13-10-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, आता या मृत्यूलोकचा अंत होत आहे आणि अमरलोकची स्थापना होत आहे, त्यामुळे तुम्ही मृत्यूलोकमध्ये असणाऱ्यांची आठवण करायची नाही”

प्रश्न:-
बाबा आपल्या गरीब मुलांना कोणती आठवण करून देतात?

उत्तर:-
मुलांनो, जेव्हा तुम्ही वाइसलेस (निर्विकारी) होता तेव्हा खूप सुखी होता. तुमच्यासारखा श्रीमंत दुसरा कोणीच नव्हता. तुम्ही अपार सुखी होता. धरती, आकाश सर्व तुमच्या हातामध्ये होते. आता बाबा तुम्हाला पुन्हा श्रीमंत बनवण्यासाठी आले आहेत.

गीत:-
नयनहीन को राह दिखाओ प्रभू...

ओम शांती।
गोड-गोड रुहानी मुलांनी, आत्म्यांनी गाणे ऐकले. कोणी म्हटले? आत्म्यांच्या रुहानी बाबांनी म्हटले. रुहानी बाबांना रुहानी मुलांनी म्हटले - ‘बाबा’. त्यांना ईश्वर देखील म्हटले जाते, पिता देखील म्हटले जाते. कोणता पिता? परमपिता. पिता दोन आहेत. एक लौकिक दुसरा पारलौकिक. लौकिक पित्याची मुले पारलौकिक पित्याला हाका मारतात. ओ बाबा, बाबांचे नाव काय आहे? शिव. त्या निराकारी शिवची पूजा केली जाते. त्यांना म्हटले जाते सुप्रीम फादर. लौकिक पित्याला सुप्रीम म्हटले जात नाही. सर्व आत्म्यांचे उच्च ते उच्च पिता एकच आहेत. सर्व जीव-आत्मे त्या पित्याची आठवण करतात. आत्मे हे विसरले आहेत की, आपले पिता कोण आहेत? बोलावतात - ‘ओ गॉड फादर, आम्हा नयनहीन असणाऱ्यांना दृष्टी द्या म्हणजे मग आम्ही आमच्या बाबांना ओळखू शकू’. भक्तिमार्गामध्ये आम्ही आंधळे बनून धक्के खात (खस्ता खात) राहतो, आता या धक्के खाण्यापासून सोडवा. बाबाच कल्प-कल्प येऊन भारताला स्वर्ग बनवतात. आता कलियुग आहे, सतयुग येणार आहे. कलियुग आणि सतयुगाच्या मध्याला संगम म्हटले जाते. हा आहे पुरुषोत्तम संगम. बेहदचे बाबा येऊन जे भ्रष्टाचारी बनले आहेत त्यांना श्रेष्ठाचारी पुरुषोत्तम बनवत आहेत. लक्ष्मी-नारायण पुरुषोत्तम होते. लक्ष्मी-नारायणाच्या घराण्याचे राज्य होते. बाबा येऊन याची आठवण करून देत आहेत. तुम्ही भारतवासी आजपासून ५ हजार वर्षांपूर्वी स्वर्गवासी होता, आता नरकवासी आहात. आजपासून ५ हजार वर्षांपूर्वी भारत स्वर्ग होता, भारताची खूप महिमा होती. सोन्या-हिऱ्यांचे महाल होते. आता काहीच राहिलेले नाही. त्यावेळी दुसरा कोणताही धर्म नव्हता, फक्त सूर्यवंशी होते. चंद्रवंशी नंतर येतात. बाबा समजावून सांगत आहेत की, तुम्हीच सूर्यवंशी होता. आतापर्यंत लक्ष्मी-नारायणाची मंदिरे बनवत राहतात. परंतु लक्ष्मी-नारायणाचे राज्य केव्हा होते? त्यांनी कसे राज्य मिळवले? हे कोणालाच माहीत नाही. पूजा करतात परंतु जाणत नाहीत, तर अंधश्रद्धा झाली ना. शिवची, लक्ष्मी-नारायणाची पूजा करतात परंतु त्यांच्या बायोग्राफीला (जीवन-चरित्राला) कोणीही जाणत नाहीत. भारतवासी स्वतः म्हणतात - आम्ही पतित आहोत. हे पतित-पावन बाबा या, येऊन आम्हाला दुःखातून, रावण राज्यातून लिबरेट करा (मुक्त करा). बाबा येऊन सर्वांना लिबरेट करतात. मुले जाणतात की सतयुगामध्ये एकच राज्य होते. काँग्रेसवाले अथवा बापूजी हेच मागत होते की, आम्हाला पुन्हा रामराज्य पाहिजे. आम्ही स्वर्गवासी बनू इच्छितो. आता नरकवासियांचे काय हाल-हाल चालले आहेत, बघत आहात ना? याला म्हटले जाते - हेल, डेव्हिल वर्ल्ड. हाच भारत डीटी वर्ल्ड (दैवी दुनिया) होता. आता डेव्हिल वर्ल्ड (आसुरी दुनिया) बनला आहे.

