14-11-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड
मुलांनो - उच्च ते उच्च पद प्राप्त करायचे असेल तर आठवणीच्या यात्रेमध्ये मस्त रहा
- हीच आहे रुहानी फाशी, बुद्धी आपल्या घरी लटकलेली रहावी”
प्रश्न:-
ज्यांच्या
बुद्धीमध्ये ज्ञानाची धारणा होत नाही, त्यांची निशाणी काय असेल?
उत्तर:-
ते छोट्या-छोट्या गोष्टींवरून रंज (नाराज) होत राहतील. ज्यांच्या बुद्धीमध्ये जितके
ज्ञान धारण होईल तेवढे ते आनंदी राहतील. बुद्धीमध्ये जर हे ज्ञान राहिले की, आता
दुनियेची अधोगती होणारच आहे, यामध्ये नुकसानच होणार आहे, तर कधीही नाराज होणार
नाहीत. नेहमी आनंदी राहतील.
ओम शांती।
गोड-गोड रुहानी मुलां प्रती रूहानी बाबा बसून समजावून सांगत आहेत. मुले समजतात उच्च
ते उच्च भगवान म्हटले जाते. आत्म्याचा बुद्धियोग घराच्या दिशेने गेला पाहिजे. परंतु
दुनियेमध्ये असा एकही मनुष्य नाही, ज्याच्या बुद्धीमध्ये हे येत असेल. संन्याशी लोक
देखील ‘ब्रह्म’ला घर समजत नाहीत ते तर म्हणतात आम्ही ‘ब्रह्म’मध्ये लीन होणार, तर
घर थोडेच झाले. घरामध्ये तर रहायचे असते ना. तुम्हा मुलांची बुद्धी तिथेच राहिली
पाहिजे. जसे कोणी फासावर चढतो ना; तुम्ही आता रूहानी फाशीवर चढलेले आहात. मनामध्ये
आहे की आपल्याला उच्च ते उच्च बाबा येऊन, उच्च ते उच्च घरी घेऊन जातात. आता आपल्याला
घरी जायचे आहे. उच्च ते उच्च बाबा मग आम्हाला उच्च ते उच्च पद प्राप्त करून देतात.
रावण राज्यामध्ये सगळे नीच (पतित) आहेत. ते आहेत उच्च, हे आहेत नीच. त्यांना उच्च (श्रेष्ठते)
विषयी काही ठाऊकच नाही आहे. श्रेष्ठ असणाऱ्यांना देखील नीच असणाऱ्यांविषयी ठाऊक नाही
आहे. आता तुम्ही समजता उच्च ते उच्च एक भगवंतालाच म्हटले जाते. बुद्धी वरच्या दिशेने
जाते. ते आहेतच परमधाममध्ये राहणारे. असे कोणीही समजत नाही की, आपण आत्मे देखील
तिथले रहिवासी आहोत. इथे येतो केवळ पार्ट बजावण्याकरिता. हे कोणाच्याही बुद्धीमध्ये
राहत नाही. आपल्याच काम-धंद्यामध्ये व्यस्त राहतात. आता बाबा समजावून सांगतात -
उच्च ते उच्च तेव्हा बनाल जेव्हा आठवणीच्या यात्रेमध्ये मस्त रहाल. आठवणी द्वारेच
उच्च पद प्राप्त करायचे आहे. तुम्हाला जे नॉलेज शिकवले जाते, ते विसरायचे नाही. छोटी
मुले देखील वर्णन करतील. बाकी योगा विषयी मुलांना समजणार नाही. खूप मुले आहेत जी
आठवणीची यात्रा पूर्णपणे समजत नाहीत. आपण किती उच्च ते उच्च जातो. मूलवतन,
सूक्ष्मवतन, स्थूलवतन… ५ तत्व इथेच आहेत. सूक्ष्मवतन, मूलवतनमध्ये ही ५ तत्व नसतात.
