14-01-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - पावलो-पावली बाबांच्या श्रीमतावर चालत रहा, एका बाबांकडूनच ऐका तर मायेचा
वार होणार नाही”
प्रश्न:-
उच्च पद
प्राप्त करण्याचा आधार काय आहे?
उत्तर:-
१) उच्च पद प्राप्त करण्यासाठी बाबांच्या प्रत्येक डायरेक्शन प्रमाणे चालत रहा.
बाबांचे डायरेक्शन मिळाले आणि मुलांनी ऐकले. दुसरा कोणता संकल्प सुद्धा येऊ नये. २)
या रूहानी सेवेमध्ये व्यस्त रहा. तुम्हाला दुसऱ्या कोणाचीही आठवण येता कामा नये.
‘आप मुये मर गई दुनिया’ तेव्हाच उच्च पद मिळू शकते.
गीत:-
तुम्हें पाके
हमने…
ओम शांती।
गोड-गोड रूहानी मुलांनी हे गाणे ऐकले. ते आहे भक्तीमार्गासाठी गायलेले. यावेळी बाबा
याचे रहस्य सांगत आहेत. मुले देखील समजतात - आता आपण बाबांकडून बेहदचा वारसा
प्राप्त करत आहोत. ते आपले राज्य कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. भारताचे राज्य
अनेकांनी हिरावून घेतले ना. मुसलमानांनी हिरावून घेतले, इंग्रजांनी हिरावून घेतले.
वास्तविक सर्वात आधी तर रावणाने हिरावून घेतले आहे, आसुरी मतावर. हे जे माकडांचे
चित्र बनवतात - ‘हिअर नो ईविल, सी नो ईविल…’ याचे देखील काहीतरी रहस्य असेलच ना.
बाबा सांगत आहेत एकीकडे आहे रावणाचा आसुरी संप्रदाय, जो बाबांना ओळखत नाही.
दुसरीकडे आहात तुम्ही मुले. तुम्ही देखील अगोदर जाणत नव्हता. बाबा यांच्यासाठी
(ब्रह्मा बाबांसाठी) देखील ऐकवत आहेत की यांनी देखील खूप भक्ती केली आहे, यांचा हा
आहे अनेक जन्मांतील शेवटचा जन्म. हेच पहिले पावन होते, आता पतित बनले आहेत. यांना
मी जाणतो. आता तुम्ही इतर कोणाचेही ऐकू नका. बाबा म्हणतात, मी तुम्हा मुलांशीच
बोलतो. होय, कधी कोणी मित्र-नातेवाईक इत्यादींना घेऊन येतात तर थोडे-फार
त्यांच्याशी बोलतो. पहिली मुख्य गोष्ट तर आहे पवित्र बनणे तेव्हाच बुद्धीमध्ये
धारणा होईल. इथे कायदे खूप कडक आहेत. बाबा म्हणतात ७ दिवस भट्टीमध्ये रहायचे आहे,
इतर कोणाचीही आठवण येऊ नये, ना पत्र इत्यादी लिहायचे आहे. भले कुठेही रहा. परंतु
संपूर्ण दिवस भट्टीमध्ये रहावे लागेल. आता तर तुम्ही भट्टीमध्ये पडून मग बाहेर
निघता. कोणी तर आश्चर्यवत् सुनन्ती, कथन्ती, अहो माया आणि मग भागन्ती झाले. हे आहे
खूप मोठे लक्ष्य. बाबांचे म्हणणे मानत नाहीत. बाबा म्हणतात तुम्ही तर वानप्रस्थी
आहात. तुम्ही का फुकटचे अडकून पडला आहात. तुम्ही तर या रूहानी सेवेमध्ये तत्पर रहा.
