12-08-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड
मुलांनो - तुम्हाला सेवेचा खूप उमंग आला पाहिजे, ज्ञान आणि योग आहे तर इतरांना
देखील शिकवा, सेवेची वृद्धी करा”
प्रश्न:-
सेवेमध्ये
उमंग न येण्याचे कारण काय आहे? कोणत्या विघ्नामुळे उमंग येत नाही?
उत्तर:-
सर्वात मोठे विघ्न आहे क्रिमिनल आय (विकारी दृष्टी). हा रोग सेवेमध्ये उत्साहित होऊ
देत नाही. हा अतिशय गंभीर रोग आहे. जर क्रिमिनल आय थंड नाही झाली, गृहस्थ
व्यवहारामध्ये दोन्ही चाके ठीक चालत नाहीत तर गृहस्थीचे ओझे होते, मग हलके होऊन
सेवेमध्ये उत्साहित होऊ शकत नाहीत.
गीत:-
जाग सजनियाँ
जाग…
ओम शांती।
गोड-गोड मुलांनी हे गाणे ऐकले. अशी २-४ चांगली गाणी आहेत ती सर्वांकडे असायला हवीत,
या टेपमध्ये भरली पाहिजेत. आता हे गाणे तर मनुष्यांनी बनवलेले म्हणावे लागेल. ड्रामा
अनुसार टच केलेले (जाणीव झालेली) आहे जे मग मुलांना उपयोगाला येते. अशा प्रकारची
गाणी मुलांनी ऐकल्याने नशा चढतो. मुलांना तर नशा चढला पाहिजे की आता आपण नवीन राजाई
स्थापन करत आहोत. रावणाकडून परत घेत आहोत. जसे कोणी युद्ध करतात तर विचार असतो ना -
यांची राजाई हडप करून घ्यावी. यांचे गाव आपण आपल्या हातामध्ये घ्यावे. आता ते सर्व
हद साठी भांडतात. तुम्हा मुलांचे युद्ध आहे मायेशी, ज्यांच्याविषयी तुम्हा
ब्राह्मणांव्यतिरिक्त इतर कोणालाच माहित नाही. तुम्ही जाणता आपल्याला या विश्वावर
गुप्त रीतीने राज्य स्थापन करायचे आहे किंवा बाबांद्वारे वारसा घ्यायचा आहे. खरे तर
याला युद्ध देखील म्हणता येणार नाही. ड्रामा अनुसार तुम्ही जे सतोप्रधानापासून
तमोप्रधान बनले आहात सो पुन्हा सतोप्रधान बनायचे आहे. तुम्ही आपल्या जन्मांना जाणत
नव्हता. आता बाबांनी समजावून सांगितले आहे. इतर जे पण धर्म आहेत त्यांना हे नॉलेज
मिळणारच नाही आहे. बाबा तुम्हा मुलांनाच बसून समजावून सांगतात. गायले देखील जाते
धर्मामध्येच ताकद आहे. भारतवासीयांना हे ठाऊक देखील नाहीये की आपला धर्म कोणता आहे.
तुम्हाला बाबांद्वारेच माहीत झाले आहे की आपला आदि सनातन देवी-देवता धर्म आहे. बाबा
येऊन मग तुम्हाला त्या धर्मामध्ये ट्रान्सफर करतात. तुम्ही जाणता आपला धर्म किती
सुख देणारा आहे. तुम्हाला कोणाशी युद्ध इत्यादी करायचे नाहीये. तुम्हाला तर आपल्या
स्वधर्मामध्ये टिकायचे आहे आणि बाबांची आठवण करायची आहे, यामध्येच वेळ लागतो. असे
नाही की, केवळ म्हटल्याने टिकता येते. मनामध्ये ही स्मृती राहिली पाहिजे - ‘मी आत्मा
शांत स्वरूप आहे. मी आत्मा आता तमोप्रधान पतित बनले आहे. मी आत्मा जेव्हा
शांतीधाममध्ये होते तेव्हा पवित्र होते, मग पार्ट बजावता-बजावता तमोप्रधान बनली आहे.
