13-08-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड
मुलांनो - अकाल मूर्त बाबांचा चालता-बोलता तख्त हा ब्रह्मा आहे, जेव्हा ते
ब्रह्मामध्ये येतात तेव्हा तुम्हा ब्राह्मणांना रचतात”
प्रश्न:-
बुद्धिमान मुले
कोणत्या रहस्याला समजून घेऊन मग इतरांना योग्यरीत्या समजावून सांगू शकतात?
उत्तर:-
ब्रह्मा कोण आहेत आणि ते ब्रह्मा सो विष्णू कसे बनतात. प्रजापिता ब्रह्मा इथे आहेत,
ते काही देवता नाहीत. ब्रह्मानेच ब्राह्मणांद्वारे ज्ञान यज्ञ रचला आहे… हे सर्व
रहस्य बुद्धिमान मुले समजून घेऊन मग इतरांना समजावून सांगू शकतात. घोडेस्वार आणि
प्यादे तर यामध्ये गोंधळून जातील.
गीत:-
ओम् नमः शिवाय…
ओम शांती।
भक्तीमध्ये महिमा करतात एकाची. महिमा तर गातात ना. परंतु ना त्यांना जाणत, ना
त्यांच्या यथार्थ परिचयाला जाणतात. जर यथार्थ महिमा जाणत असते तर वर्णन जरूर केले
असते. तुम्ही मुले जाणता उच्च ते उच्च आहेत भगवान. चित्र मुख्य आहे त्यांचे.
ब्रह्माची संतान देखील असेल ना. तुम्ही सर्व ब्राह्मण झालात. ब्रह्माला देखील
ब्राह्मण जाणतील इतर कोणीही जाणत नाहीत, म्हणून गोंधळतात, हे ब्रह्मा कसे होऊ शकतात.
ब्रह्माला दाखवले आहे सूक्ष्मवतनवासी. आता प्रजापिता सूक्ष्मवतन मध्ये असू शकत
नाहीत. तिथे रचना असत नाही. यावरून तुमच्याशी खूप वाद-विवाद देखील करतात. समजावून
सांगितले पाहिजे - ब्रह्मा आणि ब्राह्मण आहेत तर खरे ना. जसा क्राईस्ट द्वारे
ख्रिश्चन शब्द आला आहे. बुद्ध द्वारे बौद्धी, इब्राहिम द्वारे इस्लामी. तसेच
प्रजापिता ब्रह्मा द्वारे ब्राह्मण नामीग्रामी आहेत. आदि देव ब्रह्मा. वास्तविक
ब्रह्माला देवता म्हणू शकत नाही. हे देखील चुकीचे आहे. जे स्वतःला ब्राह्मण म्हणवून
घेतात त्यांना विचारले पाहिजे ब्रह्मा कोठुन आले? हे कोणाची रचना आहेत. ब्रह्माला
कोणी क्रिएट केले? कधी कोणी सांगू शकत नाही, जाणतच नाहीत. हे देखील तुम्ही मुलेच
जाणता - शिवबाबांचा जो रथ आहे, ज्यांच्यामध्ये प्रवेश करतात. हे तेच आहेत ज्यांचा
आत्मा श्रीकृष्ण प्रिन्स बनला होता. ८४ जन्मा नंतर येऊन हे (ब्रह्मा) बनले आहेत.
जन्म पत्रिकेतील नाव तर यांचे आपले वेगळे असेल ना कारण आहेत तर मनुष्य ना. मग
यांच्यामध्ये प्रवेश केल्याने यांचे नाव ब्रह्मा ठेवतात. हे देखील मुले जाणतात -
तेच ब्रह्मा, विष्णूचे रूप आहेत. नारायण बनतात ना. ८४ जन्मांच्या अंताला देखील
साधारण रथ आहे ना. हे शरीर सर्व आत्म्यांचा रथ आहे. अकालमूर्तचे चालते-बोलते तख्त
आहे. शीख लोकांनी मग ते तख्त बनवले आहे. त्याला अकाल तख्त म्हणतात. हे तर सर्व अकाल
तख्त आहेत. सर्व आत्मे अकाल मूर्त आहेत. उच्च ते उच्च भगवंताला हा रथ तर पाहिजे ना.
