13-01-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड
मुलांनो - बाबांच्या श्रीमताचा रिगार्ड ठेवणे अर्थात मुरली कधीही मिस न करणे,
प्रत्येक आज्ञेचे पालन करणे”
प्रश्न:-
जर तुम्हा
मुलांना कोणी विचारले की, ‘राजी-खुशी आहात (संतुष्ट आणि आनंदी आहात)?’ तर तुम्ही
कोणते उत्तर खूप अभिमानाने दिले पाहिजे?
उत्तर:-
तुम्ही बोला - चिंता होती पार ब्रह्ममध्ये राहणाऱ्याची, ते मिळाले, बाकी काय पाहिजे.
‘पाना था सो पा लिया…’ तुम्हा ईश्वरीय मुलांना कोणत्याही गोष्टीची चिंता नाही.
तुम्हाला बाबांनी आपले बनवले आहे, तुमच्यावर मुकुट ठेवला आहे तर मग चिंता कोणत्या
गोष्टीची.
ओम शांती।
बाबा समजावून सांगत आहेत मुलांच्या बुद्धीमध्ये जरूर असेल की बाबा - पिता देखील
आहेत, टीचर देखील आहेत, सुप्रीम गुरु देखील आहेत, याच आठवणीमध्ये जरूर असतील. ही अशी
आठवण कधी कोणी शिकवू शकणार नाही. बाबाच कल्प-कल्प येऊन शिकवतात. ते ज्ञानाचा सागर,
पतित-पावन देखील आहेत. ते पिता देखील आहेत, टीचर देखील आहेत, गुरु देखील आहेत. हे
आता समजते आहे, जेव्हा ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे. मुले भले समजत तर असतील
परंतु बाबांनाच विसरून जातात तर टीचर, गुरु तरी कसे लक्षात राहतील. माया खूपच
शक्तिशाली आहे जी तीन रूपामध्ये महिमा असताना देखील तिन्ही रूपांना विसरायला लावते.
इतकी सर्वशक्तिमान आहे. मुले देखील लिहितात - ‘बाबा, आम्ही विसरून जातो’. माया अशी
प्रबळ आहे. ड्रामा अनुसार आहे खूप सोपे. मुले समजतात असा कधी कोणी असू शकत नाही. ते
पिता, टीचर, सद्गुरु आहेत - खरे-खुरे, यामध्ये थापा इत्यादीची काही गोष्टच नाही.
सखोलपणे समजून घेतले पाहिजे ना! परंतु माया विसरायला लावते. म्हणतात - ‘मी हार खातो’,
तर मग पावला-पावला मध्ये पद्म कसे होतील! देवतांना पद्मची निशाणी दाखवतात. सर्वांना
तर देऊ शकत नाहीत. हे शिक्षण ईश्वराचे आहे, मनुष्याचे नाही. असे शिक्षण मनुष्याचे
कधी असू शकत नाही. भले देवतांची महिमा केली जाते परंतु तरीही उच्च ते उच्च एक बाबाच
आहेत. बाकी त्यांचा (मनुष्यांचा) मोठेपणा तो काय आहे, आज गाढव तर उद्या राजा. आता
तुम्ही असे (लक्ष्मी-नारायण) बनण्याचा पुरुषार्थ करत आहात. जाणतात या
पुरुषार्थामध्ये खुपजण नापास होतात. तरीही शिकतात देखील तितकेच जितके कल्पापूर्वी
पास झालेले होते. वास्तविक ज्ञान आहे देखील खूप सोपे परंतु माया विसरायला लावते.
