते - आता तुम्ही ब्राह्मण आहात, नॉलेज मिळत आहे. शिक्षणामुळे
मनुष्य सुधारतात. (चाल-चलन) आचरण देखील चांगले असते. आता तुम्ही शिकत आहात. सर्वात
जास्त शिकतात आणि शिकवतात, त्यांचे मॅनर्स देखील चांगले असतात. तुम्ही म्हणणार
सर्वात चांगले मम्मा बाबांचे मॅनर्स आहेत. ही मग झाली मोठी मम्मा, ज्यांच्यामध्ये
प्रवेश करून मुलांना रचतात. माता-पिता कंबाइंड आहेत. किती गुप्त गोष्टी आहेत. जसे
तुम्ही शिकता तशी मम्मा देखील शिकत होती. त्यांना ॲडॉप्ट केले. हुशार होती तर ड्रामा
अनुसार सरस्वती नाव पडले. ब्रह्मपुत्रा मोठी नदी आहे. मेळा देखील भरतो सागर आणि
ब्रह्मपुत्रा चा. ही मोठी नदी झाली तर आई देखील झाली ना. तुम्हा गोड-गोड मुलांना
किती उच्च घेऊन जातात. बाबा तुम्हा मुलांनाच बघतात. त्यांना (शिवबाबांना) तर कोणाची
आठवण करायची नाहीये. यांच्या (ब्रह्मा बाबांच्या) आत्म्याला तर बाबांची आठवण करायची
आहे. ब्रह्मा बाबा म्हणतात - आम्ही दोघे, मुलांना बघतो. मज आत्म्याला काही साक्षी
होऊन बघायचे नाहीये, परंतु बाबांसोबत मी देखील असे बघतो. बाबांसोबत राहतो ना.
त्यांचा मुलगा आहे तर सोबत एकत्र बघतो. मी विश्वाचा मालक बनून फिरतो, जणू काही मीच
हे करत आहे. मी दृष्टी देतो. देहा सहित सर्व काही विसरायचे असते. बाकी मुलगा आणि
पिता जणू काही एक होतात. तर बाबा समजावून सांगतात भरपूर पुरुषार्थ करा. खरोखर
मम्मा-बाबा सर्वात जास्त सेवा करतात. घरामध्ये देखील आई-वडील खूप सेवा करत असतात
ना. सेवा करणारे जरूर पद देखील उच्च मिळवतील तर मग त्यांना फॉलो केले पाहिजे ना. जसे
बाबा अपकारींवर देखील उपकार करतात, तसे तुम्ही देखील फॉलो फादर करा. याचा देखील
अर्थ समजून घ्यायचा आहे. बाबा म्हणतात - माझी आठवण करा बाकी कोणाचेही ऐकू नका. कोणी
काही बोलले, ऐकून न ऐकल्यासारखे करा. तुम्ही हसत रहा म्हणजे तो आपणच शांत होईल.
बाबांनी सांगितले होते कोणी चिडला तर तुम्ही त्याच्यावर फुले अर्पण करा, बोला -
‘तुम्ही अपकार करता, आम्ही उपकार करतो’. बाबा स्वतः म्हणतात - साऱ्या दुनियेतील
मनुष्य माझे अपकारी आहेत, मला सर्वव्यापी म्हणून किती शिव्या देतात, मी तर सर्वांचा
उपकारी आहे. तुम्ही मुले देखील सर्वांवर उपकार करणारे आहात. तुम्ही विचार करा - आपण
काय होतो, आता काय बनत आहोत! विश्वाचे मालक बनतो. ध्यानीमनी देखील नव्हते. खूप
जणांना घर बसल्या साक्षात्कार झाला आहे. परंतु साक्षात्काराने काही होते थोडेच.
हळूहळू झाडाची वृद्धी होत जाईल. हे नवीन दैवी झाड स्थापन होत आहे. मुले जाणतात आपला
दैवी फुलांचा बगीचा बनत आहे. सतयुगामध्ये देवताच राहतात तेच परत येणार आहेत, चक्र
फिरतच राहते. ८४ जन्म देखील तेच घेतील. अजून दुसरे आत्मे मग कुठून येतील.
ड्रामामध्ये जे काही आत्मे आहेत, कोणीही पार्ट पासून सुटू शकत नाही. हे चक्र फिरतच
राहते. आत्मा कधी कमी होत नाही. लहान-मोठी होत नाही.