बाबा म्हणतात - तुम्ही ८४ जन्म घेतले आहेत, ८४ लाख नाही. या तर शास्त्रांमध्ये थापा मारल्या आहेत. आजपासून ५ हजार वर्षांपूर्वी सद्गतीमार्ग होता. तिथे ना भक्ती होती, ना दुःखाचे नामोनिशाण होते, त्याला सुखधाम म्हटले जाते. बाबा समजावून सांगत आहेत - तुम्ही मूळ शांतिधामचे राहणारे आहात. तुम्ही इथे पार्ट बजावण्यासाठी आला आहात. ८४ पुनर्जन्म असतात, ८४ लाख नाही. आता बेहदचे बाबा आले आहेत, तुम्हा मुलांना बेहदचा वारसा देण्याकरिता. बाबा तुम्हा आत्म्यांशी बोलतात. इतर सत्संगांमध्ये मनुष्य मनुष्यांना भक्तीच्या गोष्टी ऐकवतात. अर्धेकल्प जेव्हा भारत स्वर्ग होता,

तेव्हा एकही पतित नव्हता, आणि आता एकही पावन नाही आहे. ही आहे पतित दुनिया. बाबा समजावून सांगत आहेत - गीतेमध्ये श्रीकृष्ण भगवानुवाच लिहिले आहे. श्रीकृष्ण काही भगवान नाहीये, त्याने गीता सांगितलेली नाही. हे लोक आपल्या धर्मशास्त्राला देखील जाणत नाहीत.

आपल्या धर्मालाच विसरले आहेत. मुख्य धर्म ४ आहेत. पहिला आहे आदि सनातन देवी-देवता धर्म - सूर्यवंशी, नंतर चंद्रवंशी, दोघांना मिळून म्हणतात देवी-देवता धर्म. तिथे दुःखाचे नाव सुद्धा नव्हते. २१ जन्म तुम्ही सुखधाममध्ये होता. त्यानंतर मग रावणराज्य, भक्तिमार्ग सुरू होतो. शिवबाबा केव्हा येतात? जेव्हा रात्र होते. भारतवासी घोर अंधारात असतात तेव्हा बाबा येतात. बाहुल्यांची पूजा करत राहतात. एकाचीही जीवन कहाणी जाणत नाहीत. भक्तिमार्गामध्ये अनेक खस्ता खातात, तीर्थांवर जा फेरे मारा. प्राप्ती काहीच नाही. बाबा म्हणतात - मी येऊन तुम्हाला ब्रह्माद्वारे यथार्थ ज्ञान ऐकवतो. बोलावतात की, ‘आम्हाला सुखधाम आणि शांतीधामचा मार्ग दाखवा’.

