12-10-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, तुम्ही खूप उच्च जातीचे आहात, तुम्हाला ब्राह्मणापासून देवता बनायचे आहे, त्यामुळे घाणेरड्या विकारी सवयींना नष्ट करायचे आहे”

प्रश्न:-
कोणत्या एका गोष्टीचा संबंध या शिक्षणाशी नाही आहे?

उत्तर:-
ड्रेस इत्यादीचा संबंध या शिक्षणाशी नाही, यामध्ये कोणताही ड्रेस बदलण्याची गोष्टच नाही. बाबा तर आत्म्यांना शिकवतात. आत्मा जाणते की, हे जुने पतित शरीर आहे, याला कसलेही हलके-साधे कपडे घाला, तरी हरकत नाही. शरीर आणि आत्मा दोन्हीही काळे झाले आहेत. बाबा, काळ्यालाच गोरे (पतितालाच पावन) बनवतात.

ओम शांती।
रुहानी बाबां समोर रुहानी मुले, रुहानी पाठशाळेमध्ये बसली आहेत. ही काही भौतिक पाठशाळा नाहीये. रुहानी पाठशाळेमध्ये रुहानी बाबा, रुहानी मुलांना बसून राजयोग शिकवत आहेत. तुम्ही मुले जाणता की, आपण पुन्हा नरापासून नारायण किंवा देवी-देवता पद प्राप्त करण्यासाठी रुहानी बाबांकडे बसलो आहोत. ही आहे नाविन्यपूर्ण गोष्ट. हे देखील तुम्हीच जाणता की, लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते, ते डबल मुकुटधारी होते. लाइटचा ताज आणि रत्नजडित ताज दोन्ही ताज होते. सर्वात पहिला असतो - लाइटचा ताज, जे होऊन गेले आहेत त्यांच्या सभोवती सफेद लाइट दाखवतात. ही पवित्रतेची निशाणी आहे. अपवित्र व्यक्तीला कधीही लाइट दाखवणार नाहीत. तुमचा फोटो काढला तर त्याच्या सभोवती लाइट (प्रकाशाचे वलय) दाखवू शकत नाही. लाइट ही पवित्रतेची निशाणी म्हणून दाखवतात. लाइट आणि डार्क. ब्रह्माचा दिवस म्हणजे लाईट (प्रकाशाचे प्रतीक आहे), ब्रह्माची रात्र म्हणजे डार्क (अंधाराचे प्रतीक आहे). डार्क अर्थात त्यांच्यावर लाइट नाही. तुम्ही मुले जाणता की - बाबाच येऊन, इतके जे पतित अर्थात डार्कच डार्क झाले आहेत, त्यांना पावन बनवतात. आता तर पवित्र राजधानी राहिलेली नाही आहे. सतयुगामध्ये यथा राजा-राणी तथा प्रजा सर्व पवित्र होते. या लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते. या चित्रावर तुम्हा मुलांनी खूप चांगल्या रीतीने समजावून सांगायचे आहे. हे आहे तुमचे एम-ऑब्जेक्ट. समजावून सांगण्यासाठी आणखीही चांगली चित्रे आहेत म्हणून इतकी चित्रे ठेवली जातात. मनुष्य लगेच हे समजत नाहीत की आपण या आठवणीच्या यात्रेद्वारे तमोप्रधानापासून सतोप्रधान बनू, आणि नंतर मुक्ती अथवा जीवनमुक्तीमध्ये निघून जाऊ. दुनियेमध्ये कोणालाही माहीत नाही की जीवनमुक्ती कशाला म्हटले जाते. लक्ष्मी-नारायणाचे राज्य केव्हा होते - हे देखील कोणाला ठाऊक नाहीये. आता तुम्ही जाणता की आपण बाबांकडून पवित्रतेचे दैवी स्वराज्य घेत आहोत. चित्रांवरून तुम्ही चांगल्या रीतीने समजावून सांगू शकता. भारतामध्येच डबल मुकुटधारींची पूजा करतात. असे चित्र देखील शिडीच्या चित्रामध्ये आहे. तो ताज आहे (राजाईचा ताज आहे) परंतु लाइटचा ताज नाहीये. पवित्र असणाऱ्याचीच पूजा होते. लाइट ही पवित्रतेची निशाणी आहे. बाकी असे नाही की कोणी तख्तावर बसल्यामुळेच लाइट निघते (प्रकाशाचे वलय तयार होते). नाही, ही तर पवित्रतेची निशाणी आहे. तुम्ही आता पुरुषार्थी आहात म्हणून तुमच्यावर लाइट (प्रकाशाचे वलय) दाखवू शकत नाही. देवी-देवतांची आत्मा आणि शरीर दोन्हीही पवित्र आहेत. इथे तर कोणाचेही शरीर पवित्र नाहीये म्हणून लाइट दाखवू शकत नाही. तुमच्यामध्ये काही जण तर पूर्ण पवित्र राहतात. कोणी मग सेमी-पवित्र राहतात. मायेची वादळे खूप येतात तर त्यांना सेमी-पवित्र म्हणणार. काही जण तर पूर्णपणे पतित बनतात. स्वतः देखील समजतात आपण पतित बनलो आहोत. आत्माच पतित बनते, तिला लाइट दाखवू शकत नाही.