बाबा म्हणतात - आपला चार्ट लिहा परंतु लिहू शकत नाहीत. कुठपर्यंत बसून लिहावे. जरी
ते लिहित असले तरी तपासतात - दोन तास आठवणीमध्ये राहिलो का? मग हे देखील त्यांनाच
समजते जे बाबांच्या श्रीमताला आचरणामध्ये आणतात. बाबा तर समजतील या बिचाऱ्यांना लाज
वाटत असेल. नाही तर श्रीमताला आचरणामध्ये आणले पाहिजे. परंतु २ टक्के मुश्किलीने
चार्ट लिहितात. मुलांना श्रीमताचा इतका रिगार्ड नाही आहे. मुरली मिळत असूनही वाचत
नाहीत. मनाला जरूर खटकत तर असेल - बाबा जे म्हणतात ते खरे आहे, आम्ही मुरलीच वाचत
नाही तर मग इतरांना समजावून सांगणार तरी कसे?
(आठवणीची यात्रा) ओम्
शांती. रूहानी बाबा रुहानी मुलांना सांगत आहेत, हे तर मुले समजतात खरोखर आपण आत्मा
आहोत, आम्हाला परमपिता परमात्मा शिकवत आहेत. आणि काय सांगत आहेत? माझी आठवण करा तर
तुम्ही स्वर्गाचे मालक बनाल. यामध्ये बाबा देखील आले, शिक्षण आणि शिकवणारे देखील आले.
सद्गती दाता देखील आले. थोड्या शब्दांमध्ये सर्व ज्ञान येते. इथे तुम्ही येताच मुळी
याला रिवाईज करण्यासाठी. बाबा देखील हेच सांगत आहेत कारण तुम्ही स्वतः म्हणता आम्ही
विसरून जातो म्हणून इथे रिवाईज (उजळणी) करण्यासाठी येतो. भले कोणी इथे राहतात तरी
देखील रिवाईज केले जात नाही. भाग्यामध्ये नाही आहे. पुरुषार्थ तर बाबा करून घेतच
आहेत. तदबीर (पुरुषार्थ) करवून घेणारे एक बाबाच आहेत. यामध्ये कोणताही पक्षपात असू
शकत नाही, आणि ना स्पेशल शिकवणी आहे. त्या (लौकिक) शिक्षणामध्ये स्पेशल
शिकविण्याकरिता शिक्षकाला बोलावतात. हे (बाबा) तर भाग्य बनविण्याकरिता सर्वांना
शिकवत आहेत. प्रत्येकाला स्पेशल वेगळे कुठे पर्यंत शिकवतील. किती असंख्य मुले आहेत.
त्या (लौकिक) शिक्षणामध्ये एखाद्या मोठ्या व्यक्तीची मुले असतात तर त्यांना स्पेशल
शिकवतात. टीचर जाणतात की, हा अभ्यासामध्ये मंद आहे म्हणून त्याला स्कॉलरशिप लायक
बनवतात. हे बाबा असे करत नाहीत. हे तर सर्वांना एकसमान शिकवतात. तो झाला टीचरचा
एक्स्ट्रा पुरुषार्थ करून घेणे. हे (बाबा) काही कोणाला वेगळा एक्स्ट्रा पुरुषार्थ
करायला शिकवत नाहीत. एक्स्ट्रा पुरुषार्थ अर्थातच शिक्षक काही कृपा करतात. तसे तर
भले पैसे घेतात, खास वेळ देऊन शिकवतात ज्यामुळे ते जास्त शिकून हुशार बनतात. इथे तर
जास्त काही शिकण्याची गोष्टच नाही. यांची तर गोष्टच नवीन आहे. एकच महामंत्र देतात -
“मनमनाभव”. आठवणी द्वारे काय होते, हे तर समजता; बाबाच पतित-पावन आहेत. जाणता
त्यांची आठवण केल्यानेच पावन बनणार.
