14-08-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - बाबांशी ऑनेस्ट (इमानदार) रहा, आपला खरा-खरा चार्ट ठेवा, कोणालाही दुःख देऊ नका, एक बाबांच्या श्रेष्ठ मतावर चालत रहा”

प्रश्न:-
जे पूर्ण ८४ जन्म घेणारे आहेत त्यांचा पुरुषार्थ काय असेल?

उत्तर:-
त्यांचा विशेष पुरुषार्थ नरापासून नारायण बनण्याचा असेल. आपल्या कर्मेंद्रियांवर त्यांचा पूर्ण कंट्रोल असेल. त्यांची दृष्टी क्रिमिनल नसेल. जर आताही कोणाला पाहिल्याने विकारी विचार येतात, विकारी दृष्टी होते तर समजा ती पूर्ण ८४ जन्म घेणारी आत्मा नाहीये.

गीत:-
इस पाप की दुनिया से…

ओम शांती।
गोड-गोड रूहानी मुले जाणतात की ही पापाची दुनिया आहे. पुण्याच्या दुनियेला देखील मनुष्य जाणतात. मुक्ती आणि जीवनमुक्ती पुण्याच्या दुनियेला म्हटले जाते. तिथे पाप असत नाही. पाप असते दुःखधाम रावण राज्यामध्ये. दुःख देणाऱ्या रावणाला देखील पाहिले आहे, रावण काही कोणती वस्तू नाहीये तरी देखील पुतळा जाळतात. मुले जाणतात आपण यावेळी रावण राज्यामध्ये आहोत, परंतु किनारा केलेला आहे. आपण आता पुरुषोत्तम संगमयुगावर आहोत. मुले जेव्हा इथे येतात तर बुद्धीमध्ये हे आहे - आपण त्या बाबांकडे जातो जे आम्हाला मनुष्यापासून देवता बनवितात. सुखधामचा मालक बनवतात. सुखधामचा मालक बनविणारा काही ब्रह्मा नाहीये, कोणीही देहधारी नाहीये. ते आहेतच शिवबाबा, ज्यांना देह नाही आहे. देह तुम्हाला देखील नव्हता, परंतु तुम्ही मग देह घेऊन जन्म-मरणामध्ये येता तर तुम्ही समजता - आपण बेहदच्या बाबांकडे जातो. ते आपल्याला श्रेष्ठ मत देतात. तुम्ही असा पुरुषार्थ केल्यानेच स्वर्गाचे मालक बनू शकाल. स्वर्गाची तर सर्वजण आठवण करतात. समजतात नवीन दुनिया आहे जरूर आणि ती देखील जरूर कोणीतरी स्थापन करणारा आहे. नरक देखील कोणीतरी स्थापन करतो. तुमचा सुखधामाचा पार्ट केव्हा पूर्ण होतो ते देखील तुम्ही जाणता. मग रावण राज्यामध्ये तुम्ही दुःखी होऊ लागता. यावेळी हे आहे दुःखधाम. भले कितीही करोडपती, पदमपती असतील परंतु पतित दुनिया तर जरूर म्हणणार ना. ही गरीब दुनिया, दु:खी दुनिया आहे. भले कितीही मोठ-मोठी घरे आहेत, सुखाची सर्व साधने आहेत तरीही म्हटले जाईल - पतित जुनी दुनिया आहे. विषय वैतरणी नदीमध्ये गटांगळ्या खात राहतात. हे देखील समजत नाहीत की विकारामध्ये जाणे पाप आहे. म्हणतात याच्या शिवाय सृष्टीची वृद्धी कशी होईल. बोलावतात देखील - हे भगवान, हे पतित-पावन येऊन या पतित दुनियेला पावन बनवा. आत्मा म्हणते शरीराद्वारे. आत्माच पतित बनली आहे तेव्हाच तर बोलावते. स्वर्गामध्ये एकही पतित असत नाही.

