12-11-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड
मुलांनो - तुम्ही ड्रामाच्या खेळाला जाणता त्यामुळे आभार मानण्याची देखील गरज नाही”
प्रश्न:-
सेवाभावी
मुलांमध्ये कोणती एक सवय अजिबात असता कामा नये?
उत्तर:-
मागण्याची. तुम्हाला बाबांकडून आशीर्वाद किंवा कृपा इत्यादी मागण्याची गरज नाहीये.
तुम्ही कोणाकडून पैसे देखील मागू शकत नाही. मागण्यापेक्षा मेलेले चांगले. तुम्ही
जाणता ड्रामा अनुसार कल्पापूर्वी ज्यांनी बीज पेरले असेल ते पेरतील, ज्यांना आपले
भविष्यात उच्च पद बनवायचे असेल ते जरूर सहयोगी बनतील. तुमचे काम आहे सेवा करणे.
तुम्ही कोणाकडून काहीही मागू शकत नाही. भक्तीमध्ये मागतात, ज्ञानामध्ये नाही.
गीत:-
मुझको सहारा
देने वाले...
ओम शांती।
मुलांच्या तोंडून ‘धन्यवाद’ हा शब्द पिता-टीचर-गुरूसाठी निघू शकत नाही कारण मुले
जाणतात हा खेळ बनलेला आहे. धन्यवाद इत्यादीचा तर प्रश्नच नाही. हे देखील मुले ड्रामा
अनुसार जाणतात. ड्रामा शब्द देखील तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये येतो. ‘खेळ’ हा
शब्द उच्चारताच पूर्ण खेळ तुमच्या बुद्धीमध्ये येतो. जणू काही तुम्ही आपोआप
स्वदर्शन चक्रधारी बनता. तिन्ही लोक देखील तुमच्या बुद्धीमध्ये येतात. मूलवतन,
सूक्ष्मवतन, स्थूलवतन. हे देखील जाणता आता खेळ पूर्ण होत आहे. बाबा येऊन तुम्हाला
त्रिकालदर्शी बनवतात. तिन्ही काळांच्या, तिन्ही लोकांच्या आदि-मध्य-अंताचे रहस्य
समजावून सांगतात. काळ वेळेला म्हटले जाते. या सर्व गोष्टी लिहून घेतल्याशिवाय
लक्षात राहू शकत नाहीत. तुम्ही मुले तर बरेच पॉईंट्स विसरून जाता. ड्रामाच्या
कालावधीला देखील तुम्ही जाणता. तुम्ही त्रिनेत्री, त्रिकालदर्शी बनता, ज्ञानाचा
तिसरा नेत्र मिळतो. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही आस्तिक बनता, नाही तर निधनके (अनाथ)
होता. हे ज्ञान तुम्हां मुलांना मिळत आहे. विद्यार्थ्यांच्या बुद्धीमध्ये सतत
नॉलेजचे मंथन चालू असते. हे देखील नॉलेज आहे ना. ड्रामा अनुसार उच्च ते उच्च बाबाच
हे नॉलेज देतात. ड्रामा शब्द देखील तुमच्याच तोंडून निघू शकतो. ते देखील जी मुले
सेवेमध्ये तत्त्पर असतात. आता तुम्ही जाणता - आम्ही अनाथ होतो. आता बेहदचे बाबा धणी
(मालक) मिळाले आहेत त्यामुळे धणके (सनाथ) बनलो आहोत. आधी तुम्ही बेहदचे अनाथ होता,
बेहदचे बाबा बेहदचे सुख देणारे आहेत, दुसरा कोणता असा पिता नाही, जो असे सुख देत
असेल. नवीन दुनिया, जुनी दुनिया हे सर्व तुम्हा मुलांच्या बुद्धी मध्ये आहे. परंतु