आता तुम्हा मुलांना
ज्ञान आहे, जितकी आठवण कराल तितके पावन बनाल. कमी आठवण कराल तर कमी पावन बनाल. हे
तुम्हा मुलांच्या पुरुषार्थावर आहे. बेहदच्या बाबांची आठवण करून आपल्याला असे
लक्ष्मी-नारायण बनायचे आहे. त्यांची महिमा तर प्रत्येक जण जाणतात. म्हणतात देखील -
तुम्ही पुण्य आत्मा आहात, आम्ही पाप-आत्मा आहोत. असंख्य मंदिरे बनवलेली आहेत. तिथे
सर्वजण काय करण्यासाठी जातात? दर्शन घेतल्याने फायदा तर काहीच नाही. एकमेकांना
पाहून निघून जातात. बस्स, दर्शन करण्यासाठी जातात. अमका तीर्थ यात्रेवर जातो आहे मग
आपणही जावे. यामुळे काय होईल? काहीच नाही. तुम्ही मुलांनी देखील तीर्थ यात्रा
केलेल्या आहेत. जसे इतर सण साजरे करतात, तसेच तीर्थ यात्रा देखील एक उत्सव समजतात.
आता तुम्ही आठवणीची यात्रा देखील एक उत्सव समजता. तुम्ही आठवणीच्या यात्रेमध्ये
राहता. शब्दच एक आहे - मनमनाभव. ही तुमची यात्रा अनादि आहे. ते (दुनियावाले) देखील
म्हणतात - ती यात्रा आम्ही अनादि करत आलो आहोत. परंतु तुम्ही आता ज्ञाना सहित म्हणता
आम्ही कल्प-कल्प ही यात्रा करतो. बाबाच येऊन ही यात्रा शिकवतात. ते जन्मोजन्मी
चारधामची यात्रा करतात. हे तर बेहदचे बाबा म्हणतात - माझी आठवण करा तर तुम्ही पावन
बनाल. असे तर इतर कोणी कधी म्हणत नाहीत की यात्रा केल्याने तुम्ही पावन बनाल.
मनुष्य यात्रेवर जातात तर ते तेवढा वेळ पवित्र राहतात, आजकाल तर तिथे देखील घाण
झालेली आहे, पावन राहत नाहीत. या रुहानी यात्रेबद्दल तर कोणालाच माहित नाही आहे.
तुम्हाला आता बाबांनी सांगितले आहे - ही आठवणीची खरी यात्रा आहे. त्या तीर्थयात्रेची
परिक्रमा करण्यासाठी जातात परंतु तरीही जसेच्या तसेच बनतात. परिक्रमा करत राहतात.
जसे वास्को-द-गामाने विश्वाला प्रदक्षिणा घातली. हे देखील परिक्रमा करतात ना. एक
गाणे देखील आहे ना - ‘चारों तरफ लगाये फेरे… फिर भी हरदम दूर रहे’. भक्तिमार्गामध्ये
तर कोणी भगवंताला भेटू शकत नाही. भगवान कोणाला भेटला नाही. भगवंतापासून दूरच राहिले.
परिक्रमा करूनही परत घरी येऊन ५ विकारांमध्ये अडकतात. त्या सर्व यात्रा आहेत खोट्या.