तुम्हाला इतर कोणाचीही आठवण येता कामा नये. ‘आप मुये मर गई दुनिया’ तेव्हाच उच्च पद
मिळू शकते. तुमचा पुरुषार्थ आहेच - नरापासून नारायण बनण्याचा. पावलो-पावली
बाबांच्या डायरेक्शनप्रमाणे चालावे लागेल. परंतु यामध्ये देखील हिंमत पाहिजे. ही
फक्त सांगण्याची गोष्ट नाहीये. मोहाची आसक्ती काही कमी नाहीये, नष्टोमोहा बनायचे
आहे. माझे तर एक शिवबाबा, दुसरे ना कोणी. आम्ही तर बाबांचा आश्रय घेतो. आम्ही कधीही
विष देणार नाही. तुम्ही ईश्वराकडे येता तर माया देखील तुम्हाला सोडणार नाही, खूप
पछाडेल. जसे वैद्य लोक म्हणतात - या औषधाने अगोदर सगळा रोग बाहेर निघेल. घाबरायचे
नाही. हे देखील असेच आहे. माया खूप सतावेल, वानप्रस्थ अवस्थेमध्ये देखील विकाराचे
संकल्प आणेल. मोह उत्पन्न होईल. बाबा अगोदरच सांगतात की, हे सर्व होईल. जोपर्यंत
जिवंत आहात तोपर्यंत हे मायेचे बॉक्सिंग चालत राहील. माया देखील पैलवान बनेल परंतु
तुम्हाला सोडणार नाही. हे ड्रामामध्ये नोंदलेले आहे. मी थोडेच मायेला सांगेन की
विकल्प आणू नको. खुप जण लिहितात - ‘बाबा कृपा करा’. मी थोडाच कोणावर कृपा करणार.
इथे तर तुम्हाला श्रीमतावर चालायचे आहे. कृपा केली मग तर सगळेच महाराजा बनतील.
ड्रामामध्ये देखील असे नाही. सर्व धर्मवाले येतात. जे इतर धर्मामध्ये ट्रान्सफर
झाले असतील ते निघून येतील. हे कलम लागत आहे, यामध्ये खूप मेहनत आहे. नवीन जे येतात
त्यांना फक्त एवढेच सांगायचे आहे - ‘बाबांची आठवण करा’. शिव भगवानुवाच, श्रीकृष्ण
तर ८४ जन्मांमध्ये येतात. अनेक मते, अनेक गोष्टी आहेत. हे बुद्धीमध्ये पूर्णपणे
धारण करायचे आहे. आम्ही पतित होतो. आता बाबा तुम्हाला पावन कसे बनायचे ते सांगतात.
कल्पा पूर्वी देखील सांगितले होते - मामेकम् (मज एकाची) आठवण करा. स्वतःला आत्मा
समजून देहाचे सर्व धर्म सोडून जिवंतपणी मरा. मज पित्याचीच आठवण करा. मी सर्वांची
सद्गती करण्यासाठी आलो आहे. भारतवासीच श्रेष्ठ बनतात मग ८४ जन्म घेऊन खाली उतरतात.
बोला, तुम्ही भारतवासीच या देवी-देवतांची पूजा करता ना. हे कोण आहेत? हे स्वर्गाचे
मालक होते ना. आता कुठे आहेत? ८४ जन्म कोण घेतात? सतयुगामध्ये तर हेच देवी-देवता
होते. आता पुन्हा या महाभारत लढाई द्वारे सर्वांचा विनाश होणार आहे. आता सगळे पतित
तमोप्रधान आहेत. मी देखील यांच्या अनेक जन्मांतील अंतिम जन्माच्या अंतामध्येच येऊन
प्रवेश करतो. हे (ब्रह्मा बाबा) संपूर्ण भक्त होते. नारायणाची पूजा करत असत.
यांच्यामध्येच प्रवेश करून मग यांना नारायण बनवतो. आता तुम्हाला देखील पुरुषार्थ
करायचा आहे. ही डीटी (दैवी) राजधानी स्थापन होत आहे. माळा बनत आहे ना. वरती आहे
निराकार फूल, मग मेरु युगल. शिवबाबांच्या एकदम खाली हे (ब्रह्मा) उभे आहेत.