तुम्ही मुले जाणता की, संगमयुगावर जे चांगले पुरुषार्थी आहेत तेच समजतात की आपण ८४ जन्म घेतले आहेत, आता परत या लक्ष्मी-नारायणाच्या सोबतच आपण सतयुगामध्ये राज्य करणार. एकानेच काही ८४ जन्म घेतलेले नाहीत ना. राजा सोबत प्रजा देखील पाहिजे. तुम्हा ब्राह्मणांमध्ये देखील नंबरवार आहेत. कोणी राजा-राणी बनतात, कोणी प्रजा. बाबा म्हणतात - ‘मुलांनो, आताच तुम्हाला दैवी गुण धारण करायचे आहेत’. हे डोळे क्रिमिनल आहेत, कोणाला पाहिल्याने विकाराची दृष्टी जाते तर त्यांचे ८४ जन्म होणार नाहीत. ते नरापासून नारायण बनू शकणार नाहीत. जेव्हा या डोळ्यांवर विजय प्राप्त कराल तेव्हा कर्मातीत अवस्था होईल. सर्व काही डोळ्यांवर अवलंबून आहे, डोळेच धोका देतात. आत्मा या खिडक्यांच्या द्वारे पाहते, यांच्यामध्ये (ब्रह्मा बाबांमध्ये) तर डबल आत्मा आहे. बाबा देखील या खिडक्यांमधून बघत आहेत. माझी देखील दृष्टी आत्म्यावर जाते. बाबा आत्म्यालाच समजावून सांगतात. म्हणतात - ‘मी देखील शरीर घेतले आहे, तेव्हाच तर बोलू शकतो’. तुम्ही जाणता बाबा आपल्याला सुखाच्या दुनियेमध्ये घेऊन जातात. हे आहे रावण राज्य. तुम्ही या पतित दुनिये पासून किनारा केला आहे. कोणी खूप पुढे गेले आहेत, कोणी पाठीमागे राहिले आहेत. प्रत्येकजण म्हणतो देखील - ‘पार लगाओ’ (पार करून द्या). आता पार तर जाल सतयुगामध्ये. परंतु तिथे उच्च पद प्राप्त करायचे असेल तर पवित्र बनायचे आहे. मेहनत करायची आहे. मुख्य गोष्ट आहे - बाबांची आठवण करा तर विकर्म विनाश होतील. हा आहे पहिला सब्जेक्ट.

तुम्ही आता जाणता आपण आत्मा ॲक्टर आहोत - सर्वप्रथम आपण सुखधाम मध्ये आलो मग आता दु:खधाम मध्ये आलो आहोत. आता बाबा पुन्हा सुखधाम मध्ये घेऊन जाण्यासाठी आले आहेत. म्हणतात माझी आठवण करा आणि पवित्र बना. कोणालाही दुःख देऊ नका. एकमेकांना खूप दुःख देत राहतात. कोणामध्ये काम विकाराचे भूत आले, कोणामध्ये क्रोध आला, हात उचलला. बाबा म्हणतील - ही तर दुःख देणारी पाप-आत्मा आहे. पुण्य-आत्मा कशी बरे बनेल. अजूनपर्यंत पाप करत राहतात. हे तर नाव बदनाम करतात. सर्वजण काय म्हणतील! म्हणतात - ‘आम्हाला भगवान शिकवतात! आम्ही मनुष्यापासून देवता विश्वाचे मालक बनतो! ते मग अशी कामे करतात काय!’ म्हणून बाबा म्हणतात - रोज रात्रीला स्वतःला पहा. जर सपुत मुले आहात तर चार्ट पाठवाल. भले कोणी चार्ट लिहितात, परंतु त्यासोबत हे लिहीत नाहीत की, ‘आम्ही कोणाला दुःख दिले किंवा ही चूक केली’. आठवण करत रहाल आणि उलटी कर्म देखील करत रहाल, तर मग हे देखील चांगले नाही. उलटी कर्म तेव्हा करतात जेव्हा देह-अभिमानी बनतात.