आता तुम्ही मुले जाणता हे आहे पुरुषोत्तम संगमयुग, जेव्हा बाबा आलेले आहेत. एके
दिवशी सर्वांना कळेल की बाबा आलेले आहेत. शेवटी भगवान भेटतील, परंतु कसे? हे तर
कोणीही जाणत नाही. हे तर गोड-गोड मुलेच जाणतात की आम्ही श्रीमतावर या भारताला पुन्हा
स्वर्ग बनवत आहोत. भारताचेच तुम्ही नाव घ्याल. त्यावेळी इतर कोणताही धर्म नसतो. सगळे
विश्व पवित्र बनते. आता तर अनेक धर्म आहेत. बाबा येऊन तुम्हाला साऱ्या झाडाचे नॉलेज
ऐकवत आहेत. तुम्हाला आठवण करून देतात. तुम्ही सो देवता होता, मग सो क्षत्रिय, सो
वैश्य बनलात. आता तुम्ही सो ब्राह्मण बनले आहात. ह्या ‘हम सो’ चा अर्थ बाबा किती
सोपा करून सांगतात. ओम् अर्थात ‘मी आत्मा’, मग मी आत्मा असे चक्र फिरते. ते तर
म्हणतात - ‘मी आत्मा सो परमात्मा, परमात्मा सो मी आत्मा’. असा एकही नाही ज्याला ‘हम
सो’चा यथार्थ अर्थ ठाऊक आहे. तर बाबा म्हणतात - हा जो मंत्र आहे हा निरंतर लक्षात
ठेवला पाहिजे. चक्र बुद्धीमध्ये नसेल तर चक्रवर्ती राजा कसे बनाल? आता आपण आत्मा
ब्राह्मण आहोत, मग आपण सो देवता बनणार. हे तुम्ही कोणालाही जाऊन विचारा, कोणीही
सांगणार नाहीत. ते तर ८४ चा अर्थ देखील समजत नाहीत. भारताचे उत्थान आणि पतन गायले
गेले आहे. हे ठीक आहे. सतोप्रधान, सतो, रजो, तमो, सूर्यवंशी, चंद्रवंशी, वैश्यवंशी…
आता तुम्हा मुलांना सर्व काही ठाऊक झाले आहे. बीजरूप बाबांनाच ज्ञानाचा सागर म्हटले
जाते. ते या चक्रामध्ये येत नाहीत. असे नाही, आपण जीव आत्मा सो परमात्मा बनतो. नाही,
बाबा आम्हाला आप समान नॉलेजफुल बनवतात, आप समान गॉड बनवत नाहीत. या गोष्टींना खूप
चांगल्या रीतीने समजून घ्यायचे आहे, तेव्हाच बुद्धीमध्ये चक्र फिरू शकते, ज्याचे
नाव ‘स्वदर्शन चक्र’ ठेवले आहे. तुम्ही बुद्धीने समजू शकता - आपण कसे या ८४ च्या
चक्रामध्ये येतो. यामध्ये सर्व येते. काळ देखील येतो, वर्ण देखील येतात, वंशावळी
देखील येते.
आता तुम्हा मुलांच्या
बुद्धीमध्ये हे सगळे ज्ञान असायला हवे. नॉलेज द्वारेच उच्च पद मिळते. नॉलेज असेल तर
इतरांना देऊ शकाल. इथे तुमच्याकडून कोणते पेपर इत्यादी लिहून घेतले जात नाहीत. त्या
शाळेमध्ये जेव्हा परीक्षा असतात तर पेपर्स परदेशातून येतात. जे परदेशात शिकत असतील
त्यांचा तर तिथेच रिझल्ट तयार करत असतील. त्यामध्ये देखील कोणी मोठे शिक्षण
क्षेत्रातील अधिकारी व्यक्ती असतील जे पेपर तपासत असतील. तुमचे पेपर कोण तपासणार?
तुम्ही स्वतःच कराल. स्वतःला जे पाहिजे ते बनवा. पुरुषार्थ करून जे पाहिजे ते पद
बाबांकडून घ्या. प्रदर्शनी इत्यादीमध्ये मुले विचारतात ना - कोण बनणार? देवता बनणार,
बॅरिस्टर बनणार… कोण बनणार? जितकी बाबांची आठवण कराल, सेवा कराल तितके फळ मिळेल. जे
चांगल्या रीतीने बाबांची आठवण करतात ते समजतात की, आपल्याला सेवा देखील करायची आहे.
प्रजा बनवायची आहे ना! ही राजधानी स्थापन होत आहे. तर त्यामध्ये सर्व पाहिजेत. तिथे
वजीर (मंत्री) इत्यादी असत नाहीत. वजीराची गरज त्यांना असते ज्यांना अक्कल कमी असते.