बाबा बसून गोड मुलांना
समजावून सांगतात, म्हणतात - मुलांनो, सुखदायी बना. आई सांगत असते ना - आपसामध्ये
भांडण-मारामारी करू नका. बेहदचे बाबा देखील मुलांना म्हणतात - आठवणीची यात्रा खूप
सोपी आहे. ती यात्रा तर जन्म-जन्मांतर करत आला आहात तरी देखील शिडी खाली उतरत
पाप-आत्मा बनत जाता. बाबा म्हणतात - ही आहेच रुहानी यात्रा. तुम्हाला या
मृत्यूलोकमध्ये परत यायचे नाहीये. त्या यात्रेवरून तर परत येतात आणि मग जसे आहेत
तसेच बनतात. तुम्ही तर जाणता आपण स्वर्गामध्ये जात आहोत. स्वर्ग होता पुन्हा होणार
आहे. हे चक्र फिरायचेच आहे. ही दुनिया एकच आहे बाकी ग्रह-तारे इत्यादीमध्ये काही
कोणती दुनिया नाहीये. वर जाऊन पाहण्यासाठी किती डोकेफोड करत राहतात. डोकेफोड
करता-करता मृत्यू समोर येऊन उभा राहील. हे सर्व आहे विज्ञान. वर जातील पण मग काय
होणार. मृत्यू तर समोर उभा आहे. एका बाजूने अंतराळामध्ये जाऊन संशोधन करतात आणि
दुसऱ्या बाजूला मारण्यासाठी बॉम्ब्स बनवत आहेत. माणसांची बुद्धी बघा कशी आहे.
समजतात देखील कोणी प्रेरक आहे. स्वतः म्हणतात वर्ल्ड वॉर (जागतिक युद्ध) जरूर होणार
आहे. ही तीच महाभारत लढाई आहे. आता तुम्ही मुले देखील जितका पुरुषार्थ कराल, तितकेच
कल्याण कराल. ईश्वराची मुले तर आहातच. भगवान तुम्हाला आपली संतान बनवतात तर तुम्ही
भगवान-भगवती बनता. लक्ष्मी-नारायणाला गॉड-गॉडेज म्हणतात ना. कृष्णाला गॉड मानतात,
राधेला इतके नाही. सरस्वतीचे नाव आहे, राधेचे इतके नाव नाही. कलश मग लक्ष्मीला
दाखवतात. ही देखील चूक केली आहे. सरस्वतीची देखील अनेक नावे ठेवली आहेत. त्या तर
तुम्हीच आहात. देवींची देखील पूजा होते तर आत्म्यांची देखील पूजा होते. बाबा मुलांना
प्रत्येक गोष्ट समजावून सांगत राहतात. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) जसे बाबा
अपकारीवर देखील उपकार करतात, असे फॉलो फादर करायचे आहे. कोणी काही बोलले तर ऐकून न
ऐकल्यासारखे करायचे आहे, हसत रहायचे आहे. एका बाबांकडूनच ऐकायचे आहे.
२) सुखदायी बनून
सर्वांना सुख द्यायचे आहे, आपसामध्ये भांडण तंटे करायचे नाहीत. हुशार म्हणून आपली
झोळी अविनाशी ज्ञान रत्नांनी भरपूर करायची आहे.
वरदान:-
सागराच्या
तळाला जाऊन अनुभव रुपी रत्न प्राप्त करणारे सदा समर्थ आत्मा भव
समर्थ आत्मा
बनण्यासाठी योगाच्या प्रत्येक विशेषतेचा, प्रत्येक शक्तीचा आणि ज्ञानाच्या प्रत्येक
मुख्य पॉईंटचा अभ्यास करा. अभ्यासी, प्रेमामध्ये मग्न राहणाऱ्या आत्म्याच्या समोर
कोणत्याही प्रकारचे विघ्न थांबू शकत नाही म्हणून अभ्यासाच्या प्रयोग शाळेमध्ये बसा.
आतापर्यंत ज्ञानाच्या सागरामध्ये, गुणांच्या सागरामध्ये, शक्तींच्या सागरामध्ये
वरवरच्या लाटांवर तरंगत आहात, परंतु आता सागराच्या तळाला जाऊन अनेक प्रकारची
विचित्र अनुभवांची रत्ने प्राप्त करून समर्थ आत्मा बनाल.
बोधवाक्य:-
अशुद्धीच
विकार रुपी भूतांचे आवाहन करते म्हणून संकल्पांमध्ये देखील शुद्ध बना.
अव्यक्त इशारे -
संकल्पांची शक्ती जमा करून श्रेष्ठ सेवेच्या निमित्त बना:-
जसे ब्रह्मा बाबांनी
विशेष श्रेष्ठ संकल्पाने मुलांचे आवाहन केले अर्थात रचना रचली. ही संकल्पाची रचना
देखील कमी नाहीये. श्रेष्ठ शक्तिशाली संकल्पाने प्रेरित होऊन विविध धर्मांच्या
पडद्याआडून बाहेर काढून जवळ आणले. तशी तुम्ही मुले देखील शक्तिशाली श्रेष्ठ
संकल्पधारी बना. आपल्या संकल्पांच्या शक्तीला जास्त खर्च करू नका, वाया घालवू नका.
म्हणजे मग श्रेष्ठ संकल्पाद्वारे प्राप्ती देखील श्रेष्ठ होईल.