जगत-पिता ब्रह्मा आणि जगत-अंबा सरस्वती. आता तुम्ही या पुरुषार्था द्वारे
विष्णुपुरीचे मालक बनता. प्रजा देखील म्हणते तर खरे ना - ‘भारत आमचा आहे’. तुम्ही
देखील समजता आपण विश्वाचे मालक आहोत. आम्ही राज्य करणार, दुसरा कोणताही धर्मच असणार
नाही. असे म्हणणार नाहीत की, हे आमचे राज्य आहे, दुसरे कोणते राज्यच नाही आहे. इथे
(या दुनियेमध्ये) असंख्य आहेत तर तुझे-माझे चालते. तिथे या गोष्टीच नाहीत. तर आता
बाबा सांगत आहेत - मुलांनो, इतर सर्व गोष्टी सोडून मामेकम् (मज एकाची) आठवण करा तर
विकर्म विनाश होतील. असे नाही कोणी समोर बसून नेष्ठा (योग) करवून घेतील, दृष्टी
देतील. बाबा तर म्हणतात चालता-फिरता बाबांची आठवण करायची आहे. आपला चार्ट ठेवा -
संपूर्ण दिवसामध्ये किती आठवण केली? पहाटे उठून किती वेळ बाबांशी गोष्टी केल्या? आज
बाबांच्या आठवणीमध्ये बसलो का? अशा प्रकारे स्वतःवर मेहनत करायची आहे. नॉलेज तर
बुद्धीमध्ये आहे तर मग इतरांना देखील समजावून सांगायचे आहे. हे कोणाच्याच लक्षात
येत नाही, की काम महाशत्रू आहे. २-४ वर्षे पवित्र राहून मग मायेची जोरात थप्पड
बसल्याने कोसळतात (अधोगती होते). मग बाबांना लिहितात - ‘बाबा, मी तोंड काळे केले.
बाबा लिहितात काळे तोंड करणाऱ्यांनी १२ महिने इथे येण्याची गरज नाही. तुम्ही
बाबांसोबत प्रतिज्ञा करून मग विकारांमध्ये गेलात, आता कधीही माझ्याकडे येऊ नका.
ध्येय खूप मोठे आहे. बाबा आलेच आहेत मुळी पतितापासून पावन बनविण्याकरिता. बरीच मुले
लग्न करून पवित्र राहतात. होय, एखाद्या मुलीला मार खावा लागतो तर तिला वाचवण्यासाठी
गंधर्व विवाह करून पवित्र राहतात. त्यामध्ये देखील काहींच्या तर नाकालाच माया
पकडते. हार खातात. स्त्रिया देखील खूप हार खातात. बाबा म्हणतात - तुम्ही तर
शूर्पणखा आहात, ही सर्व नावे यावेळचीच आहेत. इथे तर बाबा कोणत्याही विकारीला बसू
सुद्धा देत नाहीत. पावलो-पावली बाबांकडून सल्ला घ्यावा लागेल. सरेंडर (समर्पित)
होतील तर मग बाबा म्हणतील आता ट्रस्टी बना. श्रीमतावर चालत रहा. पोतामेल सांगतील
तेव्हाच तर सल्ला देतील. या नीट समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. तुम्ही भोग भले लावा
परंतु मी खात नाही. मी तर दाता आहे. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि
सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
रात्री क्लास -
१५-०६-१९६८
भूतकाळात जे घडून
गेले आहे त्याची उजळणी केल्याने ज्यांचे मन कमजोर आहे त्यांच्या मनाच्या कमजोरपणाची
देखील उजळणी होते त्यामुळे मुलांना ड्रामाच्या पट्ट्यावर थांबवून ठेवले गेले आहे.
मुख्य फायदा आहेच आठवणी द्वारे. आठवणीनेच आयुष्य वाढणार आहे. मुले ड्रामाला समजतील
तर मग कधी विचारही येणार नाही. यावेळी ड्रामामध्ये ज्ञान शिकण्याचा आणि शिकविण्याचा
पार्ट सुरू आहे. नंतर मग पार्ट बंद होईल. ना बाबांचा पार्ट, ना आपला पार्ट राहणार
आहे. ना त्यांचा देण्याचा पार्ट, ना आपला घेण्याचा पार्ट असेल. तर एक होतील ना.