हे नॉलेज बाबाच देतात म्हणून त्यांना ज्ञानाचा सागर म्हटले जाते. मनुष्य समजतात -
पुष्कळ शास्त्रे इत्यादी वाचणे म्हणजेच ज्ञान आहे. किती पैसे कमावतात. शास्त्र (धर्मग्रंथ)
वाचणाऱ्यांना किती मान मिळतो. परंतु आता तुम्ही समजता - या शास्त्रांमध्ये काही
श्रेष्ठता तर नाहीये. उच्च ते उच्च तर आहेतच एक भगवान. त्यांच्या द्वारे आपण उच्च
ते उच्च, स्वर्गामध्ये राज्य करणारे बनतो. स्वर्ग काय आहे, नरक काय आहे? ८४ चे चक्र
कसे फिरते? तुमच्या व्यतिरिक्त या सृष्टीमध्ये इतर कोणीही जाणत नाहीत, म्हणतात -
‘या सर्व तुमच्या कल्पना आहेत’. अशा व्यक्तीसाठी हेच समजायचे आहे की हा आपल्या
कुळातील नाही. निराश होता कामा नये. समजून येते - यांचा इथे पार्टच नसेल, तर काहीच
समजू शकणार नाहीत. आता तुम्हा मुलांची मान अभिमानाने खूप ताठ होते. जेव्हा तुम्ही
श्रेष्ठ दुनियेमध्ये असाल तेव्हा तुम्हाला नीच दुनिये विषयी समजणार नाही. नीच
दुनियावाले मग श्रेष्ठ दुनियेला जाणत नाहीत. त्याला म्हटलेच जाते स्वर्ग. परदेशी भले
स्वर्गामध्ये जात नाहीत तरी देखील नाव तर घेतात, हेवन पॅराडाईज होते. मुस्लिम लोक
देखील बहिश्त म्हणतात. परंतु हे त्यांना ठाऊक नाहीये की तिथे कसे जायचे असते. आता
तुम्हाला किती समज (ज्ञान) मिळते आहे, उच्च ते उच्च बाबा किती नॉलेज देतात. हा
ड्रामा कसा वंडरफुल बनलेला आहे. जे ड्रामाच्या रहस्याला जाणत नाहीत ते याला कल्पना
आहे असे म्हणतात.
तुम्ही मुले जाणता -
ही तर आहेच पतित दुनिया, म्हणूनच ओरडतात - ‘हे पतित-पावन या, येऊन पावन बनवा’. बाबा
म्हणतात - दर ५ हजार वर्षा नंतर इतिहास रिपीट होतो. जुनी दुनिया सो नवीन बनते
म्हणून मला यावे लागते. कल्प-कल्प येऊन तुम्हा मुलांना श्रेष्ठ ते श्रेष्ठ बनवतो.
पावन असणाऱ्याला श्रेष्ठ आणि पतित असणाऱ्याला नीच म्हटले जाते. हीच दुनिया नवीन
पावन होती, आता तर पतित आहे. या गोष्टी तुमच्यामध्ये देखील नंबरवार आहेत जे समजतात.
ज्यांच्या बुद्धीमध्ये या गोष्टी राहतात ते नेहमी आनंदी राहतात. बुद्धीमध्ये नसेल
तर कोणी काही म्हटले, काही नुकसान झाले तर नाराज होतात. बाबा म्हणतात - आता या
तुच्छ दुनियेचा अंत जवळ आला आहे. ही आहे जुनी दुनिया. मनुष्य किती नीच बनतात. परंतु
असे कोणी समजतात थोडेच की आपण नीच आहोत. भक्त लोक नेहमी माथा झुकवतात, नीच
असणाऱ्यासमोर थोडेच डोके टेकवायचे असते. पवित्र असणाऱ्यासमोर डोके टेकवायचे असते.
सतयुगामध्ये असे कधी होत नाही. भक्त लोकच असे करतात. बाबा तर असे म्हणत नाहीत की,
डोके झुकवून चाला. नाही हे तर शिक्षण आहे. गॉडफादरली युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही
शिकत आहात. तर किती नशा राहिला पाहिजे. असे नाही, फक्त युनिव्हर्सिटीमध्ये आले की
नशा राहील आणि घरी गेल्यावर उतरून जाईल. घरी देखील नशा राहिला पाहिजे. इथे तर तुम्ही
मुले जाणता शिवबाबा आपल्याला शिकवत आहेत. हे (ब्रह्मा बाबा) तर म्हणतात की मी थोडाच
ज्ञानाचा सागर आहे. हे बाबा देखील ज्ञानाचे सागर नाहीत. सागरातून नदी निघते ना.