रथामध्ये प्रवेश होऊन नॉलेज देतात. त्यांनाच नॉलेजफुल म्हटले जाते. रचता आणि
रचनेच्या आदि-मध्य-अंताचे नॉलेज देतात. नॉलेजफुलचा अर्थ काही अंतर्यामी किंवा
जानी-जाननहार नाहीये. सर्वव्यापीचा अर्थ वेगळा आहे, जानी-जाननहारचा अर्थ वेगळा आहे.
मनुष्य तर सर्वांना एकत्र करून जे येते ते बोलत जातात. आता तुम्ही मुले जाणता आपण
सर्व ब्राह्मण ब्रह्माची संतान आहोत. आपले कुळ सर्वात उच्च आहे. ते लोक देवतांना
श्रेष्ठ मानतात कारण सतयुग इत्यादी मध्ये देवता झाले आहेत. प्रजापिता ब्रह्माची मुले
ब्राह्मण आहेत - हे तुम्हा मुलांव्यतिरिक्त इतर कोणीही जाणत नाहीत. त्यांना माहीत
तरी कसे होईल. जेव्हा की ब्रह्माला सूक्ष्मवतनचे समजतात. ते जिस्मानी ब्राह्मण वेगळे
आहेत जे पूजा करतात, शिधा खातात. तुम्ही तर शिधा इत्यादी खात नाही. ब्रह्माचे रहस्य
आता चांगल्या रीतीने समजावून सांगावे लागते. बोला बाकी सर्व गोष्टींना सोडून बाबा
ज्यांच्याद्वारे पतितापासून पावन बनायचे आहे, पहिले त्यांची तर आठवण करा. मग या
गोष्टी देखील समजतील. थोड्याशा गोष्टीमध्ये संशय उत्पन्न झाल्याने बाबांनाच सोडून
देतात. पहिली मुख्य गोष्ट आहे अल्फ आणि बे. बाबा म्हणतात मामेकम् (मज एकाची) आठवण
करा. मी जरूर कोणामध्ये तरी येईन ना. त्यांचे नाव देखील असले पाहिजे. येऊन त्यांना
रचतो. ब्रह्मा विषयी समजावून सांगण्यासाठी तुम्हाला चांगली बुद्धीमत्ता पाहिजे.
प्यादे, घोडेस्वार गोंधळून जातात. अवस्थेनुसार समजावून सांगतात ना. प्रजापिता
ब्रह्मा तर इथे आहेत. ब्राह्मणांद्वारे ज्ञान यज्ञ रचतात तर जरूर ब्राह्मणच पाहिजेत
ना. प्रजापिता ब्रह्मा देखील इथेच पाहिजे, ज्यांच्याद्वारे ब्राह्मण बनतील.
ब्राह्मण लोक म्हणतात देखील - आम्ही ब्रह्माची संतान आहोत. समजतात परंपरेनुसार आपले
कुळ चालत येते. परंतु ब्रह्मा केव्हा होते तेच माहित नाही. आता तुम्ही ब्राह्मण
आहात. ब्राह्मण तो जो ब्रह्माची संतान असेल. ते ब्राह्मण तर पित्याच्या ऑक्युपेशनला
जाणतही नाहीत. भारतामध्ये पहिले ब्राह्मणच असतात. ब्राह्मणांचे आहे उच्च ते उच्च
कुळ. ते ब्राह्मण देखील समजतात आपले कुळ जरूर ब्रह्मा द्वारेच निघाले असेल. परंतु
कसे, कधी… हे वर्णन करू शकत नाहीत. तुम्ही समजता - प्रजापिता ब्रह्माच ब्राह्मणांना
रचतात. ज्या ब्राह्मणांनाच मग देवता बनायचे आहे. ब्राह्मणांना येऊन बाबा शिकवतात.