आपला पार्ट नवीन दुनियेमध्ये असेल. बाबांचा पार्ट शांतीधाममध्ये असेल. पार्टचे रिळ
भरलेले आहे ना, आपल्या प्रारब्धाचा पार्ट, बाबांचा शांतीधामाचा पार्ट. देण्याचा आणि
घेण्याचा पार्ट पूर्ण झाला, ड्रामाच पूर्ण झाला. नंतर मग आपण राज्य करण्यासाठी
येणार, तो पार्ट चेन्ज होईल. ज्ञान स्टॉप होईल आणि मग आपण तसे बनू. पार्टच पूर्ण
होईल तर बाकी फरक राहणार नाही. मुलांचा आणि बाबांचा देखील पार्टच राहणार नाही. हे
देखील ज्ञान पूर्णपणे धारण करतात. त्यांच्याकडे देखील काहीच राहत नाही. ना
देणाऱ्याकडे राहिले, ना घेणाऱ्यामध्ये कमी राहिले तर मग दोघे एकमेकांच्या समान
झाले. यामध्ये विचार सागर मंथन करण्याची बुद्धी पाहिजे. खास पुरुषार्थ आहे
आठवणीच्या यात्रेचा. बाबा बसून समजावून सांगत आहेत. ऐकवताना तर मोठी गोष्ट होते,
बुद्धीमध्ये तर सूक्ष्म आहे ना. मनातून जाणतात की शिवबाबांचे रूप कसे आहे. समजावून
सांगताना तर मोठे रूप होते. भक्तिमार्गामध्ये मोठे लिंग बनवतात. आत्मा तर सूक्ष्म
आहे ना. ही आहे कुदरत (प्रकृतीचा चमत्कार). कुठपर्यंत अंत मिळवतील? आणि मग शेवटी
बेअंत म्हणून मोकळे होतात. बाबांनी समजावून सांगितले आहे सगळा पार्ट आत्म्यामध्ये
भरलेला आहे. हा आहे प्रकृतीचा चमत्कार. अंत तर मिळवला जाऊ शकत नाही. सृष्टी चक्राचा
अंत तर मिळवतात. रचयिता आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताला तुम्हीच जाणता. बाबा नॉलेजफुल
आहेत. मग आपण देखील फुल (संपूर्ण) होणार. प्राप्त करण्यासाठी काहीच उरणार नाही.
बाबा यांच्यामध्ये प्रवेश करून शिकवत आहेत. ते आहेत बिंदू. आत्म्याचा किंवा
परमात्म्याचा साक्षात्कार झाल्याने आनंद थोडाच होतो. मेहनत करून बाबांची आठवण
करायची आहे तर विकर्म विनाश होतील. बाबा म्हणतात - माझ्यातील ज्ञान बंद होईल तेव्हा
तुमच्यामधील ज्ञान देखील बंद होईल. नॉलेज घेऊन उच्च बनतात. सर्व काही घेतात तरी
देखील बाबा तर बाबाच आहेत ना. तुम्ही आत्मे आत्मेच राहणार, पिता होऊन तर राहणार
नाही. हे तर ज्ञान आहे. पिता पिता आहेत, मुले मुले आहेत. या सर्व विचार सागर मंथन
करून खोलात जाण्याच्या गोष्टी आहेत. हे देखील जाणतात की, जायचे तर सर्वांनाच आहे.
सगळेच जाणार आहेत. बाकी शेवटी आत्मा शिल्लक राहील. सगळी दुनियाच नष्ट होणार आहे.
यामध्ये निडर होऊन रहावे लागते. निडर होऊन राहण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. शरीर
इत्यादीचे कोणतेही भान राहू नये. त्याच अवस्थेमध्ये जायचे आहे. बाबा आप समान बनवत
आहेत, तुम्ही मुले देखील इतरांना आप समान बनवत राहता. एका बाबांचीच आठवण राहील असा
पुरुषार्थ करायचा आहे. आता टाईम शिल्लक आहे. हा सराव तीव्र गतीने करावा लागेल.
प्रॅक्टिस नसेल तर उभे राहाल. पाय थरथर कापायला लागतील आणि अचानक हार्ट फेल होत
राहतील. तमोप्रधान शरीराला हार्ट फेल होण्यामध्ये उशीर लागत नाही. जितके अशरीरी
बनाल, बाबांची आठवण करत राहाल तितके जवळ येत जाल. योग करणारेच निडर राहतील.