इतरांना देखील यथार्थ रीतीने समजावून सांगा, या ईश्वरीय धंद्याला लागा. प्रत्येकाची
परिस्थिती आपापली असते. समजावून देखील तेच सांगू शकतील जे आठवणीच्या यात्रेमध्ये
असतील. आठवणीने बळ मिळते ना. बाबा आहेतच - धारदार तलवार. तुम्हा मुलांना जोहर (ताकद)
भरायची आहे. योगबलाद्वारे विश्वाची बादशाही प्राप्त करता. योगामुळे बळ मिळते,
ज्ञानामुळे नाही. मुलांना सांगितले आहे - नॉलेज हे सोर्स ऑफ इनकम आहे (कमाईचे साधन
आहे). योगाला बळ म्हटले जाते. रात्रं-दिवसाचा फरक आहे. आता योग चांगला की ज्ञान
चांगले? योगच प्रसिद्ध आहे. योग अर्थात बाबांची आठवण. बाबा म्हणतात - या आठवणीनेच
तुमची पापे नष्ट होतील. याच्यावरच बाबा जोर देतात. ज्ञान तर सोपे आहे. भगवानुवाच -
‘मी तुम्हाला सोपे ज्ञान ऐकवतो. ८४ च्या चक्राचे ज्ञान ऐकवतो’. त्यामध्ये सर्व काही
येते. इतिहास-भूगोल आहे ना? ज्ञान आणि योग दोन्ही आहेत सेकंदाची कामे. बस्स, मी
आत्मा आहे, मला बाबांची आठवण करायची आहे. यामध्ये मेहनत आहे. आठवणीच्या यात्रेमध्ये
राहिल्यामुळे शरीराला जणू विसरून जायला होते. तासभर जरी असे अशरीरी होऊन बसलात तर
किती पावन व्हाल. रात्री माणसे कोणी ६ तास, कोणी ८ तास झोपतात तर अशरीरी होतात ना.
त्या वेळी कोणते विकर्म होत नाही. आत्मा थकून झोपी जाते. असे देखील नाही की पापे
भस्म होतात. नाही, ती आहे झोप. कोणते विकर्म होत नाही. झोपले नाही तर पापच करत
राहतील. तर झोप हा देखील एक बचाव आहे. दिवसभर सेवा करून आत्मा म्हणते मी आता झोपतो,
अशरीरी बनतो. तुम्हाला शरीर असून अशरीरी बनायचे आहे. मी आत्मा या शरीरापेक्षा न्यारी
(वेगळी), शांत स्वरूप आहे. आत्म्याची महिमा कधी ऐकली नसेल. आत्मा सत् चित् आनंद
स्वरूप आहे. परमात्म्याची महिमा गातात की सत् आहेत, चैतन्य आहेत. सुख-शांतीचा सागर
आहेत. मग आता तुम्हाला म्हणणार - ‘मास्टर’, छोट्या मुलाला मास्टर देखील म्हणतात. तर
बाबा युक्त्या सांगत राहतात. असे देखील नाही की पूर्ण दिवस झोपायचे आहे. नाही,
तुम्हाला तर आठवणीमध्ये राहून पापांचा विनाश करायचा आहे. जितकी शक्य असेल तितकी
बाबांची आठवण करायची आहे. असे देखील नाही की बाबा आमच्यावर दया अथवा कृपा करतात.
नाही, हे त्यांचे गायन आहे - दयाळू बादशहा. तमोप्रधानापासून सतोप्रधान बनविणे, हा
देखील त्यांचा पार्ट आहे. भक्त लोक महिमा गातात, तुम्हाला फक्त महिमा गायची नाहीये.
ही गाणी इत्यादी देखील दिवसेंदिवस बंद होत जातात. स्कुलमध्ये कधी गाणी असतात का?