आता पुन्हा पवित्र बनून मला परत घरी जायचे आहे’. बाबांकडून वारसा घेण्यासाठी स्वतःला
आत्मा निश्चय करून बाबांची आठवण करायची आहे. तुम्हाला नशा चढेल आपण ईश्वरीय संतान
आहोत. बाबांची आठवण केल्यानेच विकर्म विनाश होतात. किती सोपे आहे - आठवणीने आपण
पवित्र बनून मग शांतीधाममध्ये निघून जाणार. दुनिया या शांतीधाम, सुखधामाला देखील
जाणत नाही. या गोष्टी कोणत्याही शास्त्रांमध्ये नाहीत. ज्ञान सागराची आहेच एक गीता,
ज्यामध्ये केवळ नाव बदलले आहे. सर्वांचे सद्गती दाता, ज्ञानाचा सागर त्या परमपिता
परमात्म्यालाच म्हटले जाते. इतर कोणालाही ज्ञानवान म्हणू शकत नाही. जेव्हा ते ज्ञान
देतील तेव्हाच तुम्ही ज्ञानवान बनाल. आता सर्व आहेत भक्तीवान. तुम्ही देखील होता.
आता पुन्हा ज्ञानवान बनत आहात. नंबरवार पुरुषार्था अनुसार ज्ञान कोणामध्ये आहे,
कोणामध्ये नाहीये. तर काय म्हणायचे? त्या हिशेबाने उच्च पद प्राप्त करू शकणार नाहीत.
बाबा सेवेसाठी किती उत्साहीत होतात. मुलांमध्ये अजून ती ताकद आलेली नाहीये जेणेकरून
कोणाला चांगल्या प्रकारे समजावून सांगतील. अशा प्रकारच्या युक्त्या रचल्या पाहिजेत.
भले मुले मेहनत करून कॉन्फरन्स इत्यादी करत आहेत, गोप मध्ये थोडी ताकद आहे, त्यांना
काळजी असते की संघटन असावे ज्यामध्ये युक्त्या काढल्या जातील. सेवा वृद्धीला कशी
प्राप्त होईल? डोके लढवत आहेत. नाव भले शक्ती-सेना आहे परंतु शिकल्या-सवरलेल्या
नाहीत. कोणी मग अशिक्षित देखील शिकल्या-सवरलेल्यांना चांगले शिकवतात. बाबांनी
समजावून सांगितले आहे क्रिमिनल आय (विकारी दृष्टी) खूप नुकसान करते. हा रोग अतिशय
गंभीर आहे त्यामुळे उत्साही होत नाहीत. तर बाबा विचारत आहेत तुम्ही युगल दोन्ही चाके
ठीक चालत आहात ना? त्याबाजूला किती मोठ-मोठी सेना आहे, महिलांचा देखील खूप मोठा
समुदाय आहे, सुशिक्षित आहेत. त्यांना मदत देखील मिळते. तुम्ही तर आहात गुप्त. कोणीही
जाणत नाहीत की हे ब्रह्माकुमार-कुमारी काय करत आहेत. तुमच्यामध्ये देखील नंबरवार
आहेत. गृहस्थ व्यवहाराचे ओझे डोक्यावर असल्यामुळे वाकलेले आहेत. ब्रह्माकुमार-कुमारी
म्हटले जातात परंतु ती क्रिमिनल आय विकारी दृष्टी) थंड होत नाही. दोन्ही चाके
एकसारखी असणे खूप कठीण आहे. बाबा मुलांना सेवा वाढविण्याकरिता समजावून सांगत राहतात.
कोणी श्रीमंत देखील आहेत - तरीही उत्साहित होत नाहीत. धनाचे भुकेलेले आहेत, संतान
नसेल तर दत्तक सुद्धा घेतात. उत्साह येत नाही की ‘बाबा, आम्ही बसलो आहोत. आम्ही मोठे
घर घेऊन देतो’.
बाबांची दृष्टी विशेष
दिल्लीवर आहे कारण दिल्ली आहे कॅपिटल, हेड ऑफिस. बाबा म्हणतात - दिल्लीमध्ये विशेष
सेवेचा घेरा टाका. कोणालाही समजावून सांगण्यासाठी आतमध्ये घुसले पाहिजे. गायले
देखील आहे की, पांडवांना कौरवांकडून पृथ्वीची ३ पावले सुद्धा मिळत नव्हती. हा कौरव
शब्द तर गीतेतील आहे. भगवंताने येऊन राजयोग शिकवला, त्याचे नाव गीता ठेवले आहे.