तुम्हा मुलांनी हे विसरता कामा नये की, आपण उच्च ते उच्च बाबांची मुले आहोत, तर किती रॉयल्टी असली पाहिजे. समजा एखादा सफाई कामगार आहे, तो जर एम.एल.ए. अथवा एम.पी. बनतो किंवा शिक्षण घेऊन एखादी पोझीशन प्राप्त करतो तर तो टिपटॉप राहू लागतो. असे अनेक बनले आहेत. जात भले तीच असते, परंतु पोजिशन मिळाल्यामुळे नशा चढतो. मग ड्रेस इत्यादी देखील त्यानुसार घालतील. त्याच प्रमाणे आता तुम्ही देखील पतिता पासून पावन बनण्याकरिता शिकत आहात. ते देखील शिक्षणा द्वारे डॉक्टर, बॅरिस्टर इत्यादी बनतात. परंतु पतित तर आहेत ना कारण त्यांचे शिक्षण काही पावन बनण्यासाठी नाहीये. तुम्ही तर जाणता की आपण भविष्याकरिता पवित्र देवी-देवता बनत आहोत, त्यामुळे शूद्रपणाच्या सवयी नष्ट होत जातील. अंतर्मनामध्ये हा नशा राहिला पाहिजे की परमपिता परमात्मा आपल्याला डबल मुकुटधारी बनवत आहेत. आपण शूद्रा पासून ब्राह्मण बनतो आणि नंतर देवता बनणार तर मग त्या घाणेरड्या विकारी सवयी नष्ट होतात. सर्व आसुरी गोष्टी सोडाव्या लागतील. सफाई कामगारापासून एम.पी. बनला तर राहणीमान, घर इत्यादी सर्व फर्स्टक्लास बनते. त्यांच्या या गोष्टी तर यावेळेपुरत्या आहेत. तुम्ही तर जाणता की आपण भविष्यामध्ये काय बनणार आहोत. स्वतःशी अशा प्रकारे गोष्टी केल्या पाहिजेत. आपण काय होतो, आता काय बनलो आहोत. तुम्ही देखील शूद्र जातीचे होता, आता विश्वाचे मालक बनत आहात. जेव्हा कोणी उच्च पद प्राप्त करतो, तेव्हा त्या पदाचा गर्व असतो. तर तुम्ही देखील पूर्वी कोण होता? (पतित), छी-छी होता. आता स्वयं भगवान तुम्हाला शिकवून बेहदचे मालक बनवत आहेत. हे देखील तुम्ही समजता की परमपिता परमात्मा जरूर इथेच येऊन राजयोग शिकवतील. मूलवतन किंवा सूक्ष्मवतन मध्ये तर शिकवणार नाहीत. तुम्ही सर्व दूरदेशामध्ये राहणारे आत्मे आहात, इथे येऊन पार्ट बजावता. ८४ जन्मांचा पार्ट बजावायचाच आहे. ते तर म्हणतात ८४ लाख योनी आहेत. किती घोर अंधारामध्ये आहेत. आता तुम्ही समजता की, ५ हजार वर्षांपूर्वी आपण देवी-देवता होतो. आता तर पतित बनलो आहोत. गातात देखील - ‘हे पतित-पावन या, आम्हाला पावन बनवा’. परंतु समजत नाहीत. आता स्वतः बाबा पावन बनविण्यासाठी आले आहेत. राजयोग शिकवत आहेत. शिक्षणाशिवाय कोणीही उच्च पद प्राप्त करू शकत नाही. तुम्ही जाणता बाबा आम्हाला शिकवून नरापासून नारायण बनवत आहेत. एम-ऑब्जेक्ट समोर उभे आहे. प्रजेचे पद काही एम-ऑब्जेक्ट नाहीये. चित्र देखील लक्ष्मी-नारायणाचे आहे. अशी चित्रे ठेवून कुठे शिकवत असतील काय? तुमच्या बुद्धीमध्ये संपूर्ण नॉलेज आहे. आपण ८४ जन्म घेऊन पतित बनलो आहोत. शिडीचे चित्र खूप सुंदर आहे. ही पतित दुनिया आहे ना, यामध्ये साधू-संत सर्व येतात. ते स्वतः देखील गात राहतात - ‘पतित-पावन या’. पतित दुनियेला पावन दुनिया म्हणता येणार नाही. नवीन दुनिया आहे पावन दुनिया. जुन्या पतित दुनियेमध्ये कोणीही पावन राहू शकणार नाही.

