13-11-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुम्ही दुःख सहन करण्यात खूप वेळ वाया घालवला आहे, आता दुनिया बदलत आहे, तुम्ही बाबांची आठवण करा, सतोप्रधान बना तर वेळ सफल होईल”

प्रश्न:-
२१ जन्मांची लॉटरी प्राप्त करण्याचा पुरुषार्थ काय आहे?

उत्तर:-
२१ जन्मांची लॉटरी घ्यायची असेल तर मोहजीत बना. एका बाबांवर पूर्णपणे समर्पित व्हा. सदैव हे लक्षात राहावे की आता ही जुनी दुनिया बदलत आहे, आपण नवीन दुनियेमध्ये जात आहोत. या जुन्या दुनियेला दिसत असताना देखील पहायचे नाही. सुदाम्याप्रमाणे मूठभर तांदूळ सफल करून सतयुगाची बादशाही घ्यायची आहे.

ओम शांती।
रूहानी मुलांप्रती रूहानी बाबा बसून समजावून सांगत आहेत, हे तर मुले समजतात, रुहानी मुले अर्थात आत्मे. रुहानी पिता अर्थात आत्म्यांचे पिता. यालाच म्हटले जाते आत्म्यांचे आणि परमात्म्याचे मिलन (भेट). ही भेट होतेच मुळी एकदा. या सर्व गोष्टी तुम्ही मुलेच जाणता. ही आहे विचित्र गोष्ट. विचित्र बाबा विचित्र आत्म्यांना समजावून सांगतात. वास्तविक आत्मा विचित्र आहे, इथे येऊन चित्रधारी बनते. चित्राद्वारे (शरीराद्वारे) पार्ट बजावते. आत्मा तर सगळ्यांमध्ये आहे ना. जनावरामध्ये देखील आत्मा आहे. ८४ लाख म्हणतात, त्यामध्ये तर सर्व पशु-पक्षी इत्यादी येतात ना. असंख्य पशु-पक्षी इत्यादी आहेत, बाबा म्हणतात या गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नका. या ज्ञाना व्यतिरिक्त लोकांचा टाईम वेस्ट होत राहतो. यावेळी बाबा तुम्हा मुलांना बसून शिकवत आहेत मग अर्धा कल्प तुम्ही प्रारब्ध भोगता. तिथे तुम्हाला कोणताही त्रास नसतो. तुमचा टाईम वेस्ट होतोच मुळी दुःख सहन करण्यामध्ये. इथे तर दुःखच दुःख आहे. म्हणून सर्वजण बाबांची आठवण करतात की, आमचा दुःखामध्ये टाईम वेस्ट होत आहे, यामधून बाहेर काढा, सुखामध्ये कधी टाईम वेस्ट होतो असे कोणी म्हणणार नाही. हे देखील तुम्ही मुले समजता - यावेळी माणसाची काहीच व्हॅल्यू राहिलेली नाहीये. माणसे बघा अचानकच मरतात. एकाच वादळामध्ये किती मरतात. रावण राज्यामध्ये माणसाची काहीच व्हॅल्यू राहिलेली नाही. आता बाबा तुम्हाला किती व्हॅल्यूएबल बनवत आहेत. वर्थ नॉट ए पेनी पासून वर्थ पाउण्ड बनवत आहेत. गायले देखील जाते - ‘हीरे जैसा जन्म अमोलक’. यावेळी मनुष्य कवड्यांच्या मागे लागलेले आहेत. फारफार तर लखपती, करोडपती, पदमपती बनतात; त्यांची सगळी बुद्धी त्यातच असते. त्यांना जर सांगितले की, हे सर्व विसरून एका बाबांची आठवण करा परंतु मानणारच नाहीत. हे त्यांच्याच बुद्धीमध्ये बसेल, ज्यांच्या बुद्धीमध्ये कल्पापूर्वी देखील बसले होते. नाही तर कितीही समजवा, बुद्धीमध्ये बसणारच नाही. तुम्ही देखील नंबरवार जाणता की ही दुनिया बदलत आहे. बाहेर भले तुम्ही लिहा की, ‘दुनिया बदलत आहे’, तरी देखील जोपर्यंत तुम्ही कोणाला समजावून सांगणार नाही तोपर्यंत समजणार नाहीत. अच्छा, कोणाला समजले तर मग त्यांना समजावून सांगावे लागेल - बाबांची आठवण करा, सतोप्रधान बना. नॉलेज तर खूप सोपे आहे. हे सूर्यवंशी-चंद्रवंशी… आता ही दुनिया बदलत आहे, बदलविणारे एक बाबाच आहेत. हे देखील तुम्ही यथार्थ रीतीने जाणता ते देखील नंबरवार पुरुषार्थानुसार. माया