ब्राह्मणांची देखील डिनायस्टी (घराणे) नाही आहे. ब्राह्मणांचे कुळ आहे, डिनायस्टी (घराणे)
तेव्हा म्हटले जाईल जेव्हा राजा-राणी बनतील. जसे सूर्यवंशी डिनायस्टी. तुम्हा
ब्राह्मणांमध्ये काही राजा बनत नाहीत. ते जे म्हणतात कौरव आणि पांडवांचे राज्य होते,
दोन्ही चुकीचे आहे. राज्य तर दोघांनाही नाहीये. प्रजेचे प्रजेवर राज्य आहे, त्याला
राजधानी म्हणता येणार नाही. ताज नाही आहे. बाबांनी सांगितले होते - डबल मुकुटधारी
सर्वप्रथम भारतामध्ये होते, नंतर मग सिंगल मुकुटधारी. यावेळी तर नो ताज. हे देखील
चांगल्या रीतीने सिद्ध करून सांगायचे आहे, जे एकदम चांगली धारणावाले असतील ते
चांगल्या रीतीने समजावून सांगू शकतील. ब्रह्मा विषयीच जास्त माहिती समजावून सांगणे
आवश्यक आहे. विष्णूला देखील जाणत नाहीत. हे देखील समजावून सांगावे लागेल. वैकुंठाला
विष्णुपुरी म्हटले जाते अर्थात लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते. श्रीकृष्ण प्रिन्स
असेल तर म्हणेल ना - ‘माझे बाबा राजा आहेत’. असे नाही की श्रीकृष्णाचे पिता राजा असू
शकत नाहीत. श्रीकृष्णाला प्रिन्स म्हटले जाते तर जरूर राजाकडे जन्म झाला आहे.
श्रीमंताच्या घरी जन्म घेईल तर प्रिन्स थोडेच म्हटले जाईल. राजाच्या पदामध्ये आणि
श्रीमंताच्या पदामध्ये रात्रं-दिवसाचा फरक असतो. श्रीकृष्णाचे पिता राजाचे नावच नाही
आहे. श्रीकृष्णाचे नाव किती प्रसिद्ध आहे. पित्याचे उच्च पद म्हणता येणार नाही. ते
सेकंड क्लासचे पद आहे जे केवळ श्रीकृष्णाला जन्म देण्यासाठी निमित्त बनतात. असे नाही
की श्रीकृष्णाच्या आत्म्यापेक्षा ते जास्त शिकलेले आहेत. नाही. श्रीकृष्णच पुन्हा
सो नारायण बनतात. बाकी पित्याचे नावच नाहीसे होते. आहेत जरूर ब्राह्मणच. परंतु
शिक्षणामध्ये श्रीकृष्णापेक्षा कमी आहेत. श्रीकृष्णाच्या आत्म्याचे शिक्षण आपल्या
पित्यापेक्षा उच्च होते, तेव्हाच तर इतके नाव होते. श्रीकृष्णाचे पिता कोण होते -
हे जणू कोणाला ठाऊकच नाही. पुढे चालून माहित होईल. बनायचे तर इथूनच आहे. राधेचे
देखील आई-वडील तर असतील ना. परंतु त्यांच्या पेक्षा राधेचे नाव जास्त आहे कारण
आई-वडील कमी शिकलेले आहेत. राधेचे नाव त्यांच्या पेक्षा उच्च होते. या तर आहेत
डिटेलच्या गोष्टी - मुलांना समजावून सांगण्यासाठी. सर्व काही अभ्यासावर अवलंबून आहे.