बाबा म्हणतात - आजपासून ५ हजार वर्षांपूर्वी मी तुम्हाला खूप श्रीमंत बनवले होते. तुम्हाला इतकी संपत्ती दिली होती, ती सर्व संपत्ती तुम्ही कुठे गमावली? तुम्ही किती श्रीमंत होतात! आता याला तो श्रीमंत भारत कोणी म्हणेल तरी का? भारतच सर्वात उच्च ते उच्च खंड होता. वास्तविक सर्वांचे हे तीर्थस्थान आहे कारण पतित-पावन बाबांचे जन्मस्थान आहे. जे कोणी धर्मवाले आहेत त्या सर्वांची सद्गती बाबा येऊन करतात. आता साऱ्या सृष्टीवर रावणाचे राज्य आहे, फक्त लंकेवरच नाही. जेव्हा सूर्यवंशी राज्य होते तेव्हा हे विकार नव्हते. भारत वाइसलेस (निर्विकारी) होता, आता विशश (विकारी) आहे, सर्व नरकवासी आहेत. सतयुगामध्ये जे दैवी संप्रदायाचे होते, ते मग ८४ जन्म भोगून आसुरी संप्रदायाचे बनले आहेत; आता पुन्हा दैवी संप्रदायी बनणार आहेत. भारत अत्यंत श्रीमंत होता. आता गरीब बनला आहे म्हणून भीक मागत आहेत. बाबा तुम्हा गरीब मुलांना आठवण करून देत आहेत - ‘मुलांनो, तुम्ही किती सुखी होतात. तुमच्यासारखे सुख इतर कोणालाही मिळू शकत नाही. धरती, आकाश सर्व तुमच्या हातात होते. शास्त्रांमध्ये कल्पाचा कालावधी खूप मोठा असल्याचे सांगून सर्वांना कुंभकर्णाच्या आसुरी निद्रेमध्ये झोपवून ठेवले आहे. हा भारत, शिवबाबांनी स्थापन केलेले शिवालय होते. तिथे पवित्रता होती, त्या नवीन दुनियेमध्ये देवी-देवता राज्य करत होते. मनुष्य तर हे देखील जाणत नाहीत की राधे-कृष्णाचे आपसात काय नाते आहे. दोघेही वेगवेगळ्या राज्यातील होते, मग स्वयंवरानंतर लक्ष्मी-नारायण बनले. हे ज्ञान कोणत्याही मनुष्य मात्रामध्ये नाहीये. स्पिरिच्युअल नॉलेज केवळ एक बाबाच देतात. आता बाबा म्हणतात - ‘आत्म-अभिमानी बना. मज, आपल्या परमपित्याची आठवण करा’. आठवणीद्वारे तमोप्रधानापासून सतोप्रधान बनाल. तुम्ही इथे मनुष्यापासून देवता अथवा पतितापासून पावन बनण्यासाठी येता. आता हे आहे - रावण राज्य. भक्तीमध्ये रावण राज्य सुरू होते. भक्ती करणारे सर्वजण आता रावणाच्या तावडीत आहेत. सारी दुनिया ५ विकार रुपी रावणाच्या कैदेमध्ये आहे, शोक वाटिकेमध्ये आहे. बाबा येऊन सर्वांना लिबरेट करून, गाईड बनून सोबत घेऊन जातात. त्याच्यासाठी हे महाभारत युद्ध आहे, जे ५ हजार वर्षांपूर्वी देखील झाले होते. आता बाबा पुन्हा स्वर्ग बनवत आहेत. असे नाही की, ज्यांच्याकडे पुष्कळ संपत्ती आहे ते स्वर्गामध्ये आहेत. आत्ता आहेच मुळी नरक. ‘पतित-पावन’, बाबांना म्हटले जाते, नदीला नाही. हा सर्व आहे भक्तिमार्ग. या गोष्टी बाबाच येऊन समजावून सांगतात, आता हे तर जाणता एक आहेत लौकिक पिता, दुसरे आहेत पारलौकिक पिता, तिसरे आहेत अलौकिक पिता. आता पारलौकिक पिता शिवबाबा ब्रह्मा द्वारे ब्राह्मण धर्म स्थापन करत आहेत. ब्राह्मणांना देवता बनविण्यासाठी राजयोग शिकवत आहेत. आत्माच पुनर्जन्म घेते. आत्माच म्हणते - ‘मी एक शरीर सोडून दुसरे घेते’. बाबा म्हणतात - स्वतःला आत्मा समजून मज पित्याची आठवण करा तर तुम्ही पावन बनाल. कोणत्याही देहधारीची आठवण करू नका. आता मृत्यूलोकचा अंत होत आहे. अमरलोकची स्थापना होत आहे. बाकीचे अनेक धर्म, सर्व नष्ट होतील. सतयुगामध्ये एकच देवी-देवता धर्म होता, नंतर मग चंद्रवंशी राम-सीता त्रेतामध्ये होते. तुम्हा मुलांना संपूर्ण चक्राची आठवण करून देतात. शांतीधाम आणि सुखधामची स्थापना बाबाच करतात. मनुष्य मनुष्याला सद्गती देऊ शकत नाही. ते सर्व आहेत भक्तिमार्गाचे गुरु.