सागर तर एक आहे, ब्रह्मपुत्रा सर्वात मोठी नदी आहे. खूप मोठ्या आगबोटी येतात. नद्या
तर बाहेर देशात देखील खूप आहेत. पतित-पावनी गंगा असे फक्त इथेच म्हटले जाते.
बाहेरच्या देशांमध्ये कोणत्याही नदीला असे म्हटले जात नाही. पतित-पावनी नदी असेल तर
मग गुरु करण्याची काहीच गरज नाही. नद्यांमागे, तलावांमागे किती भटकत राहतात. काही
ठिकाणी तर तलाव इतके घाणेरडे असतात, काही विचारू नका. त्यातील माती उचलून अंगाला
रगडत राहतात. आता लक्षात आले आहे - हे सगळे खाली उतरण्याचे (अधोगतीला जाण्याचे)
रस्ते आहेत. ते भक्त लोक किती प्रेमाने जातात. आता तुम्ही समजता की, या ज्ञानाने तर
आमचे डोळेच उघडले आहेत. तुमचा ज्ञानाचा तिसरा नेत्र उघडला आहे. आत्म्याला तिसरा
नेत्र मिळतो म्हणूनच त्रिकालदर्शी म्हटले जाते. तिन्ही काळांचे ज्ञान आत्म्यामध्ये
येते. आत्मा तर बिंदू आहे, त्याला नेत्र कसा असू शकेल. या सर्व समजून घेण्याच्या
गोष्टी आहेत. ज्ञानाच्या तिसऱ्या नेत्राद्वारे तुम्ही त्रिकालदर्शी, त्रिलोकीनाथ
बनता. नास्तिक पासून आस्तिक बनता. या आधी तुम्ही रचयिता आणि रचनेच्या
आदि-मध्य-अंताला जाणत नव्हता आता बाबांद्वारे रचनेच्या आदि-मध्य-अंताला जाणल्याने
तुम्हाला वारसा मिळत आहे. हे नॉलेज आहे ना. इतिहास-भूगोल देखील आहे, हिशोब आहे ना.
अच्छा, हुशार मुलगा असेल तर हिशोब करावा की, आपण किती जन्म घेतो, या हिशोबाने इतर
धर्मवाल्यांचे किती जन्म असतील. परंतु बाबा म्हणतात - या सर्व गोष्टींमध्ये जास्ती
डोकेफोड करण्याची गरज नाही. टाईम वेस्ट होईल. इथे तर सर्व काही विसरायचे आहे. हे
सांगण्याची गरजच नाही. तुम्ही तर रचता बाबांची ओळख देता, ज्यांना कोणीही जाणत नाही.
शिवबाबा भारतामध्येच येतात. जरूर काही करून जातात तेव्हाच तर शिवजयंती साजरी करतात
ना. गांधीजी अथवा कोणी साधू इत्यादी होऊन गेले आहेत, त्यांचे स्टॅम्प (पोस्टाची
तिकिटे) बनवतात. फॅमिली प्लॅनिंगचे देखील स्टॅम्प बनवतात. आता तुम्हाला तर नशा आहे
- आम्ही तर पांडव गव्हर्मेंट आहोत. ऑलमाइटी बाबांचे गव्हर्मेंट आहे. तुमचा हा कोट
ऑफ आर्मस (राज चिन्ह) आहे. इतर कोणीही या कोट ऑफ आर्मसला जाणतच नाहीत. तुम्ही समजता
की, विनाश काले प्रीत बुद्धी आपलीच आहे. बाबांची आपण खूप आठवण करतो. बाबांची आठवण
करता-करता प्रेमाने अश्रू येतात. बाबा, तुम्ही आम्हाला अर्ध्याकल्पासाठी सर्व
दुःखांपासून दूर करता. इतर कोणत्याही गुरू अथवा मित्र-संबंधी इत्यादी कोणाचीही आठवण
करण्याची गरज नाही. एका बाबांचीच आठवण करा. पहाटेची वेळ खूप चांगली आहे. बाबा तुमची
तर खूप कमाल आहे. दर ५ हजार वर्षानंतर तुम्ही आम्हाला जागे करता. सर्व मनुष्य मात्र
कुंभकर्णाच्या आसुरी झोपेमध्ये झोपी गेले आहेत अर्थात अज्ञान अंध:कारामध्ये आहेत.