परंतु गीतेच्या भगवंताला विसरले आहेत म्हणून बाबा वारंवार सांगत राहतात की याच
मुख्य पॉइंटला उचलून धरायचे आहे. पूर्वी बाबा म्हणत असत बनारसच्या ‘विद्युत मंडळ’
वाल्यांना समजावून सांगा. बाबा युक्त्या तर सांगत राहतात. मग चांगल्या रीतीने
प्रयत्न करायचे आहेत. बाबा वारंवार समजावून सांगत राहतात. नंबर वन युक्ती (योजना)
दिल्लीमध्ये बनवा. संघटनमध्ये एकत्र येऊन हा विचार करा. मुख्य गोष्ट ही की, मोठा
मेळावा इत्यादी दिल्लीमध्ये कसा करावा. ते लोक (या दुनियेतील लोक) तर दिल्लीमध्ये
खूपच उपोषण-संप इत्यादी करतात. तुम्ही काही असे कोणते काम करत नाही. भांडण-तंटा
काहीच नाही. तुम्ही तर फक्त झोपलेल्यांना जागे करता. दिल्लीवाल्यांनाच मेहनत करायची
आहे. तुम्ही तर जाणता आपण ब्रह्मांडाचे देखील मालक पुन्हा कल्पा पूर्वीप्रमाणे
सृष्टीचे देखील मालक बनणार. हे पक्के आहे जरूर. विश्वाचे मालक बनायचेच आहे. आता
तुम्हाला पृथ्वीची ३ पावले देखील राजधानीमध्येच पाहिजेत, ज्यामुळे तिथे ज्ञानाचे
तोफगोळे सोडाल. नशा पाहिजे ना! मोठ्यांचा आवाज पाहिजे ना. यावेळी संपूर्ण भारत गरीब
आहे. गरिबांची सेवा करण्यासाठीच बाबा येतात. दिल्लीमध्ये तर खूप चांगली सेवा झाली
पाहिजे. बाबा इशारा देत राहतात. दिल्लीवाले समजतात बाबा आमचे लक्ष वेधून घेत आहेत.
आपसामध्ये क्षीरखंड सारखे राहिले पाहिजे. आपला पांडवांचा किल्ला तर बनवा.
दिल्लीमध्येच बनवावा लागेल. यामध्ये बुद्धी खूप चांगली पाहिजे. खूप काही करू शकता.
ते लोक गात तर खूप आहेत - ‘भारत आमचा देश आहे, आम्ही असे करणार’. परंतु स्वतः मध्ये
अजिबातच दम नाहीये. फॉरेनच्या मदती शिवाय उठू शकत नाहीत. तुम्हाला तर बेहदच्या
बाबांकडून खूप मदत मिळत आहे. इतकी मदत कोणीही देऊ शकणार नाही. आता लवकर किल्ला
बनवायचा आहे. तुम्हा मुलांना बाबा विश्वाची बादशाही देत आहेत तर खूप हिंमत पाहिजे.
झरमुई-झगमुईमध्ये (व्यर्थ गोष्टींमध्ये) अनेकांची बुद्धी अडकून राहते. बंधनाचे संकट
आहे मातांना. पुरुषांना कसलेच बंधन नाहीये. मातांना अबला म्हटले जाते. पुरुष बलवान
असतात. पुरुष लग्न करतात तर त्यांना बळ दिले जाते - तुम्हीच गुरु ईश्वर सर्व काही
आहात. स्त्री तर जशी शेपूट आहे. मागे लटकणारी तर खरोखरच शेपूट होऊन लोंबकळत राहते.
पतीमध्ये मोह, मुलांमध्ये मोह, पुरुषांना इतका मोह नसतो. त्यांची तर एक जुत्ती (पत्नी)
गेली तर दुसरी, तिसरी घेऊन येतात. सवय लागली आहे. बाबा तर समजावून सांगत राहतात की,
हे-हे वर्तमानपत्रामध्ये टाका. मुलांनी बाबांचा शो करायचा आहे. हे समजावून सांगणे
तुमचे काम आहे. बाबांसोबत तर दादा देखील आहेत. तर हे जाऊ शकत नाहीत. म्हणतील शिवबाबा
हे सांगा, आमच्यावर ही संकटे आली आहेत, यावर तुम्ही सल्ला द्या. अशा प्रकारच्या
गोष्टी विचारतात. बाबा तर आले आहेत पतितांना पावन बनविण्यासाठी. बाबा म्हणतात -
तुम्हा मुलांना सर्व नॉलेज मिळते. प्रयत्न करून आपसामध्ये एकत्र येऊन सल्लामसलत करा.