मुले शांत बसून राहतात. टीचर आल्यावर उठून उभे राहतात, मग बसतात. हे बाबा म्हणतात -
मला तर पार्ट मिळाला आहे शिकवण्याचा, त्यामुळे शिकवायचेच आहे. तुम्हा मुलांना उठून
उभे राहण्याची गरज नाही. आत्म्याने बसून ऐकायचे आहे. तुमची गोष्टच साऱ्या
दुनियेपेक्षा न्यारी आहे. मुलांना म्हणतील का की तुम्ही उठा. नाही, ते तर
भक्तीमार्गामध्ये करतात, इथे नाही. बाबा तर स्वतः उठून नमस्ते करतात. स्कुलमध्ये जर
मुले उशिरा आली तर टीचर एक तर पट्टी मारतात किंवा बाहेर उभे करतात त्यामुळे वेळेवर
पोहोचण्याची भीती असते. इथे तर घाबरण्याची गोष्ट नाही. बाबा सांगत राहतात - मुरल्या
मिळत राहतात. त्या नियमितपणे वाचायच्या आहेत. मुरली वाचा तर तुमची हजेरी लागेल, नाही
तर गैरहजेरी लागेल कारण बाबा म्हणतात तुम्हाला गुह्य-गुह्य गोष्टी सांगतो. जर मुरली
चुकवलीत तर ते पॉईंट्स तुमचे मिस होतील. या आहेत नवीन गोष्टी, ज्या दुनियेमध्ये
कोणीही जाणत नाहीत. तुमची चित्रे पाहूनच संभ्रमित होतात. कोणत्या शास्त्रांमध्ये
देखील नाहीये. भगवंताने चित्रे बनवली होती. तुमची ही नवीन चित्र-शाळा आहे. ब्राह्मण
कुळाचे जे देवता बनणारे असतील त्यांच्या बुद्धीमध्येच धारण होईल. म्हणतील हे तर
बरोबर आहे. कल्पापूर्वी देखील आम्ही शिकलो होतो, जरूर भगवान शिकवत आहेत.
भक्तिमार्गातील
धर्मशास्त्रांमध्ये पहिल्या नंबर मध्ये गीताच आहे कारण पहिला धर्मच हा आहे. नंतर
अर्ध्या कल्पानंतर त्याच्याही नंतर बऱ्याच उशिराने दुसरे शास्त्र बनते. पहिला
इब्राहिम आला तर एकटा होता. मग एकाचे दोन, दोनाचे चार झाले. जेव्हा धर्माची वृद्धी
होत-होत दीड-लाख होतात तेव्हा शास्त्र इत्यादी बनतात. त्याचाही अर्धा कालावधी
लोटल्यानंतरच बनत असतील, हिशोब केला जातो ना. मुलांना तर खूप आनंद झाला पाहिजे.
बाबांकडून आपल्याला वारसा मिळत आहे. तुम्ही जाणता बाबा आपल्याला संपूर्ण
सृष्टीचक्राचे ज्ञान समजावून सांगत आहेत. हा आहे बेहदचा इतिहास-भूगोल. सर्वांना
सांगा इथे वर्ल्डची हिस्ट्री-जिओग्राफी सांगितली जाते, जी इतर कोणीही शिकवू शकणार
नाही. भले जगाचा नकाशा काढतात. परंतु त्यामध्ये हे कुठे दाखवतात की,
लक्ष्मी-नारायणाचे राज्य केव्हा होते, किती काळ चालले. दुनिया तर एकच आहे.
भारतामध्येच राज्य करून गेले आहेत, आता नाही आहे. या गोष्टी कोणाच्याही बुद्धीमध्ये
नाहीत. ते तर कल्पाचा कालावधी लाखो वर्षे म्हणतात. तुम्हा गोड-गोड मुलांना काही
जास्त त्रास देत नाहीत. बाबा म्हणतात - पावन बनायचे आहे. पावन बनण्याकरीता तुम्ही
भक्तिमार्गामध्ये किती खस्ता खाता. आता समजता खस्ता खाता-खाता २५०० वर्षे होऊन गेली.
आता परत बाबा आले आहेत पुन्हा राज्य-भाग्य देण्याकरिता. तुम्हाला हेच आठवते. दुनिया
जुन्यापासून नवीन आणि नव्यापासून जुनी जरूर होते. आता तुम्ही जुन्या भारताचे मालक
आहात ना. पुन्हा नवीन दुनियेचे मालक बनाल. एकीकडे भारताची खूप महिमा गात राहतात,
दुसरीकडे मग खूप निंदा करत राहतात. ते देखील गाणे तुमच्याकडे आहे. तुम्ही समजता -
आता काय-काय होत आहे. हे दोन्ही गाणी देखील ऐकवली पाहिजेत. तुम्ही सांगू शकता - कुठे
राम-राज्य आणि कुठे हे!
बाबा आहेत गरीब निवाज.