आता तुम्हा मुलांना किती अभिमान वाटला पाहिजे की, आपण गॉड फादरली स्टुडंट आहोत, ईश्वर आम्हाला शिकवत आहेत. बाबा गरीबांनाच येऊन शिकवतात. गरीबांचे कपडे इत्यादी मळके असतात ना. तुमची आत्माच तर शिकत आहे ना. आत्मा जाणते हे जुने शरीर आहे. याला कोणतेही हलके-साधे कपडे घातले तरी काही हरकत नाही. यामध्ये कोणता विशेष ड्रेस इत्यादी बदलण्याची अथवा दिखावा करण्याची गोष्ट नाहीये. ड्रेसशी काहीही संबंध नाही. बाबा तर आत्म्यांना शिकवतात. शरीर तर पतित आहे, त्यावर कितीही चांगले कपडे घाला. परंतु आत्मा आणि शरीर दोन्ही पतित आहेत ना. श्रीकृष्णाला सावळा दाखवतात ना. त्यांची आत्मा आणि शरीर दोन्ही काळे होते. तो गावातील मुलगा होता, तुम्ही सर्व देखील गावातील मुले होता. दुनियेमध्ये मनुष्यमात्र निधनके (बिनाधनीचे) झाले आहेत. बाबांना जाणत सुद्धा नाहीत. हदचे पिता तर सर्वांनाच आहेत. बेहदचे बाबा फक्त तुम्हा ब्राह्मणांनाच मिळाले आहेत. आता बेहदचे बाबा तुम्हाला राजयोग शिकवत आहेत. भक्ती आणि ज्ञान. भक्तीचा जेव्हा अंत होतो तेव्हा बाबा येऊन ज्ञान देतात. आता अंत आहे. सतयुगामध्ये यापैकी काहीही नसते. आता जुन्या दुनियेचा विनाश जवळ येऊन ठेपला आहे. पावन दुनियेला स्वर्ग म्हटले जाते. चित्रांमध्ये किती स्पष्टपणे समजावून सांगितले जाते. राधा-कृष्णच नंतर लक्ष्मी-नारायण बनतात. हे देखील कोणाला ठाऊक नाहीये. तुम्ही जाणता दोघेही वेगवेगळ्या राजधानीचे होते. तुम्ही स्वर्गातील स्वयंवर देखील पाहिले आहे. पाकिस्तानमध्ये तुम्हा मुलांचे मन रमविण्यासाठी सर्व साधने उपलब्ध होती, तुम्हाला सर्व साक्षात्कार होत होते.