ब्रह्माबद्दलही समजावून सांगण्यासाठी बुद्धिमत्ता पाहिजे. हे श्रीकृष्ण जे आहेत
त्यांचीच आत्मा ८४ जन्म भोगते. तुम्ही देखील ८४ जन्म घेता. सगळेच काही एकत्र येणार
नाहीत. जे अभ्यासामध्ये पहिले-पहिले असतात, तिथे देखील ते पहिले येतील. नंबरवार तर
येतात ना. या अतिशय सूक्ष्म गोष्टी आहेत. कमी बुद्धीवाले तर धारणा करू शकत नाहीत.
नंबरवार जातात. तुम्ही ट्रान्सफर होता नंबरवार. केवढी मोठी लाईन आहे, जी शेवटी जाईल.
नंबरवार आपापल्या स्थानावर जाऊन निवास करतील. सर्वांचे स्थान बनलेले आहे. हा अतिशय
वंडरफुल खेळ आहे. परंतु कोणी समजत नाहीत. याला म्हटले जाते काट्यांचे जंगल. इथे
सर्व एकमेकांना दुःख देत राहतात. तिथे तर नॅचरल सुख आहे. इथे आहे आर्टिफिशियल सुख.
रियल सुख एक बाबाच देणारे आहेत. इथे आहे कागविष्ठे समान सुख. दिवसेंदिवस तमोप्रधान
बनत जातात. किती दुःख आहे. म्हणतात - ‘बाबा, मायेची वादळे खूप येतात. माया गोंधळवून
टाकते, दुःखाची फिलिंग खूप येते’. सुखदाता पित्याची मुले बनून देखील जर दुःखाची
फिलिंग येत असेल तर बाबा म्हणतात - मुलांनो, हा तुमचा मोठा कर्मभोग आहे. जेव्हा बाबा
मिळाले आहेत तर मग दुःखाची फिलिंग येता कामा नये. जे जुने कर्मभोग आहेत त्यांना
योगबलाने चुक्तू करा. जर योगबल नसेल तर सजा खाऊन चुकते करावे लागेल. मोचरा आणि मानी
काही चांगले नाही (सजा भोगून पद प्राप्त करणे चांगले नाही). पुरुषार्थ केला पाहिजे
नाहीतर ट्रिब्यूनल बसते. प्रजा तर प्रचंड आहे. हे तर ड्रामा अनुसार सर्व
गर्भ-जेलमध्ये सजा भोगतात. पुष्कळ आत्मे भटकत देखील राहतात. काही-काही आत्मे खूप
नुकसान करतात - जेव्हा कोणामध्ये अशुद्ध आत्म्याचा प्रवेश होतो तेव्हा किती हैराण
होतात. नवीन दुनियेमध्ये या गोष्टी असत नाहीत. आता तुम्ही पुरुषार्थ करता - आपण
नवीन दुनियेमध्ये जावे. तिथे जाऊन नवीन-नवीन महाल बनवावे लागतील. राजाच्या पोटी
जन्म घेता, जसा श्रीकृष्ण जन्म घेतो. परंतु इतके महाल इत्यादी सर्व अगोदरपासून
थोडेच असतात. ते तर मग बनवावे लागतील. कोण रचतात, ज्यांच्याकडे जन्म घेता. गायलेले
देखील आहे - राजाच्या पोटी जन्म होतो. काय होते ते तर पुढे चालून पहायचे आहे. आता
थोडेच बाबा सांगतील. ते मग आर्टिफिशियल नाटक होईल, म्हणून काहीच सांगत नाहीत.
ड्रामामध्ये सांगण्याची नोंद नाही आहे. बाबा म्हणतात - मी देखील पार्टधारी आहे.
पुढच्या गोष्टी अगोदरच जाणत असतो तर खूप काही सांगितले असते. बाबा अंतर्यामी असते
तर अगोदरच सांगितले असते. बाबा म्हणतात - नाही, ड्रामामध्ये जे होते, त्याला साक्षी
होऊन बघत चला आणि त्याच सोबत आठवणीच्या यात्रेमध्ये मस्त रहा. यामध्येच फेल होतात.