आता तुम्ही समजता भारताचा प्राचीन योग तर हा आहे, बाकी जे काही इतके हठयोग इत्यादी
शिकवतात, ते सर्व आहेत - शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठीचे व्यायाम. आता तुमच्या
बुद्धीमध्ये सर्व ज्ञान आहे त्यामुळे आनंद वाटतो. इथे येता, समजता बाबा रिफ्रेश करत
आहेत. कोणी मग इथे रिफ्रेश होऊन बाहेर जातात आणि तो नशाच खलास होतो. नंबरवार तर
आहेत ना. बाबा समजावून सांगतात - ही आहे पतित दुनिया. बोलावतात देखील - ‘हे
पतित-पावन या’, परंतु स्वतःला पतित समजतात थोडेच, म्हणून मग पाप धुण्यासाठी जातात.
परंतु शरीराला थोडेच पाप लागते. बाबा तर येऊन तुम्हाला पावन बनवतात आणि म्हणतात -
मामेकम् (मज एकाची) आठवण करा तर तुमची विकर्मे विनाश होतील. हे ज्ञान आता तुम्हाला
मिळाले आहे. भारत स्वर्ग होता, आता नरक आहे. तुम्ही मुले तर आता संगमावर आहात. कोणी
विकारांमध्ये जातात तर फेल होतात, जसे काही नरकामध्ये जाऊन कोसळतात. पाचव्या
मजल्यावरून कोसळतात, मग १०० पटीने सजा खावी लागते. तर बाबा समजावून सांगत आहेत की
भारत किती श्रेष्ठ होता, आता किती नीच आहे. आता तुम्ही किती हुशार बनता. मनुष्य तर
किती बेसमज (अडाणी) आहेत. बाबा तुम्हाला इथे किती नशा चढवतात, आणि मग बाहेर
गेल्यावर नशाच कमी होऊन जातो, स्टुडंट कोणती मोठी परीक्षा पास करतात तर त्यांना काही
कमी नशा असतो का? शिकून पास होतात आणि मग काय-काय बनत जातात. आता बघा दुनियेची काय
हालत झाली आहे. तुम्हाला उच्च ते उच्च बाबा येऊन शिकवत आहेत. ते देखील निराकार.
तुम्ही आत्मे देखील निराकार आहात. इथे पार्ट बजावण्यासाठी आला आहात. हे ड्रामाचे
रहस्य बाबाच येऊन समजावून सांगतात. या सृष्टी चक्राला ड्रामा देखील म्हटले जाते.
त्या (दुनियेतील) नाटकामध्ये तर कोणी आजारी पडले तर बाहेर पडतात. हे आहे बेहदचे
नाटक. यथार्थ रित्या तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे, तुम्ही जाणता आपण इथे पार्ट
बजावण्याकरिता आलो आहोत. आम्ही बेहदचे ॲक्टर्स आहोत. इथे शरीर घेऊन पार्ट बजावतो,
बाबा आलेले आहेत - हे सर्व बुद्धीमध्ये असले पाहिजे. बेहदचा ड्रामा किती बुद्धीमध्ये
राहिला पाहिजे. बेहद विश्वाची बादशाही मिळते तर त्यासाठी पुरुषार्थ देखील असा चांगला
केला पाहिजे ना. गृहस्थ व्यवहारामध्ये देखील भले रहा परंतु पवित्र बना. परदेशामध्ये
अशी बरीच लोक आहेत वृद्ध होतात तेव्हा मग कंपेनियनशिपसाठी (सोबत मिळावी म्हणून)
लग्न करतात, एकमेकांना सांभाळण्यासाठी करतात आणि मग विल करतात. थोडे त्यांना देतात
थोडे चॅरीटीला देतात. विकाराची गोष्ट नसते. अशिक माशुक देखील विकारासाठी फिदा होत
नाहीत. फक्त देहाचे प्रेम असते. तुम्ही आहात रुहानी आशिक, एक माशुकची आठवण करता.