तुम्हा मुलांना आता विहंग मार्गाच्या सेवेचा भव्य शो दाखवला पाहिजे. मुंगीच्या
मार्गाची सेवा तर चालत आली आहे. परंतु असा भव्य शो दाखवा ज्यामुळे अनेकांचे कल्याण
होईल. बाबांनी हे कल्पापूर्वी देखील सांगितले होते, आता देखील सांगत आहेत. अनेकांची
बुद्धी कुठे ना कुठे अडकलेली आहे. उत्साह नाही. लगेच देह-अभिमान येतो.
देह-अभिमानानेच सत्यानाश केला आहे. आता बाबा ‘सत्या’ला श्रेष्ठ करण्याची सोपी युक्ती
सांगतात. बाबांची आठवण करा तर शक्ती येईल. नाही तर शक्ती येत नाही. भले सेंटर
सांभाळतात, परंतु नशा नाहीये कारण देह-अभिमान आहे. देही-अभिमानी बनतील तेव्हा नशा
चढेल. आपण कोणत्या पित्याची मुले आहोत. बाबा म्हणतात - जितके तुम्ही देही-अभिमानी
बनाल तितके बळ येईल. अर्ध्या कल्पाचा देह-अभिमानाचा नशा आहे तर देही-अभिमानी
बनण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. असे नाही की बाबा ज्ञानाचे सागर आहेत, आम्ही
देखील ज्ञान घेतले आहे, अनेकांना समजावून सांगतात परंतु आठवणीचे जौहर (ताकद) देखील
पाहिजे. ज्ञानाची तलवार आहे आणि आठवणीची यात्रा आहे. दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत.
ज्ञानामध्ये आठवणीच्या यात्रेचे जौहर (ताकद) पाहिजे. ती नसेल तर लाकडाची तलवार होते.
शीख लोक तलवारीचा किती मान ठेवतात. ती तर हिंसक होती, जिच्याद्वारे युद्ध केले.
वास्तवामध्ये गुरू लोक युद्ध थोडेच करू शकतात. गुरु तर अहिंसक पाहिजे ना. युद्धाने
थोडीच सद्गती होते. तुमची तर आहे योगाची गोष्ट. आठवणीच्या बळा शिवाय ज्ञान तलवार
काम करणार नाही. क्रिमिनल आय (विकारी दृष्टी) खूप नुकसान करणारी आहे. आत्मा
कानांद्वारे ऐकते; बाबा म्हणतात - तुम्ही आठवणीमध्ये मग्न होऊन रहा तर सेवा वाढत
जाईल. कधी-कधी म्हणतात ‘बाबा, नातलग ऐकत नाहीत’. बाबा म्हणतात - आठवणीच्या
यात्रेमध्ये कच्चे आहात म्हणून ज्ञानाची तलवार काम करत नाही. आठवण करण्याची मेहनत
करा. ही आहे गुप्त मेहनत. मुरली चालविणे तर प्रत्यक्ष आहे. आठवणी मध्येच गुप्त
मेहनत आहे, ज्यामुळे शक्ती मिळते. ज्ञानाने शक्ती मिळत नाही. तुम्ही पतितापासून
पावन आठवणीच्या बळानेच बनता. कमाईचाच पुरुषार्थ करायचा आहे.
मुलांना आठवण जेव्हा
एकरस असते, अवस्था चांगली असते तेव्हा खूप आनंदी असतात आणि जेव्हा आठवण ठीक नसेल,
कोणत्या गोष्टीमध्ये गोंधळून जातात तर आनंद गायब होतो. स्टुडंटला टीचरची आठवण येत
नसेल काय. इथे तर घरामध्ये राहत असताना, सर्व काही करत असताना टीचरची आठवण करायची
आहे. या टीचर कडून तर खूप-खूप उच्च पद मिळते. गृहस्थ व्यवहारामध्ये सुद्धा रहायचे
आहे. टीचरची आठवण राहील तरी देखील पिता आणि गुरु जरूर आठवतील. किती प्रकारे समजावून
सांगत राहतात. परंतु घरी मग धन-दौलत, मुले-बाळे इत्यादीना पाहून विसरून जातात.