ज्ञान कधी कमी-जास्त होत नाही. आठवणीची यात्राच कधी कमी, कधी जास्त होते. ज्ञान तर
जे मिळाले आहे ते आहेच. आठवणीच्या यात्रेमध्ये कधी उमंग असतो, कधी आळस. यात्रा
खाली-वर होते. ज्ञानामध्ये तुम्ही शिडी चढत नाही. ज्ञानाला यात्रा म्हटले जात नाही.
यात्रा आहे आठवणीची. बाबा म्हणतात आठवणीमध्ये राहिल्याने तुम्ही सुरक्षित रहाल.
देह-अभिमानामध्ये आल्याने तुम्ही खूप धोका खाता. विकर्म करता. काम शत्रू आहे,
त्यामध्येच नापास होतात. क्रोध इत्यादीची बाबा एवढी गोष्ट करत नाहीत.
ज्ञानाद्वारे एक तर
आहे सेकंदामध्ये जीवनमुक्ती नाही तर मग म्हणतात - सागराला शाई बनवा तरी देखील पूर्ण
होणार नाही. नाही तर मग फक्त म्हणतात - ‘अल्फ’ची (बाबांची) आठवण करा. आठवण करणे
कशाला म्हटले जाते, हे जाणतात थोडेच. म्हणतात - कलियुगातून आम्हाला सतयुगामध्ये
घेऊन चला. जुन्या दुनियेमध्ये आहे दुःख. बघता पावसामध्ये किती घरे कोसळत असतात.
कित्येकजण बुडतात. पाऊस इत्यादी या नॅचरल कॅलॅमिटिज् (नैसर्गिक आपत्ती) देखील असतील.
हे सर्व अचानक होत राहील. कुंभकर्णाच्या निद्रेमध्ये झोपलेले आहेत. विनाशाच्या वेळी
जागे होतील मग काय करू शकतील! मरून जातील! धरणी देखील जोराने हलेल. वादळ पाऊस
इत्यादी सर्व होते. बॉम्ब्स देखील टाकतात. परंतु इथे ॲडिशन आहे सिव्हिल वॉर (गृहयुद्धाची)…
रक्ताच्या नद्या गायल्या गेल्या आहेत. इथे मारामारी होते. एकमेकांवर केस करत राहतात.
त्यामुळे भांडतील जरूर. सर्व आहेत निधनके, तुम्ही आहात धनीचे. तुम्हाला भांडणे
इत्यादी करायची नाही आहेत. ब्राह्मण बनल्याने तुम्ही धनीचे बनला आहात. धनी पित्याला
किंवा पतीला म्हटले जाते. शिवबाबा तर पतीचेही पती आहेत. साखरपुडा होतो तेव्हा मग
म्हणतात आम्ही अशा पतीला कधी भेटणार. आत्मे म्हणतात - शिवबाबा, आमचा तर तुमच्याशी
साखरपुडा झाला आहे. आता आम्ही तुम्हाला भेटणार कसे? कोणी तर खरे लिहितात, कोणी तर
खूप लपवतात. सच्चाईने लिहीत नाहीत की ‘बाबा, आमच्याकडून ही चूक झाली. क्षमा करा’.
जर कोणी विकारांमध्ये गेला तर बुद्धीमध्ये धारणा होऊ शकत नाही. बाबा म्हणतात -
तुम्ही अशी गंभीर चूक कराल तर चकनाचूर व्हाल. तुम्हाला मी गोरे बनविण्यासाठी आलो आहे,
आणि तुम्ही काळे तोंड कसे करता. भले स्वर्गामध्ये येतील, दीडदमडीचे पद प्राप्त
करतील. राजधानी स्थापन होत आहे ना. कोणी मग हार खाऊन जन्म-जन्मांतर पद भ्रष्ट होतात.