सर्व आशिकांचा एक माशुक आहे. सर्वजण एकाचीच आठवण करतात. ते किती सुंदर आहेत. आत्मा
गोरी (पवित्र) आहे ना. ते आहेत एव्हर गोरे (सदा पावन). तुम्ही तर सावळे बनला आहात,
तुम्हाला ते सावळ्या पासून गोरे (पावन) बनवतात. हे तुम्ही जाणता की बाबा आम्हाला
गोरा बनवत आहेत. इथे असे बरेच आहेत जे ठाऊक नाही कसल्या-कसल्या विचारांमध्ये बसलेले
असतात. शाळेमध्ये असे होते - बसल्या-बसल्या बुद्धी कुठे चित्रपटाकडे, मित्र
इत्यादींकडे जाते. सत्संगामध्ये देखील असे होते. इथे देखील असे आहे, बुद्धीमध्ये
रहात नाही त्यामुळे मग नशाच चढत नाही, धारणाच होत नाही - जी मग इतरांकडून करवून
घेतील. अशा बऱ्याच मुली येतात, ज्यांची इच्छा असते की, सेवेसाठी कुठे जावे परंतु
मुले लहान आहेत. तर बाबा म्हणतात - मुलांना सांभाळण्यासाठी एखाद्या मातेला ठेवा. ही
तर अनेकांचे कल्याण करेल. हुशार आहे तर का नाही रुहानी सेवेमध्ये सहभागी होणार.
पाच-सहा मुलांना सांभाळण्यासाठी एखाद्या मातेला ठेवा. आता या मातांची पाळी आहे ना.
नशा खूप असला पाहिजे. पुढे असे होईल, पुरुष बघतील की, आपल्या पत्नीने तर संन्याशांना
देखील जिंकले आहे. या माता लौकिकचे आणि पारलौकिकचे नाव मोठे करून दाखवतील. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) तुम्हाला
बुद्धीने सर्व काही विसरायचे आहे. ज्या गोष्टींमध्ये वेळ वाया जातो, त्या ऐकण्याची
आणि ऐकविण्याची गरज नाही.
२) अभ्यासाच्या वेळी
बुद्धीयोग एका बाबांसोबत लागलेला असावा, बुद्धी कुठेही भटकता कामा नये. निराकार बाबा
आम्हाला शिकवत आहेत, याच नशेमध्ये रहायचे आहे.
वरदान:-
आपल्या
महानतेला आणि महिमेला जाणणारे सर्व आत्म्यांमध्ये श्रेष्ठ विश्वाद्वारे पूज्यनीय भव
प्रत्येक ब्राह्मण
बच्चा वर्तमान समयी विश्वातील सर्व आत्म्यांपेक्षा श्रेष्ठ आहे आणि भविष्यामध्ये
विश्वाद्वारे पूजनीय आहे. नंबरवार असताना देखील लास्ट नंबरचा मणी देखील विश्वासमोर
महान आहे. आतापर्यंत भक्त आत्मे लास्ट नंबरच्या मण्याला देखील डोळ्यांवर ठेवतात (डोळ्यांना
स्पर्श करतात) कारण सर्व मुले बापदादांच्या नयनातील तारे आहेत, नुरे रत्न आहेत.
ज्याने एकदा जरी मनापासून, सच्च्या दिलाने स्वतःला बाबांचा मुलगा म्हणून निश्चय केले,
डायरेक्ट बाबांचा मुलगा बनला त्याला महान अथवा पूजनीय बनण्याची लॉटरी आणि वरदान
मिळतेच मिळते.
बोधवाक्य:-
स्थिती सदैव
खजिन्यांनी संपन्न आणि संतुष्ट असेल तर सर्व परिस्थिती बदलतात.
अव्यक्त इशारे:-
अशरीरी आणि विदेही स्थितीचा अभ्यास वाढवा.
बापदादा अचानक
डायरेक्शन देतील की, या शरीर रुपी घराला सोडून, देह-अभिमानाच्या स्थितीला सोडून
देही-अभिमानी बना, या दुनियेपासून परे (दूर) आपल्या स्वीट होममध्ये निघून जा, तर
जाऊ शकता? युद्ध स्थळावर युद्ध करता-करता वेळ तर घालवणार नाही ना! अशरीरी बनण्यासाठी
जर युद्ध करण्यामध्येच वेळ गेला तर अंतिम पेपरमध्ये मार्क्स अथवा ग्रेड कोणती
मिळेल!