आता तुम्ही आहात ईश्वरीय संतान. बाबांकडून राज्य-भाग्य घेत आहात. ही राजधानी स्थापन होत आहे. प्रजा तर पुष्कळ बनणार आहे. कोटींमधून कोणीच राजा बनतात. सतयुगाला म्हटले जाते फुलांचा बगीचा. आता आहे काट्यांचे जंगल. रावण राज्य परिवर्तित होत आहे. विनाश होणार आहे. हे ज्ञान आता तुम्हालाच मिळत आहे. लक्ष्मी-नारायणाला हे ज्ञान असत नाही. प्राय: लोप होते. भक्तिमार्गामध्ये बाबांना यथार्थ रित्या कोणीही जाणत नाही. बाबा आहेत - रचयिता. ब्रह्मा-विष्णु-शंकर देखील रचना आहेत. सर्वव्यापी म्हटल्यामुळे वारशाचा अधिकार संपुष्टात येतो. बाबा येऊन सर्वांना वारसा देतात. ८४ जन्म तेच घेतात जे सर्वात पहिले सतयुगामध्ये येतात. ख्रिश्चन लोक फार तर ४० जन्म घेत असतील. एका भगवंताला शोधण्यासाठी किती धक्के खातात! आता तुम्ही धक्के खाणार नाही. एका बाबांची आठवण करा म्हणजे मग तमोप्रधानापासून सतोप्रधान बनाल. ही आहे - यात्रा. ही आहे गॉडफादरली युनिव्हर्सिटी (ईश्वरीय विद्यापीठ). तुमची आत्मा शिकते. साधू-संत म्हणतात - आत्मा निर्लेप आहे. परंतु आत्माच कर्मा अनुसार दुसरा जन्म घेते. आत्माच चांगले अथवा वाईट कर्म करते. यावेळी (कलियुगामध्ये) तुमची कर्म, विकर्म बनतात, सतयुगामध्ये तुमची कर्म, अकर्म बनतात. तिथे विकर्म अस्तित्वातच नसते. ती आहे पुण्य-आत्म्यांची दुनिया. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) एका बाबांकडून बेहदचा वारसा घ्यायचा आहे. श्रेष्ठ कर्म करायची आहेत. जर बाबा मिळाले आहेत तर कोणत्याही प्रकारचे धक्के खायचे नाहीत.

२) बाबांनी जी आठवण करून दिली आहे, ती लक्षात ठेवून अपार खुशीमध्ये राहायचे आहे. कोणत्याही देहधारीची आठवण करायची नाही.

वरदान:-
प्रेमापोटी सर्व कमजोरींना कुर्बान करणारे (समर्पण करणारे) समर्थ स्वरूप भव

प्रेमाची निशाणी आहे त्याग. प्रेमापोटी कोणतीही अवघड अथवा असंभव वाटणारी गोष्ट देखील कुर्बान करणे संभव आणि सोपे वाटू लागते. तर समर्थी स्वरूपाच्या वरदानाद्वारे सर्व कमजोरींना नाईलाजाने नाही परंतु मनापासून कुर्बान करा; कारण सत्य बाबांकडे सत्यच स्वीकार होते. तर फक्त बाबांच्या प्रेमाचे गाणे गाऊ नका परंतु तुम्ही स्वतः पित्यासमान अव्यक्त स्थिती-स्वरूप बना, ज्यामुळे सर्व जण तुमची गाणी गातील.

बोधवाक्य:-
संकल्प अथवा स्वप्नामध्ये देखील एका दिलारामाची आठवण राहावी तेव्हाच म्हणणार सच्चे तपस्वी.

मातेश्वरीजींची अनमोल महावाक्ये:-

१) मनुष्याचे एम ऑब्जेक्ट कोणते आहेत? आण ि ते प्राप्त करण्याची यथार्थ विधी कोणती आहे?