आता तुम्ही जाणता - आपण राजयोग शिकत आहोत, हे विसरता कामा नये. भले किचनमध्ये काम करत असाल किंवा भांडी घासत असाल परंतु शिकते तर प्रत्येकाची आत्माच ना. इथे सर्व जण येऊन बसतात म्हणून मोठ-मोठ्या व्यक्ती येत नाहीत; त्यांना वाटते की, इथे तर सर्व गरीबच आहेत, म्हणून त्यांना लाज वाटते. बाबा आहेतच गरीब निवाज. काही-काही सेंटर्सवर मेहतर सफाई कामगार देखील येतात. काही मुसलमान देखील येतात. बाबा म्हणतात - देहाचे सर्व धर्म सोडा. मी गुजराती आहे, मी अमुक आहे - हा सर्व देह-अभिमान आहे. इथे तर आत्म्यांना परमात्मा शिकवत आहेत. बाबा म्हणतात - मी एका सामान्य तनामध्ये आलो आहे. तर सामान्य असणाऱ्यांकडे सामान्य असणारेच येतील. दुनियावाले तर समजतात की हे (ब्रह्मा बाबा) तर हिऱ्यांचे व्यापारी होते. बाबा स्वतः आठवण करून देतात की, कल्पापूर्वी देखील मी सांगितले होते की मी एका सामान्य वृद्ध तनामध्ये येतो. अनेक जन्मांतील अंतिम जन्माच्याही शेवटी मी प्रवेश करतो. यांना (ब्रह्मा बाबांना) म्हणतात की, ‘तू तुझ्या जन्मांना जाणत नाहीस’. फक्त एका अर्जुनालाच घोडागाडीच्या रथामध्ये बसून ज्ञान दिले असे नाही ना, त्याला पाठशाळा म्हणता येणार नाही. ना हे युद्धाचे मैदान आहे, हे शिक्षण आहे. मुलांनी शिक्षणावर पूर्ण लक्ष दिले पाहिजे. मला पूर्ण शिक्षण घेऊन डबल मुकुटधारी बनायचे आहे. आता तर कोणताही मुकुट राहिलेला नाहीये. भविष्यामध्ये डबल मुकुटधारी बनायचे आहे. द्वापर पासून लाइट निघून जाते (पवित्रतेचा मुकुट नाहीसा होतो) आणि मग फक्त सिंगल मुकुट राहतो. सिंगल मुकुटधारी डबल मुकुटधाऱ्यांची पूजा करतात. ही निशाणी देखील जरूर असली पाहिजे. बाबा चित्रांविषयी डायरेक्शन देत राहतात म्हणून चित्र बनविणाऱ्यांना मुरलीकडे खूप लक्ष द्यावे लागेल. चित्रांवरून कोणालाही समजावून सांगणे खूप सोपे होते. जसे कॉलेजमध्ये नकाशावर दाखवतात तेव्हा लगेच बुद्धीमध्ये येते. युरोप त्या बाजूला आहे, आयलंड आहे, लंडन त्या बाजूला आहे. जर नकाशाच पाहिला नसेल तर त्यांना कसे कळणार की, युरोप कुठे आहे. नकाशा पाहिल्यावर लगेच लक्षात येईल. आता तुम्ही जाणता वर आहेत पूज्य डबल मुकुटधारी देवी-देवता. नंतर मग खाली उतरतात तर पुजारी बनतात. शिडी उतरतात ना. ही शिडी खूप सोपी आहे. कोणीही समजू शकतो. परंतु काहींच्या बुद्धीमध्ये काहीच जात नाही. भाग्यच असे आहे. स्कूलमध्ये पास-नापास तर होतातच. भाग्यामध्ये नसेल तर पुरुषार्थ देखील होत नाही, आजारी पडतात. शिकू शकत नाहीत. काही जण चांगले शिकतात. परंतु तरीही ते आहे भौतिक शिक्षण, हे आहे रुहानी शिक्षण. याकरिता सोन्याची बुद्धी पाहिजे. बाबा एव्हर प्युअर सोने