हे चक्र कसे फिरते - हे तर खूप सोपे आहे. एका दिवसामध्ये देखील टीचर बनू शकता. बाबा तुम्हाला ८४ चे रहस्य समजावून सांगतात, टीच करतात. मग जाऊन त्यावर मनन करायचे आहे. आपण ८४ जन्म कसे घेतले? त्या शिकविणाऱ्या टीचर पेक्षा देखील जास्त दैवी गुण धारण करतात. बाबा सिद्ध करून सांगू शकतात. दाखवतात बाबा आमचा चार्ट पहा. आम्ही जराही कोणाला दुःख दिले नाही. बाबा म्हणतील - ‘हा मुलगा तर खूप गोड आहे. चांगला सुगंध पसरवत आहे’. टीचर बनणे तर सेकंदाचे काम आहे. टीचर पेक्षाही स्टुडंट आठवणीच्या यात्रेमध्ये वेगाने निघून जातात. तीव्र गतीने निघून जातात. तर ते टीचर पेक्षाही उच्च पद प्राप्त करतील. बाबा तर विचारतात, कोणाला टीच करता का? रोज शिवाच्या मंदिरामध्ये जाऊन टीच करा - शिवबाबा कसे येऊन स्वर्गाची स्थापना करतात? स्वर्गाचे मालक बनवतात. समजावून सांगणे खूपच सोपे आहे. बाबांना चार्ट पाठवून देतात - बाबा आमची अवस्था अशी आहे. बाबा विचारतात - मुलांनो, कोणते विकर्म तर करत नाही ना? क्रिमिनल आय उलटे-सुलटे काम तर करवून घेत नाही ना? आपले मॅनर्स, कॅरेक्टर (शिष्टाचार, आचरण) पहायचे आहे. आचरणाचा संपूर्ण आधार डोळ्यांवर आहे. डोळे अनेक प्रकारे धोका देतात. न विचारता थोडासा जरी पदार्थ घेऊन खाल्ला तर ते देखील पाप बनते कारण परवानगी शिवाय उचलले ना. इथे कायदे खूप आहेत. शिवबाबांचा यज्ञ आहे ना. इन्चार्जला विचारल्या शिवाय तुम्ही खाऊ शकत नाही. एकाने खाल्ले तर बाकीचेही असेच करू लागतील. वास्तविक इथे कोणतीही वस्तू कुलूपामध्ये ठेवण्याची गरज नाही. कायदा सांगतो या घरामध्ये, किचनच्या समोर कोणीही अपवित्र येता कामा नये. बाहेर तर अपवित्र-पवित्रतेचा प्रश्नच नाही. परंतु स्वतःला पतित तर म्हणतात ना. सर्व पतित आहेत. वल्लभाचारींना किंवा शंकराचार्याला कोणी हात लावू शकत नाही कारण ते समजतात आपण पावन आहोत, हे पतित आहेत. भले इथे सर्वांची शरीरे पतित आहेत तरी देखील पुरुषार्थानुसार विकारांचा संन्यास करतात. तर निर्विकारीच्या समोर विकारी मनुष्य डोके टेकतात. म्हणतात - हे खूप स्वच्छ धर्मात्मा मनुष्य आहेत. सतयुगामध्ये तर म्लेंछ असत नाहीत. आहेच पवित्र दुनिया. एकच कॅटेगरी (धर्म) आहे. तुम्ही या सर्व रहस्याला जाणता. सुरुवातीपासून सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे रहस्य बुद्धीमध्ये राहिले पाहिजे. आपण सर्व काही जाणतो. अजून काही जाणण्याचे राहतच नाही. रचता बाबांना जाणले, सूक्ष्मवतनला जाणले, भविष्य पदाला जाणले, ज्याच्यासाठीच तुम्ही पुरुषार्थ करता; आणि तरीही जर असे वर्तन असेल तर उच्च पद प्राप्त करू शकणार नाही. कोणाला दुःख देतात, विकारामध्ये जातात किंवा वाईट दृष्टी ठेवतात, तर हे देखील पाप आहे. दृष्टी बदलणे हे खूप मेहनतीचे काम आहे. दृष्टी खूप चांगली पाहिजे. डोळे बघतात - हे क्रोध करतात तर मग आपणही भांडायला लागतात. शिवबाबांवर जरा सुद्धा प्रेम नाही. आठवणच करत नाहीत. बलिहारी शिवबाबांची आहे. ‘बलिहारी गुरु आपकी…’ बलिहारी त्या सद्गुरूची ज्यांनी गोविंद श्रीकृष्णाचा साक्षात्कार घडवला. गुरु द्वारे तुम्ही गोविंद बनता. केवळ साक्षात्काराने काही तोंड गोड होत नाही. मीरेचे तोंड गोड झाले का? खरोखरची स्वर्गामध्ये तर गेली नाही. तो आहे भक्तीमार्ग त्याला स्वर्गाचे सुख म्हणता येणार नाही. गोविंदला केवळ पहायचे नाही, असे बनायचे आहे. तुम्ही इथे आलाच आहात असे बनण्यासाठी. हा नशा राहिला पाहिजे आपण त्यांच्याकडे जातो जे आपल्याला असे बनवतात. तर बाबा सर्वांना हे मत देतात - चार्टमध्ये हे देखील लिहा - ‘डोळ्यांनी धोका तर दिला नाही ना? पाप तर केले नाही ना?’ डोळे कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये धोका जरूर देतात. डोळे एकदम शितल झाले पाहिजेत. स्वतःला अशरीरी समजा. ही कर्मातीत अवस्था शेवटी होईल. ते देखील जेव्हा बाबांना आपला चार्ट पाठवाल. भले धर्मराजाच्या रजिस्टरमध्ये ऑटोमॅटिकली सर्व काही जमा होते. परंतु जेव्हा की बाबा साकारमध्ये आलेले आहेत, तर म्हणतात - साकारला माहीत असणे आवश्यक आहे. म्हणजे मग सावध करतील. क्रिमिनल आय किंवा देह-अभिमानवाला असेल तर वायुमंडळाला अशुद्ध करेल. इथे बसलेले असताना देखील बुद्धीयोग बाहेर जातो. माया खूप धोका देते. मन खूप तुफानी आहे. किती मेहनत करावी लागते - असे बनण्यासाठी. बाबांकडे येतात, बाबा ज्ञानाने श्रृंगार करतात आत्म्यांचा. तुम्ही समजता आपण आत्मे ज्ञाना द्वारे पवित्र होणार. मग शरीर देखील पवित्र मिळेल. आत्मा आणि शरीर दोन्ही पवित्र सतयुगामध्ये असतात मग अर्ध्या कल्पा नंतर रावण राज्य सुरु होते. मनुष्य म्हणतील - भगवंताने असे का केले? हा अनादि ड्रामा पूर्व-नियोजित आहे. भगवंताने थोडेच काही केले. सतयुगामध्ये असतोच - एक देवी-देवता धर्म. काहीजण म्हणतात अशा भगवंताची आम्ही आठवणच का करावी. परंतु तुमचा दुसऱ्या धर्माशी काहीही संबंध नाही. जे काटे बनले आहे तेच येऊन फूल बनतील. मनुष्य म्हणतात - ‘भगवान काय फक्त भारतवासीयांनाच स्वर्गामध्ये घेऊन जातील, आम्ही मानत नाही, भगवंताला सुद्धा दोन डोळे आहेत की नाहीत!’ परंतु हा तर ड्रामा पूर्व नियोजित आहे. सर्वच स्वर्गामध्ये आले तर अनेक धर्मांचा पार्ट कसा चालेल? स्वर्गामध्ये इतके करोड असत नाहीत. पहिली आणि सर्वात मुख्य गोष्ट आहे - ‘भगवान कोण आहेत’, त्यांना तर समजून घ्या. हेच समजले नसेल तर अनेक प्रश्न विचारत राहतील. स्वतःला आत्मा समजतील, तर म्हणतील ही गोष्ट तर ठीक आहे. आपल्याला पतितापासून पावन जरूर बनायचे आहे. आठवण करायची आहे त्या एकाची. सर्व धर्मांमध्ये भगवंताची आठवण करतात.