प्रत्येक मनुष्याने हा विचार करणे जरुरी आहे, आपले जीवन उत्तम बनविण्याकरिता कोणती गोष्ट उचित आहे? मनुष्याचे आयुष्य कशासाठी आहे, त्यामध्ये काय करायचे आहे? आता आपल्या मनाला विचारा की, त्या गोष्टीने माझ्या जीवनामध्ये परिवर्तन होत आहे का? मनुष्य-जीवनामध्ये पहिले तर नॉलेज पाहिजे, आणि मग या जीवनाचे एम ऑब्जेक्ट (ध्येय) काय आहे? हे तर तुम्ही जरूर मानाल की या जीवनामध्ये सदैव सुख आणि शांती हवी आहे. तर ती आता मिळत आहे काय? या घोर कलियुगामध्ये तर दुःख अशांतीशिवाय बाकी काहीच नाहीये, आता विचार करायचा आहे की, सुख शांती कशी मिळेल? ‘सुख’ आणि ‘शांती’ हे जे दोन शब्द निघाले आहेत, तर ती गोष्ट जरूर या दुनियेमध्ये कधी तरी अस्तित्वात होती असेल, म्हणून तर या गोष्टींची मागणी करतात. जर एखादा मनुष्य असे म्हणाला की, आम्ही अशी दुनिया बघितलेलीच नाहीये, तर मग त्या दुनियेला तुम्ही कसे काय मानत आहात? उदाहरणा दाखल असे सांगितले जाते की, ‘दिवस’ आणि ‘रात्र’ हे जे दोन शब्द आहेत, तर जरूर दिवस आणि रात्र अस्तित्वात आहेत. असे कोणी म्हणू शकत नाही की, आम्ही रात्रच बघितली आहे तर मग दिवसाला आम्ही कसे मानायचे? परंतु जर का दोन नावे आहेत, तर त्यांचा पार्ट देखील असणारच. तसेच आम्ही देखील ऐकले आहे की, या कलियुगापेक्षा कोणती तरी उच्च स्टेज देखील होती ज्याला सतयुग म्हटले जाते! जर असाच काळ चालत राहिला असेल तर मग त्या काळाला ‘सतयुग’ हे नाव का दिले गेले! तर ही सृष्टी आपली स्टेज बदलत राहते. जशा बाल, किशोर, युवा, वृद्ध… अवस्था बदलत राहतात, तशी सृष्टी देखील बदलत राहते. आजच्या जीवनामध्ये आणि त्या जीवनामध्ये किती फरक आहे. तर तसे श्रेष्ठ जीवन बनविण्याचा प्रयत्न करायचा आहे.

२) निराकारी दुनिया, आकारी दुनिया आणि साकारी दुनिया यांचा विस्तार

या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये तीन दुनिया आहेत - एक आहे - निराकारी दुनिया, दुसरी आहे - आकारी दुनिया, तिसरी आहे - साकारी दुनिया. आता हे तर जाणले की, निराकार सृष्टीमध्ये तर आत्मे निवास करतात आणि साकार सृष्टीमध्ये साकार मनुष्य संप्रदाय निवास करतात, बाकी राहिली आकारी सूक्ष्म सृष्टी; आता विचार चालतो की, ही आकारी सृष्टी नेहमीच असते की काही काळापुरता तिचा पार्ट चालतो? दुनियेतील मनुष्य तर समजतात की, सूक्ष्म दुनिया कुठे वरती आहे, तिथे फरिश्ते राहतात, त्यालाच स्वर्ग म्हणतात, तिथे जाऊन सुख उपभोगू. परंतु आता हे तर स्पष्ट आहे की स्वर्ग आणि नरक या सृष्टीवरच असतो. बाकी ही जी सूक्ष्म आकारी सृष्टी आहे, तिथे शुद्ध आत्म्यांचा साक्षात्कार होतो, तो तर द्वापरपासून, जेव्हा भक्तिमार्ग सुरू होतो तेव्हापासून सुरू झाला आहे. यावरून हे सिद्ध होते की, निराकार सृष्टी आणि साकार सृष्टी दोन्ही कायम अस्तित्वात आहेतच. बाकी सूक्ष्म दुनिया मात्र कायमच असते असे म्हणणार नाही. त्याच्यामध्ये देखील खास ब्रह्मा, विष्णू, शंकर यांचा साक्षात्कार याच वेळेला आपल्याला होतो, कारण याच वेळी परमात्मा तीन कर्तव्ये करण्यासाठी तीन रूपे रचतात. अच्छा, ओम् शांती.

हे अव्यक्त इशारे - परोपकाराच्या भावनेने संपन्न बनून अपकारीवर देखील उपकार करा.

बापदादा सदैव हेच श्रीमत देतात की, मनामध्ये प्रत्येक आत्म्याप्रती शुभ भावना आणि शुभ कामना बाळगा, अपकारीवर देखील उपकाराची वृत्ती बाळगा. सर्वांप्रति सदैव श्रेष्ठ संकल्प असावे, नि:स्वार्थी असावे, सदैव दातृत्वाची भावना असावी. सदैव स्व-परिवर्तन अथवा स्वतःच्या श्रेष्ठ कर्मांद्वारे इतरांना श्रेष्ठ कर्माची प्रेरणा देणारी कर्मे असावी, तेव्हा म्हणणार - परोपकारी.