पुरुषार्थ करू देत नाही तर समजतात की, ड्रामा अनुसार एवढा पुरुषार्थ पुरेसा नाहीये. आता तुम्ही मुले जाणता की श्रीमताद्वारे आम्ही आपल्यासाठी या दुनियेला परिवर्तन करत आहोत. श्रीमत आहेच एका शिवबाबांचे. ‘शिवबाबा, शिवबाबा’ म्हणणे तर खूप सोपे आहे; इतर कोणीही ना शिवबाबांना जाणतात, ना वारशाला जाणतात. बाबा अर्थात वारसा. शिवबाबा देखील सत्य हवेत ना. आजकाल तर मेयरला देखील फादर म्हटले जाते. गांधीजींना देखील फादर म्हटले जाते, कोणाला मग जगद्गुरु म्हटले जाते. आता जगदगुरु म्हणजे साऱ्या सृष्टीचा गुरु. तो कोणी मनुष्य कसा असू शकतो! जेव्हा की पतित-पावन सर्वांचे सद्गती दाता एक बाबाच आहेत. बाबा तर आहेत निराकार मग लिबरेट कसे करतात? दुनिया बदलते तर जरूर ॲक्टमध्ये येतील तेव्हाच तर माहित होईल. असे नाही की प्रलय होतो, आणि मग बाबा नवीन सृष्टी रचतात. शास्त्रांमध्ये दाखवले आहे खूप मोठा प्रलय होतो. आणि पिंपळाच्या पानावर कृष्ण येतो. परंतु बाबा समजावून सांगतात असे तर काही नाही आहे. गायले जाते वर्ल्डचा इतिहास-भूगोल रिपीट होतो तर मग प्रलय होऊ शकत नाही. तुमच्या मनामध्ये आहे की आता ही जुनी दुनिया परिवर्तन होत आहे. या सर्व गोष्टी बाबाच येऊन समजावून सांगतात. हे लक्ष्मी-नारायण आहेत नवीन दुनियेचे मालक. तुम्ही चित्रांमध्ये देखील दाखवता की जुन्या दुनियेचा मालक आहे - रावण. राम-राज्य आणि रावण-राज्य गायले जाते ना. या गोष्टी तुमच्या बुद्धीमध्ये आहेत की बाबा जुन्या आसुरी दुनियेला नष्ट करून नवीन दैवी दुनिया स्थापन करत आहेत. बाबा म्हणतात - मी जो आहे, जसा आहे, कोणी विरळेच हे समजतात. ते देखील तुम्ही नंबरवार पुरुषार्था नुसार जाणता. जे चांगले पुरुषार्थी आहेत त्यांना खूप चांगला नशा असतो. आठवण करणाऱ्या पुरुषार्थीला चांगला नशा चढेल. ८४ च्या चक्राचे नॉलेज समजावून सांगताना इतका नशा चढत नाही जितका आठवणीच्या यात्रेमध्ये चढतो. मुख्य गोष्ट आहेच मुळी पावन बनण्याची. बोलावतात देखील - येऊन पावन बनवा. असे कधी बोलावत नाहीत की येऊन विश्वाची बादशाही द्या. भक्तिमार्गामध्ये कथा देखील किती ऐकवतात. खरी-खरी सत्यनारायणाची कथा तर ही आहे. त्या कथा तर जन्म-जन्मांतर ऐकता-ऐकता खालीच उतरत आला आहात (पतनच होत आले आहे). भारतामध्येच या कथा ऐकण्याचा रिवाज आहे, इतर कोणत्याही खंडामध्ये कथा इत्यादी करत नाहीत. भारतालाच रिलीजस (धार्मिक) मानतात. भारतामध्ये असंख्य मंदिरे आहेत. ख्रिश्चनांचे तर एकच चर्च असते. इथे तर वेगवेगळ्या प्रकारची अनेक मंदिरे आहेत. वास्तविक एकच शिवबाबांचे मंदिर असायला हवे. नाव देखील एकाचेच असायला हवे. इथे तर अनेक नावे आहेत. परदेशी देखील इथे मंदिरे पाहण्यासाठी येतात. बिचाऱ्यांना हे माहीत नाहीये की प्राचीन भारत कसा होता? ५ हजार वर्षांपेक्षा तर जुनी कोणती वस्तू असतच नाही. ते तर समजतात की लाखो वर्षांची पुरातन वस्तू मिळाली. बाबा म्हणतात ही मंदिरामध्ये चित्रे इत्यादी जी बनली आहेत त्याला २५०० वर्षेच झाली आहेत, सर्वात पहिली शिवाचीच पूजा होते. ती आहे अव्यभिचारी पूजा. तसेच अव्यभिचारी ज्ञान देखील म्हटले जाते. पहिली आहे अव्यभिचारी पूजा, मग आहे व्यभिचारी पूजा. आता तर पाहा पाण्याची, मातीची पूजा करत राहतात.