योगाद्वारेच शक्ती मिळते, ज्ञानाद्वारे धन मिळते. मुलांना पाहिजे शक्ती. तर शक्ती
मिळविण्यासाठी बाबांची आठवण करत रहा. बाबा आहेत अविनाशी सर्जन. ते कधी पेशंट बनू
शकत नाहीत. आता बाबा म्हणतात - तुम्ही तुमचे अविनाशी औषध घेत राहा. मी अशी संजीवनी
बुटी देतो ज्यामुळे कधी कोणी आजारी पडणार नाही. फक्त पतित-पावन बाबांची आठवण करत
रहा तर पावन बनाल. देवता सदैव निरोगी, पावन आहेत ना. मुलांना तर असा निश्चय झाला
आहे की आपण कल्प-कल्प वारसा घेतो. बाबा अगणित वेळा आले आहेत जसे आता आले आहेत. बाबा
जे शिकवतात, समजावून सांगतात हाच राजयोग आहे. ती गीता इत्यादी सर्व भक्तिमार्गाची
शास्त्रे आहेत. हा ज्ञान मार्ग बाबाच सांगतात. बाबाच येऊन खालून वर उचलतात. जे
पक्के निश्चय बुद्धी आहेत तेच माळेचे मणी बनतात. मुले समजतात भक्ती करता-करता आपण
खाली घसरत आलो आहोत (आपली अधोगती होत आली आहे). आता बाबा येऊन खरी कमाई करून देत
आहेत. लौकिक पिता कधी इतकी कमाई करून देत नाहीत जितकी पारलौकिक पिता करून देत आहेत.
अच्छा मुलांनो, गुड नाईट आणि नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) माया
पैलवान बनून समोर येईल, तिला घाबरायचे नाही. मायाजीत बनायचे आहे. पावलो-पावली
श्रीमतावर चालून आपणच आपल्यावर कृपा करायची आहे.
२) बाबांना आपला
खरा-खरा पोतामेल सांगायचा आहे. ट्रस्टी होऊन रहायचे आहे. चालता-फिरता आठवणीचा
अभ्यास करायचा आहे.
वरदान:-
रुहे गुलाब
बनून दूर-दूर पर्यंत रूहानी सुगंध पसरविणारे रूहानी सेवाधारी भव
रूहानी रुहे गुलाब
आपल्या रूहानी वृत्ती द्वारे रुहानियतचा सुगंध दूर-दूर पर्यंत पसरवतात. त्यांच्या
दृष्टीमध्ये नेहमी सुप्रीम रूह सामावलेला असतो. ते नेहमी आत्म्याला बघतात,
आत्म्याशी बोलतात. मी आत्मा आहे, सदैव सुप्रीम आत्म्याच्या छत्र-छायेमध्ये चालत
आहे, मज आत्म्याचा करावनहार सुप्रीम आत्मा आहे, असे प्रत्येक सेकंदाला हजुरला हाजिर
अनुभव करणारे सदैव रुहानी सुगंधामध्ये अविनाशी आणि एकरस राहतात. हीच आहे रूहानी
सेवाधारीची नंबरवन विशेषता.
बोधवाक्य:-
निर्विघ्न
बनून सेवेमध्ये पुढचा नंबर घेणे अर्थात नंबरवन भाग्यशाली बनणे.
अव्यक्त इशारे:- या
अव्यक्ती महिन्यामध्ये बंधनमुक्त राहून जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करा.
ब्राह्मण जीवनामध्ये
देहाचे बंधन, नात्याचे बंधन, साधनांचे बंधन - सगळे नष्ट झाले ना! कोणतेही बंधन
नाही. बंधन आपल्या अधीन करते आणि नाते स्नेहाचा सहयोग देते. तर देहधारी
नातेवाईकांचा देहाच्या नात्याने संबंध नाही परंतु आत्मिक संबंध आहे. असे ब्राह्मण
अर्थात जीवन-मुक्त.