आहेत, त्यांची आठवण केल्याने तुमची आत्मा सोन्या सारखी बनत जाईल. म्हटले जाते ना की, हे तर जणू ठिक्कर-बुद्धी आहेत. तिथे असे म्हणणार नाहीत, तो तर स्वर्ग होता. हे विसरले आहेत की, भारत स्वर्ग होता. हे देखील एखाद्या प्रदर्शनीमध्ये समजावून सांगू शकता, आणि मग पुन्हा त्यांच्याकडून हे परत बोलून देखील घेऊ शकता. प्रोजेक्टरमध्ये ते शक्य होणार नाही. सर्व प्रथम तर हे त्रिमूर्ती, लक्ष्मी-नारायण आणि शिडीचे चित्र खूप आवश्यक आहे. या लक्ष्मी-नारायणाच्या चित्रामध्ये संपूर्ण ८४ जन्मांचे नॉलेज येते. मुलांचे संपूर्ण दिवस हेच चिंतन चालले पाहिजे. प्रत्येक सेंटरवर मुख्य चित्रे तर जरूर ठेवली पाहिजेत. चित्रांद्वारे चांगल्या रीतीने समजावून सांगता येईल. ब्रह्मा द्वारे ही राजधानी स्थापन होत आहे. आपण प्रजापिता ब्रह्माची मुले ब्रह्माकुमार-कुमारी आहोत. यापूर्वी आम्ही शूद्र वर्णाचे होतो, आता आम्ही ब्राह्मण वर्णाचे बनलो आहोत, नंतर देवता बनायचे आहे. शिवबाबा आम्हाला शूद्रा पासून ब्राह्मण बनवत आहेत. आमचे एम-ऑब्जेक्ट समोर उभे आहे. हे लक्ष्मी-नारायण स्वर्गाचे मालक होते मग हे शिडी कशी काय उतरले? कोणापासून कोण बनतात! अगदी जणूकाही बुद्धू बनतात. हे लक्ष्मी-नारायण भारतामध्ये राज्य करत होते. भारतवासीयांना हे माहीत असले पाहिजे ना. नंतर मग काय झाले, ते गेले कुठे? काय यांच्यावर कोणी विजय मिळवला? त्यांनी युद्धामध्ये कोणाला हरवले? ना ते कोणा कडून जिंकले, ना कोणा कडून हरले. ही तर सगळी मायेची गोष्ट आहे. रावण राज्य सुरू झाले आणि ५ विकारांमध्ये पडून राजाई गमावली; मग ५ विकारांवर विजय मिळविल्याने पुन्हा तसे लक्ष्मी-नारायण बनतात. आता रावण राज्याचा खूप दिखावा आहे. आपण गुप्त रीतीने आपली राजधानी स्थापन करत आहोत. तुम्ही किती साधारण आहात. शिकविणारे किती उच्च ते उच्च आहेत आणि निराकार बाबा पतित शरीरामध्ये येऊन मुलांना असे लक्ष्मी-नारायण बनवतात. दूरदेशामधून पतित दुनियेमध्ये पतित शरीरामध्ये येतात. ते देखील बाबा स्वतःला काही लक्ष्मी-नारायण बनवत नाहीत, तुम्हा मुलांना बनवतात. परंतु तुम्ही असे बनण्यासाठी पूर्ण पुरुषार्थ करत नाही. रात्रं-दिवस शिकायचे आहे आणि शिकवायचे आहे. बाबा दिवसेंदिवस खूप सोप्या युक्त्या समजावून सांगत राहतात. लक्ष्मी-नारायणापासूनच सुरुवात केली पाहिजे. त्यांनी ८४ जन्म कसे घेतले, आता पुन्हा अंतिम जन्मामध्ये शिकत आहेत, नंतर त्यांची डिनायस्टी (घराणे) बनते. समजावून सांगण्यासारख्या किती गोष्टी आहेत. चित्रांसाठी बाबा डायरेक्शन देतात. एखादे चित्र तयार केलेत, तर लगेच बाबांकडे धावत आले पाहिजे. बाबा सुधारणा करून सर्व डायरेक्शन देतील.