समजावून तर खूप सांगतात. तुम्हाला रूहानी सेवा करायची आहे. बाबांची आठवणच सर्वोच्च
सेवा आहे. मनसा-वाचा-कर्मणा बुद्धीमध्ये बाबांची आठवण रहावी. मुखाद्वारे देखील
ज्ञानाच्या गोष्टी ऐकवा. कोणाला दुःख द्यायचे नाही. कोणतेही अकर्तव्य (अयोग्य कार्य)
करायचे नाही. पहिली गोष्ट ‘अल्फ’ला न समजल्यामुळे बाकीचे काहीही समजणार नाही. पहिले
‘अल्फ’ला पक्के करा तोपर्यंत पुढे जाता कामा नये. शिवबाबा राजयोग शिकवून विश्वाचा
मालक बनवतात. या छी-छी (विकारी) दुनियेमध्ये मायेचा शो खूप आहे. किती फॅशन झाली आहे.
छी-छी दुनियेचा तिरस्कार वाटला पाहिजे. एका बाबांची आठवण केल्याने तुमची विकर्म
विनाश होतील. पवित्र बनाल. टाईम वेस्ट करू नका. चांगल्या रीतीने धारण करा. माया
दुश्मन अनेकांची बुद्धीच भ्रष्ट करते. कमांडर चूक करतात तर त्यांना डिसमिस देखील
करतात. स्वतः कमांडरला सुद्धा लाज वाटते मग रिझाईन देखील करतात. इथे देखील असेच होते.
चांगले-चांगले कमांडर मग कधी नाहीसे पण होतात. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) आठवणीची
गुप्त मेहनत करायची आहे. आठवणीच्या मस्तीमध्ये राहिल्यानेच स्वतःच सेवा वाढत राहील.
मनसा-वाचा-कर्मणा आठवणीमध्ये राहण्याचा पुरुषार्थ करायचा आहे.
२) मुखाद्वारे
ज्ञानाच्याच गोष्टी ऐकवायच्या आहेत, कोणालाही दुःख द्यायचे नाही. कोणतेही अकर्तव्य
करायचे नाही. देही-अभिमानी बनण्याची मेहनत करायची आहे.
वरदान:-
लोखंडासारख्या
आत्म्याला पारस (सोने) बनविणारे मास्टर पारसनाथ भव
तुम्ही सर्व पारसनाथ
पित्याची मुले मास्टर पारसनाथ आहात - तर कशीही लोखंडासारखी आत्मा असेल परंतु तुमच्या
संगाद्वारे लोखंड देखील पारस बनेल. हे लोखंड आहेत - असा कधीही विचार करू नका. पारसचे
कामच आहे, लोखंडाला पारस बनविणे. नेहमी हेच लक्ष्य आणि लक्षण स्मृतीमध्ये ठेवून
प्रत्येक संकल्प, प्रत्येक कर्म करा, तेव्हाच अनुभव होईल की मज आत्म्यातील लाइटची
किरणे अनेक आत्म्यांना गोल्डन बनविण्याची शक्ती देत आहेत.
बोधवाक्य:-
प्रत्येक
कार्य हिंमतीने करा तर सर्वांचा सन्मान प्राप्त होईल.
अव्यक्त इशारे:-
सहजयोगी बनायचे असेल तर परमात्म प्रेमाचे अनुभवी बना.
परमात्म प्रेम या
श्रेष्ठ ब्राह्मण जन्माचा आधार आहे. म्हणतात देखील - प्रेम असेल तर जग आहे, जीवन आहे.
प्रेम नसेल तर निर्जीव आहेत, जग रहित आहेत. प्रेम मिळाले अर्थात दुनिया मिळाली.
दुनिया एका थेंबाची तहानलेली आहे आणि तुम्हा मुलांचे हे प्रभू प्रेम प्रॉपर्टी आहे.
याच प्रभू प्रेमामध्ये पालना होते अर्थात ब्राह्मण जीवनामध्ये पुढे जात राहता. तर
कायम प्रेमाच्या सागरामध्ये लवलीन (एकरूप होऊन) रहा.