गरिबांच्याच मुली मिळतील. श्रीमंतांना तर आपलाच नशा असतो. कल्पापूर्वी जे आले असतील
तेच येतील. काळजी करण्याचा काही प्रश्नच नाही. शिवबाबांना कधीच कोणती काळजी करण्याची
गरज नाही; दादांना (ब्रह्मा बाबांना) काळजी वाटत असेल. यांना (ब्रह्मा बाबांना)
स्वतःची देखील काळजी आहे की, आपल्याला नंबरवन पावन बनायचे आहे. यामध्ये आहे गुप्त
पुरुषार्थ. चार्ट ठेवल्याने लक्षात येते, यांचा पुरुषार्थ जास्त आहे. बाबा नेहमी
सांगत राहतात की डायरी ठेवा. खूप मुले लिहितात देखील, चार्ट लिहिल्याने खूप सुधारणा
झाली आहे. ही खूप चांगली युक्ती आहे, तर सर्वांनी केले पाहिजे. डायरी ठेवल्याने
तुम्हाला खूप फायदा होईल. डायरी ठेवणे अर्थात बाबांची आठवण करणे. त्यामध्ये बाबांची
आठवण लिहायची आहे. डायरी देखील मदतगार बनेल, पुरुषार्थ होईल. डायऱ्या किती
लाखो-करोडोंनी बनतात, नोंद इत्यादी करून ठेवण्याकरिता. सर्वात मुख्य गोष्ट तर हीच
आहे - चार्ट लिहीणे. हे कधीही विसरता कामा नये. त्याच वेळी डायरीमध्ये लिहिले पाहिजे.
रात्री हिशोब लिहिला पाहिजे. तर माहीत होईल हा तर आपल्याला घाटा होत आहे. कारण
जन्म-जन्मांतरीची विकर्म भस्म करायची आहेत.
बाबा रस्ता सांगतात -
स्वतःवर दया अथवा कृपा करायची आहे. टीचर तर शिकवतात, आशीर्वाद तर करणार नाहीत.
आशीर्वाद, कृपा, दया इत्यादी मागण्यापेक्षा मरणे चांगले. कोणाकडून पैसे देखील मागता
कामा नयेत. मुलांना सक्त मनाई आहे. बाबा म्हणतात - ड्रामा अनुसार ज्यांनी
कल्पापूर्वी बीज पेरले आहे, वारसा घेतला आहे ते आपणच करतील. तुम्ही कोणत्याही
कामासाठी मागू नका. सफल केले नाही तर मिळणार नाही. मनुष्य जेव्हा दान-पुण्य करतात
तर रिटर्नमध्ये मिळते ना. राजाच्या घरी किंवा एखाद्या श्रीमंताकडे जन्म होतो.
ज्यांना सफल करायचे असेल ते आपणच करतील, तुम्ही मागायचे नाही. कल्पापूर्वी ज्यांनी
जितके केले आहे, ड्रामा त्यांच्याकडून करून घेईल. मागण्याची काय गरज आहे. बाबा तर
सांगत राहतात, सेवेकरिता हुंडी भरत राहते. मी मुलांना थोडेच म्हणेन की, पैसे द्या.
भक्तिमार्गाची गोष्ट ज्ञानमार्गामध्ये नसते. ज्यांनी कल्पापूर्वी मदत केली आहे, ते
करत राहतील, आपणहून कधीही मागायचे नाही. बाबा म्हणतात - ‘मुलांनो, तुम्ही चंदा (देणगी)
गोळा करू शकत नाही. हे तर संन्याशी लोक करतात. भक्तिमार्गामध्ये थोडे जरी दिले,
त्याच्या रिटर्नमध्ये एका जन्मासाठी मिळते. हे मग आहे जन्म-जन्मांतरासाठी. ते
जन्म-जन्मांतरासाठी सर्व काही देणे चांगले आहे ना. यांचे तर नाव भोला भंडारी आहे.
तुम्ही पुरुषार्थ करा तर विजयी माळेमध्ये ओवले जाऊ शकता, भंडारा भरपूर काल कंटक दूर
आहे. तिथे कधी अकाली मृत्यू होत नाही. इथे मनुष्य काळाला किती घाबरतात. थोडे काही
होते तर मरण आठवते. तिथे हा विचारच नाही, तुम्ही अमरपुरीमध्ये येता. हा छी-छी मृत्यू
लोक आहे. भारतच अमरलोक होता, आता मृत्यूलोक आहे.