आता बेहदचे बाबा म्हणतात - तुम्ही भक्तिमार्गामध्ये किती धन गमावले आहे. किती अथाह शास्त्रे, अथाह चित्रे आहेत. गीतेची किती असंख्य पुस्तके असतील. या सर्व गोष्टींवर खर्च करता-करता तुम्ही बघा काय झाला आहात. मी तुम्हाला डबल मुकुटधारी बनवले होते आता तुम्ही किती कंगाल झाला आहात. कालचीच तर गोष्ट आहे ना. तुम्ही देखील समजता बरोबर आपण ८४ चे चक्र फिरलो आहोत. आता आम्ही पुन्हा असे बनत आहोत. बाबांकडून वारसा घेत आहोत. बाबा वारंवार आठवण करून देतात (पुरुषार्थ करण्यास प्रोत्साहित करतात); गीतेमध्ये देखील शब्द आहे - मनमनाभव. काही-काही शब्द बरोबर आहेत. “प्राय:” म्हटले जाते ना, अर्थात देवी-देवता धर्म नाही आहे, बाकी चित्रे राहिली आहेत. तुमचे यादगार पहा किती सुंदर बनलेले आहे. तुम्ही समजता आता आपण पुन्हा स्थापना करत आहोत. मग भक्तिमार्गामध्ये आपलेच ॲक्युरेट यादगार बनतील. भूकंप इत्यादी होतात, त्यामध्ये सर्व नष्ट होते. मग तिथे तुम्ही सर्व नवीन बनवणार. हुनर (कला) तर तिथे असते ना. हिरा कापणे देखील कला आहे. इथे देखील हिऱ्याला कापतात आणि नंतर बनवतात. हिरा कापणारे देखील खूप एक्सपर्ट असतात. ते मग तिथे जातील. तिथे ही सर्व कला वापरली जाईल. तुम्ही जाणता तिथे किती सुख असेल. या लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते ना. नावच आहे स्वर्ग. १०० टक्के सॉल्व्हेंट (पवित्र). आता तर आहेत इनसॉल्व्हेंट (अपवित्र). भारतामध्ये दागीन्यांची खूप फॅशन आहे, जी परंपरेने चालत येते. तर तुम्हा मुलांना किती आनंद झाला पाहिजे. तुम्ही जाणता ही दुनिया बदलत आहे. आता स्वर्ग बनत आहे, त्यासाठी आपल्याला पवित्र जरूर बनायचे आहे. दैवी गुण देखील धारण करायचे आहेत; म्हणून बाबा म्हणतात - चार्ट जरूर लिहा. मी आत्म्याने कोणती आसुरी ॲक्ट (कृती) तर केली नाही ना? स्वतःला निश्चितच आत्मा समजा. या शरीराद्वारे कोणते विकर्म तर केले नाही ना? जर कोणते विकर्म केले तर रजिस्टर खराब होईल. ही आहे २१ जन्मांची लॉटरी. ही देखील रेस आहे (शर्यत आहे). घोड्यांची शर्यत असते ना. याला म्हटले जाते - ‘राजस्व अश्वमेध…’ स्वराज्यासाठी अश्व अर्थात तुम्हा आत्म्यांना शर्यत करायची आहे. आता परत घरी जायचे आहे. त्याला स्वीट सायलेन्स होम म्हटले जाते. हे शब्द तुम्ही आता ऐकत आहात. आता बाबा म्हणतात - मुलांनो, खूप मेहनत करा. राजाई मिळते, काही कमी गोष्ट थोडीच आहे. मी आत्मा आहे, मी इतके जन्म घेतले आहेत. आता बाबा म्हणतात - तुमचे ८४ जन्म पूर्ण झाले. आता पुन्हा पहिल्या नंबरपासून सुरुवात करायची आहे. नवीन महालामध्ये जरूर मुलेच बसतील, जुन्यामध्ये तर बसणार नाहीत. असे तर नाही की, आपण जुन्या महालात राहतील आणि नवीन महालात