बाबा म्हणतात - मी सांवळशाह आहे (विशाल बुद्धीने देणारा आहे), हुंडी भरेल. कोणत्याही गोष्टीची चिंता नाही. इतकी असंख्य मुले बसली आहेत. बाबा जाणतात की कोणा कडून हुंडी भरून घेऊ शकतो. बाबांचा विचार आहे की, जयपूरला ताकतीने पुढे आणायचे आहे. तिथेच हठयोग्यांचे म्युझियम आहे. तर मग तुमचे राजयोगाचे म्युझियम देखील इतके आकर्षकरित्या उभारले जावे की कोणीही येऊन बघेल. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) पवित्र ज्ञानाला बुद्धीमध्ये धारण करण्यासाठी आपल्या बुद्धी रूपी पात्राला सोन्याचे बनवायचे आहे. आठवणीद्वारेच हे पात्र सोन्याचे बनेल.

२) आता ब्राह्मण बनलो आहोत त्यामुळे शूद्रपणाच्या सर्व सवयी काढून टाकायच्या आहेत. अतिशय रॉयल्टीने राहायचे आहे. आपण विश्वाचे मालक बनत आहोत - या नशेमध्ये राहायचे आहे.

वरदान:-
संगमयुगावर एकाचे शंभर पटीने प्रत्यक्ष फळ प्राप्त करणारे पदमापदम भाग्यशाली भव

संगमयुगच एकाचे शंभर पटीने प्रत्यक्ष फळ देणारे आहे, फक्त एकदा संकल्प केला की, ‘मी बाबांचा आहे’, ‘मी मास्टर सर्वशक्तिमान आहे’, तर मायाजीत बनण्याचा, विजयी बनण्याच्या नशेचा अनुभव होतो. श्रेष्ठ संकल्प करणे - हेच बीज आहे आणि त्याचे सर्वांत मोठे फळ हे आहे की, स्वयं परमात्मा पिता साकार मनुष्य रूपामध्ये भेटण्यासाठी येतात, या एका फळामध्येच सर्व फळे सामावलेली आहेत.

बोधवाक्य:-
खरे ब्राह्मण ते आहेत ज्यांच्या चेहऱ्यामधून आणि वर्तनामधून प्युरिटीची पर्सनॅलिटी अथवा रॉयल्टी अनुभवास येते.

हे अव्यक्त इशारे - परोपकाराच्या भावनेने संपन्न बनून अपकारीवर देखील उपकार करा.

वर्तमान समयी अनेक आत्म्यांची स्वतःवर उपकार करण्याची (स्वतःचा उद्धार करण्याची) इच्छा आहे, परंतु त्यांच्यामध्ये हिंमत आणि शक्ती नाहीये. अशा निर्बल आत्म्यांवर उपकार करणारी तुम्ही पर-उपकारी मुले निमित्त आहात. तर उपकार निर्मळ मनाने केला जातो. विश्व-राज्य अधिकारी बनायचे असेल तर ‘स्व-उपकारी’ असण्यासोबतच, ‘पर-उपकारी’ देखील बना.