तुम्हा मुलांना आता हे ज्ञान मिळत आहे. तुम्ही समजता हे सृष्टी चक्र कसे फिरते. तुम्ही प्रदर्शनीमध्ये देखील किती समजावून सांगता. फार थोडे निघतात. परंतु असे थोडेच म्हणणार की, कोणी निघत नाहीत म्हणून करायलाच नाही पाहिजे. ड्रामामध्ये होते, ते केले; प्रदर्शनीमधून काही ठिकाणी निघाले देखील आहेत, कुठे नाही निघत. पुढे जाऊन येतील, उच्च पद प्राप्त करण्याचा पुरुषार्थ करतील. कोणाला कमी पद घ्यायचे असेल तर इतका पुरुषार्थ करणार नाहीत. बाबा मुलांना तरी देखील समजावून सांगत आहेत, कोणतेही विकर्म करू नका. हे देखील तपासा की आपण कोणाला दुःख तर दिले नाही? कोणाशी भांडण-तंटा तर केला नाही? उलट-सुलट तर बोललो नाही? कोणते अकर्तव्य कार्य (बेजबाबदारपणाचे कृत्य) तर केले नाही ना? बाबा म्हणतात - जी विकर्म केली आहेत ती लिहा. हे तर जाणता द्वापरपासून विकर्म करत आता खूप विकर्मी बनला आहात. बाबांना लिहून दिल्याने ओझे हलके होईल. लिहितात - ‘आम्ही कोणाला दुःख देत नाही’. बाबा म्हणतील - ठीक आहे, चार्ट घेऊन या तेव्हा पाहू. बाबा बोलावतील देखील की, अशा चांगल्या मुलांना मला बघू दे तरी. सपूत मुलांना बाबा खूप प्रेम करतात. बाबा जाणतात अजून कोणीही संपूर्ण बनलेला नाही. बाबा प्रत्येकाला बघतात, कसा पुरुषार्थ करत आहेत. मुले चार्ट लिहीत नाहीत तर जरूर काही दोष आहेत, जे बाबांपासून लपवत आहेत. खरा ऑनेस्ट मुलगा त्यालाच समजतो जो चार्ट लिहितो. चार्ट सोबत मग मॅनर्स देखील पाहिजेत. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) आपले ओझे हलके करण्यासाठी जी काही विकर्म झालेली आहेत, ती बाबांना लिहून द्यायची आहेत. आता कोणालाही दुःख द्यायचे नाही. सपूत बनून रहायचे आहे.