भाडेकरू ठेवतील. तुम्ही जितकी मेहनत कराल, नवीन दुनियेचे मालक बनाल. नवीन घर बनते तर मन होते जुन्या घराला सोडून नव्यामध्ये जावे. बाबा मुलांसाठी नवीन घर बनवतातच तेव्हा जेव्हा पहिले घर जुने होते. तिथे भाड्याने देण्याची तर काही गोष्टच नाही. जसे ते लोक चंद्रावर प्लॉट घेण्याचा प्रयत्न करतात, तुम्ही मग स्वर्गामध्ये प्लॉट घेत आहात. जितके-जितके ज्ञान आणि योगामध्ये रहाल तितके तुम्ही पवित्र बनाल. हा आहे राजयोग, किती मोठी राजाई मिळेल. बाकी हे जे चंद्र इत्यादी वर प्लॉट घेण्यासाठी शोधत राहतात ते सर्व व्यर्थ आहे. याच गोष्टी ज्या सुख देणाऱ्या आहेत त्याच मग विनाश करणाऱ्या, दुःख देणाऱ्या बनतील. पुढे चालून लष्कर इत्यादी सर्व कमी होईल. बॉम्ब्स द्वारेच फटाफट काम होत जाईल. हा ड्रामाच बनलेला आहे, वेळेवर अचानक विनाश होतो. मग सैनिक इत्यादी सर्व मरतात. तुम्ही आता फरिश्ते बनत आहात. तुम्ही जाणता आपल्यासाठीच विनाश होत आहे. ड्रामामध्ये पार्ट आहे, जुनी दुनिया खलास होते. जे जसे कर्म करतात तसेच भोगायचे आहे ना. आता समजा संन्याशी चांगले आहेत, तरीही जन्म तर गृहस्थींकडेच घेतील ना. श्रेष्ठ जन्म तर तुम्हाला नवीन दुनियेमध्ये मिळणार आहे, तरीही संस्कारानुसार जाऊन ते बनाल. तुम्ही आता संस्कार घेऊन जाता नवीन दुनियेसाठी. जन्म देखील जरूर भारतामध्येच घ्याल. जे खूप चांगले रिलीजस माइंडेड (धार्मिक वृत्तीचे) असतील त्यांच्या जवळ तुम्ही जन्म घ्याल कारण तुम्ही कर्मच असे करता. जसे-जसे संस्कार, त्यानुसार जन्म होतो. तुम्ही खूप उच्च कुळामध्ये जाऊन जन्म घ्याल. तुमच्या सारखे कर्म करणारा तर कोणीही नसेल. जसे शिक्षण, जशी सेवा, तसा जन्म. मरायचे तर अनेकांना आहे. पहिले रिसीव करणारे देखील जाणार आहेत. बाबा समजावून सांगत आहेत आता ही दुनिया बदलत आहे. बाबांनी तर साक्षात्कार घडवला आहे. बाबा (ब्रह्मा बाबा) आपले देखील उदाहरण सांगतात. बघा २१ जन्मांसाठी राजाई मिळते, त्याच्या समोर हे १०-२० लाख काय आहेत. ‘अल्फ’ला मिळाली बादशाही, ‘बे’ ला मिळाली गदाई (गाढवशाही). भागीदाराला म्हणाले - तुला जे पाहिजे ते घे. कोणताच त्रास झाला नाही. मुलांना देखील समजावून सांगितले जाते - बाबांकडून तुम्ही काय घेता? स्वर्गाची बादशाही. जितके होऊ शकेल नवीन सेंटर उघडत जा. अनेकांचे कल्याण करा. तुमची २१ जन्मांची कमाई होत आहे. इथे तर लखपती, करोडपती पुष्कळ आहेत. ते सर्व आहेत गरीब. तुमच्याकडे देखील भरपूर जण येतील. प्रदर्शनीमध्ये किती येतात, असे समजू नका प्रजा बनत नाही. प्रजा खूप बनते. ‘खूप-छान - खूप छान’, असे तर खुपजण बोलतात परंतु मग म्हणतात की, आम्हाला आता वेळ नाही. थोडे जरी ऐकले तरी देखील प्रजेमध्ये येतील. अविनाशी