तिथे तुम्हाला कोणाचा सल्ला घेण्याची गरजच नसते. बाबांकडे सल्ला घेण्यासाठी येतात,
स्थूल गोष्टींसाठी सल्ला घेतात - पैशांचे काय करावे? धंदा कसा करावा? बाबा म्हणतात
- या दुनियादारीच्या गोष्टी बाबांकडे घेऊन येऊ नका. हो, कुठे निराश होऊ नये म्हणून
मग थोडाफार धीर देऊन उपाय सांगतात. हा काही माझा धंदा नाहीये. माझा तर ईश्वरीय धंदा
आहे तुम्हाला रस्ता सांगण्याचा. तुम्ही विश्वाचे मालक कसे बनू शकता? तुम्हाला
श्रीमत मिळाले आहे. बाकी सर्व आहेत आसुरी मते. सतयुगामध्ये म्हणणार श्रीमत.
कलियुगामध्ये आहे आसुरी मत. ते आहेच सुखधाम. तिथे असे देखील कोणी विचारणार नाहीत की
राजी-खुशी आहात (संतुष्ट आणि आनंदी आहात)? तब्येत ठीक आहे? हे शब्द तिथे नसतात. असे
इथे विचारले जाते. काही त्रास तर नाही ना? राजी-खुशी आहात? यामध्ये देखील अनेक
गोष्टी येतात. तिथे दुःखच नाही आहे, ज्यासाठी विचारले जाईल. ही आहेच दुःखाची दुनिया.
वास्तविक तुम्हाला कोणी विचारू शकत नाही. भले माया अधोगती करणारी आहे तरी देखील बाबा
मिळाले आहेत ना. तुम्ही म्हणाल - तुम्ही काय खुश-खैराफत (कुशल समाचार) विचारता!
आम्ही तर ईश्वराची मुले आहोत, आम्हाला कसला कुशल समाचार विचारता. चिंता होती पार
ब्रह्ममध्ये राहणाऱ्या पित्याची, ते मिळाले, मग कशाची चिंता! हे नेहमी आठवत राहिले
पाहिजे की, आम्ही कोणाची मुले आहोत! हे देखील बुद्धीमध्ये ज्ञान आहे की, जेव्हा
आम्ही पावन बनू तेव्हा मग युद्ध सुरू होईल. तर जेव्हा पण तुम्हाला कोणी विचारले की,
तुम्ही खुश-राजी (आनंदी आणि समाधानी) आहात? तर बोला - आम्ही तर सदैव खुशराजी (आनंदी
आणि समाधानी) असतो. आजारी देखील असलो तरी देखील बाबांच्या आठवणीमध्ये असतो. तुम्ही
स्वर्गापेक्षाही इथे जास्त खुश-राजी (आनंदी आणि समाधानी) आहात. जेव्हा की स्वर्गाची
बादशाही देणारे बाबा भेटले आहेत, जे आपल्याला इतके लायक बनवतात तर आपण चिंता का
करावी! ईश्वराच्या मुलांना चिंता कसली! तिथे देवतांना देखील चिंता नाही.
देवतांपेक्षा तर उच्च आहेत ईश्वर. तर ईश्वराच्या मुलांना कसली चिंता असू शकते. बाबा
आम्हाला शिकवत आहेत. बाबा आमचे टीचर, सद्गुरु आहेत. बाबा आम्हाला मुकुट प्रदान करत
आहेत, आम्ही मुकुटधारी बनत आहोत. तुम्ही जाणता आपल्याला विश्वाचा मुकुट कसा मिळतो.