तुमचा अर्धा कल्प खूप
छी-छी (विकारामध्ये) व्यतीत झाला आहे. खालीच घसरत आला आहात (अधोगती होत आली आहे).
जगन्नाथ पुरीमध्ये खूप घाणेरडी चित्रे आहेत. बाबा (ब्रह्मा बाबा) तर अनुभवी आहेत
ना. सगळीकडे फिरलेला आहे. गोऱ्यापासून सावळा बनला आहे. गावामध्ये राहणारा होता.
वास्तविक हा संपूर्ण भारत एक गाव आहे. तुम्ही गावातील मुले आहात. आता तुम्ही समजता
आपण विश्वाचे मालक बनतो. असे समजू नका आम्ही तर बॉम्बेमध्ये राहणारे आहोत. बॉम्बे
देखील स्वर्गाच्या पुढे काय आहे! काहीच नाही. एक दगड सुद्धा नाही. आपण गावची मुले
निधणके (बिनधनीचे) बनले आहोत, आता पुन्हा आम्ही स्वर्गाचे मालक बनत आहोत तर किती
आनंद वाटला पाहिजे. नावच आहे स्वर्ग. किती हिरे-माणके महालांना जडवलेले असतात.
सोमनाथाचे मंदिरच किती हिरे-माणकांनी सजलेले होते. सर्वात पहिले शिवाचे मंदिरच
बनवतात. भारत किती श्रीमंत होता. आता तर भारत एखाद्या गावाप्रमाणे बनला आहे.
सतयुगामध्ये खूप मालामाल होता. या गोष्टी दुनियेमध्ये तुमच्याशिवाय कोणीही जाणत
नाहीत. तुम्ही म्हणाल - काल आम्ही बादशहा होतो, आज गरीब आहोत. आता पुन्हा विश्वाचे
मालक बनत आहोत. तुम्हा मुलांना आपल्या भाग्याचे आभार मानले पाहिजेत. आम्ही
पद्मा-पदम भाग्यशाली आहोत. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१)
विकर्मांपासून वाचण्यासाठी या शरीरामध्ये राहत असताना अशरीरी बनण्याचा पुरुषार्थ
करायचा आहे. आठवणीची यात्रा अशी असावी जी शरीराची देखील विस्मृती व्हावी.
२) ज्ञानाचे मंथन
करून आस्तिक बनायचे आहे. कधीही मुरली चुकवायची नाही. आपल्या उन्नतीसाठी डायरीमध्ये
आठवणीचा चार्ट लिहून काढायचा आहे.
वरदान:-
रूहानी शक्तीला
प्रत्येक कर्मामध्ये युज करणारे युक्तियुक्त जीवनमुक्त भव
या ब्राह्मण जीवनाची
विशेषता आहेच मुळी रूहानियत. रूहानियतच्या शक्तीद्वारेच स्वतःला अथवा इतरांना
परिवर्तित करू शकता. या शक्तीद्वारे अनेक प्रकारच्या भौतिक बंधनांपासून मुक्ती मिळते.
परंतु युक्तियुक्त बनून प्रत्येक कर्मामध्ये लूज होण्याऐवजी, रूहानी शक्तीला यूज करा.
मनसा-वाचा-कर्मणा तिन्हीमध्ये एकाच वेळी रुहानियतच्या शक्तीचा अनुभव व्हावा. जे
तिन्हीमध्ये युक्तियुक्त आहेत, तेच जीवनमुक्त आहेत.
बोधवाक्य:-
सत्यतेच्या
विशेषतेद्वारे आनंद आणि शक्तीची अनुभूती करत चला.
अव्यक्त इशारे:-
अशरीरी आणि विदेही स्थितीचा अभ्यास वाढवा.
ज्या पण परिस्थिती
येत आहेत आणि येणार आहेत, त्यामध्ये विदेही स्थितीचा अभ्यास खूप असायला हवा;
त्यामुळे इतर सर्व गोष्टींना सोडून ‘असे तर होणार नाही ना, हे तर होणार नाही ना…
काय होईल…’ या प्रश्नांना सोडून द्या; आता विदेही स्थितीचा अभ्यास वाढवा. विदेही
मुलांवर कोणतीही परिस्थिती अथवा कोणतीही भयग्रस्त स्थिती परिणाम करू शकणार नाही.