ज्ञानाचा विनाश होत नाही. बाबांचा परिचय देणे काही छोटी गोष्ट थोडीच आहे. काहींना तर हे ऐकून रोमांच उभे राहतील. जर उच्च पद प्राप्त करायचे असेल तर पुरुषार्थ करू लागतील. बाबा कोणाकडून धन इत्यादी तर घेणार नाहीत. मुलांच्या थेंबा-थेंबाने तळे साचत आहे. कोणी तर एक रुपया देखील पाठवतात. बाबा, माझी एक विट लावा. सुदाम्याच्या मूठभर तांदळाचे गायन आहे ना. बाबा म्हणतात - तुमचे तर हे हिरे-माणके आहेत. सर्वांचा हिऱ्या समान जन्म बनतो. तुम्ही भविष्यासाठी बनवत आहात. तुम्ही जाणता इथे या डोळ्यांनी जे काही पाहत आहात, ही जुनी दुनिया आहे. ही दुनिया बदलत आहे. आता तुम्ही अमरपुरीचे मालक बनत आहात. मोहजीत जरूर बनावे लागेल. तुम्ही म्हणत आला आहात की बाबा तुम्ही याल तेव्हा आम्ही तुमच्यावर बलिहार जाणार, सौदा तर चांगला आहे ना. मनुष्य थोडेच जाणतात की, सौदागर, रत्नाकर, जादूगर नाव का पडले आहे. रत्नाकर आहेत ना, एक-एक अविनाशी ज्ञान रत्न अमूल्य व्हर्जन (अनमोल महावाक्य) आहे. यावर ‘रूप-बसंत’ची कथा देखील आहे ना. तुम्ही रूप देखील आहात, बसंत देखील आहात. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) आता या शरीराने कोणतेही विकर्म करायचे नाहीये. असे कोणतेही आसुरी ॲक्ट (कृत्य) नसावे ज्यामुळे रजिस्टर खराब होईल.

२) एक बाबांच्या आठवणीच्या नशेमध्ये राहायचे आहे. पावन बनण्याचा मुख्य पुरुषार्थ जरूर करायचा आहे. कवड्यांच्या मागे आपला अमूल्य वेळ वाया न घालवता श्रीमता द्वारे आपले जीवन श्रेष्ठ बनवायचे आहे.

वरदान:-
स्वतःला विश्वसेवेप्रती अर्पण करून मायेला दासी बनविणारे सहज संपन्न भव आता आपला वेळ, सर्व प्राप्ती, ज्ञान, गुण आणि सर्व शक्तींना विश्वसेवा अर्थ समर्पित करा. जो संकल्प उत्पन्न होतो त्याला चेक करा की हा विश्वसेवेप्रती आहे. असे सेवेप्रती अर्पण झाल्याने तुम्ही सहजच संपन्न बनाल. सेवेच्या धूनमध्ये छोटे-मोठे पेपर्स किंवा परीक्षा स्वतः समर्पण होतील. मग मायेला घाबरणार नाहीत, नेहमी विजयी बनण्याच्या आनंदामध्ये नाचत रहाल. मायेला आपली दासी असल्याचा अनुभव कराल. तुम्ही सेवेमध्ये सरेंडर व्हाल तर माया आपोआप सरेंडर होईल.

बोधवाक्य:-
अंतर्मुखतेने तोंडाला बंद करा तर क्रोध समाप्त होईल.

अव्यक्त इशारे:- अशरीरी आणि विदेही स्थितीचा अभ्यास वाढवा. जसे एका सेकंदामध्ये स्विच ऑन आणि ऑफ केला जातो, असेच एका सेकंदामध्ये शरीराचा आधार घेतला आणि एका सेकंदामध्ये शरीरापासून परे अशरीरी स्थितीमध्ये स्थित झाले. आता-आता शरीरामध्ये आले, आता-आता अशरीरी बनले, गरज वाटली तर शरीर रुपी वस्त्र धारण केले, गरज नसेल तेव्हा शरीरा पासून वेगळे झाले. ही प्रॅक्टिस करायची आहे, यालाच कर्मातीत अवस्था म्हटले जाते.