म्हणतील बाबांकडून तुम्ही हे पद घेण्यासाठी आला आहात, बाबा इतके उच्च बनतील, आपण
मुले मग प्रजा थोडीच बनणार. वडील सिंहासनावर आहेत आणि मूल दास-दासी बनते, किती
लाजिरवाणी गोष्ट आहे. शेवटी तुम्हाला सर्व साक्षात्कार होतील. मग खूप पश्चाताप
करतील. नाहक असे केले. संन्याशी देखील ब्रह्मचर्यामध्ये राहतात, तर सर्व विकारी
त्यांच्या समोर डोके टेकतात. पवित्रतेचा मान आहे. कोणाच्या भाग्यामध्ये नसेल तर बाबा
येऊन शिकवून देखील चुका करत राहतात. आठवणच करत नाहीत. खूप विकर्म बनतात.
तुम्हा मुलांवर आता
आहे बृहस्पतीची दशा. याच्यापेक्षा उच्च दशा दुसरी कोणती नाही. तुम्हा मुलांभोवती दशा
फेऱ्या मारत असतात. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) या
ड्रामाच्या प्रत्येक दृश्याला साक्षी होऊन बघायचे आहे, एका बाबांच्या आठवणीमध्ये
मशगुल रहायचे आहे. आठवणीच्या यात्रेमध्ये उत्साह कधीही कमी होता नये.
२) अभ्यासामध्ये कधीही
चूक करायची नाही, आपले श्रेष्ठ भाग्य बनविण्यासाठी पवित्र जरूर बनायचे आहे. हार
खाऊन जन्म-जन्मांतरासाठी पद भ्रष्ट करायचे नाही.
वरदान:-
खऱ्या
सेवेद्वारे अविनाशी, अलौकिक आनंदाच्या सागरामध्ये तरंगणारे खुशनसीब आत्मा भव
जी मुले सेवेमध्ये
बापदादांचे आणि निमित्त बनलेल्या मोठ्यांचे प्रेमाचे आशीर्वाद प्राप्त करतात त्यांना
अलौकिक, आत्मिक आनंदाचा अनुभव होतो. ते सेवेद्वारे आंतरिक आनंद, रूहानी सुखाचा,
बेहदच्या प्राप्तीचा अनुभव करत कायम आनंदाच्या सागरामध्ये तरंगत राहतात. खरी सेवा
ही सर्वांचे प्रेम, सर्वांकडून अविनाशी सन्मान आणि आनंदाचे आशीर्वाद प्राप्त
झाल्याचे, परम भाग्यातील श्रेष्ठ भाग्याचा अनुभव करविते. जे नेहमी आनंदी असतात तेच
खुशनसीब (भाग्यशाली) आहेत.
बोधवाक्य:-
सदैव हर्षित
आणि आकर्षण मूर्त बनण्याकरिता संतुष्टमणी बना
अव्यक्त इशारे:-
सहजयोगी बनायचे असेल तर परमात्म प्रेमाचे अनुभवी बना.
कर्मामध्ये, वाणीमध्ये,
संपर्क आणि संबंधामध्ये प्रेम, स्मृती आणि स्थितीमध्ये लवलीन (एकरूप होऊन) रहायचे
आहे, जो जितका लवली असेल, तो तितकाच लवलीन राहू शकतो. या लवलीन स्थितीला
मनुष्यात्म्यांनी ‘लीन’ची अवस्था म्हटले आहे. बाबांवरील ‘लव’ शब्दाला नाहीसे करून
केवळ ‘लीन’ शब्दाला पकडले आहे. तुम्ही मुले बाबांच्या प्रेमामध्ये ‘लवलीन’ रहाल तर
इतरांना देखील सहजच आप-समान आणि बाप-समान बनवू शकाल.