बाबा आम्हाला मुकुट घालत नाहीत. हे देखील तुम्ही जाणता सतयुगामध्ये पिता आपला मुकुट
आपल्या मुलांना घालतात, ज्याला इंग्रजीमध्ये ‘क्राऊन प्रिन्स’ म्हटले जाते. इथे (या
कलियुगी दुनियेमध्ये) जोपर्यंत पित्याचा मुकुट मुलाला मिळत नाही तोपर्यंत मुलाला
उत्कंठा असते - कधी एकदा वडील मरतात आणि मुकुट माझ्या डोक्यावर येतो. इच्छा होईल
राजकुमारापासून महाराजा बनावे. तिथे (सतयुगामध्ये) तर असे घडत नाही. पिता
कायद्यानुसार आपल्या वेळेवर मुलांना मुकुट देऊन मग दूर होतात. तिथे वानप्रस्थ विषयी
चर्चा होत नाही. मुलांना महाल इत्यादी बनवून देतात, सर्व इच्छा पूर्ण होतात. तुम्ही
समजू शकता सतयुगामध्ये सुखच-सुख आहे. प्रॅक्टिकल मध्ये सर्व सुख तेव्हा प्राप्त
करतील जेव्हा तिथे जातील. स्वर्गामध्ये काय असेल, ते तर तुम्हीच जाणता. एक शरीर
सोडून मग कुठे जातील. आता प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला बाबा शिकवत आहेत. तुम्ही जाणता
आपण खऱ्याखुऱ्या स्वर्गामध्ये जाणार. ते तर म्हणतात आम्ही स्वर्गामध्ये जातो, परंतु
हेच ठाऊक नाहीये की स्वर्ग कशाला म्हटले जाते. जन्म-जन्मांतर या अज्ञानाच्या गोष्टी
ऐकत आले आहेत, आता बाबा तुम्हाला सत्य गोष्टी ऐकवत आहेत. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) सदैव
राजी-खुशी राहण्यासाठी बाबांच्या आठवणीमध्ये रहायचे आहे. शिक्षणाने स्वतःला राज्याचा
मुकुट घालायचा आहे.
२) श्रीमतावर भारताला
स्वर्ग बनविण्याची सेवा करायची आहे. श्रीमताचा नेहमी रिगार्ड ठेवायचा आहे.
वरदान:-
श्रेष्ठ
भाग्याच्या स्मृतीद्वारे आपल्या समर्थ स्वरूपामध्ये राहणारे सूर्यवंशी पदाचे अधिकारी
भव
जे आपल्या श्रेष्ठ
भाग्याला नेहमी स्मृतीमध्ये ठेवतात ते समर्थ स्वरूपामध्ये राहतात. त्यांना नेहमी
आपले अनादि खरे स्वरूप लक्षात राहते. कधीही नकली चेहरा धारण करत नाहीत. कित्येकदा
माया नकली गुण आणि कर्तव्याचे स्वरूप बनवते. कोणाला क्रोधी, कोणाला लोभी, कोणाला
दुःखी, कोणाला अशांत बनवते - परंतु खरे स्वरूप या सर्व गोष्टींपेक्षा वेगळे आहे. जी
मुले आपल्या खऱ्या स्वरूपामध्ये स्थित राहतात ते सूर्यवंशी पदाचे अधिकारी बनतात.
बोधवाक्य:-
सर्वांवर दया
करणारे बना तर अहम् आणि वहम् समाप्त होईल (अहंकार आणि भ्रम नाहीसे होतील).
अव्यक्त इशारे:- या
अव्यक्ती महिन्यामध्ये बंधनमुक्त राहून जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करा.
जेव्हा तुमची रचना
कमळाचे फूल पाण्यामध्ये असूनही पाण्याच्या बंधनापासून मुक्त असते. मग जर का
रचनेमध्ये ही विशेषता आहे तर मग मास्टर रचयित्यामध्ये असू शकत नाही काय? जर कधी
बंधनामध्ये अडकलात तर आपल्या समोर कमळ-पुष्पाचा दृष्टांत ठेवा की, कमळ-पुष्प जर
न्यारे-प्यारे बनू शकते तर आपण मास्टर सर्वशक्तिवान बनू शकत नाही काय! आणि मग तुम्ही
कायमचे तसेच बनाल.