२) आपली दृष्टी खूप चांगली बनवायची आहे. डोळे धोका देऊ नयेत - याची काळजी घ्यायची आहे. आपले मॅनर्स खूप-खूप चांगले ठेवायचे आहेत. काम-क्रोधाच्या अधीन होऊन कोणतेही पाप करायचे नाही.

वरदान:-
लक्ष्य आणि उद्दिष्टाला नेहमी स्मृतीमध्ये ठेवून तीव्र पुरुषार्थ करणारे सदा होली आणि हॅपी भव

ब्राह्मण जीवनाचे लक्ष्य आहे की कोणत्याही हदच्या आधाराशिवाय नेहमी आंतरिक खुशीमध्ये राहणे. जेव्हा हे लक्ष्य बदलून हदच्या प्राप्तींच्या छोटया-छोट्या गल्ल्यांमध्ये अडकता तेव्हा ध्येयापासून दूर होता. त्यामुळे काहीही झाले, हदच्या प्राप्तींचा त्याग देखील करावा लागला तर त्यांना सोडून द्या परंतु अविनाशी खुशीला कधीही सोडू नका. होली आणि हॅपी भवच्या वरदानाला नेहमी स्मृतीमध्ये ठेवून तीव्र पुरुषार्थाद्वारे अविनाशी प्राप्ती करा.

बोधवाक्य:-
गुणमुर्त बनून गुणांचे दान देत चला - हीच सर्वात मोठी सेवा आहे.

अव्यक्त इशारे:- सहजयोगी बनायचे असेल तर परमात्म प्रेमाचे अनुभवी बना.

मास्टर नॉलेजफुल, मास्टर सर्वशक्तिवानच्या स्टेजवर स्थित राहून भिन्न-भिन्न प्रकारच्या क्यू मधून बाहेर पडून, सदैव बाबांसोबत मिलन साजरे करण्याच्या धूनमध्ये आपला वेळ घालवा आणि लवलीन स्थितीमध्ये रहा तर सर्व व्यर्थ गोष्टी सहज समाप्त होतील, आणि मग तुमच्या समोर तुमची प्रजा आणि भक्तांची क्यू लागेल.